येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
फक्त ते चोर हे पटले नाही कारण
फक्त ते चोर हे पटले नाही कारण सतत जनतेनेच निवडुन दिले आहे. >>>> मी इथे काही फक्त काँग्रेस ला लक्ष करत नव्हतो. त्यात बाजपाई, मोरारजी, राव साहेब ( ह्यांच्या बद्दल मात्र आदर आहे ) बाकी समाजवादी आहेतच. तसेच बाकीच्या राज्यान बिगर कॉंग्रेस सरकारे होती त्या सगळ्यांना मिळुन "चोर" असे म्हणले होते.
स्वतःची कट्टर हिंदूत्ववादी ही
स्वतःची कट्टर हिंदूत्ववादी ही भूमिका नष्ट करणे >>>>>>> तसे जर त्यांनी केले तर पुढची निवडणुक कठीण आहे भाजप् साठी.
मी तरी फक्त हा फॅक्टर बघुन मोदींना मत दिले. तेच बदलले तर मोदी काय आणि रागा काय, सारखेच
stri purush yana ekatra yeu
stri purush yana ekatra yeu na dilyas population automatically control hoil.
Duryodhan Kantode | 22 May,
Duryodhan Kantode | 22 May, 2014 - 15:54
stri purush yana ekatra yeu na dilyas population automatically control hoil.
<<<
खरंच की! हे आधीच लक्षात यायला हवं होतं!
stri purush yana ekatra yeu
stri purush yana ekatra yeu na dilyas population automatically control hoil.
<<<
खरंच की! हे आधीच लक्षात यायला हवं होतं!
बरोबर आहे.. लग्न करणा-या/ करु इच्छिणा-या लोकांना आधी आवरा... ठरलेली लग्ने मोडा.
उत्तरेची राज्ये स्त्रियांची
उत्तरेची राज्ये स्त्रियांची आणि दक्षिणेची पुरुषांची असे कराय्चे का त्याउलट?
हा धागा सुद्धा वाहवला ...
वेल उत्तम
वेल उत्तम कल्पना.
मध्यप्रदेशात कोण रहणार?
मध्यप्रदेशात कोण राहणार >>
मध्यप्रदेशात कोण राहणार >> इतरांना सुद्धा विचार करू दे की
उत्तरेची राज्ये स्त्रियांची
उत्तरेची राज्ये स्त्रियांची आणि दक्षिणेची पुरुषांची असे कराय्चे का त्याउलट?<<<
तृतीयपंथियांना स्थान न ठेवल्याबद्दल तुमचा निषेध!
हा धागा सुद्धा वाहवला ...<<<
तुम्ही नवीन आहात का?
तृतीयपंथियांना स्थान न
तृतीयपंथियांना स्थान न ठेवल्याबद्दल तुमचा निषेध!>> हे मात्र बरे नाही हा. << मध्यप्रदेशात कोण रहणार?>> साती ने लिहिलय की वर.
तुम्ही नवीन आहात का? >> आपण सगळेच महान आहोत..
हा तरी धागा भरकटवु नका. आणि
हा तरी धागा भरकटवु नका.
आणि Duryodhan Kantode या नवीन (किंवा नव्याचे सोंग आणलेल्या) आयडीकडे दुर्लक्ष करा.
त्यांचे इतर ठिकाणचे प्रतिसाद पाहिले कि त्यांच्या बुद्धिचातुर्याची (?) सर्वांना कल्पना येईल.
मोदी राममन्दिर बान्धनार काय?
मोदी राममन्दिर बान्धनार काय?
लगो, मोदींच्या निवडणूक
लगो, मोदींच्या निवडणूक जाहिरनाम्यात राममंदीराचा मुद्दा होता काय?
आणि Duryodhan Kantode या नवीन
आणि Duryodhan Kantode या नवीन (किंवा नव्याचे सोंग आणलेल्या) आयडीकडे दुर्लक्ष करा.
त्यांचे इतर ठिकाणचे प्रतिसाद पाहिले कि त्यांच्या बुद्धिचातुर्याची (?) सर्वांना कल्पना येईल. ......disgusting
अन्तर्गत सुरक्षा विभागात
अन्तर्गत सुरक्षा विभागात महत्वपूर्ण बदलाचे संकेत:
http://www.loksatta.com/desh-videsh-news/internal-security-may-move-out-...
नक्षलवाद हा आपल्या देशाच्या एकात्मतेला मोठा धोका आहे. २६०+ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. नविन सरकार या समस्येला कसं हाताळते हे पाहाणं रोचक ठरेल.
लगो, मोदींच्या निवडणूक आयोगात
लगो, मोदींच्या निवडणूक आयोगात राममंदीराचा मुद्दा होता काय?
------- निवडणूक जाहिरनाम्यात.
बाजपेयी जहा से रुके हम वही से
बाजपेयी जहा से रुके हम वही से शुरु करेन्गे असे मोदी बोल्ले. बाअजपेयी च्या राजकारनात राम देउल हा मुद्दा होता
>> बाअजपेयी च्या राजकारनात
>> बाअजपेयी च्या राजकारनात राम देउल हा मुद्दा होता <<
एका भाषणात मोदिंनी गावोगावी मंदिरांपेक्षा शौचालयांची जास्त गरज आहे असं म्हटल्याचं आठवतंय... तेंव्हा मोदिंच्या कारकिर्दित प्रायॉरीटी शौचालयांना असेल असं गृहित धरुया.
एक सूचना - भाजपाचा निवड्णुक जाहिरनामा वर हेडर मध्ये लावा; उपयोगी पडेल.
कृपया लिंक असल्यास
कृपया लिंक असल्यास द्या.
मराठीत असल्यास उत्तम.
चांगला धागा. विचित्र,
चांगला धागा. विचित्र, विक्षिप्त प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे.
रामाला सीता परत मिळालीए आनि
रामाला सीता परत मिळालीए आनि लगेच जमिनीत गडप झाली.
मोदीनाही त्यान्ची सीता परत मिलाली. तीचे काय होनार?
लगो, त्यांच्या व्यक्तिगत
लगो, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ते काय करतायत हा या धाग्याचा विषय नाही.
बेफिकीर, >> काँग्रेसच्या
बेफिकीर,
>> काँग्रेसच्या प्रशासनाच्या वेळी असे 'जागता पहारा' वगैरे धागे का निघाले नाहीत कोण जाणे!
विचारात पाडणारा प्रश्न आहे. पहिली गोष्ट अशी की जागरूकता आवश्यक आहेच. तिला पर्याय नाही. अशा धाग्याची जरुरी वादातीत आहे.
मात्र काँग्रेसच्या सरकारांवर असे धागे का निघाले नाहीत, हा प्रश्न तसाच राहतो. त्याचं काय आहे की तुम्ही आज जर असा धागा महाराष्ट्र सरकारवर काढलात तर सरकार माबोवर चाप लावेल आणि माबो प्रशासक तुमच्यावर चाप लावतील. ती काय लायकीची माणसं आहेत (माबो प्रशासक नव्हे) ते मी सांगायला नको.
काँग्रेस जशी खुनशी आहे तसे मोदी नाहीत.
आ.न.,
-गा.पै.
तुमच्या धाग्यावर सुद्धा मी
तुमच्या धाग्यावर सुद्धा मी जागता पहारा ठेवून आहे -
कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
या नियमाचा भंग झाला आहे - इडलीवाला नि उदयन..
पूर्वी काय झाले, .........चर्चा या धाग्यावर करू नये.
उदयन... यांनी लिहीले आहे -
पाकिस्तान ला बोलवाणे जितके योग्य आहे तितकेच अयोग्य...........मधे भारतासमोर पाकिस्तानला दिलेले आमंत्रण दाखवत आहे
आता जे समोर दिसेल त्याला प्रतिसाद दिलाच पाहिजे नाही का, म्हणजे कुणितरी लिहिणारच. म्हणून याहि नियमाचे वाट्टोळे!!
मायबोलीवर कसली अपेक्षा करता गंभीर चर्चेची? मुळात राजकारणावर बोलणारे सगळे दररोज शिमगा असल्यासारखे लिहीत असतात. त्यांना कुठलेहि नियम कळत नाहीत, पाळण्याची शिस्त नाही.
मायबोली हा भारतातला रस्ता आहे. अनेक लोक नीट चालतात, थुंकत नाहीत, कचरा करत नाहीत,
पण तरीहि कुणि ना कुणि चड्डी सोडून उकिडवे बसतातच!!
नक्षलवाद्यांचाही प्रश्न आता
नक्षलवाद्यांचाही प्रश्न आता हाताबाहेर गेलाय. याबाबतीत अनेक लेखक / पत्रकारांनी अहवाल लिहिलेले आहेत.
अशा लोकांचीच मदत घेऊन जर काही करता आले तरच.. आणि ते करावेच लागेल.
झक्की आपले निरिक्षण अगदी
झक्की आपले निरिक्षण अगदी योग्य आहे पण म्हणून भारतात काही कोणी रस्त्यावरून चालणे सोडत नाहीत. चड्डी सोडून उकिडवे बसणार्यांना स्वतःची लाज वाटेल याची वाट बघायची, तोवर कानाडोळा करायचा आणि पुढे चालायचे
काँग्रेसच्या प्रशासनाच्या
काँग्रेसच्या प्रशासनाच्या वेळी असे 'जागता पहारा' वगैरे धागे का निघाले नाहीत कोण जाणे! >>
कारण त्या सरकारवर 'जागता पहारा' वगैरे ठेवण्याची गरजच नव्हती. ढाराढूर झोपलेल्या जनतेलादेखिल त्या सरकारची नादानी , अनास्था, भ्रष्टाचार लक्षात आला. म्हणुनच त्यांची धुळधाण उडाली ना.
परत नविन सरकार त्या रस्त्याला लागू नये, आपले भले व्हावे म्हणुनच जनतेने जागता पहारा ठेवण्याची गरज आहे. नाहीतर अजुन ५ वर्षानी कोणाकडे बघणार
पण तरीहि कुणि ना कुणि चड्डी
पण तरीहि कुणि ना कुणि चड्डी सोडून उकिडवे बसतातच!!>>>>>> त्याची काळजी नको आता झक्की, मोदी सरकार आधी हाग्गनदारी अन नंतर बांकेबिहारी असं म्हणत आहेत. त्यात काँग्रेस गवतपण साफ झालय आता. वेळ पडली अन रस्त्याच्याकडेला जावं लागलं तरी भिती नाही.
झक्कीजी तुम्ही नेमके काय
झक्कीजी तुम्ही नेमके काय लिहीले आहे ते स्पष्ट करा.
झक्कीजी तुम्ही नेमके काय
झक्कीजी तुम्ही नेमके काय लिहीले आहे ते स्पष्ट करा.<<<
झक्की हे असे ज्येष्ठ नागरीक आहेत ज्यांना ते जे काही लिहितात ते लिहिण्याआधी, लिहिताना आणि लिहिल्यानंतर स्वतःलाच समजत नाही पण त्या अभिप्रायाला अख्खी मायबोली अनुमोदने देत बागडून घेते.
Pages