होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>डॉक्टरांनी सांगितलंय मुल होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवा. पण आम्हाला एकमेकाना भेटायला वेळच नाही म्हणून ती जानव्ही रडतेय. काय पण पाचकळपणा
डोकच फिरवताहेत ( तरीही बघण चालूच आह>><<

सासू मोड ऑन
>>अजून एकाच घरात रहातात ना? मग ... कशाला वेळ लागतोय? Proud
सासू मोड ऑफ.
तिचे ते गरागरा भोकरासारखे फिरणारे डोळे बघून वैताग वाटतो.

आणि तो हाय पीच आवाज, "काहीही श्री" म्हणतानाचा...

डॉक्टरांनी सांगितलंय मुल होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवा. पण आम्हाला एकमेकाना भेटायला वेळच नाही म्हणून ती जानव्ही रडतेय. काय पण पाचकळपणा
डोकच फिरवताहेत ( तरीही बघण चालूच आह>><< धन्य!!!! दिवस्/रात्र जरि एक केली तरी यांना काही मुलबाळ होणार नाही आहेत, उगीच प्रेक्षकांचा त्रास कसा वाढेल यावर धन्यता मानून हेही वर्ष घालवतील फुकट :):):):)

अरे त्या दोघांना कुणीतरी प्रौढ शिक्षण वर्गाला पाठवा रे च्यायला....

किंवा त्यांचे संवाद लिहीणाऱ्या अथवा लिहीणारीला....

डॉक्टरांनी सांगितलंय मुल होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवा<<< म्हणजे नक्की काय करा ते सांगितलं नाही का? Lol

नक्की काय करा ते सांगितलं नाही का? >> ते पण डॉक्टरांनीच सांगायचं का? Lol Rofl
अर्थात जान्हवी आणि श्री च्या बाबतीत उत्तर 'हो' असू शकतं Proud

अरे तो डॉक्टरांकडे जातात तो एपिसोड कधी होता. मला फक्त डॉक्टर बघायचेत म्हणून विचारते. लेडी डॉक्टर होती का?

असेल तर ती माझ्या बहीणीच्या सोसायटीत रहाते.

अन्जे का स्वतच्या हाताने स्वतच्या पायावर धोंडा मारून र्‍हायलिस? Proud
दॉक्टर बाईचे डोके फिरले होते म्हनून सल्ले द्ययला तीच स्वत घरी आली होती. या गोखल्यांच्या

चनस मेंतल होस्पितल मधू पन हाक्लून देती ल त्याना इतके गये गुजरे आहेत दोघे
आता मूल होन्यासाथी काअय करावे काय करू नये हेसांअगने आले म्हनजे कल्यानच

>>नक्की काय करा ते सांगितलं नाही का? >> ते पण डॉक्टरांनीच सांगायचं का? Lol Rofl

कदाचित बैद्यनाथच्या ह्या product ची placement होणार असेल ;-). मध्ये एकदा बैद्यनाथच्या मधाची होती तशीच.

परवा बर्‍याच दिवसांनी झी मराठी लावला तर ही सिरीयल होती. त्यात मी सीन बघितला तो असा की जान्हवीने मूल होण्यासाठी श्रीला seduce करावं असं तिच्या सासवा तिला सांगतात आणि त्यासाठी तिला हेल्प करु लागतात Uhoh
(भिंतीवर डोकं आपटणारी बाहुली)
श्रीचा एक ऑफिस सीन होता ज्यात तो तेलाची बाटली डोक्यावर रिकामी करुन बसला होता.

मी जो चॅनेल बदलला तो आजपर्यंत झी मराठी लावायचीच हिंमत झाली नाहीये.

वेदिका Rofl

मी तर या जाचातून सुटले आता. सून रात्रीच्या रिपिट टेलिकास्ट मधून हद्दपार झाल्याने पुढे तिचे काय होणार ते मला कळणार नाही. कन्या आणि सुनेच्या मध्ये 'दुरावा' आलाय Proud

हो ना दक्षिणा.
त्या सीनमध्ये seduction बद्दल चर्चा चालू असताना श्रीची आई जान्हवीला म्हणते 'मला तसा फारसा अनुभव नाहीये-" Uhoh
(श्रीच्या आईबाबांचा असा सिडक्शन सीन दाखवतील या कल्पनेने भेदरलेली बाहुली)

Lol वेदिका, मी कधीचीच सोडली ही सिरीयल. पूर्वी असावा सुन्दर आणी ही पचकावणी आलटुन पालटुन बघत होतो, आता अजीबात नाही.

झाला वाटतं श्री seduce एकदाचा.
जानूबाईंकडे गुड न्युज आहे.
पण सध्या समस्त सासू कंपनी तोंडाला काळे फासणे प्रकरणामुळे नाराज असल्याने त्यांना अजून माहीत नाही.
अन जानूला ही न्यूज आनंदाने स्वीकरली जावी असं वाटतंय त्यामुळे ती waiting मोड मध्ये आहे.
प्रोमोवरून तरी एवढाच अंदाज आला.

मला एक जेन्युइन प्रश्न आहे, सीरियल्स मधे दाखवतात तसं घरी डॉक्टर येऊन नुसतं तपासून प्रेग्नट असल्याचं कन्फर्म करता येतं का असं खरंच? ब्लड टेस्ट्स वगैरे नाही का कराव्या लागत त्यासाठी?

Pages