सेंट्रल हॉल मधील मोदींचे पहिले भाषण !

Submitted by केदार on 20 May, 2014 - 07:49

modi_1.jpg

मोदींनी आज संसदेत पहिलेंदाच पाऊल ठेवले, . आज त्यांचे भाषण लाईव्ह ऐकले. जनरली मला भाषणात फार इंन्ट्रेस्ट नसतो पण पहिल्या दोन मिनिटांनंतर भाषण ऐकतच राहिलो. काही महत्वाचे मुद्दे.

१. मोदींना पहिलेंदाच इमोशनल पाहिले.
२. त्यांनी आधीच्या सरकारला अजिबात नावे ठेवली नाहीत, तर जे जे काही झाले आहे त्यापुढे भारतमातेला कसे न्यायचे ते पाहूयात असे ते म्हणाले.
३. जनतेने टाकलेल्या जबाबदारीची जाणिव त्यांचा भाषणातून येत होती.
४. सर्वांना विकास हवा आहे, तर विकासात सर्वच जणांचा सहभागही हवा. सर्वांसोबत सर्वांचा विकास !

यु ट्युब -

भाग १

भाग २

अजून बरेच मुद्दे आहेत जे नेटवर सहज मिळतील.

भाषण झाल्यावर मी चॅनल सर्फ करत होतो, ABP news वर भाषणाचे रेटिंग ( अगदी अमेरिकेत होते तसे) चालू होते आणि बहुतेक सर्वांनी १० पैकी १० (काहिंनी ८-९) मार्क दिले.

खूप दिवसांनी एका नेत्याचे भाषण ऐकले ही फिलिंग मात्र नक्कीच आली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रावी,

लेखाबद्दल धन्यवाद! Happy

हटमळ दुवा : http://www.dawn.com/news/1107810/eyes-on-modis-india

लेख मोदींना विरोधाकरिता विरोध या भूमिकेतून लिहिला आहे. मात्र शेवटून दुसरा आणि शेवटला हे दोन परिच्छेद विशेष महत्त्वाचे आहेत. बाकी सर्व नेहमीचाच सेक्युलर भोंगळपणा भरला आहे.

लेखाखालील प्रतिक्रिया बऱ्याच रोचक आहेत.

आ.न.,
-गा.पै.

शेवटून दुसरा आणि शेवटला हे दोन परिच्छेद विशेष महत्त्वाचे आहेत. बाकी सर्व नेहमीचाच सेक्युलर भोंगळपणा भरला आहे. >+१.

छान भाषण... माफक अपेक्षा आहेत आणि त्या पुर्ण होतील अशी अपेक्षा आहे. बाहेर राहुन बोलणे आणि पन्तप्रधान झाल्यावर काहीतरी भरिव काम करुन दाखवणे हे यातला फरक मोदी यान्ना माहित आहे.

टिका टिप्पणी करण्याअगोदर मी त्यान्ना १ वर्ष देणार... या क्षणी त्याना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्याचे काम करणार.

Pages