होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो शिल्पा.. ती एलिझाबेथ वाली.. आणि जुयेरेगा वाली पण..

आता जानीला कितवा महिना आहे माहित नाही. पण जोवर ती श्रीला बातमी सांगत नाही तोवर तिचं पोटं अ‍ॅब्सच्या जाहीरातीत दाखवतात तितकं सपाट.. अगदी कोणाला संशय पण येऊ नये इतकं.. Angry

एकदा श्रीला कळलं कि अर्ध्या रात्रीत पोटाला उशीबीशी बांधुन एकदम पुढे येईल पोट. पार ७व्या महिन्यातलं. Uhoh
मग डोजे इत्यादी..

>>>> भाऊजी, नका हो बोल लावू माझ्या जानूला. मी पाया पडते तुमच्या. <<<<
भाऊजी?????? अप्पाकाका भाऊजी? अप्पाभाऊजी????? Proud

ए पण काही म्हणा हां, तो लाल ड्रेस छान दिस्तो हं तिला.... उगाच काय आपलं नावं ठेवायची . जातीच्या सुंदरीला काहीही छानच दिसते ! Happy

कालच्या भागात जाह्नवी डोक्यात गेली. Angry
काय तो अभिनय, काय ते रडणं, मध्येच बसणं, उठणं, ग्लास फोडणं...
मी श्री च्या जागी असते तर अजुन एक ग्लास मागवून डोक्यावर ओतून तिला गदागदा हलवलं असतं. ते ही पुरलं नसतं तर तिच्या श्रीमुखात भडकावून दिली असती एक मस्तपैकी. Proud

दक्षे अग त्याची बायडी मधल्या सगळ्या मिसअंडरस्टॅण्डींग नंतर त्याच्याशी बोलायला आली होती.. त्यावेळी हे सगळ करण म्हणजे तयार होत आलेला पुल बॉम्ब लावुन फोडण्यासारख आहे.

शिरेलीच्या सुरुवातीला एकदा लग्नापूर्वी जान्हवी श्रीच्या हापिसात गेली होती तेव्हा कशामुळे तरी अशीच रडत होती तेव्हा हा तिला म्हणाला होता की तु रडण थांबवल नाहीस तर मी तुला मिठीत घेईन वगैरे.. काल आईआजी असल्याने तस म्हणुही शकत नव्हता आणि करुही शकत नव्हता.

खर तर जान्हवीने कितीही आग्रह केला तरी आईआजीने स्वतःहुन तिथुन निघुन जायला हव होत म्हणजे वर उल्लेखलेला सीन दाखवुन जान्हवी मोकळेपणाने बोलु शकली अस दाखवता आल असत दिग्दर्शकाला.. पण मग एक तासाच्या एपीचा घाट घालुन प्रेक्षकांच्या छळ नसता मांडता आला.

आता जानीला कितवा महिना आहे माहित नाही. पण जोवर ती श्रीला बातमी सांगत नाही तोवर तिचं पोटं अ‍ॅब्सच्या जाहीरातीत दाखवतात तितकं सपाट.. अगदी कोणाला संशय पण येऊ नये इतकं.. राग

एकदा श्रीला कळलं कि अर्ध्या रात्रीत पोटाला उशीबीशी बांधुन एकदम पुढे येईल पोट. पार ७व्या महिन्यातलं. अ ओ, आता काय करायचं
मग डोजे इत्यादी..>>+१
Rofl

ए हो, तो.लग्नाआधीचा सीन फार गोड होता.
दक्षिणे, श्रीने जान्हवीच्या 'श्री'मुखात देणे म्हणजे स्वत:लाच मारून घेणे आहे ना Proud

हो ना आशुडी.. खर तर त्या टेक्निकचा वापर करुन कालचा हापिसातला सीन खूप छान करता आला असता दिग्दर्शकाला आणि तो भावलाही असता..

लग्नआधीचा मिठीचा सीन खरेच क्युट होता. पण मग एक तासाच्या एपीचा घाट घालुन प्रेक्षकांच्या छळ नसता मांडता आला. ना >>> +१००

येत्या सोमवारी आहे तो बहुचर्चित सोहळा... झी मराठी प्रेक्षकांना त्या क्षणांचे साक्षीदार होण्याच आवाहन खरतर आव्हान करत आहे...

त्या जानीचा नक्की काय प्रॉब्लेम आहे???? सगळं तिच्या लाडक्या श्रीलाच सांगायचे आहे ना? मग एवढा का घोळ घालते आहे ती Angry मला वाटते त्याची कारणे कदाचीत खालीलपैकी असावित
१) बाळ श्री चे नसून दुसर्याच कोणाचे आहे म्हणून ती एवढी घाबरत आहे Wink
२) ती प्रेगनंट नाहीचे. आता खोटे बोलले म्हणून आई आजी चिडतील म्हणून घाबरली आहे
३) दुरावातल्या आदितीच्या अपघाताचा जानीच्या डोक्यावर परिणाम झाला आहे Proud

) दुरावातल्या आदितीच्या अपघाताचा जानीच्या डोक्यावर परिणाम झाला आहे फिदीफिदी>>>>>:हाहा: तो डबल परीणाम आहे. आधी ती स्वतःच पडली होती. आता सोमवारी सगळे एका पडद्यावर दाखवणार आहे. तिचे लग्न वगैरे वगैरे. जुन्या आठवणी छ्ळतात हो नुसत्या बाकी काही नाही बरका.:खोखो:

श्री बाळ आणी आई आजी प्रेक्षकात बसुन हे सर्व याची डोळा याची देही अनूभवणार आहेत.

काही काही वेळेला ५-६ भागात कथानक आणी अभिनय चांगल्या दर्जाचा होतो आणी अचानक एखाद्या एपिसोडमधे सगळ्याच बाबतीत का माती खातात काय कळत नाही.

ती मधुगंधा ,मंदार देवस्थळी सटकले आहेत का?? ..काय वाट्टेल ते दाखवतायत ....श्री चा पुतळा काय आणतायत ,त्याच्याशी जानी बोलतेय काय ,तो काका रेकॉर्ड काय करतोय ...सगळा सावळा गोंधळ Uhoh

वर दहा वेळा ‘काहीही हा’ ‘काहीही हा’ करून जानीने पुतळ्याला पण पकवल ..नशीब त्या पुतळ्याने जिवंत होवून हिच्या एक कानाखाली पेटवली नाही Proud

हो खरच.. काल खूपच पांचट्टपणा चाल्ला होता.. आता महाएपिसोडपर्यंत असच चालु रहाणार अस दिसतय म्हणजे अजुन दोन दिवस छळ.

अरे नाही, कापडी पुतळा. श्री बाळा सारखाच हेलकावे खात होता. मग काकाने तिचे बोलणे रेकॉर्ड केले.>>>

आता ते श्री ला ऐकवणार का? मग हेच २०-३० एपिसोड पहिले का नाही सुचलं???

कापडी पुतळा. श्री बाळा सारखाच हेलकावे खात होता. >> मला तात्या विन्चु आठवला

मला तात्या विन्चु आठवला >> तो तात्या विंचू सारखाच दिसत होता Proud वर त्याला चांगले नवीन कपडे सुद्धा दिले होते ...पुतळ्यावर अशी उधळपट्टी करण्यापेक्षा तो shirt खर्या श्री बाळाला तरी द्यायचा बिचारा रोज तेच तेच कपडे घालत असतो Sad

Pages