होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटते ..आता गोड बातमी साठी जानु बाळ आणि श्री बाळ कुठे तरी फिरायला जातिल ... मा नर्मदा म्हनत होति न ... खुप दमतो श्री हल्ली.....

खरच गोड बातमी आहे बहुदा त्यान्च्या कडे .. आणी शूटिन्ग मधे त्रास नको म्हनुन हे कथानक बदलले असेल का???

जान्हवी श्री शी बोलल्याच आणि त्यालाही भावी गोखल्यांना जन्म घालण्यात इंटरेस्ट असल्याच सासवांना कन्फर्म करतेय>> आं???????? नंतर अजून काय काय कन्फर्म करणार आहे ही बया.

Mala vatate janvi madhe kahitari problem asanar (ajun ) ani mag ajun radarad dakhavnar

>> मलापण. आणि मग ते बाळ दत्तक घेतील. सोशल मेसेज द्यायला.

अत्यंत विनोदी मालिका. प्रमुख विनोदी पात्र आणि पात्री यांसाठी अनुक्रमे श्री आणि जान्ह्वी यांना नॉमिनेट केले गेले आहे.
एक नम्बर सस्पेन्स थ्रिलर. (थिल्लर.) बाळाच्या जन्माच्या सस्पेन्समुळे प्रेक्षक हार्ट अ‍ॅटॅकने गारद.
एक भयपट. सगळ्या सासवा आणि मो.आ., जान्हवी वगैरे पात्रे एकत्र पडद्यावर आली की त्यांच्या कलकलाटाने पडदा थरथरतो. जान्हवीच्या 'काहीही हं' या किंकाळीने प्रेक्षकांची हृदये धडधडतात.
आता जान्हवीने सासवाआजेसासूच्या साक्षीने एकदाचे गरोदर राहावे. (हवे तर देवाब्राह्मणालासुद्धा साक्षीला ठेवावे.)बाळंतपणातून तिची सुटका झाल्यावर बहुधा सीरियल संपेल आणि प्रेक्षकांची या छळवादातून सुटका होईल.
वरती निल्या कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे जान्हवीकडे खरंच गोड बातमी असावी आणि ही गोष्ट सामावून घेण्यासाठी ती कथानकातही आणली असावी.

खरेतर सिरेलवाल्यांनी कसला भारी पंच मिस केला...
जान्हवीच्या डोक्यावर परिणाम झालेला असतानाच (म्हणजे तिला काही आठवत नसताना) ती प्रेग्नंट हवी होती. मग फुल्ल धुमाकुळ की हे कुणापासून...
आणि मग तिची दिव्य आई हे बाळ आपटेच म्हणून तिला लग्नासाठी तयार करणार...
इकडे बाबा लंगडत राहणार, पिंट्या - ताई तुला काहीतरी सांगायचे आहे असे म्हणत काहीही सांगणार नाही...
आणि गोखलेंच्या घरचे या अवस्थेत जानूला जपायला हवे म्हणून कशातही काही इंटरफेर न करता अश्रूंचे पाट वाहवणार....

कसली भारी झाली असती सिरेल मग...

जान्हवी श्री शी बोलल्याच आणि त्यालाही भावी गोखल्यांना जन्म घालण्यात इंटरेस्ट असल्याच सासवांना कन्फर्म करतेय>> LOL

खरच गोड बातमी आहे बहुदा त्यान्च्या कडे .. आणी शूटिन्ग मधे त्रास नको म्हनुन हे कथानक बदलले असेल का??? << शूटींग मधे त्रास नको म्हणुन मालिका बंद करावी अस नाही का कोणाला वाटल ?:))

बरय श्री जान्हवी च सगळचं मालिकेच्या खर्चाने आणि प्रेक्षकांच्या साक्षीने होतय.

बरय श्री जान्हवी च सगळचं मालिकेच्या खर्चाने आणि प्रेक्षकांच्या साक्षीने होतय. >>> लग्नं झालंच, मग डोक्यावर पडून झालं, आता पोरगं...

मुलगा झाला तर त्याची मुंज, मग त्याचं लग्नं, सगळे सण, त्यात त्याची बायको डोक्यावर पडणार, मग श्री आणि जान्हवीचा नातू,,,,
मुलगी झाली तर तिचं लग्नं, नवर्‍याची लफडी, मग डोहाळजेवणापासून ते बाळंतपण, हे सगळे विधी मग श्री - जान्हवीच्या नातीचे पण...

शशीकलाबाईंना मुलाची किंवा मुलीची सासू हे असिस्टंस आयतेच मिळणार.
बाबांबरोबर पिंट्या पण लंगडायला लागणार.

आणि हे सगळं बघायला त्या सगळ्या आया आणि ती आई आजी नामक महामाया टणटणीत जिवंत असणार!

<< आणि हे सगळं बघायला त्या सगळ्या आया आणि ती आई आजी नामक महामाया टणटणीत जिवंत असणार! >> शिवाय, हें सगळं संभाळून गोखले इंडस्ट्रीजने 'रीलायन्स साम्राज्य' विकत घेतलेलं असणार, आयपीएलमधे प्रत्येक "आई"च्या नांवाने एकेक टीम खेळत असणार, मोठ्या आईला किती तरी सोहळ्यांमधे 'जीवनगौरव पुरस्कार ' मिळालेले असणार, लहान मुलं ' रामायणातल्या सीतेने आपल्या जान्हवीचं नांव चोरलं होतं का ?' असा प्रश्न आपल्या आयाना विचारत असणार.... ...!!!!! Wink

आयपीएलमधे प्रत्येक "आई"च्या नांवाने एकेक टीम खेळत असणार >>> Biggrin

काय एक प्रोमो पाहिला, त्यात जान्हवी "मला.....आणि श्री ला......दोघांनाही......बाळ हवंय" असं लाजत लाजत सांगते आणि नंतर क स ली भी ष ण ह स ते !!
मुळात बाळ होण्यासंबंधी काहीही बोलताना पडद्यावरच्या नायिका लाजतात का? Uhoh

<< मुळात बाळ होण्यासंबंधी काहीही बोलताना पडद्यावरच्या नायिका लाजतात का? >> ' कांहींच्या बाबतींत तरी कदाचित लाजणं, लाजणं काय म्हणतात तें आपल्यालाही कधीतरी पडद्यावर तरी जमेल का ?', या त्याना सतावणार्‍या शंकेचं निरसन करायला ! Wink

बाळ हवंय" असं लाजत लाजत सांगते आणि नंतर क स ली भी ष ण ह स ते !!>>>> बाळ हवंय म्हणत लाजणं आणि नंतर भीषण हसणं? Uhoh

बरं झालं मी सिरियलीच बघत नाही. मायबोलीवरचे धागे मात्रं कधीतरी वाचून काढते धमाल म्हणून.

तुम्हा सर्वांच्या सहनशक्तीची दाद द्यायला हवी, मी तर श्री आणि जान्हवीचं लग्न झाल्यानंतर लगेचच ही मालिका पाहाणं बंद केलं.

जन्मतः मेमरी लॉस झालेलं आणि रोज डोक्याला तेल लावून घेणारं एकमेव बालक म्हणून गिनीस बुकात नोंद होणार

रोज डोक्याला तेल लावून घेतल्यानेच दाढीपण भसाभसा वाढत असेल त्या श्रीची. डोकं तरी किती जिरवून घेणार तेल? दाढीकडे ट्रान्स्फर होत असेल :कैच्याकै:

काय चित्रं आलं डोळ्यासमोर! श्रीबाळ जमीनीवर बसलंय! आई आजी वरून तेल चोपडतीय आणि श्रीबाळाच्या हनुवटीखाली केस उगवू लागलेत. केश्विनी, तुमच्या लिखाणातील चित्रदर्शीत्व हेवा करण्याजोगे आहे.

काय एक प्रोमो पाहिला, त्यात जान्हवी "मला.....आणि श्री ला......दोघांनाही......बाळ हवंय" असं लाजत लाजत सांगते आणि नंतर क स ली भी ष ण ह स ते !!<<< काल अंजाना अंजानी बघत होते त्यामधला एक प्रसंग आठवला!!!!

आशू, मी मालिका बघत नाय आज्याबात...एकदाही पाहिलेली नाही....पण प्रोमोज बघते आणि इथल्या पोस्टी वाचून हसते Lol

'आजपासून मीं ही सिरियल लावणार नाही पण तुमचा मा.बो.वरचा तो अचरटपणा मात्र बंद करा !', अशी पत्नीने सक्त ताकीद दिल्याने माझा हा शेवटचाच प्रतिसाद -

adyatali_0.JPG

Pages