अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ७-८ वर्षाचा असेल . आमचे एकत्रित कुटुंब दोन काका त्यांची मुले, आजोबा आजी अशी सर्व मिळून १४ जनाचा परिवार आमच्या स्वत: च्या मोठ्या वाड्यात राहायचो. आमचा वाडा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे आणि जवळ पास ३००० स्क़. फूट वाडा आणि त्या जवळील ८००० स्क़. फूट मोकळी जागा अशी आमची मालमत्ता.

गोष्टी ला सुरवात अशी झाली की कपडे धुवून वाळू घातले की थोड्या वेळात त्या वर विष्ठा लागलेली दिसायची आधी आम्हाला कुणी तरी खोडी काढत आहे असे वाटले, म्हणून आजी एकदा लक्ष ठेवून बसली पण कुणीच आले नाही पण कपड्याला विष्ठा मात्र लागलेली आढळून आली. मग धुतलेले कपडे बैठकीत वाळू घातले तरी तोच प्रकार पुन्हा झाला २-३ दिवसातच घराच्या आत म्हणजे भिंती वर, कपाटाला एवढेच काय देवांच्या फोटो वर पण विष्ठा लागलेली दिसायची आणि याला एक खूप घाणेरडा वास यायचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच जात होता घरात केलेल्या अन्नावर सुद्धा विष्ठा लागायची परत स्वयंपाक केला तरी सुद्धा हाच प्रकार आणि बाहेरून काही आणले तरी हाच प्रकार एक तर बाहेर जाऊन जेवण कराव लागायचं नाही तर उपाशी पोटीच झोपावं लागायचं. दरम्यान याचा बंदोबस्त करण्या साठी खूप प्रयत्न केले गेले. खूप सारे मांत्रिक, साधू, जाणकार आणले गेले पण परिणाम शून्य.

लहाने काका घर सोडून दुसरी कडे किरायाने राहण्या साठी गेले तरी त्यांना हाच त्रास तेथे सुद्धा होऊ लागला, घर मालकाने घर सोडायला लावले.

शेवटी आगतिक होऊन काकाच्या मुलाने ज्या वर संशय होता अश्या सर्वांवर वर साम दाम दंड चा वापर सुरु केला आणि एका कडून खात्री लायक माहिती मिळाली की एक व्यक्ती आमच्या वाड्या वर डोळा ठेऊन आहे आणि हे सर्व काही तो एका मांत्रिका कडून करून घेत आहे, विशेष म्हणजे हाच मांत्रिकाने या आधी आमच्या कडून ११००० रुपये घेतले होते व पूजा केली होती वरील प्रकार बंद व्हावे म्हणून. त्या मांत्रिकाला भावाने गोडी गुलाबी ने वाड्यावर आणले आणि ७ महिन्यात जे जे काही सहन केले त्याच्या सर्व राग त्याच्या वर काढला, चांगले १/२ तास तुडवला, दोन चांगले बांबू तोडले त्याच्या वर आणि ज्याने या मांत्रिकाला पैसे दिले होते त्याला सुद्धा त्याच्या घरी जाऊन त्याला बदडले.
त्या नंतर आज पर्यंत असा कोणताच प्रकार आमच्या कडे घडला नाही.

परवा रात्री 'रात्रीस खेळ चाले' मालिका बघत होतो. एरवी ही मालिका फक्त मनोरंजन म्हणून पाहणारा मी पण मालिके मध्ये दाखविलेल्या काही प्रसंगांमुळे काही जुन्या आठवणी चाळवल्या आणि बेचैन झालो.
साल १९९९, स्थळ: प्रतापगड. ओळखीच्या गटा सोबत महाबळेश्वर ते प्रतापगड हा ट्रेक करत होतो. दुपारी जेवण करून महाबळेश्वरच्या बॉबे पॉइंट वरून निघून पारगाव - अफझलखान समाधी असे करत प्रतापगड वर पोचणे हा कार्यक्रम होता. अंतर साधारण १६ किमी ( ४ तास) . प्रतापगडच्या MTDC च्या रेस्टहाऊस मध्ये रात्रीच्या जेवणाची आणि राहण्याची आधीच सोय केलेली होती. ट्रेक मस्त चालू होता. काही नव्या ओळखी झाल्या होत्या. अंतर ही तसे फार दमवणारे नव्हते. साधारण ६ च्या दरम्यान अफझलखान च्या समाधीचं दर्शन घेऊन प्रतापगड कडे निघालो. फारतर अर्धा तास राहिला होता गडावर पोचायला. मी, जळगावचे एक डॉक्टर आणि पुण्याचा एक मुलगा असे तिघे सगळ्यात पुढे होतो. बाकी चमू बराच मागे होता. गडाच्या थोडंसं अलीकडे जंगलात आम्ही तिघे बाकी चमूची वाट बघत थांबलो होतो. पुण्याचा तो मुलगा लघुशंकेसाठी झाडीत गेला. थोड्याच वेळात त्याचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही तो गेला त्या दिशेला धावलो तर तो झाडीतून आमच्या कडेच पळत येत होता. तो आम्ही उभे होतो तिथपर्यंत पोचला आणि 'ते.. ते.. तिथे.. तिथे' एवढंच बोलत होता. डॉक्टर त्याला 'अरे काय जाल? साप बघितला का? काही चावला का? ' असे विचारत होते पण तो काहीच बोलत नव्हता आणि बघता बघता तो बेशुद्ध पडला. त्यानंतर आमची बरीच धावा धावा झाली. मी बाकी लोकांना बोलवायला खाली पळालो तो पर्यंत डॉ नि त्याला उचलून रेस्टहाऊस पर्यंत नेलं होतं. आधी सगळ्यांना वाटलं त्याला काही तरी चावलं आहे म्हणून गाडीतळावर एक गाडी त्याला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेण्यासाठी तयार ठेवण्यासाठी सांगितली होती. पण त्याच्या शरीरावर तश्या काहीच खुणा नव्हत्या आणि नाडीची जलद गती एवढं सोडलं तर बाकी काहीच लक्षण नव्हती. डॉ च्या मते तो कसल्या तरी शॉक मध्ये होता आणि त्याला थोडीशी विसरती मिळणे आवश्यक होते. डॉ नि सर्वांना धीर दिला.ह्या पूर्णं प्रसंगात नेतृत्वं आपोआपच डॉ कडे गेलं होतं. थोड्या वेळांनी त्याला जाग आली आणि तो हमसून हमसून रडायला लागला. डॉ नि सगळ्यांना बाहेर पाठवलं आणि एकटेच त्याच्याशी बोलायला थांबले. आमच्या मध्ये वय वर्षे १५ च्या आत मधली बरीच मंडळी होती (इंक्लुडींग मी) . हा असं प्रसंग कोवळ्या मनाला कितपत झेपेल आणि त्याचा पुढे किती इंपॅक्ट पडेल हा अम्हाला त्या मागचा कळवळा. त्या मुलाने डॉ ला काय झालं ती सर्व हकिकत सांगितली (जी आम्हाला बरीच नंतर कळली).
तर तो लघुशंके साठी गेला असता त्याला तिथे एक विहीर दिसली. तो विहिरी जवळ गेला आणि आतमध्ये वाकून कसले कसले आवाज काढले (बऱ्याचं लोकांना अशी सवय असते). त्या विहिरीत आवाज घुमत होता. आपल्याला नवीन एको पॉइंट मिळाला आहे हे सांगण्यासाठी तो परत अम्ही उभे होतो त्या दिशेने निघाला. त्याला मागे कोणीतरी हसण्याचा आवाज आला (विहिरीतून). त्याने मागे वळून पाहिले तर परत आवाज आला. हे सगळं त्याला सहन नाही झालं आणि आमच्या दिशेने पळत निघाला.
त्याला त्या रात्री भरपूर ताप भरला म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला स्पेशला गाडीनी आधी महाबळेश्वराला, तिथे काही प्राथमिक तपासण्याक
रून पुण्याला नेण्यात आले. ह्या सर्व प्रसंगानंतर अर्थातच आमचा ट्रेक तिथेच संपला (आमचा प्लॅन दुसऱ्या दिवशी घोणसपूर मार्गे मधुमकरंद गडावर जाण्याचा होता). आम्ही सर्व एसटी नि आपापल्या गावी परतलो.
डॉच्या मते हा केवळ भास होता आणि त्या सर्व प्रसंगाला भुताटकी च्या ऍंगल नि पाहू नये असे होते. खूप दमल्या नंतर शरीरात कमी पडलेले पाणी आणि इतर सर्व सॉल्टस मुळे मेंदूला योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही आणि असे भास होतात अस त्याचं मत होतं. वाळवंटात आणि हिमालयात होणारे दृष्टिभ्रम हे त्यातलेच प्रकार. असं होण्या मागे शास्त्रिय कारण त्यांनी अम्हाला पटवून सांगण्याचा प्र्यत्न केला. त्यांना स्वथला हिमालयात ट्रेकिंगच्या वेळी प्राण्वायू कमी पडल्यामुळे आलेले अनुभव सांगितले. हा त्यातलाच प्रकार आहे हे ही पटवून दिले. त्यांनी आम्हा सर्व मुलांना बराच धीर दिला आणि घाबरून न जात हा केवळ वेगळा प्रसंग म्हणून त्याच्याकडे पाहावे हा सल्ला दिला. त्याचं तर मत होते की पुढचा कार्यक्रम रद्द न करता तसाच पुढे चालू ठेवावा असे होते. अर्थात त्या मन:स्थितीत कोणिच त्याला दुजोरा दिला नाही. प्रत्येकाला आपापल्या घरी सुरक्षित कोशात जायचे होते.
तिथल्या स्थानिक मंडळीनि नंतर तिथे घडलेल्या अजून काही अद्भुत गोष्टी सांगितल्या पण त्या सर्व अतिश्योक्ती वाटत असल्याने आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्श्य केलं.
मी त्या वेळी १५ वर्षाचा होतो आणि सहाजीकच माझ्या वर ह्या अनुभवाचा बराच प्रभाव पडला. पण ह्या सर्व प्रसंगात माझे हीरो होते डॉ. त्यांनी जे मनोधैर्य दाखवले आणि कठीण काळात पूर्णं टीमच मनोधैर्य खचू न देण्यासाठी जे प्रयत्न केले ते खरेच वाखण्या जोगे होते. कधी कधी मी विचार करतो, त्या संध्याकाळी जेव्हा तो मुलगा झाडीतून घाबरून आमच्या दिशेने पळते येत होता, तिथे जर डॉ नसते तर मी काय केले असते? निर्णय घेणं तर सोडाच नक्की काय घडत आहे तेच मेंदू पर्यंत पोचत नव्हतं. सगळं कस स्वप्नवत चालू आहे असे वाटत होते.
त्या नंतर मी असंख्य वेळा महाबळेश्वर ला गेलो असेन. महाबळेश्वर ला गेलो की प्रतापगडला ही जातोच. प्रतापगडाला गेलो की त्या विहिरीजवळ पण जातो. पण खरचं सांगतो अजून पण आत मध्ये वाकून काही ओरडन्याचे धाडस होते नाही.
टीप : हा प्रसंग जसा घडला तसा नमूद केला आहे. कोणत्याही स्थळाची बदनामी करायचा हेतू नाही. महाबळेश्वर, प्रतापगड, मधुमकरंदगड, कमळगड, चंद्रगड, भीमाची काठी आणि परिसर हे माझ्यासारख्या भटक्या साठी काशी समान आहेत.

किस्से फरच सुंदर आहेत सगळे, हे सगळं वाचून मला आलेल्या अमानवीय अनुभवाची आठवण आली. Post graduation साठी कॉलेजात अ‍ॅडमीशन घेतले तिथेच एका खाजगी hostel वर रुम मिळाली. hostel ची इमारत तीन मजली होती, नुकताच नविन बांधल्यामुळे बहुतेक रूम बुक झालेल्या नव्हत्या मी मुद्दाम ‍तिसर्‍या मजल्यावरची रूम घेतली. त्या मजल्या वर बहुतांश रूम बंदच होत्या. मी सामान लावून घेतले, तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. रुम मध्ये दोन बेड होते त्यातला एक भिंतीला लागून तर एक दरवाजा झाल्यानंतर दुसरा बेड होता व बेड शेजारी एक मोठी खिडकी होती. मी ऊकाड्याचा विचार करून मुद्दाम खिडकीजवळचा बेड घेतला नंतर कोणी room-mate आला तर त्याला दुसरा बेड द्यायचे ठरवले. त्या मजल्या वर कोणच नसल्याने संध्याकाळ अगदी भकास गेली. रात्रीचे जेवण वैगेरे झाल्यावर लॅपटॉप काढून मायबोली वर एक लेखनाचा धागा ऊघडला आणि एक थ्रीलिंग कथा लिहायला घेतली. कथा लिहता लिहता जाणवले कि आपण इथे एकटेच आहोत तसा बाहेर डोकावलो माझ्या आसपासच्या रूम्स बंदच होत्या.
पहीला बाहेरचा बल्ब लावला जो आतापर्यंत मी बंदच ठेवाला होता. आता मात्र मला थोडी भिती वाटू लागली तसा मी भुताला घाबरत खुप घाबरत होतो पण आता मला एकटेपणाची जास्त भिती वाटू लागली. मी लॅपी बंद केला आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. थोड्यावेळाने झोप लागलीही पन थोड्या वेळानंतर मला जाग आली ते थंड हवेच्या झोताने मी डोळे ऊघडून पाहीले तर बेड जवळ्ची खिडकी ऊघडीच होती. मी खिडकी ऊघडल्याचे मला तरी आठवत न्हवते. तरिपण मी स्वतःला समजवु लागलो की आपणच ऊघडली असेल आणि आपल्या लक्षात रहीले नसेल वैगेरे वैगेरे.
प्रवासाच्या थकव्यामुळे लगेचच झोप लागली, दुसर्‍यांदा जाग आली तेव्हा डोळे ऊघडल्या नंतर समोरच खिडकी मध्ये एक आकृती दिसली आता मात्र माझी जाम टरकली, माझ्या शरिरावर माझे नियंत्रण नाही असे मला वाटले कारण मी हालचाल करण्याचा खिडकी पासून दूर जाण्याचा अटोकाट प्रयत्न करून सुद्धा मी जराही हालचाल करू शकत नव्हतो. बाहेरचा बल्ब पण बंद झाला होता त्यामूळे त्या व्यक्तीचा चेहरा मला दिसत नव्हता. असा किती वेळ गेला काह्हिच कळले नाही शेवटी ती आकृती नाहिशी झाली.
मी लगेचच बेड वरून ऊतरुन खाली गेलो, घामाने पुरता भिजलेलो होत्तो. त्यानंतर मी कधीच तो बेड वापरला नाही आणि ती खिडकी कायमची बंद केली. नंतर काही दिवसात रूम बुक झाल्या सगळे राहू लागले. तसे सगळ्यांचे अनुभव कानावर पडू लागले. कुणाला पायर्‍यांवर काहीतरी दिसले कुणाला विचीत्र आवाज आला वैगेरे वैगेरे. मी मात्र उसर्‍याच महीन्यात ती रूम सोडली. आता दुसर्‍या रूममध्ये एकटाच बसून ही पोस्ट लिहीत आहे आणि लाईट गेली..........

दोन्हि अमानविय धागे वाचले...काहि किस्सेखुप गहिरे आहेत... इथे उल्लेख झालेल्या बहुचर्चित गानु आजीन्चि अन्गाइ ह्या कथेचि लिन्क मिलेल का???? पुर्वि दिलेलि लिन्क ओपन होत नाहि...पन कथा वाचन्याची इच्छा आहे...pls provide d current source....

exactly rashmi ...i received d message of insecured login...अजुन कुठे उपलब्ध आहे क ती कथा????

बापरे खरेच भयानक दिसते गानू आज्जीची कथा. इतकी कि गुगल ने सुद्धा धोक्याचा इशारा दिला तिकडे जाऊ नका म्हणून Wink असो. गुगलून पाहिले. ती फेसबुकवर आणि इतर ब्लोग वर पण उपलब्ध आहे. खूपच फेमस दिसते आज्जी.
इथे एक लिंक आहे:

http://bhutbanglaa.blogspot.in/2015/05/blog-post.html

मी पण अजून वाचली नाही. नंतर सवडीने वाचतो.

इथे जे किस्से देण्यात येतात ते काही फेसबुकवर पेजेसवर कॉपी पेस्ट तर होत नाहीत ना यावर कुणाचे लक्ष आहे का ? मायबोलीवरच्या अनेक धाग्यांचे नाव न देता शेअरिंग झालेले आहे. काही दिवसांनी ते व्हॉट्स अप वर फिरून आपल्याकडे आले की आपल्याला कलते की हे तर मायबोलीवर वाचलेले आहे.

माय हॉरर एक्स्पेरिअन्स नावाचे एक पेज आहे. असीम नगराळे नावाचा एक महाभाग ते चालवतो. या माणसाने बाबूरावांची हडळीचा मुका ही कथा पात्रांची नावं बदलून स्वतःची म्हणून खपवली. त्याच्या पेजवरून सहाशे सातशे शेअरिंग झाले. नंतर व्हॉट्स अप वर फिरली ती कथा. तिथून स्वतःचीच म्हणून किमान हजारेक लोकांनी फेसबुक वर पोस्ट केलेली आहे. काही ठिकाणी तर गडचिरोली भागात घडलेली सत्यकथा, एकाने माझ्या मामाच्या गावची कथा असे म्हणून शेअर केलीय.

कवठीचाफा या लेखकाच्या कथाही अशाच पद्धतीने फिरताहेत.

कष्ट घेऊन लिहीणा-यांचं नाव सुद्धा दिलं जात नाही.

.

गानू आज्जीची कथा वाचली ....भयानक आहे.

२ आठवडे अमानवीय... धागा वाचत आहे (बहुतेक २५०० पोस्ट त्या मधले निदान १००० अनुभव )
त्यामुळे
कसली भीती …
कशाची भीती …
कुणाची भीती …
कशाचीच भीती वाटत नाही आता…

या धाग्या वरून मिळालेली माहिती
१) गण - राक्षस गण आहे त्यांना भुताचा त्रास होत नाही. ( माझा आणि बाळाचा आहे)
२) sleep paralysis
३) जर काही अमानवीय वाटले तर अंगारा वापारणे.
४) मंत्र जप करणे (रामरक्षा, हनुमान चालीसा काही येत नाही)
५) रात्रीचा प्रवास टाळणे.

…-मराठी मध्ये जास्त लिखाण नाही त्यामुळे लिखाणातील चुका दुर्लक्ष करा.
…- एक मुक वाचक (२०११ पासून सर्वच लेख वाचत आहे)

काही ठिकाणी तर गडचिरोली भागात घडलेली सत्यकथा, एकाने माझ्या मामाच्या गावची कथा असे म्हणून शेअर केलीय.
>>>
Rofl
तुमची रिअ‍ॅक्शन काय होती यावर Lol
आपणच लिहिलेली कथा लोकं आपल्यालाच ही खरी घडलेली आहे म्हणून सांगतात तेंव्हा कसलं लोळायला होत असेल Lol

मी तिसरी चौथीत असताना आमच्या गावी आमच्या वाडीची सत्यनारायणाची पूजा जवळपास १२-१५ वर्षांनी होणार होती. इतक्या वर्षांनी पूजा होणार म्हणून चाकरमान्यांनी स्पेशल एसटी ठरवली. मी आणि माझा मोठा भाऊ, आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच गावी (रादर मुंबईबाहेर) जात होतो. गाव कसे असते काही म्हणजे काही कल्पना नव्हती. बस सकाळी निघून रात्री १०-११ पर्यंत पोहोचण्याचा प्लान होता पण निघेपर्यंत उशीर झाला आणि पोहोचायला पहाटे ३:३० - ४ झाले असावेत. स्पेशल एसटीमधून प्रत्येक घरातच कुणी न कुणी येणार होते म्हणून अख्खी वाडी जागी होती. आमची आमच्याच वयाची चुलतबहिण सुट्टी लागल्यालागल्याच गेलेली होती. ती दरवर्षी जाऊनयेऊन असल्याने तिकडच्या भूगोलाची तिला पूर्ण कल्पना होती. एसटी वाडीच्या बाहेर उभी राहिली आणि सगळ्यांबरोबर चुलतबहिण आली आणि आम्हा दोघांचे हात धरून आम्हाला अक्षरशः खेचत घेऊन जायला लागली. वाडीतल्या वाटा दगडांनी भरलेल्या. आम्ही ठेचकाळत तिच्यामागे चाललो आणि एकदाचे घराच्या अंगणात पोहोचलो. आम्हाला तिथे पोहोचवून बहिण काहीतरी करायला गेली आणि आम्ही दोघेच होतो. गावात/वाडीत वीज नसल्याने काळाकुट्ट अंधार होता. इतक्यात माझ्या भावाला १५-२० फुटांवर जमिनीपासून साधारण ५-६ फुट उंचीवर कमरेत वाकलेली एक जख्ख म्हातारी हातात एक मिणमिणता दिवा घेऊन चालताना दिसली. आजूबाजुला वाडीतल्या लोकांची घरच्या लोकांबरोबर भेट होत होती. कुणालाच काही खटकले नव्हते. गावी गेलो नसलो तरी बाबांच्या गावच्या भुतांच्या कथा भरपूर ऐकलेल्या. आम्ही पुतळे बनून भयभीत होऊन त्या म्हातारीकडे बघत होतो. काही क्षणांनंतर सावरून गुपचूप घरात जाऊन बसलो. कुणाला काही बोलण्याची भीती वाटली.
शेवटी पहाट झाली. आम्ही थोडे सावरलेलो... दिवस वर आल्यावर बहिण वाडी दाखवायला घेऊन गेली तेव्हा लक्षात आले ती म्हातारी आमच्या आईची सख्खी मावशी, तिचे घर थोड्या उंचावर होते. ती तिच्या मुलांना घ्यायला बाहेर आलेली. Happy
इतक्या वर्षात इतके वेळा गेलो आम्ही. पण त्या पहिल्या सकाळची आठवण कायम डोक्यात राहिलीये!! Happy

सारेच अनुभव मस्त..
पण सद्ध्या इथं कुणी काही सांगाव आणि नंतर त्याचे पोस्टमॉर्टेम व्हावे असचं चाल्लेलं दिसतयं.. Sad

पण सद्ध्या इथं कुणी काही सांगाव आणि नंतर त्याचे पोस्टमॉर्टेम व्हावे असचं चाल्लेलं दिसतयं.. अरेरे<<<<
होय. आशुचँम्प यांचा अमानविय धागा वाचताना जेवढ थ्रिल वाटतं होत तितक हा धागा वाचताना नाही वाटत आहे.

Pages