अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक किस्सा जो माझ्या पप्पासोबत घडलाय
त्यावेळी मम्मी माहेरी होती. सासर आणि माहेर मधे १-२ किमी चा रस्ता आहे. मध्ये वाटेत एक अशी जागा आहे जिथे मेलेली गुरे गाडतात तिला गावी दुर्गाडी असे मह्नतात तिला पार करुन जावे लगते

रात्रीचे साधारण ११ वाजले होते. पप्पा त्यान्च्या सासरी येत होते त्याकळी गाड्या नसाय्च्या एवड्या रात्रि व मधल्या रस्त्यानि फक्त २० मिनिटे लागाय्चि मह्नुन ते एकटे निघाले. चालता चालता ते दुर्गाडी इथे पोचले तर अचानक त्यान्ना एक गाय दीसलि एवढ्या रात्रि कुणी गुरे मोकळी सोड्णे शक्य नव्हते पप्पान्च्या लक्श्यात आले कि हा काहीतरी वेगळा प्रकार आहे कारण त्यान्नी यापुर्वि असे किस्से एकले होते मह्नुण ते शान्त पणे मागुन चालु लागले तर त्यान्च्या डोळ्यादेखत गुरान्ची सन्ख्या वाढत चालली एक एक करता करता जवळपास १५ ते १६ गुरे त्यान्च्यासमोर रस्ता आडवुन खुप सन्थ पणे चालत होति.
पप्पा अगदी शान्तपणे त्यान्च्या मागुन चालत होते खरतर मनातुन घाबरले होते पण त्यान्ना माहीत होते कि इथे रीअक्ट व्हाय्चे नाहि जर झालो तर ते आप्ल्यला त्रास देतात नाहि.
बराच वेळ झाल्यावर शेवटी जेव्हा गावाचि वेस आली त्यान्च्या नजरेसमोर सर्व जनावरे अद्रुश्य झाली

Sorry for typing mistake as not friendly with Marathi keyboard n grammar

आम्ही साताऱ्यात एका ठिकाणी किरायाने राहत होतो त्यावेळी मी आठ ते नऊ वर्षांचा आसेल घरात एकसारख्या तीन रूम होत्या सर्वात समोर बैठक मध्ये एक रुम व नंतर स्वयंपाक घर तर आम्हाला ह्या घरात येऊन जेमतेम एक महिना झाला होता. आम्ही सर्व जण मधल्या रूम मध्येच झोपायचो एका रात्री दोन वाजता आईला कुठल्या तरी आवाजाने जाग आली आईने मांजर आली असेल म्हणून झोपल्या झोपल्या स्वयंपाक घरात पाहिले तर एक बाई सेल्फ मध्ये भांडे लावत होती आईला पहिले कळलच नाही ही बाई कोण आहे. घरात आई शिवाय दुसरी बाई कुणी नव्हती मग हि कोण. ? आईला लगेच लक्षात आले हा वेगळाच प्रकार आहे. ती बाई आईला दहा एक मिनिटे दिसली असेल. सकाळी आईने शेजार्याना सांगितल ते म्हणाले कि ह्या घरात एक बाई स्वयंपाक घरात जळून मेली होती. ...एकच महिन्यात आम्ही दुसर्या घरात गेलो.आजही तो किस्सा सांगताना आईच्या अंगावर काटा येतो.

माझ्या मावस साबा बाबत हेच घडलेय. त्या आधी एक फ्लॅट भाड्याने बघायला गेल्या होत्या. ( नोकरीनिमीत्ताने मुम्बईला बदली झाली होती). काका बाहेर दरवाज्यातच उभे राहुन कोणाशी तरी बोलत असताना मावशी ( मावस साबा) किचन बघायला आत गेल्या तर तिथे एक बाई त्यान्च्याकडे एक टक बघतीय असे त्याना वाटले, तर खरच तिथे एक बाई होती. त्याना थोडे आश्चर्य वाटले आधी. मग त्यानी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, तर ती न बोलता तिथुन गेली. त्यानी बाहेर येऊन नवर्‍याला विचारले तर ते आणी त्यान्च्याशी बोलणार्‍या माणसाने सान्गीतले की इथे कुणीच बाई आतुन बाहेर जाताना वा येताना पण दिसली नाही. मावशीन्ची बोबडी वळली. त्या घरात आणी जवळ खूप सोयी असूनही त्यानी ते घर पुन्हा बघीतलेच नाही.

बिपाशा च्या कुण्या एका चित्रपटात एक डायलॉग आहे " अगर तुम भगवान को मानते हो तो तुम्हे शैतान को मानना ही पढेगा. "

सेम किस्सा माझ्या आतेबहीणीबरोबर झाला.
विरारला रेन्टच्या घरात ती, तिचा नवरा, सासरे, नणंद आणि नणंदेचे दोन मुलगे (वय १० आणि १२) रहात होते. थोडे दिवसांनी ही किचन मधे काम करताना तिला कोपर्‍यात कोण तरी बाइ उभी दिसली. अगदी स्पष्ट. ही किंचाळुन चक्कर येउन पडली. घरच्या इतरांना सांगितलं तर सासरे म्हणाले की त्यांना नणंदेच्या लहान मुलाने सांगितलेलं की कोणतरी बाई बाथरुम मधुन निघाली आणि किचन कडे चालत गेली. पण त्यांनी त्याला समजाउन गप्प केलेलं. मग त्यांनाही ती दिसली. पण माझी बहीण आणि नणंद घाबरतील म्हणुन सांगितलं नाही. माझ्या बहिणीने मला इथे रहयचं नाहीये असं सांगितलं. पण एका दिवसात कुठे घर मिळणार म्हणुन, दुसरं घर मिळेपर्ञंत ते सगळे २ दिवस तिथेच रहिले. माझ्या आत्याला म्हणजे तिच्या आईला तिने बोलाउन घेतले. ह्या २ रात्री ती अजिबात झोपली नाही पुर्ण वेळ जागी. आणि ती भुतबाई ह्या दिवसात सगळ्यांनाच दिसली. अगदी माझ्या आत्याला सुद्धा.

असेलही. पण तिचा चेहरा एका बाजुने जळालेला दिसत होता म्हणे. आणि ती कुणाशी न बोलता एका ठिकाणी उभी रहायची/बसायची.

परस्वा | 14 February, 2016 - 03:25
सस्मित मस्त किस्सा खरोखर घाबरलो

परस्वा | 14 February, 2016 - 03:27
सस्मित मस्त किस्सा खरोखर घाबरलो

परस्वा | 14 February, 2016 - 03:30
सस्मित मस्त किस्सा खरोखर घाबरलो>>>>>>>> होना, म्हणून तीन वेळा एको आला.:फिदी:

माझ्या आजीला म्हणजेच माझ्या आईच्या आईला तिच्या आयुष्यामध्ये
चमत्कारीक व भयप्रद असे खूप अनुभव आले ,त्यातील एक अनुभव
सांगतो .हा अनुभव आजीच्या तरुणपणीचा आहे उन्हाळयच्या दिवसंमध्ये आजी लाकडे आणायला डोंगरावर जायची. अशाच एका दुपारी आजी तिच्या मैत्रीणिबरोबर डोंगरात लाकडे आणायला गेली होती ,तर लाकडे तोडून भारे बनवण्यात दोघिंनचा खूप वेळ गेला तेवढ्यात संध्याकाळ झाली अंधार पडायला सुरुवात झाली तेव्हा दोघी घरी परत यायला निघाल्या .डोंगर उतरत असताना उतरणीवर एक गोल वळण आहे त्या वळणाला लागुनच आत वडाचे एक मोठे झाड होते .तर त्या दोघी वडाच्या समोरून भारा घेऊन चालत येत होत्या, की अचानक आजीला आपल्याकडे कोणी तरी रोखून बघत आहे असे वाटले ,तेवढ्यात आजीचे लक्ष समोरच्या वडाच्या झाडावर गेले तर तिला दिसले की वरून दोन अजस्त्र मोठे लाल लाल डोळे त्या दोघिंनकडे वटारून रोखून बघत आहेत हे बघताच आजी घाबरुन ओरडली व तिच्या मैत्रिणीला ते द्रुश्य दाखवले त्या दोघीही खूप घाबरल्या आणि देवाचं नाव घेऊन तो रस्ता पार करू लागल्या त्यांना ते गोल वळण पार करायचे होते त्यासाठी वडाला अर्धप्रदक्षिणा घालुनच पार करावे लागणार होते ,जेव्हा दोघिंनी ते गोल वळण पार केले तेव्हा त्या दोघीनां वाटलं आपण आता त्या नजरेपासुन सुटलो म्हणून आजीने परत मागे फिरुन वडावर नजर टाकली तर पुन्हा तेच मोठे लाल डोळे दोघिंवर नजर रोखून होते तेव्हा आजी घाबरून म्हणाली "आया आया तो आता पलटला "तेव्हा त्या घाईघाईने पावले टाकत तिथून निघून कशाबशा त्यांच्या घरी पोहोचल्या .नंतर तिला समजले की त्या वडावरच्या भूताला मुंजा म्हणतात म्हणून .

नाही मी आजीला विचारले तेव्हा तिने सांगितले की ते डोळे खूप मोठे होते म्हणजे एखादया फुटबॉल एवढे असतिल आणि त्या डोळ्यांमधे चार पाच फूटांच तरी अंतर असाव .

माझ्या एका सिनीयर मैत्रिणीचा किस्सा

तिच्या नवर्‍याची बदली अमरावती ला झाली होती. तिकडेच कुठे एक भले मोठ्ठे जुने घर त्यांना नाममात्र भाड्यात मिळाले. घरात फक्त मैत्रिण , तिचा नवरा आणि ८-९ महिन्यांची मुलगी. येवढेच होते. घर चांगले कौलारु होते. साधारण १९८०-८२ चा काळ. तिला त्या घरात सारखे भास व्हायचे. कोणीतरी वावरत आहे असे वाटायचे. पण ती खुपच दुनिया फिरलेली होती. त्या मुळे तिला भिती वाटत नसे. तिला पूस्तके वाचायचा भयानक नाद आहे. तेंव्हा ती मुलगी झोपली की तासन तास वाचत बसायची. तेंव्हा तिला सारखा भास व्हायचा की पूस्तकात मागुन कोणी डोकावुन पहात आहे. एकदा तर मुलीला झोपवताना पाळण्याला हलकेच झोका कोणी देत आहे असे ही वाटले. एकदा मुलगी रडायला लागली तेंव्हा ही धावत बाहेर गेली, गॅस वर दूध उतु जाणार होते. म्हणुन ही मुलीला कडेवर घेवुन परत किचन मधे आली तर गॅस कोणीतरी बंद केला होता, आणि आश्चर्य म्हणजे सांडशी जवळच खाली पडलेली होती. तिला खुप आश्चर्य वाटले की हे तर तिने नक्कीच नाही केले, कारण तिला ती सांडशी वापरताच येत नसे. त्या मुळे किचनच्या अगदी न लागणार्‍या भांड्यां मधे सांडशी ठेवलेली होती.

त्या "कोणीतरी" तिला त्रास मात्र दिला नाही. त्या घरात कामवाली मात्र टिकत नसे. खरेतर कोणी तयारच होत नसे. पण हिला मात्र सगळी कामे करताना सतत आपल्या पाठीशी कोणी आहे हे वाटत असे. ही जरा मॉडर्न असल्याने आणि तिला फारसे नीट मराठी येत नसल्याने आजुबाजुचे जरा फटकुनच वागत. तिचे सगळे बालपण आफ्रिकेत गेले आणि सगळे शिक्षण परदेशी भाषांत आणि मुख्य म्हणजे स्वाहिलीत झाले. त्या मुळे तिला मराठीही नीट स्वच्छ समजत नसे. पण तरीही ती कधी घाबरली नाही. त्या घरात ते चांगले २-३ वर्ष राहिले.

गॅस कोणीतरी बंद केला होता....
भारी आहे हा सगळाच किस्सा ! >>> + १००००००
काटा आला अन्गावर

किचन मध्ये बायका दिसणारे किस्से एकदम जबरी आहेत. ग्यास बंद करणारे भूत पण भारीच. आजकालच्या "स्मार्ट होम" मध्ये पण मिळत नसेल हो सोय Proud असेच एक निरुपद्रवी भूत लोणावळ्याच्या हॉटेल मध्ये "बेडशीट ओढणारे" म्हणून प्रसिद्ध आहे. बरेच ऐकून आहे. कुणी अनुभव घेतला असेल तर सांगा.

Pages