Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जानी सोडून सगळ्या
जानी सोडून सगळ्या बायाबापड्यांना नवीन कपडे देण्यात आले आहेत म्हणजे अजून ४ -६ महिने तरी हि सिरीअल संपेल असे दिसत नाही
madhugandha-kulkarni - बरेच
madhugandha-kulkarni -
बरेच लोक 'होणार सून..'ला आता कंटाळवाणी म्हणत असले तरी अजूनही त्या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक आहे. पहिल्या वर्षीच्या विक्रमी प्रतिसादानंतर आता दुसऱ्या वर्षी ही मालिका जास्त लोक अॅप्रिशिएट करताहेत. माझी स्वत:ची भूमिका कोणतीही मालिका एका वर्षांत संपावी अशी होती. पण आता येणारा रिस्पॉन्स पाहता ती लिहीत राहावी, असं वाटतंय.
http://www.loksatta.com/viva-news/elizabeth-ekadashi-writer-madhugandha-...
आईआज्जी जेव्हा जान्हवीला
आईआज्जी जेव्हा जान्हवीला तिच्या आईच्या वागण्याबद्दल सांगत असतात तेव्हा बरेच फ्लॅशबॅक दाखवले आहेत.. आईआज्जी बोलताना प्रसंग अन सगळे फ्लॅशबॅक्स यात जान्हवीचा तोच एक निळा ड्रेस आहे..
कोणतीही मालिका एका वर्षांत
कोणतीही मालिका एका वर्षांत संपावी अशी होती. पण आता येणारा रिस्पॉन्स पाहता ती लिहीत राहावी, असं वाटतंय >> अरे देवा !! म्हणजे हे असेच अखंड चालू राहणार तर

शशिकला बाईंच्या वागण्याबद्दल
शशिकला बाईंच्या वागण्याबद्दल जान्हवीला आत्ताच कळले आहे का? परवाचा एपिसोड पाहिला. ती आईला `तू माझ्यामागे माझा संसार मोडावा म्हणून प्रयत्न करत होतीस' असं काहीसं म्हणत होती. तेव्हा प्रथमच मला शशिकला बाईंचा अभिनय अगदीच आवडला नाही. नक्की काय भावना आहेत काहीच दाखवता आलं नाही त्यांना .
हो रावी. आईआजींकडुन तिला
हो रावी. आईआजींकडुन तिला समजलय नुकतच...
यात काल काय झाल? सम्पलं का
यात काल काय झाल?
सम्पलं का प्रेग्नंसी कथन पुराण??
तीन चार महिन्यांनी नवर्याला
तीन चार महिन्यांनी नवर्याला भेटायला जातेय तीही इतकी आनंदाची बातमी घेऊन तर एखादीने किती छान ड्रेस घातला असता, सुंदर आवरलं असतं. साडीत तू खूप आवडतेस असं श्री ने सुरूवातीच्या काही भेटीत सांगितलेलं तरी लक्षात ठेवलं असतं! जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल ड्रेस आणि जत्रेत मिळणारे कानातले बघवत नाहीयेत.
नुसता ड्रेसच काय? झिपर्या पण
नुसता ड्रेसच काय? झिपर्या पण कायम तेलकट असतात.
जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल
जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल ड्रेस आणि जत्रेत मिळणारे कानातले बघवत नाहीयेत. >>आशुडी

आजकाल ४ रुपायात बाहुलीचा ड्रेस पण यायचा नाही.
जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल
जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल ड्रेस आणि जत्रेत मिळणारे कानातले बघवत नाहीयेत. >> +१
त्यात तिचा पेटंट डायलॉग 'कुठुन सुरु करु कळत नाहीयं' असं काहितरी.. जाहिरात बघुनच वैताग आला!!
तीन चार महिन्यांनी नवर्याला
तीन चार महिन्यांनी नवर्याला भेटायला जातेय तीही इतकी आनंदाची बातमी घेऊन तर एखादीने किती छान ड्रेस घातला असता, सुंदर आवरलं असतं. साडीत तू खूप आवडतेस असं श्री ने सुरूवातीच्या काही भेटीत सांगितलेलं तरी लक्षात ठेवलं असतं! जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल ड्रेस आणि जत्रेत मिळणारे कानातले बघवत नाहीयेत.>>>> +१००
जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल
जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल ड्रेस आणि जत्रेत मिळणारे कानातले बघवत नाहीयेत >> आणि चेहर्यावर जत्रेत हरवल्यासारखे भाव .
आशुडीला प्रचंड अनुमोदन.. खरच
आशुडीला प्रचंड अनुमोदन.. खरच नवर्याच्या आवडीचा विचार करुन भेटायला हव होत.
ओह म्हणजे श्रीबाळाला बाळाची
ओह म्हणजे श्रीबाळाला बाळाची बातमी कळली का ? का पुन्हा त्यात काहीतरी विघ्न येणार ? जसं की त्याचं वेळी सौम्या / बेब्याची एंट्री ?
नाही प्राजक्ता अजुन नाही
नाही प्राजक्ता अजुन नाही समजली.. कालचा अख्खा भाग निरोपसमारंभात घालवला.. पिंट्याचा नि.सं वेगळा, बाबांचा वेगळा, मनिष आणि गीताचा वेगळा.. आज मॅडम फायनली ऑफीसात पोचणारेत आणि "कस सांगु तुला तेच कळत नैये" ही नांदी गाउन सुरुवात करणारेत..
ओह म्हणजे श्रीबाळाला बाळाची
ओह म्हणजे श्रीबाळाला बाळाची बातमी कळली का ?>> सांगण्यासाठी इतक अवघड का वाटतय? बाळ नक्की श्रीचच आहे ना??
ओह म्हणजे श्रीबाळाला बाळाची
ओह म्हणजे श्रीबाळाला बाळाची बातमी कळली का ? का पुन्हा त्यात काहीतरी विघ्न येणार ? जसं की त्याचं वेळी सौम्या / बेब्याची एंट्री ?
नक्कीच पुन्हा काहितरी विघ्न येणार .
कोणीतरी गचक्णार , फॅक्टरीत कसलातरी अपघात होणार , कोणीतरी जिन्यावरून पडणार .... नक्कीच काहितारी होणार . आणि श्री ला केबिन्च्या बाहेर जाव लागणार आणि जानु हात तसाच पुढे करून उभी रहाणार आणखी केविलवाणा चेहरा करून
सौम्याची एंट्री होईल अस वाटत
सौम्याची एंट्री होईल अस वाटत नाही, कारण त्यांना खरच तस एखाद पात्र घुसडायच असत तर त्यांनी सौम्या नामक व्यक्ती एकदा तरी दाखवली असती..
जानी जेव्हा तिच्या बाबांशी
जानी जेव्हा तिच्या बाबांशी श्रीबद्दल बोलताना "मी त्याला खूप मिस करते", "कधी एकदा त्याला भेटते असे झाले आहे", "मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत" इत्यादी वाक्ये बोलते तेव्हा लेक म्हणाली "ही बाबांशी असे कसे काय बोलु शकते
हेच ती बॉयफ्रेंड बद्दल बोलली तर त्यांना चालेल का
" 
तीन चार महिन्यांनी नवर्याला
तीन चार महिन्यांनी नवर्याला भेटायला जातेय तीही इतकी आनंदाची बातमी घेऊन तर एखादीने किती छान ड्रेस घातला असता, सुंदर आवरलं असतं. साडीत तू खूप आवडतेस असं श्री ने सुरूवातीच्या काही भेटीत सांगितलेलं तरी लक्षात ठेवलं असतं! जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल ड्रेस आणि जत्रेत मिळणारे कानातले बघवत नाहीयेत.>>+१००००
पुढे काय होणार ते मी सांगते.
पुढे काय होणार ते मी सांगते. जानी हापिसात पोचणार आणि अभिनंदनासाठी हात पुढे करणार आणि त्याला अवॉर्ड मिळणार आहे आणि तो बाप होणार आहे या दोन्ही गोष्टीत गफलत होऊन त्याला आपण बाप होणार आहोत हे कळणारच नाही. उघड कुणिच बोलणार नाही. तुला माहित आहे की, मी कशाला सांगू.. इ. मखलाश्या होणार त्यातून श्रेय आईआज्जीला दिलेलंच आहे. जानी पण तेच तेच बोलणार कारण हे सर्व सॉर्ट करायला तिला पण आईआज्जीनेच मदत केली.
अशा पद्धतीने बाप होण्याची बातमी अजून एक दोन एपिसोड नंतर श्री बाळाच्या कानावर पडेल
रमा. | 6 May, 2015 -
रमा. | 6 May, 2015 - 17:59
समजा तिथे त्या परदेशात आमचा अंत पाहून आई आजी ऑफ झाल्यास…
.
.
.
.
आई आजी मेल्याचे दुःख नाही, बाळ सोकावेल !!!!
>>
दक्षे हो ना ती नुसतच अभिनंदन
दक्षे हो ना ती नुसतच अभिनंदन म्हणाल्याच दाखवलय जाहीरातीत.. आणि तसही या शिरेलीत कुणालाही स्पष्ट बोलायची बंदी घातलीय पहील्यापासुन
कुठलीही डोकं ठिकाणावर असलेली
कुठलीही डोकं ठिकाणावर असलेली बाई आपण गरोदर आहोत ही बातमी नवर्याशी कितीही भांडण झालेलं असलं तरी शून्य मिनीटं वाया घालावून आधी त्याला धावत जाऊन सांगेल. दुसर्या कोणालाही नाही. ह्या सिरिअली म्हणजे लोकांच्या आयक्युचा अपमान करतात. आग लागो असल्या मालिकांना.
अप्पाकाका +१०० कारण जरी
अप्पाकाका +१०० कारण जरी डिवोर्स केस फाइल केली असली तरी मूल होणार म्हणजे अॅडिशनल चाइल्ड सपोर्ट क्लेम करू शकतात बायका.
कुठलीही डोकं ठिकाणावर असलेली
कुठलीही डोकं ठिकाणावर असलेली बाई >> डोकं ठिकाणावर असलेली ना?
जानी आणि डोकं ठिकाणावर या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी दुरूनही संबंध नाही.
आशा काळे स्टाईल : नका हो असं
आशा काळे स्टाईल : नका हो असं बोलू माझ्या जानूला! तिने का कमी प्रयत्न केले श्रीरावांना सांगायचे? पण दरवेळी फुटकं नशीब आडवं आलं. एके दिवशी घरी जाऊन सांगू म्हणाली तर पाच सासवांनी मिळून आपल्याच नवर्याचं दुसरं लग्न लावायची गोष्ट तिच्या कानी पडली. कसं सहन होईल एका दोन जीवांच्या सुवासिनीला हे? तरीही माझी जानू खंबीर म्हणून तिने डोळ्यातल्या अश्रूंची शाई करून पत्र लिहून सा..रं सा..रं काही कळवलं यजमानांना. पण ग्रहदशाच इतकी वाईट की ते पत्रं तर त्यांनी वाचलं नाहीच पण फाडलेलं मात्र दिसलं. कागदाऐवजी काळजाचेच कपटे कपटे झाले हो माझ्या जानूच्या! आई जगदंबेची शपथ घेऊन सांगते, माझ्या जानूने श्रीरावांपासून काहीही लपवलं नाही. शंभो शंकर साक्षी आहेत की तिने तिचा संसार वाचवण्यासाठी जिवाचं रान केलंय हो, जीवाचं रान! भाऊजी, नका हो बोल लावू माझ्या जानूला. मी पाया पडते तुमच्या.
नशीब त्या बाईला सिरिअलमधे
नशीब त्या बाईला सिरिअलमधे कोणी घेत नाही
(No subject)
Pages