अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिष, केदार, युरो ह्यांनी देशाच्या इकॉनॉमी आणि आप च्या इकॉनॉमिक पॉलिसीबाबत मुद्दा मांडलाय. एक खूप मोठा फरक मला जाणवला तो म्हणजे - तुम्ही सगळे पॉलिसी बद्दल बोलताय ते असं गृहित धरून की सरकारची तिजोरी रिकामी आहे. त्यामुळे जनतेला सबसिडी दिली तर तिजोरीवर ताण पडेल. आणि दुसरीकडे कर वाढवावे लागतील.
आणि केजरीवालांच्या २-३ मुलाखतींमध्ये मी ऐकलं की सरकारकडे भरपूर पैसा आहे, आपण तो योग्य नियोजन करून वापरला तर उलट कर कमी करता येतील. >>
मिर्ची.. आम्ही कधीही म्हणालो नाहिये की सरकारची तिजोरी रिकामी आहे. शिवाय फक्त रिकामी तिजोरी भरण्यासाठीच आर्थिक धोरण अवलंबवायचे नसते. भरलेली तिजोरी असेल तरी सुद्धा ती भरलेलीच रहावी/वाढावी जेणेकरून कल्याणकारी योजना राबवता येतील हेही बघायचे असते. महागाइ वाढू द्यायची नसते , करांचं नियोजन करायच असतं, उद्योगांसाठी सवलती द्यायच्या असतात, त्यांच्यासाठी धंदा करणं सोपं होइल असे नियम बनवायचे असतात, अश्या बर्‍याच गोष्टी येतात आर्थिक धोरणात. आर्थिक धोरणातच गुंतवणुक्/निर्गुंतवणूक धोरणंपण येतात. आर्थिक धोरण म्हणजे फक्त सबसिडी कोणाला देणं हे ठरवणं नव्हे. याबद्दल आआपनं कधी काही बोललेलं मी तरी नाही बघितलं. त्यांच्याकडून 'भ्रष्टाचार' या एकाच विषयाबद्दल बोललं जातं.

बाकी तुमच्या एकंदर पोस्टस वरून तुम्ही फारच आदर्शवादी विचारांच्या आहात असं दिसतंय (त्यात चुकीचं काहीच नाही).

विकारवंत .............. Lol एखादा पगारी माणूस तरी जरासं डोकं वापरेल असं वाटतं बघा तुमच्या पोष्टी वाचून. अशा पोष्टी लिहीणा-या कुणा जोशी, अजय हांग्रे, सुरेश काने, चहावाला, शायर पैलवान, कापुस, बापुस, भारतिय,................................... दम लागला Rofl

तुमचा गैरसमज होतोय. या जगात ज्ञानी सुब्रमणियम स्वामी आणि तुम्ही. उगाच उदार होउ नकासा. तुमच्या अनेक पोस्ट्स या कारवाई होण्यायोग्य आहेत याची आठवण ठेवा आणि धमक्या कमी करा किंवा जे करायचंय ते करून मोकळे व्हा. इशारेबाजी कशाला करताय.

(आता तुमच्या हहगलो वाल्या पोष्टी येणार, मग ........................... सो प्रेडीक्टेबल बिनडोकपणा. तक्रार करा नाहीतर मनूचा मासा मधले उतारे देऊ Proud )

देशाला नमोंसारखं नेतृत्व लाभलेलं असताना त्यांची टिंगल करणा-या या माणसाविरुद्ध काहीच कारवाई का होत नाही ? आजपर्यंत कुणीच तक्रार का केलेली नाही ? कुणाच्यातच हिंमत नाही की काय ? खुले आम नमोंविरुद्ध टीका ? हे कसं खपवून घेतात भक्त ? भक्तांबद्दलचा विश्वास कमी होऊ लागलाय ? ते सुक्या धमक्या देतात की काय असं वाटू लागलं आहे.

भक्तांनो,
आवाहन आहे. कारवाई करा या माणसावर.

http://www.youtube.com/watch?v=0Sq8rUvcIuM

नाही नेम लागलेला नाही. उलट बरंच आहे संशयकल्लॉळ. तुम्हाला या आयुष्यात ओळखू यायचं नाही.

गुजरातमधल्या शेतीच्या विकासाबद्दल ज्या लिन्क्स दिल्या आहेत त्यावर काही लिहू शकाल का? कारण (दुर्दैवाने?) गुजरातमध्ये विकास झालेला नाही असल्याच बातम्या (दाखल्यांसहित) माझ्यासमोर येतात.
----- दोन्ही प्रकारच्या, विकास झालेला आहे अथवा विकास झालेला नाही आहे, बातम्या देणार्‍या स्त्रोतान्ची विश्वासार्हता काय आहे हे पण तपासायला हवे. BBC सारख्या सन्केत स्थळी पण मथळ्यात भडक काही लिहीलेले असते आणि खाली बातमीत कुठेतरी दुरान्वये स्पर्श केलेला असतो.

http://deepakpithwa.com/index_files/Page266.htm

गुजरात बद्दल सरकार जे सांगतंय त्याची दुसरी बाजू जाणून घेण्यात ज्यांना रस आहे त्यांनी या वेबपेजवर जाऊन श्री दीपक पिथवा यांच्याशी संपर्क साधावा. तुम्हाला नियमित माहीती मिळू शकेल. फेसबुक वर असाल तर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवा.

सत्येंद्र दुबे खून खटल्याशी अरविंद केजरीवाल यांचा संबंध होता किंवा कसे , असल्यास कशासाठी यावर कुणी प्रकाश टाकू शकेल का ? या केसचं पुढे काय झालं ?

<<मनिष, केदार, युरो ह्यांनी देशाच्या इकॉनॉमी आणि आप च्या इकॉनॉमिक पॉलिसीबाबत मुद्दा मांडलाय. एक खूप मोठा फरक मला जाणवला तो म्हणजे - तुम्ही सगळे पॉलिसी बद्दल बोलताय ते असं गृहित धरून की सरकारची तिजोरी रिकामी आहे. त्यामुळे जनतेला सबसिडी दिली तर तिजोरीवर ताण पडेल. आणि दुसरीकडे कर वाढवावे लागतील.
आणि केजरीवालांच्या २-३ मुलाखतींमध्ये मी ऐकलं की सरकारकडे भरपूर पैसा आहे, आपण तो योग्य नियोजन करून वापरला तर उलट कर कमी करता येतील. >>

मिर्ची ताई मी यावर सविस्तर उत्तर देईन थोडा वेळ द्या. बरेच मुद्दे लिहावे लागतील.

<<मिर्ची.. आम्ही कधीही म्हणालो नाहिये की सरकारची तिजोरी रिकामी आहे. >>
ओक्के. पण एकंदर असं वाटलं. तुमचं मत असं असावं असं गृहित धरल्याबद्दल क्षमस्व.:)

<<आर्थिक धोरण म्हणजे फक्त सबसिडी कोणाला देणं हे ठरवणं नव्हे. याबद्दल आआपनं कधी काही बोललेलं मी तरी नाही बघितलं. त्यांच्याकडून 'भ्रष्टाचार' या एकाच विषयाबद्दल बोललं जातं.>>
मनिष,
आपकडे आदर्श शास्त्री आहेत (अ‍ॅपलचे सीईओ होते), मीरा संन्याल आहेत(रॉयल बँक ऑफ स्कॉटलँडच्या अध्यक्षा होत्या) असे अनेक आहेत.
काहीतरी तर विचार करतच असतील ना ते?

"Power companies are playing dirty game with the people-
He told that for the last 20 days, the power companies are resorting to power cuts for long hours. At present the temperature in the capital has reached 45°c but the power companies have no sympathy for the people of Delhi. In spite of the fact that Delhi Government and DERC are aware of it, the power companies are doing this deliberately.
These companies are selling power meant for Delhi at the rate of Rs. 5 to 8 per unit to neighboring States like UP, Haryana, Rajasthan, Uttrakhand, Punjab and Himachal and earning heavy profit."

"उन्होंने कहा सरकार पेट्रोल पर 20 प्रतिषत वैट वसूलती है। इतना ही वैट फाइव स्टार होटल में षराब के पैग पर लगता है। यदि सरकार जनता की मुष्किलों को समझती तो उसे पेट्रोल पर वैट 20 %से घटाकर 5 प्रतिषत करना चाहिए था। अब भी दिल्ली में पेट्रोल 6.30 रूपए मंहगा है। पेट्रोल के दामों में वृद्वि से चैतरफा मंहगाई बढ़ेगी। इसका सीधा वार आम जनता पर होगा। "

हे सगळं कोण बोलतंय माहीत आहेत? नॉट केजरीवाल. हे आहेत भाजपाचे लोक. पण निवडणूकीच्या आधी. आता चुपचाप. ह्यामध्ये कुठली आर्थिक निती असावी?

<<बाकी तुमच्या एकंदर पोस्टस वरून तुम्ही फारच आदर्शवादी विचारांच्या आहात असं दिसतंय (त्यात चुकीचं काहीच नाही).>>
फारच नसावी. पण आहे (आणि अजून पर्यंत टिकून आहे!)

उदय +१

आब्र,
तुम्ही लालूंना का फॉलो करताय म्हणे ? Uhoh Lol

युरो,
हे आवडलं. नक्की लिहा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा.

मी : आपला आर्थिक पॉलिसी आहे असे वाटत नाही.

मिर्ची : केजरीवालांच्या २-३ मुलाखतींमध्ये मी ऐकलं की सरकारकडे भरपूर पैसा आहे, आपण तो योग्य नियोजन करून वापरला तर उलट कर कमी करता येतील

मी : हे वाक्य टाळ्यांसाठी / नाइव्ह लोकांसाठी चागंले.

मिर्ची : करवादू नका, भाजपची पॉलिसी तुम्ही लिहा.

मी : मी प्रवक्ता नाही.

मिर्ची : अपेक्षित उत्तर

थोडक्यात मी लिहितोय मिर्चीने दिलेल्या आपच्या स्टान्सबद्दल आणि मिर्ची उतरतात, भाजपाचेच काय ते सांगा.

आपच्या आर्थिक पॉलिसीत भाजपा कुठे, कशी आणि का आली ते कळत नाही. :|

तुम्हाला पॉलिसी नाही का? की सरकारकडे भरपूर पैसा आहे म्हणून गरज नाही?

<<तुम्हाला पॉलिसी नाही का? की सरकारकडे भरपूर पैसा आहे म्हणून गरज नाही?>>

आप म्हणजे मी नव्हे. मी पण आपची प्रवक्ती नाही. फक्त समर्थक आहे. मला जे दिसतंय, वाटतंय ते लिहितेय. तुम्ही अर्थविषयातील तज्ञ आहात. आप ला पॉलिसी नाही म्हणता तेव्हा भाजपाची तुम्हाला दिसलेली पॉलिसी समजावून सांगितलीत (प्रवक्ता म्हणून नाही) तर ती चर्चा होईल. अन्यथा नुसताच वाद.

(पांशा : केदार ही व्यक्ती अतिशय भावनाप्रधान असावी असं वाटतंय. आप जिंकली म्हणून टीमला जेवण देणे आणि आता आप चं नाव काढताच चवताळून उठणे ह्यामुळे सुरूवातीला आप ला दिलेला पाठिंबा हासुद्धा बुद्धीपेक्षा भावनेने दिला असावा असं वाटतंय. त.टी. - मी टॅरोकार्ड रीडर, फेसरीडर, पोस्ट-टु-माइण्ड रीडर ह्यापैकी कुणीही नाही. पण त्यामुळे अंदाज बांधायचा माझा हक्क कुणीही नाकारू शकत नाही.)

मिर्ची, तुम्ही आपच्या प्रवक्त्या नाही, त्यामुळे मी मागच्या पानावर मांडलेल्या "कोणी कोणाला वापरले?" या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित नाही. पण असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का?

४ डिग्री तापमानात रस्त्यावर धरणे धरण्याचे कौतुक करायचे असेल तर मुलीच्या बारावीसाठी घर न सोडण्यासाठी टीकाही स्वीकारायला हवी.

आता बरेच जण आपच्या प्रचारपद्धतीवर, कोणालाही तिकिटे देण्याबद्दल टीका करत आहेत. पण दिल्ली विधानसभा निवडणुकींच्या वेळी आपचा घरोघर जाऊन प्रचार कौतुकास्पद ठरला होता.

आपने लोक स्वतःच्या पैशाने निवडणुका लढवताहेत ना? मग घ्या आमच्य तिकिटावर उभे रहा. जिंकलात तर आपचा फायदा. हरलात तरी नुकसान काहीच नाही अशी भूमिका घेतली होती का?

केजरीवाल सगळ्या प्रश्नांची अगदी सोपी उत्तरे शोधत आले आहेत. भ्रष्टाचार बंद झाला की सगळा पैसा जनकल्याणाला मिळेल. लोकपालसारखी एक पॅरॅलल यंत्रणा उभारली की भ्रष्टाचार बंद.

भाजपची अर्थनीती काय आनि ती काँग्रेसपेक्षा वेगळी कशी या प्रश्नाचे उत्तर शोधायचा (अयशस्वी) प्रयत्न युपीएच्या लेखाजोखा कार्यक्रमात झाला होता.

मीर्ची ताईनी आगामी विधानसभेला हुभे राहावे.
"चांगल्या मिरच्या राजकारणात आल्या पाहीजेत "असे भ्रष्टाचार निर्मुलनचे प्रणेत श्रीयुत चि.ली. ढोबळे यांनी सांगुनच ठेवले आहे.
(चिंतामण लीलाधर ढोबळे यांचा नम्र अनुयायी-धिरज काटकर)

भाजपची अर्थनीती काय आनि ती काँग्रेसपेक्षा वेगळी कशी या प्रश्नाचे उत्तर शोधायचा (अयशस्वी) प्रयत्न युपीएच्या लेखाजोखा कार्यक्रमात झाला होता. >>

नाही ! तिथेही मी भाजपा काय करेल हे मांडले नाही, तर काँग्रेसने काय केले हे मांडले आहे. अर्थात तिथेही जळी स्थळी मोदीला आणले, पण मी गुजराथ मॉडेल वर वेगळी चर्चा करा असा स्टान त्या बाफवर अनेकदा घेतला आहे.

आता आप चं नाव काढताच चवताळून उठणे >>. Lol चवताळून उठणे हा तुम्ही लावलेला आरोप आहे. जो खरा नाही. तुमचे मुद्दे खोडले की तुम्हीच उलट रागात येऊन लिहिता असे दिसते.

मी पण आपची प्रवक्ती नाही. >>. तेच तर मी लिहिले आहे तर तुम्ही लिहिता की अपेक्षित उत्तर, आता मी काय लिहावे? म्ह्णून म्हणतो ज्या प्रश्चाच्या उत्तराची गरज इथे नाही, ते प्रश्न का आणायचे. हा बाफ वर मोदी अन भाजपावर दर पोस्ट मध्ये नेण्यापेक्षा आप आणि केजरीवालवर ठेवा की !

आपने काँग्रेसला खिंडार पाडले म्हणुन भाजप्यांना आप प्रिय झाली .मोदीँच्या विरोधात मोर्चा वळवल्यानंतर भाजप्यांची प्रचंड जळजळ झाली .खरेतर भाजप व उजव्या लोकांनीच अण्णा आंदोलन सोमिच्या माध्यमातून पसरवले, परंतु शेवटी केजु त्यांच्यावरच उलटले .असो ,महागाईला भ्रष्टाचार कारणीभूत असतो .जनलोकपाल बाबतीत भाजपची भूमिका काँग्रेस सारखी आहे यावरुन भारतात महागाई कमी होणार नाही हे नक्की.उलट मोदी आल्यापासून महागाई वाढली आहे.

लालूंनी थोडीशी रंगत नाही आणली का ?
बादवे, त्या काळात संसदेत काय होतंय हे देखील खाजगी वृत्तवाहीन्या दाखवत नव्हत्या आणि सरकारी वृत्तवाहीनी आता कुणी पाहतच नाही. २४ तास अण्णा एके अण्णा आणि "एके" एके "एके" Wink सरकारची बाजू काय आहे हे कळतच नव्हतं. सरकार चोर आहे नाही तर संसद चोर.आहे असं एकेंचं स्टेटमेण्ट होतं. संसद, लोकशाही, निवडणुका या सर्वांविरोधात एकेंची भाषणं होती. त्यालाच ते व्यवस्था म्हणत होते. आंदोलनाच्या स्टेजवर एक मोठी चूक राहून गेली होती जी पुढच्या मुंबईच्या उपोषणकाळात सुधारली. त्या स्टेजमुळेच या आंदोलनच्या पाठीमागे कोण आहेत, त्यांचे उद्देश काय आहेत याबद्दल शंका निर्माण होत होती. या संशयाला बळकटी देणारी भाषणं, अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होत असतांना त्याचं होणारं कौतुक, ते कौतुक करणारे लोक.. सगळं स्पष्ट होतं. पुढच्या घटनांचा जर अभ्यास केला तर फक्त अवलोकनातून बरंच काही समजतं.

>>पुढच्या घटनांचा जर अभ्यास केला तर फक्त अवलोकनातून बरंच काही समजतं.>>

यावर तुमचे भाष्य वाचायला आवडेल. काय समजतं नेमकं ते जरा विशद करुन सांगता का. Could you please care to elaborate on your study of this?

वर कुणी तरी प्रश्न विचारलेला आहे की केजरीवालांनी वाराणसीतून निवडणूक का लढवली ?

का लढवली हा प्रश्न बाजूला ठेवूयात. काय झालं हे पाहू.
वाराणसी मधून मुरली मनोहर जोशी निवडून आले तेव्हां त्यांचं मार्जिन होतं १५,०००० मतांचं. निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला तितकीच मतं कमी पडली होती.बसप आणि सप यांच्य मतांमधे फारसं अंतर नव्हतं. काँग्रेसला देखील लक्षणीय मतं पडली होती. थोडक्यात सप + बसप + काँग्रेस अशी फाटाफूट होऊनही भाजपचा उमेदवार फक्त १५००० मतांनी जिंकून आला हे चिंताजनक होतं. म्हणजेच हा मतदार संघ काही सुरक्षित म्हणता येत नव्हता. म्हणून जर या उमेदवाराला सुरक्षित मतदारसंघ बनवायचा असेल तर विरोधी मतांमधे प्रचंड प्रमाणात फूट पडायला हवी. म्हणजेच असा उमेदवार हवा की जो फक्त गैरभाजपेयी मतं घेईल.

अरविंद केजरीवाल आणि आपची इमेज विष्णू शास्त्री याच्या हिंदू राष्ट्र सेना या अंघटनेच्या हल्ल्यानंतर हिंदुत्वविरोधी आणि भारतभूषण यांच्या काश्मीरबाबतच्या वक्तव्यानंतर सेक्युलर अशी करण्यात आली होती. बसपाच्या ज्या उमेदवाराने मुस्लीम मतं घेतली, त्याला अपक्ष म्हणून उभे करण्यात यश आले. काँग्रेसनेही आपला उमेदवार दिला आणि केजरीवालांनी लक्षणीय मतं घेत मोदींचा विजय सोपा केला. सप आणि बसपाने उमेदवार दिलेच होते. जर केजरीवाल तिथून उभे राहीले नसते आणि जर विरोधकांनी एकजूट केली असती तर मोदी निवडून आले असते का ?

हेच अमेठीबाबतही म्हणता येईल. कुमार विश्वास हे उघडपणे भाजपच्या बाजूने होते. राहुल गांधींविरुद्ध त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. इथे भाजपला संधी नव्हती. पण काँग्रेसच्या मतांमधे फूट पडली तर चमत्काराला वाव होता. त्यासाठी स्मृतीबाई या मतदारसंघामधे उभ्या राहण्यास तयार झाल्या. कुमार विश्वास यांच्यामुळे राहुल गांधींच्या मतांमधे प्रचंड फाटाफूट झाली. नाराजीचा फॅक्टर होताच, तो एन्कॅश केला गेला. कुमार विश्वासही निवडून आले असते किंवा स्मृतीबै तरी आल्या असत्या अशी परिस्थिती निर्माण केली जात होती. भाजपच्या मतांमधे कुणी वाटेकरी नसल्याने त्यांना फाटाफुटीचा धोका नव्हता. इथे राहुल गांधी थोडक्यात निवडून आले.

कुणाचा कुणाला फायदा झाला हेआपले आपण ठरवावे.

विचारवंत
तुम्ही मला प्रश्न न विचारलेले उत्तम. ही पोस्ट मी लिहायला घेतली तेव्हां तुमचा प्रतिसाद नव्हता. हे तुम्हाला उद्देशून दिलेलं उत्तर नाही. तुम्ही कितीही चकाट्या पिटल्या तरी तुम्हाला उत्तर दिलं जाणार नाही. तुमच्यासाठी लालूप्रसादांचे व्हिडीओज दिले जातील फारतर... तुम्ही स्वतःचे दोन पैसे लावा आधी. डोण्ट बिहेव लाईक सुस्वा.

>>आणि भारतभूषण यांच्या काश्मीरबाबतच्या वक्तव्यानंतर >>

प्रशांत भूषण म्हणायचंय का तुम्हाला (की शांती भूषण)? भारतभूषण अ‍ॅक्टर होता ना? Proud

>>तुम्ही मला प्रश्न न विचारलेले उत्तम.>>

उत्तर देता येत नाही असं स्पष्ट म्हटलं असतं तरी वाईट नसतं वाटलं हो Wink

Pages