होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का..ही..ही.. हा भाऊ...

(आम्हाला तुमची व्यंगचित्र हवी आहेत. त्यासाठी तरी बघाच हि मालिका.)

अक्षरशः भंगारापेक्षा बाद झाली आहे ही सिरियल.
कुणीतरी या धाग्याची लिंक तिला आणि त्याला मेल करा खोटा आयडी घेऊन.
दोघं ही सन्यास घेतील आणि आपली सुटका होईल

दक्षिणा,

आता तर लोक इतके चिडलेत की स्वतःच्या खर्‍या आय डी ने ही मेल करतील Proud

परवा तर एक वाचकांचे पत्रही आले होते पेपरात.

मालिकेची लेखिका गायबच आहे वाटते. रेशिमगाठी मध्ये पण दिसत नाही हल्ली. लेखनही नाही आणि अभिनयही नाही.

दोघं ही सन्यास घेतील आणि आपली सुटका होईल<<< नाही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

ही मालिका किती वाईट आहे तरी लोकं बघत आहेत त्यावर ह्साण्यासाठी का होइना बघत आहेत याचा अर्थ टीआरपी आहे.

झेला!!!

हे बरय, त्या कडबोळीच्या नसलेल्या ( जुयेरेगा सिरीयलमध्ये) आईला आजारी पाडायचे, मग कडबोळी माहेरी जाणार, तेवढ्या वेळात एक एकादशी पार पाडणार. आणी कडबोळीची बुन्दी म्हणणार बाबा, आई कधी येणार? दोन पकाऊ सिरीयलमध्ये एकच अ‍ॅक्टर्+लेखिका.

काल या मालिकेच्या हिंदी व्हर्जनचे (नक्की नाव माहित नाही) ट्रेलर पाहिले. आईआज्जीच्या भुमिकेत फरिदा जलाल आहे.>>>>>>>>>>>>>>>>>>> सतरंगि ससुराल असे नाव आहे म्हणे त्या हिंदि सिरियल चे... बाकी काल सर्फिन्ग करता करता त्या जानीचं भीशण हसणं पाहिल... horror movie मधे हडळी चा रोल नक्कि मिळेल :रागः

शनिवारच्या मटाला एक पत्र आलंय. ह्या मालिकेच्या टीमने एक पूर्ण दिवस अनाथ आश्रमात घालवला. बाकी कलाकारांनी एक दिवसाचे मानधन घेतले नाही पण दोघानी घेतले production houseकडून, त्यांचा दिवस खर्च झाला म्हणून, डायरेक्ट नावं नाहीयेत पण बहुतेक ती दोघे शशांक आणि तेजश्री असावीत असा अंदाज पत्रातल्या शेवटच्या वाक्यावरून येतो.

अन्जू बातमी खरी आहे. आणि पैसे दोघांनी नाही. फक्त या बाईंनी घेतले आहेत.
पण ही घटना खूप जुनी आहे, सध्या नविन घडली आहे का? मग दोघांनी घेतले असतील
वाण नै पण गुण लागणे म्हनत असतील याला

दक्षे परवाच्या शनिवारी ते पत्र प्रसिद्ध झालेय. अनाथाश्रमात शुटींग आधीपण झालं होतं का? का नवीन झालंय.

अरेच्चा! हि बातमी तर खुपचं जुनी आहे. आधीच्या धाग्यावर याची चर्चा झाली होती. काहीशे भाग पुर्ण झाल्यानिमित्त सगळी टीम तिकडे गेली होती आणि त्यावेळी 'फक्त तेजश्री' ने पैसे घेतल्याचे वाचलेले आठवते आहे.
एकतर ते पत्र मटाकडे खुप 'लवकर' पोचले असेल किंवा छापायला दुसरे काही नाही म्हणुन ते पत्र छापले असेल!

ओके ओके परवाच पत्र आलं मला वाटलं आता अनाथाश्रमाचा वगैरे नवीन track असेल, दाखवायचं असेल अजून.

श्रीच्या तोंडी मध्ये काही कळकळीचे वाक्य होते अनाथाश्राबाद्द्ल ते रो ह च्या तोंडी शोभले असते असा उल्लेख आहे आणि बहुतेक आश्रमात पूर्वीच गेले होते पण श्रीच्या तोंडीचे वाक्य आत्ता कधीतरी होतं.

sorry मी confused झाले, पत्रात दोन संदर्भ आहेत पण पैसे दोघांनी घेतले असा उल्लेख आहे.

जौ दे ना अन्जूडे. इतका नको विचार करू. पैसे घेतले ना त्यांनी? पुरता धंदेवाईकपणा केला माणुसकी न दाखवता Sad

आजच्या प्रोमोमध्ये जान्हवी एका मुलिला शिकवताना दाखवली . नाव काहितरी दिशा होते. चूभूदेघे. मालिकेने लीप घेतला काय Uhoh

काल ते सारखं सारखं बाळाविषयी बोलुन नवीन जोडप्यावर ताण येतो असा संदेश होता.
बालिका वधु मध्ये एपिसोड संपतांना कंपल्सरी एक मेसेज देतातच तसं सुरु केलंय यांनी.
काल हॅपी जर्नी निमित्ताने अकु आणि प्रिबा आले होते. मोजुन ३ मिनिटे.

Pages