'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> ज्या कोणाला आपल्या देशातील मुलींच्या रक्षणाची, भवितव्याची काळजी असेल त्यांनी इथल्या खऱ्या प्रश्नांवर तोडगा काढावा

+१

बाकी, मुलींना (आणि मुलांनाही) आपल्या बर्‍यावाइटाचा निर्णय घेता येण्याइतके स्वातंत्र्य द्यायला हवे. मुलगी स्वतःच्या पायावर उभी असल्यावर समजा अशी प्रेमात पडली व धर्मांतरित झाली, नंतर परित्यक्त झाली किंवा नवरा अब्यूजिव असला तर तिला भावनिक आधार दिला तरी पुरेसे होईल. तिला पुन्हा जुन्या धर्मात यावेसे वाटले तर तसे करता यायला हवे. लव्ह जिहाद खरा असेल तर तोडगा मुलींना समर्थ करणे, वाळीत न टाकणे हा आहे.

लव्ह जिहाद खरा असेल तर तोडगा मुलींना समर्थ करणे, वाळीत न टाकणे हा आहे.
>>

नक्कीच !

ओवरऑलच या मेंटेलिटीची समाजात गरज आहे. मग ते लव्हजिहाद प्रकरण असो वा इतर कुठल्याही प्रकारची फसवणूक.

धर्म या संकल्पनेला आता आपण मोडीत काढू शकत नाही.त्याचे ड्रॉबॅक्स आहेत तसेच फायदेही असतातच. त्यामुळे खुशाल प्रत्येकाने आपला जपावा. पण किमान बाटणे वगैरे खुळचट समजुतीतून बाहेर यायची गरज.

संमि एक भाबडा हिंदु :G:-G:खोखो:

+++++अरेंज म्यारेज करुन पस्तावलेला भाबडा हिंदु पुरुष

++++++ज्या कोणाला आपल्या देशातील मुलींच्या रक्षणाची, भवितव्याची काळजी असेल त्यांनी इथल्या खऱ्या प्रश्नांवर तोडगा काढावा ++++++++++

ह्या प्रश्नाला भरत मयेकरच उपाय सुचवताहेत, कोठून कोठून उपाय शोधुन काढतात आणि माय्बोलीच्या माथी मारतात.

प्रकाशक भारतीय विचार साधना आहे हे पाहून काय समजायचे ते समजले. पण तरीही नेट लावून बुकगंगावर असलेली दोन तीन पाने वाचली. misogynist लेखन.

दुसर्‍याच परिच्छेदात "धाकट्या बहिणीने मारवाड्याशी लग्न केले तेव्हाच अद्याप लग्नाला तयार न झालेल्या अबक ची भीड चेपली" असे वाक्य दाताखाली खडा यावा असे आले. हिंदु समाजाचा घटक असलेल्या मारवाडी समाजालाच असे म्हणले असेल तर मुस्लीम ख्रिस्द्चन ई ची बात नको.

शबानाच्या प्रतिसादाशी सहमत. भारतात लव्ह जिहाद नावाचा प्रकार अस्तित्वात नाही. उत्तर प्रदेशातल्या निवडणूकीत ध्रुवीकरण करायला केलेला हा कांगावा आहे. तिथे अपयश आल्यावर खुद्द भाजपानेही आता काखा वर केल्या आहेत.

पण लव्ह जिहादवर इतके सोप्पे प्रतिबंधक उपाय असताना एवढं काय त्याचं ते हे करायचं?

हे आज कुठेतरी वाचलं: काही हिंदू पुरुष द्विभार्याप्रतिबंधातून पळवाट काढण्यासाठी म्हणून दुसर्‍या (तिसर्‍या, चौथ्याची कल्पना नाही) लग्नापुरते मुसलमान होतात; तो खरा लव्ह जिहाद.

(आता असं करणार्‍यात भाजपचे एक माजी खासदारच आहेत आणि त्यांची द्वितीय पत्नी भाजपची विद्यमान खासदार, तीही तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघातून. ते जौद्या)

>>>हिंदुत्ववादातून मुस्लिमद्वेष मायनस केला, तर हिंदुत्ववाद्यांचं अस्तित्वच संपुष्टात येईल, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे असले बागुलबुवे उभे केले जातात.<<<

विधान पटले नाही.

उद्या उठून भारतातले सगळे मुसलमान हिंदू धर्म स्वीकारायला तयार झाले तर त्यांना हिंदू करून घेणार का? कारण बाबर आला त्याला ३-४०० वर्षं होऊन गेलीत, त्यानंतरचे इथेच जन्मलेत, अन इतर बहुतांशी इथलेच बाटून हिंदूचे मुसलमान झालेत.<<<

रस्त्यावरून कही वेळा एखादे जुनाट वाहन फक्त पंधराच्या स्पीडने चाललेले असते पण त्याचा आवाज मात्र हेलिकॉप्टरसारखा येतो त्याची आठवण झाली. काल्पनिक मुद्दा अश्या कर्कश्श्य थाटात आणि अधिकारवाणीने विचारायचा की तो जणू मध्यवर्ती मुद्दा आहे चर्चेचा!

अ‍ॅलोपथीला शिव्या घातल्याशिवाय आयुर्वेद सिद्ध होत नाही येथपर्यंत म्हंटले गेले तर समजू शकतो, हिंदूत्ववादातून मुस्लिमद्वेष नष्ट केला तर हिंदूत्ववाद्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल हा तर्क काहीही आहे.

हिंदूत्ववाद म्हणजे मुस्लिमद्वेष नाही.

ते समानार्थी शब्द नव्हेत.

लव जिहादवर उपाय म्हणजे साक्षात कॄष्णाचे अनुकरण.

कृष्णाने नरकासुराच्या बायका मुलांना थारा दिला होता.

सनातन व संघ यातील लग्नाळु तरुणानी लव जिहादातील मुली व त्यांची मुले यांना स्वीकारावे व त्यांची यादी जाहीर करावी.

शबाना,

तुमची ही विधाने:

>>>भारतात चाललेली लव जिहाद ही मात्र निव्वळ राजकीय खेळी आहे<<<

>>>लव -जिहादच्या नावाखाली जे चाललेले आहे ती नवीन राजकीय खेळी आहे.<<<

>>> हा प्रश्न जर खरेच एवढा मोठा असेल तर त्याची रीतसर चौकशी व्हावी व बिगर इच्छेविरुद्ध minor मुलींचे जर शोषण होत असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. <<<

हे स्दगळे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणत आहात हे कृपया सांगता का?

धन्यवाद!

हिंदूत्ववाद म्हणजेच मुस्लिमद्वेष..

ते समानार्थी शब्द आहेत.

Happy

मुसलमान संपले की ख्रिश्चनद्वेष पुढे आणला जातो. ते संपल्यावर वरणभात, आपलं वर्णभेद आहेच Wink

लव जिहादची पहिली लाट(?) उसळली ती केरळात. एकूण ६००० मुली गायब झाल्याची बातमी होती. सुब्रम्हणीयन स्वामीच्या भाषणातील संदर्भ खरे मानल्यास २००८-०९ मध्ये केरळ न्यायालयात स्थानीक हिंदुत्ववाद्यानी धाव घेतली. न्यायालयाने लव जिहाद प्रकरण खरच असते का याची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मल्याळी पोलिसांनी जिवाचे रान करत शोधमोहीम व तपास यंत्रणा राबवीली. सरते शेवटी पोलिसानी न्यायालयात सादर केलेली कागद पत्रे हेच सांगतात की हे लव जिहाद निव्वड अफवा असून हिंदुत्ववाद्यानी संगठना बळकट करण्यासाठी वापरलेले एक तंत्र आहे.

लव जिहादची आवई उठविणारी अजून एक संगठना म्हणजे श्रीराम सेने. नुकतच कर्नाटक पोलिसानी सुद्धा सेम अहवा ल सदर करत लव जिहाद प्रकरण फेटाळले आहे. पण त्याच बरोबर कर्नाटक पोलिसानी हे सुद्धा मान्य केले की मागच्या पाच वर्षात २३० हिंदू मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तपासाअंती यातल्या १५० मुलीनी मुस्लीमांशी लग्न केल्याचे आढळले. पण वरील विवाह निव्वद प्रेम विवाह असून त्याचा लव जिहादशी कोणताही संबंध नाहि. पण हिंदुत्ववादी मात्र याच आकड्यांकडे बोट दाखवत "हा बघा लव जिहाद" अशी अरोळी फोडतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

एकूण आकडेवारी, पोलिसांचे अहवाल व हिंदुत्ववाद्यांची तक्रार पाहता असेच म्हणावे लागेल की हिंदु-मुस्लीमातील प्रेमविवाहांना हिंदुत्ववादी लव जिहादचे नाव देत आहेत.

Rofl

In kerala, more men have converted to Islam than women; much more. Is that love jihad too?

सर्व धर्मांतरे लव्ह जिहाद ह्या सदरात मोडतात असे विधान मूळ लेखात कुठे दिसत आहे का?

इब्लिस राव: हिंदुत्ववाद म्हणजे हिंदू धर्माचा रास्त अभिमान, हिंदुत्ववाद म्हणजे हिंदू मुल्यांचे पालन, हिंदुत्ववाद म्हणजे हिंदू म्हणून जन्माला आल्याचा गर्व....
परदेशात असुनही स्वदेशातही न मिळणारा जो आदर आपल्याला मिळतो तो हिंदू धर्मामुळेच..

"हिंदूत्ववाद म्हणजेच मुस्लिमद्वेष..
ते समानार्थी शब्द आहेत.
मुसलमान संपले की ख्रिश्चनद्वेष पुढे
आणला जातो. ते संपल्यावर वरणभात, आपलं
वर्णभेद आहेच">>>>
आपल्याला एखाद्या ख्रिश्चन / मुस्लिम व्यक्तिला जबरदस्तीने हिंदू बनवल्याचे सांगता येईल का?

भारताची फाळणी होण्याची कारणमिमांसा करता येईल का? बांग्लादेश अथवा पाकिस्तानात हिंदूंवर जे अत्याचार होतात, तसे हिंदुस्तानात झाल्याची उदाहरणे देता येतील का?

आपण कोणत्या कालखंडात जगत आहात? माझ्या जवळच्या मित्रपरिवारात मुस्लिम मुले- मुली आहेत. आमच्यात धर्मावर चर्चा होतात, पण वाद नाही होत.
विचार बदला, देश बदलेल...

मा. बो. करांन्नो विषय धाग्यापासुन थोडा दुर गेल्याबद्दल माफी ("kshamaswa" type karta nahi aala)

मा. बो. करांन्नो विषय धाग्यापासुन थोडा दुर गेल्याबद्दल माफी ("kshamaswa" type karta nahi aala

..........

माफी शब्द लिहायला नको का वाटते? ऊर्दु आहे म्हणुन ?

क्षमस्व शब्दच का वापरायचा ? देववाणीतुन आला म्हणुन ?

प्रकाशक भारतीय विचार साधना आहे हे पाहून काय समजायचे ते समजले. पण तरीही नेट लावून बुकगंगावर असलेली दोन तीन पाने वाचली. misogynist लेखन. >>>

@विजय कुलकर्णी - आपल्या बचावकार्याबद्दल आभार (आमचा वेळ वाचला ).

संमि मावशी: हमें उर्दू लफ्जों से बिलकुल भी नफरत नहीं है। आपने कभी सुनी भी नहीं होगी इतने सलीके से हम उर्दू पेश कर सकते हैं।
धागा मराठी, संकेतस्थळ मराठी म्हणून मराठी...

आपल्याला संस्कृत अथवा उर्दूबद्दल किती माहीत आहे?
Happy Lol

मराठी शबद ?

माफी हा शब्द मराठी नाही !

क्षमस्व मराठी आहे !!!

ज्ञानात भर पडली

Happy

शबाना, पेपर वाचत जा जरा.
गेल्या आठवड्यात सकाळ मध्ये आलेली बातमी. national level ची शूटर असणार्या तारा ला एका माणसाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यावेळी त्याने तो मुसलमान आहे हे उघड केलं नाही. स्वतःच नाव हिंदू सांगितलं . आपल्या हिंदू आईवडिलांना तिला भेटवल . आणि लग्न झाल्याच्या दुसर्या दिवशी तो हिंदू नसून मुसलमान आहे हे उघड केलं . आणि मग तिने मुसलमान व्हावं म्हणून तिचा छल केला. मारणं, उपाशी ठेवणं, कोंडून ठेवणं इत्यादी .
love जिहाद ची procedure अशी आहे . आधी हिंदू भासवून हिंदू मुलींना फसवायचं आणि मग जबरदस्तीने त्याचं धर्मांतर करायचं

'लव्ह जिहाद' - खरच अस काही आहे का?
यासाठी निकष कोणते वापरणार? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही.

त्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.
१) संख्या ?- किती विवाह असे झाले आहेत?
२) परीणाम ?- अशा विवाहानंतर किती जणीना धर्मबदलासाठी जाच सहन करावा लागत आहे?
३) कारणभाव ?- अशा विवाहामागील कारणे काय आहेत? फक्त प्रेम (आकर्षण) हेच कारण आहे काय?
४) अर्थकारण? - अशा विवाहासाठी पैसा दिला जात आहे काय?
५) संघटनात्मक प्रयत्न? - कोणत्या संघटना असे प्रयत्न करत आहेत?
५) वैचारिक बैठक ? - उ.दा. (evangelical philosohy)

ह्या प्रश्नाचे उत्तर केवळ समाजामधे कार्य करणा-या संघटना (उ.दा. बालसुधार, स्त्रीसबलीकरण संस्था, पोलिस) देवू शकतील असे मला वाटते.

माझे मत - 'लव्ह जिहाद' आहे का ह्याचे उत्तर हो-कडे झुकत आहे.

Pages