साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

तुळ राशीला शेवटची अडीचकी आहे. शेवटची अडीचकी काही चांगले घडवुन जाते. तुळ राशीला शनि राजयोग कारक असल्याने किंवा तुळ राशीत शनि उच्चीचा असल्यामुळे पहिली अडिचकी सोडली तर दुसर्‍या आणि तिसर्‍या अडीचकीत फारसा त्रास होत नाही.

शेवटच्या अडिचकीत कुटुंबस्थानातुन किंवा धन स्थानातुन होणारे शनिभ्रमण हळु हळु सांपत्तीक स्थितीत सुधारणाच करेल. याचा वेग मंद असला तरी स्लो बट स्टेडी अश्या प्रकारचा असेल.

कुटुंबात शनि हा वाढ करणारा ग्रह नसुन कितीही हवे असले तरी कुटुंबातील सदस्य संख्या एका आकड्याने किमान कमी होताना काहिंना दिसते. अत्यंत वृध्द असे आजी - आजोबा यांचा या अडिचकीत वियोग होण्याची शक्यता असते तेव्हा लवकरच त्यांच्या जिवंतपणी आशिर्वाद घेण्याचे मनात आणा. त्यांच्या बरोबर काही काळ व्यतित करा. त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शेवटी अमर कोणीच होत नसते. पण मोठ्यांचे कृपाछ्त्र मात्र कायम रहावे असे वाटत असते. अश्या वेळी रुख रुख राहु नये या दृष्टिने हे लिहले आहे.

वृश्चिक राशीला ही मधली अडिचकी. प्रत्यक्ष चंद्रावरुन शनिचे भ्रमण होताना होणारा मानसीक त्रास लक्षात राहिल असा असतो. तुमच्या राशीला अनुरुप बदला घ्यायचा स्वभाव जरा अजुनही लांब ठेवा . शांत पणे पहात रहा काय घडते आणि का घडते या कडे. अनुकुल काळ येईल तेव्हा तुम्हाला सव्याज उट्टे काढायची संधी येणारच आहे. पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल.

शनिवारी तेलाने मालीश करुन गरम पाण्याने स्नान करावे हा उपाय साडेसातीत करायला जुने व जाणते ज्योतिषी सांगतात. मनाचे व्यापार वाढतात तेव्हा शरीरातले रक्ताभिसरण वाढवणे सुखद अनुभव देते असा काहिसा प्रकार यामागे असावा.

शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.

धनु राशीला पहिलीच अडीचकी आहे. व्यावसायीक महात्वाकांक्षांना आवर घालुन लो रिस्क असलेले करार मदार करणे क्रमप्राप्त ठरेल. धनु राशीला धन स्थानाचा मालक असलेला शनिच व्ययस्थानात या अडिचकीत असल्यामुळे स्थावर / रोकड यांचा क्षय होताना दिसणार आहे. तो थांबविण्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण आणि मानसीक ताण जाणवणे अपरिहार्य आहे.

तृतीयेश शनि तुमच्या व्ययात असल्यामुळे सहोदरांची खास करुन मोठ्या भावा - बहिणीची चिंता सतावेल.

आपली मानसीकता अध्यात्मीक आणि परमेश्वराला मानणारी असल्यामुळे या कालखंडातुन आपण पार जाणारच आहात.

शनिवारी शनिमहाराजांना तेल आणि काळे उडीद याच बरोबर रुईपत्रांची माला अर्पण करा. मारुतीचे दर्शन घ्या. हा उपाय पुढील साडेसात वर्षे न चुकता करा. सोबत शनिस्तुती आणि हनुमान चालिसाचा पाठ सुरु ठेवा.

सर्वांसाठीच शनिचा नवग्रहपिडाहर स्त्रोत्रातला मंत्र रोज जपावा असा आहे.

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते

|शुभंभवतु |

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधनाताई Amen..
खरेकाका, तुमची साडेसाती संपली आहे.. त्याबद्दल तुमचे अभिनंदन.

सोसायटीत सेक्रेटरी होणे हीसुद्धा साडेसातीच असते...>>>

सोसायटीत कार्यकारिणीत स्वतःहून जाणे ही साडेसातीची सुरवात, खजिनदार वगैर पद घेणे हे खरे चटके व सेक्रेटरी होणे म्हणजे मधली अडीजकी... Happy Happy

साडेसातीबद्दल-
शनी देवाला माज केलेला चालत नाही, खपत नाही. तो भल्या भल्यांचा माज उतरवतो. साडेसातीत (आणि एरवीही) - माज करू नका, उन्मत्त होऊ नका. वर्कर क्लासशी नीट , आदराने वागा. स्वतः सेवाक्षेत्रात असलात तर आपलं काम नीटपणे करत राहा.

सनव +१

शनिदेव हे 'न्यायाधिश' आहेत, जर अहंकार, माज नसेल तर साडेसाती/ शनिमहादशेत खूप प्रगती सुद्धा होते. आणि अंहकार असेल तर तो सगळा उतरवतात ह्या काळात शनिदेव.
शनिदेव साडेसातीच्या काळात स्वतःला स्वतःची आणि इतरांची 'ओळख ' करून देतात.

'शनि' म्हण्जे मंदगती, त्यामुळे प्रत्येक कामाला बराच वेळ लागू शकतो. 'श्रद्ध आणि सबुरी' हा दोन गोष्टी साडेसातीत खूप महत्वाच्या आहेत.

मेख कसली? लाभ होतोय म्हणून केले जाते.
मलाही अनेक लाभ झाले>>>गैरसमज नसावा डीविनिता,मला वाटले तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी आहे म्हणून मी लिहिले पण अर्धाच type होऊन सेव्ह झाला प्रतिसाद आणि मी नंतर पाहिला नाही,
मला असे म्हणायचे होते की,तुमचा विश्वास आहे म्हणून चँगले अनुभव येत असतील मुळात माझा खूप विश्वास नाहीये या कशावर त्यामुळे,आणि श्रद्धा असेल तर भल्या भल्या गोष्टींना हरवू शकता येते हेही मला माहित आहे पण मला कशावर पूर्ण अतूट श्रद्धा ही ठेवता येत नाही हा माझा प्रॉब्लम आहे

माझी धनू रास आहे. साडेसातीत खुप त्रास झाला. आताही आहेच थोडा पण बिलिव्ह मी ह्या काळात खुप काही शिकायला मिळालं.

आपल्याला आपलं खरं रूप दाखवण्याचा काळ म्हणजे साडेसातीचा काळ. निराश होऊ नका. जे वाटेले येईल त्याला सामोरे जा आणि मुळात संयम ठेवा. साडेसातीतच ठेवायला पाहीजे असं काही नाही. आयुष्यभर ठेवा खुप फरक पडतो.

मुळ मुद्दा म्हणजे कधी कुणाबद्दल वाईट विचार करू नका, वागू नका.
न्यायाने राहा. इतकं जरी केलं तरी आयुष्यात कितीही मोठे संकटे आली तरी तरून जालं.

माझा एक प्रश्न आहे. लग्नाळू वर वधूंना दोघांनापण साडेसाती असेल तर लग्नानंतर त्रास दुप्पट होतो का?

उद्या सकाळी 9 वाजून ५३ मिनिटांनी वृश्चिकेची साडेसाती संपणार.... येSSSSSSSSSS नाचो... एन्जॉय

साडेसाती, अमुक ग्रह वक्री, तमका ग्रह दुषित वगैरे गोष्टी जाणून घेतल्यानंतर माणसाची नकारात्मकता वाढत असावी आणि मनात संशय वाढत असेल असं मला वाटतं. अंदमान निकोबार बेटांवर नैसर्गिक आयुष्य जगणारे आदिम जमातींचे लोक जास्त सुखी आहे असं वाटतं.
आपल्याला अर्धा पेला रिकामाच दिसतो.

साडेसाती व्यतिरिक्त इतर काळात त्रास झाला याचा अर्थ साडेसातीत त्रास होईलच असे नाही. शनी महाराज चांगल्या स्थानात, उच्च राशीत, इतर ग्रहांशी मंगल योग आणि युवा किंवा तरुणावस्थेत असतील तर हा काळ अत्यंत चांगला जातो जरी बाकी काळ वाईट गेला असला तरी. परंतु बऱ्याचदा साडेसातीत शनी महाराज मनाला आरसा दाखवण्याचे काम करतात. या जगाची क्षणभंगुरता दाखवून देतात आणि भौतिक जगातून पारमार्थिक जगाकडे नेण्याचा प्रयत्न करतात. या काळात बरेचजण अध्यात्मिक मार्गाकडे वळतात. बऱ्याचदा गुरुलाभ ही याच काळात होतो आणि अध्यात्मिक प्रगतीदेखील या काळात चांगली होते. जर तुमचा नैसर्गिक ओढा अध्यात्माकडे असेल तर का काळ खरेतर पर्वणीचाच असतो. या काळात गोरगरिबांना मदत, सत्पात्री केलेले दान, आणि नम्रता यामुळे साडेसातीचा त्रास कमी होतो. अहंकारी, उद्धट, वाममार्गाने वागणारे, आध्यात्माविषयी तिटकारा असणाऱ्या लोकांना मात्र हा काळ खडतर जातो.

ऋणिल, चांगली पोस्ट...
लग्न करणाऱ्या दोघांचीही साडेसाती सुरु असेल तर अगदी घटस्फोट होणार नाही पण लग्नानंतरचा काळ फार काही छान जाणार नाही.
सतत प्रॉब्लेम येऊ शकतात. सतत वादविवाद होणं असं होऊ शकेल.
असं मला वाटतं.

आपला जन्म होत असताना ज्या राशीत चंद्र असतो ती आपली जन्मरास व जी रास क्षितिजावर उगवत असते ती लग्नरास. चंद्र उगवत असताना जर जन्म झाला तर दोन्ही राशी एकच असणार.

ह्या दोन्ही राशींचे आपल्यावर काय परिणाम होतात हे कोणी उलगडून सांगितले तर बरे होईल. कित्येक जुळ्यांचे आयुष्य भिन्न होते. त्यांची जन्मरास एक असली तरी लग्नरास वेगळी असू शकते. पूर्वसंचितामुळे आयुष्यात खूप फरक पडणार पण त्यामुळे लग्नराशी वेगळ्या होऊ शकतात का?

मला असे वाटते की आपल्या पत्रिकेत जी ग्रहस्थिती असते त्यावर आपले आयुष्यमार्ग अवलंबून नसून जे मार्ग आपल्यासाठी आपल्या पूर्वसंचिताने निवडलेले असतात त्याबरहुकूम आपल्या पत्रिकेतील ग्राहस्थिती रचली जाते.

लग्न रास की जन्म रास पहावी?>> सर्वसाधारणपणे जन्मरास पहावी. परंतु काही पत्रिकात जन्मराशी पेक्षा लग्नरास प्रभावी असते. अशावेळी लग्नरास पहावी असाही एक प्रवाह ज्योतिषात आहे.

मला कशावर पूर्ण अतूट श्रद्धा ही ठेवता येत नाही हा माझा प्रॉब्लम आहे>>आदू हा सुद्धा एक टप्पा आहे असे जर मानले तर पुढे जाता येईल.
मी मनाला लाऊन घेतले नाही. तुम्ही मुद्दाम लिहिले असते तरी माझी श्रद्धा अतूट असल्याने तिच्यावर फरक पडला नसताच.

जुळ्यांच्या जन्मांत एकदीड तास वेळ लागत नाही. अर्थात राशी एकच असतात. दहावीस मिनिटांनी काठावर असल्यास रास बदलेल किंवा कुंडलीच फिरेल. पण दोघांचे आयुष्य ढोबळ मानाने एकसारखेच जायला हवे. लग्नानंतर जोडीदार इफेक्ट हा संततीवर पडू शकतो.
इतके सुक्ष्म भविष्य कुणाला येते?

>> धन्यवाद अपर्णा. माझा शनि १२ व्या घरात व कर्केचा चंद्र २ र्‍या घरात आहे. कै च्या कै टेरर दिवस होते.

सामो, शनिमहात्म्यामधे राजा विक्रमाच्या पत्रिकेत सुद्धा शनि १२ व्या घरात असल्याचं वर्णन 'बारावा अति क्रूर स्थानी' असं आहे.
पण त्याच शनिमहाराजांनी साडेसाती संपताना राजा विक्रमावर खूप कृपाही केली आहे.

शनिमहात्म्य पूर्वी वाचलेले आहे. तुमचे अगदी बरोबर आहे. आत्ता आठवले की खरच विक्रमसिंहाच्याही १२ व्या घरात होता शनि.

Pages