अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<मिर्चीतै, उत्तम धागा आणि सर्वोत्तम प्रतिसाद!! तुमच्या संयमाला आणि चिकाटीला सलाम!!
चांगले काम करत अहात. असेच चालू ठेवा.>>

एरवी धाग्यांवर प्रतिसाद येवोत, न येवोत काही फरक पडत नाहीत (खर्‍या आयडीच्या धाग्यांबद्दल बोलतेय)
पण आत्ता तुमच्या प्रतिसादाने फार बरं वाटलं डेलिया. धन्यवाद.
केजरीवाल होणं तर सोप्पं नाहीच त्यांचा समर्थक होणं पण मुळीच सोप्पं नाही.

<<सोडून जाणा-यांमधलं योगेंद्र यादव हे असं नाव आहे की शंभर वेळा विचार करावा लागेल.>>

योगेंद्र यादव कुठे सोडून गेलेत? पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांना लिहिलेली इमेल्स लीक करून चॅनेलवाले दिवसभर का चघळत बसले होते? दुसरे महत्वाचे प्रश्न नव्हते का देशासमोर ?
खरंच लक्षात येत नाहीये का कुणाच्या हे आप ला संपवण्याचं सुपारी जर्नलिझ्म? Uhoh

ब्र. आ. तुमच्या लिन्का सवडीने बघते.

खरंच लक्षात येत नाहीये का कुणाच्या हे आप ला संपवण्याचं सुपारी जर्नलिझ्म? >>>

या जर्नलिअझम ने आपची सदस्यता नोंदणी सुरू झालेली आहे. या वेबसाइटवर जा. इथं क्लिक करा. हा नंबर डायल करा. पन्नास लाख मेंबर्स झाले. आपच्या कार्यालयात गर्दी अशा बातम्या दिल्या होत्या. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. देशपातळीवरचा पक्ष बांधण्यासाठी माध्यम नसेल तर किमान पंधराएक वर्षे लागतात संघटना उभारायला. इथे तर रात्रीत पक्ष उगवला, महीन्यात एक करोड मेंबर्स झाले...

हे कुणामुळे शक्य झाले ?

ब्राआ,
कदाचीत,केजरीवालांची ती आधीची स्ट्रॅटेजी असेल की आण्णांना उपोषणाला बसायला लावायचं आणि त्यांची तयार झालेली गुडविल आपण वापरायची.पण मला एक सांगा-
१-आण्णांनी पक्ष स्थापनेला विरोध केला होता.नुसती उपोषनं करुन देश बदलला असता काय?
२-पक्ष स्थापन करुन सत्तेत आल्याशिवाय सध्य स्थितीत बदल घडवणे अशक्यप्राय होतं.हे सगळ्यांना मान्य होतं.
पण पक्ष काढायचं धाडस दाखवणं बेदी आणि आण्णांना रुचत नव्हतं.कारण आडमुठेपणा,तत्वं वगैरेच होतं.ती बेदी आणि आण्णांची परीपक्वता होती काय?

आण्णांंचे पैसे,आण्णांना कशाला हवे होते? केजरीवालांच्या पक्षासाठी उपयोगी आले असते तर छानच की...पण आण्णांना कुठे मान्य होतंय हो...झाला वाद आणि या वादामुळेच केजरीवाल सर्वांसमक्ष जाहीर करत नसावेत. पण इअतर पक्षांच्या अंतर्गत कुरबुरी आपण खपवून घेतो,हा लोकांचा दुटप्पीपणा नाही कसा?

आण्णांना त्याचं क्रेडीट भले केजरीवाल न देवोत पण अण्णांमुळे हे सगळं घडू शकलं ते जगजाहीर आहेच की.त्यांनी त्यांच्या तोंडूनच कबूल केलंच पाहीजे हा अट्टहास का? हा हट्ट आहे कारण आपल्याला केजरीवालांकडून प्रत्येक गोष्टीत प्रामाणिकपणा हवा होता.पण केजरीवाल सारखा माणूस भाजप सारख खोटारडेपणा करतो म्हणून त्याला दुषणं दिली गेली.वरून भाजप मात्र आपल्याला चालतो.कारण त्यांची सवय झालीये का आपल्याला??

प्रश्न कच्च्या राजकारणाचा असेल तर केजरीवालांची कुठे चूक आहे असे मला तरी वाटले नाही.तसेच पक्षातल्या इतर लोकांचा दबाव येताच काही गोष्टी या प्राथमिक काळात पक्षात घडल्या असतील तरी त्यात सध्या वावगे असे काहीही दिसून येत नाही.

आबासाहेब तुम्हाला अनुमोदन पण त्यांच्या पोस्टमध्ये काही गोष्टी फारच ओढूण ताणून आणि आमचंच खरं अशा सांगितलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पोस्टचं इम्प्रेशन पटकन पडलं...

आपण आआप बाबत एकाच बाजूने विचार करतो आहोत. आआपला निदान पाच एक वर्षाची अजून संधी द्यायलाच हवी मग बाकी नंतर बघूयात की, अठरा महीन्याच्या रेकॉर्ड्वर तो हुशार की बुद्धू असा खटला तुमचे विचार मांडताहेत हे असं कसं हो...

सन्माननीय विचारवंत,
तुमचा उद्देश फक्त आणि फक्त खोड्या काढणं हाच दिसत असल्याने तुमच्या प्रश्नांना आत्ताही पास.

स्तुत्य निर्णय. आपला अ‍ॅस्पिरिन वरचा खर्च वाचेल.

मी आप ला खरंच आत्तापर्यंत फॉलो केलं नाही.
त्यामुळे याविषयावर काही लिहिता येणार नाही.
पण मिर्चीचा पेशंस आवडला.

भाजपाने FDI च्या निमिताने इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये घेतलेला एक मोठ्ठा यु-टर्न मी बघितला. असं असेल तर काय अर्थ आहे पॉलिसी असूना आणि नसून?

कशात FDI येतोय त्याने काय फरक पडतो? समजावून सांगाल का? खरंच विचारतेय. म्हणजे मी नंतर कोणाशी
ह्या पॉइंटवर वाद घालणार नाही. >>>

कशात FDI येतोय काय फरक पडतो हे वाचून खरचं खूप हसू आले आहे. Lol

भाजपाच्या जाहीरनाम्यात FDI (retail सोडून) आहे. जाहीरनामा वाचला की हे स्पष्ट होईल. उद्या रेल्वे, बस, Air India आणि इतर ठिकाणीही १००% FDI येऊ शकते. असे (जे मुद्देच नाहीत) ते आले की आमच्यासारख्याचा भ्रमनिरास होतो हो. हा मुद्दा देखील तुमच्या त्या नर्मदेचे पाणी सारखा आहे हो!

आणि अगदी ह्याच मुद्द्यावर त्या मोदीबाफ २०० पोस्टी आहेत आणि तिथेही मी उत्तर दिले आहे की जाहीरनामा वाचा.

आर्थिक पॉलिसी तुम्हाला कळत नसतील तर येथे विचारा, निदान ३-४ लोकं व्यवस्थित समजावून सांगतील, पण काय फरक पडतो हे उत्तर हास्यास्पद आहे.

आपला आर्थिक पॉलिसी अजून तरी नाही!

जिनोसाइड सगळ्यामध्ये हात रंगवून घेत असतील तर त्याचा आपल्याला कसा फायदा होणार हे काही आकलन होत नाही.
(हे सगळं सिद्ध झालेलं नाही हे लक्षात आहे. ते होईल अशी आशा बाळगणंसुद्धा वेडेपणा ठरेल इतके आपले नेते क्लीन-चिट मास्टर्स आहेत!) >>>

सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय तुम्ही पाहिला नाही का? की मोदीने सुप्रिम कोर्टही विकत घेतले आहे का?

मिडिया आता आपकडे लक्ष देत नाही अश्या आरोळ्या ठोकणे हे सुद्धा, आप हमारे साथ हो तो ही बरोबर, नही तो तूम चुकचम अन आम्हीच एकटे काय ते बरोबर आहोत, अश्या आपच्या घोष वाक्याचे प्रतिबिंब आहे. जेंव्हा मिडीया सोबत होता तेंव्हा कोण मिडिया चालवतो असा प्रश्न ना मिर्चीला पडला ना आपला, पण आज मात्र पडत आहेत, अचानक जागे झाल्यासारखे. मग मिडीयावर आरोप करणे भागच.

<<आर्थिक पॉलिसी तुम्हाला कळत नसतील तर येथे विचारा, निदान ३-४ लोकं व्यवस्थित समजावून सांगतील, पण काय फरक पडतो हे उत्तर हास्यास्पद आहे.>>

केदार, मी प्रश्नातच विचारलंय की काय फरक पडतो म्हणून समजावून सांगा. एवढा चेष्टेचा सूर? असू दे, पण मग समजावून तरी सांगा ना की एका क्षेत्रात FDI आल्याने "FDI को मंजूरी है, या और एक घोटाले की मजबूरी है" असं होतं आणि दुसर्‍या क्षेत्रात आल्याने भारताचा फायदा होतो हे कसं? प्रामाणिकपणे विचारतेय.
(विचारवंत असे वागले तर त्यात नवीन काही नाही, पण..व्हाय यु?)

बाकी मिडिया आणि आपवरच्या इतर प्रतिसादांमधून व्यक्त होणारा तुमचा त्रागा घालवण्यासाठी माझ्यातर्फे एक आइसक्रीम खाऊन या. बिल ड्यु.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत मला इतकंच माहीत आहे की भक्तगण सांगत असले तरी अजून मोदींना क्लीन चिट मिळालेली नाही. तुमच्याकडे काही माहिती असेल क्लीन चिट मिळाली आहे हे सांगणारी तर प्लीज शेअर करा. तोही मुद्दा मी वादातून ड्रॉप करीन.

<<अजूनही मेडीयाने २४ तास कव्हरेज देण्याचं कारण काय याचंच उत्तर मिळालेलं नसल्याने मेडीया आप वर नाराज आहे हे पचनी पडण्यास जड जात आहे.>>

मिडिया आप वर कधीपासून नाराज झाली ?
सगळे म्हणतात की 'मिडिया बिका हुआ है' असा आरोप जेव्हा केजरीवालांनी केला तेव्हापासून मिडिया बिथरला. पण हा आरोप केजरीवालांनी १४ मार्च २०१४ ला केलाय. मिडिया त्याच्या आधीच आप-विरोधी झाला.
केजरीवाल सरकारने ११ फेब्रुवारी २०१४ ला मुकेश अंबानींविरुद्ध FIR केली. त्याच्या आधीपर्यंत मिडिया आपचं कौतुक करत होती. खिडकी एक्स्टेन्शन सारखा विवाद होऊन भाजपा खासदारांनी निदर्शने करूनही मिडिया बॅलनस्ड किंवा प्रो-आप बातम्या देत होता.
पण FIR च्या दिवसानंतर मिडियाचा नूर बदलला. बातम्या ट्विस्ट करून दाखवल्या जाऊ लागल्या, नौटंकी, स्ट्रीट-ड्रामा हे शब्द आले. अधिकृत बातमी आपकडून यायच्या आधीच चॅनेल वर दाखवायची आणि मग आपने ती बातमी नाकारली की 'केजरीवाल ने फिर लिया यु-टर्न' !
पुन्हा पुन्हा तेच शब्द समोर आले की जनतेच्या मनात ते फिट्ट बसले तर त्यात नवल काय?

हेच आर्थिक ताकद आणि त्यासंबधित आआपचे पाऊल यावर मुद्दा अडला आहे. महत्वाचा मुद्दा.वरती शहा यांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे.
तशीसुद्धा चर्चा परत-परत काही ठराविक ठिकाणी फिरतेय असं वाटतेय किंवा परततेय...अर्थात त्याला लिमीटेशन्स असणं सहाजीक आहे. Happy

मला वाटतं मेडीयानेच आआपला उचलून धरलं होतं.त्यामुळे दबाव आणल्याखेरीज मेडीया आपच्या बाजूनेच आहे आणि भविष्यातही राहील.

पण FIR च्या दिवसानंतर मिडियाचा नूर बदलला.<< +१ यात तथ्य आहे असं दिसतंय. त्यातून समाजाची निगेटीव्ह मानसिकता आआपबद्दल तयार व्हायला कारणच मिळालं आहे.निदान आतातरी असं म्हणावं लागेल.

(मराठी टाइप होत नवतं,सॉरी म्हणून संपादित प्रतिसाद)

भाजपने रिटेल मधे एफ डी आय आणले तरच त्यांच्यावर यू टर्न चा आरोप करता येइल. केदार +१

सुप्रीम कोर्टाने क्लीनचिट वगैरे काहीही दिलेले नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने स्थापन झालेल्या एस आय टी ने मोदींवर खटला भरन्याइतका पुरावा नाही हा निश्कर्ष काढला आणी सुप्रीम कोर्टाने तो मान्य केला इतकेच.

मिर्चीताई तुम्ही हा शांतपणा योगेंद्र यादवांकडून शिकला आहात का? हा छोटासा गमतीशीर व्हिडिओ.

http://www.youtube.com/watch?v=M_MyvcmFlHs

विज्ञानदास, कुणाला उद्देशून म्हणताय?

दिल्लीमध्ये आप साठी जनता अनुकूल आहे असं बरेच रिपोर्टस सांगत आहेत. पण भाजपा निवडणूक टाळायचा प्रयत्न करेल असं वाटतंय.
आम्हाला तुमचं सरकार आवडलं होतं,तुमच्या सरकारने राजीनामा का दिलात, असं विचारण्याची ह्या आधीची घटना कुणाला आठवतेय का?

११ एप्रिलची बातमी आहे.

A bench comprising of Justices H.L. Dattu and S.A. Bobde also declined the plea for reconstituting the Special Investigation Team (SIT) involving retired judges of the apex court on the ground that this option was not good to raise it at this moment.

माझ्या माहितीप्रमाणे - डिफेंस एफडिआयमुळे नवीन तंत्रद्न्यान येइल, रोजगार वाढेल, संरक्शण सामुग्रीकरता बाहेर कोणाकडे हात पसरावे लागणार नाहीत इ.

विकु, Lol भारी व्हिडिओ. हर्षुकाकांचा राग अनावर झालाय अगदी.
पण खरंच मला योगेन्द्र यादवांचा शांत अ‍ॅटिट्युड आवडतो आणि केजरीवालचा धुडगूसी स्वभावही आवडतो. मी पण अ‍ॅनार्किस्ट Wink
भक्तगण ह्या दोघांना सलीम-अनारकली म्हणतात. योगेन्द्र यादवांना लहानपणी सलीम म्हणत. ह्यावरून भक्तगणांनी त्यांना मुस्लिमधार्जिणं बनवून टाकलं. पण खरी गोष्ट अशी आहे. त्यांचे आजोबा-राम सिंग, ह्यांचा १९३६ च्या जातीय दंगलीमध्ये मृत्यू झाला. त्याचा निषेध म्हणून त्यांच्या सेक्युलर वडिलांनी मुलाचं नाव 'सलीम' आणि मुलीचं नाव 'नज्मा' ठेवलं.
आपल्याला दिसतं त्यापेक्षाही बरंच काही असतं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात.
(बाप्रे, मिर्ची इमोशनल अत्याचार मोडमध्ये.)

मिर्ची,

१.
>> तुमच्याकडे काही माहिती असेल क्लीन चिट मिळाली आहे हे सांगणारी तर प्लीज शेअर करा

मोदींना आतापावेतो क्लीन चिट मिळालेली नाहीये. कारण की त्यांच्यावर मुळी आरोपपत्रच दाखल झालं नाहीये. न्यायालयाने त्यांना आरोपी म्हणून घोषितच जिथे केलं नाही, तिथे क्लीन चिट कोणाला देणार!

२.
>> आम्हाला तुमचं सरकार आवडलं होतं,तुमच्या सरकारने राजीनामा का दिलात, असं विचारण्याची ह्या आधीची
>> घटना कुणाला आठवतेय का?

केजरीला जाब विचारलायकी राजीनामा का दिलास. त्यातून 'त्याचं सरकार आवडलं' हा निष्कर्ष कसा निघतो? हां, अपेक्षा जरूर असतील. पण त्या पूर्ण झालेल्या नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

...

. एवढा चेष्टेचा सूर? >> अहो चेष्टेचा नाही, वैतागाचा. त्या बाफवर पण हाच आरोप होता अन तिथेही जाहीरनामा पाहा हेच लिहिले होते, परत इथे येऊन तुम्ही तोच आरोप केला म्हणून वैताग आला.

आईसक्रिम मी खाल्ले आहे. आता पैसे तुमच्या कडून घेईन, पुढच्या तुमच्या भारत भेटीत. (किंवा तुमच्या ओरिजनल आयडी कडून Happy )

क्लिन चीट : metropolitan court in Ahmedabad accepted the clean chit given by the SIT to the Gujarat chief minister, rejecting Ms Jafri's petition challenging the SIT's closure report.

http://www.ndtv.com/article/india/gujarat-riots-plea-to-reconstitute-spe... ह्या बातमी प्रमाणे सुप्रिम कोर्टाने आत्ता गरज नाही ही लिहिले होते ११ एप्रिलला.

पण मिर्ची, तुम्ही जिनोसाईड झाला असे एका फोरम वर लिहिता. तो आरोप फार गंभीर आहे. तुम्ही आणि आप ( अर्थात / किंवा केजरीवाल) मोदींवर खटला का नाही दाखल करत ह्या बाबतीत. जस्ट क्युरीयस !

आणि पूर्ण जनता जी मोदींच्या पाठीमागे ( तुमच्या मते ३१%) आहे सध्या, तिने ह्यावर अजिबातच विचार केला नाही / नसावा असे तुम्हास वाटते का हा मुद्दा उपस्थित करण्यापाठीमागे? अन्यथा काहीच कारण नाही, तेच ते मुद्दे येण्याचे.

<<केजरीला जाब विचारलायकी राजीनामा का दिलास. त्यातून 'त्याचं सरकार आवडलं' हा निष्कर्ष कसा निघतो? हां, अपेक्षा जरूर असतील. पण त्या पूर्ण झालेल्या नाहीत.>>

गापै, अपेक्षा पूर्ण झाल्या नसत्या तर आधी मत दिलेल्या लोकांसोबतच आणखी ४% लोकांनी मत दिलं नसतं !

<<पण मिर्ची, तुम्ही जिनोसाईड झाला असे एका फोरम वर लिहिता. तो आरोप फार गंभीर आहे. तुम्ही आणि आप ( अर्थात / किंवा केजरीवाल) मोदींवर खटला का नाही दाखल करत ह्या बाबतीत. जस्ट क्युरीयस !>>

मोदी आणि भक्तगण केजरीवालला पाकिस्तान एजण्ट आणि AK49 म्हणतात तेव्हा त्यांनी कुठे खटला दाखल केलाय??
अर्थात असं म्हणणं मला धोक्याचं ठरू शकतं हे खरंय. गोव्याच्या देवु चोदनकरने Modi would unleash a 'holocaust' असं फेबुवर म्हटलं म्हणून अटक झाली त्याला.
भाषणस्वातंत्र्य चिरायु होवो!

<> मेट्रोपॉलिटियन कोर्ट हे सुप्रीम कोर्ट कधी झालं म्हणे?
मयेकरांनी ठळक केलेलं सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याविषयीचं वाक्य वाचलंय.

माझ्या प्रश्नांना बगल दिली आहे तुम्ही. FDI चं समजावून सांगू शकाल का? घाई नाही. सवड होईल तेव्हा.

मिर्चे, मी समजवू का?
एक सरदार राजाला म्हणाला, मला प्रधान करा मी राज्यात साधी चोरी होऊ देणार नाही.
राजाने विश्वासाने त्याला प्रधान केला तर राज्यात खूना मारामारी यांचा सुकाळ झाला.
राजा म्हणाला प्रधानजी , हे कसं काय बुवा चाललंय राज्यात? तर प्रधान म्हणाले 'खून चालतायत, मी म्हणालो होतो चोरी होऊ देणार नाही'
तर अशी गत.
मतदार राजाला सांगितलं 'रिटेल मध्ये १००% एफ डी आय येऊ देणार नाही' नाही मंजे नाही .
पण डिफेन्स मध्ये कुठे म्हणलवतं?
मग राजाने ते चालवून घ्यायला पहिजेत.
प्रधान आपल्या शब्दाशी प्रामाणिक आहे.

आणि हो, मी कुठे कुणाचं नाव घेतलंय? आपले नेते बरेच आहेत. जिनोसाइड म्हटलं की तुम्हाला तेच नाव का आठवलं ? Happy

बरोब्बर समजलं सातीतै.

I am taking screenshots of this thread. Will be sent to appropriate places. Happy

पण हा आरोप केजरीवालांनी १४ मार्च २०१४ ला केलाय. मिडिया त्याच्या आधीच आप-विरोधी झाला. >>

चूक.
त्यानंतर केजरीवालांनी वाराणसी तून निवडणूक लढविणार याची पत्रकार परीषद घेतली. अर्ज भरायला रेल्वेने जाणार अशी घोषणा केली. हे सगळे इव्हेंटस मेडीयामधे साग्रसंगीत, लाईव्ह आणि नंतर महत्वाच्या वेळेत दाखवण्यात आले. त्यानंतर गंगेत डुबकी मारलेली दाखवली (याचमुळे गंगा शुद्धीकरणाची घोषणा मोदींनी केली). मग संध्याकाळी कौल घेतला. भाषण ठोकलं. अजान चालू असताना दोन मिनिट स्तब्धता पाळली. हे सगळंच दाखवलं. नंतर मेडीयाकर्मींनी मिळालेला प्रतिसाद कसा उस्फूर्त होता, लोकल्सचा कसा पाठिंबा होता हे सांगितलं. त्यानंतर केजरीवालांची भाषणं लाईव्ह दाखवली.

एका पार्टीत त्यांचं भाषण रेकॉर्ड झालं त्यात सत्तेवर आल्यानंतर मेडीयाकडे बघून घेईन असं म्हणताना ते दिसून आले. त्या आधी न्यूज एक्सप्रेस मधे सर्वे कंपन्या सर्वेचे निकाल कसे मॅनेज करतात हे दाखवलं होतं. केजरीवालांनी त्याचा आधार घेऊन मेडीयावर आरोप केले तरीही मेडीया बिथरला नव्हता. त्यांचं म्हणणं असं होतं की जाहीर सभेत बोलतांना मनुष्य रणनीतीचा भाग म्हणून बोलत असतो. पण समोर गर्दी नाही, मीडीया नाही हे माहीत असतांना जी मतं मांडली ती वैयक्तिक होती. ती त्यांची खरी विचारसरणी होय. केजरीवालांना ते काय बोलताहेत याचं रेकॉर्डिंग होतंय याची कल्पना नव्हती.

त्यांच्या घरी देखील एका टीव्हीपत्रकाराला कुठला बाइट कसा घ्यायचा, कुठले प्रश्न विचारायचे , कुठले टाळायचे याचं दिग्दर्शन केजरी करत असल्याचं एका स्टिंग ऑपरेशनमधे दिसून आलं. हा व्हिडीओ यू ट्यूबवर व्हायरल तर झालाच, शिवाय वाहीन्यांवरही दाखवला गेला. तो भाजपने अपलोड केला होता असं आपचं म्हणणं.

हे सगळं आपण पाहीलेलं आहे, ऐकलेलं आहे.

यातले दाखवायचे दात कुठले आणि खायचे कुठले हे पाहूयात नंतर.

अंबानींवर आरोप केले म्हणून मेडीया बिथरला हे म्हणणं पण चुकीचं आहे. केजरींनी अंबानींवर किमान ३ पेक्षा जास्त वेळा आरोप केलेला आहे. त्यातले महत्वाचे आरोप हिट अ‍ॅण्ड रन सीरीज मधे पहिल्यांदा, मुख्यमंत्री बनण्याच्या आधी पॉवर कटबद्दल बोलताना एकदा, मुख्यमंत्री बनल्यावर एकदा आणि राजीनामा नाट्यानंतर एकदा. हिट अ‍ॅण्ड रन पत्रकार परीषदेच्या वेळी त्यांनी यह देश अंबानी चलाता है असा उल्लेख केला होता.

त्यानंतर त्यांच्या मीडीया कव्हरेज मधे वाढच झाली. कमी कुठे झालं ?

(नीरा राडीया टेप ज्या कुणा बिझनेस ग्रुपकडून लीक केले गेले त्याचा हिशेब चुकता करण्यासाठी प्रतिस्पर्धी बिझनेस हाऊस कडून प्ले बॅक सिंगर केजरींकडून हे राग आळवून घेतले गेले अशी चर्चा भाजपेयींच्यात होती. तशा फेसबुक पोस्टस आहेत. अर्थात ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सहजच उल्लेख केला).

डिस्क्लेमर :
आपण फक्त आपल्यापर्यंत पोहोचत असलेल्या घटना पाहतोय. त्यांचं विश्लेषण हे वेगवेगळ्या चष्म्यातून येईल. काही वेळा काळाच्या संदर्भात हे तुकडे जोडून पाहीले तर अतर्क्य उत्तरं मिळतात. तरी देखील बंद दारामागे झालेल्या चर्चा, पडद्यासमोर न येता खेळनारे खेळाडू याबद्दल कधीही कुणालाही उत्तरं मिळू शकत नाहीत. त्याबद्दल गावगप्पा चालू असतात. त्या ख-याच असतात असं काही नाही, तसंच खोट्याच असतात असंही नाही. एखादी व्यक्ती संपूर्ण वाईट असते असं नाही, आणि शंभर टक्के चांगली असते असंही नाही. ज्याप्रमाणे नमोभक्त काळ्या बाजूचा उल्लेखही होऊ देत नाहीत त्याचप्रमाणे आपभक्त ही वागताहेत. ते कुठल्याही गोष्टीचं समर्थन करतात. तसंच ज्याप्रमाणे नमोविरोधक चांगल्या कामाचं श्रेय द्यायला तयार होत नाहीत तसेच केजरीवाल्यांबरोबर होतंय का ?
--------------------------------------------------------------------------------------------------------------

दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर नाही असं येतंय. केजरींना सुरुवातीला भाजपने छुपा पाठिंबा दिला होता. त्यांच्या आंदोलनाला संघाचा पाठिंबा होताच. पुढे काँग्रेसने पाठिंबा दिला आणि भाजप विरोधात गेली. पण केजरी एकटे पडलेत असं काही नव्हतं. उलट शंका घेणा-यांवर भ्रष्टाचारी असे शिक्के बसलेच होते, जसे मोदींना विरोध म्हणजे राष्ट्रद्रोही !! प्रचारात विलक्षण साम्य, शैली सेम !! हे कसं काय ?

Pages