अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

People get the government that they deserve.>> +१०००
खरंच असं वाटतं खरं. की कशाला आप चे लोक जीवतोड करत आहेत. आपल्याला गडकरी, निहालचंदांसारखेच राज्यकर्तेच आवडतात बहुतेक. सोमनाथ भारती रात्री उठून नागरिकांच्या मदतीला गेले तर सगळे त्यांच्यावरच आरोप करत सुटलेत Sad

आब्र,
<<रस्त्यावर झोपण्याचा समारंभ सा-या देशाने पाहीलेला आहे.>>
हो, मी पण पाहिलाय. पण त्यात जनलोकपालबिलाचा काय संबंध?? म्हणून तर मी वाक्यात ते शब्द ठळक करून विचारलंय.

मयेकर,
सोमनाथ भारतींनी जे केलं ते योग्य केलं असं माझं मत आहे (बायस्ड? कल्ट? म्हणू शकता.)
Khirki Ka Sach: Truth Vs. Manufactured by the media
हे सोमनाथ भारतींनी स्वतः लिहिलं असलं तरी त्यासोबत दाखले दिले आहेत. वेळ मिळाल्यास वाचा. मी सविस्तर इथे लिहिणार आहे. आत्ता जरा गडबडीत आहे.

ड्रग आणि सेक्स रॅकेटला वैतागून तिथल्या रहिवाशांनी पोलिसांकडे आधी अनेक तक्रारी केल्या आहेत. काहीही उपयोग झाला नाही (नेक्सस?) त्या बीभत्स प्रकाराला कंटाळून रहिवासी कायदामंत्री सोमनाथ भारतींकडे गेले. आणि ते त्वरित रहिवाशांसोबत गेले.
रहिवासी भारतींना हिरो मानतात. त्यांनी CCTV फूटेज आप कडे दिलं.
पोलिस आणि मिडिया त्या रात्रीचे रॉ व्हिडिओज का दाखवत नाहीत आपल्याला?
कोर्टाने समन्स पाठवलेल्या निहालचंदांना सोडून, स्वतःच्या घरात सेक्स रॅकेट सापडलेल्या कमिशनर सत्यपाल सिंगांना सोडून मिडियाला सोमनाथ भारतींचा मुद्दा का उचलावासा वाटतोय??
Khirki extension locals don't view Bharti's act in black and white

हा व्हिडिओ जरूर पहा.
अनसीन ट्रुथ ऑफ खिडकी एक्टेन्शन

<<आमच्यासारखे नैतिक-सोवळे कोणी नाही, आमच्यासारखे शहाणे कोणी नाही आणि त्या काही ना काही छापलेल्या टोप्या यातलं सगळ्यात जास्त काय खटकतं ते ठरवणं कठीण आहे.>>

हे खटकतंय का बघा बरं तुम्हाला...

Namo products.png

टोप्या हा उपलब्ध रिसोर्सेसमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा उत्तम मार्ग होता. पेपरात लाखो रूपये खर्च करून ही आप च्या टोप्या जड पडत आहेत बघून शेवटी भाजपा पण टोप्यांवर उतरले Happy

Namo cap.png

फार मोठी गडबड आहे. आपण साप सोडून भुई तर धोपटत नाही आहोत ना?

छे, ते वरचे कम्पाईल्ड फोटोज फारच छोटु आलेत. खरंतर एकेक फोटो आणि एकेक वस्तु आहाहा वाटण्यासारखी आहे...जिंजर बाम,पेढे,रोटी, चहाचे पेले, चहा पावडर, पेन्स, साड्या, शर्ट्स, कॉफीमग्ज...मेघना पटेलताईंचं तर काही बोलायलाच नको.
"कहां से आया जी इतना पैसा??" केजरीवालांशी सहमत.

People get the government that they deserve.<< +१ जशी प्रजा तसा राजा असंच काहीसं.

आमच्यासारखे नैतिक-सोवळे कोणी नाही, आमच्यासारखे शहाणे कोणी नाही आणि त्या काही ना काही छापलेल्या टोप्या यातलं सगळ्यात जास्त काय खटकतं ते ठरवणं कठीण आहे. <<< सद्य पक्षांबाबतच आपलं काही ठरलेलं आहे का बघायला हवं.तिथेच गोंधळ असेल तर ही अशी विधानं ठरवणं तुमच्यासारख्या लोकांसाठी अवघडच असणार, मयेकरजी.

अरविंद केजरीवाल झोपले रस्त्यावर्,ठिके...असो. इतर पक्षांचं उदाहरण देणं हे उत्तर नसेल कदाचीत पण म्हणून इतर पक्षांच्या नेत्यांच्या कुरापती,वर्तणुकी कानाडोळा करण्यासारख्या आहेत असं कुणाला म्हणायचंय का?

त्यामानाने आआपच्या अनेक विसंगत वागण्याला प्रामाणिक आणि खरी कारणं आहेत.त्यावर कानाडोळा करताय तुम्ही लोकं. या डेलीया म्हणतात तसं तुम्हा लोकांना हे या दोन अस्थित्वात असणार्‍या पक्षांचंच सरकारच असायला पाहीजे..बघुया तुमचा आआपला असलेला विरोध क्या गुल खिलाता है यापेक्षा ज्या पक्षांची बाजू घेऊन आआप विरोधक बोलतायत ते काय दिवे लावतील ते दिसावेच.

आपवाले नाटक करतात लोकाना वाट्त. दिल्लित आधि लोकानि निवडुन दिल, दोन महिन्यात झिरो करुन टाक्ल. का ते पन कटात सामिल आहे ?

टोप्या हा उपलब्ध रिसोर्सेसमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा उत्तम मार्ग होता. पेपरात लाखो रूपये खर्च करून ही आप च्या टोप्या जड पडत आहेत बघून शेवटी भाजपा पण टोप्यांवर उतरले><<<

या टोप्या "आपने" आणल्या नाहीत. त्या आधीपासून होत्या. कूठे होत्या आणि आपच्या आंदोलनत कश्या आल्या आणी त्याचे फॅशन स्टेटमेंट कसे झाले,. याचा जरा अभ्यास करा. (त्या टोप्यांना गांधी टोपी म्हणतात, आणि कोणे एके काळी अशा टोप्या महाराष्ट्रामध्ये शाळकरी मुलांच्या गणवेषाचा भाग होत्या, इतक्या रोजच्या जीवनमानातली वस्तू आहे)

मला इथेही शिकवणीची गरज आहे.गांधी टोप्या मी पहील्यांदा तेही आआपच्याच डोक्यावर पाहील्या आहेत.

गांधींच्या डोक्यावर ती बघीतल्याचं आठवत नाही.(त्या खादीच्या आहेत आणि त्याचं इनोवेशन म.गां.नी केलं हेच काय ते जुजबी माहीत्ये हो) शिवाय जी पोरं डोक्यावर गांधी टोप्या घालून शाळेत जायची ती 'आम आदमीचीच' होती हेही वाचल्यागत वाटतय. किती चुकीची माहीती लिहीतात ना? Uhoh

बर विषय टोपीवर आलाच कसा,इश्श्यु संपले का काय इतर पक्षांच्या समर्थकांचे.. ?

खिरकी एक्स्टेन्शन संदर्भाने टाइम्समधल्या बातमीतला शेवटचा परिच्छेद : Bharti couldn't establish that "a prostitution-and-drug racket" was operating from the area, but locals want a permanent solution to the problem. The incident, they claim, has made police proactive and vigilant.
त्याआधीचा परिच्छेद आफ्रिकन लोकांना जास्त पैशासाठी घरे भाड्याने देण्यार्‍या (तिथल्या) अनिवासी घरमालकांबद्दल आहे.

बर विषय टोपीवर आलाच कसा,इश्श्यु संपले का काय इतर पक्षांच्या समर्थकांचे.. ? >>>>

विज्ञानदास, मिर्चींनी "टोप्या हा उपलब्ध रिसोर्सेसमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा उत्तम मार्ग होता. पेपरात लाखो रूपये खर्च करून ही आप च्या टोप्या जड पडत आहेत बघून शेवटी भाजपा पण टोप्यांवर उतरले" असं लिहिलं आहे त्यांच्या ह्याच पानावरच्या पहिल्या पोस्टमध्ये.

आधीच्या पानावर भरत मयेकरांनी "आमच्यासारखे नैतिक-सोवळे कोणी नाही, आमच्यासारखे शहाणे कोणी नाही आणि त्या काही ना काही छापलेल्या टोप्या यातलं सगळ्यात जास्त काय खटकतं ते ठरवणं कठीण आहे." असं म्हटलं आहे.

हो काही न काही छापलेल्या टोप्या डोक्यात जाताहेत. सगळ्यांच्याच. काल स्टुडियोत की घरात ते सोमनाथ भारती असंच काही छापलेली टोपी घालून आले होते.
मेधा पाटकर आणि मीरा सन्याल तर त्या टोप्या घालून फारच फनी दिसायच्या.

टोप्या हा उपलब्ध रिसोर्सेसमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा उत्तम मार्ग होता. पेपरात लाखो रूपये खर्च करून ही आप च्या टोप्या जड पडत आहेत बघून शेवटी भाजपा पण टोप्यांवर उतरले" <<< आपच्य टोप्या म्हणजे आआपने इनोव्हेट केल्या असा अर्थ घेतलात. टाटाची नॅनो म्हणजे काय रतन टाटांची नॅनो नव्हे.त्या गांधी टोप्याच आहेत फक्त आआपने आपलं नाव टाकल्याने ज्यांना ते नाव मिळालं त्या स्पेसिफिक टोप्यांविषयी बोललेलं आहे. त्याचंच अनुकरण भाजपने केले... Happy त्या गांधी टोप्याच आहेत.

आमच्यासारखे नैतिक-सोवळे कोणी नाही, आमच्यासारखे शहाणे कोणी नाही आणि त्या काही ना काही छापलेल्या टोप्या यातलं सगळ्यात जास्त काय खटकतं ते ठरवणं कठीण आहे.<<< हे तिन वेगळे मुद्दे आहेत... टोपीवर काय छापायचं हा ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.त्याला डिबेटचा मुद्दा कस बनवला म्हणूनच म्हणालो आआप विरोधकांचे मुद्दे संपले की काय?

<<या टोप्या "आपने" आणल्या नाहीत. त्या आधीपासून होत्या. कूठे होत्या आणि आपच्या आंदोलनत कश्या आल्या आणी त्याचे फॅशन स्टेटमेंट कसे झाले,. याचा जरा अभ्यास करा.>>

फारच बै अभ्यास करायला सांगता तुम्ही ! तुमच्या अभ्यासातून तुम्हाला कळलेलं लिहा की थोडक्यात.
आप ने दावा केलाय का की टोप्या आम्ही आणल्या म्हणून?

"Women say it is not safe to move out alone in the area, especially during the night. "Earlier, we used to go for a walk after dinner. But now, we avoid it. This is a residential colony, but during evening it resembles a busy commercial road. I can't let my five-year-old daughter go out alone," said Sarita (name changed).

Despite several complaints to local police and other senior officials, residents say nothing has been done. Bharti, they say, has done nothing wrong. "Is it wrong to protect the interest of your people? We are not against these African nationals, but we can't allow them to make life hell for us," said A George, member of J-block Resident Welfare Association."

हे पण आहे की त्याच बातमीत. रहिवासी भारतींना पाठिंबा देत आहेत हे कुठल्या चॅनेलवर पाहिलं का?

Khirki extension.jpg

पच्या आधी "अण्णा हजारे" नावाने टोप्या दिसायच्या.>>> आय अ‍ॅम अन्ना किंवा मै हू अन्ना अशा त्या टोप्या जास्त प्रसिद्ध झाल्या. माझ्याकडे दहा बारा आहेत. कुणाला हव्या तर घेऊन जा.

४९ दिवसात एकच टोपी नव्हती, सर्वात महत्वाची टोपी आता घालत आहेत तिच नाव आहे माफिनामा.

"मुझे चाहिये स्वराज" लिहिलेल्या टोप्या डोक्यात जातात आणि "मोदी फॉर पीएम" लिहिलेल्या टोप्या सुखद वाटतात का ?
अण्णांनी त्यांचं नाव लिहिलेल्या टोप्या वापरायला आप ला मनाई केली होती.

बरेच दिवस शोधत होतो तो लेख आज मिळाला.
बिझिनेस स्टँडर्ड २३.११.२०११
How the RSS co-opted Anna
http://www.im4change.org.previewdns.com/latest-news-updates/how-the-rss-...

“The connection between Arvind Kejriwal and RSS is very old. His organisation, Parivartan, had started from the residence of Ved Prakash Goyal, who was also the treasurer of the BJP. Later on Parivartan shifted to another location in east Delhi,” said a senior RSS leader. सध्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल हे वेदप्रकाश गोयल यांचे चिरंजीव आहेत.

मयेकर,
ह्या लेखासाठी धन्यवाद. मी ऐकून होते की अण्णा आंदोलनाचा चेहरा असले तरी मास्टरमाइंड केजरीवालांचं होतं. पण मला तशा आशयाचं कुठे काही मिळत नव्हतं. हा लेख वाचून वरच्या वाक्यावर आणखी विश्वास बसतोय.

"After holding a series of meetings with Anna Hazare at his village, Ralegaon Siddhi, by October 2011, the same month Ramdev started his anti-corruption yatra, Kejriwal had mentally decided to start a nationwide agitation asking people to come forward and support the Lok Pal Bill while Anna Hazare would be the face of the movement.

The decision to choose Hazare as the face of the movement was not difficult. Anticipating that it would be tough to catch the attention of the government, especially the aam aadmi, Kejriwal decided on three criteria: the leader would have to go on fasts for several days; he should be a Gandhian; and he should be incorruptible. The 74-year-old Anna Hazare fit Kejriwal’s criteria perfectly."

बाकी, केजरीवाल आणि आर एस एस च्या संबंधांबद्दल म्हणाल तर ते स्वतःच सांगतात की "आम्ही डावे पण नाही आणि उजवे पण नाही. आम्हाला आम आदमीच्या प्रश्नांची लॉजिकल उत्तरे जिथून मिळतील तिथून आम्ही ती घ्यायला तयार असणार."
हा व्हिडिओ पहा.
महत्त्व आहे ते ह्या गोष्टीला की ज्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू झालं त्या मुद्द्यापासून बरेच लोक विचलित झाले, आणि हा 'येडा' अजून त्यालाच धरून बसलाय.
अण्णांचं तर लिहिलंच आहे आधी, किरण बेदींचं लिहिते आज.

आलं का पुन्हा आर एस एस. माहिती घेऊन बोलायची सवयच नाही यांना. जौद्यात.

मिर्ची, केजरीवाल सुद्धा वापरले गेले असू शकतील असं आताचं चित्र पाहून वाटत नाही? त्यांनी आपल्याला हवे ते काम केल्यावर त्यांना अलगद उचलून बाजूला टाकता येईल (पाहुण्याच्या हातून साप मारून घेणे ही म्हण फिट होईल का?) असा अंदाज असावा. पण त्यांनी सगळ्यांच्या अपेक्षेला विपरित असा स्वतःच निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचा पनिर्णय घेतला आणि चित्र बदललं?
रान उठवून सावज टप्प्यात आणुन द्यायचं त्याने पण शिकार मात्र करणार आम्हीच. ?

अण्णांच्या वापरल्या जाण्याच्या कथा अनेक असाव्यात.>>>>

मिर्चीताई येऊदे लिंक. Happy

<<मिर्ची, केजरीवाल सुद्धा वापरले गेले असू शकतील असं आताचं चित्र पाहून वाटत नाही? >>
वाटतं ना. काँग्रेसविरुद्ध (वाचा: भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध) नांगरणी केली, बिया पेरल्या, पीक उगवलं आणि कापणीला आल्यावर भाजपा वाले आयतं कापून घेऊन गेले.

<<त्यांनी आपल्याला हवे ते काम केल्यावर त्यांना अलगद उचलून बाजूला टाकता येईल (पाहुण्याच्या हातून साप मारून घेणे ही म्हण फिट होईल का?) असा अंदाज असावा.>>
आजवर अण्णांनी इतकं काय काय बोलूनही केजरीवाल अण्णांबद्दल अवमानकारक बोलल्याचं माझ्या वाचण्यात-ऐकण्यात आलेलं नाही. कुणी वाचलं असल्यास लिन्क द्या.

<<पण त्यांनी सगळ्यांच्या अपेक्षेला विपरित असा स्वतःच निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचा पनिर्णय घेतला आणि चित्र बदललं?>>
भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्याची ती पुढची लॉजिकल पायरी होती. सरकार अजिबात दाद देत नव्हतं.

<<रान उठवून सावज टप्प्यात आणुन द्यायचं त्याने पण शिकार मात्र करणार आम्हीच?>>
हे नाही कळलं. शिकार जर झाली असती तर आप चा जन्मच झाला नसता ना. अजूनही आप वाले म्हणतच आहेत की आम्ही जे करतोय ते आत्ताच्या सरकारने करावं, ते होत असेल तर आमची गरजच नाही!

विचारवंत,
मागची पानं वाचा एकदा. झालंय ह्या मुद्द्यावर लिहून.
मधुमेह असताना १३ दिवस उपवास करण्यात धोका नसतो वाटतं?

शी! काय ही मेंटालिटी. He wanted Anna to sacrifice his life? हे खरं असेल तर कठीण आहे. उद्या सत्तेवर आले तर कुणाकुणाची लाईफ सॅक्रिफाइस करायला लावतील काय माहित. Sad

Pages