साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

तुळ राशीला शेवटची अडीचकी आहे. शेवटची अडीचकी काही चांगले घडवुन जाते. तुळ राशीला शनि राजयोग कारक असल्याने किंवा तुळ राशीत शनि उच्चीचा असल्यामुळे पहिली अडिचकी सोडली तर दुसर्‍या आणि तिसर्‍या अडीचकीत फारसा त्रास होत नाही.

शेवटच्या अडिचकीत कुटुंबस्थानातुन किंवा धन स्थानातुन होणारे शनिभ्रमण हळु हळु सांपत्तीक स्थितीत सुधारणाच करेल. याचा वेग मंद असला तरी स्लो बट स्टेडी अश्या प्रकारचा असेल.

कुटुंबात शनि हा वाढ करणारा ग्रह नसुन कितीही हवे असले तरी कुटुंबातील सदस्य संख्या एका आकड्याने किमान कमी होताना काहिंना दिसते. अत्यंत वृध्द असे आजी - आजोबा यांचा या अडिचकीत वियोग होण्याची शक्यता असते तेव्हा लवकरच त्यांच्या जिवंतपणी आशिर्वाद घेण्याचे मनात आणा. त्यांच्या बरोबर काही काळ व्यतित करा. त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शेवटी अमर कोणीच होत नसते. पण मोठ्यांचे कृपाछ्त्र मात्र कायम रहावे असे वाटत असते. अश्या वेळी रुख रुख राहु नये या दृष्टिने हे लिहले आहे.

वृश्चिक राशीला ही मधली अडिचकी. प्रत्यक्ष चंद्रावरुन शनिचे भ्रमण होताना होणारा मानसीक त्रास लक्षात राहिल असा असतो. तुमच्या राशीला अनुरुप बदला घ्यायचा स्वभाव जरा अजुनही लांब ठेवा . शांत पणे पहात रहा काय घडते आणि का घडते या कडे. अनुकुल काळ येईल तेव्हा तुम्हाला सव्याज उट्टे काढायची संधी येणारच आहे. पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल.

शनिवारी तेलाने मालीश करुन गरम पाण्याने स्नान करावे हा उपाय साडेसातीत करायला जुने व जाणते ज्योतिषी सांगतात. मनाचे व्यापार वाढतात तेव्हा शरीरातले रक्ताभिसरण वाढवणे सुखद अनुभव देते असा काहिसा प्रकार यामागे असावा.

शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.

धनु राशीला पहिलीच अडीचकी आहे. व्यावसायीक महात्वाकांक्षांना आवर घालुन लो रिस्क असलेले करार मदार करणे क्रमप्राप्त ठरेल. धनु राशीला धन स्थानाचा मालक असलेला शनिच व्ययस्थानात या अडिचकीत असल्यामुळे स्थावर / रोकड यांचा क्षय होताना दिसणार आहे. तो थांबविण्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण आणि मानसीक ताण जाणवणे अपरिहार्य आहे.

तृतीयेश शनि तुमच्या व्ययात असल्यामुळे सहोदरांची खास करुन मोठ्या भावा - बहिणीची चिंता सतावेल.

आपली मानसीकता अध्यात्मीक आणि परमेश्वराला मानणारी असल्यामुळे या कालखंडातुन आपण पार जाणारच आहात.

शनिवारी शनिमहाराजांना तेल आणि काळे उडीद याच बरोबर रुईपत्रांची माला अर्पण करा. मारुतीचे दर्शन घ्या. हा उपाय पुढील साडेसात वर्षे न चुकता करा. सोबत शनिस्तुती आणि हनुमान चालिसाचा पाठ सुरु ठेवा.

सर्वांसाठीच शनिचा नवग्रहपिडाहर स्त्रोत्रातला मंत्र रोज जपावा असा आहे.

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते

|शुभंभवतु |

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वकर्म वगैरे विचारांनी पूर्ण समाजच मानसिक पांगळा करून ठेवला आहे.>>>>>>>
कर्माच्या सिद्धांता वर विश्वास ठेवून वागणारा आणि मानसिक पांगळा झालेला मी अजून एकही माणूस पाहिलेला नाही .
कर्माच्या सिद्धांता वर विश्वास ठेवून मानसिक पांगळेपणा दूर केलेले अनेक लोक नक्कीच पाहिलेत

मानसिक पांगळेपणा निर्माण करणारे हे विचार असते तर भगवान श्रीकृष्णाने ते नक्कीच सांगितले नसते ,बरोबर ना??

फार गाढा अभ्यास नाही माझा पण कर्म सिद्धांत म्हणजे - कर्म कर, फल की चिंता मत कर. त्याचा आणि पूर्वकर्माचा फारसा सम्बन्ध ऐकला नाही. कर्म सिद्धांतानुसार चांगली कर्मे करा हे सांगणे ठीक. पण काही गोष्टी मनासारखे फल देत नसतील तर त्याचा फक्त पूर्वकर्माशी सम्बन्ध लावणे काही गरज आहे का?

Lol अरे मग एवढच उत्तर का? उलगडून सांगा कुणी. अगदी जाऊन हे ते पुस्तक वाच अस सांगितल तरी चालेल पण नुसतच ... अमा, आप भी कभी कभी कमाल करते हो!

आपण केलेल्या कर्मांची (या जन्मात किंवा कोणत्याही पूर्वजन्मात )फळे भोगण्यास(चांगली किंवा वाईट ) आपण पूर्णतया बांधील आहोत इतका सोपा आहे कर्माचा सिद्धांत

साडेसाती दरम्यान येणाऱ्या दशा पण महत्वाच्या असतात . साडेसाती बद्दल मी एक लेख मागे लिहिलाच आहे ब्लॉगवर.
साडेसाती बद्दल छान चर्चा चालली आहे .

accountant च्या भाषेत सांगायचा झाले तर साडेसाती म्हणजे शनि महाराजांचे audit .आपल्या चांगल्या वाईट गोष्टींचे हिशोब द्यावे लागतात.

accountant च्या भाषेत सांगायचा झाले तर साडेसाती म्हणजे शनि महाराजांचे audit .आपल्या चांगल्या वाईट गोष्टींचे हिशोब द्यावे लागतात.

महादशा ही एकच दशा मी वाचली आहे.

वर कुणीतरी लिहिले आहे की वडील हयात असले की मुलाला साडेसाती फार सतावत नाही. माझ्या अनुभवानुसार तुमच्या घरात कुणीही व्यक्ती जी तुमचा आधार आहे. तुमचे प्रश्न जाणते. तुम्हाला तिची मदत मिळते. तुमच्या जबाबदार्‍या तिच्यामुळे हलक्या होतात - अशी जर साडेसाती नसलेली व्यक्ती तुमच्या सोबत सहवास करत असली तर नक्कीच त्या व्यक्तिचा तुम्हाला फायदा होतो. माझ्या दोन बहिणींना साडेसाती दरम्यान खूप त्रास झाला. त्या सतत हाच उल्लेख करायच्या काय ही साडेसाती मागे लागली. त्यावेळी माझे दिवस एन भरात होते. मी त्यांना खूप मदत केली. म्हणजे आर्थिकच नाही तर इतरही त्यांचे प्रश्न मिटवण्यास धडपड केली. त्यातून त्या सुखरुप बाहेर पडल्या आणि आता अगदी आनंदी जीवन जगत आहेत. माझ्या बहिणीला थेट चवथ्या स्टेजमधला कर्करोग झाल होता. मी तिला त्यातून अलगद बाहेर काढले. म्हणजे अजूनही तो आहेच पण तिला योग्य ती मदत धीर आधार हे सर्व मी तिला देत आहे.

मेल मेनोपॉजबद्दल मी कधी ऐकले नाही. आता गुगल करुन बघतो. बट नथींग लाईक दॅट.

बी , प्रत्येकाला आयुष्यभर कोणत्या न कोणत्या ग्रहाची महादशा चालू असते . महादशेत अंतर्दशा असतात.
लेखक, मी साडेसातीवर लिहिलेल्या लेखाचे नाव ' साडेसाती- शनि महाराजांचे ऑडीट' असेच आहे. बर्याच दिवसापूर्वी लिहिला होता लेख.

accountant च्या भाषेत सांगायचा झाले तर साडेसाती म्हणजे शनि महाराजांचे audit .आपल्या चांगल्या वाईट गोष्टींचे हिशोब द्यावे लागतात.>>>>>>>>अनुमोदन

मागच्या जन्माचे संचित -- मी जर मागिल जन्मी एखादा प्राणी असेल तर प्राणी पाप पुण्य करतात का? माझ्यामते प्राण्याला पापपुण्य नसतात. मग कदाचित मी जेंव्हा केंव्हा मनुष्य जन्माला येऊन गेलेलो असेल त्यावेळी मी जे पापपुण्य केले त्याचे फळ कदाचित मला ह्या जन्मी मिळालेले असू शकते.

साडेसाती समजा एका व्यक्तीला आहे तर त्याचा नातेवाईक कशाला मरेल ? Uhoh नातेवाईकाला थोडी साडेसाती असते. ?

ऑडिट म्हणजे प्रामाणिकपणाची तपासणी इतकेच. हिशेब द्यावे लागतात साडेसातीत याचा काय संबंध त्याच्याशी? कुटुंबातले आजारपण निघते आणि कष्ट ,दूरच्या ठिकाणी बदली होते वगैरे गोष्टीँचा काळ आणि साडेसाती एकाच वेळी घडतात असे फारतर म्हणू. घरात काही आजारपण येणारच नाही, बदली होणारच नाही, धंद्यात मंदी येणारच नाही, अशी काही कोणाची गैरसमजूत नसावी. यावर यांचा काही गतजन्मीच्या कर्माशी संबध वाटत असेल तर गीता न वाचता एक हजार वेळा गीतेला कव्हरे घालावी. या ठक्करमंडळींनी सगळ्या बर्फाच्या लादीला भुशात घालून वेगळे रूप देण्याचा आटापिटा चालवला आहे. आयुष्यात कधितरी कमीअधिक कष्ट झेलावेच लागतात,{आपल्यासाठी कोणाला अथवा कोणासाठीतरी आपल्याला }वाईट, अप्रिय प्रसंग येणारच आहेत ते येऊच नयेत यासाठी बिचाऱ्या शनिच्या डोक्यावर तेल थाप, घराच्या दारावर मारुतिला पहाऱ्याला बसव इ० गोष्टी अनाकलनीय आहेत.

सरद, तुम्हाला मुद्दा लक्षातच येत नाही आहे. इथे लोक अनुभव सांगत आहेत तरी देखील तुम्ही नको तो मुद्दा मांडत आहात! तुम्ही जी उदा. दिली त्यापेक्षा भयंकर हालत निर्माण होते सासामधे. उदा देणे सोपे आणि हयतून जाणे अवघड असते.

माझ्या मित्राच्या वडिलांना राजयोग होता पण तेव्हा मित्राला साडेसाती लागली. वडील गेले. मग हा साडेसाती होती म्हणुन रडत बसला. याला साडेसाती होती ठिक आहे पण वडीलांना तर राजयोग होता त्यांचा काय दोष ?

राजयोग म्हणजे व्यवसायीक प्रगती, अधिकार, पैसा, मान इ. हे काही संपुर्ण आयुष्यभर मिळत नाही. आयुष्यातला थोडा काळ मिळते. मृत्यु तर अटळ आहे. तो येणारच.

मुलाच्या कुंडलीत दु:ख प्राप्त होण्याचे दिवस साडेसातीत असतात हे निदर्शक आहे. मुलगा वडीलांवर खुपच अवलंबुन असेल तर खुपच दु:ख होईल. कर्तबागार आणि विचारी असेल तर कमी होईल.

मुलाला साडेसाती असल्यामुळे हा वडीलांचा मृत्यु झाला असे मानणे चुक आहे. घरात कोणाची साडेसाती असेल तर सगळ्यांना त्रास होतो कारण आपण आपल्या जवळच्या व्यक्तीत भावनेने गुंतलेले असतो.

सगळा बाफ वाचल्यावर मला साडेसाती - मानसोपचार तज्ञ - त्याची औषधे-- कौन्सेलिंग- त्याचा फायदा - मेल मेनोपॉज-- यात काहितरी जबरदस्त लिंक असावी असे वाटतेय.
ऑडीत आणि अकाउट्न्सी नाही कळाली तसेच साडेसातीतच का चांगले वागायचे तेही नाही कळाले.

हळुहळु बाफ उलगडत जाइल तसे कळेल असे वाटते.

बाकि चालु द्यात.

बी तुम्ही फार साधे आहात .यासाठी तुमचा स्वभाव कारणीभूत असू शकतो पण बर्याचदा स्वभाव हा त्या व्यक्तीच्या आयुश्यात घड्लेल्या परीस्तिथीनुसार घडतो.याला अनेक बर्या वाईट प्रसंगाचीही जोड असु शकते .त्यामुळे डिप्रेशन ,फस्ट्रेशन ,एकदम निराश वाटनं असं सगळयांच्या बाबतीत घड्तं फक्त सगळे ते सांगत लिहित नाहीत.काही लिहीतात त्यांच्यासाठी नीधप यांनी लिहिल्याप्रमाणे "समस्येचे उत्तर धैर्य, कष्ट, पेशन्स हेच आहे."

.पण तुमच्या बाबतीत तर मला या सर्व गोष्टी तुमच्यात असाव्यात असे वाटते कारण तुम्ही वर लिहीलेलं तुमच्या बहीणीच्या कर्करोगाबाबत, जे तुम्ही त्यांच्यासाठी करताय त्यासाठी खरोखर तुमच्या धैर्याला सलाम .फक्त थोडी विचारांची स्ट्रेन्थ वाढवा.बाकी मी काय सांगणार तुम्हाला तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहात.आणि इथे माबो वर येणारा प्रत्येक जण तुम्हाला जर का मद्त करत नसेल किंवा तुमच्या भावना समजुन घेत नसेल तर वाईट वाटुन घेउ नका .तेही काही असंवेदनशील नसतात.त्यामुळे त्यांना दुष्ट ही समजु नका. त्यांचाही तो स्वभावगुणच आहे.

आणि पुढ्च्या आयुष्या बाबत बोलाल तर मी म्हणेन तुम्ही सलमान खानचा (चांगल्या गोष्टी व आनंदी राह्ण्याचा)आदर्श ठेवा.त्याचं सुदधा लग्न झालेलं नाही. Happy . आनंदी जीवनासाठी शुभेछा.
आय होप मी लिहिलेलं तुम्हाला पटेल.

बी ! तु प्र्त्येकच गोश्टीचा फार किस पाडत बसतोस, त्याचा अतस्: त्रास तुलाच होतो, मित्रा प्र्त्येक गोश्टीचा इतका त्रास करुन घेशिल तर जिवन जगशिल कधी!
काही गोश्टी अव्यक्तावर सोडण्यात शहाणपणा आहे. जे आता समोर आहे त्यात तु काय चान्गले करु शकतोस ते तु कर प्र्त्येक गोष्टिचा भार घेणे सोडुन दे!

मला असं म्हणायचं आहे की जरा शास्त्रोक्त /शास्त्रिय मुद्दे घ्या १)अमुक अमुक राशिला आली. अमुकला संपली यावर एक दोघे म्हणतात आमची सिंह तरी सासा कशी ? मान्य २)कोण कोणता त्रास होऊ शकतो -अनुभव मांडलेत. बरोबर. ३)साडेसाती शनीचे गोचरी मूळ चंद्रराशी च्या जवळ भ्रमण. ज्यांचा लग्नेश रवी अथवा मंगळ (शनीचे शत्रु)ज्या राशीँत आहेत त्यावरूनही भ्रमण सासा लांबवते का? ची उदाहरणे योग्यच ४)कर्ता शनी ग्रहाचा स्वभाव.

आता मध्येच कर्मसिध्दांत, ऑडीट, अकाउंटनसीशी साधर्म्य इ०मुद्दे आणून धागा भरकटतो.
वैयक्तिक विरोध अथवा विशिष्ठ मत विरोध नाही.

मि व माझा भाऊ आम्हि दोघे वृश्चिक्,अडीचकी मानसिक तनावाचि होती .मायबोली च्या या धाग्याचा आधार वाट्ला .आमच्या वडिलानाही त्रास झाला. पुढेही त्रासदायक जाइल का?

माझि जनम त्तारिक ०६/१२/१९७५ आहे . रत्नगिरि सकालि ५.४५ मला शनि वक्री आनि शनि साडेसाती

चालु आहे का , असेल तर क्रुपय उपाय सागा.

निवांत पाटीलजी,

सगळा बाफ वाचल्यावर मला साडेसाती - मानसोपचार तज्ञ - त्याची औषधे-- कौन्सेलिंग- त्याचा फायदा - मेल मेनोपॉज-- यात काहितरी जबरदस्त लिंक असावी असे वाटतेय.

प्रत्येकालाच साडेसातीत मानसपोचार तज्ञाची गरज लागते असे नाही. हा काळ मानसीक दृष्ट्या डोळसपणे अनुभवण्याचा जरुर असतो. चांगले वागायचे या पेक्षा डोळसपणे आलेले अनुभव का आले याचा विचार अंतर्मुख होउन केला तर आपले आचरण चांगले ठेवण्याची प्रेरणा जरुर मिळते.

ऑडीत आणि अकाउट्न्सी नाही कळाली तसेच साडेसातीतच का चांगले वागायचे तेही नाही कळाले.

<<साडेसातीतच का चांगले वागायचे तेही नाही कळाले>> माझ्यामते चांगले नेहमी वागावे किंवा चांगले वागण्याचा प्रयत्न तरी करावा.
पण का जर का साडेसातीत वाईट वागले तर जो त्रास होईल तो जास्त असेल.कधी कधी चांगले वागुनही केवळ गैरसमजुतीतुन त्रास होउ शकतो.म्हणुन असेल कदाचित. मला या बाबतीत जास्त माहीत नाही हा केवळ एक अंदाज .

Pages