साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

तुळ राशीला शेवटची अडीचकी आहे. शेवटची अडीचकी काही चांगले घडवुन जाते. तुळ राशीला शनि राजयोग कारक असल्याने किंवा तुळ राशीत शनि उच्चीचा असल्यामुळे पहिली अडिचकी सोडली तर दुसर्‍या आणि तिसर्‍या अडीचकीत फारसा त्रास होत नाही.

शेवटच्या अडिचकीत कुटुंबस्थानातुन किंवा धन स्थानातुन होणारे शनिभ्रमण हळु हळु सांपत्तीक स्थितीत सुधारणाच करेल. याचा वेग मंद असला तरी स्लो बट स्टेडी अश्या प्रकारचा असेल.

कुटुंबात शनि हा वाढ करणारा ग्रह नसुन कितीही हवे असले तरी कुटुंबातील सदस्य संख्या एका आकड्याने किमान कमी होताना काहिंना दिसते. अत्यंत वृध्द असे आजी - आजोबा यांचा या अडिचकीत वियोग होण्याची शक्यता असते तेव्हा लवकरच त्यांच्या जिवंतपणी आशिर्वाद घेण्याचे मनात आणा. त्यांच्या बरोबर काही काळ व्यतित करा. त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शेवटी अमर कोणीच होत नसते. पण मोठ्यांचे कृपाछ्त्र मात्र कायम रहावे असे वाटत असते. अश्या वेळी रुख रुख राहु नये या दृष्टिने हे लिहले आहे.

वृश्चिक राशीला ही मधली अडिचकी. प्रत्यक्ष चंद्रावरुन शनिचे भ्रमण होताना होणारा मानसीक त्रास लक्षात राहिल असा असतो. तुमच्या राशीला अनुरुप बदला घ्यायचा स्वभाव जरा अजुनही लांब ठेवा . शांत पणे पहात रहा काय घडते आणि का घडते या कडे. अनुकुल काळ येईल तेव्हा तुम्हाला सव्याज उट्टे काढायची संधी येणारच आहे. पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल.

शनिवारी तेलाने मालीश करुन गरम पाण्याने स्नान करावे हा उपाय साडेसातीत करायला जुने व जाणते ज्योतिषी सांगतात. मनाचे व्यापार वाढतात तेव्हा शरीरातले रक्ताभिसरण वाढवणे सुखद अनुभव देते असा काहिसा प्रकार यामागे असावा.

शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.

धनु राशीला पहिलीच अडीचकी आहे. व्यावसायीक महात्वाकांक्षांना आवर घालुन लो रिस्क असलेले करार मदार करणे क्रमप्राप्त ठरेल. धनु राशीला धन स्थानाचा मालक असलेला शनिच व्ययस्थानात या अडिचकीत असल्यामुळे स्थावर / रोकड यांचा क्षय होताना दिसणार आहे. तो थांबविण्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण आणि मानसीक ताण जाणवणे अपरिहार्य आहे.

तृतीयेश शनि तुमच्या व्ययात असल्यामुळे सहोदरांची खास करुन मोठ्या भावा - बहिणीची चिंता सतावेल.

आपली मानसीकता अध्यात्मीक आणि परमेश्वराला मानणारी असल्यामुळे या कालखंडातुन आपण पार जाणारच आहात.

शनिवारी शनिमहाराजांना तेल आणि काळे उडीद याच बरोबर रुईपत्रांची माला अर्पण करा. मारुतीचे दर्शन घ्या. हा उपाय पुढील साडेसात वर्षे न चुकता करा. सोबत शनिस्तुती आणि हनुमान चालिसाचा पाठ सुरु ठेवा.

सर्वांसाठीच शनिचा नवग्रहपिडाहर स्त्रोत्रातला मंत्र रोज जपावा असा आहे.

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते

|शुभंभवतु |

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उ बो, शनी ज्या राशीत तिथे साडेसाती या नियमाने तुमची जी काही रास आहे त्या राशीच्या मागे शनी आल्यावर तुम्हाला साडेसाती सुरू झाली असणार. वर कित्येकांनी म्हटलेय की ज्यांची पूर्वकर्मे चांगली त्यांना त्रास कमी होतो. तुमची नुसतीच चांगली नसावीत, उत्तम असावीत म्हणून तुम्हाला साडेसाती कधी येऊन गेली हे कळले नसावे.

काय आहे ना, चांगल्या आयुष्यासाठी प्रयत्न सगळेच करत असतात पण सगळेच सारख्या प्रमाणात यशस्वी होत नाहीत. जे होत नाहीत, ज्यांना प्रयत्न करूनही सतत कटकटी, अपयश वाट्याला येते ते शेवटी कंटाळून हे असे का होतेय याचा शोध लावायचा प्रयत्न करतात. काहीजण ज्योतिषी गाठतात. त्यांना जेव्हा कळते की आपल्याला साडेसाती म्हणून हे सगळे सुरू आहे तेव्हा त्यांना थोडे बरे वाटते. कारण साडेसात वर्षांनंतर का होईना, पण यातून सुटका मिळेल ही आशा निर्माण होते. मनुष्य हा शेवटी आशेवर जगणारा प्राणी आहे हो. आशा नसेल तर त्याचे आयुष्य शून्य.

ज्यांच्या आयुष्यात अडथळे येताहेत, कामे होत नाहीयेत, ती का होत नाहीयेत हे कळत नाही, बाहेर पडायचे मार्ग दिसत नाहीत त्यांच्यासाठी हे ज्योतिष बीतिष सगळे आहे. ते एकतर त्यांना आहे ते आयुष्य तसेच निमूट स्वीकारायला भाग पाडते किंवा भविष्यात चांगले आयुष्य वाट पाहतेय ही आशा निर्माण करते.

तुमचे आयुष्य तुम्हाला अपेक्षित होते तसेच चाललेय, दुःख चिंता करण्यासारख्या बाबी आयुष्यात नाहीत तर तुम्हाला ज्योतिषाची गरज नाही. तुम्हाला साडेसाती कधी येणार वगैरे विचार करून शिणू नका, तुमच्या आयुष्यात ती कधीही येणार नाही.

<<< सोपा उपाय. कोणता तरी मोठा गुन्हा करा , मग बघा साडेसाती येते की नाही? >>>
आता कसं मुद्द्याचं बोललात. मग ते अमकी-तमकी रास, ग्रहदशा वगैरे थोतांड कशाला?

<<< तुम्हाला साडेसाती कधी येणार वगैरे विचार करून शिणू नका, तुमच्या आयुष्यात ती कधीही येणार नाही. >>>
धन्यवाद, आभारी आहे.

उपाशी बोका, आयुष्यात साडेसाती यावी अशी तुमची इच्छा दिसते. ते वाचून मला महाभारतातल्या 'तुझी आठवण राहावी म्हणून संकटं दे' अशी मागणी कृष्णाकडे करणाऱ्या कुंतीची आठवण झाली Happy

करिअरमध्ये प्रचंड भरभराट, त्याचवेळेस व्यक्तिगत आयुष्यात प्रचंड अपेक्षाभंग, पण ते आयुष्य सोडून लांब जायला सतसद्विवेकबुद्धी परवानगी देत नाही म्हणून भराभराटी करीयरचे पंख कापून सामान्य करीयर स्विकारून त्याच आयुष्यात राहणारे माझे एक स्नेही होते, अजूनही आहेत. त्यांच्यासारख्या माणसाच्या वाट्याला हे सगळे का आले हा प्रश्न मला वारंवार पडायचा. एकदा त्यांनाच विचारले की हे असे तुमच्याबाबतीतच का व्हावे? ते म्हणाले, नशिबाच्या गोष्टी असतात. मी म्हटले कसले नशीब घेऊन बसलात? टाटा, बिर्ला, किर्लोस्कर कधी म्हणाले का, आमचे नशीब खूप चांगले म्हणून आम्ही यशस्वी झालो? तेव्हा ते चटकन म्हणाले की नशीब, नियती, ज्योतिष, ग्रहतारे ह्याचा विचार तेच करतात ज्यांना अपयश येते. जे आयुष्यात यशस्वी होतात ते 'मी माझ्या मनगटाच्या बळावर यश खेचून आणले' असेच म्हणतात. प्रयत्न सगळेच जण करतात, सगळेच यशस्वी होत नाहीत. यशस्वी होण्याची भरपूर कारणे असतात, चांगले नशीब हेच एकमेव कारण नसते पण नशिबाची साथ सुद्धा लागते. या स्नेह्यांची तेव्हा साडेसाती सुरू होती का माहीत नाही पण त्यांच्या आयुष्यातील खूप वाईट असा सात आठ वर्षांचा काळ मी जवळून बघितला. ती साडेसाती असावी. कारण नंतर अचानक व्यक्तिगत आयुष्यात अशा घडामोडी घडल्या ज्याने तणाव पूर्ण नाहीसे झाले, त्यादरम्यान जे काही वाईट झाले त्यातूनही नंतर चांगले मार्ग निघाले, करिअर पहिल्यासारखे होणे अशक्य होते पण तरी बऱ्यापैकी सुधारले. आता करीयरमधून रिटायरमेंट घेऊन शांत निवृत्त आयुष्य जगताहेत, मुलाची भरभराट पाहताहेत.

"आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.पडायचंच असेल तर, ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल."
- व पु काळे

आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा>>>> हे सर्व वाचायला,दुसर्‍यांना सांगायला(व.पुंना उद्देशून नाही) खूप सोपं आहे.व्यक्तीशः भोगताना कठीण आहे.

उ बो
तुम्ही हनुमंताची उपासना / भक्ति करत असाल तर साडेसातीचा त्रास अत्यल्प / नगण्य जाणवतो (बहुतांश जाणवतच नाही आणि जी संकटे त्या काळात येतात ती अंतिमतः भविष्यात फायद्याचीच सिध्द होतात ― इति मीच Happy कारण अनुभवाचे बोल )

Hi,
Mazi dhanu raas aani Shani 8 vya grahaat yurenous,nep aani Chandra sobat...
Saadesatee Cha kitpat trass....???

नवऱ्याची शनी महादशा सुरु आहे.
तब्येतीच्या तक्रारी 2 वर्षांपासून सुरु आहेत.
एक ऑपेरेशनही झालं पण तरी तब्येत सुधारत नाही.
हे कमी म्हणून की काय हापिसात मॅनेजर चा त्रास सुरु झाला आहे.
शारीरिक, मानसिक पातळीवर दोघांचाही कस लागतो आहे.
आणखी 3 वर्ष आहे म्हणे त्याची महादशा.
आम्ही दोघेही इतक्यातच दमलोय. अजून 3 वर्ष कशाकशातून जावं लागणार काय माहिती (sad बाहुली ).

इथे कुणी शनी महात्म्य वाचलंय का?
नवऱ्याला वाचायला सांगितलं आहे.
अर्थात त्यानं येणारी संकट कमी होणार नाहीत हे माहितीय
मनःशांती साठी वाचायला सांगितलंय.
पण त्यात बरेच अध्याय आहेत.
एवढं सगळं एका बैठकीत वाचणं अपेक्षित आहे का?
की रोज थोडं थोडं वाचलं तरी चालतं?

Pages