अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या काकी सोबत आमच्या गावी घडलेला किस्सा ..कितपत खरा-खोटा माहित नाही. ऎकीव माहितीवरून इथे टाकत आहे.
काकी तशी मुंबईची पण एकदा गावी गेली असताना तिला रात्री जेवल्या नंतर परसाकडे जायचं होत. तिला हि सवय होती जेवल्या नंतर जायची .. आमचा काका तिला त्या सवयीसाठी खूप रागवायचा आणि गावकडे रात्री ८ नंतर सर्व सामसूम असते .. परसाकडे जायचं तर आमच्या घरापासून बरचस लांब जिथे जास्त झाडी आहेत तिंकडे जाव लागायचं .. त्या दिवशी काकी थोड जास्त आतमध्ये झाडीत बसायला गेली.आणि ती बसली असताना तिला लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला एकदम २-३ बाळ रडतायेत असा .. तीला वाटल आसपास कुठे वस्तीमधून येत असेल आवाज.. तीच आटोपून ती घरी आली आणि सकाळी शेजारच्या बाईला तिने सहज म्हणून रात्री जे घडल ते सांगितलं. तेव्हा ती बाई थोडीशी घाबरल्या सारखी काकी कडे बघू लागली आणि तिला म्हणाली पुन्हा त्या आतल्या झाडीत कधीच जाऊ नकोस पूर्वी लहान मुल गेल कि गावची माणस त्या बाळाला तिकडे पुरायची.

परसाकडे जाण्यावरुन आठवले.
गावी गेलो असताना माझ्या जाउबाई अशाच थोड्या दुर झाडीत गेल्या. थोड्या वेळाने त्यांच्या समोर मोठं वानर येउन बसलं. त्यांनी घाबरुन जी धुम ठोकली. Lol

त ट. वानर म्हणजे अमानवीयच स्टोरी आहे.

असेच एक निरुपद्रवी भूत लोणावळ्याच्या हॉटेल मध्ये "बेडशीट ओढणारे" म्हणून प्रसिद्ध आहे. बरेच ऐकून आहे. कुणी अनुभव घेतला असेल तर सांगा.>>>>> अनूभव नाय घेतला पण बेडशीट ओढुन बहुतेक ती नखशिखान्त पान्घरुन झोपणार्‍याला भॉक करायची अतृप्त ईच्छा असेल त्या भूताची.:खोखो:

हा आणि अजून एक लेख आहे, त्यात हॉस्टेल ला राहणार्‍या मुलाने कोंबडीचं पिल्लू पाळलं आणि शेवटी भीम अर्जुन दुर्योधन यांची रुपके मानवी नात्यांसाठी आणि माणुसकीसाठी दिली आहेत. त्याच्या प्रतीक्रिया भयंकर आहेत.

सस्मित,
अहो प्रतिक्रिया भयंकर आहेच हो, पण लेख कसले गंडलेले आहेत Lol
Skype वरुन सोलापुर हुन मुलगा बोलत होता...इथेच मी पहिला Rofl

मी खास प्रतीसाद मिळवण्यासाठी एक खराखरा लेख मुक्तपीठात लिहीणार आहे. बर्‍याच दिवसांची तमन्ना आहे.
सोलापूरहून स्कीप ठीक आहे हो, कधीकधी आम्ही सिंहगड रोड वरुन पि.सौ. ला पण स्काईप करतो Happy

काहीही हं तो लेख..... Uhoh
माझ्या लिखाणालाही लाज आणली त्या लेखाने... Proud
अर्थात त्या धर्तीवर लिहित सुटणारे माबोवरही काहि कमी नाहीत.....
असे लिखाण करता येणे, हे देखिल अमानवी सदरात मोडत असावे म्हणून इथे लिन्क दिली का? Lol

Esakal वरच्या प्रतिक्रिया जर रेग्युलर सकाळमधे छापायला लागले तर मुपीमधे लेख लिहायला कुणीच तयार होणार नाही Happy

एक किस्सा मित्राकडून ऐकलेला...
एकदा सातारा भागातील जत्रांच्या मोसमात माझा मित्र आणि त्याचा भाऊ एका लांबच्या गावी मित्राकडे, जत्रा होती तेव्हां, रात्री जेवायला गेले. गाव बरेच दूरवर. रस्ते पण चांगले नव्हते.
पण काय करणार मित्राचा आग्रह मोडवेना. शेवटी जावेच लागले. तिथे गप्पाटप्पा, जेवणखाण यात रात्रीचे साडेअकरा वाजले. तसे या दोघांनाही परत जायची आठवण आली. लगेच मित्राला सांगून हे दोघे परत निघाले. अगदी निर्जन, दुर्गम भाग. निघाल्यानंतर एक 20-25 मिनिटांत मोकळे माळरान लागले. त्यांनी 'धार' मारायला मोटरसायकल थांबवली. कार्यभाग उरकतानाच त्यांच्या लक्षात एक मंद, वा-याच्या झुळकीबरोबर वाहत येणारा आवाज आला. साधारण एखादी मिरवणूक, प्रोसेशन असते तसा. कुठे भजन वगैरे चालू असेल काय? नाही, कुठेही भजनाचा आवाज ऐकू येत नव्हता.
फक्त एक उत्साही मिरवणूक निघाल्याचा आवाज. थोरल्या भावाचा आवाज घाबरा झाला: "चल बाबा इथनं लवकर चल."
धाकट्याने तत्काळ गाडीला किक् मारली.

पुन्हा दोन तीन दिवसांनी त्या मित्राला खुलासा विचारला तर त्याने कबूल केले की अनेक जणांना तिथे 'वेताळाची पालखी' निघाल्याचा अनुभव आला आहे...

विजय, वेताळाची पालखी सातार्यात कुठे निघते माहित नाही, पण....
सातार्‍याहून पुसेगावला जाताना, वाटेत लगेचच एक खिंड लागते, तिथे मात्र पालखी नाही पण "लग्नाचे वर्हाड " निघालेले दिस्त असे तेव्हा म्हणायचे. आम्ही अमावास्येच्या पुसेगावच्या जत्रेहुन परतताना याच खिंडीतुन रात्रीचे दहाचे सुमारास पास झालो होतो सायकलवरुन. ते अनुभव वेगळेच होते.

गोव्याला जे नार्वेच्या पुढे ( आता नार्वे गोव्यात कसे ते विचारु नका) महादेवाचे जे सप्तकोटेश्वर मन्दिर आहे, तिथे पण दुपारी ३-४ च्या दरम्यान मन्दिर बन्दच करतात. कारण सन्ध्याकाळ नन्तर म्हणे भूतान्ची जत्रा भरते. एकतर ते जन्गलात आहे, जवळ वस्ती, वाहन सोय नाही म्हणून कोणीच तिकडे फिरकत नाही.

Pages