अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/49229?page=13

मला होणाऱ्या त्रासाबद्दल मी माज्या पत्नीला सांगितले, तिने तिच्या माहेरी हि गोष्ट सांगितली तिला त्यावर उपाय म्हणून श्री गुरु चरित्र चे पारायण करण्यास सांगितले

आणि दर आमावस्येला घराबाहेर दही भाताचा नैवेद्य टाकण्यास सांगितले आणि आश्चर्य म्हणजे होणारा त्रास कमी झाला

माझ्या मैत्रिणीचा एक अनुभव … तिने मला सागिंतल ..
तीच नाव तृप्ती . ती शिक्षणाबरोबर पार्ट तैम हॉस्पिटल मध्ये जॉब करते सेकंड शिप मध्ये , कॅश कॅउन्तर वर . एकदा सेकंड शिप मध्ये काम संपून घरी जायला थोडासा उशीर झाला . कारण हॉस्पिटल मध्ये काही माणसे एका स्त्री ला घाईत घेऊन आले डॉक्टर ना दाखवायला , पण ती अगोदर च मेलेली होती . त्या स्त्रीने आत्महत्या केली होति. आणि ति माणसे काही सांगायला कचरत होति. यामुळे तिला उशीर झाला जेमतेम १०. ३० रात्रीचे . हॉस्पिटल आणी घरापासून अंतर २५ ते ३० मिनटे अंतरावर . ती पायीच घरी जायला निघाली . तशी ती रोज मैत्रिणी बरोबर जायची . पण त्या रात्री ती एकटीच निघाली घरी जायला (ठिकाण मुदामून सांगत नाही आहे ) . घरी जाताना तिला एक रेल्वे ब्रिज क्रॉस करावा लागतो . ब्रिज क्रॉस करताना तिला तितेच खाली तिला त्या हॉस्पिटल मध्ये मेलेली स्त्री दिसली किवा भास झाला असेल तिला … कशीबशी ती आपल्या घरी गेली .ति फार घाबरलेली होती . दुसऱ्या दिवशी तिने हॉस्पिटल मध्ये सहकार्यांना विचारल त्या बदल , मिळालेली माहिती अशी कि त्या स्त्री ने घरच्या भांडणाला कंटाळून उडी मारली त्या ब्रिजवरून …

(टीप : हा किस्सा ऐकीव आहे )

आर्या, हो, त्या 'जाणकार्याने' मुलाला जावळ असल्याने तिन्ही सन्जेला, बाहेर नेऊ नका असे सान्गीतले होते.
आता आजुन एक कीस्सा, मुलाला घेउन बहीणी कडे तळेगावला गेले होते.बहीण सन्ध्याकाळी मुलाना घेउन (माझा मुलगा वय २ वर्शे, तिचा मुलगा वय २.४ वर्शे) बिल्डिग कम्पाउड मध्ये खेळण्यास गेली. घरात आल्यावर माझ्या मुलाला उलट्या चालु झाल्या. घरगुती औशधे देउन झाली पण काहीही फरक नाही.शेवटी Doctor ने काही औशधे दिली पण नो इफेक्ट. मग सकाळी बहीणीच्या साबानी मुलावरुन पाव आणी सिगरेट उतरवली.तेव्हाच मुलाला आराम पड्ला.
नन्तर टेस्ट केल्यावर शरिरातील पाणी कमी झाल्याने उलट्या चालु झाल्या असे आले.

टिपः हि सत्य घटना आहे.जाणुण बुजुन 'अमानविय' सम्भ्ध जोड्लेला नाही. बहीणीच्या बिल्डिग विशयी अनेक किस्से ऐकण्यात होते.

>>मला एक समजत नाही ह्या भुतणी/जखणी/हडळा केस मोकळेच का सोडतात नेहमी?

त्यांनी केस बांधले तर त्या भुतणी/जखणी/हडळा आहेत हे तुम्हाला कसं समजणार? Happy

>>अर्धवट बांधलेली बिल्डिंग आहे. किंवा मुंबईहुन येत असाल तर टोल भरल्यानंतर फुड मॉल कडे जाताना फुड मॉलच्या diagonally opp उजव्या हाताला आहे ही बिल्डिंग

कोणीतरी फोटू टाका की

माझी मावशी कॉलेजात असताना तिची एक बंगाली मैत्रिण होती. मुमताज नटीसारखी दिसायची म्हणे. डोक्याला रुमाल बांधून सायकलवरून कॉलेजात यायची आणि सगळी मुलं तिच्यावर लट्टू. मग एका ट्रेन अ‍ॅक्सिडेंटमध्ये ती गेली. ट्रेन तिच्या शरीरावरून गेली आणि जवळपास दोन तुकडे झाले म्हणे. तरी तिच्या शरीरात थोडी धुगधुगी होती. कोणीतरी पाणी दिलं ते प्यायली आणि डोळे मिटले. पुढे कित्येक दिवस ट्रेनड्रायव्हर्सना ती ट्रॅक्सच्या कडेला दिसायची असं म्हणत. तिची एक वही मावशीकडे राहिली होती त्यामुळे ती परत घ्यायला ती येईल ह्या शंकेने मावशीची मात्र काही दिवस जाम टरकली होती.

मला एक समजत नाही ह्या भुतणी/जखणी/हडळा केस मोकळेच का सोडतात नेहमी?>> अहो मग आता मेल्यावरसुधा क्लिपा आणि रबर बॅन्ड शोधत बसाव्या की काय .. Proud

यावरुन आठवलं, एक मराठी पुस्तक वाचलं होतं भूतांचे प्रकार असं.(खरंच आहे, सिरीयस आहे, विनोदी नाही, फक्त पुस्तकाचं नाव वेगळ्ं आहे.) त्यात लिहीलं होतं की हडळ मुळात कपडे घातलेली नसते, पण स्त्री असल्याने लज्जेनुसार ती सारखी पदर लपेटून घेण्याची अ‍ॅक्शन करत असल्याने आपोआप कपड्यांचा भास होतो
तसेच ती स्त्रीसुलभ जेश्चर ने सतत केसातून हात फिरवत राहिल्याने मोकळे केस निर्माण झाले असावेत.

पण मला काय वाटतं, की जर एखादी व्यकती मेली की तिचं भुत होतं. तर ज्या अवस्थेत ती व्यक्ती मरेल त्याच अवस्थेत ते भुत दिसायला/फिरायला हवं. म्हणजे एखादी बाई जीन्स टी शर्ट+ पोनीटेल बांधलेल्या अवस्थेत मेली तर तिचं भुतही तसंच दिसावं. भुत कपडे / हेयर स्टाइल कशाला चेंज करेल?
सफेद साडी / केस मोकळे वैगेरे खोटं. भुत कुठुन सफेद साडी मिळवणार? आणि सफेदच का? राम्से एफेक्ट्साठी का?

<<तलम पांढरी पायघोळ नाईटी घातलेली पण भूतं<<< Rofl
अरे देवा सॉरी अरे भुताआआ.. किती ती तुमच्या वस्त्रान्ची 'चिरफाड'

रामसेच्या एका पिक्चरात ते भूत लहान बाळ असताना त्याला तळघरात कोंडलेलं असतं आणि मोठं झाल्यावर त्याच्या अंगावर मोठ्या माणसांचे कपडे असतात. त्यांच्या पिक्चरांचं सोडून द्या. तिथे लॉजिक लागतंच नाही Happy

करेक्ट, जशी सिक्स्थ सेन्स मधली भुतं वावरताना दाखवलियत तशी>>> बरोबर.

तलम पांढरी पायघोळ नाईटी घातलेली पण भूतं<< Lol

परदेशातली भुते संस्कृत रामरक्षा म्हणल्यास पळून जातील का?::अओ:

की मला स्वाहिली भाषेत रामरक्षा ट्रान्सलेट करून घ्यावी लागेल?

मला वाटतं भूताला समजणार्‍या भाषेतच रामरक्षा किंवा स्थानिक भाषेतील उपाय म्हणावा लागेल. भूत बनलं म्हणून मेंदूतलं अनोळखी भाषा ओळखण्याचं सेंटर अ‍ॅक्टिव्हेट होणार नाही.
तसेच भूतावर लहानपणापासून झालेले संस्कार तसेच असतील देशांप्रमाणे. त्यामुळे बॉडी लॅन्ग्वेज पण चुकीची इंटर्प्रिट होईल.

बाप्रे म्हनजे भुताशी डील करायला त्याची सगळी पे डिग्री , फ्यामिली इतिहास अभ्यासावी लागेल::अओ:

Pages