अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय प्रमाणवेळेनुसार मला आता झोपणं गरजेचं आहे. पण उत्तर मिळत असेल तर थोडाफार जागू शकेन. (हल्ली दुपारी झोपण्याची सोय झालीय हे पण कारण Proud )

१ आप चे निदान काही आमदार आज अस्वस्थ आहेत आणी ते पुन्हा निवडणूक नको म्हणून भाजपाला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत हे अगदीच अशक्य वाटत नाही. ती बातमी पेरलेली वावडी आहे असे लगेच म्हणता येणार नाही. अगदी काँग्रेसचे काही आमदार फुटून त्यांनी आप ला पाठिंबा दिला तरीही आश्चर्य वाटू नये. पक्ष म्हणून आपची भूमिका काहीही असेल पण काही आपचे आमदार आणी बहुसंख्य कॉग्रेस चे आमदार यांना पुन्हा निवडून येऊ अशी खात्री नसावी.

२ आआपमध्ये कुठला समान विचार दिसतो? मलातरी कुठलाच दिसत नाही. हे गापैंचे वाक्य चिंत्य आहे. भ्रष्टाचार विरोध या एकाच समान मुद्द्यावर पक्ष कसा बांधता येइल? आप चे नेते स्वच्छ असतीलही, पण जनता पक्षातही एकसे एक स्वच्छ माणसे होतीच.

३ आप कडे आर्थिक विचार नाही हे ही एक महत्वाचे मत इथे केदार ई ई नी व्यक्त केले आहे.

४ केजरीवालांनी वाराणासीत निवडणूक एक स्टेटमेंट म्हणून लढविली असे म्हणता येइल. सुषमा स्वराज यानीही सोनिया विरुद्ध लढविली होतीच. अशा सिंबॉलिक निवडणूकीत जय्/पराजया पेक्षा संदेश जाणे महत्वाचे आणी ते दोघेही हार कर जीते असे मला वाटते.

विकु, विज्ञानदास,
पटतंय.

मनिष, केदार, युरो ह्यांनी देशाच्या इकॉनॉमी आणि आप च्या इकॉनॉमिक पॉलिसीबाबत मुद्दा मांडलाय. एक खूप मोठा फरक मला जाणवला तो म्हणजे - तुम्ही सगळे पॉलिसी बद्दल बोलताय ते असं गृहित धरून की सरकारची तिजोरी रिकामी आहे. त्यामुळे जनतेला सबसिडी दिली तर तिजोरीवर ताण पडेल. आणि दुसरीकडे कर वाढवावे लागतील.
आणि केजरीवालांच्या २-३ मुलाखतींमध्ये मी ऐकलं की सरकारकडे भरपूर पैसा आहे, आपण तो योग्य नियोजन करून वापरला तर उलट कर कमी करता येतील.
केजरीवाल रेवेन्यू सर्विसमध्ये कमिशनर होते ही जमेची बाजू धरली तर मला त्यांच्या विधानात तथ्य असावं असं वाटतंय.

माने,
सिसोदिया सापडले का? तेवढे भाजपा आणि काँग्रेसचे आमदार-खासदार पण शोधून द्या दिल्लीकरांना.

इथे लिहीणर्‍या बर्‍याच विरोधी लोकांचा,म्हणजे आआपविरोधी लोकांचा बोलण्याचा रोख हा कपील सिब्बलसारखा वाटतोय.थोडासा बायसड् थोडासा तुच्छतेचा... केजरीवालांचं राजकारण बाळबोध आहे असा समज त्या लोकांनी करुन घेतलेला आणि त्यातच काही दिवसांनी स्पष्ट निकाल दिसला होता.
मनीष सिसोदिया गायब होणे,आआपचे काही लोक पक्ष बदल करणार या बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य दिसून येत नाही.जरी इ.टी.ची बातमी असेल तरी.... तो आआपचा कल्त वगैरे असेल तर खपवून घेतला जावा..

मुळात आआपला अजून बरीच तयारी करावी लागेल.त्याच्यातल्या अंतर्गत समन्वयांची पुनरुभारणी करावी लागेल.एकट्या केजरीवालांची ताकद कमी पदते आहे असे वाटत आहे.ज्या प्रश्नांसाठी मी पक्ष स्थापन केलेला आहे ते सर्व होण्यात येणारे अडथळे पक्षाचे सद्स्य का समजून घेत नाहीएत असा हतबल करणारा प्रश्न आणि त्यात आता दिल्लीत त्यांच्या गव्हर्नन्सचा सावळा गोंधळ,थोडासा आआपबद्दल नकारात्मक भाव जागवित आहे.

आआपणे अशा वायफळ गोष्टींनध्ये वेळ न दवडता पक्ष बांधणीला,समन्वयाला सुरुवात केली,अर्थशास्त्रावर आधारीत अजेंडा तयार केलाच आणि राजठाकरेंसारखा एकाच मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय प्रश्नांच्या ब्रॉड स्पेक्ट्रमकढे वळवला तर जाऊन पाचेक वर्षात आआपला सत्ता थोडी-थोडी काबीज करण्यासाठी रस्ते खुले होऊ लागतील.आआपबद्दल जनतेच्या मनात अजूनही तोच पाठंबा आहे.परंतु राजकारणाच्या व्यावहारीक डवपेचात आप कमी पडतो आहे.त्याची शिकवणी त्याला लावावीच लागेल्,हे नक्की.

आपच्या सद्यस्थितीबाबत होणारे उथळ आणि तडकाफडकी निर्णय्,मतप्रत्यंतरे ही बर्‍याच जणांना साधक-बाधक वाटत नाहीत.परंतु आआपने जर थोडे पक्ष-संयोजन ठेवले,त्यावर नियंत्रण ठेवले,तर आआपला वर येणे व झालेल्या चूका सुधारुन कारभार चालवणे सहज शक्य व्हावे.मुळात राजकारण हे इतके अवघड असते का व आपण त्याला अवघड व क्लीष्ट बनवून ठेवले आहे का असा मूळ मुद्दा उपस्थित होतो.कारण की मूलभूत सुविधांचा पुरवठा करणे हे कठीण काम वाटत असेल तर साठ+ वर्षांनंतर आपला देश जसा दिसतो आहे त्यापेक्षाही तो खालच्या अवस्थेत असायला हवा.एखादा पक्ष हे करू म्हणण्याचे धारीष्ट्य दाखवतो त्याचे पाय ओढणे मला इतर पक्षांवर टाकलेला आंधळा विश्वास वाटतो. आणि जसे की आधी म्हणालो राजकारणात एका शीतावरून भात परखता नाहीच येत...तेव्हा मिळालेला एक नवीन पर्याय त्याला थोडा पाठीम्बा देऊन आपल्याला हवा तसा पक्ष निर्माण करण्याची हीच संधी आहे असा सकारात्मक विचार मला भावतो आहे.
धन्यवाद.

मि काय म्हनतो, केजरिवाल का कोन ते अचानक उगवलेल धुड. त्यापेक्शा टिव्हिवाते पाठीम्बा देत असतिल तर आपले आर आराबा, नितिशकुमार, राजु भाउ, शरद भाउ जोशि, सोनमाथ चटरजि, चन्द्रा नायडु अशे अनेक लोक एकत्र येवुन देश मस्त चालवतिल. प्रतेकाचि ताकत पन आहे. त्यान्च्यात अमरत्य भाउ ना घेतल कि कालजि मिटलि. कशाला पायजे फन्ड अन बिन्ड, अन एन आरआय अन नाव नाहि ऐकलेल लोक. मयन्क भाउ वर तर खटले चालु आहेत. दमानिया काकु तरि क्लिन आहेत का ? बघा बाबा.

राजु भाउ, >>>> ह्ये कोन?

अमरत्य भाउ >>>>> ह्ये कोन? अमर्त्य सेन का?

बघा बाबा.>>>> बाबा कोण? पृथ्वीराज चव्हाण का?

लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण

Case of perjury and fraud against Kejriwal

On February 19, Neeraj Saxena and Anuj Kumar Agarwal, office bearers of Maulik Bharat Trust (engaged in voters’ awareness activities) accused Arvind Kejriwal of not mentioning many of his assets, and seriously undervaluing a property of his worth Rs 5.5 crore in the mandatory affidavit of assets and liabilities declaration that a candidate must submit to the Election Commission. Arvind Kejriwal had filed his nomination papers on November 16, 2013.

<<इथे फिल्डवर काम करणारे रिपोर्टर फेकाफेकी करत आहेत!!! >>
रिपोर्टर्स खर्‍या बातम्या आणत असतील. त्यात फेरफार वरच्या लेवल वर होत असणार (असं वाटायला वाव आहे)

१. तुम्ही इकॉनॉमिक टाइमसमधील बातम्यांबद्दल लिहिलं आहे.
हे पहा -
Gujarat records highest decadal agricultural growth rate of 10.97%
आणि हे -
If one takes agriculture as index of inclusive development, Gujarat’s agrarian miracle stands out

अशा अनेक बातम्या आहेत.
आणि आता हे वाचा.

"In last 6 years, Gujarat’s agriculture had -ve years of growth -1.08% (2007) & -8.71% (2009), and a zero growth year 0.3% (2010)."

Agricultural growth rate in Gujarat.png

आणि हे -
" The paper by Gulati, Shah and Shreedhar pointed towards how, from 2000-01 to 2006-07, Gujarat State Domestic Product (GSDP) for agriculture grew by 9.6 percent per annum, when during the same period the corresponding Gross Domestic Product (GDP) for agriculture at the all-India level grew by only 2.9 percent.

With the latest data for the 11th Five Year Plan (2007-12), the argument put forward by Gulati and Shah stands totally exposed. Put out in “State of Indian Agriculture”, the GSDP for Gujarat agriculture dipped to half – exactly 4.8 per cent per annum – of what it was from the previous period. Worse, it was less than several other states, including Madhya Pradesh (7.6 per cent), Chhattisgarh (7.6 per cent), Rajasthan (7.4 per cent), Jharkhand (6 per cent), Karnataka (5.6 per cent), Andhra Pradesh (4.9 per cent) and Assam (4.9 per cent). Year-wise figures also suggest that volatility in agriculture had set in."

हा स्क्रीनशॉट प्लॅनिंग कमिशनच्या पीडीएफमधून घेतलाय.

Agri growth Gujarat.png

आता ह्यात गुजरातच्या अ‍ॅग्रि ग्रोथ चं 'मिरॅकल' कुठे दिसतंय?
कोणाला खोटं ठरवायचं ? इकॉनॉमिक टाइम्सच्या मथळ्यांना की अधिकृत रिपोर्टसना?

टाइम्स ऑफ इंडियातील ह्या दोन बातम्या पहा.
गुजरातमधील शेतकीमधील दोन अंकी विकास हा एक भ्रम आहे. जून २०१२

TOI myth.pngशेतीमधील विकास हा मापदंड मानला तर गुजरातमधील चमत्कार ठळकपणे दिसून येतो. एप्रिल २०१४

TOI miracle.png

दोनच वर्षांत असं काय घडलं असावं की भ्रम आहे असं सांगणारे चमत्कार आहे असं सांगायला लागले?
विश्वासार्हतेबद्दल शंका आली तर त्यात नवल नाही.

२. बायलाइन असली तरी परवा ABPnews ने म्हटलं तसं लेखक नंतर म्हणूच शकतो की मला खोटा रिपोर्ट मिळाला होता.
३. कोट प्रकाराबद्दल मला काही कळत नाही. त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही.
४. असल्या बातम्यांवर केस करत बसलं तर आप वाले आयुष्यभर कोर्टाच्या वार्‍याच करत बसतील. आपली न्यायव्यवस्था तितकी सक्षम आहे!

असो, कुणाचे MLA फुटले, कोण सरकार बनवणार हे यथावकाश कळेलच. बातमीत म्हटल्याप्रमाणे आप चे काही MLA जर सत्तेसाठी असा प्रकार करत असतील तर ते आप मध्ये नाही राहिले तरी चालेल. वैम.
कारण सत्ता काबीज करणं हा आपचा उद्देश नसून व्यवस्था परिवर्तन आहे ह्यावर केजरीवाल आणि त्यांचे निकटवर्तीय ठाम दिसत आहेत. आणि म्हणूनच मी इथे एवढं खरडत बसलेय.

आणि कल्टचं म्हणाल तर जी व्यक्ती १२ वर्षांपासून एका महत्वाच्या मुद्द्याला घेऊन लढा देतेय त्या व्यक्तीला सपोर्ट करणं हा कल्ट असेल तर...येस, आय एम अ कल्टी !
आपल्या विभागात कोण उमेदवार उभा आहे, त्याच्यावर बलात्कार/भ्रष्टाचार/खून असले गंभीर आरोप आहेत का हेसुद्धा न पाहता केवळ 'मोदी' ह्या नावामुळे कमळावर शिक्का मारून येणार्‍या कल्टपेक्षा बरंच Happy

आब्र,
आता तुमचे प्रश्न.
अण्णा आंदोलन (खरंतर मला हा शब्द आवडत नाही, पण लिवायला सोप्पा पडतो), आपची सुरूवात, टीम अण्णा, मिडियाने दिलेली प्रसिद्धी आणि नंतर हात धुवून मागे लागणं ह्याविषयी मागे लिहिलं होतं की मला हे सगळं एका बुद्धिबळाच्या खेळासारखं वाटतंय.
मी मागचे व्हिडिओज आणि बातम्या ३-४ महिन्यांपासून वाचतेय. त्यामुळे त्या त्या वेळी मिडियात येणार्‍या बातम्यांनी माझी मतं बनत गेली नाहीत (स्लो पॉयझनिंग झालं नाही :डोमा) हा ह्या विवरणाचा प्लसपॉइंट.
मी केजरीवाल आणि त्यांच्या विचारांशी सहमत असणार्‍यांची समर्थक आहे, हा ह्या विवरणाचा मायनस पॉइंट. कारण त्यामुळे बायस येऊ शकतो.

तर मला जाणवलं ते असं -
१. मागच्या लोकसभा निवडणूकीत 'इंडिया शायनिंग' च्या चमकीला मतदार भुलले नाहीत. कारण कदाचित २००२ मधल्या घटनांमध्ये असावं. बरीच जनता कट्टर हिंदुत्ववादी भाजपापेक्षा सेक्युलर (?) काँग्रेसलाच मत द्यायची भिती होती.
२. काँग्रेस सरकार कसं घोटाळे करतंय आणि देश त्यामुळे भरडला जातोय हे मतदारांना सांगायला हवं.
३. पण मग बदली सरकारबद्दल मतदारांना विश्वास वाटावं असं काहीतरी भरीव त्यांच्यापुढे ठेवायला हवं.
४. ह्या सगळ्या उद्देशांसाठी 'इण्डिया अगेन्स्ट करप्शन' चं आंदोलन आणि 'गुजरात मॉडेल' ला प्रसिद्धी दोन्ही एकाच वेळी चालू झालं.
५. अण्णा, अरविंद केजरीवाल, किरण बेदी, व्ही के सिंग, प्रशांत भूषण, कुमार विश्वास,मेधा पाटकर, गोपाल राय, संजय सिंग, शाझिया इल्मी हे त्यातले प्रमुख चेहरे. (बाकीचेही होतेच. पण मी एवढ्यांबद्दल लिहिते. कुणी इतरांवर लिहिणार असेल तर छानच.)
६. भ्रष्टाचाराने कंटाळलेल्या जनतेने अण्णा आंदोलनाला भरभरून प्रतिसाद दिला. लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. सत्तेत असलेल्यांनी केलेले घोटाळे समोर आले. सरकारविरुद्ध नकारात्मक जनमत तयार झालं.
७. भ्रष्टाचार आटोक्यात आणायचं असेल तर स्ट्राँग लोकपालबिल हा एकच पर्याय असं तेव्हा टीम अण्णाचं मत होतं. मग सरकारशी वाटाघाटी सुरू झाल्या. सरकारने मांडलेलं लोकपालबिल आणि टीम अण्णाने मांडलेलं लोकपालबिल ह्यात खूप फरक होता.
इथल्या स्लाइड शो ने दोन्हीतला फरक चांगला लक्षात येईल.
GovtLokpalVsTeamAnna.png

८. केजरीवाल आणि इतर समविचारी लोकांना "राजकारणात उतरल्याशिवाय जनलोकपालबिल पास होऊ शकणार नाही"असं वाटायला लागलं.
मग टीम अण्णामध्ये फूट पडायला लागली (की पाडण्यात आली?)
जे खरोखरीच जनतेसाठी लोकपालबिल आणायचं म्हणून लढत होते ते केजरीवालांसोबत गेले. जे फक्त काँग्रेस सरकारला पाडवण्यासाठी आंदोलनात उतरले होते त्यांचा हेतू साध्य झाल्याने ते मागे राहिले. पण विनोदकुमार बिन्नी, अश्विनी उपाध्याय सारखे लोक आप मध्ये पाठवून दिले. थोड्या दिवसांत आप मधून फुटायचं आणि आपची बदनामी करायची हे काम त्यांच्यावर सोपवण्यात आलं.
९. अजून लोकसभा निवडणूक व्हायची असल्याने, भाजपाऐवजी काँग्रेसला मतं पडू नयेत म्हणून आम आदमी पक्ष उभा करण्यात भाजपाने मदत केली. (भाजपा=मिडिया)
१०. दिल्लीमध्ये आपने काँग्रेसची धूळधाण उडवल्यावर भाजपाचं निम्मं काम झाल्यासारखंच होतं. पण केजरीबाबा सत्ता मिळवूनही इतर राजकारण्यांसारखी स्वतःची पोळी शेकून न घेता अडेलतट्टूसारखं जनलोकपालबिलावरच अडून बसले. बिल पास झालं तर आपण संपणार हे भाजपा आणि काँग्रेस दोघांनाही पक्कं माहीत होतं. त्यामुळे आधी कबूल करूनही काँग्रेसने समर्थन काढून घेतलं. आणि केजरीसरकार कोसळलं.
११. जी मिडिया आधी आप ला उचलून धरत होती ती आता आप ला संपवायच्या मोहिमेवर जुंपली.

सारांश : अण्णा, किरण बेदी, व्ही के सिंग, रामदेवबाबा ही सगळी आर एस एस चीच मंडळी आहेत (खुलेआम किंवा पांढर्‍या सदर्‍याखाली भगवी बंडी असलेली)
काँग्रेसला मातीत मिळवण्यासाठी आप ला मिडियाने वर चढवलं.
आता पुढचं लक्ष्य आहे आप ला संपवणं. म्हणजे मग १५ वर्षे देशभर बेरोकटोक गुजरात मॉडेल लागू.

हुश्श...झाला सगळा कल्पनाविलास Proud
पुढच्या पोस्टींमध्ये असं सगळं का वाटलं ह्याचे दाखले देते. हे न पटणार्‍यांनी त्यांचे मुद्दे मांडा.
होऊ द्या खर्च...माबो आहे घरचं!

कृपया आर एस एस बद्दल आधी जाणून घ्या मगच तोंड उघडा. मी सदस्य नसलो तरी त्यांचे सेवाभावी काम जवळून पाहीलेले आहे, त्यामुळे काहीही बरळण्याच्या आधी विचार करा.

अण्णा हजारे :
अण्णा संघाचे प्रचारक होते. ग्रामविकासाच्या संघाच्या योजनाही त्यांनी राबवल्या आहेत असं म्हणतात.
भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यात त्यांचा सहभाग असला तरी सरकारकडून काहीतरी आश्वासन मिळालं की ते फार प्रतिकार करत नसावेत. (मला त्यांच्याबद्दल फार माहीत नाही. चुकलं तर प्लीज दुरूस्त करा.)
अण्णा आंदोलनाचा चेहरा त्यांचा असला तरी मास्टरमाइंड केजरीवालांचं होतं असं म्हणतात. IAC ने आधी रामदेवबाबांना चेहरा बनवायचं ठरवलं होतं. पण त्यांचे संघ परिवाराशी असलेले लागेबांधे पाहून IAC ने त्यांच्याऐवजी अण्णांना चेहरा बनवायचं ठरवलं.
आंदोलनाच्या सुरूवातीला भरपूर प्रतिसाद मिळाला. पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही हे पाहून गर्दी ओसरायला लागली. भ्रष्टाचाराविरुद्ध तयार झालेला मोमेन्टम नाहीसा होऊ द्यायचा नसेल तर पुढची पायरी चढायला लागणार होती. ती म्हणजे दिग्विजयसिंगांनी आव्हान दिल्याप्रमाणे राजकारणात उतरायचं.
अरविंद आणि समविचारी लोक ह्या पायरीवर चढायला तयार होते. पण अण्णा आणि इतर ह्यासाठी तयार नव्हते. (त्यामुळे अण्णा, किरण बेदी, व्हीकेसिंग ही संघाची प्यादी असतील असं वाटायला वाव आहे)
अण्णांनी केजरीवालांना सांगितलं "राजकारण चिखल आहे, ह्यात उतरलो तर आपणच कलंकित होऊ"
केजरीवाल म्हणाले "जर तोच एक मार्ग शिल्लक आहे असं दिसतंय तर माझी त्याला तयारी आहे." (खखोदेजा)

तेव्हापासून आत्तापर्यंत अण्णांनी इतक्यावेळा भूमिका बदलल्या आहेत की त्यांचा नेमका उद्देश तरी काय असा प्रश्न पडतो. मोदी कम्युनल की सेक्युलर, पंतप्रधान होण्यासाठी योग्य की अयोग्य, राजकारण चांगलं की वाईट...कशातच एकवाक्यता नाही.

Anna 1.pngAnna1.png

असं म्हणता म्हणताच -

Anna 2.png

आधी मोदींची आणि नितिशकुमारांची तारीफ केली.

Anna4.png

आणि नंतर म्हटले मी तारीफ केलीच नाही.

Anna3.png

आधी मी राजकारणात जाणार नाही ह्या कारणासाठी केजरीवालला पाठिंबा दिला नाही. आणि मग सगळ्यांना सोडून ममता बॅनर्जीला पाठिंबा द्यायला गेले.

Anna5.png

सगळाच गोंधळ. कुठेतरी अहंकाराची ओढाताण झाली असावी का? की बाँग्रेसकडून असली काही ऑफर मिळाली असावी?
Anna2_0.png

एकंदरीत हे सगळं पाहिलं तर केजरीवालांनी अण्णांना फसवलं म्हणण्यात फार अर्थ राहत नाही. मागे कुठेतरी वाचलं होतं, केजरीवाल अण्णांच्या जीवाशी खेळले,त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकललं. पण कितीजणांना माहीत आहे की केजरीवाल स्वतः डायबिटीक आहेत आणि तसं असताना त्यांनी १३ दिवस अन्नसत्याग्रह केला होता? पण कदाचित ती नौटंकी असावी, जीवाशी खेळ नाही !
अण्णांनी नंतर IAC च्या नावावर सुद्धा स्वतःचा अधिकार सांगितला असं वाचण्यात आलं.
त्यामुळे माझ्याकडून तरी अण्णा सच्चे देशभक्त आहेत (आधी असतील) ह्या वाक्यावर फुली.
विरोधी मतं वाचायला आवडेल.

रूमाल

आणि हो, पुरावे देण्याची तयारी ठेवा. संघाबाबत भलते सलते आरोप केल्याने राहुल गांधींवर केस करणार होते ते. जरा जपून.

विचारवंत,
नितीसेन्ट्रल???? Lol

<<त्यामुळे काहीही बरळण्याच्या आधी विचार करा.>> धमकी देताय का?
मला हे माहीत आहे आर एस एस बद्दल.
मीसुद्धा आर एस एस मधल्या काही चांगल्या, शिस्तप्रिय आणि देशप्रेमी लोकांना ओळखते.

ठिक आहे ना. १२वीची परिक्षा होती मुलीची त्यांच्या. तिचं नुकसान झालं असतं मोठ्यांच्या गोंधळात.

हुश्श...झाला सगळा कल्पनाविलास :P>>>>>>>

बर झाल हे सांगितले ते नाहीतर मला वाटले होते हे तुमचे निरिक्षण आहे. त्यामुळे त्याबद्दल काय मुद्दे मांडणार. खर्च वाचला. Lol

अश्विनी +१
केजरीवालांना दिल्लीमध्ये भाड्याने घर मिळत नाहीये. त्यांना घर दिलं तर मिडिया, काँग्रेस आणि भाजपाचे लोक त्रास देतील अशी भिती वाटतेय म्हणे लोकांना.

"बंधु, दिल्ली में कोई हमें घर देने को तैयार नहीं है।’
यह न तो मुंबई की तर्ज पर किसी मुसलिम का कथन है और न ही घर ढूंढ़ने वाले किसी बेरोजगार का जिससे किराया मिलेगा या नहीं, इस अंदेशे से मकान मालिक घर देने से इनकार कर दे।
ये शब्द हैं अरविंद केजरीवाल के। वही केजरीवाल जिन्होंने दिल्ली में बेघरों को घर दिलाने की जद्दोजहद की।
सर्द रातों में किसी को खुले आसमान तले रात न गुजारनी पड़े, इसके लिए उनके मंत्री जद्दोजहद करते रहे।
उन्हीं केजरीवाल को दिल्ली में कोई किराए पर मकान देने को तैयार नहीं है।"

हे वाचून ज्यांच्या मनात "बरं झालं, फार उड्या मारतो केजरीवाल" ह्यासारखा विचार येऊन गेला त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायची गरज आहे. प्रामाणिक आहे, आणि तत्वांवर राजीनामा दिला म्हणून माजी मुख्यमंत्र्यावर अशी वेळ येऊ शकते तर आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय वातावरण तयार करत आहोत!

माने,
मी कल्पनाविलास मांडला आता तुम्ही सत्यकथा लिहा. उसमें क्या?

>>केजरीवालांना दिल्लीमध्ये भाड्याने घर मिळत नाहीये. त्यांना घर दिलं तर मिडिया, काँग्रेस आणि भाजपाचे लोक त्रास देतील अशी भिती वाटतेय म्हणे लोकांना. >>.

मुदत संपली तरी हा प्राणी घर सोडणार नाही अशी भीती असावी, रास्त. मुलीच्या परीक्षेचे कारण दिले त्याने यावेळी, पुढच्यावेळी दुसरे कारण सांगून ठाण मांडून बसायचा. अरविंदला दिली ओसरी आणि अरविंद हातपाय पसरी Wink

नाही मिर्ची आम्ही आप विरोधी असलो तरी इतक्या खालच्या पातळीवरचे विचार केजरीवालच काय, तर इतर कुठल्याही पक्षा/ अपक्षाच्या/ व्यक्तीच्या बाबतीत करणार नाही, कारण आपण सर्व आधी माणुस आहोत नन्तर भारतीय.

आणी कॉन्ग्रेस किन्वा भाजपाने सुद्धा इतक्या खालच्या पातळीवर येऊच नये ही माझी ठाम अपेक्षा आहे.

लोकपाल कायद्यासाठी अण्णांचे महाउपोषण दिल्लीत सुरू होते तेव्हा त्या आंदोलनामागे रास्वसं असल्याच्या अनेक बातम्या वाचनात यायच्या.
त्यापूर्वी याच मंडळींनी भ्रष्टाचारविरोधी आघाडी उघडायचा प्रयत्न केला होता, पण हवे तसे यस मिळाले नाही तेव्हा अण्णांना त्यात ओढून उपोषणाचा घाट घातला गेला.

http://communalism.blogspot.in/2012/08/india-rss-corruption-and-high-soc...

लिंक ब्लॉगची असली तरी तिथे इंडियन एक्स्प्रेसमधली बातमी/लेख आहे.
In fact, it was at the Vivekananda International Foundation last year that a decision was taken to form an anti-corruption front under Baba Ramdev — this was just days before Anna Hazare sat on his first fast. The foundation’s director is Ajit Doval, a former director of the Intelligence Bureau. It was at the foundation again that the first serious attempt was made to bring Ramdev and Team Anna members together.

http://archive.indianexpress.com/news/i-am-thread-that-binds-anna-kejriw...

http://www.hindustantimes.com/comment/columnsothers/a-differential-calcu...
The materials of history thus suggest that the parallels between JP and Anna are less comforting than we might suppose. Front organisations of the Jana Sangh’s successor, the BJP, are now playing an increasingly active role in ‘India against corruption’. While Anna cannot be blamed for the infiltration of his movement by partisan interests, he certainly stands guilty, as did JP, of suggesting that the street — or the maidan — should have a greater say in political decision-making than a freely elected Parliament.

नक्की कोण कोणाला वापरून घेत होते? नक्की केव्हा बिनसलं?

"इन्डिया अगेन्स्ट करप्शन" ला भाजपची 'बी' टीम अशी लेबलं लागली होती. 'आप'ला काँग्रेसची 'बी' टीम अशी लेबलं लागली. मेरी बिल्ली मुझीसे म्यांव असं झालं का?

Pages