अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<नाही मिर्ची आम्ही आप विरोधी असलो तरी इतक्या खालच्या पातळीवरचे विचार केजरीवालच काय, तर इतर कुठल्याही पक्षा/ अपक्षाच्या/ व्यक्तीच्या बाबतीत करणार नाही, कारण आपण सर्व आधी माणुस आहोत नन्तर भारतीय.>>

रश्मी, हे आवडलं Happy
पण तुमच्या आधीची पोस्ट बघा. <<मुदत संपली तरी हा प्राणी घर सोडणार नाही अशी भीती असावी, रास्त. मुलीच्या परीक्षेचे कारण दिले त्याने यावेळी, पुढच्यावेळी दुसरे कारण सांगून ठाण मांडून बसायचा. अरविंदला दिली ओसरी आणि अरविंद हातपाय पसरी >> काय म्हणणार अशांना ? गेट वेल सून, हो ना Wink

मनिष, केदार, युरो ह्यांनी देशाच्या इकॉनॉमी आणि आप च्या इकॉनॉमिक पॉलिसीबाबत मुद्दा मांडलाय. एक खूप मोठा फरक मला जाणवला तो म्हणजे - तुम्ही सगळे पॉलिसी बद्दल बोलताय ते असं गृहित धरून की सरकारची तिजोरी रिकामी आहे. त्यामुळे जनतेला सबसिडी दिली तर तिजोरीवर ताण पडेल. आणि दुसरीकडे कर वाढवावे लागतील.
आणि केजरीवालांच्या २-३ मुलाखतींमध्ये मी ऐकलं की सरकारकडे भरपूर पैसा आहे, आपण तो योग्य नियोजन करून वापरला तर उलट कर कमी करता येतील.

>>>

मिर्ची, अहो आम्ही बोलत काय आहोत आणि तुम्ही लिहित काय आहात. काही ताळमेळ नाही. पॉलिसी म्हणजे काय? आणि कोणी कुठे काय गृहित धरले आहे?

म्हणून म्हणतो आपला आर्थिक निती कळत नाही. (अजून तरी). हे उत्तर फार तर सभेत टाळ्या मिळवायला किंवा आर्थिक बाबतीत नाईव्ह लोकांचा पाठींबा मिळवायला बरे आहे.

पण भाड्यानेच का घर घेतोय.............स्वतःचे विकत का घेत नाही...... ? Uhoh

<त्या शुक्राचार्या वर केस करायला हवी.....येडपटासारखा काहीही बोंबलत असतो>

हे आत्ता लक्षात आलं? किमान दोन दशके झाली .त्यांना तेच हवंय. येनकेनप्रकारेण.....

>>पण भाड्यानेच का घर घेतोय.............स्वतःचे विकत का घेत नाही...... ? >>>

अहो भाड्याने देत नाही कुणी....विकणार काय? सोसायटीची परमिशन लागते ना.

मिर्चीताई लोकसभा निवडणुकीत आपच्या मतांची टक्केवारी वाढली असे आपणच ह्या धाग्यावर कुठेतरी लिहिले आहे. त्या दिल्लीत अरविंद केजरीवालांना भाड्याने घ्रर मिळत नाही हा विरोधाभास नाही वाटत तुम्हाला. कि ज्या शहरात एवढे समर्थक आहेत तिथे भाड्याने घ्रर न मिळने.

उदयन घर विकत घ्यायचे आणी ते ही दिल्लीसारख्या महानगरात?

आपला भलेही भरपूर निधी मिळाला असेल पक्षासाठी, पण केजरीवाल यानी तो स्वतःकरता वापरला नाही/ नसेल. निदान या बाबतीत तरी माझा त्यान्च्यावर विश्वास आहे. त्यान्च्या भोवतालचे कोण्डाळे जर हटले तर ते काही करु शकतील अन्यथा नाही.

जसे कै. राजीव गान्धीन्च्या आसपास ते माखनलाल फोतेदार सारखी चान्डाळ चौकडी होती, तसेच सध्या केजरीवाल यान्चे झाले आहे.

>>मिर्चीताई लोकसभा निवडणुकीत आपच्या मतांची टक्केवारी वाढली असे आपणच ह्या धाग्यावर कुठेतरी लिहिले आहे. त्या दिल्लीत अरविंद केजरीवालांना भाड्याने घ्रर मिळत नाही हा विरोधाभास नाही वाटत तुम्हाला. >>>

माने ठ्ठो Rofl

हायला हा प्वॉइंट लक्षातच नव्ह्ता आला

य दोन्ही बातम्या वाचून बरे नक्कीच वाटले नाही.

http://indianexpress.com/article/cities/delhi/for-kejriwals-tilak-lane-h...

“The rent of Rs 85,000 is being paid by Arvind Kejriwal’s batchmates from IIT,” AAP spokesperson Nagendar Sharma confirmed.

http://indianexpress.com/article/india/politics/arvind-kejriwal-to-vacat...
The source, meanwhile, added that Kejriwal was looking to have the house allotted in the name of his wife, who is a senior IRS officer.

The source said that Kejriwal’s wife, Sunita, is due for a promotion in her job which would entitle her to accommodation of a type similar to the one on Tilak Road, but noted that it could take a couple of months due to the change of guard at the Centre.

<<मिर्ची, अहो आम्ही बोलत काय आहोत आणि तुम्ही लिहित काय आहात. काही ताळमेळ नाही. पॉलिसी म्हणजे काय? आणि कोणी कुठे काय गृहित धरले आहे?>>

तुम्ही भाजपाची पॉलिसी समजावून तर सांगत नाहीत आणि नुसतंच करवादताय !
नाइव्ह असलो तर शिंपडा की थोडं ज्ञान आमच्यावर पण. काढा तेवढा वेळ.

मयेकर,
अण्णांना १९८३ मध्ये संघांच्या नानाजी देशमुखांकडून दीक्षा मिळाली. अण्णा संघाचे कार्यकर्ते होते.

Anna & RSS.jpg

"The RSS chief, Mohanrao Bhagwat, has said that although the RSS never actively supported the Jan Lokpal movement, it was the RSS that urged Anna Hazare to go on the anti-corruption crusade.
The RSS leader also claims that they had spoken to Baba Ramdev as well on starting an anti-corruption movement.
In an interaction with journalists in Kolkata, Bhagwat claimed that Hazare's association with the RSS goes back a long way, and that Hazare used to visit and train RSS cadres in Maharashtra."

म्हणून तर मला अण्णा आंदोलन हा शब्द आवडत नाही. ते लोकांचं आंदोलन होतं, जे अण्णा, किरण बेदी, व्हीकेसिंग सारख्या लोकांनी धुळीत मिळवलं. Angry

उदयन घर विकत घ्यायचे आणी ते ही दिल्लीसारख्या महानगरात? >>>>>>> रश्मी त्यांची संपत्ती १ कोटीच्य घरात आहे वर दोघे सरकारी नोकरीत आहेत... केजरी ने भले नोकरी सोडली असेल परंतु त्यांच्या बायको अजुन सरकारी कर्मचारी आहे आणि असिस्टंट कमिशनर सारख्या पदावर आहे ....... अश्या वेळेला बँक एक वेळॅला तुम्हाला आम्हाला कर्ज देणार नाही पण सरकारी नोकरांना पहिले कर्ज देते...... कर्ज घेउन घर घेता येत नाही ? Uhoh

नवल आहे.......

गुरगावात आहे बहुतेक मालकीचं घर. मुख्यमंत्री व्हायच्या आधी कुठे तरी राहातच होते ना.
बायकोला गाझियाबादमध्ये क्वार्टर्स मिळाले होते.

उदयन, त्यांचं घर आहे की गाझियाबादमध्ये. दिल्लीचं शोधतायेत ते. परत कशाला विकत घेतील.

ती बातमी मी सहानुभूती वगैरेच्या दृष्टीने टाकलेली नाही. विचारवंतांनी मुख्यमंत्री निवासाचा विषय काढला म्हणून विरोधाभास दाखवायला टाकली. कारण मी नुकतीच ती बातमी वाचून घरच्यांसमोर चिडचिड केली होती. Happy

>>उदयन, त्यांचं घर आहे की गाझियाबादमध्ये. दिल्लीचं शोधतायेत ते. परत कशाला विकत घेतील.>>>

मग भाड्याने घर मिळत नाही वगैरे गळे का काढले जातात?

म्हणून तर केजरीवालवरचा विश्वास कमी झाला ना. हा काय वेगळे करतो आहे बाकीच्या राजकारण्यांपेक्षा. बाकीचे तसेही निगरगट्ट आहेत पण केजरीवाल मी नाही त्यातलाचे तुणतुणे लावत होता ना. पण वेळ आल्यावर फार काही वेगळा वागला नाही. म्हणून तर जे लोक एकदम त्याच्या विरुद्ध झाले आहेत ना. पुन्हा विश्वास संपादन करायला थोडा वेळ नक्कीच लागेल.

दिल्लीत केजरीवाल इतकी प्रचंड मते मिळवू शकले, त्यात ज्या अनेक समाजघटकांचा सहभाग होता, त्यात रिक्षावाले सर्वात महत्वाचा गट होता. त्यांनी आपल्या रिक्षाच्या मागे ‘आप’चे फ़लक लावून केलेल्या प्रचारामुळे ह्या पक्षाला दिल्लीत एक चेहरा मिळू शकला. आज त्यांचीच काय अवस्था आहे? गेले दोनतीन दिवस हे रिक्षावाले गाडीच्या त्याच भागावर ‘केजरीवालने दगा दिला’ असल्या घोषणांचे फ़लक लावून फ़िरत आहेत.

केदार,
तुम्हाला मोदींच्या आर्थिक नितीवर विश्वास आहे ना. गुजरातमधल्या शेतीच्या विकासाबद्दल ज्या लिन्क्स दिल्या आहेत त्यावर काही लिहू शकाल का? कारण (दुर्दैवाने?) गुजरातमध्ये विकास झालेला नाही असल्याच बातम्या (दाखल्यांसहित) माझ्यासमोर येतात.
सगळ्या क्षेत्रातील राहू द्या. फक्त अ‍ॅग्रिकल्चर ग्रोथ बद्दल समजावून सांगा.

मागे माझ्या वाचण्यात हा लेख आला होता.
त्यातले सगळे मुद्दे मी मूळ माहिती पाहून पडताळून पाहिलेले नाहीत. पण एकदा करणार आहे तो उपद्व्याप. त्यातलं बरंच आर्थिक गोष्टींशी संबंधित आहे, म्हणून तुम्हाला लिन्क देतेय.

विचारचंत, चहापाणी घेऊन पुन्हा या. दमला असाल.

वाचली वरची पोस्ट म्हणुन संपादीत केलं.
त्यांच्या मिसेस ना सरकारी निवास्थानाची सोय नाहिये का?
असेल तर त्यांनी नक्कीच घ्यावी.

तुम्ही भाजपाची पॉलिसी समजावून तर सांगत नाहीत आणि नुसतंच करवादताय !
नाइव्ह असलो तर शिंपडा की थोडं ज्ञान आमच्यावर पण. काढा तेवढा वेळ.>>>

मी भाजपाचा प्रवक्ता नाही. ज्ञान शिंपडायला हरकत नाही, रिसिव्ह पण व्हायला पाहिजे ना?

तुम्ही मत मांडत सुटला आहात की सरकार कडे पैसा आहे अन केजरीवाल युं करतील त्युं करतील, म्हणून म्हणलं केजरीने हे लोकांच्या टाळ्या घ्यायला म्हणलेले आहे. इतके सिरियस होऊ नका त्यांच्या वक्तव्यात.

?) गुजरातमध्ये विकास झालेला नाही असल्याच बातम्या (दाखल्यांसहित) माझ्यासमोर येतात. >>. भाजपा = मिडिया हे तुम्हीच लिहिले तरी हा प्रश्न तुम्हाला पडावा?

एखाद्या कल्टच्या बाबा महाराज यांच्या नादाला लागलं की कसं होतं तसं झालाय आप वाल्यांचं. भ्रमनिरास होऊन अनेक लोक बाहेर पडलेच आहेत. उरलेल्यांची मात्र दया येते. समजेल तेव्हा फार फार उशीर झालेला असेल.

मिर्ची
तुझं म्हणणं पुर्ण होऊ दे. मी निखील वागळेंसारखं मध्येच मोठमोठ्याने आपलं घोडं दामटणार नाही Proud असो.
कल्पनाविलास आहे हे सांगणं प्रामाणिक वाटलं. आजकाल कोण माबोवर अशी कबुली देतंय.
मी घटनाक्रम मांडलाय तो निरीक्षणातून. मीडीयातून होणा-या प्रचाराच्या उलट निरीक्षण मांडलेलं आहे.
त्या काळात अण्णा, केजरीवाल, जनलोकपाल यांच्या विरोधात मत मांडणारा भ्रष्टाचारी, देशद्रोही, काँग्रेसी असं वातावरण तयार केलं गेलं होतं. अगदी मोदींच्या विरोधात तो पाकिस्तानी... तसंच काही फरक नाही.

<<मी भाजपाचा प्रवक्ता नाही. ज्ञान शिंपडायला हरकत नाही, रिसिव्ह पण व्हायला पाहिजे ना?>>

असंच उत्तर अपेक्षित होतं. Happy

<<गुजरातमध्ये विकास झालेला नाही असल्याच बातम्या (दाखल्यांसहित) माझ्यासमोर येतात. >>. भाजपा = मिडिया हे तुम्हीच लिहिले तरी हा प्रश्न तुम्हाला पडावा?>>
त्यांच्या बातम्यांमधला विरोधाभास शोधणारे जागे झालेत.

आब्र, रूमाल टाकलेत तिथे लिहिते उद्या. आत्ता बिझी.

अरेरे Rofl

आप हा कल्ट आहे असा आरोप करणा-यांकडे पुरावे आहेत का ? त्यांना आपवाल्यांनी कोर्टात का खेचू नये ? इतरांची टिंगल करायची आणि स्वतःवर आलं की कोर्टाच्या धमक्या, कारवाई अशांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हावं असं माझं मत आहे.

(मनूचा मासा, झोत अशी काही पुस्तकं आहेत ज्यावर अद्याप न्यायालयाची बंदी नाही. ती का नाही ?) एकदा लोकसभेत लालूप्रसाद यादव यांनी केलेल्या एका आरोपामुळे तत्कालीन संवेदनशील पीएम व्यथित वगैरे झाले होत ( हे लोक व्यथित होतात, इतरांची ती फजिती असते) , त्यांच्या कल्टमधून शेम शेम घोषणा केल्या गेल्या. त्या वेळी लालूंनी केलेलं भाषण हे दर्शनशास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमुना असलेलं संसदेतलं अभासनीय असं भाषण ठरलेलं आहे. त्या भाषणामुळे सत्ताधारी बाकं हक्काबक्का झाली होती, एकमेकांकडे पाहण्याशिवाय त्यांच्या हाती काही उरलेलं नव्हतं. भाषणाचा कळसाध्याय म्हणून लालूंनी शेवटी एक पुस्तक समोरच्या डेस्कवर आदळलं आणि पुन्हा उचलून कॅमे-याकडे दाखवत विचारलं :"देखो, कितने अच्छे है हमारे पीएम, देश का भाग्य है की इतना अच्छा पीएम हमे मिला है, तो फिर इस किताब को लिखनेवाले के खिलाफ कोई कार्रवाई क्युं नही हुई, हम चाहते है, इस लेखक को बीच बाजार मे फांसी पे लटका देना चाहीये जिसने हमारे इतने अच्छे पीएम के बारे मे बेजवह ही यह सब लिख दिया, जो मैने थोडी देर बोला था "

सभागृह अवाक झालं होतं.

Pages