होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ लय भारी काढलत.:फिदी:

खरे तर झी मराठी ने आता आदर्श सहनशील प्रेक्षक असा पुर्स्कार द्यायला हरकत नसावी.:फिदी: नुसतच नट-नट्या आणी सहायक बक्षिसे कशाला? एक अट ठेवायची की जो या पुढील सर्व एपिसोड न चुकता बघील, त्याला मानाने झी गौरव आजीवन आदर्श सहनशील प्रेक्षक म्हणून गौरवले जाईल.:फिदी:

खरे तर झी मराठी ने आता आदर्श सहनशील प्रेक्षक असा पुर्स्कार द्यायला हरकत नसावी.फिदीफिदी नुसतच नट-नट्या आणी सहायक बक्षिसे कशाला? एक अट ठेवायची की जो या पुढील सर्व एपिसोड न चुकता बघील, त्याला मानाने झी गौरव आजीवन आदर्श सहनशील प्रेक्षक म्हणून गौरवले जाईल. >>>>

माझे आजोबा (आता गेले बिचारे) लाईफटाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्डच्या वरताण बक्षीसाचे मानकरी ठरले असते.

चाद दिवस सासूचे
वहिनीसाहेब
या गोजिरवाण्या घरात
असंभव

या सर्व मालिकांचा एकही भाग न चुकवता बघण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.

नुसता एकदाच ना़ही, रिपीट टेलीकास्टला पाहण्याचा पण!

ह्या सिरियल्ची अख्खि टिम डोक्यावर जोराने आपटली आहे नक्किच. आता तर आईअजी पण वाण नाही गुण लागल्यासारखी वागतेय. Sad
आता पोर जन्माला घाला म्हणून मागं लागून ते होणार आहे का? आणि पोर म्हणजे काय आज ठरवलं उद्या आलं असं असतं का?
एकेक टॉपिक हातावेगळे करतात बहुतेक हे सगळे. एकच एक घेऊन बसायचं \
मूगाचे डोसे, उच्चारणे, पाकृ , करून पाहणे, खाऊ घालणे, मने जिंकणे - टास्क कंप्लिट.
ती एक येडी काकू तिच तो नवरा तो पण एक टॉपिकच होता.
गाडी शिकू का विचारणे, विरोध करणे, विरोध न जुमानणे, गनिमि काव्याने गाडी शिकणे, चालवून दाखवून एकदाच्या त्या श्री च्या डोम्बलावर ड्रायव्हिंग आणि कानावर आय लव्ह यू हाणणे.

आता बाळाल वेठिस धरले आहे.

श्री च्या डोम्बलावर ड्रायव्हिंग आणि कानावर आय लव्ह यू हाणणे. >>>> Rofl दक्षे हा असा विचार खुद्द शशांकने पण केला नसेल..

भाऊ मस्त काढलय.

ह्या मालिकेच्या लेखक, दिग्दर्शक मंडळीनी धागा वाचायला हवा. म्हणजे काही सुधारणा झाली तर !!!

तो अमेरिका वाला लक्ष्मीच ना? एवढा भारी नट त्या आयांच्या पोरकटपणात सहभागी होताना बघवत नाही. हट्टंगडीबाई भलत्याच बारीक झाल्यासारख्या वाटल्या.

तो अमेरिका वाला लक्ष्मीच ना?>>>>. नाही ग सुमेधा. लक्ष्मीकान्त श्रीचा काका, प्रसाद ओक. श्री चे बाबा म्हणजे रमाकान्त, मनोज जोशी. तो अमेरीका रिटर्न आहे.

<< माझे आजोबा (आता गेले बिचारे) लाईफटाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्डच्या वरताण बक्षीसाचे मानकरी ठरले असते.>> स्पार्टाकस, याचा अर्थ एवढाच कीं कांहीं मालिकांपेक्षांही असह्य अशी एखादी गोष्ट असूं शकते व ती म्हणजे - वृद्धावस्थेतलं एकाकीपण व रिकामपण !! Wink

दक्षे Rofl

भाऊकाका,
अहो एकाकी वगैरे नव्हते हो. आमच्या घरीच होते. आजी पण होती. ती जाम वैतागायची. त्यात त्यांना ऐकायला कमी येत असे त्यामुळे टी.व्ही. चा आवाज तारसप्तकात असायचा.

व्हाट्स अप वरून साभार !

होणार सुन.. मधील जान्हवीला होणारया मुलाबद्दल एकाने समर्पक नाव सुचविले आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
.

" श्रीफळ "

भाऊ व्यंगचित्र मस्त! आई देखिल परवा हेच म्हणत होती! सध्या काळ्या उडदांमध्ये का रे दुरावा जराशी गोरी आहे अजून, नवीन असल्याने चार दिवस संपले नाहीयेत अजून!
जाई हहपुवा Lol

होणार सुन मधील जान्हवीला होणारया मुलाबद्दल एकाने समर्पक नाव सुचविले आहे,.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
" श्रीफळ ".

माझे आईबाबा पण सिरीयल बघत बसतात त्यात बाबांना आवड नाहीये त्यामुळे ते involve नसतात पण आई प्रचंड involv होते आणि मी विशेष कुठल्याच सिरीयल बघत नाही अपवाद वगळता तर मला फोनवर विचारते की तू का बघत नाही त्या जान्हवीचे असं झालं आणि अमकीकडे असं झालं मग मी स्पष्ट सांगते मी फोन तुमच्या दोघांची विचारपूस करायला केलाय. श्री-जान्हवी आणि दुर्वा, मेघनासाठी नाही. मला सांगते सिरीयल बघत जा. (म्हणजे हिला चर्चा करायला एकजण मिळेल).

<< जान्हवीला होणारया मुलाबद्दल एकाने समर्पक नाव सुचविले आहे >> वा: ! हेंही आधींच पक्कं ठरवतां येतं का सिरीयलवाल्याना ! तरी पण 'श्रीदेवी' असंही कांहींतरी योजून ठेवा म्हणावं त्याना !! Wink
<< अहो एकाकी वगैरे नव्हते हो. आमच्या घरीच होते. >> स्पार्टाकस, इच्छा असूनही वॄद्धत्वामुळे बाहेर जातां येत नसलं तर घरींही एकाकी वाटूं शकत असावं !

स्पार्टाकस, इच्छा असूनही वॄद्धत्वामुळे बाहेर जातां येत नसलं तर घरींही एकाकी वाटूं शकत असावं ! >>> अहो तसं काही नाही भाऊकाका! शेवट्पर्यंत दोघे रोज दिवसातून दोनदा फिरायला जात, ते पण चांगले मैल-दोन मैल! कंटाळून आम्ही दुसरा टी.व्ही. घेतला होता!

<< अहो तसं काही नाही भाऊकाका! .... कंटाळून आम्ही दुसरा टी.व्ही. घेतला होता!>> स्पार्टाकस, मींही ज्येष्ठ नागरिक असल्याने माझ्या मनात असलेली घरींच बसायची पाळी येण्याची भिती कदाचित मीं तुमच्या आजोबाना चिकटवली असावी; सॉरी.
<< तो जोक आहे . एवढ्या गंभीरतेने घेऊ नका >> अहो, उलट मी कांहींच गंभीरतेने घेत नाही, ही तर माझ्याबद्दल घरच्यांची कायम गंभीर तक्रार आहे ! Wink

Pages