साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

तुळ राशीला शेवटची अडीचकी आहे. शेवटची अडीचकी काही चांगले घडवुन जाते. तुळ राशीला शनि राजयोग कारक असल्याने किंवा तुळ राशीत शनि उच्चीचा असल्यामुळे पहिली अडिचकी सोडली तर दुसर्‍या आणि तिसर्‍या अडीचकीत फारसा त्रास होत नाही.

शेवटच्या अडिचकीत कुटुंबस्थानातुन किंवा धन स्थानातुन होणारे शनिभ्रमण हळु हळु सांपत्तीक स्थितीत सुधारणाच करेल. याचा वेग मंद असला तरी स्लो बट स्टेडी अश्या प्रकारचा असेल.

कुटुंबात शनि हा वाढ करणारा ग्रह नसुन कितीही हवे असले तरी कुटुंबातील सदस्य संख्या एका आकड्याने किमान कमी होताना काहिंना दिसते. अत्यंत वृध्द असे आजी - आजोबा यांचा या अडिचकीत वियोग होण्याची शक्यता असते तेव्हा लवकरच त्यांच्या जिवंतपणी आशिर्वाद घेण्याचे मनात आणा. त्यांच्या बरोबर काही काळ व्यतित करा. त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शेवटी अमर कोणीच होत नसते. पण मोठ्यांचे कृपाछ्त्र मात्र कायम रहावे असे वाटत असते. अश्या वेळी रुख रुख राहु नये या दृष्टिने हे लिहले आहे.

वृश्चिक राशीला ही मधली अडिचकी. प्रत्यक्ष चंद्रावरुन शनिचे भ्रमण होताना होणारा मानसीक त्रास लक्षात राहिल असा असतो. तुमच्या राशीला अनुरुप बदला घ्यायचा स्वभाव जरा अजुनही लांब ठेवा . शांत पणे पहात रहा काय घडते आणि का घडते या कडे. अनुकुल काळ येईल तेव्हा तुम्हाला सव्याज उट्टे काढायची संधी येणारच आहे. पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल.

शनिवारी तेलाने मालीश करुन गरम पाण्याने स्नान करावे हा उपाय साडेसातीत करायला जुने व जाणते ज्योतिषी सांगतात. मनाचे व्यापार वाढतात तेव्हा शरीरातले रक्ताभिसरण वाढवणे सुखद अनुभव देते असा काहिसा प्रकार यामागे असावा.

शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.

धनु राशीला पहिलीच अडीचकी आहे. व्यावसायीक महात्वाकांक्षांना आवर घालुन लो रिस्क असलेले करार मदार करणे क्रमप्राप्त ठरेल. धनु राशीला धन स्थानाचा मालक असलेला शनिच व्ययस्थानात या अडिचकीत असल्यामुळे स्थावर / रोकड यांचा क्षय होताना दिसणार आहे. तो थांबविण्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण आणि मानसीक ताण जाणवणे अपरिहार्य आहे.

तृतीयेश शनि तुमच्या व्ययात असल्यामुळे सहोदरांची खास करुन मोठ्या भावा - बहिणीची चिंता सतावेल.

आपली मानसीकता अध्यात्मीक आणि परमेश्वराला मानणारी असल्यामुळे या कालखंडातुन आपण पार जाणारच आहात.

शनिवारी शनिमहाराजांना तेल आणि काळे उडीद याच बरोबर रुईपत्रांची माला अर्पण करा. मारुतीचे दर्शन घ्या. हा उपाय पुढील साडेसात वर्षे न चुकता करा. सोबत शनिस्तुती आणि हनुमान चालिसाचा पाठ सुरु ठेवा.

सर्वांसाठीच शनिचा नवग्रहपिडाहर स्त्रोत्रातला मंत्र रोज जपावा असा आहे.

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते

|शुभंभवतु |

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो,
https://www.maayboli.com/node/30761
ही धाग्याची लिंक.

मी दुसऱ्या पानापासून भाग घ्यायला सुरवात केली. त्यासाठी त्यादिवशी मायबोलीचा मेंबरही बनलो.

पण एकंदरीत धागा टिंगलटवाळीसाठी काढलेला आहे हे नंतर माझ्या लक्षात आले. मग मात्र मी त्यात भाग घ्यायचा बंद केला.

आडनाव पाहून ट्रोलिंग केले जाते हे लक्षात आल्यावर मात्र मायबोलीवर लिहिणे बंद केले.
Happy

Ashwini_99
इनबॉक्स चेक करा.
रिप्लाय दिला आहे.

सर्वात भारी उपाय म्हणजे दर शनिवारी हनुमान मंदीरात एक नारळ देवाला फोडावा. फोडलेला नारळ, थोडेसे अख्खे उडीद देवापुढे वहावे. दिव्यात तेल घालावे किंवा दिवा लावावा. कमीत कमी तीन प्रदक्षिणा घालून शक्य झालं तर हनुमान चालीसा पठण करावे. गरिबांना इच्छेनुसार अन्नदान करावे. साडेसातीत त्रास होत असेल तर हा एकदम भारी, समस्या सोडवणारा उपाय आहे.

माझी रास वृश्चिक आहे. साडेसाती संपली आहे की अजून बाकी आहे? हे मात्र नक्की की साडेसाती खूप काही शिकवून जाते.माझ्या सारख्या पटकन रिअॅक्ट होणार्‍या, क्षणात मूड खराब होणारी मुलगी आता ८०% शांत, विचार करून बोलणारी झाली आहे. तरी नक्षत्र जेष्ठा असल्यामुळे अजून त्रास होतो. मनात अनेकदा आत्महत्येचा विचार येतो, मन निराशेच्या गर्तेत अडकते. कितीही चांगला विचार करायचा प्रयत्न केला तरी निगेटिव्ह विचार मधे डोके वर काढत असते. आणि मनाचा पूर्ण ताबा निगेटिव्ह विचार घेतात. हे चक्र सतत सुरू असते.

गोंदवलेकर महाराज म्हणतात मनात अक्षरशः काहीही विचार येऊ शकतात, पण कृती करणे आपल्या हातात असते.
थोडक्यात सामान्य माणसाला विचारांवर नियंत्रण ठेवणे अवघड असते पण योग्य कृती नक्कीच करु शकतो.

माझी मकर रास. आणि आता साडेसाती म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास अशी गत झालेय. नम्रता, तुमची स्थिती समजू शकते. पण अनेक वर्षांपूर्वी एका गुजराती मित्राने सांगितलेली म्हण आठवते. आ दिसो पण जस्से. अशी काहितरी होती. अर्थ हा की हेही दिवस जातील. वर दिलेला सल्ला वाचून मी तो मंत्र रोज म्हणते. देवावरचा विश्वास कापरासारखा कधीच उडालाय पण मन्त्रोच्चारण केल्याने पॉझिटीव्ह एनर्जी निर्माण होते ह्यावर विश्वास आहे. हनुमान चालीसा मिळवून बघते. तुम्हीसुध्दा धीर धरा. निगेटीव्ह विचारांवर म्युझिक ऐकण्ं हा रामबाण उपाय आहे. करुन बघा.

लिंक दिल्याबद्दल, धन्यवाद शाम भागवत. शनि आणि मारुतीचा तार्किक संबंध आपण लावलेला आवडला. आपले त्या धाग्यावरचे विवेचन वाचेल. आवडले.

आमच्या घरात माझी धनु रास, मुलाची आणि नवऱ्याची वृश्चिक रास, त्यामुळे साडेसाती म्हणा किंवा कर्म म्हणा सगळ्या बाजूने तिघे पोळून निघालो आहोत, त्यात mrची राहू महादशा सोने पे सुहागा असे झाले आहे. मी तर आता सगळ्या गोष्टी साठी तयार आहे, होऊन होऊन काय होणार, मेल्यावर कोणीच त्रास देऊ शकत नाही, आणि जिवन संपणे हा शेवट आहे असा विचार करून आता शांत झाले आहे.

Pages