'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदय, आपण रक्ताच्या नात्यात लग्न केल्याने येणारे कॉम्प्लिकेशनबद्दल बोलत आहात का?
मला आलेली शंका वेगळी किंवा नेमकी उलट आहे. मानवा-मानवांमधील संकरित अपत्य असे म्हणू शकता. कदाचित नक्की मांडता आले नसेल.

तुमचे इथले बोलणे वाचून, तुम्ही बावळट आहात, की साळसूद, असा प्रश्न उत्पन्न होतो. इमानदारीत या प्रश्नाचे उत्तर दिल्यास पुढील ट्यूशन फ्री घेण्यात येईल.

जर्सी गाय प्लस खिल्लारी बैल असला संकर तुम्हाला माणसांत अपेक्षित असेल तरी तसेही लिहा. पण त्यात स्पेसिफिक गुण असतात. जर्सी दूध जास्त देते अन खिल्लारी इथले लोकल असल्याने त्यांना इथल्या चार्‍याची सवय, अन आजारांना इम्युनिटी असते इत्यादी. याचा लव्ह जिहाद नामक बिण्डोकपणाशी काय संबंध, तेही सांगा.

तुमची बाया लॉजी कच्ची असल्याचं वरती लिहिलं आहेच तुम्ही आधी.

बावळट = naive या अर्थाने लिहिले आहे.
निरागस असेही याचे भाषांतरण होऊ शकेल. वर बावळ्ट टंकले गेले, ते तसेच ठेवलेले आहे.

हो लव जिहाद २००% खरे आहे. भारताला कीड लागलीये हि. हे जे काही चाललंय हे आटोक्यात आलं नाही तर काही वर्षात अनर्थ होईल. काही दिवसा आधी माझ्या सामाजिक कार्याच्या निमित्त्याने आम्ही महिला बाल सुधार गृहात गेलो होतो. तिथे १४ वर्ष ते १८ वर्षाच्या वयोगटातल्या एकएका मुलीचे उदाहरण ऐकले तेव्हा मी शॉक झाले होते. ह्या मुली आजही त्या (मुस्लिम) मुलांच्या प्रभावाखाली आहेत. त्या हिम्प्नोटाईज झाल्या सारख्या वागतात आजही…. त्या मुलासाठी वेड्या होतात पण लहान पणापासून संस्कारात वाढलेल्या ह्या मुली आज काहीच दिवसात त्यांच्या पालकांची अतिशय चीड करतात. तिथे असणार्या दोन मुलींनी त्यांच्या वडलांवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले. एका मुलीने जिने कधी एक शब्दही मोठ्याने बोलला नव्हता ती वडलांना घाण शिवी देऊन आई वडिलांना धमकी देते एसिड फेकेन अंगावर म्हणून. आई वडिलांशिवाय राहू न शकणाऱ्या मुली त्यांना आज समोर उभे सहन करत नाही … या मुलींना सोडवले गेले तेव्हा त्यांना अतिशय वाईट परिस्थितीतून त्या मुलांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या तावडीतून सोडवले होते पण आज त्या मुली त्याच ठिकाणी जाण्यास तडफडतात. इतक्या बेचैन होतात कि वेळी अवेळी वोइलेटं होतात. कधीही न ऐकलेल्या घन शिव्या घालतात.

आमच्या घराजवळची एक १६ वर्षांची मुलगी मध्ये एका मुस्लिम लोहालोखंड-रद्दी विकणाऱ्या रस्त्यावरून ठेला घेऊन फिरणाऱ्या काळाकुटट घाणेरड्या मोठ्या वयाच्या माणसासोबत पळून गेली. हा माणूस एका आठवड्यात फक्त एकदा यांच्या घरी आला होता रद्दी घ्यायला आणि एका साधारण मध्यमवर्गीय ब्राम्हण संस्कारी परिवारातली लहान वयातली मुलगी त्याच्या प्रेमात वेडी झाली. एवढेच नाही तर तिला परत घ्यायला गेलेल्या तिच्या वडिलांवर तिने पोलिसात जाउन अत्यंत वाईट आरोप लाऊन केस टाकली.

हे सगळं काय आहे? का होतंय माहिती नाही पण जे काही होतंय ते अत्यंत वाईट आहे एवढे नक्की

मयी,
डिड यू कन्सिडर चान्सेस ऑफ द चाईल्ड्स सेंटिमेंट्स बिइंग जेन्युइन? आपण तो लैंगिक शोषणाचा एपिसोड पाहिलात का कधी?
१३० कोटी लोकसंख्येच्या भारतात चाईल्ड अ‍ॅब्यूजचे प्रमाण किती? याचा विचार केला का? मेबी, दे आर रेबेलिंग अगेन्स्ट समथिंग बॅड दॅट हॅज हॅपन्ड टू देम.
माईंड यू,
"लव्ह जिहाद" ही जी काय कन्सेप्ट टाऊट केली जातेय ती अत्यंत विकृत अन घातक आहे असेच माझेही मत आहे.

त्यापुढे एक 'पण' आहे, त्यात,
"माईंड कंट्रोल करणारी औषधे, अन काळी जादू वापरून मुलींना फितवले जाते", ही कन्सेप्ट येते, जी माझ्यातरी डोक्यावरून जाते.

कारण, माईंड कंट्रोल करणार्‍या औषधांचा अभ्यास करणे हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे. अन काळी जादू अक्षरशः थापालॉजी आहे, असे माझे मत आहे.

असो. बाकी चालू द्या.

काळी जादू असा कुठेही शब्दप्रयोग मी केलेला नाहीये नाही. हिप्नोटाईज बोलले मी. हिप्नोटीज्म हि कुठलीही अंधश्रद्धा नाही ते एक स्वतंत्र शास्त्र आहे. राहिला प्रश्न लैंगिक अत्याचारांचा तर मी मागल्या १२ वर्षांपासून महिलांच्या समस्यांसाठी काम करते आहे तेव्हा मला ते उत्तम प्रकारे माहिती आहे. प्रश्न हा आहे कि प्रत्येक मुलगी सारखीच कसकाय वागू शकते. १६ वर्ष ज्या पालकांसोबत हसत खेळत सुंदर आयुष्य घालवले ते एखाद्या आणि विशेषतः अश्या विशिष्ट मुलांना भेटून एक दिवस झालेला नसतांनाही त्यांच्या इतका ड्रास्तिक चेंज कसकाय येतो. आई आणि वडील किंवा पालकांपैकी कुणालाही समोरही न सहन करण्या इतका राग एकादिवसात कसा निर्माण होतो ? पूर्वी कधीही फारसा आवाज न उचलणाऱ्या मुली अचानक वाइलंट कश्या होऊ लागतात. एखाद्या विशिष्ट धर्माच्या इतक्या अधीन कसकाय होतात. कालपर्यंत होत्या तश्या न राहता इतक्या कश्या बदलतात. १६ वर्षांची मुलगी फारच नासमज नसते हो … तरीही दुप्पट वयाच्या घाणेरड्या रद्दी विकणाऱ्या सोबत एका दिवसाच्या ओळखीत कसकाय पळून जाऊ शकतात. …. आणि त्याच एका विशिष्ट धर्माच्या मुलांसोबतच पळून गेलेल्या मुली एकसारख्याच कसकाय वागतात. …. आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न होतात न इतरही तिथे जाणार्या मुली त्यांच्या पालकांना मानाव्ण्याचे प्रयत्न करतांना दिसतात पालकांवर आरोप लावून किंवा त्यांना धमकी देऊन उग्र होऊन त्यांना स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत.

काळी जादू म्हणे … विषयाला उगाचच वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करून ते थोपवण्याचा प्रयत्नही करू नका …. कारण मी जे बोलतेय त्याला प्रमाण आहे उगाच फेकत नाहीये. १००% खरे जे घडलंय ते सांगतेय.

ईब्लिस, ते विषयांतर होते, त्याचा लवजिहादशी संबम्ध नव्हता, नाहीये. सहज प्रश्न पडला तर विचारला. जर्सी गाय प्लस खिल्लारी बैल हे आपले उदाहरण त्या अनुषंगाने बरोबर वाटतेय. माझे या विषयातील ज्ञान जेमतेमच असल्याने या केसमध्ये बावळट बिनडोक अज्ञानी काहीही म्हणू शकता Happy

मयी,
शॉकिंग आहे Sad

ईब्लिस,
माईंड कंट्रोल वा काळी जादू नसेल आणखी काही असेल. या केसमध्ये लैंगिक शोषण आणि लव्ह जिहाद हा योगायोग कसा जुळून आला याचाही विचार करा. कि ते लव्हजिहाद वाले युवक लैंगिक शोषण झालेल्या मुलींच्या मदतीला धावून येतात असे म्हणायचे आहे?

नुसत्याच बातम्यात सांगतात ते खरय अस नसतं. ग्राउंड लेवलला उतरून त्यांच्यात शिरून काम केलं कि लक्षात येतं बघा कधीतरी शक्य असेल तर मुलींच्या बालसुधार गृहात जाउन त्यांच्या कहाण्या ऐका. तिथल्या मुलींना बघून या. ज्या मुलींसोबत हे सर्व घडलंय त्यांच्या पालकांशी बोला एकदा. त्यातले गांभीर्य कळले तर बोबडी वळेल आपली इतकं भयंकर पद्धतीने हे पसरत गेलंय आणि त्याचं स्वरूप फार विक्राळ होत चाललंय … यावर आळा बसने गरजेचे आहे.

लैंगिक शोषण हे जसे स्त्री भृणहत्या अश्या गंभीर समस्येला कारणीभूत ठरतंय तसाच पुढे भविष्यात हे जे काही घडतंय हे सुद्धा कारणीभूत ठरेल…. असे प्रकरण घडणार असतील तर मुलगीच नको कोण सांभाळत बसेल जपेल इतके आटोकाट असे विचार निर्माण होतील. तसे संकेत सुद्धा दिसू लागले आहेत समाजात. हे प्रकरण दिसतंय त्याहूनही अधिक गंभीर आहे

ग्राउंड लेवलला उतरून त्यांच्यात शिरून काम केलं कि लक्षात येतं
<<
अंडरग्राउंड लेवलवरून नमस्कार Happy
बिल झालं तुमचं.
बाय.

मयी..
मीसुद्द्धा असला प्रकार पाहिला आहे.
एका सुसंस्कृत घरातील आर्किटेक्ट मुलीला एका विवाहित बिहारी मुस्लिम टेलरच्या प्रेमात पडलेले पाहिले आहे मी. एक अशी मुलगी जिच्या सोज्वळपणाचा आम्ही सगळेच आदर करायचो ती अशा व्यक्तिशी लग्न करायला निघावी हे पचायला खरच खुप जड जातं. तिच्या परीवाराची मानसिक अवस्था बघवत नाही.

मोठ्या शहरात लहानाचे मोठे झालेल्या कथित सेक्युलर लोकांना मी काय म्हणतोय ते कदाचित् समजायला जड जाईल. पण...

माझी पण एक ओळखीतली मुलगी उत्तम शिकलेली. मोठ्या घरातली. तिला रायडिंग क्लबवर बोलत बोलत त्यामुलाने व्यवस्थित प्रेमात पाडले. एकत्र राहात होते. त्याचा परिणाम काय तो झाल्यावर तिच्या नकळत तिच्या हेल्थशी खेळायचा जोरदार प्रयत्न झाला हे तिची आई गायनॅक असताना.
मग कन्वर्जन, लग्न तीन महिन्यात मारहाण, वादावादी घटस्फोट. लग्नात ती मुलगी आदाब करायच्या ऐवजी नमस्कारच करत होती चुकून सवयीने. वाइट वाट्ते असे बघून.

त्या वयात मुलींना कौतूक हवे असते व ते जिथून मिळेल तिथे त्या आकर्षित होत असतात. असे काहीसे असावे.

खुपच भयानक आहे हे.

मी माझ्या एका BSF मधल्या मित्राकडून ऐकले आहे की बिहार, झारखंड, बंगाल इ. प्रदेशांत हिंदू मुलीशी लग्न केल्यावर मुस्लिम मुलाला काही लाख रुपये मिळतात.

<लैंगिक शोषण हे जसे स्त्री भृणहत्या अश्या गंभीर समस्येला कारणीभूत ठरतंय>

हाही समाजशास्त्रातला नवीन शोधच म्हणायला हवा.

वर सांगितलेल्या गेलेल्या प्रकरणांमागे 'लव्ह जिहाद' अर्थात धर्मांतर करून घेण्यासाठीचे "संघटनेच्या पाठिंब्यावर प्रयत्न" असे काही होते का? स्वधर्मीय मुलाशी केलेल्या प्रेमविवाहात/ अ‍ॅरेन्ज्ड मॅरेजमध्ये फसवणुकीचे प्रकार नसतातच आणि आंतरधर्मीय विवाहातच ते असतात असं काही आहे का? की मुलीने परजातीत्/परधर्मात विवाह केल्याने तिला घराची/धर्माची दारे कायमची बंद होतात हे कारण आहे. बरं या मुली चांगल्या शिकलेल्य आहेत असंही अनेक उदाहरणांत दिसते आहे.

दलित तरुण (तथाकथित) उच्चवर्णीय मुलींना फूस लावतात अशी ओरड तामिळनाडूत ऐकायला मिळते. त्यातून ऑनर किलिंगचे प्रकार झाले आहेत. महाराष्ट्रातही शाळेतून ओढत नेऊन एका मुलाची निर्घृण हत्या झाल्याचे वाईट प्रकरण घडलेले आहे. या सगळ्यात आणि त्या लव्ह जिहाद प्रकरणांत काहीच समांतर नाही. बरोबर?

आधीच्या एका प्रतिसादात लव्ह जिहाद नंतर त्या मुलींना वेश्याव्यवसायाला लावले जाते असे म्हटले गेले आहे. केंद्रीय मंत्री निहाल चंद यांच्यावर आरोप असलेल्या प्रकरणात स्वजातीय अ‍ॅरेंज्ड मॅरेजनंतर त्या पीडित महिलेचा नवराच अन्य पुरुषांकरवी तिचे शोषण करवीत होता. असे दिसते.

तेव्हा लव्ह जिहाद हे जर इतके गंभीर प्रकरण असेल तर निश्चित आकडेवारी, पक्क्या केसेस शोधून त्यावर कायदेशीर कारवाई करणे खरेच अवघड आहे का? किती पालकांनी habeas corpus दाखले केल्या?

माझ्या परिचयात सुशिक्षित जोडप्यांचे किमान दोन आंतरधर्मीय प्रेमविवाह आहेत, एकात मुलगा तर एकात मुलगी मुस्लिम आहे.

जिथे जातीपातीचा आणि धर्मांचा संबंध येतो तिथे आपल्या देशात राजकारण हे केले जातेच. एखादा राजकीय पक्ष किंवा धार्मिक संघटना अश्या बाबतीत राईचा पर्वत करायला बघते तर एखादी असे काही अस्तित्वातच नसल्याचा दावा करते. दोन्हीही दोन टोकाचे आणि चुकीचे.

लव्ह जिहादाचे गांभीर्य नाकारणार्‍यांची मला कमाल वाटते. अश्या लोकांनीच सेक्युलर या शब्दाचा मजाक बनवून ठेवला आहे. सेक्युलर म्हणजे एखाद्या समूहाचे लांगुलचालन करणे नव्हे तर देशहिताला (किंबहुना माणुसकीला) प्राधान्य देत सर्वधर्मसमभाव जपणे.

असो, मध्यंतरी मी एके ठिकाणी आता आपणही उलटा लव जिहाद करून त्यांच्या मुली फसवायला हवेत अश्या आरोळ्या ऐकल्या होत्या. हा देखील एक मुर्खपणाच. म्हणजे अपराध्यांना सोडून पुन्हा निर्दोषांनाच शिक्षा करण्याचा हा प्रकार.
"आंख के बदले आंख, सारी दुनिया अंधी हो जायेगी" - मोहनदास करमचंद गांधी
पण इथे आंख देखील भलत्याचीच असा प्रकार झाला. याउलट सर्वच धर्मातील लोकांनी जागरूक नागरीक बनत याला रोखायला एकत्र यायला हवे. इच्छाशक्ती दाखवली तर कित्येक रॅकेट पकडले जातील.

एक सहज आठवले, बॉलीवूडचा सुपर्रस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी, तसेच आता सैफ-करीना वगैरे जोड्यांना त्यांच्याही नकळत आयडॉल म्हणून दाखवले जाते अश्या कुकर्मात मुलींना बहकवण्यासाठी ..

ऋन्मेऽऽष: खरोखरच प्रेमात पडून जाती धर्माचा विचार न करता जर कोणि लग्न करत असतील, तर सर्वांनीच त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे.

पण जर कोणि प्रेमाचे नाटक फक्त धर्मप्रसारासाठी करत असतील, तर अशी मनोवृत्ति वेळीच ठेचली गेली पाहिजे.

ईब्लिस, ती अशुद्ध सेक्युलर भाषा आहे Happy किंवा मग त्याला सेक्युलर तरी म्हणू नये.
कारण इथे कोणीही एका धर्मावर आसूड ओढतेय असे दिसत नसतानाही त्यांचे समर्थनार्थ उतरायचा प्रयत्न दिसतोय.

प्रथम म्हात्रे,
आमच्या घराण्यात असे एक हिंदु-मुस्लिम लग्न झाले आहे. मुलगी हिंदू-मुलगा मुस्लिम. अर्थात दोन्ही घरून विरोध हा होताच, पण आता दोघे सुखात आहेत. दोन्हीकडून स्विकारलेही गेले आहे. मुलगी दोन्ही धर्मातले सण साजरे करतेय. मुलगा मुलीच्या माहेरच्या गणपतीला डो़के टेकवायला न चुकता येतोय. वगैरे वगैरे .. त्यामुळे हिंदु-मुस्लिम प्रेमविवाह आणि लव्हजिहाद यातील फरक जाणला पाहिजेच आणि त्यानुसारच वागायला हवे या मताचा मी सुद्धा आहे.

इब्लिस,
आपल्याकडे हा प्रकार उघडपणे दिसत नाही, पण मुस्लीम धर्मात काही विशिष्ठ उच्चार करून उन्मादावस्थेत नेले जाते. तूम्ही एस्केप फ्रॉम तालिबान, काबूल असे चित्रपट बघितले असतील तर त्यात असे काही प्रसंग आहेत.
तूर्कीमधे पण अति जलद वेगात गिरक्या घेण्याचा एक प्रकार असतो ( जोधा अकबर मधे आहे तसा प्रकार )
कधी कधी मोहर्र्मच्या मिरवणुकीत रक्तबंबाळ होईपर्यंत स्वत:लाच बदडले जाते. अशा उन्मादावस्थेत जिथे स्वतःचा
सारासार विचार रहात नाही, तिथे त्यांच्या डोक्यात असे विचार भरवणे शक्य होत असेल का ? असा अघोरी प्रकार
अश्या प्रेमप्रकरणात फसलेल्या मुलींवर पण होत असेल का ?

तुलना कितपत योग्य आहे माहित नाही, पण आपल्याकडे घागरी फुंकताना बायका अश्याच उन्मादावस्थेत गेलेल्या मी बघितल्यात. तसेच दक्षिण अमेरिकेत येशूसारखे स्वतःला जखमी करण्याचेही प्रकार दिसतात.

तसा ब्लॅक मॅजिकवर मीदेखील विश्वास ठेवत नाही पण या प्रकारात काहितरी काळेबेरे दिसतेय खरे.

कनिष्ठ जातीच्या किंवा समूहाच्या मुलाला वरिष्ठ जातीच्या किंवा समूहाच्या मुलीने होकार देण्यात त्यांचा अहं सुखावणे आणि याच्या अगदी उलट म्हणजे वरीष्ठ समूहाच्या अहं ला ठेच लागणे ही भावना या प्रकरणाच्या मुळाशी असावी. बाकी पैसे दिले जाणे वगैरे सगळे सांगीवांगीचे दिसतंय.

अगदी बरोबर.. जर दोघेही एकमेकांना अनुरूप आणि चांगल्या परिवारातले असतील तर मग धर्म हा मुद्दा गौण ठरतो. कोणालाही धर्माची सक्ती नसावी.

पण कट्टरपंथीयांन्ना माझा विरोध आहे. हा जो लव्ह जिहादसारखा घृणास्पद प्रकार त्यांनी सुरु केलाय त्याचा बिमोड झालाच पाहिजे.

संघटीत रित्या लव्ह - जिहाद हे नाव देऊन पैसे आणि गाड्या बक्षीसी देण्याचे सज्जड पुरावे कुणी कुठे दिले याबद्दल काही ? मुस्लिमांमधे कट्टरपण आहेच, शिवाय निरक्षरता आणि व्यक्तीस्वातंत्र्याबद्दल अनभिज्ञता असल्याने बायकोने नव-याच्या चालीरीती पाळायच्या म्हणून सक्ती केली जात असेल तर त्याला जेहाद, जिहाद म्हणणार का ? कर्मठ ब्राह्मणाने मांस मच्छी खाणा-या मुलीशी लग्न केलं आणि लग्नानंतर तिला शाकाहाराची सक्ती केली तर त्याला जिहाद , धर्मयुद्ध म्हणणार का ?

गण्या सर, आपण आंतरजाल पाहू शकता.. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल.

म्हात्रेजी, सर म्हणू नका. ढ म्हणालात तरी चालेल.
लव्ह जेहाद नावाची काही कल्पना अस्तित्वात आहे यावर विश्वास असणा-यांनी ते सिद्ध करायचं असतं अशी माझी समजूत होती. ज्यांचा विश्वास नाही ते कशाला पुरावे शोधतील ? एक भाप्र.

त्याचे काय आहे, झोपलेल्याला जागे करता येते. पण ज्याने झोपेचं सोंग घेतलंय त्याला झोपेतुन उठवायचा प्रश्नच येत नाही Happy Wink

भगवी झोप ?

Pages