अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण 10 वर्षांपूर्वी माझ्या नातेवाईकांसोबत मी रायगड-दिवेआगर ट्रीपसाठी गाडी करुन गेलो होतो. दिवेआगरमधून परत निघायला आम्हाला रात्रीचे 11 वाजले. आता तपशील फारसे आठवत नाहीत. पण परत येताना साधारण साडेअकरा वाजता कुठल्यातरी घाटातच रस्त्यात एक सहा-साडेसहा फूट उंचीची एक स्त्री, अगदी मळकट साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेले, दोन्ही हात एखाद्या पैलवानासारखे भारदस्त हलवत, तरातरा रस्त्याच्या मधूनच चाललेली होती. ड्रायव्हर अनुभवी होता. त्याने हा प्रकार बघून सगळ्यांना ओरडून सांगितले कुणीही तिच्याकडे वळून पाहू नका. त्याने तिच्यापासून लांबून थोडीशी रस्त्याच्या खाली उतरूनच गाडी जोरात पुढे दामटली. अर्थातच कुणी मागे वळून पाहिले नाही. पण काय असेल हा प्रकार? आसपास कुठेही मनुष्यवस्ती नव्हती. आमची गाडी सोडली तर रस्त्यावर पूर्ण अंधार. तिच्याकडे काही प्रकाशाचे साधन देखील नव्हते. ती जरी कुणी मनुष्य असली तरी तिला इतक्या भयाण रात्री अंधा-या, निर्जन भागात एकटेच रस्त्याच्या मधोमध चालायचे काय कारण होते? मी तरी नाही सांगू शकत….

त्या हडळी बिचार्‍या तुमच्याकडे त्यांची हेअरस्टाईल करून द्या ना म्हणून विनवायला येतात तर तुम्ही घाबरून पळ काढता आणि वर त्या केस मोकळे सोडतात म्हणून विचारताय? पुढच्यावेळी हडाळ भेटली तर तिची वेणीफणी करून द्या.

वेणी घालता येईल मामी, पण तिने तिच्या आवडीचीच हेअर स्टाईल करुन द्या सान्गीतले आणी ते नाय जमल तर धरेल ना ती. वरतुन आपल्याच झिन्ज्या उपटायला बघेल ती.:फिदी:

अजून एक अनुभव आहे. आम्ही तेव्हां पुण्यात रहात होतो. गावाकडील घर अनेक महिने बंद होतं. आईवडील पण सोबतच रहात असल्याने गावाकडचे घर या कालावधीत बंदच राहिले. एकदा सलग जोडून सुट्ट्या आल्याने आम्ही गावी जायचे ठरवले. आम्हांला पोहोचायलाच रात्र झाली. घरात सर्व आवराआवर चालू असताना मी वरती गच्चीवर गेलो. खोल्यांतील कुबट हवेमुळे (अनेक महिने घर बंद असल्यामुळे) इथे त्यापेक्षा आलेले बरे वाटत होते. कट्ट्याला रेलून निवांत उभा होतो. पण अचानक कसलीशी वेगळीच जाणीव मला झाली. अशी जाणीव यापूर्वी कधीच झालेली नव्हती. मी अनेक वेळा आकाश निरीक्षण या छंदाच्या निमित्ताने अंधार्‍या माळावर एकटा वगैरे फिरलेलो आहे, पण असे कधीच वाटले नव्हते. तिथं आणखी कुणीतरी होतं याची स्पष्ट जाणीव झाली. अचानक माझ्या शेजारून कुणीतरी गेल्यासारखं स्पष्टपणे जाणवलं. सुदैवाने हा प्रकार इथेच थांबला. त्यापुढे काही घडलं नाही.

हड्ळीची वेणी फणी आणि खवीसची दाढी Biggrin Biggrin Biggrin

आजुन एक अनुभव, माझा मुलगा ८ महिन्याचा होता तेव्हा मुम्बै हुन नाशिकला मी, मुलगा, नवरा, बहीण, तिचा मुलगा (वय ११ महिने) चाललो होतो. नव्हे ते सन्धाकाळी (अगदी तिन्ही सन्जेला) प्रवास करण्याची बुध्दी झाली.
गाडीच्या ड्रायव्हरने नेहमीच्या होटेल ऐवाजी दुसर्या होटेल मध्ये थाम्बवली. खाणे पि णे आटपुन आम्ही नाशिकला पोहोचलो. रात्रि १-१.३० सुमारास माझा मुलगा खुप रडायला लागला आणी दरवाज्याकडे बोट दाखवुन बाहेर ने म्हणु लागाला.अन्गारा लावला, तरी रड चालुच. घराबाहेर व्हराड्यात नेल्यावर रस्त्यात ने असे दाखवु लागला. शेवटी नवर्याला फोन केला (सासर जवळ्च आहे), तो हि घाबरुन गेला.औशधे, खेळनी, दिले तरि शान्त होइना. सकाळी ६ ला चुलत बहीण जि doctor आहे ति हि बघुन गेली. तीच्या म्ह्णण्या प्रमाणे त्याला काहीही झाले नाही. तो प्रयन्र्त मुलाचे रडणे आनी बोट दाखवुन बाहेर ने असे चालुच. शेवटी सकाळी ८ ला ओळखीचे एक जाणकार आहेत त्याना विचारले. त्यानी सन्गितले कि मुलावर छाया पडली आहे. त्यानी काही उपाय केले आणी एक तासाभरात मुलाचे रडणे बन्द झाले. तो जो झोपला तो एकदम सन्धाकाळी उथला. मुलाचा मनुश्य गण आहे. तेन्व्हा पासुन सन्ध्याकाळ आनी रात्रिचा प्रवास बन्द.

प्लीजच हां. Give me a break ! किती अनेको कारणं असु शकतात या रडण्याची.

सॉरी, आपापला विश्वास. मीच वाचायला यायला नको, नाही पटत तर.

मनीमाउ, घट्ना नीट वाचा, आधी औशधे, doctor करुन झाले होते. आता मुलाला सन्भाळताना कीमान आइला तरि कळतेच बाळाला काय झाले ते. आणी शेवटी ज्याचा त्याचा विश्वास. मुलाच्या बाबतित आजुनही काही अनुभव आलेले आहेत.

कोकणात जाताना वडखळ नाका म्हणून ठिकाण लागतं . तिथे अशा घटना घडतात अस बऱ्याच जणांकडून ऐकलेय

मला एक समजत नाही ह्या भुतणी/जखणी/हडळा केस मोकळेच का सोडतात नेहमी?आरश्यात त्यांचा चेहरा दिसत नसेल ना !!

माझे आजोबा (६५-७२ साली) सायकलीने ६ वर्षे रोज पहाटे ४.३० वा. आपल्या गावापासुन ५-६ किमी वरच्या शेजारच्या गावात तालमीत मल्लांना (विनामोबदला) शिकवायला जायचे, त्या गावात अशीच गावाबाहेर वडाच्या झाडाखाली रस्त्यावरच भुतणी/जखणी/हडळाकम आडवी येते अशी चर्चा होती, एक दिवस आजोबा पहाटे जात असताना अंधारात ती आडवी आली,ओरडुन भिती घालत बडबडत होती,तेव्हां आजोबानी न घाबरता जवळ जाऊन पाहिलं तर केस सोडलेली रुपवान,कपड्याविना बाई होती,तिचे केस पकडुन २ लगावून तिची ओळख विचारली, घरी पाठवून आले,ती त्याच गावातील एका घरातील (वेडसर) बाई होती. जी कधीतरी पहाटे अशी वागायची.

पुराच पाणी नदीपात्राबाहेर मळीत आलं होत, आजोबा सकाळी मळीतलं गवत कापुन घेऊन कमरेएव्ढ्या पाण्यातुन येताना पायाला काही तरी लागलं,पाण्यात हात घालुन उचलुन पाहिलं तर एका नवविवाहित स्त्रीच मंगळसुत्रासहित प्रेत होत.२-४ जणांना घेऊन लाकडे गोळा केली आणी लगेच काठावर अंत्यसस्कार केले.पुर्वी (आणि आतादेखील) अशी अनेक बेवारस प्रेत पुराच्या पाण्यातुन जाताना अनेकांनी पाहिली आहेत.

<<व्हे ते सन्धाकाळी (अगदी तिन्ही सन्जेला) प्रवास करण्याची बुध्दी झाली.<<
अश्विनी....सेम केस माझ्या लहान भावाच्या बाबतीत झाली होती.
आई सांगते…. १९७६-७७ साल असेल. तेव्हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे क्वार्टर्स नुकतेच बांधले गेले होते. बाबांना क्वार्टर मिळाले. तळमजला होता. प्रत्येकाला मागे विस्तीर्ण बाग असायची. बागेच्या शेवटी छोटेसे गेट. त्यापलिकडे शेती होती. संध्याकाळी ५ ला ऑफीस सुटले… लोक घरी आले की बहुतेक सगळी फॅमिली बागेतच चहापाणी/ काम करण्यातच वेळ घालवायची. टी. व्ही. वै काही आले नव्हते घरात. नन्तर दिवेलागणीला घरात येउन दिवाबत्ती करायची अशीच सवय होती.
एका सायंकाळी आई माझ्या लहान भावाला घेऊन मागच्या गेटपाशी उभी राहून शेजारणीशी गप्पा मारत होती. भाऊ वय वर्ष दीड… तीथेच गेटपाशी खेळत होता. दिवेलागणीला आई त्याला घेऊन घरात आली त्याबरोबर त्याने भोकाड पसरले. कोबा केलेला होता त्या घराला. आणि मोठे स्क्वेअर केलेले होते. त्या मधल्या फुलीकडे बोट दाखवून 'ते' 'ते' करत भाऊ रडु लागला. खाली सोडले तर घाबरल्यासरखा आईला चिटकायचा. आम्ही सर्वांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ! आईचा अर्थातच अश्या गोष्टीवर विश्वास असल्याने आईने कुलदेवतेचा अंगारा लावला. भाऊ मग हळुहळु शांत झाला. आणि आईने दुध पाजून त्याला झोपवले… ते तो थेट दुसर्या दिवशी संध्याकाळीच ४-४:३० लाच उठला.
आता आईने इतका वेळ झाल्यावर त्याला उठवायचा प्रयत्न केला नसेल का असे प्रश्न काही तेव्हा मला पडले नाहीत. पण त्या काळात कॉलनीतली ७ लहान मुले काही कारणाने वारली होती, अस आई म्हणते!

असो, पण तिन्हीसांजेला/ दिवेलागणीला, 'जावळ' असलेल्या बाळांना बाहेर नेऊ नये अस आई अजूनही सांगते.

आम्ही कॉलेजला शहरात येण्यापूर्वी जिल्हा प्लेसला एका थिएतरचे काम बरीच वर्षे अपूर्ण होते.त्याबद्दल जुन्या कॉलेजच्या विद्यार्थ्याकडोन्न भुताच्या लै दंतकथा ऐकल्या होत्या. जागा भारलेली आहे भुते बांधकाम करू देत नाहीत. बांधले की रात्रीतून पुन्हा बांधकाम ढासळते. त्यामुळे कामगार येत नाहीत वगैरे.आम्ही कॉलेजला असे तो वर ही ते बांधकाम अपूर्ण होते. पुढे कॉलेज संपल्यावर यथावकाश ते भरभर पूर्ण झाले अन तिथे थिएटर सुरू झाले . आम्ही एकदा तिथे मेरे हमसफर हा चित्रपट पहायला गेलेओ होतो अत्यन्त रटाळ चित्रपट असल्याने मध्येच सोडून दिला आणि मॅनेजरशी गप्पा मारीत बसलो त्यात तो हाँटेड वास्तूचा विषय काढला.त्याने खोखो हसून सांगितले. अहो कशाचे काय. पूर्वीच्या मालकाने थिएटर बांधायला काढले . मध्ये त्याचे निधन झाले त्याच्या मुलांचे प्रॉपर्टीवरून वाद सुरू झाले त्यामुळे ते बांधकाम वादात पडले व तसेच अपूर्ण राहिले. वीसेक वर्षानी त्या भावा भावांचे कॉम्प्रोमाईज झाले अन त्यानी ती जागा एका मुस्लिम गृहस्थाला विकली . त्याने भांडवल घालून थिएटर पूर्ण केले . आजही ते थिएटर उत्तम चालू आहे Happy तिथून जाताना हा सर्व इतिहास आठवतो.
दुसरा: एका राजकीय पुढार्‍याचे मेडिकल कॉलेज होते / आहे. त्यासाठी त्यांनी एक हॉस्पिटल बांधले व सुरू केले त्यामुळे दुसर्‍या शेजारच्या जिल्ह्यातील पुढार्‍याच्या हॉस्पिटलवर परिणाम होऊ लागला. त्याने व्हिस्परिंग कॅम्पेन राबवून या नव्या हॉस्पितल मध्ये भुताटकी असून त्याने पेशंट मरतात अशी आवई उठवून दिली परिणामी हे नवे हॉस्पिटल एकदम रोडावले. बर्‍याचदा एखाद्या प्रॉपर्टीच्या व्यवहारात अडथळा आणण्यासाठी अशा पद्धतीच्या अफवा उठवल्या जातात अथवा कोर्ट केस, कौटुम्बिक वाद इत्यादी कारणामुळे काही बिल्डिंग्ज अपूर्ण असतात, जीर्ण होतात वापरात नसतात त्याबाबत असे प्रवाद निर्माण केले जातात ज्यामुळे तिला गिर्हाईक मिळू नये.
तिसरे: शिवाजी महाराजानी रायगडाचे काम सुरू केले तेव्हा एका विषिष्ट कोपर्‍याबाबत असले प्रवाद होते. एकदा महाराजानी थिथे काम सुरू करण्यास सांगितले तेव्हा कोणीच तयार होईना . कामगारही टाळाटाल करू लागले.महाराजांनी विचारले काय झाले तेव्हा तिथे भूत जखीण, वेताळ काय असेल ते आहे आणि त्यामुळे तिथे धोका आहे असे काहीतरी सांगण्यात आले. महाराजानी स्मित केले आणि तिथेच खोदकाम करण्यास सांगितले तेव्हा तिथे तिथे पुरलेला मोठा खजिना मिळाला. Happy

तात्पर्य अशा जुन्या रामसे टाईपच्या इमारतींचे गुपित लक्षात घ्या. भुते इमारतीत राहात नसून माणसांच्या मनात राहतात::फिदी:

Pages