अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक अनुभव माझ्या आजोबांना आणी गावातील बर्याच जणांना आलेला.....

आमचे गाव आणी आजोळ मध्ये साधारण २ किमी चे अंतर असेल.
जसा शक्यतो ईतर गावाना असतो तसच इथेही एक कच्चा रस्ता आहे कमी अंतराचा दोन्ही गावाना जोडणारा.
ह्या रस्त्यात काजु अन आंब्याची बाग, एक छोटेसे तळे आणी झेटींग बाबाचे मंदीर आहे.
झेटींग बाबा म्हणजे ईर.... अपघाती मरण आलेला, अशी वंदता आहे कि तो गावचे रक्षण करतो.
तरी रात्रीच्या वेळी लोक ईथुन जाणे टाळतात.

तर बर्याच लोकाना त्या तळ्याजवळुन जाताना एक उंच, खांद्यावर घोंगडे घेतलेला, एका हातात काठी अन दुसर्या लाटण (लाल्टेण ?) असलेला एक व्यक्ती दिसतो तो त्यांना आवाज देतो. त्यांच्या माहीतीतील एखाद्या व्यक्ती किंवा विषयावर गप्पा मारतो आणी त्याच्याकडे तंबाखु मागतो.
गावी बहुतेक सर्रास लोक तंबाखु खातात किंवा या बद्दल माहीती असल्यामुळे लोक जवळ तंबाखु ठेवतात्च.
असे एकलेय कि जर ह्याला टाळायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीचे खुप नुकसान होते.

असाच एक अनुभव मझ्या आजोबाना पण आलाय.
त्याने तंबाखु खाउन गप्पा मारल्या आणी चार पावले पुढे जाऊन नाहीसे झाले.
हे सगळ आजोबाना एकुन माहित होते तरीही ते घाबरले, पुढे जायचा प्रयत्न केला पण वाट सापडेना.
ते त्याच परिसरात रात्रभर फिरत होते जेव्हा सकाळ होत आली अन कोंबडा आरवला तेव्हा त्यांना रस्ता दिसला.

(Kindly ignore typos)

मला वाटत नाही कि भूत बित काही असते .... आपल्या मनाच्या या सर्व कल्पना असतात... जी माणसे हळव्या - कमजोर किंवा घाबरट मनाची असतात त्यांनाच अशा काहीतरी गोष्टी दिसतात.
अशा काही गोष्टी होण्यामागे किंवा दिसण्यामागे काही वैद्न्यानिक किंवा मानशास्त्रीय कारणे हि असू शकतात. मनातील भीती किंवा अन्य नकारात्मक भावना आपल्याच समोर भूत बनून उभ्या रहातात आणि आपला मेंदू अश्या भावनांना दृश्य स्वरूप देतो ....पण ते केवळ एक मृगजळ असते, तो भावनांचा कल्लोळ किंवा गुंता असतो आणि आपणास उगाच वाटते कि आपण काही भूत बघितले.
भूत हे माणसाच्या मनात असते ....प्रत्यक्षात नाही !

मला वाटत नाही कि भूत बित काही असते .... आपल्या मनाच्या या सर्व कल्पना असतात... जी माणसे हळव्या - कमजोर किंवा घाबरट मनाची असतात त्यांनाच अशा काहीतरी गोष्टी दिसतात.>>>> हे ही खरे आहे.

भूत हे माणसाच्या मनात असते ....प्रत्यक्षात नाही !>>>>> आणी हे ही पण खरे आहे. माणसाने फक्त देवाचे अस्तित्व मानावे आणी सकारात्मक विचार ठेवावेत.

हा धागा प्रबोधनाचा नसून, मनोरंजनाचा, अद्भूत (व्वा! कोटी झाली ही तर) वाचनाचा आहे. बा समंधा, ह्यांना माफ कर आणी तुझा वेताळ डान्स असाच चालू ठेव. तुला आणी हडळी ला हवे तेव्हढे पिंपळ वगैरे मिळू दे. वर्षांतून चार-दोन आमावस्या अजून येऊ दे. रस्तो-रस्ती चकवे लागू दे.

मला आलेला एक अमानवीय अनुभव......
दोन वर्षा पूर्वी कॉलेज मध्ये असताना ...परीक्षा जवळ आलीये म्हणून प्रिंसीपल सरांकडुन रात्रीच्या अभ्यासाला कॉलेजची चावी घेतली.त्यांनी एका अटीवर चावी देण्याचे मान्य केलं, की सकाळी सात वाजता येऊन कॉलेज उघडून जायचं. कॉलेज तसं मोठं होते,तीन मजली इमारत होती. आत गेल्या गेल्या एंट्रीलाच गणपतीची मूर्ती ठेवलेली त्याच्या आजुबाजुला पांढऱ्या फरश्यांचा चौकोन होता. कॉलेजातले मोजकेच लाईट ऑन करायचो आम्ही. कॅम्पस मोठे असल्याने कॉलेजची इमारत एका कोपऱ्यात होती आणि पुढे मुलांचे वस्तीग्रूह होते.
माझी रूम लांब असल्याने मी जेवण करून कॉलेजला वाचायला यायचं ते सकाळी सातला शिपायाला चावी देऊनच रूमला यायचो. त्या दिवशी दुसऱ्या मजल्यावर दोन क्लासरूम मुद्दाम उघडे ठेवले होते. मी जेऊन दहा रात्री दहा वाजता कॉलेजात गेलो. वरच्या मजल्यावर क्लासरूम मध्ये पाहिले तर फक्त चार पाच मुलं होती. असूदे म्हणून जास्त विचार न करता मी अभ्यासाला सुरुवात केली. १२ च्या सुमारास मला झोप येऊ लागल्यामुळे खाली आलो आणि तोंड धुऊन फ्रेश झालो.
मी बॅग घेऊन खालीच आलो आणि जीन्या जवळच्या मोकळ्या जागेत कॉम्प्युटर बरोबर आलेल्या पुट्टा खाली ठेऊन त्याच्यावर वाचत बसलो. वाचता वाचता कधी झोप लागली कळालंच नाही.
अचानक कोणाच्यातरी कानात हळुवार बोलण्याने जाग आली मी दचकून इकडेतिकडे पाहिले कोणीच नव्हत. बहुतेक स्वप्नात झाले असावे अशी स्वतः ची समजूत काढली. घड्याळात पाहिल तर सव्वा एक वाजला होता. कॉलेजचे मेन गेट उघडं होत त्यातून थंड गार हवा आत येत होती. उठून गेट बंद केलं. आणि मगासच्या अनूभवामुळे घाबरुन गणपती जवळच पुट्टा टाकून बसलो.
पुढला अर्धा एक तास वरून हसण्याचा, दरवाजा उघड झांक करण्याचा आवाज येत होता. पोरं काहीतरी करत असतील म्हणून दुर्लक्ष केलं आणि नंतर काही वेळाने तिथेच झोपलो.
सकाळी ६-६.३० च्या दरम्यान जाग आली तोंड धुऊन फ्रेश होऊन वरच्या मजल्यावर सहजच गेलो तर तेथे कोणीच नव्हते. आणि मेन गेट कम दरवाजा तर आतून बंद होता. आता मात्र माझी जाम तंतरली सकाळी सहा वाजतापण मला कॉलेज मध्ये थाम्बू वाटेना. सरळ खाली आलो आणि गेटच्या बाहेर येऊन बसलो.
नंतर ती मुलं भेटल्यावर त्यांना विचारलं तर ते म्हणाले आम्ही सगळे तर १ वाजताच निघून गेलो होतो.तु झोपलेला म्हणून उठवले नाही. त्यानंतर परत कधीच कॉलेजात रात्री एकटा थांबलो नाही.

मला पण एक वेगवेगळा अनुभव आलेला आहे...जागेचा नाव नाही सांगत पण आम्ही भाड्यानी राहायचो तिथे एकदा बाथरूम चा दरवाजा आतून बंद झाला होता आपोआप. नवल म्हणजे तो दरवाजा वर उचलून काडी लावली तेंव्हाच लागायचा आणि त्या वेळेस घरी मी माझी मोठी बहीण आणि आजी होती. बरे मागून जायला पण जागा न्हवती कारण आम्ही १ ल्या माळ्यावर राहायचो आणि मागून चढायला पण काहीही न्हवते. कखाली जाऊन बघितले तर काचा पण बंद होत्या...नक्की काय झाले असेल ते आम्हाला अजून पण कळले नाही....

माझा पण एक अनुभव..
एकदा मुंबैला जाताना माझी भाची गाडी चालवत होती, मी शेजारी काम करत होतो आणि बायको व छोटी मुलगी मागे बसली होती.
मध्येच गप्पा मारता मारता अचानक बायकोचा आवाज बंद झाला. थोड्या वेळाने आरश्यात पाहिले तर मागे बायको दिसेना.
असली फाटली म्हणून सांगू..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नीट पाहिले तर कळले की सीट वर झोपायला जागा नाही म्हणून बाईसाहेब पुढच्या आणि मागच्या सीटच्या मध्ये खाली झोपल्या आहेत.

सॅम पार्निया हे emergency medicine मधील तज्ञ आहेत.अमेरीका ,युरोप आणि ऑस्ट्रेलियातील हॉस्पीटल्समध्ये एक प्रयोग केला गेला ,ज्याचे रिझल्ट्स असे दाखवतात की मृत्युनंतरही काही काळ awareness असतो,म्हणजे ती व्यक्ती मृत्युनंतरही जागृत असते काही काळ ,हा पुर्णपणे सायंटीफीक डिसिप्लीनमध्ये झालेला स्टडी आहे म्हणुन मी इथे देतो,एकदा लिंक उघडून बघावी.युट्युबलाही व्हिडीयो आहेत.

First hint of 'life after death' in biggest ever scientific study

D eath is a depressingly inevitable consequence of life, but
now scientists believe they may have found some light at
the end of the tunnel.
The largest ever medical study into near-death and out-of-
body experiences has discovered that some awareness may
continue even after the brain has shut down completely.
It is a controversial subject which has, until recently, been
treated with widespread scepticism.
But scientists at the University of Southampton have spent
four years examining more than 2,000 people who suffered
cardiac arrests at 15 hospitals in the UK, US and Austria.
Dead could be brought back to life in groundbreaking
project
And they found that nearly 40 per cent of people who
survived described some kind of ‘awareness’ during the
time when they were clinically dead before their hearts were
restarted.
One man even recalled leaving his body entirely and
watching his resuscitation from the corner of the room.
Despite being unconscious and ‘dead’ for three minutes, the
57-year-old social worker from Southampton, recounted the
actions of the nursing staff in detail and described the
sound of the machines.
“We know the brain can’t function when the heart has
stopped beating,” said Dr Sam Parnia, a former research
fellow at Southampton University, now at the State
University of New York, who led the study.
“But in this case, conscious awareness appears to have
continued for up to three minutes into the period when the
heart wasn’t beating, even though the brain typically shuts
down within 20-30 seconds after the heart has stopped.
“The man described everything that had happened in the
room, but importantly, he heard two bleeps from a machine
that makes a noise at three minute intervals. So we could
time how long the experienced lasted for.
“He seemed very credible and everything that he said had
happened to him had actually happened.”
Of 2,060 cardiac arrest patients studied, 330 survived and of
140 surveyed, 39 per cent said they had experienced some
kind of awareness while being resuscitated.
Although many could not recall specific details, some
themes emerged. One in five said they had felt an unusual
sense of peacefulness while nearly one third said time had
slowed down or speeded up.
Some recalled seeing a bright light; a golden flash or the Sun
shining. Others recounted feelings of fear or drowning or
being dragged through deep water. 13 per cent said they
had felt separated from their bodies and the same number
said their sensed had been heightened.
Dr Parnia believes many more people may have experiences
when they are close to death but drugs or sedatives used in
the process of rescuitation may stop them remembering.
“Estimates have suggested that millions of people have had
vivid experiences in relation to death but the scientific
evidence has been ambiguous at best.
“Many people have assumed that these were hallucinations
or illusions but they do seem to corresponded to actual
events.
“And a higher proportion of people may have vivid death
experiences, but do not recall them due to the effects of
brain injury or sedative drugs on memory circuits.
“These experiences warrant further investigation. “
Dr David Wilde, a research psychologist and Nottingham
Trent University, is currently compiling data on out-of-body
experiences in an attempt to discover a pattern which links
each episode.
He hopes the latest research will encourage new studies into
the controversial topic.
“Most studies look retrospectively, 10 or 20 years ago, but
the researchers went out looking for examples and used a
really large sample size, so this gives the work a lot of
validity.
“There is some very good evidence here that these
experiences are actually happening after people have
medically died.
“We just don’t know what is going on. We are still very
much in the dark about what happens when you die and
hopefully this study will help shine a scientific lens onto
that.”
The study was published in the journal Resuscitation.
Dr Jerry Nolan, Editor-in-Chief at Resuscitation said: “Dr
Parnia and his colleagues are to be congratulated on the
completion of a fascinating study that will open the door to
more extensive research into what happens when we die.”

One man even recalled leaving his body entirely and watching his resuscitation from the corner of the room.
असाच अनुभव मला अगदी लहान असताना (८-९ वर्षाचा) असताना आला होता. मी काहीतरी कारणान आजारी होतो. ताप खूप वाढला होता. मी गादीवर झोपलो होतो, बरेच लोक आजूबाजूला बसले होते. असे आठवते. अजूनहि अनेकदा आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी मी त्रयस्थपणे अनुभवत असतो, मला आनंद, दु:ख काहीहि मनापासून होत नाही. मी उगाचच नाटक करतो, पण मा़झे मन, मा़झे विचार भलतीकडेच असतात.

माझ्या लहानपणीचा डोळ्यासमोर घडलेला किस्सा............
मी आणि आई दोघीच घरात होतो....आई शिलाई मशीनवर कपडे शिवत होती..मी अभ्यास करत होते.....आणि अचानक कुणास ठाऊक कसं आमचं लोखंडी गोदरेजचं कपाट थोडसं उघडून पुन्हा बंद झालं...
दोघीही दचकलो....कपाटाजवळ दोघींपैकी कुणीच न्हवत तरीदेखील असं कसं घडलं...भूकंपाचा हादरा म्हणावा तर तो फक्त कपाटालाच कसा जाणवला....आईने भीतभीतच कपाट उघडून बघितलं..त्यात माझी फार जुनी बाहुली तिला समोरच दिसली....तिने पटकन कपाट बंद केलं...पण त्यादिवशी बाबा घरी येईपर्यंत आम्ही घाबरलेल्याच होतो...
बाबा घरी आल्यांनतर आईने ती बाहुली...बाबांना बाहेर फेकून यायला सांगितली....त्यानंतर तो प्रकार पुन्हा घडला नाही....पण अजूनही ते अर्धवट उघडून बंद झालेलं कपाट माझ्या डोळ्यासमोर येत....

माझा पण एक अनुभव

बरीच शोधाशोध करून आम्ही 3 वर्षांपूर्वी आमच घर घेतल. फ्लॅट आवडला म्हणून आणि त्या घराच्या मालकाला लंडन ला शिफ्ट व्हायची घाई असल्याने आम्ही पण लगेच सगळे घाईतच केले. डिसेंबर 2013 ला गृह प्रवेश करून तिथे शिफ्ट झालो. घरातलं सगळं साहित्य लावण्यासाठी मी सुट्टी घेतली होती. मुलगा शाळेत आणि मीस्टर ऑफिस ला गेल्यानंतर मी सावकाश आपल काम करत बसायचे. आमचा फ्लॅट बिल्डिंग च्या पाठच्या बाजूला आहे. मागे मस्त खाडी, जंगल आणि मोकळ आकाश मस्त वाटत होतं.
मी बेडरूम मध्ये कपाट लावत असताना अचानक हूऊऊउ हूऊऊउ ... असा आवाज 2-3 वेळा आला. मला वाटलं कबुतर असतील, मी जरा शांत होऊन आवाज ऐकला पण तो कबुतरांचा नव्हता. Uhoh रात्री पण 1-2 वेळा आला. मी यांना काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच आवाजाचा कानोसा घेतला तर किचन मधून येत होता. मी जरा धीर करून किचनच्या दारात जाऊन उभी राहीले. परत तोच आवाज आला आणि एक्सओस्ट फॅन जोरात फिरत होता, त्याच स्विच बंद असून, मग लक्षात आलं कि जोरात आलेल्या वाऱ्यामुळे एक्सओस्ट फिरतोय आणि त्याच्यात घोंगावता आवाज येतोय ..... Lol Lol Lol

एक किस्सा गेल्या आठवड्यातला (सर्व पित्री अमवश्येचा)

संध्याकाळी घरी येताना ट्रेन मध्ये एकजण बोलली की तिने दुपारी ३.१५ ची CST ट्रेन डोंबिवली वरुन पकडली, फार गर्दी नव्हती. एक मुलगी पण चढली आणी डोरलाच ऊभी राहीली.
ट्रेन दिवा- मुंब्रा खाडी जवळ येताच ती मुलगी अचानक बाहेर ओढली जाऊ लागली, ते पहाताच तिथे ऊभ्या असलेल्या दोघी-तीघीनी तीला आत खेचायचा प्रयत्न केला पण काही ऊपयोग नाही जणु एखादी अद्रुश्य शक्ती त्या मुलीला बाहेर खेचत होती, शेवटी ती खाली पडली आणी गेली.

त्या बाईच्या म्हणन्यानुसार हे सर्व तीने स्वतः पाहीलेय. या आधीसुद्धा त्या जागेबद्दल असेच काहीतरी एकले आहे खरे खोटे माहित नाही.

माझा खरतर विश्वास बसत नव्ह्ता म्हणुन मी त्यांना विचारले सुद्धा की, जर का २-३ जणी ती आत ओढत होत्या मग ती एकटी कशी पडली कारण सहसा अश्यावेळी गतीनुसार दुसरी व्यक्ती सुध्हा बाहेर फेकली जाते.
त्यावर त्या फक्त ईतकेच बोलल्या की जे झाले ते मी माज्या डोळ्यांनी पाहीलेय बाकी माला काही कळत नाही.

वेस्टइंडीज के लोग एसे है । तो वहा के ----भूत-- -केसे होगे >>> नाही आवडलं +111
@ मानिनी, मीपण ऐकलय याबद्दल मुंबईकरांकडून•
बाकी इथे लिहीलेले अनुभव खरच अद्भुत!

Pages