होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>सीरिअल्समधले डॉक्टर्स नाडीचे ठोके बघुनच प्रेग्नन्सीचं निदान करु शकतात हो... केवढे ते स्किल्स>>

Happy Happy Happy

हे भारी

गोगो!! Lol मस्त उत्तर.. Happy वर्षानुवर्ष सिनेमा, मालिकांमध्ये हेच दाखवत आले आहेत.. त्यामुळे असंच असतं, असंच कोणालाही वाटेल ना?

सीरिअल्समधले डॉक्टर्स नाडीचे ठोके बघुनच प्रेग्नन्सीचं निदान करु शकतात हो >>>

मला नेहमी वाटायच की ते खरच असं करतात Happy
म्हणजे दोन जीवांची म्हणून त्याना नाडीचे ठोकेही २ ऐकू येत असतिल , त्यावरून त्याना कळत असेल

सिरियसली , नॉट जोकिंग Sad

स्वस्ति, अगदी खरं.. म्हणूनच मी ही सुरुवातीलाच म्हणाले, माझा जेन्यूइन प्रश्न आहे म्हणून.. मलाही हे असंच होतं, असं वाटायचं.. Uhoh

सानी, ब्लड नाही - घरी येऊन युरिन टेस्ट करतात.
पण आपल्या बालमनावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून सांकेतिकरित्या नाडीचे ठोके दाखवायला सुरूवात झाली.
आता डायरेक्ट प्रेग्नन्सी डिटेक्शन कीटच्या जाहिराती राजरोस दाखविल्या जातात तरी सांकेतिक भाषा काही बदलत नाही.
Happy

पण आपल्या बालमनावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून सांकेतिकरित्या नाडीचे ठोके दाखवायला सुरूवात झाली.>>>

सातीदी , पण त्याचा तसाही विपरीत परिणाम झालाच ना , माझ्या आणि सानी आणि न जाणे आणखी अशा किती बाल्मनावर Wink

साती..धन्यवाद, नीट क्लियर केल्याबद्दल Happy तू म्हटल्या प्रमाणे सीनचा विचार केला तर त्यात नक्कीच बालमनावर विपरित परिणाम होण्याचे पोटेंशियल आहे, मात्र चुकीची माहिती नक्कीच नाही जाणार त्यातून Happy

स्वस्ति Lol

अरेच्चा असं असतं होय ते. नणंदेने काल मला कैतरी भलतंच उत्तर दिलं. Uhoh अन् मी पण असेल हो म्हणून विश्वास पण ठेवला. कोणावर विश्वास ठेवायची सोय राहिलेली नाही. Sad

अरेच्चा असं असतं होय ते. नणंदेने काल मला कैतरी भलतंच उत्तर दिलं. अ ओ, आता काय करायचं अन् मी पण असेल हो म्हणून विश्वास पण ठेवला.>>

घ्या ! आता टोटल चार झाली बाल्मनं Wink Light 1

हे बर आहे !
हे असे प्रश्न जानी ला पडले असते तर ??? ( पडले पण असतिल )

मग त्यावरची चर्चा विशयाला धरून होणार का?

जानी कडे खरंच गुड न्यूज आहे का? अरे देवा. म्हणजे प्रत्यक्षातही ही बया बारसं केल्याशिवाय प्रेक्षकांच्या मानगुटीवरून उठणार नाही. Uhoh

Sad हो गं बाई !
पण त्या अगोदर तिचे मळमळणं , खाण्यापिण्याचे डोहाळे , डोहाळेजेवण , (झालिच तर ) डिलेवरीमधली कॉम्प्लिकेशनस सगळं बघायला लागेल .

आता सुनेच्या सुना येऊन ती मालिका चालवणार आहेत म्हणे... मोठी आज्जी, दुसरी आज्जी, इत्यादी इत्यादी ..
Proud

हो, मग शाळान्ची डोनेशनं वैगरे असन्ख्य प्रकार "आईआज्जीच्या" तत्त्वात न बसणं आनी पर्यावरणाचा र्‍हास यावर मध्ये मध्ये श्री श्री श्रीरंग गोखल्यांची प्रवचने...

त्या जानीला खेटरं पडायला लागल्यावर परत एक्दा सिरिअल बघावीशी वाटायला लागली. ती (पडद्यावर)दु:ख्खी असली तर जरा कमी डोक्यात जाते.

दोन्ही बाजुने कचाट्यात सापडल्यावरची होणारी घालमेल दाखवतानाचा जान्हवीचा अभिनय आवडतोय मला तरी.

पण एकुणात मुळ मुद्दयाचे बोलायला गोखले कुटुंब कधी शिकणार देवास ठाउक. Sad

Pages