चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण फार बघत नाही .पण जेवताना न्युज पेक्शा हे बरे .एलतीगो मस्त होती.इथे सदस्य होण्यात एलतीगो चा मह्त्वाचा वाटा आहे.पहीली प्रतिक्रीया तिथेच लिहीली होती.

'दृश्यम' (drishyam) हा मल्याळम चित्रपट जरुर पहा. त्याचे विविध भाषामध्ये रिमेक होत आहेत.

टिव्हीवर क्लब ६० हा फारुख शेख आणि सारिकाचा सिनेमा पाहिला. सिनेमाची स्टोरी एकदम क्लिशे वाटली. पण फारुख शेख आणि सारीका अभिनय करताहेत असं वाटतच नाही. अत्यंत म्हणजे अत्यंत सहज आणि संयत अभिनय. त्यातही अगदी नंबर लावायचाच तर सारीका इज नंबर वन. काय बोलते ती तिच्या डोळ्यांनी, चेहर्‍यानी, देहबोलीनी!!!! इम्प्रेस्ड.

त्यामानानं बाकीची पात्रं एकदम पात्रं आहेत. टिपिकल, लाऊड आणि जशी ती असणार अशी अपेक्षा आहे तश्शीच. पण कामं मात्र प्रत्येकानं उत्तम केली आहेत. अगदी हिमानी शिवपुरी ही थोड्या वेळाकरता येते पण ठसा उमटवून जाते.

परवा चॅनल-सर्फिंग करताना हिंदीत डब केलेला बंगाली सिनेमा 'कश्मकश' दिसला. जुनं बंगाली वातावरण, वेषभूषा पाहून पुढे बघायला सुरूवात केली. रिया सेन, रायमा सेन, (या दोघीही मला आवडत नाहीत.) प्रसन्नजीत हे चेहरे ओळखीचे होते. अजून एक बंगाली कलाकार होता. त्याचं नाव विसरले.
२ जोड्या, प्रेम, ताटातूट, उदासी, तडजोडींची मानसिक तयारी...नंतर अति-योगायोग घडून दोन्ही जोड्यांचं पुनर्मिलन - असा प्लॉट होता. अगदीच टिपिकल. नाविन्य काहीच नाही. मात्र वातावरणनिर्मिती, सेट्स, रायमा सेनच्या साड्या आवडल्या.

सुरूवातीला होऊन गेलेल्या कथानकाची काही लिंक लागेना. म्हणून विकीवर शोधाशोध केली, तर सिनेमाचं मूळ नाव 'नौकाडूबी' असल्याचं कळलं. टागोरांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.

टागोरांच्या कादंबरीवरचा सिनेमा म्हणून तर अजिबातच आवडला नाही, पटला नाही, इ. इ.

सिनेमाचे निर्माते सुभाष घई यांनी सिनेमा हिंदीत आणताना त्यात काटछाट केली, संवादांचं भाषांतर स्वतःच्या देखरेखीखाली केलं - असं नेटवर वाचलं.

मी मधुनच 'कश्मकश' पाहिला .त्यामुळे कळला नाही .जरा स्लो होता.पण जर >>हिंदीत आणताना त्यात काटछाट केली, संवादांचं भाषांतर स्वतःच्या देखरेखीखाली केलं - असं नेटवर वाचलं.>>तर आता बंगालीतुन पाहावा लागेल.रिया नाय पण रायमा बरी आहे अभिनयात .
अजून एक बंगाली कलाकार होता. त्याचं नाव विसरले.>> कहानी मधला व्हिलन बहुतेक.

इथे ललिता-प्रितीने उल्लेख केलाय ( पान १५ ) तो सिटीलाईट्स मी काल सिडीवर बघितला. भट्ट साहेबांनी चक्क मूळ चित्रपटाचे नाव जाहीर केलेय.
राजकुमार आणि पत्रलेखा, आणि इतरही पात्रांचा अभिनय उत्तम आहे. कथेत गडबड वाटली.. दोघांनी चावी चोरायला प्लॅन केला होता, त्यात बाकीचेही ( बारमित्र ) सहभागी होणार होते. जर मित्राचा मृत्यू अपघाती होता तर बाकीचे मित्र कुठे गेले ? मित्राने आपल्या बायकोला बॉक्स बद्दल सांगितलेले असते, मग तो कुठे ठेवलाय हे का सांगितलेले नसते ?
त्या बॉक्सची घटना, राजकुमारची एंट्री व्हायच्या आधीच झालेली असते, मग तो मित्र ते घर राजकुमारच्या नावे कसे घेईल ? ( खोटे बोलला असेल बहुतेक )

पायाला गोळी लागल्यावर राजकुमार बाथरूम मधे घुसतो तोपर्यंत त्याच्या पायातून रक्त येत असते, पण पुढे खिडकीतून बाहेर पडताना, गच्चीवर गेल्यावर रक्त गायब !

चावीचा ठसा लॉकेटवर उमटून ठेवेन, असे त्याने बायकोला आधीच सांगून ठेवले होते का ? ती बरोबर कसे उघडते ते ? एवढ्या हायफाय बॉक्सची चावी एवढी साधी कशी असेल ? ती त्या बॉक्सची कशी विल्हेवाट लावते ?

दोघींना आपल्या नवर्‍याच्या म्रूत्यूची बातमी दिल्यानंतर, डेड बॉडी बघायची ईच्छा होत नाही ?

पण लोकेशन्स मात्र भन्नाट आहेत. सगळ्या जागा अस्सल वाटतात आणि आहेतही.

"माणसाला पंख असतात" हा एक जूना मराठी चित्रपट मी सिडीवर बघितला. जातीविषयक उल्लेख फार असल्याने कदाचित दूरदर्शनवर दाखवत नसावेत.
सूर्यकांत, उषा किरण, दादा साळवी, इंदिरा चिटणीस, माई भिडे, चंद्रकांत गोखले, वसंत शिंदे.. अशी सगळी अभिनयातील दादा मंडळी असल्याने त्याबाबतीत चित्रपट छानच आहे.
पण त्यापेक्षा सुंदर आहेत ती गाणी. मीना मंगेशकर यांचे संगीत आहे.

१) ये जवळी घे जवळी, प्रिय सखया भगवंता ( हे गाणे दोन वेगवेगळ्या चालीत आहे.)
२) देशील का रे मजला क्षणभर, पंख पाखरा
३) रम्य अशा स्थानी
४) पंख हवे मज पोलादाचे

अशी एकंदर पाच लताची सरस गाणी आहेत. सर्वच चाली सुंदर आहेत. पंख हवे मज ची चाल तर लताचाही कस
लावणारी आहे. या शिवाय हृदयनाथांची पतितपावन नाम ऐकुनी, उभवू उंच निशाण अशी दोन गाणी आहेत. तिही
अर्थातच सुंदर आहेत.

त्याकाळी मराठी चित्रपटांचे डबिंग होत होते का ? का थेट रेकॉर्ड होत असे.

पत्र उघडल्याचा आवाज, लाटांचा आवाज असे काही आवाज फार उत्तम रेकॉर्ड झालेले आहेत.

ओम शांती ओम आवडला असेल तर जरूर हॅपी न्यू इयर बघा. (उगाच ओशन्स बरोबर तुलना करण्यात वेळ घालवू नका.)

किमान चोरी होत असताना दाखवली तरी आहे या एका प्लस वर चित्रपट बघा नाही तरी धूम3 बघितला ना बिनाचोरीचा

दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणारा असं वाक्य पूर्वी असायचं पिच्चरच्या झैरातीत.
हॅपी न्यू इयर ला ते फारच सुट होतं. मजा येते सिनेमा पाहताना. संपूर्ण करमणूक केलीये फरहा खान - शाहरूख ने.

सणाचं पूर्ण फॅमिलीबरोबर हॉटेलमध्ये जेवायला जाताना कमी तेलातलं. शुद्ध तेलातलं, सकस अन्न समोर येणार आहे अशी अपेक्षा ठेवून जात असाल तर मात्र हा सिनेमा नाही आवडणार.

पाहिला आज हॅन्यूइ
मस्त आहे. सरप्राइजिंगली सोनू सुद खूप आवडला. उसकेभी सिक्स पॅक्स इग्नोर नही कर सकते बॉस!
शाहरूखचा दाढी पोनीवाला लूक अज्जिबात नाही आवडला.
टिपिकल फराह मूव्ही. एकदा बघायला हरकत नाही.

मी काल जॉनी डे नावाचा चित्रपट बघितला. नासिरुद्दीन आणि रणदीप हुडा मुख्य भुमिकेत आहेत.
मूलीच्या खूनाचा, बँक ऑफिसरने घेतलेला सूड असे कथानक. रुढ अर्थाने नायक नायिका प्रकार नाही.
ज्या खूनाचा सूड घेतला जातो तोच मूळात खून नसून अपघात असतो.

कथानक खुप छान आहे. कुणीही प्रामाणिक नाही, हे सत्य अधोरेखीत होते खरे.
बहुतेक पात्रे खलप्रवृत्तीची असली तरी प्रत्येकाला एखादा हळवा कोपरा आहे. संवादही छान आहेत पण शिव्यांचा
अतिरेक आहे. नासिर आणि रणदीप दोघांचाही अभिनय सरस आहे.

पण या चित्रपटातला हिंसाचार आणि त्याचे चित्रण अंगावर येणारे आहे. दाताने एखाद्याची जिभ कापणे, मानेला चावा घेऊन रक्तबंबाळ करणे, सळीने डो़के ठेचून ते धडावेगळे करणे, डोक्यावर हातोडी मारणे असले प्रकार आहेत. याची खरोखरीच गरज होती का ?

ज्या जंगलाला आग लागलेली दाखवलीय ते हिरवेकंच आहे. तिथे आग लावायची तर सगळीकडे पेट्रोल / रॉकेल शिंपडावे लागेल. तसे काही दाखवलेले नाही.
बायबलमधे पिस्तूल लपवताना, पुस्तकाचे नाव ब्लर केले आहे पण नंतर संवादात मात्र थेट शब्द वापरलाय.

या हिंसाचारामूळे परीणाम वाढायच्या ऐवजी, कमी झाल्यासारखा वाटला मला.

हा एक ट्रेलर पाहिला आज. जबरी काहीतरी दिसते. तो देवळाचा वाईड अँगल शॉट प्रचंड आवडला.
http://www.youtube.com/watch?v=ns6gCZI-Nj8&feature=youtu.be

चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. कोणाला माहीत आहे का हा चित्रपट? 'एलिझाबेथ एकादशी'

एलिझाबेथ एकादशी परेश मोकाशी यांचा सिनेमा आहे. त्यांनी हरिश्चंद्राची फॅक्टरी बनवला होता. त्यात मुलांच्या तोंडी फार छान अत्यंत निरागस आणि सटल विनोद होते. ए.ए. चा ट्रेलर पाहून हा देखील तसाच असेल असे वाटते! पाहायला उत्सुक आहे!

मस्तच आहे ट्रेलर . जाम आवडला ,गरम बांगड्या Happy जिज्ञासा>>>>+१००
१४ नोहेंबर ,बाल दिवस चा चांगला मुहुर्त साधून रीलीज होतोय. पण मोठ्यांनीसुद्धा बघावा असा आहे . Happy .

'एलिझाबेथ एकादशी' ची जाहिरात झी मराठी अवोर्ड कार्यक्रमात होती. मधुगंधा कुलकर्णी च्या नवर्याचा ( परेश मोकाशी ) यांचा सिनेमा आहे . जू ये रे गा च्या आदित्यानी त्या मुलांबरोबर संवाद जाहिरातीत भाग घेतला होता Happy

गॉन गर्ल - निक आणि एमी या बाहेरून सुखी पिक्चर परफेक्ट दिसणारया जोडप्याच्या लग्नाच्या ५ व्या वाढ दिवशीच संशयित परिस्थितीमध्ये एमी त्यांच्या राहत्या घरातून गायब होते . सगळे धागे खून किंवा अपहरण या शक्यतेकडे बोट दाखवत असतात . मात्र धक्कादायक असतो तो निक ने या सगळ्याला दिलेला थंड प्रतिसाद . त्याच्या कडे बघून त्याला याच फारस दुख पण झालेलं नाही हे कळत . त्याला आपल्या बायकोचे जवळचे मित्र कोण आहेत ? आपण कामासाठी बाहेर जातो तेव्हा ति काय करते ? इतकेच काय पण तिचा रक़्त गट कुठला हे पण माहित नसत हे पाहून या प्रकरणाची चौकशी करणारे पोलिस पण आश्चर्यचकित होतात . अर्थातच संशयाचा काटा निक कडे झुकायला लागतो . गायब एमी च्या शोधासाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात येते . एमी सोबत काय झालेलं असत ? निक ची नेमकी त्यात काय भूमिका असते ? या प्रश्नांची उत्तर हा चित्रपट देतो . वरकरणी हा चित्रपट 'thriller ' सदरात मोडतो कि काय असे वाटू शकते . पण हा चित्रपट अधिक व्यापक मुद्द्यावर भाष्य करतो . लग्न संस्था , बाजारपेठेचा नौकरीवर आणि नाते संबंधावर पडणारा प्रभाव आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे राजकारण . यस ! स्त्री -पुरुष संबंधा मधल राजकारण . एकमेकां पासून वाटणारी असुरक्षितता , 'लोक काय म्हणतील ?' हा पुराना गंड , लोकांसमोर दाखवावा लागणारा आनंदाचा मुखवटा , ज्याच्यासोबत आपण आयुष्य घालवतो त्याच्यासोबत राहून होणार suffocation या सगळ्या गोष्टी हा चित्रपट प्रभावी पणे मांडतो . चित्रपटात 'pretend ' शब्द वारंवार वापरला जातो . समझदार को इशारा काफी है . चित्रपट 'तिकडचा ' असला तरी भारतीय परिस्थिती मध्ये तितकाच चपखल ठरू शकतो . In fact हा जगाच्या पाठीवर कुठेही घडू शकतो . Bottom line is प्रत्येक शादी शुदा त्याने /तिने हा चित्रपट आवर्जून बघायला पाहिजे . Kudos to David Fincher

'एलिझाबेथ एकादशी' - कमाल चित्रपट आहे. पैसाच नव्हे तर आयुष्यातील वेळही वसूल ! नक्की बघा !!!

'एलिझाबेथ एकादशी' - कमाल चित्रपट आहे. पैसाच नव्हे तर आयुष्यातील वेळही वसूल ! नक्की बघा !!!

>>
मला वाटलेलंच Happy
कथा जराशी प्रेडिक्तेबल वाटतेय पण सिनेमा सुंदर असणार यात वाद नाही

Pages