अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूत उद्या ये ऐकतं म्हणजे समजूतदार आहे.
कधीतरी ट्रिक कळून 'नाही आजच येऊन जाते उद्या आराम करते' म्हणेल.

>>>तरी आम्ही फोटो काढण्यासाठी आणि निरखुन पहाण्यासाठी बस स्लो केली होती.>>>> मनिमाऊ,
सिरीयसली??? आहो तुमच्या ह्या एका डाउट मुळे तुम्ही किती लोकांचा जीव धोक्यात घातला!! आजू बाजूच्या आणि मागच्या गाडया आणि त्यातील लोकांचा जीव गेला असता!
असले काहीतरी धंदे करू नका लोकहो!!

आम्ही 20 वर्षांपूर्वी कास पठारावर मित्रांसोबत फिरायला गेलो होतो. सोबत तरुण वयाला साजेसे मटणाचे जेवण. पोहोचायला रात्रीचे 9 वाजले. तेव्हां आताच्याइतके निर्बंध तिथे नव्हते....

9.30 वाजता चूल पेटवून मटण शिजायला टाकलं आणि बाटल्या ओपन झाल्या...

मी याविषयी नाराजी व्यक्त करुन सांगितलं की असल्या निर्जन ठिकाणी असले उद्योग बरोबर नव्हेत... आपल्याला इथल्या spirits ना त्यांचा वाटा दिलाच पाहिजे, त्याशिवाय सुरुवात करु नका...
पण बाकीच्यांनी हसण्यावारी विषय घालवला...

थोड्याच वेळात पाणी संपलं. एका गरीब मुलाला पाणी आणायला तलावाकडे पाठवलं. तो ही बिचारा गेला...
पाणी भरून परत येताना काय झालं कुणास ठाऊक? तो एका कमरभर उंचीच्या खड्ड्यात पडला... आल्या आल्या कुणालाच तो खड्डा दिसला नव्हता...

बेक्कार लागलं होतं त्याला ... भयानक रक्त वाहत होतं.... आम्ही त्याला वर काढलं... तिथली प्रचंड थंडी आणि रक्त वाहिल्यामुळे त्याचे हातपाय थड् थड् कापत होते....

सगळा बेरंग झाला... पिलेल्यांची खाड्कन उतरली... मटण फेकून द्यावं लागलं.... तत्काळ त्याला उचलून गाडी दामटून सातार्यात हाॅस्पिटलात दाखल करावा लागला....

माझ्या एका मित्राचा अनुभव...
नरकचतुर्दशीला तो दिवाळीच्या सुट्टीसाठी बहिणीच्या गावी चालला होता...
रात्रीच्या वेळेस तो बाईकवर चालला होता... एक मोठं शहर ओलांडून तो ग्रामीण भागात शिरला....
वाटेत एका माणसाने त्याला लिफ्ट मागितली... त्यानेही दयाबुद्धीने त्याला लिफ्ट दिली...
गाडी पुन्हा सुसाट सुटली....
थोड्याच वेळात मागचा माणूस त्याचा गळा दाबू लागला... त्याचे गाडीचे अवसान सुटलं....
गाडी डांबरी रस्त्यावर तिरपागडी फरफटत डावीकडच्या झाडाला थडकून थांबली....
मित्राला बराच मार लागला होता... त्याही परिस्थितीत त्याने मागे वळून पाहिलं....
मागं सरळसोट रस्ता पसरलेला...
मागं कुणीच नव्हतं...
त्यानं लिफ्ट दिलेला माणूस कुठेच नव्हता...

माझा एक मित्र ठाण्यात नवीनच रहायला आलेला... आल्यावर एक स्वस्तातला फ्लॅट, बदनाम असूनही त्याने घेतला...
सोबत पत्नी व लहान मुलगी...
हा सकाळी नोकरीवर जाऊन परत रात्री उशिराच येत असे...
मध्येमध्ये बायकोने भीति वाटल्याची तक्रार केली... पण याने दुर्लक्ष केले...
3 महिने झाले... मुलगी वेड्यासारखी वागू लागली... अगदी घाण घाण शिव्या देऊ लागली... सतत एका कोपर्यात बसून शून्यात गेल्यासारखी एकटक पाहत बसे...
रोज रात्री 3 वाजता उठून अंधार्या कोपर्यात जाऊन जोरजोरात रडत असे... तिथे तेव्हां शेजारी पण रहायला आले नव्हते...

मुलीचं वय फक्त अडीच वर्षे...
तिला काही ही कळणे शक्य नव्हते...
याने घरमालकाशी वाद घातला... तेव्हा कळले की तिथे एका मजुर बाईचा अपघातात मृत्यु झाला होता...
त्याने लगेच इकडेतिकडे चौकशी सुरु केली... घर सोडून उपयोग होणार नाही हे कळले कारण त्या आत्म्याने मुलीवर कब्जा केला होता... जिथेजिथे ते जातील तिथे तिथे ती येणार होती...
झालं...
शेवटी एका अगदी ताकदवान तांत्रिक बाईने त्या पिशाच्चाला मुलीपासून दूर केले...

'वेताळाची पालखी'

ही सातारा जिल्ह्यातली अन मुख्य म्हणजे माणदेश कडली खासियत (असे माळ तिकडे भरपुर आहेत विशेषतः सांगली जिल्ह्यातल्या पलुस कुंडलकडून वाया विटा औंध (यमाई) कड़े जाणारी वाट, भोसरे , वडुज, पुसेगाव, खाली पुसेसावळी , दहिवडी ही गावे रात्री लैच मेल्या सारखी गपगार पडतात, रात्रीचं गोंदवल्याहून दहिवडी जायला सुद्धा नको होते इतके भकास वातावरण, गंमत म्हणजे ह्याच भागात लहानाचे मोठे झालेले आबा अन वडील सुद्धा संध्याकाळी आम्हा पोरांना ह्याच गोष्टी सांगत, तंतोतंत असलेच भकास माळ लगीन घाई असावी तसले आवाज, वाद्य अन पालखी मधे बसलेला वेताळ राजा, सगळे डिटेल्स मॅच होतात! काय गंमत असेल बुआ!? किंवा काय किस्सा असेल हा नेमका ?

माझ्या एका मित्राचा अनुभव
माझा मित्र चिपळूण जवळ सांवरड़ा नावाच्या गावामधील शाळेत स्पोर्ट्स टीचर आहे.त्याच्या शाळेत एकदा काही कार्यक्रमनिमित्त कोल्हापुरहुन झांझ पथक बोलावले होते. कार्यक्रम संपायला रात्रि १०_१०:३० वाजले असतील .ती मुले कोल्हापुरला परत जाण्यासाठी निघाली असता मित्राने त्याना इतक्या रात्रि जाऊ नका उद्या सकाळी जा म्हणून सांगितले .त्यांची झोपन्याची व्यवस्था शाळेच्याच् एका हॉल मधे केली. रात्रि ३ च्या सुमारास ४० पैकी ३० मुलाना अंगावर कोणीतरी बसल्याचा भास् झाला त्यातील काहीजण तर ओरडतच उठले.त्यानंतर कोणीही झोपले नाही.सकाळी सुहास (माझा मित्र)आल्यावर त्याला सर्वानी रात्रिचा अनुभव सांगितला.त्याने चौकशी केल्यावर असे कळले की ४० पैकी ३० जण त्या हॉलच्या मागे एका कोकणी देवस्थानचया दगडा जवळ लघुशंका करण्यासाठी गेले होते.

.

:G:

नमुसी | 1 March, 2016 - 20:28
>>>तरी आम्ही फोटो काढण्यासाठी आणि निरखुन पहाण्यासाठी बस स्लो केली होती.>>>> मनिमाऊ,
सिरीयसली??? आहो तुमच्या ह्या एका डाउट मुळे तुम्ही किती लोकांचा जीव धोक्यात घातला!! आजू बाजूच्या आणि मागच्या गाडया आणि त्यातील लोकांचा जीव गेला असता!
असले काहीतरी धंदे करू नका लोकहो!!

@नमुसी: कोणत्या पोष्ट चा संदर्भ आहे इथे? जरा पोष्ट ची तारीख वेळ पण पेस्ट करत जा

Update: Ok सापडली पोष्ट: मनिमाऊ | 21 February, 2016 - 23:32

झुरळाचे भूत

काल दुपारी एक झुरळ दिसले. घरातल्या फरशीवर झाडूने मारले आणि फेकून दिले. काल रात्री हा धागा वाचून झोपलो. मध्यरात्रीनंतर जाग आली. अंधुक प्रकाशात पाहिले. दुपारी जिथे झुरळ मारले होते तिथेच एक झुरळ गोल गोल फिरत होते. नजर थोडी इकडे तिकडे झाली. काही सेकंदात पुन्हा तिथे पाहिले. झुरळ गायब. म्हणजे कमालच झाली. कारण तितक्या वेळात लपता येईल अशी जागा तिथे आसपास नव्हती. कपाटे वगैरे सगळे तिथून खूप दूर होते. प्राण्यांची भुते असतात का असा प्रश्न पूर्वी पडला होता. पण या धाग्यावर कुठेतरी गायींच्या भुताची कथा वाचून तो प्रश्न निकाली निघाला. आता मनात प्रश्न आला झुरळांची पण भुते असतात का? Uhoh Biggrin

गेल्या आठवड्यात एक अशी घटना घडली कि खूप वेळ विचार करावा लागला.

फेसबुक वर माझं कुणाशी तरी चाट चालू होतं. मधेच मला ब्रेक घ्यावा लागला. पुन्हा चालू केलं. थोड्या वेळाने पाहीलं तर त्यातली एक पोस्ट मायबोलीवर !

धक्काच बसला .
मग मी पुन्हा ते संभाषण चेक केलं. तर तिथून तो मेसेज गायब होता आणि इकडे माबोवर उमटलेला.
भर दुपारी घाम फुटला.
अंग चिंब झालं.

मग माशाबाला कौल लावला. खरंच विचार चालू झाले.
आणि हळू हळू आठवणी सैल होत गेल्या. मग आठवलं.

बरहा बंद झाल्यानंतर पुन्हा चालू करून वाट पाहून त्यात टंकण्याच्या कंटाळा आला की मायबोलीच्या ओपनच असलेल्या विंडोत क्लिक करून जो धागा समोर दिसेल त्याच्या कमेण्टबॉक्स मधे टंकण्याची रीत तशी जुनीच आहे. टंकल्यानंतर मेसेज कॉपी करून इथून डिलीट करून तिकडे पेस्ट करायचा हा शिरस्ता. पण कधी कधी चुकून सेव्हचं बटण दाबलं जातं. लगेच लक्षात आलं तर कुणाच्या लक्षात यायच्या आधी तिथे स्माईली टाकता येते. उशीर झाला तर कुणी तरी वाचण्याची शक्यता बळावते.

पण मल्टीटास्किंगच्या नादात हे असं झालेलंच विसरून गेल्याने या वेळी फजिती झाली.
ता.क - घाम फुटण्याचे कारण उन्हाळ्यात गेलेली वीज.

प्रभात रोड वर कोणाला काही अमानवी अनुभव आले आहेत काय??? मला आलाय

पुण्यात शिकायला होतो तेव्हा सुवर्णरेखा आमची मेस होती, रोज रात्री तिकडे जायचे सुग्रास जेवायचे अन तिथुनच पुढे पौड फाट्याला राहणाऱ्या मित्राकडे पत्त्याचा एखादा डाव अन गप्पा महफ़िल रंगवुन परत घरी यायचे १२ वाजता च्या दरम्यान हा शिरास्ता होता आमचा. एक दिवस रूममेट घरी गेल्यामुळे मी मेस ला एकटाच होतो, शिस्तीत जेवण करून नेहमीप्रमाणे पौड फाट्याला गेलो तिकडे गप्पा टाकून अंदाजे सव्वा बाराला परत निघालो , नेहमीच्या रस्त्याने म्हणजे पौड फाटा -एसएनडीटी-प्रभात रोड -खंडुजी बाबा चौक अन तिथून प्रबोधिनी वाया लकड़ी पुल हा तो रस्ता होय, सुवर्णरेखाचा चौक (आता बहुदा घोड़के पढ़ेवाले चौक नामकरण झाले आहे) ओलांडून मेस ओलांडून जसा पुढे आलो तसे लिज्जत पापड़ समोर त्याच्या जवळ असणाऱ्या बस स्टॉप जवळ एक जख्ख म्हातारी दिसली , मला नवल वाटले इतक्या रात्री ती तिथे काय करत असावी असे म्हणून मी थोड़ा स्लो होऊन तिच्याकडे पाहिले तर चेहरा वेडा वाकडा करत हसत म्हणाली "मला बशीव अन डेक्कन ला सोड" मला ते विचित्र वाटले म्हणून मी दुर्लक्ष करुन गाड़ी तशीच दामटली तर अक्षरशः गाड़ी स्टैंड स्टिल झाली (१५० सीसी सिबिझेड) काटा साठचा स्पीड दाखवत होता पण गाड़ी पुढे जाते आहे हे जाणवतच नव्हते, मी घामाघूम झालो होतो, मागून त्या म्हातारीचे शाप अन अक्षरशः लाखोली ऐकू येत होती, मागे वळून पाहता म्हातारी गाड़ी जवळ उभी! मी कसेबसे बळ एकवटले अन भीमरूपीची जी ओळ आठवेल ती पुटपुटत पुढे झालो, कसा बसा खंडुजी बाबा चौकात आलो ते एकदम गलितगात्र झाल्यागत वाटले थरथर सुटली होती अंगाला, तिथेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसां जवळ गेलो तर त्यांनी सावरले, पाणी दिले प्यायला, काय झाले ते विचारले , तेव्हा त्यांना कापरे कंट्रोल करत सगळे सांगितले तेव्हा त्यांच्यातला एक हवालदार म्हणाला

"बाबा रे वंगाळ जागा हाय ती परत रातीचा तिकडून येऊ नकोसा आज वाचलास उद्याचं काय खरंय" नंतर आठवडाभर सड़कुन ताप भरला होता, परत पुण्यात असे पर्यन्त रात्री नवा नंतर कधीच त्या वाटेने गेलो नाही मी.

तिथे काय होते ते कळले नाही कधीच पण तिथे काहीतरी होते/आहे ख़ासच असे वाटते, हा अमानवीय अनुभव होता का माझा भ्रम माहीती नाही पण मला हा अनुभव आला खरा.

खतरा बापू.
शाळेतली तीन वर्षं, आणि नंतर कॉलेज मधे असताना रुतुजा बेकरी मागेच एक मित्र रहायचा त्याच्या कडे येणे जाणे होते. असा प्रभात रोड आणि लिज्जत पापडच्या आजूबाजूच्या परिसराचा सायकल, बाईक वरुन मोठा अनुभव आहे. त्यात रात्रीच्या वेळी फिरायचे प्रसंग पण आले. तरी असला अनुभव ऐकून ही माहित नाही.

@सोन्याबापू, भीतीदायक अनुभव. पण मार्ग थोडा गूढ वाटला...

>> एसएनडीटी-प्रभात रोड -खंडुजी बाबा चौक अन तिथून प्रबोधिनी वाया लकड़ी पुल

एसएनडीटी वरून कर्वे रोड सरळ खंडुजी बाबा चौकात येतो. पण आपण प्रभात रोडला (व्हाया लों कॉलेज रोड?) का गेलात?

सोन्याबापू , भीतीचा प्रसंग ओढवला तुमच्यावर. आता हे वाचल्यापासून एकदा चक्कर मारावी असे वाटू लागले आहे.

सोन्याबापू, भयानक अनुभव. मित ने सांगितल्याप्रमाणे प्रभात रोड वरून सायकलवरून आणी नंतर बाईक वरून बरेच वेळा रात्री वगैरे फिरलोय. पण सुदैवाने असले काही अनुभव आले नाहीत.

बादवे, ते रुतुजा बेकरी होतं की रुजुता?

सोन्याबापू - बाकी अमानवीय वगैरे नाही माहित, पण तो प्रभात रोड - एरम्डवणे भाग आमच्या लहानपणी आम्हाला फार गूढ वाटायचा एकूण, हे खरे. बरेचसे बंगले अगदीच शांत, मुला-बिलांच्या गोंगाटाची जाग नसलेलेच जास्त होते . झाडे भरपूर, जरा संध्याकाळ होऊन गेली की सामसूम! एकूण अगदी जायचा यायचा भाग असला तरी जरा भितीच वाटायची तिथे.

आता प्रभात रोड भुतांनाच भिती वाटेल इतका गजबजलेला, गर्दीचा असतो. मागच्या भारत भेटीत पुण्यातल्या इतक्या वर्षांच्या काळात पहिल्यांदाच प्रभात रोडवर ट्रॅफिक जॅम अनुभवला Uhoh

Pages