Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेव्हा भांडे फोडायचे असेल
जेव्हा भांडे फोडायचे असेल तेव्हा खणखणीतपणे फोडले होते एकता कपूर ने... >>>> अगदी अगदी
इतकी गोड आणि अर्थातच खाजगी
इतकी गोड आणि अर्थातच खाजगी गोष्ट पहिल्यांदाच उघड करताना अशी चारचौघांसमोर कशी काय सांगता येते हे कोडंच आहे हां पण! आणि तेही मधे इतकं काय काय घडून गेलं असताना.... इथे जाह्नवीला केवढा मोठा आधार होता आईआजी नि काकांचा.. त्यांच्या मदतीने काहीतरी स्पेशल प्लान करून एकट्या श्रीला भेटून ती सगळे गैरसमज- अगदी तिच्या आईचं मधलं वागणंसुद्धा कदाचित थोडक्यात सांगून- मिटवू शकली असती. बराच स्कोप होता हे सगळं अधिक चांगल्या आणि वास्तवदर्शी का काय म्हणतात त्या पद्धतीने हाताळायला...
असोच. जास्त अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. अजून बेबीआत्याचा संसार मार्गी लागायचाय, सरूमवशीचं लग्न व्हायचंय. मधे जाह्नवीचं डो जे, बाळजन्म वगैरे असेलच! छळ हो छळ!
मुग्धटली.... शशिकलाबाई आहेत
मुग्धटली.... शशिकलाबाई आहेत म्हणून थोडी सहनेबल आहे ही सिरीयल...
नाहीतर अती गोड अती बोर झाले असते!
जवळजवळ प्रत्येक वाक्याच्या
जवळजवळ प्रत्येक वाक्याच्या शेवटी 'मिहीर' बोलणारी तुलसी मख्ख नसेल पण बरीच इर्रीटेटींग झाली नंतर. आणि रोनित रॉयचा मिहीर तर आपण बदली कामगार आहोत ह्याच भावनेतुन काम करतोय असं वाटायचं.
बदली कामगार >
बदली कामगार >
कालचा भाग आत्ता वेबसाईटवर
कालचा भाग आत्ता वेबसाईटवर फॉर्वर्ड करत पाहिला. अत्यंत खाजगी गोष्टींचा चारचौघांसमोर जाहीर पंचनामा ? तेही नातेवाईक, मित्रमैत्रिणींसमोर नाही तर पूर्णपणे अनोळखी लोकांना पॉपकॉर्न खात सिनेमा दाखवल्यासारखा ?...आरारा ...किती ते कल्पनादारिद्र्य !!!
शैलेश दातार कुठून आले एकदम कालच्या भागात ? सरुमावशीसाठी ह्या नवीन पात्राचे प्रयोजन दिसते.
सस्मित.... मान्य आहे की तुलसी
सस्मित.... मान्य आहे की तुलसी / कोणीपण नंतर नंतर वैताग आणायला लागले पण...
१. जेव्हा काही सांगायचे असेल तर स्पष्टपणे बोलायचे
२. मख्ख चेहरा ठेवून कोणी वावरायचे नाही
३. परिवार बद्दलची ठाम मूल्ये होती त्यांची
४. कितीपण प्रश्न असू दे, नेहमी एकत्र राहावे कसे हे चांगल्या पध्दतीने मांडले आहे...
आणि, हा धागा होसूमीयाघ चा आहे. म्हणून इथेच थांबते.
प्रज्ञा९ त्या झी वरच्या याच
प्रज्ञा९
त्या झी वरच्या याच शिरेलीची कॉपी असलेल्या सतरंगी ससुराल मध्ये नायिकेच्या मावससासुच लग्न झाल देखील.. परवा असच झी लावल तेव्हा ती फेरे घेताना दिसली, तिच्या लग्नात विघ्न आणण्यासाठी कोणीतरी तिच्या मेकअप किट मध्ये पाल ठेवली जी तिच्या हेअरस्टाईलमध्ये लपली आणि सातवा फेरा पूर्ण होउन मासीमांला चक्कर आली येवढाच शॉट बघायला मिळाला.. बाकी काही असो पण त्या नायिकेने मासीमांच लग्न लावायच काम चोख बजावल हे नक्की.. इथे जानुबै स्वतःच्याच संसाराला टाके घालत बसल्यात बाकीच्यांच्या घड्या कधी घालणार कोण जाणे.. मध्ये त्या बेबीच्या नवर्याला आणल होत स्टॉपवर तेव्हा वाटल होत की अजुन एक संसार मार्गी लागेल पण नंतर गायबच केला त्याला.. बाकी तो म्हणजे एक पात्रच होता...
सस्मित रोनित रॉय सगळेच रोल त्याच भावनेने करतो अस मला वाटत..
काल जेव्हा जानी श्रीला म्हणते
काल जेव्हा जानी श्रीला म्हणते की त्यांच्या बाळाने श्रीचे रुप घ्यावे अशी तिची ईच्छा आहे तेव्हा चिरंजीवांनी मला विचारले की "त्यांना दाढीवालं बाळ हवंय का?"

गिरी
त्यांना दाढीवालं बाळ हवंय का?
त्यांना दाढीवालं बाळ हवंय का?:D
गिरी , बाकी, खालची वाक्य
गिरी ,
बाकी, खालची वाक्य जानीने अगदी वेगवेगळ्या मिनिटाला उच्चारली. नक्की का ते अजून शोध घेतेय मी.
१)एक मॉर्डन ईंग्लिश मराठी: उदाहरण खाली पहा,
श्री मी प्रेग्नंट आहे
२)एक हृदयाला पीळ पाडणारं मराठी( ते कसं? तर वंश वगैरे शब्द टाकून): उदाहरण खाली पहा,
श्री माझ्या पोटात तुझा वंश वाढतोय
३) लहान मुलांना समजावे असे मराठी:
श्री आपल्याला बाळ होणार आहे
४) बाकी, उरले, सुरले त्यांना कळावे म्हणून,
श्री तू बाबा होणार आहेस
मज्जा होती श्रीची. चार चार वेळा सांगितले तेव्हा त्याला भावना कळली की जानी नळागत का रडतेय आणि तो मगच उठला खुर्चीतून.
दाढीवालं बाळ >> शैलेश दातार
दाढीवालं बाळ >>
शैलेश दातार कुठून आले एकदम कालच्या भागात ? सरुमावशीसाठी ह्या नवीन पात्राचे प्रयोजन दिसते.>>
अगो, तसं नसणारे.... कारण शैलेशच लग्न झालय सिरियल मध्ये अन् त्याची बायको पण आहे... त्याच्या मुलीशी तो संवाद साधू शकला नाही ते सांगण्यासाठी तो आला होता.
गिरीदा
गिरीदा
अगो, तसं नसणारे.... कारण
अगो, तसं नसणारे.... कारण शैलेशच लग्न झालय सिरियल मध्ये अन् त्याची बायको पण आहे... त्याच्या मुलीशी तो संवाद साधू शकला नाही ते सांगण्यासाठी तो आला होता. >>> ओह्ह, हो का ? फॉर्वर्ड करुन पाहिल्याचा परिणाम !
कारण शैलेशच लग्न झालय सिरियल
कारण शैलेशच लग्न झालय सिरियल मध्ये अन् त्याची बायको पण आहे... त्याच्या मुलीशी तो संवाद साधू शकला नाही ते सांगण्यासाठी तो आला होता>>> असंय होय, मला वाटलं तो बेबी चा बेबा आहे असं येणार्या कुठल्यातरी भागात दाखवतात की काय आता!
कालच्या भागावर कणेकरांना काहीतरी लिहायला सांगायला पाहिजे. राहून राहून फिल्लमबाजी मधलं, 'ह्या लोकांची खानदानची इज्जत जेव्हा लुटली जाते, तेव्हा ते गावजेवण घालतात.... ' आठवलं.
गिरीदा .. इतकी गोड आणि
गिरीदा ..
इतकी गोड आणि अर्थातच खाजगी गोष्ट पहिल्यांदाच उघड करताना अशी चारचौघांसमोर कशी काय सांगता येते हे कोडंच आहे >> नाहीतर काय आणि नवर्याला सांगताना " काय बाई सांगू , कसं गं सान्गु "
देसाइवाडीत करायचा ना समारंभ.
देसाइवाडीत करायचा ना समारंभ. तिथल्या लोकांना तसाही दुसर्याच्या आयुष्यात भारीच इन्टरेस्ट असतो. आणि श्रीच्या मागे बसलेल्या मुलीच्या जागी माईंना बसवलं असतं तर माई रड रड रडल्या असत्या आणि मेघनानेही उसासेभरले कटाक्ष आदेकडे टाकुन भर घातली असती. :हहपुवा:
नको तितकी फालतूगिरी चालवली आहे या सिरिअल मधे
अरे कोणी ती श्रीच्या मागे
अरे कोणी ती श्रीच्या मागे बसलेली मुलगी नोटीस केली का?
एपिसोड किती रटाळ चाललाय याचे प्रतिक होती ती.>>>>>>>>>>>> हाहा हो मी केली नोटीस. मधेच कंटाळुन भुवया पण उडवल्या तिनं.>>> एक दोनदा डुलक्या पण घेतल्या तिने..
हो हो डुलक्या घेतल्या, मधेच
हो हो डुलक्या घेतल्या, मधेच वर बघत होती, शंभर रुपये द्यायचे कबुल करुन पन्नासवर भागवल्या सारखा चेहरा होता तिचा.
, शंभर रुपये द्यायचे कबुल
, शंभर रुपये द्यायचे कबुल करुन पन्नासवर भागवल्या सारखा चेहरा होता तिचा. >>>>
काय काय सुचत लोकांना आई ग!
शंभर रुपये द्यायचे कबुल करुन
शंभर रुपये द्यायचे कबुल करुन पन्नासवर भागवल्या सारखा चेहरा होता तिचा. >>>>
किंवा मग 'शंभर रुपड्यांसाठी काय काय सहन करावं लागतयं देवा' असंही असेल
बापरे... किति सहन करयच १०० रु
बापरे...
किति सहन करयच १०० रु सथि.........
शंभर रुपये द्यायचे कबुल करुन
शंभर रुपये द्यायचे कबुल करुन पन्नासवर भागवल्या सारखा चेहरा होता तिचा. >>>> अगदी अगदी!

आता वाटतं ती मुलगी बघायला
आता वाटतं ती मुलगी बघायला एपिसोड बघायला हवा होता की काय. मगाशी रिपीट होता मी झटकन channel बदललं.
आता वाटतं ती मुलगी बघायला
आता वाटतं ती मुलगी बघायला एपिसोड बघायला हवा >>> मलाही तेच वाटतेय .
वंश नव्हे, अंश. प्रोमो पाहिला
वंश नव्हे, अंश.
प्रोमो पाहिला होता. प्रत्यक्ष मालिकेत वंश म्हटलं असेल तर असेल...
दाढीवाल बाळ..
दाढीवाल बाळ..

आणि एका वाक्यात तिने 'माझ्या
आणि एका वाक्यात तिने 'माझ्या उदरात' असं म्हटलं होतं !!
उदर बिदर म्हटलं की एकदम जलोदरच आठवतं..
Pages