अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिर्ची, तुम्ही ज्या स्तरावरची आप ची कामं/फोटो उल्लेख केला होता त्याच स्तरावरची इतर उदाहरणं मी दिली होती Happy

मला वाटतं तुम्ही आप ने काय काय सणसणीत कामं केली आहेत आणि ते राज्यकारभार सांभाळायला कसे समर्थ आहेत ह्या दृष्टीने लिहिलंत तर तो योग्य प्रचार प्रसार होईल. आणि आप ला एक संधी द्या म्हणणं म्हणजे २-३ विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्याला त्या विषयांत ३५ मार्क देऊन प्रमोट करण्या इतकं राज्यकारणाला (राजकारण नव्हे) लाईटली घेण्यासारखं आहे. ५ वर्षांत काय हाल होतील अश्यामुळे लोकांचे! मेधा पाटकर किंवा अरविंद केजरीवाल हे आहेत त्या जागीच योग्य (कदाचित काही बाबतीत बेस्टही) असतील, पण राज्यकर्ते म्हणून नाही.

एकमेकांवर चिखलफेक आणि निंदा हा घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे. जे असं करतात त्यांना तो लखलाभ होऊ दे. भाजपा, काँग्रेस किंवा आता तुम्ही बोलताय म्हणून ही 'आप', ह्या सगळ्यांनी समोरचा किती वाईट आहे ह्याचा प्रचार केला तर स्वत:ची पातळी उंचावेल असं समजणे चूक आहे. शेवटी जनता काही अगदीच मुर्ख नसते.

नमोंच्या यशाने चिरडीला येऊन आणि द्वेषाने नमो समर्थकांना 'भक्तगण' असं उपहासाने बोललं जात असेल तर काँग्रेस, आप समर्थकही रागा/सोगा भक्तगण किंवा अके भक्तगणच की Happy

"यात इथे खर्‍या किंवा टोपण नावानिशी या फुकट लिहिणार्‍या आयडीजना काहीच त्रास होणार नाही,"...हे कळलं नाही. माबोवर वर्गणी आहे का? मला माहीत नव्हतं.असेल तर कृपया सांगा. मी द्यायला तयार आहे.>>>>> शब्दशः तो अर्थ का घेताय? तुम्ही जुन्या माबोकर (मूळ आयडीने) आहात म्हणजे खरंतर तुम्हाला सगळं माहित आहे. लिहिणारे लिहून मोकळे व्हाल आणि प्रॉब्लेम मात्र मायबोली वेबसाईटला येईल. तेव्हा कुणी त्याची जबाबदारी घेणार नाहीत कारण ह्यांचे खरे चेहरे कधी दाखवणारच नाहीत. म्हणजे ह्यांचं काहीच नुकसान न होता टाईमपास्/प्रचार्/अपप्रचार होईल आणि नुकसान मात्र ज्या साईटवर हे लिहिणार त्यांचं आणि जे माबोकर ह्या साईटवरच्या निखळ लिखाणाचा आनंद घेतात त्यांचं. आता ह्यावरुन ही साईट नमो वाली आहे असा बालिश निष्कर्श काढू नका. नीट शब्दात राजकारणाबद्दल चर्चा होऊ शकतेच पण इथे आणि नमोंच्या धाग्यावर फक्त द्वेषाचं राजकारण (उगाचच्या उगाच :-P) दिसतंय. तिकडे ते सगळ्याच पार्ट्यांचे मोठे नेते इथल्या आपल्या कुणाच्याही मतांच्या आधारावर विसंबून नाहीत त्यामुळे निदान इथल्या द्वेषाच्या रंगपंचमीत मायबोलीला धोका उत्पन्न होऊ नये. सेन्सिटिव्ह टॉपिक्स ह्या आधीही अ‍ॅडमिनने वॉर्निंग देऊन थांबवले होतेच किंवा कित्येकांच्या आयड्या जप्त केल्या होत्याच (अगदी भाजपावाल्यांच्याही...काय मंदार जोशी, मास्तुरे, गापै?) किंवा अगदी रागांची मॉर्फ्ड चित्रं बाहेर मेडियात फिरत असतानाही त्यावर बाहेर अ‍ॅक्शन्स घेतल्या जात होत्या त्यामुळे 'आता लिहिता येत नाही' हा आरोप खोटा आहे. ड्यु आयच्या आडून काहीही धिंगाणा घालता यावा आणि मेली मायबोली तर मेली, आपलं काय? असं करुन कसं चालेल? (हे कुठल्या एकाच आयडीला उद्देशून नाही. सर्वपक्षीय ड्यू.आयडींना उद्देशून आहे).

टिनपॉट विचारवंतांना फोटू काढायला एक पोज द्यावी म्हणून ही पोस्ट.
बाकी आपशी मला घेणंदेणं नाही. केजरीवाल मला आवडत नाहीत. त्यामुळे मी इथे लिहित नाहिये याची 'संबंधितांनी' नोंद घ्यावी.

<<आणि जे पडद्याआडून लिहितायेत ते आधीच घाबरून लपलेले आहेत , हे उघडच आहे.>>

हे खरंय. मी घाबरूनच दुसर्‍या आयडीने लिहितेय. ३ महिन्यांचा अनुभव आहे. आपबद्दल इतका जास्त द्वेष आहे लोकांच्या मनात की आपची बाजू मांडते म्हणून माझे मित्र-मैत्रिणी,कुटुंबीय सगळ्यांनी भरपूर (शाब्दिक) धोपटलंय मला. सध्या राजकारण हा विषय गप्पांमधून आम्ही थांबवला असला तरी कुठेतरी थोडा कडवटपणा आहे. माबोवरचे दोस्तमंडळींसोबत हे होऊ नये एवढीच भिती. म्हणून ड्युआयडी.
एरवी खरा आयडी म्हणताना सुद्धा आपण टोपणनावच घेतलेलं असतं ना.
दोन्ही घरच्यांनी मला आमिष दिलंय की तू यंदा आदिवासींमध्ये काम करायला जाशील तेव्हा हवंतर आम्हीही येऊ, पण तू राजकारणात रस घ्यायचं सोडून दे. Such is the fear of politics!!

अश्विनी,
<<मिर्ची, तुम्ही ज्या स्तरावरची आप ची कामं/फोटो उल्लेख केला होता त्याच स्तरावरची इतर उदाहरणं मी दिली होती >>
पण तुम्ही हे नाही सांगितलंत अजून की बाँग्रेसचे आमदार-खासदार हीच कामं करतात तर आप ला आमदारनिधीतून प्रत्यक्ष राजधानीत ही कामं करत फिरायची वेळ का यावी. खेड्यांची तर गोष्टच काढायला नको.

<<मेधा पाटकर किंवा अरविंद केजरीवाल हे आहेत त्या जागीच योग्य (कदाचित काही बाबतीत बेस्टही) असतील, पण राज्यकर्ते म्हणून नाही.>>

हम्म्म. ६ वी पास उमाभारती, रेपच्या आरोपात समन्स पाठवलेले निहालचंद हे राज्यकर्ते म्हणून योग्य आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला?
(स्मृती इराणींचा उल्लेख मी करत नाही. कारण इथे स्मृतीतैंबद्दल अनेकांना कौतुक आहे हे माहीत आहे. पण भारताला पार्टटाइम काम करणारा HRD मिनिस्टर कसा परवडू शकतो हे कोडं आहेच.)

<<नमोंच्या यशाने चिरडीला येऊन आणि द्वेषाने नमो समर्थकांना 'भक्तगण' असं उपहासाने बोललं जात असेल तर काँग्रेस, आप समर्थकही रागा/सोगा भक्तगण किंवा अके भक्तगणच की>>
भक्तगण फार चांगला शब्द आहे आप्टर्डस पेक्षा असं नाही वाटत का?

<<नीट शब्दात राजकारणाबद्दल चर्चा होऊ शकतेच पण इथे आणि नमोंच्या धाग्यावर फक्त द्वेषाचं राजकारण (उगाचच्या उगाच फिदीफिदी) दिसतंय.>>
नमोंच्या धाग्यावर मी कुठल्या पोस्टमध्ये 'नीट' शब्द वापरले नाहीत हे प्लीज दाखवा.
तिथे दिलेल्या पुराव्यांवर (५०००+ आत्महत्या) तुमचं मत व्यक्त केलं नाहीत. त्याला कसलं राजकारण म्हणायचं बरं?

<<ड्यु आयच्या आडून काहीही धिंगाणा घालता यावा आणि मेली मायबोली तर मेली, आपलं काय? असं करुन कसं चालेल?>>
मी धिंगाणा घालतेय असं मला वाटत नाहीये. त्यामुळे ही कमेंट मला नाही असं मी समजून चालते.

असल्या प्रतिक्रिया विकुंनी लिन्क दिलेल्या व्हिडिओतील हर्षवर्धनांच्या प्रतिक्रियेसारख्याच वाटतात.
मी ५०००+ आत्महत्या झाल्याचा पुरावा दिलाय (अर्थात अधिकृत आकडेवारी) तर तुम्ही ती आकडेवारी खोटी ठरवण्यासाठी पुरावा द्या ना. आम्ही द्वेषाचं राजकारण करतोय, धिंगाणा घालतोय ह्या शब्दांना काय अर्थ आहे?

मला वाटतं तुम्ही आप ने काय काय सणसणीत कामं केली आहेत आणि ते राज्यकारभार सांभाळायला कसे समर्थ आहेत ह्या दृष्टीने लिहिलंत तर तो योग्य प्रचार प्रसार होईल. >

खरे की काय ? Uhoh
आपले आबा आणि दादानी काय काय सणसणीत कामं केली आहेत आणि ते राज्यकारभार सांभाळायला कसे समर्थ आहेत , हे सगळ्या महाराष्ट्राला पटलेले दिसतेय. म्हणुनच राज्याचे अगदी भले करण्यासाठी लोकांनी त्यांना ३ दा निवडून दिले.

असं म्हटलं जातं की वेंदाता गृपच्या अनिल अग्रवालचा आपला ’उभी’ करण्यामागे हात आहे. (रिलायन्सचे हिशेब चुकते करण्यासाठी). गुगलल्यावर लिंका मिळतील्च.

आणि आप ला एक संधी द्या म्हणणं म्हणजे २-३ विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्याला त्या विषयांत ३५ मार्क देऊन प्रमोट करण्या इतकं राज्यकारणाला (राजकारण नव्हे) लाईटली घेण्यासारखं आहे. ५ वर्षांत काय हाल होतील अश्यामुळे लोकांचे! मेधा पाटकर किंवा अरविंद केजरीवाल हे आहेत त्या जागीच योग्य (कदाचित काही बाबतीत बेस्टही) असतील, पण राज्यकर्ते म्हणून नाही. >>

वा!! वा!! टाळ्या!!
ताई , जो प्रामणिकपणे अभ्यास करून परीक्षा देतोय त्याला धोपटा.
आणि जो फक्त कॉपी करूनच डीस्टींक्शन मिळवतोय त्याला डोक्यावर घेऊन नाचा.
आबा , दादा, तटकरे , टोपे मंडळी लय भारी!! दरवेळी १०१% रीझल्ट आणतायेत!!

पण तुम्ही हे नाही सांगितलंत अजून की बाँग्रेसचे आमदार-खासदार हीच कामं करतात तर आप ला आमदारनिधीतून प्रत्यक्ष राजधानीत ही कामं करत फिरायची वेळ का यावी. खेड्यांची तर गोष्टच काढायला नको.>>>> का फिरावं लागतं त्याचा त्यांनाच अभ्यास करायला सांगा. भावी राज्यकर्ते म्हणून उपयोगी पडेल Happy हे मी मनापासून बोलतेय. आणि मी एक रस्त्याचं उदाहरण दिलं ते नगरसेवकांनी केलं होतं. बाकीची कामं तर NGO पण करतायत.

हम्म्म. ६ वी पास उमाभारती, रेपच्या आरोपात समन्स पाठवलेले निहालचंद हे राज्यकर्ते म्हणून योग्य आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला?
(स्मृती इराणींचा उल्लेख मी करत नाही. कारण इथे स्मृतीतैंबद्दल अनेकांना कौतुक आहे हे माहीत आहे. पण भारताला पार्टटाइम काम करणारा HRD मिनिस्टर कसा परवडू शकतो हे कोडं आहेच.)>>>> पुन्हा तुम्ही दुसरा कसा वाईट तेच सांगताय. अरविंद केजरीवाल राज्यकर्ते म्हणून कसे उत्तम आहेत ते सांगा. खरंच सांगतेय, तुम्ही मनापासून त्यांचा प्रचार करत असाल तर तो पॉझिटिव्ह प्रचार करा. त्याची ताकद जास्त असते.

भक्तगण फार चांगला शब्द आहे आप्टर्डस पेक्षा असं नाही वाटत का? >>> माझ्या पुर्ण पोस्ट मध्ये सगळ्यांनाच असं द्वेषाचं लिहू नका असं म्हटलंय. तुम्ही बाकी बरं लिहिताय म्हणून तुम्हाला सांगितलं, एवढंच. दुसरा खाली उतरला म्हणून मी ही उतरेन असं असेल तर माझ्या वाक्याकडे दुर्लक्ष करा.

नमोंच्या धाग्यावर मी कुठल्या पोस्टमध्ये 'नीट' शब्द वापरले नाहीत हे प्लीज दाखवा.
तिथे दिलेल्या पुराव्यांवर (५०००+ आत्महत्या) तुमचं मत व्यक्त केलं नाहीत. त्याला कसलं राजकारण म्हणायचं बरं? >>> तुम्ही बाकी नीट लिहिताय म्हणून तुम्हाला एवढं सांगितलं :-). मी ह्या आधीही कुठल्यातरी पानावर म्हटलं आहे की दोन्ही बाजूंनी घाईघाईने ब्रेकिंग न्यूज देण्यापेक्षा (आनंदाचं नाचकाम आणि आरोपांचा थयथयाट असं दोन्ही) काही काळ जाऊ देणं महत्वाचं आहे. वेट अँड वॉच पिरियड. हे काही कुणाच्या घरचा निर्णय घेण्याइतकं सोपं नाही, किंवा शेजार्‍यांनी भांडण काढलं म्हणून तावातावाने त्यांच्या दाराशी जाऊन अविचारी उत्तरे देण्याइतकं उथळ नाही. आणि कन्सिडरेबल कालावधी गेल्यावर कुणीही राज्यकर्त्यांकडे जाब मागू शकतंच की. तुमच्या पार्टीला सांगा की विचारायला. राहवत नाहिये म्हणून सांगतेय, तेव्हाही अकेंनी राजिनाम्याची घाई करायला नको होती. त्यांनाही वेट अँड वॉच लागू होतंच Happy

मी धिंगाणा घालतेय असं मला वाटत नाहीये. त्यामुळे ही कमेंट मला नाही असं मी समजून चालते. >>> जोपर्यंत संयम सोडून लिहिलं जात नाही तोपर्यंत नक्कीच नाही Happy

असल्या प्रतिक्रिया विकुंनी लिन्क दिलेल्या व्हिडिओतील हर्षवर्धनांच्या प्रतिक्रियेसारख्याच वाटतात.>>> हेच ते! Happy तुम्ही जे लिहिताय त्यावर कुणी काही प्रतिक्रिया (ज्या तुम्हाला विरोधी वाटतात) द्यायच्या नसतील तर प्रश्न मिटला. तरी मी अके, मेधा पाटकर किंवा त्यांच्या तळाच्या कार्यकर्तीला...म्हणजे तुम्हाला काहीच बोलले नाहिये एक्सेप्ट मला ते योग्य राज्यकर्त वाटत नाहित.

आपले आबा आणि दादानी काय काय सणसणीत कामं केली आहेत आणि ते राज्यकारभार सांभाळायला कसे समर्थ आहेत , हे सगळ्या महाराष्ट्राला पटलेले दिसतेय. म्हणुनच राज्याचे अगदी भले करण्यासाठी लोकांनी त्यांना ३ दा निवडून दिले.>>> अगं त्यांच्या मागे त्यांच्या पक्षाची भूतकाळातली पुण्याई उभी होती, जिच्यात भर नाही पडली तर ती कधी ना कधी संपणारच आहे. मी हेच तर म्हणतेय की 'आप'चं राजकारणाच्या दृष्टीने झालेलं नुकसान ते ५ वर्षांत भरुन काढू शकतात, पण त्यासाठी तो नविन पक्ष असल्याने आणि गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण करायचा असल्याने भरपूर मेहनत घावी लागेल. ती मेहनत म्हणजे दुसर्‍या पक्षांवर चिखलफेक करण्यात एनर्जी वाया घालवणे वगैरे नाही. ते जर खरोखरचे स्वच्छ असतील तर त्यांना ह्याचा आधार घ्यावाच लागणार नाही. त्यांच कामच लोकांना त्यांना मत द्यायला भाग पाडेल.

दोन्ही घरच्यांनी मला आमिष दिलंय की तू यंदा आदिवासींमध्ये काम करायला जाशील तेव्हा हवंतर आम्हीही येऊ >>> मस्त! घरुन ह्या कामांना सपोर्ट असेल तर कामं जास्त चांगली होतात, अनुभवावरुन सांगते Happy

शनिवार रविवार लै टेन्शन मधे गेले. इथे आल्यावर हा धागा वाचला. एकदम रिलॅक्स वाटले आता दरवेळेस जेव्हा जेव्हा असे काही वाटेल तेव्हा तेव्हा हा धागा विणेन सॉरी वाचेन. लै करमणुक.

हाय काय त्या खड्ड्यात, रस्त्यात, पाण्यात, लायटीत, अन्नसुरक्षेत, महिला सुरक्षिततेत.
इथ तुम्ही फोडा डोकी एकमेकांची तिकडे ते मारु र्‍हायले मज्जा. एवढे बोंबलुन मला काय कोणी देणार नाही. जे आहे ते तसेच चालु रहाणार.

इंग्लंडवाल्यानो राणीला जरा इचारता का परत यायला तयार हाय काय.
लै कटाळलो राव. उठसुट तेच तेच फेनताय पब्लिक..............................
परत एकदा,,,,,,, कामं करा रे का ओवाळुन टाकलयं. !!!!!!!!!!

ह्याचा जर कोनाला राग आलाच तं काय करुन घिशान ?

मिर्ची,

>> गापै, अपेक्षा पूर्ण झाल्या नसत्या तर आधी मत दिलेल्या लोकांसोबतच आणखी ४% लोकांनी मत दिलं नसतं !

हा फसवा युक्तिवाद आहे. भले आआपचा टक्का ४ ने वाढला असेल, भाजप चा १३ ते वाढलाय. दिल्ली विधानसभेच्या पोरकटपणामुळे आआपच्या तिप्पट लोकं भाजपकडे आकर्षित झाले असं का म्हणू नये?

संदर्भ :
>> The BJP had secured 33.07 per cent vote share in the assembly polls which increased to
>> 46.1 per cent in the Lok Sabha polls. The AAP's vote share also increased to 32.9 per cent
>> from 29.49 per cent in the assembly polls.

आ.न.,
-गा.पै.

मिर्ची
आपल्या दोघांच्या पोस्टस या निव्वळ आपबद्दल होत्या. अवांतरकुमार आनि कुमारींकडे दुर्लक्ष करूयात. ज्या कुठल्या बेजबाबदार पोस्टवरून यांना संधी मिळाली आह्, ती मी इथे लिहीत असतानाही वाचायला मिळाली नाही आणि त्याबद्दल खेद वगैरे वाटत नाही. (जे कुणी आपल्या चेकबुकवर ज्या नावाने सही करत असतील आणि त्याच नावाने आयडी घेत असतील त्यांचे नाव खरे असे मी समजओ. बाकिच्यांच्या नावावरून कसलाच अर्थबोध होत नाही. भेटण्याची शक्यता नाही. स्वभाव जुळ्ण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत कुणाची काय आवड असावी हे ठरवणारे आपण कोण ? आपण काही इथे सोयरीक जमवायला येत नाही. नाही का ? ही पोस्ट अर्थातच मी जरी शांतपणे लिहीत असेन तरी पलिकडे ती तसीच पोहोचेल याची शक्यता नाही. इथून पुढे संदिग्ध पोस्टीज, स्पेशल एक्झिकुटीव्ह मॅजिस्ट्रेट्स यांच्याकडे दुर्लक्ष करूयात. खबरदारीचा उपाय म्हणून वेमां किंवा अ‍ॅडमिन यांना या धाग्यावर लिहीण्यासाठी पैसे भरण्याची गरज आहे का हे विचारून घ्यावे का ? किमान आपल्या पोस्ट्स जबाबदार आहेत किंवा कसे याबद्दल या फक्त दोघांचे मत विचारात घ्यावे का ?)

डेलिया +१

<< असं म्हटलं जातं की वेंदाता गृपच्या अनिल अग्रवालचा आपला ’उभी’ करण्यामागे हात आहे. (रिलायन्सचे हिशेब चुकते करण्यासाठी). गुगलल्यावर लिंका मिळतील्च.>>

भ्रमर, जुनी बातमी (म्हणजे बिनबुडाचा आरोप) आहे ही. दिल्ली हाय कोर्टाने भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना वेदान्ता कडून फंडिंग घेण्यासाठी दोषी ठरवलं आहे. Happy
इथे पहा.

BJP-Cong Vedanta.png

निवडणूक आयोगाने दोघांना नोटीसही दिली होती. त्याचं पुढे काय झालं देव जाणे.

<<का फिरावं लागतं त्याचा त्यांनाच अभ्यास करायला सांगा. भावी राज्यकर्ते म्हणून उपयोगी पडेल >>
अश्विनी, चर्चा आपण करतोय. त्यांचं काम ते करतायेत करू दे. तुम्ही एवढंच सांगा की जर सध्याच्या सिस्टीममध्ये आमदार-खासदार काम करत असते तर अशी वेळ का आली असती.

<<बाकीची कामं तर NGO पण करतायत.>>
NGO ना पैसे कोण देतं? नागरिकच ना? मग हे काम निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी केलं तर NGO ना करायची वेळच येणार नाही.

<<तुम्ही मनापासून त्यांचा प्रचार करत असाल तर तो पॉझिटिव्ह प्रचार करा. त्याची ताकद जास्त असते.>>
हे मान्य. हा धागा खरंतर त्याच उद्देशाने काढला होता. पण इथेही भाजपाचा विषय निघाल्याने वाद सुरू झाले.

<<तुम्ही जे लिहिताय त्यावर कुणी काही प्रतिक्रिया (ज्या तुम्हाला विरोधी वाटतात) द्यायच्या नसतील तर प्रश्न मिटला. >>
असं अजिबात नाही. मी फक्त प्रतिप्रश्न विचारला होता. मेधा पाटकर, केजरीवाल आपल्याला लायक वाटत नाहीत तर उमा भारती, निहालचंद कुठल्या गुणवत्तेने लायक ठरतात. हे सांगितलंच नाहीत तुम्ही Happy

<<एकदम रिलॅक्स वाटले आता दरवेळेस जेव्हा जेव्हा असे काही वाटेल तेव्हा तेव्हा हा धागा विणेन सॉरी वाचेन. लै करमणुक.>>
००७, करमणूक कर लावू काय? Wink

<<दिल्ली विधानसभेच्या पोरकटपणामुळे आआपच्या तिप्पट लोकं भाजपकडे आकर्षित झाले असं का म्हणू नये? >>
अहो गापै, आपने पोरकटपणा केला मान्य आहे. मीच का , केजरीवाल पण म्हणतात ना की इट वॉज अ पॉलिटिकल ब्लंडर. प्रश्न असा आहे की लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसत्या तर लोकांनी आत्ता दिली तेवढी तरी मतं का दिली असती आप ला? हाकलून लावलं नसतं का पूर्णच?

आब्र +१

मनिष,
<<आणि तुम्हाला प्रगती म्हणजे काय अपेक्षित आहे तेही सांगा.>>
हे तुम्ही ज्या पोस्टसंबंधी विचारलंय त्यातच एक लिन्क दिली आहे. भारताचा ह्युमन डेवलपमेंट इंडेक्स खाली घसरतोय म्हणून. मोठी आधुनिक शहरं उभारली पण आहे त्या खेड्यांमध्ये मुलभूत सुविधा नाहीत. मोठमोठ्या शाळा उघडल्या, पण सरकारी शाळांमध्ये शिक्षक नाहीत. श्रीमंत आणि गरीब ह्यातली दरी वाढत जाणं कितपत हिताचं आहे. समाज अस्थिर नाही का होणार त्याने? मालमत्तेच्या विषम वाटणीने गुन्हेगारी वाढणार नाही का?
आहेत त्या गोष्टी आधी मजबूत नको का करायला?
अगदी ताजं उदाहरण म्हणजे परवा स्मृती इराणींनी ८ नवीन आय आय टी संस्था काढण्यासाठी फंडस् ची मागणी केली.
आय आय टी चे विद्यार्थी म्हणतायेत आधी आहेत त्या ठिकाणी सुविधा द्या.

<<पण, कालानुरूप, परिस्थितीनुरूप सरकारच्या धोरणांमधे बदल तर होतच राहणार >>
मान्य. पण इतके झपाट्याने होणारे बदल मनात शंका निर्माण करतात.

Diesel price hike before.pngDiesel price hike after.png

सबसिडीजच्या बाबत सांगायचं तर आपलं सरकार आधीच श्रीमंत असणार्‍यांना भरपूर सबसिडीज देऊन बिलियनियर बनवतं आणि नागरिकांना सबसिडी द्यायला कानकूच करतं. तुमचं 'आहे रे' वर्गाचं लॉजिक पटतंच.

४९ दिवसांतील निर्णयांबद्दल मला काय वाटतं ते सविस्तर लिहिते नंतर.

विकास म्हणजे काय ? निरनिराळ्या व्याख्या येतील.

पण नीतीशकुमार भाजपसोबत असताना बिहार राज्य आघाडीवर असते, एक मोदींचे मॉडेल आणि एक नीतीश यांचे मॉडेल अशी दोन्ही मॉडेल्स आमच्याकडे आहेत असं सांगितलं जातं, आणि ते बाहेर पडले की ताबडतोब नीतीश यांच्या राज्यात शिक्षणाचा कसा बो-या उडालेला आहे, शिक्षकांना कसं इंग्लीश येत नाही हे टीव्हीवर दाखवलं जातं,हे कमी म्हणून की काय खिचडी प्रकरण संशयास्पदरीत्या घडतं...

या परिस्थितीत विकासाचे दावे करणा-यांकडे निर्मळ मनाने कसं काय पहावं ? हा विषय धाग्याशी संबंधित नाही. विकास म्हणजे काय असा प्रश्न वाचनात आला.

लोकायतच्या पुस्तिका माहीतीच्या दृष्टीने खरंच सुंदर आहेत. पण एकांगी वाचन नको या दृष्टीने इथे इतरांच्या नजरेस पडाव्यात यासाठी दिलेल्या आहेत. वर लिंक्स दिलेल्या आहेत. त्या कुणाला पाहण्यात रस असेल तर आपल्या सर्वांना त्यातले अधिक-उणे गुणदोष पाहून वैचारीकदृष्ट्या समृद्ध होता येईल.

मेधा पाटकर, केजरीवाल आपल्याला लायक वाटत नाहीत तर उमा भारती, निहालचंद कुठल्या गुणवत्तेने लायक ठरतात. हे सांगितलंच नाहीत तुम्ही >>> केजरीवालांच्या हातात एकदा जनतेने सत्ता दिल्यावर त्यांनी एखाद्या २री पास व्यक्तीला मंत्रीपद दिलं असतं तरी मी काही म्हटलं नसतं. कारण एकदा निवडून दिल्यावर त्यांना त्यांनी राज्यकारभार त्यांच्या पद्धतीने (पण घटनेच्या व इतर प्रोव्हिजन्सच्या चौकटीत बसूनच) चालवू द्यायचे स्वातंत्र्य आहे. निवडून देताना तो विश्वास दाखवावाच लागतो. एखाद्या खात्याचा बट्ट्याबोळ वाजतो आहे हे कालांतराने सिद्ध झालं तर जनता आपोआप केजरीवालांकडे जाब विचारती झालीच असती कारण ते सर्वस्वी जबाबदार ठरले असते. तोच नियम इथेही लागू.

असो, मला कुठल्याच पक्षाचा प्रचार किंवा विरोध करायचा हेतू नसल्याने मी इथेच थांबते. मला आरोप प्रत्यारोपांमध्ये खरंच स्वारस्य नाही. होतं काय, की समोरच्याने उकसवून उकसवून आपण त्या लूपमध्ये खेचलं जाऊ शकतो, आणि मला ते नको आहे.

तुम्हाला मनापासून शुभेच्छा! आणि त्या आदिवासी भागातील कार्याच्या प्लानबद्दल तर भरपूरच शुभेच्छा Happy

असो, मला कुठल्याच पक्षाचा प्रचार किंवा विरोध करायचा हेतू नसल्याने मी इथेच थांबते.>>

असं वाटलं नाही. कुणीही काहीही म्हणू शकतं. कुणी तुम्हाला असभ्य लिखाण केलं अस म्हणू शकतं, किंवा निकृष्ट पोष्टींना प्रोत्साहन देऊन अगदी अनुल्लेखही करू शकतात . पण तुमचं लिखाण कसं आहे हे वाचणारे ठरवतील किंवा प्रशासक, वेमा वगैरे..

NGO ना पैसे कोण देतं? नागरिकच ना? मग हे काम निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी केलं तर NGO ना करायची वेळच येणार नाही.>>>>>>>>>>>

NGO कामे करतात असे वाटणे हाच मोठा विनोद आहे.

<<केजरीवालांच्या हातात एकदा जनतेने सत्ता दिल्यावर त्यांनी एखाद्या २री पास व्यक्तीला मंत्रीपद दिलं असतं तरी मी काही म्हटलं नसतं.>>

मी म्हटलं असतं. सत्ता त्यांच्या हातात दिली की आपलं कर्तव्य संपलं असं नाही चालणार. ह्याच गोष्टीचा फायदा घेतलाय आजवर.
२ री पास आहे, पण त्याच क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत आहे असं असेल तर गोष्ट वेगळी. उदा- मेधा पाटकरांना जलसंपदा मंत्री केलं तर समजू शकतो. त्या इतकी वर्षे ह्याविषयी काम करतायेत, त्यांना पुरेसा अभ्यास झाला असणार. उमा भारती कायकु?

<<एखाद्या खात्याचा बट्ट्याबोळ वाजतो आहे हे कालांतराने सिद्ध झालं तर जनता आपोआप केजरीवालांकडे जाब विचारती झालीच असती कारण ते सर्वस्वी जबाबदार ठरले असते. >>

तोवर फार उशीर होतो. शिवाय गुजरातमध्ये झालेल्या पोकळ विकासाचा (वाचा: बट्ट्याबोळाचा) जाब कुठे कोण विचारू शकतंय?
असो. उत्तर नाही दिलंत तरी चालेल. तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. Happy

विवेक,
गोव्याच्या खनिजांची निर्यात करायला नको ह्या वक्तव्याबद्दल मोदींचं अभिनंदन.

केजरीवाल मुख्यमंत्री असताना वेगवेगळ्या विभागातील तात्पुरत्या पदांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना नियमित करण्यासाठी १३ सदस्यांची एक समिती तयार केली होती.
त्या समितीच्या रिपोर्टनंतर कॉन्ट्रॅक्ट वर काम करणारे ३६००० कर्मचारी नियमित झाले. अभिनंदन.

36000 posts regularised.png

मिर्ची,

>> प्रश्न असा आहे की लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसत्या तर लोकांनी आत्ता दिली तेवढी तरी मतं का दिली असती
>> आप ला? हाकलून लावलं नसतं का पूर्णच?

लोकांनी आआपला दिल्लीतून तरी पूर्णपणे हाकलून लावलं आहे. म्हणूनच त्यांना तिथे लोकसभेच्या ० जागा मिळाल्या. विचार करा आमदार २८/७० आहेत तरीही एकही खासदार नसावा? काँग्रेस व इतर पक्षांची टक्केवारी घसरलेली आहे. तिच्यातला मुख्य तुकडा भाजपकडे आला (१३%) आणि छोटा तुकडा (४%) आआपकडे गेला.

आज दिल्ली विधानसभा विसर्जित होऊ नये म्हणून केजरीवालची धडपड चालली आहे. नरेंद्र मोदींची भेट घ्यायचा प्रयत्न त्याचसाठी चालला आहे. मोदी धूर्त आहेत. ते म्हणतात होऊन जाऊ दे विधानसभा विसर्जित. केजरीवालचे धाबे दणाणले आहे. परत निवडणुका झाल्या तर ३६ सोडाच २० तरी जागा मिळतील का!

आ.न.,
-गा.पै.

मिर्ची, छान माहिती देत आहात. धन्यवाद म्हणून तुम्हाला आईसक्रीम.

आप कडून खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांचे ओझे सांभाळून अनेक प्रतिकूल शक्तींशी मुकाबला करत ही लढाई चालू ठेवावी लागेल.

मून, धन्यवाद, बरं वाटलं Happy

<<आज दिल्ली विधानसभा विसर्जित होऊ नये म्हणून केजरीवालची धडपड चालली आहे. नरेंद्र मोदींची भेट घ्यायचा प्रयत्न त्याचसाठी चालला आहे. मोदी धूर्त आहेत. ते म्हणतात होऊन जाऊ दे विधानसभा विसर्जित. केजरीवालचे धाबे दणाणले आहे. परत निवडणुका झाल्या तर ३६ सोडाच २० तरी जागा मिळतील का!>>
गापै,
आप काँग्रेसकडे पुन्हा समर्थन मागतंय, त्यांना निवडणूका नको आहेत, त्यांचे धाबे दणाणले आहेत ह्या सगळ्या बातम्या कुठून मिळाल्या तुम्हाला?
हा लोकांचा गैरसमज आहे. आणि तो पसरवण्यात आपल्या थोर प्रसारमाध्यमांचं महत्वाचं योगदान आहे.
अगदी पहिल्यापासून सांगायचा प्रयत्न करते.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजपाला ३१, आप ला २८ आणि काँग्रेसला ८ जागा मिळाल्या. ज्या काँग्रेसला लाखोली वाहून निवडणूक लढवली त्यांना समर्थन मागायला जाण्याइतके आप वाले मुरब्बी राजकारणी नाहीत. (आप ला राजकारण येत नाही ह्यावर दुमत नसावं)
त्यांनी एलजीला भेटून सांगितलं होतं की आम्हाला बहुमत मिळालेलं नाही, त्यामुळे आम्हाला सरकार बनवायचं नाही. काँग्रेसने स्वतःहून समर्थन दिलं (भाजपाने सुद्धा). तरीही आप तयार नव्हतं. मग त्यांनी ८ दिवसांचा वेळ मागून घेतला. ठिकठिकाणी जनसभा घेतल्या, ओपिनियन पोल्स घेतले.
जनमताचा कौल होता की सरकार बनवावं. तो कौल घेऊन आप ने काँग्रेसचा "अनकण्डिशनल सपोर्ट" मंजूर केला. आणि अल्पमतातील सरकार बनवलं, युतीचं सरकार नव्हे.
त्यात प्रमुख बाबी ह्या होत्या की
१. काँग्रेसला कुठलंही मंत्रीपद, खातं मिळणार नाही.
२. आप ने जो १७ मुद्द्यांचा अजेण्डा मांडला आहे त्याला त्यांचा पाठिंबा असायला पाहिजे.
३. पाठिंबा दिलेला असला तरी काँग्रेसमधील भ्रष्ट नेत्यांवर सुद्धा आप कारवाई करणार.
काँग्रेसने हे मान्य केलं आणि आपचं अल्पमतातील सरकार तयार झालं.
ह्या बातमीमध्ये एक व्हिडिओ आहे तो बघा.

सरकार कोसळल्याच्या पहिल्या दिवसापासून आप फेरनिवडणूक मागतंय. त्यासाठी त्यांनी केलेल्या अपीलवर सुप्रीम कोर्टाने भाजपा आणि काँग्रेसला "तुमची भूमिका ३ आठवड्यांत स्पष्ट करा" म्हणून नोटीस सुद्धा दिली होती.

आता लोकसभा निवडणूकीनंतर चॅनेलवाले जे काही दाखवत आहेत "काँग्रेसने आपला समर्थन नाकारलं" वगैरे, त्या अफवा आहेत. आप ने त्यांच्या अधिकृत पेजवर लगेच हे प्रसिद्ध केलं होतं. आप खोटं बोलतंय आणि चॅनेलवाले खरं बोलतायेत असं असेल तर ABPnews ने 'मिस्चिव्हस आणि मिसलिडिंग' म्हटल्याबद्दल आपवर मानहानीचा दावा लावावा. आणि आपवाले कॉंग्रेसचं समर्थन मागत आहेत ह्याचा व्हिडिओ लोकांना दाखवावा.

ABP news.png

तुम्ही दिलेल्या लिन्कमध्ये आप मोदींची भेट मागतंय हे कळलं, पण ते वीजेच्या प्रश्नासाठी. त्यात विधानसभा विसर्जित करण्याचा मुद्दा कुठून आला?

(आता ००७ येऊन रागवणार असं दिसतंय "काय ओवाळून टाकलंय का रे?")

मिर्ची - छान धागा सुरु केला आहे आणि महत्वपुर्ण चर्चा तुम्ही घडवुन आणत आहात. अभिनन्दन.
मी प्रतिसाद वाचतो आहे. आआपा मिळालेल्या 'आप'यशाचे आत्मपरि़क्षण करेल आणि धोरणात योग्य त्या सुधारणा घडवुन आणेल अशी अपेक्षा. तुमच्या सारख्यान्चा उत्साह वाखणण्यासारखा आहे आणि म्हणुन पक्षाला भविष्य आहे... शुभेच्छा.

चुका सर्वच करतात हे मान्य. पण केलेल्या चुका मान्य करुन जनतेची माफी मागण्याचे धाडस आणि प्रामाणिकपणा केजरीवाल यान्नी दाखवला आहे.

अश्विनी के यान्चे प्रतिसाद आणि भुमिका आवडली; तिव्र मतभेद Happy असतिलही पण प्रतिसाद देताना ते विरोधी मताला आणि ते व्यक्त करणार्‍या व्यक्तीला कुठेही कमी लेखत नाहीत. आजकाल अशी भाषा वाचायला मिळणे अत्यन्त दुर्मिळ होत चालले आहे.

Pages