Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बोकलतांच्या मागे साडेसाती
बोकलतांच्या मागे साडेसाती लागली तेव्हापासून त्यांनी या धाग्यावर लिहायचं सोडलं. आता ते दुसर्या धाग्यांच्या मागे लागतात. तेव्हा अमानवीय फॅन्सनी या धाग्याला लागलेलं बोकलत ग्रहण सुटलं आहे, याची खात्री बाळगा.
एक्सेल फाइल्स ??
एक्सेल फाइल्स ??
सहमत आहे, काही विघ्नसंतोषी
मुख्य म्हणजे लोकं गाढवासारखे कौतुक करत बसतील
सहमत आहे, काही विघ्नसंतोषी स्वतःला बोकलत ह्याचे फॅन म्हणवून घेणारे ज्यांना चांगले धागे चाललेले सहन होत नाहीत असे लोक मग बोकलतच्या पांचट विनोदांवर ख्या ख्या करून धाग्याची अजून वाट लावू पाहतात, नी मग जे लोक धाग्यावर काही सिरियस लिहायला आले आहेत ते काहीच लिहीत नाही. बोकलतने अस करूनच मानवीय धागा अबंद पाडला! आता ह्यावर कुणीही काही लिहीत नाही. मजा म्हणून धागा वाचायला यावे नी तिथे बोकलत आणी फॅन्स चे पो वर पो पडलेले!
मायबोलीवर सगळी भली माणसं आहेत
कृपया कोणीही व्यक्त होऊ नका.
कृपया कोणीही व्यक्त होऊ नका. सुपरचार्ज तुमच्या भावना नकळत दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो. अजून एक विनंती कृपया मला जे दाद देतात त्यांना काही बोलू नका. मला काय वाटेल ते बोला काही हरकत नाही.
चला, कित्येक वर्षे बंद पडलेला
चला, कित्येक वर्षे बंद पडलेला धागा थोडा तरी हलला.
बोकलत, काही अतिशयोक्ती पोस्ट वर तुमची शाल जोडी आवडली होती, पण नंतर तुम्ही धाग्याची "होळीच " केली. असो
ज्याप्रमाणे मद्य, धूम्र, चरस,
ज्याप्रमाणे मद्य, धूम्र, चरस, गांजा, ब्राऊनशुगर, हशीश, कोकेन सगळे पान प्रमाणात करावे त्याच प्रमाणे थट्टा-मस्करी-खिल्ली, तसेच सत्यकथा अथवा खखोदेजा कथांमध्ये पुड्या सोडणे सुद्धा सगळेच प्रमाणात करावे. सारे काही प्रमाणात करू अवघे धरू सुपंथ.
अमानवीय धाग्यावर मानवी
अमानवीय धाग्यावर मानवी प्रतिसाद.
एखाद दुसरी लेंडी टाकली तर
एखाद दुसरी लेंडी टाकली तर समजू शकतो पण अख्खे पो च्या पो टाकून धागा बंद पाडणे कशाचे लक्षण म्हणावे?
सुपरचार्जजी मी तिकडे नवीन
सुपरचार्जजी मी तिकडे नवीन धागा सुरू केलाय. हा धागा फुल्ल झाला आहे.
या धाग्यावर काय सीन झाला
या धाग्यावर काय सीन झाला कल्पना नाही. कारण कधी इथे लिहिले वाचले नाही. २००० पोस्ट आताही वाचणार नाही. पण धागा वर आल्याने वरच्या काही पोस्ट वाचून काहीतरी अतिशयोक्ती पोस्ट आल्या असे उल्लेख आढळले. पण जर धागाच अमानवीय किस्से आहे तर इथे विश्वासार्ह वाटाव्या अश्या पोस्ट येतीलच कश्या.. की अमानवीय किस्से लिहा तरीही ते आम्हाला खरे वाटले पाहिजे असे काही आहे का.. की आणखी काही वेगळे सीन झालेत.
ह्या धाग्याचे सार आज मला
ह्या धाग्याचे सार आज मला गवसले,
मृत आयडींचे नव अवतार मज उमजले
पिशाच्च, खविस, मुंजा अन् ब्रह्मराक्षस,
सर्वच एकसुरी येथ अस्फुट गरजले
निरोप माझा अखेरचा घ्यावा म्हटलेले
आज नव्या नावांनी पुन्हा तेच अवतरले
हितगुजाचे उपदेश करित फिरती,
धागा पेटविण्यासही तेच सरसावले
मायबोलीचा हा अद्भुतच अवतार—
एकच जीव, आयडी दहा उगवले
ओळख पटेना म्हणे कोण कोण इथे,
पण शब्दांचे ठसे सारेच उघडे पडले
मायाजाल भारी ह्या मायबोलीचे
नियम सारे कडक म्हणे परवलीचे,
मी पुन्हा येईन म्हणत सारे
भुतेच येथे आयडी बदलून नाचले
आता तुमच्या सगळ्यांना वाटत
आता तुमच्या सगळ्यांना वाटत असेल एक लेखक हा माझा डू आयडी आहे पण तसं काही नाही. जाऊ दे आता काय स्पष्टीकरण देणार. खरं काय ते. वेमा. मी आणि एक लेखक यांनाच माहीत.
बोकलत टेन्शन घेऊ नका. खुलासे
बोकलत टेन्शन घेऊ नका. खुलासे करण्यात अर्थ नसतो नाही तर सांगितले असते कि स्कोअर सेटल केला आहे. खूपदा इग्नोर केलेच होते.
तुम्हाला मनःस्ताप व्हावा ही काही इच्छा नव्हती.
फक्त ऋन्मेष लोड घेत नाही.
विश्वासार्ह वाटाव्या अश्या
विश्वासार्ह वाटाव्या अश्या पोस्ट येतीलच कश्या..>>
चोरोंके भी उसुल होते है तसेच काहीसे आहे हे, अमानवीयोंके भी कुछ उसुल होते है.
ज्यांचा अमानवीयवर विश्वास असतो त्यांनाही वाटु लागते की ये कुछ ज्यादाही नही हुआ? म्हणजे भूत आलं आणि जुन्या काळच्या गाण्यावर नाचलं तर ओके, पण धुरंधरच्या अरबी गाण्यावर नाचलं तर उसुल तुटला.
भूतं सिरीयस लोकांचीच होतात असा समज आहे . त्यामुळे मेल्यानंतर मी भूत होणार नाही याची मला खंत वाटते.
किती गमती जमती करता आल्या असत्या भूत होऊन.
मेल्यानंतर मी भूत होणार नाही
मेल्यानंतर मी भूत होणार नाही याची मला खंत वाटते.>> कमाल आहे तुमची मानव, म्हणजे मेल्यावर देखील तुम्हाला कुणाला तरी पछाडायचचं आहे?? जे काही आहे ते आताच इथेच भागवून घ्या ना...
Pages