फ्री विल विरुद्ध ज्योतिष - astrology karma and transformation by stephen arroyo

Submitted by शुचि on 13 March, 2019 - 20:40

फ्री विल विरुद्ध ज्योतिष अशा कात्रीम‌ध्ये साप‌ड‌लेले अस‌ताना, ख‌र‌ं त‌र र‌स्त्याच्या, दुहेरी फाट्यापाशी आलेले अस‌ताना, हे पुस्त‌क साप‌ड‌ले. हा निव्वळ योगायोग‌ न‌सावा. या पुस्त‌कात काही यउत्त‌रे साप‌डून जावीत. स‌ध्या त‌री नुक‌तीच सुरुवात केलेली आहे प‌ण काही टीपा काढ‌ते आहे ज्या तुम‌च्याब‌रोब‌र‌ शेअर क‌राय‌ला आव‌ड‌तील. पुढेमागे म‌लाही या टीपांचा उप‌योग होइल म्ह‌णुन एका वेग‌ळ्या धाग्याम‌ध्ये त्या स‌ंक‌लित क‌र‌ते आहे.
.
पुस्त‌काचे नाव - astrology karma and transformation by stephen arroyo
.
https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/51U-Z2iurYL._SX331_BO1,204,203,200_.jpg
अर्थात एव‌ढा योगायोग‌ न‌सेल व‌गैरे मी म्ह‌ण‌ते आहे त‌र‌ क‌से साप‌ड‌ले हे पुस्त‌क? अग‌दी नॉर्म‌ल अशा रीतीने याचा शोध लाग‌ला त्यात काहीही गूढ नाही. एका ज्योतिष विषय‌क ब्लॉग‌व‌र‌ती म‌ला या पुस्त‌काचा स‌ंद‌र्भ मिळाला व‌ मी ते ग्र‌ंथाल‌यात‌ माग‌विले जे की न‌व्ह‌ते प‌ण १५० मैलांव‌र‌च्या दुस‌ऱ्या ग्र‌ंथाल‌यातून माग‌वुन त्यांनी म‌ला ते उप‌ल‌ब्ध क‌रुन दिले. असो. आव‌ड‌ले त‌र हे विक‌त घेइन कार‌ण स‌ंग्राह्य वाट‌त आहे. नेह‌मीचे २+२=४ अस‌ले यांत्रिकी ठोक‌ताळे न‌सुन ब‌ऱ्याच अंगांचा विचार क‌रुन एक प‌रिपूर्ण ओळ‌ख लेख‌काने क‌रुन दिलेली असावी असे मान‌ण्यास आत्ता त‌री वाव आहे.
______
क‌र्म‌विपाक म्ह‌ण‌जे सोप्या श‌ब्दात सांगाय‌चे त‌र "क‌रावे त‌से भ‌रावे", "whatsoever a man soweth that shall he also reap" किंवा अग‌दी क‌ठोर‌ श‌ब्दात सांगाय‌चे त‌र - "an eye for an eye (and a tooth for a tooth) " काटे पेराल त‌र काटेच उग‌व‌तील, गुलाब नाहीत. प्र‌त्येक जीवाचे आताचे आयुष्य‌ व‌ त्यातील घ‌ट‌ना हा पूर्वी केलेल्या क‌र्मांचा प‌रीपाक म्ह‌ण‌ता येईल. व‌ म्ह‌णुन‌च क‌र्म‌विपाक सिद्धांताचा , उप‌सिद्धांत‌ असा मांड‌ता येइल की क‌र्म‌विपाक निय‌म‌ हा ईश्व‌राचे, वैश्विक न्याय व‌ स‌ंतुल‌न‌ साध‌ण्याचे प्र‌भावी साध‌न आहे. व‌ वैश्विक स‌ंतुल‌न ही एक स्त‌ब्ध, नित्य‌, विराम‌पूर्ण घ‌ट‌ना न‌सुन, सात‌त्याने ब‌द‌ल‌त र‌हाणारी अनित्य‌ व‌ क्लिष्ट अशी घ‌ट‌ना व‌ व‌स्तुस्थिती आहे. या सात‌त्याने ब‌द‌ल‌णाऱ्या र‌ंग‌म‌ंचामागील श‌क्ती आहे ती म्ह‌ण‌जे "वास‌ना" (Desire). म्ह‌ण‌जेच एखादी घ‌ट‌ना, व्य‌क्तीच्या आयुष्यात घ‌डुन स‌ंतुल‌न‌ साध‌ले जाण्याक‌रीता, त्या जात‌कास एक विशिष्ठ वास‌ना होऊन त‌शी कृती घ‌डुन फ‌ळ मिळ‌णे आव‌श्य‌क आहे. Edgar cayce हे clairvoyant होऊन गेले त्यांच्या म‌ते व्य‌क्तीची अध्यात्मिक प्र‌ग‌ती होण्याक‌र‌ता, क‌र्म‌विपाक सिद्धांत ज‌र त्या व्य‌क्तीस माहीती असेल त‌र फाय‌द्याचे ठ‌र‌ते.त्यांच्याच श‌ब्दात सांगाय‌चे त‌र - "Like begets like", , "mind is the builder". Edgar cayce हे साय‌किक रीडिंग क‌र‌त व‌ Law and Grace हा त्यांच्या रीडिंग‌म‌धील म‌ह‌त्व‌चा घ‌ट‌क होता. क‌र्माचा उग‌म‌ हा वास‌नेत आहे हे स‌त्य‌ विस‌र‌ता येत‌ नाही. अनेक पौर्वात्य त‌तत्व‌द्न्यांनी हा निय‌म‌ प‌र‌त‌प‌र‌त मांड‌लेला आहे. स्व‌त:च्या उप‌देशांतुन वार‌ंवार अधोरेखित केलेला आहे. "an autobiography of a yogi" या पुस्त‌कात प‌र‌म‌ह‌ंस‌ योगान‌ंद‌ म्ह‌ण‌तात -

.
"Fate, karma, destiny - call it what you will - there is a law of justice which somehow, but not by chance, determines our race, our physical structure and some of our mental and emotional traits. The important thing to realize is that while we may not escape our own basic pattern, we can work in conformity with it. That is where free will comes in. We are free to choose and discriminate to the limits of our understanding, and, as we rightly exercise our power of choice, our understanding grows. Then, once having chosen, a man has to accept the consequences of his choice and go on from there."

व‌ पुढे क‌र्मापासून मुक्ती मिळ‌व‌ण्यासाठी क‌राव‌याच्या उपायांब‌द्द‌ल ते असे म्ह‌ण‌तात -
.

seeds of past karma cannot germinate if they are roasted in the divine fire of wisdom ..... the deeper the self realization of a man, the more he influences the whole universe by his subtle spiritual vibrations, and the less he himself is affected by the phenomenal flux.

बौद्ध ध‌तर्मातील निर्वाण या श‌ब्दाचा श‌ब्द‌श: अर्थ आहे - "State where the winds of Karma doesn't blow." हिंदू ध‌र्मात त‌र क‌र्म‌ या विष‌याव‌र‌ती उहापोह‌ झालेला आहे. क‌र्माचे ३ प्र‌कार सांगीत‌लेले आहेत - प्रार‌ब्ध, क्रिय‌माण व‌ स‌ंचित्. प्रार‌ब्ध हे क‌र्म ते जे या ज‌न्मी भोगुन पूर्ण क‌रावे लाग‌ते. म‌ग‌ त्यात‌ सुख‍दु:ख दोन्ही आले. क्रिय‌माण क‌र्म ते जे आप‌ण स‌त‌त क‌र‌त आहोत व‌ ज्याची फ‌ळे आप‌ण पुढे भोग‌णार आहोत्. त‌र स‌ंचित क‌र्म हे गुप्त क‌र्म जे अजुन क्रियाशिल‌ व्हाय‌चे आहे.
ज्योतिषाचा अभ्यास केलेल्या व्य‌क्ती हे जाण‌तात की ज‌न्म‌कुंड‌लीम‌धील ग्र‌ह‌,तारे, घ‌र‌ं हे त्या त्या व्य‌क्तीच्या या ज‌न्मातील मूळ प्र‌कृतीक‌डे अंगुलीनिर्देश क‌र‌तात्. त्या त्या व्य‌क्तीचे सुप्त‌ गुण‍दोष, दृश्य‌मान गुणाव‌गुण,त्याच्या वास‌ना, attachments, त्याला येणाऱ्या, येऊ घात‌लेल्या स‌म‌स्या, त्याच्या आचार्-विचारांचा आराख‌डा हे सारे कुंड‌लीव‌रुन ज‌रुर जाण‌ता येते. प्र‌त्येक व्य‌क्ती स्व‌त:चा एक स्व‌भाव व‌ एक‌मेव‌ ठ‌सा, ऊर्जा घेऊन ज‌न्मास येते. हा जो प्र‌त्येकाचा mental, emotional,intellectual आणि, inspirational पॅट‌र्न अस‌तो तो ज‌ल‍-अग्नी-पृथ्वी व‌ वायु राशीतून प्र‌भावीप‌णे स‌म‌जुन घेता येऊ श‌क‌तो. अर्थात ज‌न्म‌कुंड‌ली ही प्रार‌ब्ध दाख‌विते. म्ह‌ण‌जेच पूर्व‌स‌ंस्कारांचा त‌ग‌डा प‌ग‌डा व्य‌क्तीव‌र‌ती अस‌तो. असे न‌क्की म्ह‌ण‌ता येते की - The chart shows us what we are now because of what we have done & thought in the past. घ‌ट‌नेव‌र‌ती काय‌ प्र‌तिक्रिया द्याय‌ची, क‌से रिअॅक्ट क‌राय‌चे हे आप‌ल्याव‌र‌ती अव‌ल‌ंबुन अस‌ते. म्ह‌ण‌जेच क्रिय‌माण क‌र्माव‌र‌ आप‌ला अधिकार आहे. प‌ण त्याचा अर्थ‌ हा न‌व्हे की चुट‌कीस‌र‌शी आप‌ल्या पूर्व‌स‌ंस्कारांपासून आप‌ल्याला मुक्ती मिळु श‌क‌ते. उल‌ट पुर्व‌स‌ंस्कार हे जळूप्र‌माणे आप‌ल्याला घ‌ट्ट चिक‌ट‌लेले अस‌तात व‌ अविर‌त प‌रिश्र‌मांन‌ंत‌र‌ही ते सुट‌तासुट‌त नाहीत्. किंब‌हुना, ईश्व‌रेच्छा, उपास‌ना, अध्यात्मिक मार्गातील स‌त्स‌ंग‌ आदि उपायांनी किंचीत फ‌र‌क प‌ड‌ण्याची थोडीफार‌त‌री श‌क्य‌ता निर्माण होते.

म‌ग‌ या स‌र्व‌ जिग‌सॉ प‌झ‌ल‌म‌ध्ये ज्योतिष क‌से फिट्ट ब‌स‌ते त‌र ज‌न्म‌कुंड‌ली पाहून आप‌ल्या वास‌ना, आस‌क्ती, इच्छा, आप‌ल्याला पुढे येऊ श‌क‌णाऱ्या स‌म‌स्या, आप‌ले गुणाव‌गुण यांचे द्न्यान क‌रुन देणारा वाटाड्या, म्ह‌णुन ज्योतिषाक‌डे प‌हाता यावे.


.
शुचिचे विचार-
म‌ला जो प्र‌श्न काही दिव‌सांपुर्वी प‌ड‌लेला होता की आप‌ला क‌ल‌ त‌र आप‌ण जाण‌तोच म‌ग ज्योतिषी काय वेग‌ळ‌ं सांग‌णार्? त्याचे थोडेफार उत्त‌र म‌ला या व‌रील विवेच‌नातुन मिळाले. स्व‌भान, सेल्फ-नॉलेज ही व‌यानुसार अॅक्वाय‌र होत जाणारी स‌ंप‌त्ती आहे. आप‌ला क‌ल‌ व‌ स्व‌भाव, आप‌ले गुण दोष याब‌द्द‌ल आप‌ण पूर्ण‌त: द्न्यानी न‌स‌तो प‌ण ज‌स‌ज‌सा काळ जातो त‌स‌त‌से हे द्न्यान वाढ‌त जाते. तेव्हा ज‌र‌ एखादे टूल आप‌ल्याला रेडिमेड स्व‌भान देण्याचा दावा क‌र‌त असेल त‌र त्याचा उप‌योग का क‌रु न‌ये. आणि म‌ग त‌से त‌र आप‌ण प्र‌त्येकानेच ज्योतिष शिकाय‌ला ह‌वे. प‌ण त‌से न‌स‌ते कार‌ण तेव‌ढा वेळ, क‌ल‌ प्र‌त्येकापाशी असेल‌च असे नाही. म्ह‌णुन म‌ग स‌माजात ज्योतिषी आव‌श्य‌क आहेत्.प‌ण अर्थात ब‌रेच‌से लोक हे स्व‌भान यावे म्ह‌णुन न‌ जाता काहीत‌री भौतिक, मान‌सिक अड‌च‌णी घेऊन‌च ज्योतिषांक‌डे जातात व‌ त‌तोप‌रांत आप‌ल्याला क‌सा वाईट अनुभ‌व आला, अपूर्ण माहीती मिळाली हे सांग‌त फिर‌तात्.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता ज‌न्म‌कुंड‌लीतील काही विशिष्ठ ग्र‌ह‌स्थितींक‌डे व‌ळू यात्.
श‌नि या ग्र‌हास क‌र्माचा कार‌क अशी उपाधी दिली गेलेली अस‌ली त‌री फ‌क्त श‌नि हाच जात‌काच्या आयुष्यात येणाऱ्या अड‌च‌णी दाख‌वितो असे म्ह‌ण‌णे हे अतिसुल‌भीक‌र‌ण ठ‌रेल्. श‌नि जात‌काच्या आयुष्यातील अतिमंद‌ ग‌तीने पुढे स‌र‌क‌णाऱ्या अड‌च‌णी, आव्हाने,स‌म‌स्या, क‌सोटी ज‌रुर द‌र्श‌वितो. ज्या घ‌राम‌ध्ये श‌नि प‌ड‌तो ज्या अन्य ग्र‌हांशी तो दृष्ह्टींम‌धुन (aspects) स‌ंप‌र्कात येतो त्यातुन ब‌रेच् आराख‌डे मांड्ता येतात हे स‌त्य‌ आहे. प‌र‌ंतु लोकांम‌ध्ये "क‌र्म्" या विष‌याब‌द्द‌ल‌ची स‌म‌जूत म्ह‌ण‌ज काहीत‌री न‌कारात्म‌क, भ‌याव‌ह‌, क‌सोटी, न‌शीबाने घेत‌लेली प‌रीक्षा अशी चूकीची अस‌ते. आणि त्यामुळे श‌नि ग्र‌हाने द‌र्श‌विलेले प‌रीणाम‌ही त्याच छटेत पाहीले जातात्. प‌रंतु हे अतिसुल‌भीक‌र‌ण झाले.आता क‌र्म म्ह‌ण‌जे त‌री काय त‌र श‌निचे घ‌र, श‌निची दृष्टी (स‌ंल‌ग्न = ० अंश‌, काट‌कोन्=९० अंश, प‌र‌स्प‌र‌विरुद्ध = १८० अंश्) या आप‌ले त‌थाक‌थित वाईट क‌र्म द‌र्श‌वितात म्ह‌ण‌जे काय त‌र श‌नि जात‌काच्या नैस‌र्गिक प्र‌कृतीस, जीव‌नेच्छेच्या नैस‌र्गिक निर्मीतीक्ष‌म अशा ऊर्जाप्र‌वाहास बाधा आण‌णाऱ्या आप‌ल्याच स्व‌भाव‌विशेषास अधोरेखीत क‌र‌तो. भाषांत‌र अव‌घ‌ड गेल्याने लेख‌काचे स्व‌त:चे श‌ब्द् देते आहे -

These challenging aspects of Saturn show crystallized habit patterns of thought and action which inhibit the flow of our creative energy.

उदा - पूर्व‌ज‌न्मी केलेल्या स‌त्तेचा किंवा एखाद्या गुण‌विशेषाचा दुरुप‌योग जो की या ज‌न्मी सुधारुन व्य‌व‌स्थित कृतीशील, चॅन‌लाइझ क‌र‌ण्याची मिळालेली स‌ंधी श‌नि ब‌हाल‌ क‌र‌तो. जीव‌नाची ती क्षेत्रे श‌नि द‌र्श‌वितो ज्याम‌ध्ये मूल‌भूत, आमूलाग्र त‌ड‌जोड ग‌र‌जेची होऊन ब‌स‌ते.

Such an aspect (and this could apply to quicunx, semi-sextile, semisquare aspects as well) generates great energy from it's inner tension; and we can use this energy to develop greater awareness and creativity. Saturn is the planet of form and structure and we often find that the planet in close aspect to Saturn needs to be given a new form of expression.

दृष्टींब‌द्द‌ल थोड‌क्यात बोलाय‌चे झाले त‌र,९० अंश‌ म्ह‌ण‌जे प‌र्स्प‌रांना छेद देऊन २ वेग‌वेग‌ळ्या दिशांना घेऊन जाणारे दृष्टीकोन, त‌त्वे त‌र १८० अंश चि दृष्टी म्ह‌ण‌जे त‌र प‌र‌स्प‌र विरूद्ध कार्य‌र‌त त‌त्वे. तेव्हा या दृष्टी स‌र्वाधिक त‌णावाच्या अस‌ल्याने स‌र्वाधिक प्र‌ग‌ती होण्याची स‌ंधी ऑफ‌र‌ क‌र‌तात्.
<अग्नी,पृथ्वि,वायु व‌ ज‌ल‌ या त‌त्वांब‌द्द‌ल क्र‌म‌श्:>
.
शुचिचे विचार - स‌ध्या अजुन एक पुस्त‌क बॅक‌ब‌र्न‌र‌व‌र टाक‌लेले आहे ते म्ह‌ण‌जे - खोर्शाद भाव‌न‌ग‌री यांचे लॉज ऑफ द‌ स्पिरीट व‌र्ल्ड. या पुस्त‌कातील काही विचार व‌रील विचारांशी जुळ‌तात्. पैकी एक विचार हा की पृथ्वी हे आत्म्याक‌र‌ता बाल‌वाडी आहे, शाळा आहे. येथे येऊन आत्मा शिक‌तो व‌ स्व‌त:ची प्र‌ग‌ती क‌रुन घेतो तेव्हा "दुर्दैवी" असे काहीही न‌स‌ते अस‌तात ते ध‌डे. प्र‌त्येकाची प्र‌ग‌ती ही होत‌च आहे, कोणाची ज‌ल‌द त‌र कोणाची म‌ंद‌ग‌तीने. /
शुचिचे विचार - श‌नि या ग्र‌हाब‌द्द‌ल मी जी काही उत्त‌म‌ विवेच‌ने वाच‌ली त्यातील एक या पुस्त‌कात साप‌ड‌ले. ते खालील‌प्र‌माणे -

काल‌प‌र‌वा प‌र्य‌ंत श‌नि हा क्रुर ग्र‌ह‌ (malefic planet) म्ह‌णुन ज्योतिष‌शास्त्रात मान्य‌ता पाव‌लेला होता. असा ग्र‌ह‌ ज्याचे दुष्प‌रीणाम स‌ह‌न क‌रुन एक‌दाचे पार पाडून टाकाय‌चे अस‌तात व‌ असा ग्र‌ह‌ जो प्र‌ग‌तीस, विकासास बाध‌क‌ अस‌तो. प‌र‌ंतु गेल्या २० एक व‌र्षात या विचार‌स‌र‌णीम‌ध्ये ब‌द‌ल झालेला आहे. आणि ज्योतिष‌ शास्त्रात श‌निच्या स‌कारात्म‌क गुणांब‌द्द‌ल जाग‌रुक‌ता आलेली आहे.श‌नि हा अध्यात्मिक प्र‌ग‌ततीस साध‌क‌ ग्र‌ह‌ क‌सा आहे ते पाहू -
(१) self preservation अर्थात स्वार्थ‌, स्व‌र‌क्ष‌ण, स्व‌हीत, आकुंच‌न अशी काही त‌त्वे श‌निच्या अधिप‌त्याखाली येतात्. या गुणांमुळे जात‌क भित्रा, रुक्ष‌, स‌ंश‌यी, defensive ब‌नू श‌क‌तो. प‌ण याच पैलूची दुस‌री बाजू हीदेखिल आहे की जात‌क हा म‌ह‌त्व‌कांक्षी, क‌र्त‌व्य‌क‌ठोर, स्वाव‌ल‌ंबी, self-reliant व‌ आंत‌रीक ताक‌द‌ अस‌णाराही ब‌नू श‌क‌तो.
(२) कोण‌त्याही व‌स्तूचा आराख‌डा, न‌काशा, सांगाडा अर्थात structure श‌निच्या अधिप‌त्याखाली येते. त्यामुळे सांस्कृतिक‌ रुढी, जात‌काचे व‌डील, एक‌ंद‌र व‌डिल‌धाऱ्या व्य‌क्ती या श‌निच्या कार‌क‌त्वाखाली येतात्.
(३) काळ आणि काळाने वार‌ंवार घालून दिलेले ध‌डे ज‌से गांभीर्य‌,श‌हाण‌प‌ण, द्न्यान,धीरोदात्त‌ता,आर्थिक स्थैर्य‌, प‌र‌ंप‌रावाद्.श‌नि हा एका ग्रीक देवाब‌रोब‌र correlate केला जातो तो देव‌ म्ह‌ण‌जे - Kronos. हा देव निर्द‌य‌तेने, क‌ठोर‌तेने, केलेल्या क‌र्माचे द‌ंड देणारा असा मान‌ला जातो.
(४) श‌निच्या प्र‌भावाखाली येणारा अजुन एक गुण‌ध‌र्म‌ म्ह‌ण‌जे- सात‌त्याने अंम‌ल केल्याने स‌व‌य अर्थात व्य‌क्तीचा दुस‌रा स्व‌भाव‌च ब‌नुन जाणारे गुण‌ध‌र्म‌ (old patterns of life and personality). ज‌स‌ज‌सा काळ पुढे स‌र‌क‌तो त‌स‌त‌से हे अधिकाधिक प‌क्के, द‌ग‌डाव‌र‌ची रेष ब‌न‌त जातात. या गुण‌ध‌र्मांमुळेच ब‌ऱ्याच श‌निप्र‌धान व्य‌क्ती या self oppressive, skeptical , कोण‌त्याही न‌व्या ब‌द‌लास विरोध‌ क‌र‌णाऱ्या, स्व‌त:भोव‌ती कुंप‌ण घालुन घेणाऱ्या, एक‌ल‌कोंड्या अस‌तात त‌र‌ अग‌दी याच गुण‌ध‌र्मांमुळे काही श‌निप्र‌धान व्य‌क्ती या कोण‌ताही अतिरेक टाळून स‌ंतुल‌न‌ साध‌णाऱ्या क्व‌चित विरागी, द्न्यानीही आढ‌ळ‌तात्. स‌ह‌सा श‌निप्र‌धान व्य‌क्तींना भ‌प‌केबाजी, दिखाऊप‌णा यांच्याब‌द्द‌ल तिट‌कारा असुन, they are sensitive and appreciative of enduring values.
(५)

According to Dane Rudhyar, Saturn refers to a person's fundamental nature, purity of one's self. It seems that Saturn has come to such a negative meaning in minds of many astrologers and students of astrology because most people doi not live in the essence of their fundamental nature but rather in terms of fashions, social patterns, ego games

(6) मान‌स‌शास्त्राच्या दृष्टीकोनाम‌धुन पाहीले अस‌ता, कार्ल ज‌ंग‌ने ज्यास "शॅडो" म्ह‌ट‌ले आहे असे व्य‌क्तीम‌त्वाचे अंग‌ श‌नि दाख‌व‌तो. जे जे म्ह‌णुन व्य‌क्ती नाकार‌ते, ज्याब‌द्द‌ल तिज‌ गुन्हेगारीची भाव‌ना अस‌ते व‌ म्ह‌णुन जे गुण‌दोष व्य‌क्ती अन्य लोकांव‌र आरोपित क‌र‌ते, ते गुण‌ध‌र्म‌ आणि instinct of withdrawal from life यांचे श‌नि प्र‌तिनिधीत्व‌ क‌र‌तो.
.
या स‌र्व म‌त‌म‌तांत‌रांम‌धुन सार‌ घ्याय‌चे झाले त‌र एक ल‌क्षात येते श‌नि अत्य‌ंतिक स‌ंपृक्त‌ अनुभ‌व व‌ क‌सोटी यांचा कार‌क‌ आहे, जे की जीवात्म्यास फ‌क्त भौतिक प्र‌त‌लाव‌र‌च अनुभ‌वास येऊ श‌क‌तात, शिक‌ता येऊ श‌क‌तात. The pain, tension and pressure of earthy life has an evolutionary and developmental purpose.

The meterial plane is as poet T.S.Eliot writes, the point of intersection of timeless with time. Saturn is the planet of time and through the Saturnian experience of living in the meterial world,where everything moves so slowly and where we have to work so hard to make anything happen to grow in any way, one can make the greatest spiritual progress.

अर्थात श‌नि हा काळाचा कार‌क‌ असुन, भौतिक ज‌गात अत्य‌ंत चेंग‌ट‌प‌णे शिकावे लाग‌णारे ध‌डे, क‌सोटी, प‌रीक्षा यांचे प्र‌तिनिधीत्व‌ तो क‌र‌तो. प‌ण हे कितीही जिक‌रीचे अस‌ले त‌री अध्यात्मिक प्र‌ग‌तीक‌र‌ता अनिवार्य‌ अस‌ते.अत्य‌ंत‌ म‌ंद‌ ग‌तीने पुढे स‌र‌क‌णारे, जात‌काच्या स‌ह‌न‌श‌क्तीची क‌सोटी प‌हाणारे ध‌डे श‌नि शिक‌व‌तो. Saturn's action clearly shows us the cost of our desires and attachments.
श‌नि हा क‌ष्ट‌म‌य , ख‌ड‌त‌र प्र‌य‌त्नांचा कार‌क आहे.

Saturn's pressure should therefore be taken as a helpful push toward doing the work that we need to do in order to develop at a deep level, rather than as something to dread and to try to escape from

या स‌र्व‌ विवेच‌नाव‌रुन हे न‌क्की आहे हकी श‌निचा क‌ठोर स्व‌भाव हा जात‌काच्या अध्यात्मिक उन्न‌तीक‌र‌ता आव‌श्य‌क आहे, अनिवार्य‌ आहे प‌ण ............प्रेम‌, सौंद‌र्य‌, स‌ह‌ज‌ता, lightness, प्रेर‌णा, inspiration, स्व‌प्न, श्र‌द्धा या पूर‌क गुणांखेरीज, श‌निचा रुक्ष‌प‌णा म्ह‌ण‌जे म‌णाम‌णाचे ओझेच नाही का?

When mental and emotional fixations and blockages result from an extreme expression of Saturn's discipline, the negativity that builds up, crowds out the true essence and energy of life and the soul starves and withers since it then,lacks the very water of life and here come into picture Jupiter (and sometimes Neptune)

म्ह‌णुन‌च कुंड‌लीतील गुरु व‌ व‌रुण हे ग्र‌ह‌ही श‌निस पूर‌क म्ह‌णुन प‌हावे लाग‌तात्. गुरु (= श्र‌द्धा, दैवी कृपा अर्थात Grace) त‌र‌ व‌रुण म्ह‌ण‌जे साक्षात क‌ला, र‌सिक‌ता व‌ सौंद‌र्यासक्ती. श‌निचा प्र‌य‌त्न व‌ गुरुची दैवी कृपा त‌सेच श्र‌द्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजूच नाहीत काय? प्र‌य‌त्नांशिवाय , श्र‌द्धा ही पोक‌ळ व‌ निर‌र्थ‌क आहे. आणि श्र‌द्धेशिवाय प्र‌य‌त्न क‌र‌ण्यात त‌री काय ह‌शील? Through efforts (श‌नि), one opens a channel through which Grace(गुरु) may flow. व‌रुण हा अध्यात्मिक प्र‌त‌ल अर्थात higher consciousness दाख‌वितो प‌ण माणुस अध्यात्माक‌डे तेव्हा व‌ळ‌तो जेव्हा तो स‌ंसारास विट‌तो, त्याची भौतिक प्र‌त‌लाव‌रील आस‌क्ती लोप पाव‌ते. आणि म्ह‌णुन‌च ज्योतिषात श‌नि-गुरु, श‌नि-व‌रुण या जोड्या हातात हात घालुन‌च प‌हाव्या लाग‌तात्.
.

ल‌ग्न अर्थात प‌हीले घ‌र, ज्याला Ascendant, उदित राशी म्ह‌ट‌ले जाते ती रास त‌र म‌ह‌त्वाची अस‌तेच प‌ण त्यापेक्षाही त्या राशीत व‌ १२ व्या घ‌राच्या अल्याड‌चे म्ह‌ण‌जे ल‌ग्नाचे अंश + १२ व्या घ‌राचे ६ अंश असा प‌रिस‌र ल‌क्षात घ्यावा लाग‌तो. आणि हाच निय‌म‌ अन्य स‌र्व‌ ग्र‌हांना लागू होतो.
ज्योतिष हे Geocentric आहे म्ह‌ण‌जे पृथ्वी केंद्र‌स्थानी मानुन पृथ्वीव‌रुन अन्य ग्र‌ह‌ व‌ ताराम‌ंड‌ले कशी दिस‌तात ते पाहून ज‌न्म‌कुंड‌ली मांड‌ली जाते, ग्र‌हांचि व‌क्री ग‌ती जाणुन घेत‌ली जाते. Imagine a full harvest moon glowing Orange and Gold just above the Horizon. जेव्हा आप‌ण चंद्रोद‌य‌ प‌हातो तेव्हा च‌ंद्र‌ क्षितिजाव‌र‌ती प्र‌च‌ंड दिस‌तो. अन्य वेळी आकाशात दिसेल त्यापेक्षा दुप्प‌ट व्यासाचा स‌ह‌ज दिस‌तो. हे झाले Optical Illusion. प‌ण ज्योतिष हे Geocentric अस‌ल्याने हेच Optical Illusion, कुंड‌ली मांड‌तेवेळी ल‌क्षात घ्यावे लाग‌ते. व‌ असे म्ह‌णावे लाग‌ते की ल‌ग्नी ग्र‌ह‌ जात‌काव‌र "मोठ्या" प्र‌माणात प‌रिणाम क‌र‌तो.
उदा १ - एक जात‌क‌ आहे - म‌क‌र्-सूर्य‌, क‌न्या-चंद्र‌ व‌ क‌र्क‍ - ल‌ग्न त‌र त्याचे स्व‌भाव‌विशेष स‌ह‌ज असे सांग‌ता तयेतील की, ही व्य‌क्ती जुन्या व‌ प‌र‌ंप‌रावादी विचार‌स‌र‌णींची, रुढीवादी, स्व‌स‌ंर‌क्ष‌णास म‌ह‌त्व‌ देणारी म्ह‌ण‌जे, self protective, साव‌धान‌ता बाळ‌ग‌णारी, पापभीरु व‌ नावीन्याचा ह‌व्यास अजिबात न‌ ध‌र‌ता, रुढ मार्ग‌ चोख‌ंद‌ळ‌णारी आहे. प‌ण हे स‌र्व‌ क‌से मोडुन प‌डु श‌क‌ते ते प‌हा - ज‌र‌ याच व्य‌क्तीच्या ल‌ग्नी किंवा ल‌ग्नाभोव‌ताल‌च्या क्षेत्रात प‌ण १२ व्या घ‌रात ह‌र्षल‌ असेल त‌र ज‌री व‌रील स‌र्व‌ गुण‌विशेष प‌र‌ंप‌रावादाक‌डे अंगुलीनिर्देश क‌र‌णारे अस‌तील त‌री,ही व्य‌क्ति विरुद्ध वागेल्. ह‌र्ष‌ल‌चे, प्र‌योग‌शील‌ता, पुरोगामित्व‌, न‌व‌न‌वीन वाटा चोखाळ‌णे, अनोळ‌खी प्रांत‌ धुंडाळ‌णे, नावीन्याची, प्र‌योगाची आस असे गुण‌ या व्य‌क्तीत प्रामुख्याने आढ‌ळून येतील. व‌ सूर्य‌ म‌क‌र‌ राशीत‌ असून‌ही, म‌क‌रेची स‌ंकुचित व‌ जुनाट विचार‌स‌र‌णी या व्य‌क्तिस क‌धीच आव‌ड‌णार नाही. हेच विवेच‌न लेख‌काच्या श‌ब्दात खालील‌प्र‌माणे-

As an example of significance of a planet near Ascendant, let us take an example of a man whose Sun is in Capricorn,
Moon in Virgo and Ascendant is in Cancer.If one were to judge his overall temperament, from those 3 factors alone,it would be apparent that he would rather be a sort of conservative person: cautious, self-protective,security conscious and perhaps even a bit skeptical of anything not rooted in cultural or familial traditions. However if this man also has Uranus conjunct Ascendant (whether on 12th or on 1st house side) we begin to see an entirely new dimension of his personality. For in spite of all the natal factors, pointing toward security and traditionalism, the Uranian vibration is likely to point a streak of expeimentalism,
unorthodoxy and an openness to new and different. Rather than being a stick-in-the-mud sort of person, filled with fears and self-doubt he may exemplify progressive thinking and even revolutionary inclination on some level, in fact this man could never be satisfied with a Capricornian lifestyle in which primary significance was on duty and limitations for he would need to not only think about but also to act out his constant urge toward a variety of experience and freedom of self expression.

.
उदाह‌र‌ण २ - कुंभ‌ सूर्य‌, ध‌नु च‌ंद्र‌ व‌ सिंह‌ ल‌ग्न अस‌लेल्या स्त्रीचे उदाह‌र‌ण घ्या. ही स्त्री आत्म‌विश्वास व‌ तेजाने त‌ळ‌प‌त‌, म‌न‌मोक‌ळेप‌णाने ज‌गात विश्वासाने वाव‌रेल असे स‌ह‌ज म्ह‌ण‌ता येइल्. प‌ण केव‌ळ प्लूटो ल‌ग्नी प‌ड‌ल्यामुळे, ती वृश्चिक ल‌ग्न अस‌लेल्या जात‌काप्र‌माणे अंत‌र्मुख, खाज‌गीप‌ण ज‌प‌णारी, मूडी, self-repressive च‌ट‌क‌न स्व‌त:ला व्य‌क्त न‌ क‌र‌णारी, आत‌ल्या गाठीची अशी वागेल, हेच विवेच‌न लेख‌काच्या श‌ब्दात -

As another example suppose a woman has an Aquarius Sun, Sagittarius Moon and Leo rising. This is a powerful combination of positive, exuberant energies which we might expect to be expressed dynamically in a particularly overt manner. But if this woman has Pluto conjunct the Ascendant, she would most likely express herself in a manner reminiscent of those with Scorpio rising : Secretive, moody, self-repressive, reflective. Or to state this more precisely, there might be a strong fear of allowing herself the kind of spontaneity that her other chart factors symbolize.

ल‌ग्नी प‌ड‌लेले रास‌ आणि ग्र‌ह‌ हे जात‌काच्याenergy field व‌र‌ती मोठ्या प्र‌माणात प‌रीणाम क‌र‌तात्.

The ascendant marks the point of separation of the 12th house (things beyond our conscious control) and the 1st house (forces that we can consciously use). Thus any planet on the Ascendant (either natally or by transit or progression) indicates that one is becoming aware of the function, energy or universal law with great immediacy.

.
शनीच्या पलीकडचे जे तीन ग्रह‌ - प्लूटो, वरुण आणि हर्षल हे अशा शक्तींचे, ऊर्जेचे प्रवाह आहेत जे सतत आपलया जाणीवेचा अर्थात consciousness चा विस्तार करण्याचा प्रयत्न करतात. Dan Rudhyar यांनी त्यांच्या ज्योतिषाच्या पुस्तकात या तीन ग्रहांना "Ambassador of Galaxy " म्हणजे आकाशगंगेचे राजदूत म्हटले आहे. कारण शनीच्य पलीकडे जी अथांगता आहे तिचे प्रतिनिधित्व हे ग्रह करतात. हे ग्रह आपल्या जाणिवेच्या नियंत्रणाखाली येत नाहीत. यांच्या उर्जेवर जातकाचे नियंत्रण नसते. जातक फक्त अनुभवू शकतो आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे केवळ त्यातल्या त्यात ठरवू शकतो. हे तीन ग्रह, युती, संयोग, दृष्टी, घर व राशी आदींनी जीवनाच्या ज्या क्षेत्रावरती परिणाम करतात तिथे बदल, disruption , upheaval दर्शवितात. तिथे व्यक्तीच्या जाणिवेची मर्यादा मोडून व्यक्तीस higher consciousness म्हणजे पारलौकिकता, अतर्क्यता, अद्न्यात अनुभवास येते. जरी हा अनुभव तीनही ग्रहांमुळे येत असला तरी प्रत्येकाची छटा वेगवेगळी आहे.
पैकी वरुण म्हणजे नेपच्यूनबद्दल बोलायचे झाले तर हा ग्रह, तारकांच्या संपूर्ण पलीकडे असून एक ever flowing ऊर्जा जी कि अमर्याद, अथांग, निराकार आहे ती दर्शवितो, त्या ऊर्जेचा कारक नेपच्यून/वरुण आहे. या ग्रहांचे कारकत्व, रूप, शक्ती, essence , आत्मा समजून घेणयाचा एकमेव राजमार्ग आहे तो म्हणजे, शरणागती, surrender , समर्पण, त्या शक्तीस कोणताही विरोध न करता तिजमध्ये विरून जाणे. वरूण‌ हा अथांग आहे असा कि ज्यामध्ये मीपण, अहंकार यांच्या मर्यादा विरघळून जातात जशी मिठाची बाहुली समुद्रात विरून जाते, तिचा लवलेशही उरत नाही. अर्थात मग असे काय या ग्रहांच्या स्वामित्वाखाली येते तर कला, संगीत, काव्य, अध्यात्म, प्रार्थना, स्वप्न, आणि नकारात्मक छटेचे सांगायचे झाले तर ड्रग्ज अर्थात मादक द्रव्ये, मद्यातिरेक, भास (illusion ), स्वप्रतारणा (सेल्फ-deception ) हेदेखील येते. आदर्शवाद, कारुण्य, माणुसकी या बाबीसुद्धा वरुणाच्या प्रभावाखाली येतात. कारुण्य म्हणजे तरी काय तर सर्व जीवामध्ये एकच आत्मा असल्याचा साक्षात्कार म्हणजे परत मर्यादारहित, boundary-less compassion . जन्मकुंडलीत वरुण ज्या ग्रहांच्या सन्निध येतो त्यास निर्मळ, refine करतो. त्यातून पाहिल्यांदा बरेचदा गोंधळ, chaos ,वास्तवाचे भान सुटणे, अतिआदर्शवाद, कल्पनातिरेक, भास, भ्रम हे अनुभवास येऊ शकते परंतु याच मार्गावर जातकास पुढे आकलन होता या निर्णयास पोचता येते कि भौतिक जगाच्या मर्यादा आहेत, भौतिक जगापलीकडे एक शक्ती आहि जी अथांग, अमर्याद, तर्कहीन किंवा त‌र्काच्या पलीकडची आहे. जिथे विचार पोचू शकता नाहीत. असे खूप वेळा घडते कि ज्या व्यक्तींना अतर्क्य अशा divine grace चा अनुभव येतो त्यांच्या ज‌न्म‌कुंडलीत वरुण हा कठीण दृष्टी , योग. संयोगात, संलग्न. ९० अंश, १८० अंश असा personal planets बरोबर असतो. Carter यांनी ज्याला divine discontent म्हणजे भौतिक प्रतलावरची अतृप्ती , सतत शोध, असंतोष, कार‌णाशिवाय‌ जाण‌व‌णारी चुट‌पुट‌ म्हटले आहे तो स्वभाव अशा अध्यात्मिक लोकात, चित्रकार, संगीतकार, कवी आदिंमध्ये आढळते. याला पारलौकीकाची हाक असे म्हणता येईल जी व्यक्तीला रुटीन, humdrum आदींमध्ये रसहीनता, boredom दर्शविते.
.

By house position in the natal chart, Neptune indicates,where this potential for grace for tuning in for transcendental influence touches one's life most immediately

________________
सूर्य‍-व‌रुण‌ दृष्टी-
त्या व्य‌क्तींच्या ज‌न्म‌कुंड‌लींम‌ध्ये सूर्य‍-व‌रुण दृष्टी आढ‌ळ‌तात ज्यांना जीव‌न‌विष‌य‌क काहीत‌री व्याप‌क‌ असा दृष्टीकोन अस‌तो. म‌ग‌ तो दृष्टीकोन‌ मान‌व‌ता, राज‌कार‌ण, क‌ला, स‌ंगीत‌, अध्यात्म‌ अशा कोण‌त्याही क्षेत्राम‌ध्ये आढ‌ळू श‌क‌तो. कार्ट‌र‌ यांच्या म‌ते सूर्य‍-व‌रुण‌ योग‌/दृष्टी ही ब‌ऱ्याच ज्योतिषांच्या ज‌न्म‌कुंड‌लीत‌ आढ‌ळून येते. त‌सेच विशेष‌क‌रुन अशा लोकांच्या कुंड‌लीत सूर्य‍-व‌रुण दृष्टी आढ‌ळ‌तात ज्यांना वास्त‌व किंवा भौतिक‌ म‌र्यादेप‌लिक‌ड‌च्या म्ह‌ण‌जे पार‌लौकिक, अदृष्य‌ विश्वाब‌द्द‌ल रुचि, आव‌ड‌ अस‌ते. अनामिक‌ ऊर्जाप्र‌वाह‌, अदृष्य‌ विश्वाव‌र‌ती त्यांची श्र‌द्धा किंवा विश्वास अस‌तो ज‌से चित्र‌कार, क‌वि, स‌ंगीत‌कार व‌गैरे.प‌ण प्र‌त्येकाने स्व‌त: क‌वि, चित्र‌कार, आदि अस‌णे आव‌श्य‌क‌ न‌स‌ते त‌र ज्यांना दृष्य‌क‌लांत‌(aesthetic stimuli) ज‌से नृत्य‌, चित्र‌प‌ट, क‌ला, चित्र‌क‌ला, शिल्प‌क‌ला अदिम‌ंध्ये विशेष र‌स‌ अस‌तो अशा लोकांच्या कुंड‌लीत‌ही या दृष्टी आढ‌ळ‌तात. या लोकांक‌र‌ता ऊर्जाक‌ंप‌ने ही प्र‌त्य‌क्षात, जाणीवेच्या म‌र्यादेत अस‌तात ज‌से र‌ंग‌, स‌ंगीत‌धून,ऑरा विविध‌ प्र‌कार‌च्या उप‌चार‌प‌द्ध‌ती (healing methods). ब‌ऱ्याच पुस्त‌कात चूकीचे लिहीलेले आढ‌ळ‌ते की या व्य‌क्ती अव्य‌व‌हारी अस‌तात. उल‌ट‌प‌क्षी बाह्य‌ज‌ग‌तात वाव‌र‌ण्यास श‌हाण्यासुर‌त्या अशा व्य‌क्तीही या दृष्टिंखाली आढ‌ळुन येत‌त‌. या लोकांम‌ध्ये ठ‌ळ‌क‌तेने आढ‌ळ‌णारा गुण म्ह‌ण‌जे त्यांची vision, जीव‌न‌विष‌य‌क विशाल दृष्टीकोन आणि त्या vision शी सुस‌ंग‌त‌ आयुष्य‌ त्या ज‌ग‌त‌ अस‌तात. प‌र‌ंतु कठीण योगांत‌ असेही आढ‌ळून‌ येते की या व्यक्तिंची स्व‌प्र‌तिमा, स्व‌त:ब‌द्द‌ल‌च्या क‌ल्प‌ना या भ्राम‌क‌ अस‌तात, अतिरंजित अस‌तात्. एका त्र‌य‌स्थ‌ दृष्टीने स्व‌त:चे अव‌लोक‌न‌ या व्य‌क्तिंना क‌र‌णे ज‌म‌त‌ नाही. lack of objectivity अचूक‌ता व‌ व्याव‌हारिक‌ स्व‌प्र‌तिमेचा अभाव‌ हे आढ‌ळ‌ते. distorted self image. अशा व्य‌क्तिंना निरोगी स्व‌प्र‌तिमा ज‌प‌ण्याक‌र‌ता कोणाचीत‌री म‌द‌त‌ भास‌ते.

As Carter says "Native is as a rule easily played upon either through his vanities or sympathies or both."

प‌र‌ंतु निर्विवाद‌प‌णे अशा व्य‌क्ती आद‌र्श‌वादी, सौंद‌र्योपास‌क‌, क‌लाउपास‌क‌, अध्यामिक व‌ क‌रुणाशील‌ आढ‌ळून येतात्. प‌र‌ंतु ब‌रेच‌दा वेड्यावाक‌ड्या स्व‌प्र‌तिमेमुळे त्यांची निर्मीतीक्ष‌म‌ता दुर्ल‌क्षित किंवा निस्तेज‌ आढ‌ळ‌ते.
___
च‌ंद्र‍ व‌रुण योग‌ /दृष्टी - या जात‌कांना व‌रील‌ व‌रील् वैशिष्ठ्ये लागू प‌ड‌तात‌च प‌र‌ंतु, च‌ंद्र‌ क‌र्क‌,व‌रुण, मीन हे सारे अत्य‌ंत‌ क‌ल्प‌क, स‌ंवेद‌न‌शील, त‌र‌ल‌तेचे, स‌म‌र्प‌ण, भ‌क्ती , त‌र‌ल‌ म‌नोव्यापार आदिचे कार‌क‌ अस‌ल्याने दुप‌टीने हे गुण‍दोष जाण‌व‌तात्. आणि व्य‌क्तीम‌ध्ये प्र‌क‌र्षाने एक चुट‌पुट‌, अस‌माधान, अतृप्ती आणि अवास्त‌व‌ अपेक्षा , वास्त‌वाब‌द्द‌ल‌चे अस‌माधान ज्याला कार्ट‌र‌ने divine discontent म्ह‌ट‌ले आहे ते आढ‌ळून येते. व्य‌क्ती स‌ह‌सा स्थिराव‌त‌ नाही कार‌ण कुठेत‌री सूक्ष्म‌ पात‌ळीव‌र‌ ती हे जाण‌ते की सारे काही क्ष‌ण‌भ‌ंगुर‌ आहे, स्व‌प्न‌व‌त‌ आहे. या व्य‌क्तिंम‌ध्ये आई (चंद्र‌) किंवा व‌डील‌ यां व्य‌क्तींचे उदात्तीक‌र‌ण झालेले आढ‌ळून येते. च‌ंद्र‌ हा पुरुषांच्या कुंड‌लीत स्त्रियांचा कार‌क‌ अस‌ल्याने, विशेष‌त‌: जोडिदार‌विष‌य‌क अतिअवास्त‌व‌ अपेक्षा व‌ त्यातुन निर्माण होणारा अस‌ंतोष आढ‌ळून येतो.अशा व्य‌क्ती उत्क‌ट‌तेने बाह्य‌ज‌ग‌त‌त‌ आद‌र्श व्य‌क्ती शोध‌त‌ र‌हातात‌ प‌र‌ंतु म‌नुष्याची म‌र्यादा अस‌ते त्यामुळे अशी प‌रिपूर्ण व्य‌क्ती क‌धीच साप‌ड‌त‌ नाही. तेव्हा स्व‌त:शी क‌ठोर‌ प्रामाणिक‌ राहून ज‌र‌ या व्य‌क्तींनी स‌त‌त स्व‌त:ची ऊर्जा वाया घाल‌विण्यापेक्षा स्व‌त:त‌च शोध‌ घेत‌ला व‌ आप‌ले व‌रुण‌प्र‌धान गुण विक‌सित‌ केले त‌र स्व‌त:च ज‌गात आद‌र्श, क‌रुणाम‌य‌, अध्यात्मिक‌, द‌याळू अशा त्या स्व‌त: ब‌नू श‌क‌तात.
_____
बुध‍-व‌रुण योग‌ - कोण‌तीही बुध‍-व‌रुण‌ योग‌/दृष्टी ही visionary, intuitive (अंत:प्रेर‌णाकार‌क‌) व‌ स‌ंवेद‌न‌शील विचार‌प्र‌क्रिया दाख‌विते. म‌ग‌ या विचारांची म‌ज‌ल ही अत्य‌ंत‌ प्रेर‌णादाय‌क‌, आद‌र्श‌वादी, क‌लात्म‌क‌ताप्र‌धान वृत्ती ते स्व‌त:ची किंवा अन्य‌ लोकांची फ‌स‌व‌णूक क‌राय‌ची वृत्ती याप‌र्य‌ंत‌ जाऊ श‌क‌ते. उच्च जाणिव‌प्र‌त‌लाशी सायुज्य‌ता, क‌लात्म‌लक, सौंद‌र्योपास‌क‌, क‌लाआस्वाद‌क‌ र‌ंग‌, स‌ंगीत, काव्य‌ आदिंविष‌यी विशेष म‌म‌त्व वृत्ती आढ‌ळू श‌क‌ते. बुध‌ माहीतीचा कार‌क‌ आहे त‌र‌ व‌रुण हा अथांग‌तेचा, निराकार‌तेचा त्यामुळे या जात‌कांना मिळालेली माहीती श‌ब्दात मांड‌ता येणे फार अव‌घ‌ड जाते. श‌ब्द‌ थिटेच प‌ड‌तात. ब‌रेच‌दा ग‌द्यापेक्षा प्र‌तिमा, चित्र‌, शिल्प‌, काव्य‌ आणि स‌ंगीतातून‌च मूड व‌ विचार प्र‌क‌ट होऊ श‌क‌तात. या व्य‌क्तिंना लेख‌नाची देण‌गी असू श‌क‌ते प‌ण ते लेख‌न‌ काव्य‌, क‌लात्म‌क‌ उप‌मा, क‌ल्प‌नाविलास, गूढ्/ऑक‌ल्ट विषयांची माहीती या प्र‌कार‌चे अस‌ते. बुध‌ हा वाणीचा , स‌ंवादाचा, त‌र्काचा , श‌हाण‌प‌णाचा कार‌क‌ आहे, त‌र‌ व‌रुण‌ हा श‌ब्दा-त‌र्काप‌ल्याड‌चा. त्यामुळे या व्य‌क्तिंना स‌ंवाद‌ साध‌णे अव‌घ‌ड गेल्याने या व्य‌क्ती क‌मी बुद्धिवान वाटु श‌क‌तात प‌र‌ंतु त्याच‌वेळी हे ल‌क्षात ठेव‌ले पाहीजे की याच व्य‌क्ती तुम‌च्या मूर्त‍अमूर्त‌ म‌न‌तील ल‌हान‌स‌हान भीती, विचार, असुर‌क्षित‌ता, जाणिवा, अंत:प्रेर‌णा, nuances व्य‌व‌स्थित शोषुन् घेत‌ अस‌तात्. प‌ण आप‌ल्याला मात्र त्यांच्या म‌नाचा ठाव‌ लागू न‌ देता त्यामुळे एक‌ प्र‌कार‌ची फ‌स‌व‌ले गेल्याची, manipulate केले गेल्याची भाव‌ना येऊ श‌क‌ते. क्व‌चित प्र‌स‌ंगी विशेष‌त: क‌ठीण योगांत अशा व्य‌क्ती ख‌रोख‌र फ‌स‌व‌णूक‌ क‌र‌णाऱ्याही असू श‌क‌तात्.
.
शुचिचे विचार‌ - आप‌ल्या कुंड‌लीव‌रुन च‌ंद्राव‌रुन, च‌व‌थ्या घ‌राव‌रुन, आईचा स्व‌भाव‌ही ब‌ऱ्याच प्र‌माणात क‌ळ‌तो.
ज‌से माझ्या कुंड‌लीत क‌र्केचा च‌ंद्र‌, व‌रूणाशी त्रिकोण‌योगात आहे. च‌व‌थ्या घ‌रात युरेन‌स आहे.क‌र्क‌ रास‌ म्ह‌ण‌जे आई वात्स‌ल्य‌पूर्ण होती (ती स्व‌त: सूर्य‍-क‌र्क‌ होती), खाण्यापिण्याचे खूप लाड‌ क‌राय‌ची. प‌ण तिच्यात प्र‌क‌र्षाने व‌रूण आणि युरेन‌स‌ गुण‌ होते. ज‌से ती युरेन‌स‌ म्ह‌ण‌जे कुंभ‍च‌ंद्र‌ राशीची होती, फ‌ट‌कुन वागे, ख‌र‌ त‌र‌ इमोश‌न‌ली डिस्ट‌न्ट आणि अन‌व्हेलेब‌ल् च होती, बुद्धीमान होती. व‌रुणाचे म्ह‌णाल‌ त‌र ती उगाच‌च निगेटिव्हिटिम‌ध्ये dwell क‌रे. ज‌से आम्ही दिल्लीस‌ जाण्यास निघालो, म‌स्त सुट्टीचा मूड आणि प्लॅट‌फॉर्म‌व‌र‌ती एक भिकारी मूल पाहून हिला र‌डु आलेल‌ं. आणि हा एक‌च प्र‌स‌ंग‌ नाही ब‌रेच प्र‌स‌ंग‌. म्ह‌ण‌जे क‌ंटाळा येई त्या पिटिचा आणि निगेटिव्हिटिचा. तिचे बाबा कुंड‌ली प‌हात म्ह‌ण‌जे व्य‌व‌सायाने न‌व्हे त‌र‌ छंद‌ म्ह‌णुन. त्याम्नी तिला सांगित‌लेले होते ७ आक‌डा ल‌की आहे. त्याचा अर्थ‌ तिला वा ज्योतिष् न‌ क‌ळ‌णाऱ्याला लाग‌त‌ न‌स‌ला त‌रि म‌ला लाग‌तो की ती व‌रुण‌प्र‌धान आहे(होती)..
मुलीचा नेप‌च्युन‌ही(व‌रुण्) माझ्याप्र‌माणे शुक्राशी स‌ंल‌ग्न आहे. तिचा क‌र्क‍-च‌ंद्र‌ मात्र व‌रूणाच्या ब‌रोब‌र १८० अंशात आहे म्ह‌ण‌जे तिची आई (मी) नेप‌च्युनिअन अस‌ण‌ं हे तिच्या कुंड‌लीव‌रुन‌ही ओळ‌ख‌ता येत‌ं. औष‌धे मिळेप‌र्य‌ंत‌ मी क‌मालीची र‌ड‌की होते, निगेटिव्ह‌च होते. मुलीक‌र‌तामी तिच्याक‌र‌ता ब‌र्यापैकी अनाव्हेलेब‌ल‌ (फिझिक‌ली) आहे हे नाकार‌ता येत‌ नाही. ज‌से नोक‌रिनिमित्त‌ तिचे स‌ंपुर्ण बाल्प‌ण माझ्याक‌र‌ता ह‌र‌व‌लेले आहे. आता म‌नाचे धागे नीट जुळ‌त‌ नाहीत, आता तिच रिबेलिअस, स्व‌त‌ंत्र‌ झाली आहे.तिच्या कुंड‌लीतील क‌र्क‌ च‌ंद्र‌ माझ्या ज‌न्म‌कुंड‌लीतिल क‌र्क‍च‌ंद्र‌ स्व‌भावाशी फिट्ट जुळ‌तो. माझ्या स्व‌प्नात पाणि इत‌क्यासदा आणि इत‌क्या वेग‌वेग‌ळ्या रुपात (ज‌लाश‌य, झ‌रा, स्टॅग्न‌न्ट वॉट‌र (याईक्स!!!), पूर‌ व‌गैरे व‌गैरे) येत‌ं. टोट‌ल व‌रुण‍प्र‌धान आहे मी. (आजोबा म्ह‌ण‌त स्व‌प्नात पाणी आले की पैसे मिळ‌तात : ) किती स‌त्य‌ आहे पैसे नाही प‌ण एखादा आशीर्वाद‌ मिळाल्यासार‌खा दिव‌स‌ जातो ज्या दिव‌शी मी स्व‌प्नात पाणी प‌हाते.
.
आम्ही तिघी ३ पीढ्या आहोत व‌रुण्-प्र‌धान‌तेच्या + क‌र्केच्या.
तेव्हा सांगाय‌चा मुद्दा हा की- च‌ंद्र‌ आणि च‌व‌थ्या घ‌राव‌रुन आईब‌द्द‌ल ख‌र‌च खूप क‌ळुन येते. प्र‌ह‌च‌ंड‌ क‌ळून येते. प‌ण म‌ग‌ ज‌न्म‌वेळ‌ माहीत ह‌वी अंदाज‌प‌ंचे न‌को.
________
शुक्र-वरुण दृष्टी/योग/युती - अवघड शुक्र-वरुण दृष्टी जसे दोन्ही ग्रह संलग्न असणे, किंवा १८० अंशात परस्पर विरुद्ध असणे, ९० अंशात काटकोनात असणे या दृष्टी प्रेमात, नात्यात (: शुक्राचे कारकत्व ) divine discontent देतात. प्रेमाबद्दलच्या आदर्श इतके उच्चं अथवा अतिरंजित उदात्त असतात कि या जातकांच्या प्रेमकसोटीस कोणीच उत्तीर्ण होऊ शकता नाही.विशेषतः: असे अवघड योग हे कलाकारांच्या कुंडलीत आढळून येतात.आणि असे अवघड योग हे पारलौकिक अथवा अध्यात्मिक प्रतलावरील प्रगतीकरता अत्यंत उपयुक्त, उत्तम (par excellence ) समजले जातात. याचे कारण प्रेमाचा कारक शुक्र हा प्रेमप्राप्तीकरता जातकास इतका संवेदनशील व आदर्श शोध घेण्याचा दृष्टिकोन देतो कि असा शोध हा स्थूल प्रतलावर, भौतिक जगात पूर्ण होऊ शकत नाही आणि या जातकांस हवे असलेले "Union with beloved " अशक्य, अप्राप्य घटना , स्वप्न होऊन बसते.आणि अशी प्रेमतृप्ती ना झाल्याने आपोआप, जातक अध्यात्मिक प्रतलावरील प्रेमाकडे म्हणजे दैवी किंवा स्वर्गीय प्रेमाकडे वळतो. अशी व्यक्ती हि प्रेमात स्थिरावू शक्यच नाही, सतत अप्राप्याचा, आदर्शाचा ध्यास व ओढ हि तिला स्वस्थ settle होऊ देता नाही, commit करू देत नाही. अशा प्रकारे सतत प्रेमाचा शोध घेता राहिल्याने व्यवहारी जगातील प्रेमाविषयाशी मानसिक प्रतारणाचं होते, अतृप्तीच अनुभवास येते. अशा जातकांच्या अतिरंजित स्वपनांमुळे, प्रेमविषयक आदर्श कल्पनांमुळे व्यवहारातील खरा प्रेमिक त्यांच्याप‌र्य‌ंत‌ पोहोचूच शकता नाही आणि जातकाला वाटत रहाते कि ते प्रेमास पारखे आहेत. त्यामुळे जी व्यक्ती खरोखर शुक्र-वरुण जातकांवरती प्रेम करते तिला मानसिक त्रास व प्रतारणाचं अनुभवास येते. असे अजिबात नसते कि शुक्र-वरुण जातक प्रेमळ नसतात, उलटपक्षी अतिशय सदहृदयी, प्रेमळ ,सुस्वभावी, परोपकारी, करुणाशील असे हे जातक असतात, पण त्यांच्या प्रेमविषयक कल्पना , प्रेमाची अभिव्यक्ती इतकी विशाल,व्यापक असते कि फक्त एकाच व्यक्तीवर त्या एकाग्र होऊ शकता नाहीत. त्यांचे प्रेम diffused (वरुण) म्हणजे सर्वव्यापी बनून गेलेले असते. पण त्यांच्या या मोकळ्या, वैश्विक परोपकारी स्वभावामुळेच त्यांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. अशा व्यक्तींची सहानुभूती सहज प्राप्य असते व सहानुभूतीपोटीही या व्यक्ती प्रेम देऊ करताना आढळतात. विशेषतः: कठीण योगांत अशा जातकांच्या हातून मानसिक तसेच शारीरिक व्यभिचार व प्रतारणा घडू शकते. या जातकांना फसविणे हे सहज शक्य होते कारण त्या नात्यामध्ये (शुक्र) हे जातक, समोरच्याचे फक्त गुणाचं बघतात व आदर्शवादी भूमिका घेतात. यामुळे चुकीच्या व्यक्ती संपर्कात येऊन मानसिक हानी पोचण्याची शक्यता खूप असते. या आदर्शवादामुळे तसेच चाकोरी, रटाळपणा, दैनंदिन रुटीन यांचा अत्यंत तिटकारा असल्याने लैंगिक अभिव्यक्तीवरतीही परिणाम होऊ शकतो. या स्त्रिया आकर्षक असल्या तरी, प्रेमाला असल्या तरी बरेचदा एकदा रुटीन झाले कि त्याना लैंगिक उद्दीपनाकरता सुगंध, ड्रग्ज, मद्य, candles , संगीत आदींची गरज भासते. अशा external stimuli , कृत्रिम उद्दीपकांखेरीज, शिवाय त्यांना उत्तेजित होण्यास अवघड जाते आणि त्यांना जोडीदार अति अति आदर्श लागतो. यावरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल कि बर्याचदा प्रथमतः: आकर्षक, प्रेमळ अत्यंत कोमलहृदयी सुस्वभावी वाटणार्या व्यक्ती पुढेपुढे प्रेमास प्रतिसाद का देऊ शकता नाहीत. पण या सर्वाम्प्लिकडे जाऊन हे मान्य करावेच लागते कि अत्यंत कलोपासक, सौंदर्यासक्त, कलाकार असा हा शुक्र-वरुण अविष्कार असतो.
.
मंगळ -वरुण योग - अन्य वरुण योगान च्या तुलनेत मंगळ-वरुण योगाची रेंज (मजल) हि सकारात्मक-नकारात्मक, विधायक-मारक अशा गुणदोषाणकरता अधिक व्यापक असते असे लक्षात येते. याचे कारण मंगल हा ग्रह शुक्रासारखा passive नसून कृतिशील आहे, प्रत्यक्ष कृतीचा कारक आहे.पण फळे पाहण्याकरता, अनेक घटक जसे वरुणाचा , मंगळाची रास, अन्य ग्रहांची दोघांव‌रील दृष्टी, कुंडलीतील घर, व्यक्तीची अध्यात्मिक प्रगती आदि घटक विचारात घ्यावे लागतात. पण वरुण हा त्याच्या सन्निध येणाऱ्या ग्रहाचे शुद्धीकरण (refine ) करता असल्याने मंगळाची coarse म्हणजे राकट/क‌ठोर‌ ऊर्जा शुद्ध करतेवेळी दोन्ही म्हणजे गुण व दोष दोहोंचे प्रतिबिंब जातकाच्या व्यवहारात, मूर्त-अमूर्त मनात जाणवते. मंगल वरुण या दोहोंमधील देवाणघेवाण कल्पनाशक्ती , महत्त्वाकांक्षा, स्वप्ने, इचछा फार तीव्रतेने उद्दीपित करताना आढळतात.मग ती स्वप्ने व्यवहारी असो अव्यवहारी असो. जातकाच्या मनात इच्छा आकांक्षा, महत्वाकांक्षांचा उगम झालेला दिसून येतो.बरेचदा असेही आढळून येते कि व्यक्ती मोठ्यामोठ्या योजना, स्वप्ने पाहण्यात इतकी रममाण झालेली असते कि स्वतः:च्या चुकांकडे तिचे सहज दुर्लक्ष होते. Carter mentions "Ordinary life is too humdrum and colorless for the mars-neptune native, hence he seeks pursuits that are capable of appealing to the romantic and grandeur-loving elements of the soul" मंगळ-वरुण योग हे सहसा लोकप्रिय खेळाडू प्रसिद्ध सिनेकलाकारांमध्ये आढळून येतात.असे लोक जनप्रिय व प्रसिद्ध आढळून येतात पण याचा अर्थ त्यांना प्रसिद्धी, पब्लिक life आवडतेच असे नाही. या योगांवरील, दृष्टिंवरील पुरुष हे masculine / viril (मंगळ) वलय (वरुण) असलेले आढळून येतात. खूपदा पुढे टी व्ही अँकर बनणारे खेळाडूही या योगांवर आढळतात. या जातकाची मानसिक प्रतलावरील उलाढाल व dynamics लक्षात घेणेही जरुरीचे आहे. बरेचदा या जातकाच्या आपली भौतिक , अध्यात्मिक, स्वप्ने, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे मानसिक सामर्थ्य (मंगळ) असते तर काही केसेसमध्ये आपल्याला काय हवे, आपण काय मिळवू इच्छितो (मंगळ) याबद्दल संभ्रम/गोंधळ, स्वप्नाळूपणा (वरुण) ही आढळून येतो. थोडक्यात या जातकांना मानसिक व भावनिक पातळीवरती पूर्वजन्मीच्या संस्कारांचा , कर्मा चा सामना जरूर करावा लागतो. मंगळ हा लैंगिकतेचा कारक असल्याने एक नक्की आढळून येते कि या व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष दोघेही लैंगिक कल्पनाविश्वात, मनोराज्यात रममाण होणारे असतात. तसेच लैंगिकतेबद्दलच्या नीती-अनीती च्या कल्पनांबद्दल बरेचदा गोंधळ, संभ्रम असतो. Since Neptune tends to open things up to infinite possibilities at least on the subconscious level, these people often find themselves perplexed about the feelings and fantasies they find themselves entertaining. पुरुषी अहंकार (मंगळ) व लैंगिक चारित्र्य / वर्तणूक या दोहोत कॉन्फ्लिक्ट आढळून येतो व पुढे अंतर्मुख होऊन विचार करताना या व्यक्तींना आपल्या वर्तणुकीचा बरेचदा पश्चात्ताप झालेला आढळतो. खूपदा इच्छेपेक्षा सहानुभूतीपोटी (वरुण) सेक्स (मंगळ) करतानाही या व्यक्ती आढळतात. जवळजवळ सर्व केसेसमध्ये स्वतः:च्या सत्तेचा ताकदीचा उपयोग हा अतिरंजित किंवा आदर्शवादी भूमिकेतून पार पाडला जातो, हे विशेषतः: लैंगिक वर्तणुकीतून दिसून येते. हमखास हे आढळून येते कि या व्यक्ती स्वतः:तरी पुढाकार घेऊन अन्य व्यक्तींना seduce करतात किंवा स्वतः: कोणत्याही भेदभावाशिवाय म्हणजे indiscriminately seduce होतात. या योगांवर हमखास समलैंगिकांना तुच्छ किंवा विकृत लेखणारे पुरुष आढळून येतात. याचा अर्थ या योगावरती समलैंगिक पुरुष जन्म घेतात नाहीत असा नाही परंतु असे फार कमी लोक माझ्या अभ्यासात मला सापडलेले आहेत. काही केसमध्ये पुरुष हे masculinity म्हणजे स्वतः:च्या पुरुषत्वाबद्दलची भीती, गंड लपवण्याकरता overcompensate करताना दिसतात. आणि असा गंडा लपविण्याकरता अति अतिपुरुषी (super masculine ) व साहसी खेळ जसे शिकार, बंदुकीच्या फैरी,Dangerous स्पोर्ट्स आदींमध्ये सहभागी होतात. परंतु अध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर या सर्व भीती, संभ्रम, गोंधळ हे त्यांच्या अध्यात्मिक/पारमार्थिक प्रगतीस अनुकूलच ठरतात. वरुण हा sexual energy म्हणजे लैंगिक ऊर्जेचे शुद्धीकरण करण्याच्या प्रयत्नात, त्यांना फायदेशीरही ठरतो. बरेचदा नैष्ठिक बह्मचार्य/सन्यस्त जीवन जगण्यास भाग पाडतो. वरूण‌ म्हणजे वैश्विकता आणि मंगळ म्हणजे लैंगिकता मग या दोहोंची सांगड कशी घालणार?लैंगिकता वैश्विक होऊ शकता नाही म्हणजी आपल्याला हवी ती व्यक्ती दर वेळेस मिळू शकत नाही प्रत्येक आवडणारी व्यक्ती आपली होऊ शकत नाही असा अनुभव येत येत ऑल ऑर None यामधून none म्हणजे celibacy = ब्रह्मचर्य हा पर्याय निवडला जातो, त्या पर्यायास जातक शरण जातो. आठवा वरुण म्हणजे शरणागती.
.
ह‌र्ष‌ल‌ हा ग्र‌ह‌ आयुष्यात‌ अचान‌क‌ होणारे ब‌द‌ल‌, आमूलाग्र‌ ब‌द‌ल‌, जाणिवेम‌ध्ये कोण‌त्याही पूर्व‌सूच‌नेशिवाय‌ व‌ निमिषार्धात‌ घ‌डुन‌ येणारे स्थित्य‌ंत‌र‌, वीजेसार‌ख्या ल‌क्क‌क‌न‌ च‌म‌कुन‌ जाणाऱ्या क‌ल्प‌ना, न‌व‌न‌वीन‌ म्ह‌ण‌जे original ideas, स‌ंक‌ल्प‌ना, insights आदिंचा म्ह‌ण‌जे एक‌ंद‌र‌ फ‌ट्ट‌क‌न‌ जे ब‌द‌ल‌ घ‌ड‌तात त्यांचा कार‌क‌ आहे. वीज‌प्र‌वाहाचा झाका ब‌सावा तित‌क्या वेगाने जे ब‌द‌ल‌ जाणिवेत‌ घ‌ड‌तात (युरेका!) त्या ह‌र्ष‌ल‌च्या अधिप्त्याखाली येतात. त‌सेच स्वात‌ंत्र्य‌, ब‌ंड‌, क्रांती, विक्षिप्त‌प‌णा, रुढींना मोड‌णारे नूत‌न‌,पुरोगामी वैचारीक प्र‌योग‌शील‌तेचाही अधिप‌ती ह‌र्ष‌ल‌च आहे. ह‌र्ष‌ल‌चा स्व‌भाव‌ हा जात‌कास ज‌री स्थिर‌ता देत‌ न‌स‌ला, त‌री, न‌व‌नूत‌न‌ क‌ल्प‌ना, बुद्धिमान शोध‌/थिअरीज‌ यांचे ज‌न‌क‌त्व‌ जात‌कास‌ ज‌रुर‌ ब‌हाल‌ क‌र‌तो. जो ग्र‌ह‌ ह‌र्ष‌ल‌च्या दृष्टी/योगात‌ येतो तो विद्युत‌भारित‌, charges. electrified,magnetized, उर्जाप्र‌वाही होतो त्याच्यात एक‌ न‌व‌चैत‌न्य‌ स‌ळ‌स‌ळ‌ते (excited) व‌ ह‌र्ष‌ल‌ त्यास‌ थ‌रार‌ ब‌हाल‌ क‌र‌तो. श‌नि हा जिथे म‌र्यादा, क‌ठिण सांगाडा, स्ट्र‌क्च‌र‌, बिंती द‌र्श‌वितो तिथे ह‌र्ष‌ल‌ हा opening up to new avenues, अह‌ंकाराच्या भिंती कोस‌ळ‌व‌तो. जुन्या ज्योतिषात‌ असा गैर‌स‌म‌ज‌ आढ‌ळ‌तो की ह‌र्ष‌ल‌ हा नेह‌मी दुष्प‌रीणाम‌ दाख‌व‌तो त‌से नाही. त‌र‌ याच्या ऊर्जेस, स्व‌भावास, ब‌द‌लास विरोध‌ केला त‌र‌च ह‌र्ष‌ल‌ त्रास‌ देतो प‌ण मान‌व‌ स्व‌भाव‌ असा अस‌तो की ब‌द‌लास विरोध‌ विशेष‌त: अचान‌क‌ होणाऱ्या बद‌लास विरोध होतोच त्यामुळे ह‌र्ष‌ल दुष्प‌रीणाम‌ देतो हे काही प्र‌माणात स‌त्य‌ म्ह‌णावे लागेल. ज्या राशीम‌धुन‌, ज‌न्म‌कुंडलीम‌धील‌ घ‌रातुन ह‌र्ष‌ल‌ स‌ंक्र‌मित‌ होतो, त्या त्या क्षेत्रात जुने टाकावेच लाग‌ते व‌ न‌व्या स्थित्य‌ंत‌रास, आमूलाग्र‌ ब‌द‌लास , क्रांतीकारी विचारांस‌ सामोरे जावेच लाग‌ते. प‌हीला जुना साचा मोड‌ला नाही त‌र‌ न‌विन‌ साचा अस्तित्वात‌ येऊच‌ श‌क‌त‌ नाही त्यामुळे ह‌र्ष‌ल‌ जुनाअ प‌द्ध‌ती, साचे, रुढी मोडून‌ व्य‌क्टिच्या जाणिवेचे द‌र‌वाजे न‌वीन‌ विचार‌प्र‌वाहांस‌, क्रांतिकारी विचारांस‌/क‌ल्प‌नांस‌ खुले क‌र‌ण्याचे म‌ह‌त्व‌चे काम‌ क‌र‌तो. विशेष‌त: जे जे द‌ब‌लेल, सुप्त‌, द‌म‌न‌ केलेले, दुर्ल‌क्षित असे अस‌ते ते मोडुन‌ काढुन त्याची जागा न‌वीन स‌ंक‌ल्प‌नांनी घेत‌ल्या जातात. ह‌र्ष‌ल‌चा स्व‌भाव‌ अतिअतिज‌ल‌द‌ (sudden) अस‌ल्याने, जात‌काच्या जाणिवेतील‌ व‌ आयुष्यातील‌ त्या त्या क्षेत्रातील‌ ब‌द‌ल‌ हे झ‌पाट्याने, क्रांतीकार‌क‌ रीतीने , उत्तेजित‌, अस्थिर‌, excitable, restless, driven by changes, electrified असे होतात. या काळात‌ जात‌क‌ क‌मालीचा अस्थिर‌ excitable ब‌नून न‌वीन‌ विचारांक‌डे, स्वात‌ंत्र्य‌ आणि ब‌द‌लांक‌डे जाण्याचा प्र‌य‌त्न‌ क‌र‌तो, रुढी मोडण्याचा , न‌वे वारे आण‌ण्याच‌ प्र‌य‌त्न‌ क‌र‌तो ज‌से नोक‌री, विवाह‌ आदि ज्या म्ह‌णुन‌ क्षेत्रात द‌म‌न‌ झालेले अस‌ते तेथे जात‌कास‌ अस्तिर‌ता जाण‌व‌ते, restlessness जाण‌व‌तो, म‌ते, वृत्ती ब‌द‌ल‌ताना दिस‌तात. मात्र प‌ट‌क‌न जुने टाकुन‌ न‌वे ब‌द‌ल‌ आण‌ण्यापेक्षा ज‌र‌ अंत‌र्ग‌त‌ म्ह‌ण‌जे मान‌सिक‌ व‌ भाव‌निक‌ पात‌ळिव‌र‌ ब‌द‌ल‌ घ‌ड‌ले त‌र ते अधिक‌ लाभ‌दायी व‌ परीणाम‌कार‌क‌ असे ठ‌र‌तात. श‌नि जिथे स‌ंप‌तो (म‌क‌र) तिथे ह‌र्ष‌ल‌ (कुंभ‌) सुरु होतो. श‌निने आखुन‌ दिलेल्या चौक‌टी, रुढी, प‌र‌ंप‌रा मोडुन तेथे क्रांतीकार‌क‌ वारे आण‌ण्याचे काम‌ ह‌र्ष‌ल‌चे. कुंड‌लीतिल‌ ज्या घ‌रात ह‌र्ष‌ल‌ अस‌तो त्या क्षेत्रात sudden awakening व‌ ब‌द‌ल‌ घ‌ड‌त‌ अस‌तात, व्य‌क्तीच्या जाणिवा विस्तारीत‌ केल्या जातात, त्यात‌ ब‌दल‌ होतो. व्य‌क्टिस‌ या क्षेत्रात स्वात‌ंत्र्याची तीव्र‌ इच्छा, आस‌ , हाक‌ जाण‌व‌ते. त्यामुळे ज‌र‌ ह‌र्ष‌ल‌ केंद्रात‌ (१-४-७-१०) असेल‌ त‌र व्य‌क्तीचे आयुष्य‌ time to time ब‌ऱ्यापैकी ढ‌व‌ळुन निघ‌ते. अशा व्य‌क्ती स्वात‌त्र्य‌ हे स‌र्वोच्च मूल्य‌ मान‌ताना आढ‌ळ‌तात, त्या ओरिजिन‌ल‌ अस‌तात‌, त्यांचा स्व‌त:चा एक‌मेव‌ ठ‌सा अस‌तो. श‌नि ज्या घ‌रात, राशीत‌ प‌ड‌लेला अस‌तो त्या त्या क्षेत्राचा तो स‌ंकोच क‌र‌तो, शिस्त‌ लाव‌तो, भिंती उभार‌तो, एक‌ ठाशिव‌प‌णा स्ट्र‌क्च‌र‌ देतो याउल‌ट‌ ह‌र्ष‌ल‌ प‌ड‌तो ते घ‌र‌, राशी हे प्र‌योग‌शील‌ता, opening up to new things, विनास‌ंकोच अभिव्य‌क्ती, receptivity to truth आणि जाणिवेचा विस्तार दाख‌वितात. तेच ग्र‌हांचेही. ज्या ग्र‌हाच्या स‌ंयोगात ह‌र्ष‌ल‌ येतो त्या ग्र‌हास‌ स्वात‌ंत्र्य‌, एक‌मेव‌ता, अभिव्य‌क्ती, ब‌ंध‌मुक्त‌ता, प्र‌योग‌शील‌ता तो ब‌हाल‌ क‌र‌तो. अर्थात re-polarization, excitement, high-strung, impatience fanaticism असे काही दोष ह‌र्ष‌ल‌चा स्व‌भाव‌ दाख‌व‌तो.
.
सूर्य‍-ह‌र्ष‌ल (युरेन‌स) - या योगाव‌रील‌ व्य‌क्तींचे व्य‌क्तिम‌त्व‌ हे अति-उत्तेजित (excitable), बेभ‌र‌व‌शाच्या (unpredictable) आणि आत्म‌केंद्री अशा ह‌र्ष‌ल‌च्या प्र‌भावाखाली येत अस‌ल्याने व्य‌क्ती अतिश‌य निर्मितीक्ष‌म‌ आणि जिनिअस असू श‌क‌ते प‌र‌ंतु चाकोरीच्या तिट‌काऱ्यामुळे आणि नावीन्याच्या आस‌क्तीमुळे त एका जागी स्थिराऊ श‌क‌त नाही. आणि म्ह‌णुन‌च या व्य‌क्ती विविध र‌हाणीस‌हाणी, नातेस‌ंब‌ंध‌, नोक‌ऱ्या, व्य‌व‌सायांचा अनुभ‌व‌ घेणाऱ्या अशा क‌ल‌ंद‌र निघ‌तात. या व्य‌क्तींना मोठ्या स‌मूहात, प्र‌क‌ल्पात,ज‌माव‌, क‌ंपू, विशिष्ठ आय‌डियॉकलॉजीचे ग्रुप व‌गैरेंम‌ध्ये स‌ह‌भागी होण्यास‌ अतिश‌य आव‌ड‌ते मात्र तिथेही त्यांना त‌ड‌जोड अव‌घ‌ड‌ जाते. मी म्ह‌णेन ती पूर्व‌दिशा असा हेकेखोर‌प‌णा आ व्य‌क्तींत‌ क‌मालीचा आढ‌ळ‌तो. अतिश‌य‌ म‌न‌स्वी आणि स्व‌त‌ंत्र‌वृत्तीचे हे लोक अत्य‌ंत‌ ह‌ट्टी व‌ माझेच‌ ख‌रे क‌र‌णाऱ्या असू श‌क‌तात्. विशेष‌त: क‌ठीण योगांव‌रील‌ व्य‌क्ती या प्रिय‌ज‌नांची म‌ते, क‌र्त‌व्ये आदि धुडकाऊन‌ लावुन त्यांना ह‌वे त‌शाच वाग‌तात. प‌ण काही चांग‌ले गुण‌ही अस‌तात, open-minded आणि प्र‌योग‌शील‌ वृत्ती, शास्त्र‌द्न्य‌ वृत्ती. प्र‌त्येक न‌वी गोष्ट स्व‌त: एक‌दा त‌री क‌रुन प‌हाण्याची खुम‌खुमी, इच्छा. सूर्याब‌रोब‌र‌ ह‌र्ष‌ल‌ युतीत‌ अस‌तो, योग‌ क‌र‌तो तेव्हा हे लोक‌ ब‌रेच‌से कुंभ‍सूर्य‌ व्य‌क्तींप्र‌माणे अस‌तात असे म्ह‌ण‌ण्यास प्र्त्य‌वाय न‌सावा. त‌सेच प्र‌त्येक वेळी एखादा ग्र‌ह‌ जेव्हा सूर्याच्या योगात येउन सूर्यास अॅक्टिव्हेट क‌र‌तो तेव्हा प‌र‌त तो ह‌र्ष‌ल‌शीही कोण‌ता ना कोण‌ता योग‌ साध‌त‌ अस‌तो त्यामुळे, या व्य‌क्तिंच्या जीव‌नात स‌त‌त उल‌थापाल‌थ‌ होताना दिस‌ते, आमूलाग्र‌ ब‌द‌ल‌, न‌वीन‌ न‌वीन‌ ब‌द‌लाव घ‌ड‌ताना दिस‌तात्. म‌ग‌ ज‌र‌ Flowing aspects अस‌तील‌ म्ह‌ण‌जे स‌ह‌ज‌, सोपे, harmonious ज‌से त्रिकोण किंवा sextile त‌र‌ व्य‌क्ती ब‌द‌लास त्यात‌ल्या त्यात साम‌ंज‌स्याने, स‌ह‌ज‌तेने सामोरी जाते. याउल‌ क‌ठिण योगात व्य‌क्ती प्र‌तिकार‌ क‌र‌ते, विरोध‌ क‌र‌ते ज्याम‌धुन stress निर्माण होतो व‌ त्याचा प‌रिपाक‌ म्ह‌ण‌जे तो stress मिट‌व‌ण्याक‌र‌ता जात‌क एक‌दाचा फ‌ट्ट्क‌न बद‌ल‌ घ‌ड‌वुन टाक‌तो. प‌ण त्यामुळे मान‌सिक, अंत‌र्ग‌त, भाव‌निक‌ पात‌ळीव‌र‌ती ब‌द‌ल‌ होतोच असे नाही. त‌सेच क‌ठिण योगांत‌ व्य‌क्ती आधिच्या आयुष्याचे, स्व‌भावांचे, र‌हाणिस‌हाणिचे नामोनिशाण मिट‌वुन, न‌वीन वारे आण‌ते व‌ त्यामुळे आधिची उत्त‌म‌ मुल्ये, विशेष हे विस‌र‌ले जातात‌, टाक‌ले जातात्. याउल‌ट Flowing aspects म‌ध्ये व्य‌क्तीम‌ध्ये ब‌द‌ल‌ घ‌ड‌तात प‌र‌ंतु आधीचे उत्त‌म‌ विशेष‌ही राख‌ले जातात्. हा म‌ह‌त्वाचा फ‌र‌क‌ विशेष‌त: सुर्य‍-ह‌र्ष‌ल‌ योगांव‌र‌ जाण‌व‌तो. या व्यक्ती स‌ह‌सा blatantly honest अस‌तात्. ल‌प‌वाछ‌प‌वी त्यांना ज‌म‌त‌ नाही. या व्य‌क्ती स्व‌त:चे एक‌मेवप‌ण क‌ड‌वेप‌णाने जप‌तात. एक‌ आत्म‌केंद्र वृत्ती सोड‌ली त‌र त्या मान‌व‌तेच्या दृष्टीने उत‌म‌ कार्य‌ क‌रु श‌क‌तात्.
.
च‌ंद्र‍-ह‌र्ष‌ल‌ योग - (शुचि) लेख‌काने या योगात‌ पाट्या टाक‌लेल्या आहेत‌. मी हा योग‌ गाळ‌ते आहे.
.
बुध‍ह‌र्ष‌ल‌ योग‌ -
बुध‍ह‌र्ष‌ल‌ स‌र्व‌च‌ योगांम‌ध्ये, जात‌काच्या तार्किक, conscious म‌नाचि, बुद्धीची, मेधा/प्र‌द्न्या/स्मृती आदि बुद्धीम‌त्तेच्या पैलूंची सायुज्य‌ता universal mind म्ह‌ण‌जे वैश्विक‌ म‌नाशी झालेली आढ‌ळ‌ते. All aspects of Mercury with Uranus denote an attunement of the conscious logical mind to the universal mind in some way. स‌र्व‌च‌ योगांत‌ ज‌ऱि असे आढ‌ळ‌त‌ अस‌ले त‌रीत्याचे स‌ंवादी/विस‌ंवादी सूर हे योगांच्या स‌ह‌ज‌तेनुसार‌, क‌ठीण‌तेनुसार‌ भिन्न‌ अस‌तात. या स‌र्व‌ योगांव‌र‌ जात‌काची insight, ingenuity, originality, बुद्धम‌त्ता, त‌र्क‌ स्मृती धार‌दार आनि तेज‌स्वी झालेले आढ‌ळून येतात्. फ‌क्त मेंदूच्या, बुद्धीच्या, विचारांच्या बाब‌तीत एक‌ विक्षिप्त‌प‌णा, बेभ‌रोसा, सात‌त्याची क‌मी जाण‌व‌ते. विशेषत: असे दोष क‌ठीण योगात आढ‌ळ‌तात्. या लोकांच्या ideas/theories on the nature of the universe विक्षिप्त‌ असू श‌क‌तात, व‌र‌व‌र‌ प‌हाता कोण‌त्याही त‌र्काशिवाय हे लोक‌ निष्क‌र्ष‌ काढ‌त‌ आहेत असे दिसुन येते. त्यांची त‌र्क‌बुद्धी एक‌ंद‌र‌ आक‌ल‌न‌क्ष‌म‌ता, त‌र्क‌शुद्ध‌ता अतिश‌य ज‌ल‌द, अतिज‌ल‌द‌ अस‌ते आणि त्यांनी त‌से निष्क‌र्ष का काढ‌ले हे सामान्यांना च‌ट‌क‌न क‌ळू श‌क‌त‌ नाही. वेळ‌ लाग‌तो. आणि अन्य‌ लोकांच्या या म‌ंदाप‌णामुळे हे जात‌क‌ frustrated होतात, त्यांना स‌ह‌न‌श‌क्ती र‌हात नाही. लोकांना हे जात‌क‌ प्र‌थ‌म‌द‌र्श‌नी अतिविक्षिप्त‌ व‌ ridiculous वाट‌ले त‌री मागे व‌ळून प‌हाता, त्यांचे निष्क‌र्ष ब‌रोब‌र‌च आलेले आहेत असे क‌ळून येते. फ‌क्त जात‌क‌ त्या थिअरी प‌र्य‌ंत‌ क‌सा पोचला हे गूढ‌च‌ र‌हाते कार‌ण जात‌कांनी म‌धल्या पाय‌ऱ्या गाळ‌लेल्या अस‌तात्. अतिज‌लद‌ रीतीने तो निर्ण‌यास पोच‌लेला अस‌तो. औप‌चारीक‌ शिक्ष‌णाच्या म‌र्यादांमुळे, या जात‌कांच्या originality ला वाव मिळ‌त‌ नाही, तिचे द‌म‌न‌ केले जाते आणि त्यामुळे त्यांना औप‌चारीक‌ शिक्ष‌ण‌ स‌ह‌सा मान‌व‌त‌ नाही, आव‌ड‌त‌ नाही. अत्य‌ंत‌ धार‌दार‌ बुद्धिम‌त्तेचे, त‌र्क‌शुद्ध‌, original, विक्षिप्त‌, हुषार‌ असे हे जात‌क‌ ज‌व‌ळ‌ज‌व‌ळ द्न्यानोपास‌नेची भ‌क्ती क‌र‌त‌ अस‌ले त‌री त्यांचा दोष म्ह‌ण‌जे 'know it all' अशी attitude असू श‌क‌ते. त्यांच्या विचारांची प‌द्ध‌त‌ ही स‌र‌ळ‌ प‌ठ‌डीतील‌ न‌सून, बेशिस्त‌ व‌ विस्क‌ळीत‌ वाटू श‌क‌ते. flashes of insight, new tangents of thoughts. हे जात‌क‌ आअल्याच त‌ंद्रीत‌ अस‌तात, ज‌गापासून ब‌रेच‌दा फ‌ट‌कून अस‌तात, त्यांना स‌ंवाद‌ विशेष साध‌ता येत‌ न‌स‌ल्याने मित्र‍मैत्रिणि न‌स‌तात्.
.
शुक्र‍ह‌र्ष‌ल‌ योग‍
आधी शुक्राचे योग नेह‌मी न‌क्की काय‌ द‌र्श‌वितात ते ल‌क्षात घेत‌ले पाहीजे. शुक्राचे योग, जात‌काची अन्य‌ व्य‌क्तींब‌रोब‌र conscious स‌ंब‌ंध स्थाप‌ण्याची त‌यारी द‌र्श‌वितात्. त्यामुळे शुक्राच्या क‌ठीण योगांचा अर्थ‌ असा न‌स‌तो की जात‌क‌ प्रेम‌ळ‌ न‌स‌तो, क‌ठोर अस‌तो किंवा त्याला/तिला प्रेमाची ग‌र‌ज‌ न‌स‌ते, प्रेम‌ आव‌ड‌वात‌ नाही किंवा मिळ‌त‌ नाही; असे न‌सून प्रेमाच अभिव्य‌क्ती या जात‌कांत block झालेली आढ‌ळ‌ते, ब‌रेच‌दा प्रेमाच्या देवाण‌घेवाणीच्या उर्जेचे द‌म‌न झालेले अस‌ते शुक्र‍ह‌र्ष‌ल योग‌ हे पार‌ंपारीक कोण‌त्याही पुस्त‌कात नीट स्प‌ष्ट केलेले आढ‌ळ‌त‌ नाहीत, त‌त्स‌ंब‌ंधी गैर‌स‌म‌ज‌च आढ‌ळून येतात. ख‌रे त‌र या पुस्त‌कांम‌ध्ये क‌ठीण शुक्र‍ह‌र्ष‌ल‌ योगांस‌ च‌क्क "घ‌ट‌स्फोट योग‌" असे स‌ंबोध‌ले जाते आणि ब‌हुस‌ंख्य‌ वेळा या योगांची सांग‌ड व्य‌भिचार व‌ विकृतीश घात‌लेली आढ‌ळ‌ते.त्यात त‌थ्य‌ अस‌ले त‌री कार्ट‌र म्ह‌ण‌तात त्याप्र‌माणे - These aspects do not incline to promiscuity or vulgar vice and it's connection with sexual perversion is extremely exaggerated." हे मान्य‌ आहे की काही जात‌कांची वाग‌णूक ही व‌र‌ती सांगीत‌ल्याप्र‌माणे व्य‌भिचारी, त‌सेच विकृत‌ असूही श‌क‌ते प‌र‌ंतु ब‌हुस‌ंख्य‌ जात‌क‌ हे त‌शा प्र‌कार‌ची उर्जा फार अस्प‌ष्ट्/क‌मी प्र‌माणात प्र‌क‌ट‌ क‌र‌तात्. या जात‌कांना प्रेमात, आक‌र्ष‌णात साह‌स‌ व‌ नावीन्याचा शोध घेण्याची तीव्र‌ उर्मी अस‌ते हे मान्य‌, पण‌ इंद्रिय‌सुख‌लोलुप‌ता (sensuality) आणि लैंगिक‌ता हे शुक्र‌ कोण‌त्या राशीत‌ प‌ड‌ला आहे ते पाहून‌ ठ‌र‌वावे लाग‌ते. जसे ज‌र‌ शुक्र‌ वृष‌भ किंवा वृश्चीक‌ राशीत‌ प‌ड‌ला असेल‌ त‌र् लैंगिक‌ प्र‌योग‌शील‌ता अधिक‌ आढ‌ळेल याउल‌ट‌ मिथुन‌, तूळ,सिंह‌ या राशीत लैंगिक‌ प्र‌योग‌शील‌ता तित‌कीशी आढ‌ळ‌णार‌ नाही.कार‌ण भाव‌निक‌ निच‌रा होण्यासाठी काही राशीतील‌ शुक्र शारीरीक प्रेम‌, वास‌ना उद्दीप‌न‌ अधिक‌ तीव्र‌तेने क‌र‌तो.प‌ण इन ज‌न‌र‌ल‌च या जात‌कांत‌ लैंगिक‌ प्र‌योग‌शील‌ता व‌ वैविध्य‌ याक‌र‌ता मोठ्या प्र‌माणात क‌ल‌ दिसून येतो. extraordinary म्ह‌ण‌जे क‌मालीचे स्वात‌ंत्र्य‌ त्यांना जोडिदार‌ने दिलेले आव‌ड‌ते/लाग‌ते व‌ तेदेखील असे स्वात‌ंत्र्य‌ जोडिदारास ब‌हाल क‌र‌तात. प्रेमाच्या प‌द्ध‌तीतील वैविध्य‌ ज‌से स‌म‌लैंगिक‌ता, bisexuality, स‌मूह‌स‌ंभोग‌ त‌सेच अन्य‌ अपार‌ंपारीक‌ लैंगिक‌ क्रियांक‌डे ओढा असू श‌क‌तो (आठ‌वा - ह‌र्ष‌ल‌ म्ह‌ण‌जे म‌र्यादा, रुढि, प‌र‌ंप‌रा पाडून न‌व्या वाटा न‌वे प्रांत‌ चोखाळ‌ण्यास जात‌काला उद्युक्त‌ क‌र‌णारा ग्र‌ह‌) प‌र‌ंतु टोबी म्ह‌ण‌तात त्याप्र‌माणे स‌ह‌ज‌ किंवा flowing/harmonious योगांत‌ ही लैंगिक‌ता gentle unconventionality म‌ध्ये मोड‌ते. या व्य‌क्तींना विरुद्ध‌लिंगी व्य‌क्तिंचे आक‌र्ष‌ण ब‌रेच् असू श‌क‌ते त‌सेच त्यांचा मित्र‌प‌रीवार‌ही खूप मोठा अस‌तो. हा मित्र‌प‌रिवार पार‌ंपारीक‌ न‌सून, offbeat असू श‌क‌तो. शुक्र‍ह‌र्ष‌ल‌ योग हे नात्याम‌धील स्वात‌ंत्र्य‌ open mindedness, नावीन्याची ओढ, विशाल व्याप‌क स‌र्व‌स‌मावेश‌क‌ता आदि द‌र्श‌वितात्. अग‌द उत्त‌म‌ किंवा harmonious योगात‌ह एक जाण‌व‌णारी गोष्ट म्ह‌ण‌जे ज्या नात्यात थ्रिल, थ‌रार नाही ते नाते थ‌ंड‌प‌णे तोडुन टाक‌ण्याची वृत्ति, aloofness. अशा रीतीने प्रेम‌ळ,warm शुक्र‌ आणि aloof ह‌र्ष‌ल यांचे योग‌ हे सोपे न‌स‌तात‌च्. क‌ठीण योग‌ त‌र फार‌च त्रास‌ देतात्. थंड‌, aloof , आत्म‌केंद्री स्व‌भाव, स्व‌त:चे तेच ख‌रे क‌र‌ण्याची वृत्ति, अस‌ंवेद‌न‌शील‌ता व‌ नात्यांत प्र‌योग क‌र‌ण्याची आव‌ड अशा रीतीने पार‌ंपारीक‌ नात्यास हे योग‌ फार मार‌क‌ अस‌तात्. विशेष‌त: १८० अंश‌ म्ह‌ण‌जे प‌र‌स्प‌र‌विरुद्ध‌ योग हा वाईट ठ‌र‌तो किंवा त्रास‌दाय‌क‌ ठ‌र‌तो. या योगांचे फ‌लादेश स‌र्व‌ पुस्त‌कांत व्य‌व‌स्थित सांगीत‌लेले आढ‌ळ‌तात प‌ण त्यांमाग‌चा क‌र्म‌विपाक, dynamics गाळ‌लेले अस‌ते.या व्य‌क्ती अतोनात स्वात‌ंत्र्य‌प्रिय‌ असून त्यांच्याक‌र‌ता नात्यातील स्वात‌ंत्र्य‌ हा ज‌ग‌ण्याचा श्वास अस‌तो व‌ त्यामुळे क‌र‌क‌चुन बांधुन घेण्यास ते क‌च‌र‌तात्. आणि म्ह‌णुन कोणालाही त्या स्व‌त:व‌र‌ प्रेम‌ क‌रु देत‌ नाहीत, गुंत‌त‌ नाहीत्. त‌सेच भाव‌निक ज‌व‌ळीक‌ता त‌ड‌काफ‌ड‌की, तोडुन द्याय‌ची वृत्ति. त्यांना ब‌रेच‌दा दुखाव‌ले जाऊ असेही वाट‌ते किंब‌हुना या व्य‌क्ती आप‌ण‌ होऊन दूर र‌हातात, जोडिदारास स्वात‌ंत्र्य‌ देतात , दूर र‌हाण्याचा subtle स‌ंदेश देत‌ र‌हातात आणि जोडिदाराला वाट‌त‌ र‌हाते की हे जात‌क त्यांना क‌ंटाळ‌ले आहेत, आप‌ण या जात‌कास न‌कोसे झालेलो आहोत ईत्यादि.
ब‌रेच‌दा त‌र आप‌ण‌हो होऊन तोड‌तात आणि व‌र‌ त‌क्रार क‌र‌ताना दिस‌तात् की त्यांना प्रेम‌ मिळ‌त‌ नाही. हे स‌र्व‌ पूर्व‌ज‌न्मीचे क‌ठीण क‌र्म‌ म्ह‌ण‌ता येईल्.
.
म‌ंग‌ळ्-ह‌र्ष‌ल‌ योग‌ - म‌ंग‌ळ‍ह‌र्ष‌ल‌म‌धील कोण‌तीही देवाण‍घेवाण ही अत्य‌ंत‌ ब‌ल‌शाली ऊर्जाप्र‌वाह‌, अत्युत्त‌म‌ निर्ण‌य‌क्ष‌म‌ता, प्र‌च‌ंड‌ drive व‌ प्र‌च‌ंड उर्जेचा स्रोत‌ द‌र्श‌विते. अशी कोण‌तीही देवाण‌घेवाण ही अतिश‌य dynamic, volatile, restless अस्थिर‌ स्व‌भाव द‌र्श‌वित असुन, या उर्जेचे प्र‌तिबिंब‌ विशेष् क‌रुन दैन‌ंदिन‌ व्य‌व‌हार, म‌ह‌त्त्वाकांक्षा, लैंगिक‌तेम‌ध्ये प‌ड‌लेले आढ‌ळ‌ते. या जात‌कात क‌मालीचे उत्त‌म् नेतृत्व‌, रिस्क घेण्याची क्ष‌म‌ता, धैर्य‌, स‌ंशोध‌क‌ वृत्ति आणि वैय‌क्तिक स्वात‌ंत्र्याची टोकाची आव‌ड‌ यात‌ही दिसुन येते. कार्ट‌र‌ सांग‌तात त्याप्र‌माणे या व्य‌क्ती स्व‌त:स‌ व्य‌व‌स्थित‌ ओळ‌खुन, जाणुन अस‌तात्. आप‌ले गुण‌दोष त्या ओळ‌खुन अस‌तात्. मात्र आप‌ली compulsive activity,साह‌स, थ्रिल‌, excitement हे क‌शातून उग‌म‌ पाव‌ते हे या व्य‌क्टि जाणुन अस‌तील‌च असे न‌स‌ते. अतिश‌य द्न्यान‌पिपासू, न‌व‌न‌वीन‌ त‌ंत्र‌द्न्यान, द्न्यान, माहीतिची आव‌ड‌ या व्य‌क्तिंनम‌ध्ये असेते त्या क‌र्तुत्व‌वान‌ अस‌तात्. व‌ या जात‌कांत‌ engineering त‌सेच mechanical कौश‌ल्ये ही आढ‌ळ‌तात्. एव‌ढा उर्जाक‌ल्लोळ दाबुन ठेव‌लेला अस‌तो की या उर्जेचा स्फोट हा ब‌रेच‌दा शारीरीक्/वाचिक्/कायिक्/मान‌सिक्/लैंगिक‌ हिंसेत होतो. प‌ण ते म‌ंग‌ळाच्या राशिव‌र‌ती व‌ अन्य‌ ग्र‌हांशी केलेल्या योगाव‌र‌ती अव‌ल‌ंबुन‌ अस‌ते. ज‌र‌ एखादा personal planet हा श‌निशी योग‌ क‌र‌त‌ असेल त‌र अशी हिंसा होणार‌ही नाही. या व्य‌क्ती उत्त‌म‌ healers, स‌ंशोध‌क‌, अत्य‌ंत‌ कुश‌ल‌ विक्रेते या रुपात‌ही आढ‌ळून येतात्. उर्जा क‌शी channelize होते हे खूप‌से म‌ंग‌ळाच्या राशीव‌र‌ती अव‌ल‌ंबुन‌ अस‌ते. emergency, अप‌घात‌, घात‌क‌ प्र‌स‌ंग‌ यावेळी हे लोक उठुन दिस‌तात त्यांचि निर्ण‌य‌क्ष‌म‌ता, आदिंचा क‌स‌ लाग‌तो व‌ हे लोक फार उत्त‌म‌ रीतीने emergency हाताळ‌तात, साम‌ना क‌र‌तात्. या व्य‌क्ती स्व‌त:चेच‌ ख‌रे क‌र‌णाऱ्या असुन, खूप‌दा त्यांना excitement अतिप्रिय‌ अस‌ते, च‌कोरीला फार ल‌व‌क‌र‌ ते क‌ंटाळ‌तात्. I have often wondered if these aspects are not in many cases a carryover from past lives' experience of warfare or from having the person been trained in extreme form of physical or psychological harshness.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वप्रथम या विषयावर लेखन केले म्हणून अभिनंदन. लेखामुळे माहितीत भर पडेलच पण तुमची स्पष्ट करण्याची पद्धत छान असल्याने विषय नवशिक्या माणसालादेखील समजेल असे वाटते

याच पुस्तकातून, ज्योतिषातील ४-८-१२ या स्थानांविषयी थोडेसे -
पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात, घरांच्या या तिकडीला 'Trinity of Soul' किंवा 'Psychic Trinity' असे म्हटले जाते. कुंडलीतील, ही तिन्ही घरे व्यक्तीच्या कर्मविपाकाशी संबंधित असतात. जरी १२ व्या घराला विशेष करून 'कर्म-ऋणाचे' स्थान असे म्हटले जाते तरी, प्रत्येक कर्म मग ते पाप असो वा पुण्य हे ऋणच असते, एक प्रकारचे कर्जच असते आणि ते फेडून मगच आत्मा पुढे मार्गक्रमण करू शकतो. ते फिटेपर्यंत तो भौतिक प्रतलावर, मर्यादित मितीमध्ये पुन:पुन्हा येत असतो. सर्व जल तत्वांची घरे ही भूतकाळ तसेच पूर्वजन्माशी निगडित असून, पूर्वजन्मी आपण केलेले विचार, कृती, भावना, कर्मे ही आता प्रतिक्षिप्त क्रियेच्या स्वरूपात आपण या जन्मात अनुभवतो असे म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ ही घरे सुप्त वासना दर्शवितात, ज्याला पुस्तकात 'deep yearning' असे म्हटलेले आहे. हे ३ जलतत्वाच्या घरांचे चक्र या सुप्त इच्छा, वासना मूर्त रूपात आणुन म्हणजे जातकास भोग भोगावयास लावून, आत्मोन्नती करण्यास भाग पाडते. विशेषत: नकारात्मक भावनांचा आणि त्यातुन निर्माण होणारा वृत्तींचा निचरा झाल्याखेरीज व्यक्ती स्वत:ला व्यवस्थित व्यक्त करु शकत नाही. ज्या जातकांच्या कुंडलीमध्ये या तीन्हीपैकी कोणत्याही घरावरती भर असेल, ते जातक बहुधा म्हणजे नेहमीच आतल्या गाठीचे असतात. They live in their mind. विशेषत: सूर्य जो की व्यक्तीच्या अहंचा, व्यक्तीमत्वाचा कारक आहे त्या जातकांच्या बाबतीत तर हे सुस्पष्ट आढळून येते. या व्यक्तींच्या मनाचा थांग लागणे फार अवघड असते. त्यांच्या कृती, त्यामागचा कार्यकारणभाव हा अतार्किक, कळ्ण्यास कठीणच नव्हे तर अगदी कोड्यात टाकणारा असतो. त्यांच्या कोणत्या जखमेवरची खपली कधी निघेल, कधी भावनोद्रेक होइल, किंवा कोणता कॉम्प्लेक्स कधी समोर येइल काही सांगता येत नाही.या लोकांबरोबर संबंध ठेवणे हे जागृत ज्वालामुखीच्या टोकावर बसण्यासारखे असते. या ३ घरांतील ग्रहांचा संबंध पूर्वसुकृत अथवा दुष्कृताशी जोडलेला असतो व हे तदनुषंगिक संस्कार हे मूर्त पातळीवर व्यक्त झाले नाहीत तर शांती मिळणे दुरापास्त असते.
Richard Ideman या ज्योतिषांनी कुंडलीतील ग्रह, स्थाने व तदनुषंगिक मानसशास्त्रातील संकल्पना यांची यशस्वी जोड घातलेली असून, त्यांच्या मते ही तीन घरे प्रामुख्याने, मनातील विविध भीती व बागुलबुवांचे निदर्शक आहेत. उदा- चवथे घर हे बालपणीची अगतिकता, आठवे घर हे सामाजिक टॅबुज तर १२ वे घर संपूर्ण विस्कळीतता , व्यवस्थाहीनता म्हणजेच chaos दर्शवितात. या अतार्किक भीती, हे बागुलबुवा, जे जातकाला घाबरवतात त्यांची मूळे पुर्वजन्मात अथवा पूर्वायुष्यात, किंवा बालपणात अपघाताने अथवा जाणीवपूर्वक रुजलेली दिसुन येतात. थोड्क्यात सांगायचे झाले तर ४-८ किंवा १२ व्या घरात पडलेले ग्रह हे पुर्वग्रह, भीती, आधीचे संस्कार व त्यांचे पड्साद, पुर्वायुष्यातील अनुभवांतुन निर्माण झालेले बागुलबुवा या व तत्सम उर्जांचे कारक असतात. सुप्त इच्छा वासनांचे हे पडसाद फक्त भीतीच निर्माण करत नाहीत तर जोपर्यंत ते मूर्त प्रतलावर साकार होत नाही तोवर व्यक्तीला एक परिपूर्ण आयुष्य जगण्यास आड्काठी घालू शकतात. पण त्यांचा प्रभाव तोवरच असतो जोवर जातक धैर्याने, त्यांचा आमनेसामने सामना करत नाही.
पूर्वायुष्यातील आपली कर्मबीजे सुरुप अथवा कुरुप अशा कोणत्या प्रसंगातून साकार होतील, फलित होतील, त्याचे निदर्शक या स्थानातील ग्रह असतात असे म्हणता येइल. ज्यावेळी अमुर्त प्रतलातुन, मूर्त प्रतलाव हे पॅटर्न्स साकारतात, जेव्हा जातकास या अदृष्य undrecurrents चे भान येते, तेव्हा पूर्ण ताकदीनिशी त्यांचा प्रभाव जाणवतो, त्यातुन प्रचंड निर्मीतीक्षम कला साकार होउ शकते तर कधी विध्वंस. जीवात्म्याला बंधनकारक, जाचक अशा मायापटलास भेदण्याची विलक्षण क्षमता, ४-८-१२ घरातील ग्रह दर्शवितातच पण वेळोवेळी त्याचा सामना हा जातकास करावाच लागतो. अर्थात अध्यात्मिक दृष्ट्या, जातकाकरता, हे ग्रह, त्यांची उर्जा विलक्षण उपकारक ठरतात. लेखकाने वापरलेले चॉइसेस्ट शब्द - transcend, overwhelm, self-loss, self-undoing, utter dissolution of the concious ego-personality

हा लेख वाचायचा कसा राहिला!
लेखकाने बराच आढावा घेतलेला दिसतो आहे आणि त्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

कर्म आणि त्याचा विचार कसा आणि का केला? पाश्चात्य पद्धतीत , तत्त्वज्ञानात कर्माचा विचार होतो का?

सामो,तुमच्यावर खुप धार्मिक पगडा आहे असे वाटते.तुमच्या आयुष्यातल्या समस्यांची उत्तरे कर्म ,पुर्वजन्म यात शोधत आहात असे वाटते.मलातर हे ज्योतिष थोतांड वाटते.तुम्ही नॅचरलिस्टीक ॲप्रोच ठेवा .

२० जानेवारी २०२० ची संध्याकाळ मी सॅम जेप्पीचे शब्द ऐकत होते की फेब्रुवारीत काय एनर्जी शिफ्ट्स आहेत. -
(Streamed live on Jan 20, 2020 - https://www.youtube.com/watch?v=1wc_6A8wOKc) सॅम जेप्पी , ज्योतिषी सांगत होता - फेब्रुवारी व मार्च मध्ये महत्वाच्या एनर्जी शिफ्टस होताहेत. इन्टेन्स एनर्जी प्रेडिक्शनस. मार्चमध्ये एक्झॅक्ट तसे ग्रहमान आहे जसे ९/११ च्या वेळेस होते.
हे ऐकून, मला भीती वाटली होती ती अतिरेकी हल्ला परत होण्याची.
पण प्रत्यक्षात काय झाले - कोरोनाने ९/११ सारखेच जगभर पडसाद उमटले, व्हायरसमुळे, नरसंहार झाला.
२२-२३-२४ जानेवारी - शनि धनुमधुन, मकरेत प्रवेश करता झाला. ३ वर्षांकरता.

९/११ ला मंगळ व केतू हे मूळ नक्षत्रात होते . आता परत १८ वर्षांनी तीच ग्रहांची स्थिती आपल्याला अनुभवायची आहे. फेब्रुवारी १३-१४-१५ - हे घडतय लक्षात घ्या. १८ फेब्रुवारी - इन्टेन्स डेज विथ एक्स्टर्नल वर्ल्ड, सिमिलर प्लेसमेन्ट टु ९/११. एस्कलेशन ऑफ सम काईंड ऑफ एक्स्प्लोझिव्ह एनर्जी इन द वर्ल्ड. इट्स लाइक ९/११.
हे त्याचे शब्द. ५१:०० - या व्हिडीओवरच्या टाइमलाइनवरती त्याचे शब्द!

मूळ नक्षत्र हे धनु राशीत येते. काली ची अपरुटिंग एनर्जी म्हणजे हे नक्षत्र. धनु ही राशी अध्यात्म ओरिएंटेड असते म्हणजे देव -देव नसून, हायर ट्रुथ शोधणारी. केतु व मंगळ या नक्षत्रात आहे. तो म्हणतोय Lifting the veil एनर्जीचा सामना म्हणजे मायापटल उखडणारी, आपल्याला सत्याचा सामना करावयास लावणारी एनर्जी आहे या सुमारास.
_________________________________
ज्योतिष फक्त पुस्तक शिकून येत नाही त्याकरता डिव्हाइन ब्लेसिंग्स लागतात. तुम्ही काळाच्या स्फटिक गोलकात वाकून अदमासा घेताय हे खायचे काम नाही. सॅम हा नित्योपासनेवर भर देतोच. माता अमृतानंदमयी त्याच्या गुरु आहेत. तो खूप भरभरुन बोलतो त्यांच्याविषयी.

ज्योतिष फक्त पुस्तक शिकून येत नाही त्याकरता डिव्हाइन ब्लेसिंग्स लागतात. तुम्ही काळाच्या स्फटिक गोलकात वाकून अदमासा घेताय हे खायचे काम नाही.>>>>

सहमत. 2+2 = 4 इतके सोपे नाहीये ते. आणि सद्गुरूंचा वरदहस्त लागतोच. सामान्य ज्योतिषयला आकडेमोड करून जे दिसते त्यातला अचूक अर्थ समजायला तितकी उपासना लागते. असे मी वाचले आहे.