'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही काही मुद्यांना काखा मारून युक्तीवाद चालू आहेत.

लव्हजिहाद यातला जिहाद हा स्वरूप संघटीत षडयंत्र दर्शवतो. इथे लिहीणा-यांचे म्हणणेही तेच आहे. संघटीतपणे मोहीम राबवणे या मुद्याच्या समर्थनार्थ एकही पुरावा , संदर्भ मिळालेला नाही.

धर्म बदलण्याबद्दलचे म्हणणे चुकीचे नाही. पण त्याची कारणमीमांसा मागच्या काही पोष्टीत झालेली आहे. काखा मारून सोयीच्या गोष्टींवर तेव्हढीच चर्चा चालू आहे. ब्रिटनमधल्या घटनेचा संदर्भ देण्यात आलाय. तिथेही लव्ह जिहाद बद्दल सरकारने काहीच म्हटलेले नाही. व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला, धर्मांतरणासाठी छळ असे गुन्हे झालेले आहेत, ज्याचा लव्ह जिहाद शी संबंध नाही असे म्हटले आहे.

आत्ता चाळीशीत असलेली पिढी टीनएजर असतांना मुस्लीम युवज हिंदू युवतींना फूस लावून पटवतात आणि त्यांच्या मुलिंना मात्र बुरख्याची जबरदस्त करतात यावरून तेढ माजवली होती. ती खेळी तेव्हां यशस्वी झाली होती. त्यात तथ्य होतंच. त्यावरून दंगली झाल्या आणि मुस्लीम समाजाला झोडपण्यात आले होते. त्यानंतर बहुसंख्य समाजात जितं ची भावना पसरली होती. ज्यांना समाधान वाटली ते काड्या टाकणारे होते. दंगलीत भाग घेनारे गोरगरीब होते. तेच पोलिसांचे बकरेही बनले. आता समाधान पाअलेल्यांची पुढची पिढी बक-यांच्या दुस-या पिढीला संघटीत गुन्हेगारीचा बागुलबुवा उभा करून उकसवत आहे. जे काड्या टाकताहेत त्यांनी स्वतः काय ती कारवाई करावी, त्यांना कुणीही अडवणार नाही हे वचन द्यायला कसलीही अडचण येणार नाही.

प्रश्न आहे तो मुलींच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा, त्याबद्दल कुणी अवाक्षरही काढत नाही. मुस्लीम समाजात हिंदू पत्नीलाच नाही तर मुस्लीम पत्नीलाही स्वातंत्र्य नाही आणि हिंदू समाजात देखील पूर्णपणे स्वातंत्र्य नाही. फक्त बुरखा घ्यावा लागत नाही एव्हढाच काय तो फरक.

>>फक्त बुरखा घ्यावा लागत नाही एव्हढाच काय तो फरक.>>>
खरंच?
किती सामान्य मुस्लिम मुलींंना ओळखता?
त्यांच्यावर किती बंधने आहेत हे आपण जाणू शकत नाही.
आणि आपल्याला बुरखा सोडूनही इतर किती स्वातंत्र्य आहे याची कल्पनाही करू शकत नाही.

किती सामान्य मुस्लिम मुलींंना ओळखता?

नो कमेंटस.
कारण :
१. पोस्टच्या उद्देशाशी संपूर्ण फारकत. चालू द्या.
२. तुम्हाला काहीच माहीती नाही (नसणारच) हा टोन.

मायबोलीवर पोस्टी टाकणारे काही पुरोगामी सोडले तर बायकांचं स्वातंत्र्य म्हणजे सोन्याचा पिंजराच आहे.

आपल्या घरी येणारी कामवाली, सकाळी शहर स्वच्छ करणा-या बायका, कचरा वेचणारे, हातावर पोटं असणारे, रिक्षावाले, दूधवाले, कष्टकरी, पूर्वीची बलुत्यांची कामं करणारे, शेतमजूर यांच्या बायकांना काय स्वातंत्र्य असतं ? अनेक ठिकाणी रात्री पिऊन येणारा नवरा, त्याची मारहाण, भांडणं हे सर्व असूनही त्याच्याबरोबर नांदणं याला स्वातंत्र्य म्हणत असतील तर आपल्याला खरंच काही कळत नाही. आजही हुंड्यांसाठी बळी जाणा-या बायका आहेत, खालच्या जातीतल्या मुलाशी लग्न केलं म्हणून मारहाण करणारे पालक, अजब शिक्षा देणा-या पंचायती, ऑनर किलिंगच्या प्रथा आणि गर्भात मुलगी आहे म्हणून पाडून टाकण्याचे आदेश देनारे घरवाले याला स्वातंत्र्य म्हणत असतील याची कल्पना नव्हती. असोच.

( इथं नमूद केलेल्या वर्गवारी आठवल्या तशा दिल्यात. इतर वर्गात सगळं आलबेल आहे असं म्हणायचा उद्देश अजिबात नाही. नाहीतर जे मिसिसंग आहे त्यावरून पुन्हा छेडछाड व्हायची... Proud )

आश्चिगच्या अंधश्रद्धा या धाग्यावर नुकतीच आलेली लंबीचौडी हिंदी पोस्ट वाचून झाली. शंभर टक्के सहमत आहे. भारतातले सर्व मुसलमान हे काही परकीय नाहीत आणि जे मूळचे इथले आहेत ते सगळेच बाटवल्याने मुस्लीम झालेले नाहीत.

पुर्‍वी असलेल्या जाचामुळे अनेक लोक स्वतःहून मुस्लीम झाले असण्याची शक्यता जास्त आहे. सती सारखी प्रथा आणि बुरखा यांची तुलना केली तर बुरखा परवडला असं म्हणायची वेळ येईल (सतीची प्रथा इंग्रजांच्या राज्यात आणि सुदैवाने इकडे काही सुधारक निपजल्याने नष्ट झाली. परकीय (विवेकी) राज्य आणि सुधारक या युतीने हे शक्य झालं). मुस्लिमांमधे देखील काही सुधारक निपजले. पण प्रमाण कमी आहे. अर्थात वर्णव्यवस्था, अस्पृश्यता अशा प्रथा मुस्लिमांमधे नव्हत्या आणि नाहीत. हिंदूंमधली वर्णव्यवस्था तिकडे जाऊनही कायम राहीली असली तरी मुस्लीम म्हणून त्यांच्यात ब-याच अंशी एकोपा आहे.

तारा सहदेवची केस जरा वेगळी आहे.

रंजित सिंह नाव्याच्या ज्या माणसाशी ताराने लग्न केले त्याची आई मुस्लीम होती व बाप हिंदू होतो. आता तुम्हीच सांगा आपण बापाचा धर्म धरतो की आईचा?
रंजित सिंह लहान असताना बापाचे निधन झाल्यामुळे आईनी माहेरच्यांची(मुस्लीमांची) मदत घेत त्याचे पालन पोषण केले. म्हणजे मुस्लीम समाजानी एक हिंदू मुलाच्या जडण घडणीसाठी हातभार लावला. आईकडच्या लोकांशी चांगले संबंध असणे ओघाणे आलेच.. म्हणजे तो मुस्लीम झाला असा अर्थ काधायचा का? आई वडलानी आंतर्धर्मीय प्रेमविवाह केला यात पोराची काय चूक? त्याची आई लग्ना आधी मुस्लीम होती पण नंतर तिनीही धर्मांतर करुन हिंदू बनली.

तारा नावाची शूटरबाई नव-याची आई मुस्लीम होती हा धागा धरुन नव-याला मुस्लीम ठरवायला निघाली हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. नव-याच्या बापाच म्हणजे ताराबाईच्या सास-याचं खानदान कोणतं यावर जरा बोला म्हणा, म्हणजे कळेल की तो (नवरा) हिंदू आहे की मुसलमान.

आता कोणी म्हणले की मग त्याचं नाव रकिबूल कसं का?
अरे मामा लोकं प्रेमाणे लहाणपणापासून त्या नावानी बोलवत असतील... त्यात काय. आपल्याकडे नाही का शाळेत एक नाव, घरी एक नाव. अगदी तसंच. त्याच्या मामांना सुद्धा तो अधिकार आहेच की.

@ हतोडावाला

त्याने दिलेली कागदपत्रं खोटी आहेत असा दावा सुरू आहे. त्याचे वडील हिंदू असतील तर त्याने धर्मांतराचा आग्रह का धरला हे कळत नाही. हल्ली अशा केसेसचा फारसा विचार करत नाही आणि अपडेट्सही ठेवत नाही. तारा सहदेव ची कुचंबणा होत असेल तर ते ही योग्य नाही. न्यायालय आहेच खरं खोटं ठरवायला. अर्थातच लव्ह जिहाद चे हारे देण्याच्या वेळीच हे प्रकरण प्रकाशात आलेले आहे आणि युपीच्या राजकारणावर भगव्यांचा डोळा आहे हे डोळ्याआड करूनही चालत नाही.

गण्या. राव:
मायबोलीवर पोस्टी टाकणारे
काही पुरोगामी सोडले तर बायकांचं
स्वातंत्र्य म्हणजे सोन्याचा पिंजराच आहे.
आपल्या घरी येणारी कामवाली, सकाळी शहर
स्वच्छ करणा-या बायका, कचरा वेचणारे,
हातावर पोटं असणारे, रिक्षावाले, दूधवाले,
कष्टकरी, पूर्वीची बलुत्यांची कामं करणारे,
शेतमजूर यांच्या बायकांना काय स्वातंत्र्य
असतं ? अनेक ठिकाणी रात्री पिऊन
येणारा नवरा, त्याची मारहाण, भांडणं हे सर्व
असूनही त्याच्याबरोबर नांदणं याला स्वातंत्र्य
म्हणत असतील तर आपल्याला खरंच काही कळत
नाही. आजही हुंड्यांसाठी बळी जाणा-
या बायका आहेत,
खालच्या जातीतल्या मुलाशी लग्न केलं म्हणून
मारहाण करणारे पालक, अजब शिक्षा देणा-
या पंचायती, ऑनर
किलिंगच्या प्रथा आणि गर्भात मुलगी आहे
म्हणून पाडून टाकण्याचे आदेश देनारे घरवाले
याला स्वातंत्र्य म्हणत असतील
याची कल्पना नव्हती.
>>>>>>>

तुम्ही हे जे काही म्हणत आहात, मुस्लिम बंधूंमध्येही तो प्रकार आहे.
कामवाली, कचरा वेचणारी स्त्री मुस्लिमही असू शकते.
पुरोगामी मुस्लिम वगळता आजही मुस्लिम स्त्री उच्च शिक्षण नाही घेऊ शकत.
कोणत्या स्त्रीला आपला पती सवतीशी वाटून घ्यायला आवडत असेल ?
शिया, सुन्नी तर सोडाच, अहमदी, बरेलवी, खोजा, नवाबी, सिद्दीकी यांमध्येही रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत. सरळ त्यांची हत्या केली जाते. आणि याची पोलिस तर सोडाच, नाव खराब होऊ नये म्हणून समाजाबाहेरही वाच्यता होत नाही.
तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या पिठीत हुंडा हा प्रकार केव्हाच नष्ट झालाय. पण मुस्लिम समाजात अजुनही हा प्रकार आहे.

पोस्ट कळत नसेल तर समजावून सांगण्याचा आग्रह तुम्हीही धरलेला नाही आणि तितका वेळही नाही. तुम्हाला किमान १८ लोकांचं समर्थन मिळेल याची खात्री आहे.:फिदी:

त्याने दिलेली कागदपत्रं खोटी आहेत असा दावा सुरू आहे.>> नाही. कोर्टात दिलेले बयान व रिसेंट बातमी नुसार तो हिंदू बापाची औलादच आहे. फक्त बाप वारल्यामुळे आईकडच्या (म्हणजेच मुस्लीम) नातेवाईकांच्या प्रभावात त्याची वाढ झाल्यामुले हा सगळा आरोप होतो आहे. मेडियानी तर अशीही बातमी दिली की तो जन्माने हिम्दूच आहे पण २००७ मध्ये धर्मांतर केले.

कोर्टात दूध का दूध व पानी का पानी होईलच (पुढील तपास सुरु आहे).

बाकी काही असो पण तो जन्माने हिंदू आहे यावर मात्र कोर्टात शिक्कामोर्तब झाले आहे.

रांचीचे एसएसपी तपासाअंती असे म्हणतात की पोलिसानी आता पर्यंत केलेल्या तपासात त्यानी मुस्लीम धर्म स्विकारल्याचे पुरावे मिळालेले नाही. त्यामुळे रंजीत हा हिंदूच आहे. आईमुळे इस्लामचा प्रभाव असणे नैसर्गिक असून तेवढ्यामुळे त्याला मुस्लीम ठरविणे चूक ठरेल.

ओके.

शबाना, पेपर वाचत जा जरा.
गेल्या आठवड्यात सकाळ मध्ये आलेली बातमी. national level ची शूटर असणार्या तारा ला एका माणसाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यावेळी त्याने तो मुसलमान आहे हे उघड केलं नाही. स्वतःच नाव हिंदू सांगितलं . आपल्या हिंदू आईवडिलांना तिला भेटवल . आणि लग्न झाल्याच्या दुसर्या दिवशी तो हिंदू नसून मुसलमान आहे हे उघड केलं . आणि मग तिने मुसलमान व्हावं म्हणून तिचा छल केला. मारणं, उपाशी ठेवणं, कोंडून ठेवणं इत्यादी .
love जिहाद ची procedure अशी आहे . आधी हिंदू भासवून हिंदू मुलींना फसवायचं आणि मग जबरदस्तीने त्याचं धर्मांतर करायचं

>>>>>>>>>>>>>

हे अर्थातच वाचलेय,
सेलिब्रेटी असल्याने निदान उजेडात तरी आली हि केस .. पण त्यातूनही पुढे काय ... मग सामान्य जणांचे बोलायलाच नको ..

मुस्लीम समाजात हिंदू पत्नीलाच नाही तर मुस्लीम पत्नीलाही स्वातंत्र्य नाही आणि हिंदू समाजात देखील पूर्णपणे स्वातंत्र्य नाही. फक्त बुरखा घ्यावा लागत नाही एव्हढाच काय तो फरक.

>>>>>>

एक प्रश्न -

कतरीना कैफ हि मुस्लिम नटी आहे ना?
तिला कशी नाही बुरख्याची सक्ती?
(याउलट चित्रपटांमध्ये ती कित्येकदा तोकड्या कपड्यांतच दिसते, बिकीनी घालूनही दिसते.)

कोणीही उत्तर दिले तरी चालेल.

मुस्लिम असूनही हिंदू नाव सांगून हातात गंडे माथ्यावर टीका लावून मुलींना फसवणे हे लव जिहाद नाही का ??
मुलींना प्रेमात फसवून लग्नाच्या आधीच शारीरिक संबंध ठेवून नंतर त्यांना पूर्ण जाळ्यात घेऊन धर्मपरिवर्तन करवणे ह्याला काय म्हणावे ?
लग्न होईपर्यंत कुठल्याही पद्धतीने मुलीला कळू न देणे कि तो कुठल्या जातीचा आहे हे काय प्रकरण असते ब्वा ?
पूर्वी लग्न झालेले असूनही किती मुलांचा बाप असूनही हिंदू मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करणे ह्यामागचे कारणं काय असावीत अस वाटतंय ?

आणि कोण म्हणतं पुरावे नाहीयेत … सबळ पुरावे आहेत … इकडे तिकडे कुठेही शोधाल तर हजार मिळतील आम्हाला मानायचेच नसेल तर कुणी काहीच करू शकणार नाही … मघाशी कुणीतरी म्हणालच झोपलेल्याला उठवता येते सोंग घेणार्याला नाही … पुरावा समजायला आपल्या घरीच घडावं असं काही नसतं ज्याच्यासोबत हे घडलंय त्याचं दुःख कमी नसतं … मुंबईत बॉम्बब्लास्ट झाला आणि माझ्या गावात नाही म्हणजे बॉम्ब बिंब सगळं बोंबाबोंब आहे अस नाहीये हो… कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं मुसलमानांचा इथे कित्तेकांना आलेला पुळका पाहून.

हर मुसलमान आतंकवादी नही होता पर हर आतंकवादी मुसलमानही होता है.

जो जीव देऊन 'जिहाद' पाळतो त्या संस्कारांना प्रेम देऊन जिहाद पाळायचा आहे ते अधिक सोप्प जातं त्यांना एकाचे हजार उतरतात अश्या जिहाद साठी … अल्लाची मर्जी समजून

माझ्याकडे दिव्य कुरआन आहे. उद्या त्यातील संबंधित उतार्‍यांचे फोटो येथे देऊ शकेन.

त्यात किमान तीन ते चार ठिकाणी असे स्पष्टपणे म्हंटलेले आहे.

'जो अल्लाह मानत नाही तो काफिर आहे. काफिराला अल्लाह मानायला लावणे ही अल्लाहची भक्ती आहे. काफिराने अल्लाहला मानावे ह्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणे हे सच्च्या मुसलमानाचे कर्तव्य आहे. जगातील काफिर नष्ट करणे हेही कर्तव्य आहे. मुसलमान धर्म सर्वांनी पाळावा ह्यासाठी आयुष्य जगणे हेही कर्तव्य आहे'

ह्या व अश्या वाक्यांचा खरा अर्थ वेगळा आहे. जो मुसलमान म्हणून जन्मलेला आहे पण अल्लाह मानत नाही किंवा प्रथा पाळत नाही त्याला योग्य वाट दाखवणे असे त्यातून खरे तर अभिप्रेत आहे.

मात्र (सच्च्या?) मुसलमानांनी ह्याचा अर्थ वेगळा घेतलेला कित्येकदा दिसतो. जो मुळातच दुसर्‍या धर्मात जन्मलेला आहे त्यालाही अल्लाहला मानायला लावणे व कोणत्याही प्रकारे ते घडवून आणणे असा तो अर्थ!

खरी मेख इथे आहे.

लव्ह जिहाद ही राजकीय खेळी आहे हे विधानसुद्धा मला तितकेसे शुद्ध वाटत नाही.

-'बेफिकीर'!

टीप - माझा वरील प्रतिसाद हा मुस्लिमद्वेष मुळीच नाही. तसेच, तो मुस्लिमद्वेष आहे असे वाटल्यामुळे मी कट्टर हिंदूत्ववादी आहे असा निष्कर्षही घाईघाईने काढला जाऊ नये. मुळातच तो मुस्लिमद्वेष नाही आहे. मला मुस्लिमांच्या पुरातन काळापासून चालत आलेल्या संस्कृतीबद्दल 'कुतुहल' आहे ('आकर्षण' नव्हे). हे कुतुहल असण्याचे कारण गझलेचा अभ्यास हे आहे. अनेक मुस्लिमांच्या स्वभावातील दिलदारता, कला, ठाम भूमिका घेण्याचे धैर्य, शौर्य, प्रेमविषयक भावभावनांमधील सूक्ष्म बारकाव्यांवर झालेले काव्य हे सर्व काही मला आवडते. मात्र आतंकवाद आणि मुस्लिम हेही नाते काही नवीन नाही. धर्मप्रसारासाठी इतर धर्मीयांचे केलेले हाल, शोषण आणि मुस्लिम हेही नाते नवीन नाही. तेव्हा विपर्यास करण्यापूर्वी कृपया ही टीप विचारात घेतली जावी.

-'बेफिकीर'!

संघटीत व सुनियोजित कारस्थान इथपासून ते वैयक्तीक पातळीवर फूस लावून पळवणे व धर्मांतरासाठी सक्ती करणे या मागे मांडलेल्या मुद्यावर चर्चा आली हे ही नसे थोडके. वैयक्तीक पातळीवरच्या प्रकारांना या धाग्यावर कुणीही विरोध केलेला नसल्याने त्याचे पुरावे देणे हा कालापव्यय आहे. ज्याचे पुरावे मागितले आहेत ती पोस्ट अजूनही या धाग्यावर आहे.

बेफिकीर यांच्या प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत नसलो तरी प्रतिसादामागची भावना प्रामाणिक आहे.

अकबर, सिकन्दर और मौलवि

वर्ण व्यवस्था की व्यथा से पीड़ित भारत वर्ष कैसे-कैसे सुवर्ण समय खो चुका है। देखिए-एक बार अकबर बादशाह ने बीरबल से कहा कि मैं हिन्दू धर्म को पसन्द करता हूँ, मुझे हिन्दू बना लो। बीरबल इस युक्तियुक्त बात को सुनकर सन्न रह गया; क्योंकि उसके दिमाग़ में हिन्दुओं की वर्ण व्यवस्था अड़ी हुई थी। मन ही मन सोचता रहा। एक दिन बादशाह की सवारी यमुना के पास से निकल रही थी। बीरबल को मजाक सूझा। एक गधी को पकड़ कर यमुना के तट पर ले गया और खूब मल-मल कर स्नान कराने लगा। इस विचित्र कार्य को देखकर अकबर पूछने लगा कि यह क्या हो रहा है। बीरबल ने उत्तर दिया कि इस गधी को स्नान कराकर गाय बना रहा हूँ। बादशाह ने हँसकर कहा कि कहीं गधी से गाय हो सकती है। बस-बीरबल ने मौका समझ कर झट उत्तर दे दिया ‘‘तब मुसलमान भी हिन्दू कैसे हो सकता है?’ बादशाह चुपचाप चला गया। बीरबल के इस मजाक ने भारत का तख़्ता पलट दिया। यदि अकबर हिन्दू हो जाता तो भारत को औरंगजेबी अत्याचारों का सामना न करना पड़ता और नादिरशाही जमाना न देखना पड़ता। परन्तु भारत ने तो वर्ण व्यवस्था का महान् विध्वंस भुगता था। आज के दक़ियानूसी हिन्दुओं की वही मनोवृत्ति है। आज भी गाय गधी वाली युक्ति भारत के कोने-कोने में पुराण पन्थी लोग दे रहे हैं। इन अल्पज्ञों को पता नहीं है कि यह युक्ति तर्क शास्त्र के ही विरुद्ध है। देखिए-गाय और गधी की जाति भिन्न है परन्तु मुसलमान और हिन्दू की जाति भिन्न नहीं है। मुसलमान और हिन्दू दोनों मनुष्य जाति के हैं। फिर गाय गधी का दृष्टान्त कैसे लागू हो सकता है। प्रयोजन यह है कि बारम्बार कहने पर भी वर्ण-व्यवस्था के पोषक बीरबल आदि हिन्दुओं ने अकबर को हिन्दू नहीं बनाया। तो भी अकबर हिन्दू प्रेमी रहा और दोनों कौमों के साथ समान भाव से निष्पक्ष व्यवहार करता था। परन्तु पश्चात् औरंगजेब की पक्षपातिनी पद्धति ने हिन्दुओं को खूब पद दलित किया और वर्ण व्यवस्था का कड़वा नींबू खूब चुसाया।

इसी प्रकार 16वीं शताब्दी में सिकन्दर नामी एक बादशाह जो ला मजहब था, काश्मीर पर चढ़ आया और वहाँ के हिन्दुओं पर अपना अधिकार कर लिया। कुछ काल बाद वह काश्मीर के ब्राह्मणों को देख कर अत्यन्त प्रसन्न हुआ और उनसे हिन्दू धर्म में दीक्षा लेने के लिए कहा। उस समय भी वर्ण व्यवस्था के पोषक उन मूर्ख ब्राह्मणों ने उसकी हार्दिक इच्छा को अनसुना करके टाल दिया। पश्चात् सिकन्दर बादशाह ने मौन तो धारण कर लिया परन्तु हृदय में उसने प्रतिज्ञा कर ली कि कल सूर्योदय होते ही पहिले पहिल जिसका मुख देखूँगा-उसी के मजहब को स्वीकार कर लूँगा। यह बात बुलबुलशाह नामी फकीर को किसी प्रकार ज्ञात हो गयी। फलतः वह सुबह होते ही राजमहलों में पहुँच गया और बादशाह सिकन्दर ने स्वभावतः बुलबुलशाह नामी मुसलमान फ़कीर के दर्शन कर लिये और उसी दिन उसने घोषणा करवा दी कि आज से मैं मुसलमान हो गया हूँ। अब मैं सच्चे मजहब वाला हूँ। ला मजहब नहीं रहा हूँ। इतना होने पर भी उसके बाल बच्चे हिन्दू धर्म की तरफ़ ही झुके रहे। सौभाग्य से सिकन्दर की एक स्वरूपवती युवती कन्या भी थी। उसका विवाह भी वह किसी हिन्दू ब्राह्मण के साथ करना चाहता था। खोजने पर सोहाभट्ट नामक एक ब्राह्मण तय्यार हो गया। सिकन्दर ने अपनी कन्या का विवाह सोहाभट्ट से कर तो दिया-परन्तु वर्ण व्यवस्था के ठेकेदारों ने बड़ा कोहराम मचा दिया। धर्म की दुहाई, शास्त्रों की दुहाई और ब्राह्मणत्व की दुहाई देने लगे। सिकन्दर ने उसको अपना मन्त्री बना लिया और ब्राह्मणों से अनेक बार प्रार्थना की- इन दोनों के विवाह को आप लोग हिन्दू शास्त्रों के अनुसार नियमित करा दीजिए। परन्तु वहाँ तो हिन्दुओं का मुख्य धर्म शास्त्र ‘मनुस्मृति’ माना जाता था। भला मनुस्मृति हिन्दुओं को संगठित कैसे होने देती। इसको जबतक भस्मसात् न किया जाएगा भारत उठकर खड़ा ही नहीं हो सकता। जब स्वामी दयानन्द जैसे कट्टर सुधारक भी मनुस्मृति के मोह को न छोड़ सके तब और कौन इसकी पकड़ से भारत को मुक्त करेगा? बस, मनुस्मृति के मानने वाले ब्राह्मणों की मूर्खता के कारण सोहाभट्ट कट्टर मुसलमान बन गया। मन्त्री तो वह था ही-उसने सिकन्दर को सलाह दी कि काश्मीर मुसलमानों के लिए है, काफ़िर हिन्दुओं के लिए नहीं। फिर क्या था-बादशाह ने मनमानी करने की आज्ञा दे दी। सोहाभट्ट ने डट कर हिन्दुओं के मन्दिर तुड़वाये। सोने चाँदी की देव मूर्तियों को पिघलवा कर उनके सिक्के ढलवा लिए। यहाँ तक ही हो जाता तो बस था-सोहाभट्ट ने मुसलमान सैनिकों द्वारा सैकड़ों ब्राह्मणों को पकड़वाया और झेलम नदी के किनारे ‘बट-मजार’ नामक चबूतरे पर खड़ा किया। जिन्होंने इसलाम को स्वीकार कर लिया उनको तो छोड़ दिया गया, बाकी ब्राह्मणों को बोरों में भरवा कर झेलम नदी के गहरे पानी में डुबवा दिया गया। यह स्थान आज तक बना हुआ है। काश्मीर जाने वाले इस स्थान को देखकर खून के आँसू बहाते हैं। यह स्थान ‘बट मंजार’ नाम से प्रसिद्ध है। बट का अर्थ है ब्राह्मण और मजार कहते हैं कब्र को-अर्थात् ब्राह्मणों की कब्र। कहिए इस पिशाचिनी वर्ण व्यवस्था ने क्या-क्या गुल नहीं खिलाए। यदि मनुस्मृति की वर्ण व्यवस्था का विध्वंस करते हुए ब्राह्मण लोग सोहाभट्ट को अपना लेते तो आज काश्मीर जैसी स्वर्ग भूमि में 95 प्रतिशत म्लेच्छ (मुसलमान) क्यों होते? काश्मीर के ब्राह्मण पाण्डे के बाण्डे क्यों बनाए जाते? पे की जगह बे हो गया। बस-एक अक्षर के बल पर गोरक्षक से गोभक्षक बन गए। फलतः आज सारा काश्मीर मुसलमानों से भरा है। सौभाग्य से गो हत्या काश्मीर में नहीं होने पाती। यह एक ग़नीमत है-नहीं तो वर्ण व्यवस्था के पोषक उन अदूरदर्शी ब्राह्मणों की कृपा से काश्मीर में सबसे अधिक गोहत्या होती; क्योंकि काश्मीर के सौ में सौ ब्राह्मण भी मांस भक्षी हैं। तो भी कौन उनका ब्राह्मणत्व छीन सकता है?

और सुनिए-भारतवर्ष की वर्ण व्यवस्था और छुआछूत का पता पाकर योरप के पादरी लोगों ने बड़ी प्रसन्नता मानी। कई सौ वर्ष पूर्व पुर्त्तगाल से डी रौवर्ट नौवली नाम का एक पादरी मद्रास प्रान्त में पहुँचा। आते ही उसने कपड़े रँग कर संन्यासी का भेष धारण किया। उस कपटी संन्यासी की वेषभूषा को देखकर लगभग 300 ब्राह्मण उस पादरी के पिछलगुवे बन गये। यह भी तो एक मूर्खता थी कि अनजाने ही किसी के पीछे लग जाना। उस कपट-पादरी ने सबको पानी पिलाया। अब उसने एक विराट सभा का आयोजन किया-जिसमें सभी पेशों के लोग अधिक संख्या में उपस्थित थे। तब उस कपट-संन्यासी ने उठ कर कहा कि मैं वास्तव में पादरी हूँ-मेरा नाम नावली है। ये सभी लोग मेरे चेले हैं और इन्होंने मेरे हाथ से पानी पी लिया है। बस-विराट् सभा में गड़बड़ पड़ गई। अन्त में वहाँ के पण्डितों ने व्यवस्था दे दी कि अब ये लोग पुनः हिन्दू धर्म में सम्मिलित नहीं हो सकते। बेचारे सारे यों ही ईसा मसीह की भेड़ों में शामिल कर दिए गये। उन्होंने बड़ी प्रार्थनाएँ कीं-परन्तु एक न सुनी गई। उनकी बिरादरी वालों ने जात से निकाल दिया। हुक्का पानी बन्द कर दिया। यह है वर्ण व्यवस्था का विकराल कृत्य-जिसने भारत का गारत कर दिया है। वास्तव में वर्ण व्यवस्था न होती तो आज मद्रास में आर्य धर्म की ध्वजा फहराती होती। कौन बुद्धिमान् है जो ऐसी घटनाओं के बाद भी वर्ण व्यवस्था का विध्वंस करने के लिए कमर न कसेगा?

<<<<धर्मांतरविरोधी काड्या करण्यापेक्षा, लोकांना धर्मांतरण करून हिंदू का करून घेत नाही आपण? न रहेगा बांस न बजेगी बांसरी! >>>
हिंदू करून घ्यायचे म्हनजे काय करायचे? .म्हनजे कुठल्या जातित घ्यायचे ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य कि शूद्र.
कुन्हाला जर ब्राह्मण व्हायच असेल तर काय विधि आहे .आनि जर क्षत्रिय ९६ कुळी मराठा व्हायच असेल तर काय
विधि आहे शूद्र व्हायला कुनालाच आवडनार नाहि.मुस्लिमनि हिंदु होउन हिंदु...............काय जात लावायचि?.

हिंदू करून घ्यायचे म्हनजे काय करायचे? .म्हनजे कुठल्या जातित घ्यायचे ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य कि शूद्र.
कुन्हाला जर ब्राह्मण व्हायच असेल तर काय विधि आहे .आनि जर क्षत्रिय ९६ कुळी मराठा व्हायच असेल तर काय
विधि आहे शूद्र व्हायला कुनालाच आवडनार नाहि.मुस्लिमनि हिंदु होउन हिंदु...............काय जात लावायचि?.

>>>>>>>>>>

उत्तर तुमच्या प्रश्नातच आहे.
हिंदू धर्मातील सर्व जातीयव्यवस्था मोडीत काढून संघटित असा एकच हिंदू धर्म बनवायचा.

हे वरती अनेकांनी जे प्रवचन सांगीतल ते सर्व ठिक आहे, पण ऐकशे बेचाळीस प्रतिक्रीयां देणार्‍यातील एकानेही धागाकर्तीच्या >'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी< या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही.

सावरकर काय म्हणायचे ?
<<
<<
आता सावरकरांना कशाला या चर्चेत आणताय.

Pages