सेंट्रल हॉल मधील मोदींचे पहिले भाषण !

Submitted by केदार on 20 May, 2014 - 07:49

modi_1.jpg

मोदींनी आज संसदेत पहिलेंदाच पाऊल ठेवले, . आज त्यांचे भाषण लाईव्ह ऐकले. जनरली मला भाषणात फार इंन्ट्रेस्ट नसतो पण पहिल्या दोन मिनिटांनंतर भाषण ऐकतच राहिलो. काही महत्वाचे मुद्दे.

१. मोदींना पहिलेंदाच इमोशनल पाहिले.
२. त्यांनी आधीच्या सरकारला अजिबात नावे ठेवली नाहीत, तर जे जे काही झाले आहे त्यापुढे भारतमातेला कसे न्यायचे ते पाहूयात असे ते म्हणाले.
३. जनतेने टाकलेल्या जबाबदारीची जाणिव त्यांचा भाषणातून येत होती.
४. सर्वांना विकास हवा आहे, तर विकासात सर्वच जणांचा सहभागही हवा. सर्वांसोबत सर्वांचा विकास !

यु ट्युब -

भाग १

भाग २

अजून बरेच मुद्दे आहेत जे नेटवर सहज मिळतील.

भाषण झाल्यावर मी चॅनल सर्फ करत होतो, ABP news वर भाषणाचे रेटिंग ( अगदी अमेरिकेत होते तसे) चालू होते आणि बहुतेक सर्वांनी १० पैकी १० (काहिंनी ८-९) मार्क दिले.

खूप दिवसांनी एका नेत्याचे भाषण ऐकले ही फिलिंग मात्र नक्कीच आली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही चर्चा मी पुर्ण वाचली, ऱोचक आहे.सगळेच जण आता fingers crossed, wait and watchभुमिकेत शिरलेत.
केदार ह्यांचे लिखाण थोदे प्रचारकी ठाटाचे असले तरी सभ्यतेच्या मर्यादा ते कधीच सोडत नाहीत.(मी सगळेच लिखान वाचले नाहिये त्यांचे, तरी जे थोडेफार वाचले आहे त्यावरुन वाटते) .
संपुर्ण चर्चेत राजसी ह्या आयडीची पोस्ट मात्र अत्यंत किळसावाणी आणि अपमानजनक आहे.
बाकी ,लोकशाही मार्गाने,मतदान यंत्रात गदबद न करता ,पैसे न चारता,विकासाची स्वप्ने दाखवुन निवडुणूका जिंकता येउ शकतात हे एका मोठ्या गटाला मान्य झाले हेही नसे थोडके.

Mr. Modi Congradulations and Wish you all the best!!

मोदींचा कारभार पाहायला मीही उत्सुक आहेच<<< +1

मोदीजी आपल्या अपेक्षा नक्की पूर्ण करतील अशी आशा आहे पण जनतेनी त्यांना वेळ द्यायला पाहिजे हेही तितकेच खरे

कदाचित हें कांहींसं विषयांतर असेलही पण आत्तांच मोदींच गुजरात विधानसभेतलं निरोपाचं भाषण ऐकलं. तीच उत्स्फुर्तता, सहजता, खंबीरता, नम्रता,विरोधी पक्षांचंही कौतुक, व्यक्तीनिष्ठ विकासाचं खंडण व चांगल्या कल्पना 'इन्स्टिट्यूशनलाईज' करण्यावर जोर ... शिवाय नर्म विनोद ! मोदी किती यशस्वी होतील हें काळच ठरवेल पण ते यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करावी इतपत तरी अंगीभूत गुणवत्ता त्यांच्यात आहे असे संकेत निश्चितच मिळताहेत !!

खुप उद्बोधक चर्चा झालीये.. भाऊ, अंजली आणि चिन्मय, तुमच्या सगळ्याच पोस्टस पटण्यासारख्या..

श्रद्धा और सबुरी की सख्त जरुरत है! नाहीतर दैव देतं अन कर्म नेतं अशातली गत होईल.. इथे तर दैवानेही दिलेलं नाही, प्रजेनेच एकमुखाने कौल दिला आहे तर भान ठेऊन, वेळ देऊन, समजून घेऊन मोदींच्या आपल्यासाठीच्या प्रवासात सहभागी होऊ या..

धागा मोदींच्या संसदेच्या सेंट्र्ल हॉल मधील भाषणावर असला तरी चर्चा मात्र वेगळ्याच विषयांवर सुरू आहे. ह्यालाच म्हणतात मायबोलीकर. Happy

मोदींचे कालचे भाषण ऐकल्या नंतर येत्या पाच वर्षात देशातील जनतेला त्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांची जाणीव त्यांना आहे असे वाटले.

आपापला खारीचा वाटा उचलणारी लोकं आहेत आपल्या आजूबाजूला. फक्त ओला-सुका कचरा वेगळा ठेवणारीच नाही, कुठलाही कचरा फक्त कचराकुंडीतच टाकणारी, प्लॅस्टिकच्या पिशव्या कमी/न वापरणारी,पाणी जपून वापरणारी, ट्रॅफिक रुल्स पाळणारी, कुणी क्रॉस करत असेल तर अंगावर गाडी घालण्याऐवजी थांबून जाऊ देणारी, अपघात पाहिल्यावर थांबून मदत करणारी, नियम पाळणारी, रांग लावणारी. पण रेटा खूप कमी पडतोय.>>>> +१००

रश्मी,
मी मोदीजींच्या भाषणाबद्दल इथे लिहित आहे. मोदीजींबद्दल किंवा जनतेबद्दल नाही.

वत्सला,
मी भाषणं तशी खूपच कमी ऐकतो. भारतीय राजनेत्यांची भाषणं तर त्याहूनही कमी ऐकायला मिळतात. इथे केदार ह्यांनी लिंक दिली म्हणून दोन्ही भाग सहज ऐकायला मिळालेत. आता भाऊ नमस्कर ज्या भाषणाबद्दल इथे लिहित आहे ते भाषण शोधावे लागेल. माझा आक्षेप भावना व्यक्त करण्याबद्दल मुळीचं नाही. उलट मनुष्याचे बोलणे कोरडे ... पाठ केल्यासारखे नसावे. आक्षेप भाषणामधील कन्टेन्टवर आहे. मला ते फार प्रभावी नाही वाटले इतकेच मला म्हणायचे आहे.

आगाऊ, भाऊ, केश्विनी - तुमची मते प्रेरक वाटली.

हा स्तेतस पाहिला नाहि. तेच म्हतला कुनीच कस काल कोन्ग्रेचुलेसन च्या स्तेतस वर कमेन्ट दिलि का नाहि. स्तेतस चान्गला लिहल आहे. सुप्रलाइक.
आता मोदिनि सरकारचि कालजि घ्यायला पाहिजे. कारन कान्ग्रेस सरकार पादन्याचा ट्राय मारनार. एखाद वेलि ते अदवानिंना तुम्हि पिएम बनता का विचारतिल. तस झाल तर आनि १०० एमपिज सोबत गेले तर देन्जर आहे.

मोदी किती यशस्वी होतील हें काळच ठरवेल पण ते यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करावी इतपत तरी अंगीभूत गुणवत्ता त्यांच्यात आहे असे संकेत निश्चितच मिळताहेत !!

भाऊ, अगदी अगदी.....

मोदी किती यशस्वी होतील हें काळच ठरवेल पण ते यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करावी इतपत तरी अंगीभूत गुणवत्ता त्यांच्यात आहे असे संकेत निश्चितच मिळताहेत !!+ १

मोदींची बडोदा आणि सेंट्रल हॉल दोन्ही भाषणं अतिशय आवडली. उत्तम वक्ते आणि श्रोत्यांच्या भावनांना हात घालण्याची त्यांची क्षमता निर्विवाद आहे. पण तरीही ते `वाचीवीर' न वाटती 'कृतीवीर ' वाटतात. त्यांचं देशप्रेम वादातीत वाटतं. मस्त कामगिरी करून दाखवावी या सरकारने. आणि येणार्‍या सर्व सरकारांसाठी हाच पायंडा पाडावा .

मोदी सतत विकासाबद्दल आत्मविश्वासाने बोलताहेत आणि तो कसा करणार यासाठी दोन संज्ञा वापरत आहेत. त्या म्हणजे गुड गव्हर्नन्सगुजराथ मॉडेल.

मोदी म्हणजे नवनवीन कल्पना करणे व त्या प्रत्यक्षात आणणारे अ‍ॅपलचे स्टीव्ह जॉब्स नाहीत. स्वतः मोदीही हे जाणतात असे वाटते. मग ते पुढील पाच वर्षे नक्की काय करणार आहेत?

विकास कोणताही मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान करत नसतो. ऊद्योगपती / कारखानदार व कामगार विकास करत असतात. शेतकरी व शेतमजूरांमुळे विकास होत असतो. सेवा क्षेत्रातील लोक शेती व कारखानदारीला सेवा पुरवून विकासाचा वेग वाढवत असतात. सरकारचे काम असते ह्या विकासाच्या तीन मूळ स्तोत्रांना काम करू देण्याची मोकळीक देणे. त्यांना भेडसवणारे अडथळे दूर करणे व दप्तरदिरंगाईमुळे होणारे नुकसान टाळणे. हे साधल्यावर या विकासाचा आधार असलेल्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे व शैक्षणिक सुविधा निर्माण करणे. हेच त्यांनी गुजराथेत केलेय असे ते म्हणत आहेत व त्यालाच ते गुजराथ मॉडेल म्हणत आहेत.

त्यांचे गुजराथ मॉडेल यशस्वी झाले की नाही हे तपासण्यासाठी वरील मुद्यांच्या आधारेच तपासणी केली पाहिजे. पण लोक वेगळ्याच आकडेवारीचा आधार घेऊन तुलना करू लागतात व मग प्रत्येकाचे निष्कर्ष वेगवेगळे आल्याने मोठाच गोंधळ उडतो.

थोडक्यात गुजराथ मॉडेल यशस्वी झाले की नाही हे तपासण्याची वेगळीच पध्दत वापरायला पाहिजे आणि त्यासाठी विकासाचे वर उल्लेखलेल्या घटकांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. उदा. गुजराथमधली २००१ पूर्वी असलेली स्थिती व २०१४ मधली स्थिती याची तुलना केली पाहिजे. भारतातली दोन वेगवेगळी राज्ये अथवा वेगवेगळ्या राज्यातील दोन नेते यामधली तुलना करून हे आपल्याला तपासता येणार नाही.

हे खालील मुद्यांवर तपासायला पाहिजे. अर्थात हे मुद्दे नमुना म्हणून दिले आहेत.
१) रस्त्यांची स्थिती
२) विजेची उपलब्धता
३) दप्तर दिरंगाईचे प्रमाण
४) कर्फ्यू, आंदोलने, संप, टाळेबंदी आदिंमुळे कामाचा होणारा खोळंबा (फक्त २००२ चा मुद्दा घेऊन चालणार नाही.)
५) भ्रष्टाचाराचे प्रमाण
६) शेतीला मिळणारे पाणी व धान्योपादन
७) वाढलेल्या शैक्षणिक सुविधा
८) शेतकर्‍यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी केलेले प्रयत्न
९) सेवा क्षेत्राच्या सुविधेत झालेली वाढ
१०) जमीन अधिग्रहणा बाबत विस्थापितांची परिस्थिती ( येथे २००१ पूर्विचे विस्थापित व २००१ नंतरचे विस्थापित अशी तुलना केली पाहिजे. फक्त नर्मदा सरोवर एवढाच मुद्दा घेऊन चालणार नाही.)

वरील तपासणीचे निष्कर्ष जर सकारात्मक येत असतील तर हे मॉडेल भारतात कुठेही लागू करता येईल असे वाटते. हे मॉडेल यशस्वी होण्यासाठी सरकार जो खर्च करत असते त्यासाठी आवश्यक असते "मी खात नाही व खाऊ देत नाही" हे धोरण अवलंबणे.

एखादा स्वतः खात नाही पण सहकार्‍यांना खाऊ देत असेल तर असा माणूस काय उपयोगाचा. तसेच स्वतः खात नाही व इतरांनी खाऊ नये म्हणून फाईली तुंबवून निर्णयच घ्यायचा नाही असे करत असेल तर तेही चालणार नाही. तर खात नाही व खाऊ देत नाही व निर्णयही विनाविलंब घेणारा असला पाहिजे. मोदी तसे आहेत का हे तपासता येऊ शकते. जर गुजराथपुरते मोदींनी हे जमले असेल तर भारतात त्यांना ते सहज जमेल असे म्हणायला लागते.

सरकार जेव्हा एक रुपया खर्च करते तेव्हा लाभार्थीपर्यंत फक्त १५ पैसे पोहोचतात हे राजीव गांधीचे विधान सर्वांनाच माहितेय. जर हे प्रमाण येत्या सहा महिन्यात २० पैशांपर्यंत व वर्षभरात ४० पैशापर्यंत जरी गेले तरी विकास होतो आहे हे जाणवायला लागेल आणि २०१९ पर्यंत ७०-८० पैशापर्यंत जरी आपण प्रगती करू शकलो तरी भारतात मोठी क्रांती होईल असे मानायला जागा आहे.

मला वाटते हे सर्व प्रयोग मोदींनी गुजराथ मधे केले असल्यामुळे ब तिथे आलेल्या यशातून एक आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसतो. गुजराथेत आघाडी सरकार नसल्याने हे जमू शकले हे ते जाणतात. त्यामुळे मिशन २७२+ ही संकल्पना घेऊनच ते निवडणूक रिंगणात उतरले होते असे वाटते.

मोदींचा तरणाईवर खूप विश्वास आहे. यातूनच काही स्टीव्ह जॊब्स मिळतील असे वाटतेय म्हणून ते तरूणाईवर विश्वास टाकताहेत का ते माहित नाही. पण जर एकादी नवीन कल्पना कोणी मांडली आणि ती व्यवहार्य असेल तर मोदी ती स्विकारतात का ? का जुने ते सोने करत बसतात हे त्यांच्या १२ वर्षाच्या कारकिर्दीतून कळू शकणे अवघड वाटत नाही.

निवडणूक जिंकायचे एक वेगळेच तंत्र त्यांनी गुजराथेत विकसीत केले होते. व त्या तंत्राच्या सहाय्याने भारतात लोकसभा जिंकता येतील हे त्यांना माहित होते. म्हणूनच २७२+ हे मिशन इतरांना अशक्यप्राय वाटत असले तरी प्रथम पासून शेवटपर्यंत त्यांना त्या बद्दल खात्री वाटत होती. कारण त्या तंत्राचा उपयोग त्यांनी गुजराथेत २ वेळा केलेला होता. पण याबद्दल जास्त खोलात जाण्याची जरुरी नाही कारण मिशन २७२+ यशस्वी झालेले आहे.

झटपट निर्णय घेणे त्यांना जमू शकेल काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर त्यातील अडथळे कोणते हा विचार करायला लागेल. नमुना म्हणून काही उदाहरणे दिली आहेत.
१ आघाडी सरकार
२ टक्केवारीची अपेक्षा.
३ जात धर्म राज्य प्रांत भाषा हे निकष वापरणे व निर्णय रेंगाळत ठेवणे
४ निर्णयाचा फायदा विरोधकांना होता कामा नये अगदी स्वपक्षातील विरोधकांनासुध्दा हा निकष प्रत्येक वेळेस लावत बसणे.
५. स्वत:ला क्रेडिट मिळणार आहे का हे प्रथम पाहाणे नसेल तर निर्णय लांबणीवर टाकणे

पण याऐवजी फक्त भारताचे हित आहे किंवा नाही एवढेच तपासायचे असेल तर मला वाटते कोणताही माणूस झटपट निर्णय घेऊ शकेल. तसे असेल तर मोदींना का जमणार नाही.

परराष्ट्रीय धोरण हे मात्र मोदींना नवे क्षेत्र आहे तेथे मात्र त्यांचा कस लागणे शक्य आहे. याबाबतीत मात्र थांबा व पहा हेच धोरण अवलंबावे लागणार आहे असे वाटते.

एकंदरीत मोदींच्या विरोधात व बाजूने बरीच माहिती उपलब्ध असल्याने मोदी यशस्वी होतील किंवा नाही ह्याचा अंदाज बांधणे खूप काही अवघड गोष्ट आहे असे वाटत नाही.

चिनूक्स +१
खरय यायच्या आधीच येवढ्या अपेक्षा आहेत की त्या पुर्ण होऊ पर्यंत तरी पबलिक गप बसेल की नाही माहित नाही. त्याच बरोबर विरोधी पक्ष नेते असतीलच आगीत तेल ओतायला.
काल रात्री संपुर्ण भाषण ऐकलं. खुपच स्फुर्तीदायक होतं. एकदा मेन लिडरच जर कामसू असेल तर त्याच्या खालच्यांना आपसुकच चाड यायला हवी की आपण नुस्तं हातावर हात ठेवून बसू शकत नाही. अर्थात फक्त पैसे खाऊन काहीही न करण्यात इतकी वर्षं छान मुरलेली काही लोकं लगेच सुधारतील की नाही माहित नाही आणि तेव्हा मोदी काय करतात हे बघायला आवडेल.

मोदी पप्र व्हायच्या आधीच कोळसा मन्त्रालय असलेल्या शास्त्री भवनाला आग लागली. एवढे हबकलेत का कॉन्ग्रेसवाले?:अओ: पूर्वी महाराष्ट्रात टग्याच्या खात्याच्या ऑफिसला आग लागली होती ना? सॉरी अवान्तर लिहीले म्हणून.

मोदी पप्र व्हायच्या आधीच कोळसा मन्त्रालय असलेल्या शास्त्री भवनाला आग लागली.

>> म्हणजे अजुन बर्‍याच फायली आणि त्यांच्याविरुद्ध असलेले पुरावे नष्ट केले. Sad

वरच्या चर्चेवरून बर्‍याच जणांचा असा गैरसमज झालेला दिसतोय की मोदींचे संसदेतले भाषण 'देशाला' किंवा 'भारतीय जनतेला' ऊद्देशून होते. Uhoh

सर्व नवनिर्वाचित खासदारांनी मोदींची एका औपचारिक समारंभात देशाचा पंतप्रधान म्हणून निवड केली त्या निवडीबद्दल कृतज्ञता, आपली पार्टी, तिचे विचार,पाया आणि आपले पार्टी पूर्वज यांना विसरू नका ह्याचा ऊहापोह आणि आपण सगळे कुठल्या दिशेने प्रयत्न करणार आहोत एवढेच काय ते भाषणाचे महत्व आणि आवाका होता.

त्या भाषणात ते काय विकास कामांचा अजेंडा, परराष्ट्र धोरण,भ्रष्टाचार निर्मूलन वगैरे मुद्द्यांना थोडीच हात घालणार होते. श्यपथविधी व्हायच्या आधीच जनतेला बहूधा कठोर आणि प्रवर्तक निर्णयांची मोदींकडून ऊदघोषणा असे काही तरी अपेक्षित आहे असे दिसते.

पियू,

बरोबराहे. पुरावे नष्ट करायला सुरुवात झाली आहे. मंत्रीही बंगले सोडायची घाई करताहेत. तीसुद्धा पुरावे नाहीसे करण्यासाठीच अशी शंका आहे.

आ.न.,
-गा.पै.

कोळसा खाणीत सगळ्यांचीच ,अगदी बीजेपीवाल्यांचीही तोंडे काळी झाली आहेत.
सिंचन घोटाळा करणार्या टग्याची सिबीआय चौकशी नमो करणारच नाहीत ,फक्त फार्स असतो.तूमाकमीलाक.

बीजेपीवाले असतील तर त्यानाही धरा. अपराधी कुठल्याही पक्षाचा असो, शिक्षा तर झाली पाहीजे.

परत सॉरी चर्चा भलतीकडे नेल्याबद्दल. आधीचे चालू द्या.

लोकहो,

सर्वांचे संदेश आवडले. भाऊ नमसकरांचे अप्रतिम आहेत. त्यांची शैली अशोकमामांसारखी सौजन्यमय आहे हे निर्विवाद.:-) अंजली, चिनूक्स यांचे विशेष उल्लेखनीय वाटतात.

राजसी यांचा संदेश काहीजणांना किळसवाणा वाटतो. मात्र तो किळसवाण्या मनोवृत्तीच्या लोकांना उद्देशून आहे. २००२ च्या दंगली खाजवून मोदींना टोमणे मारायची ही जागा नव्हे.

आ.न.,
-गा.पै.

शाम भागवत,

सर्वांच्या संदेशांवर लिहित होतो इतक्यात तुमचा संदेश आला. तुम्ही मांडलेल्या सर्व मुद्द्यांशी शंभर टक्के सहमत आहे.

मोदी दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे. 'खाणार नाही आणि खाऊही देणार नाही' ही प्रतिज्ञा त्यांनी खूप वर्षांपूर्वी केली होती. यावर एके ठिकाणी मोघम लिहिलं होतं (माझी रिक्षा). पण भ्रष्टाचार न करण्याच्या मुद्याला त्या बाफवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. खरंतर मोदींच्या कार्यशैलीचा हा कळीचा मुद्दा आहे.

मोदींना फलनिष्पत्ती दाखवायला किती वेळ लागेल हा प्रश्न वारंवार चर्चेस येणं सहाजिकच आहे. याबद्दल एक उदाहरण द्यावंसं वाटतं. इंदिरा गांधींनी १९७५ साली आणीबाणी जाहीर केल्यावर प्रशासन ताबडतोब सरळ वागू लागलं. अर्थात राज्य प्रशासनांस फारसा वाव नव्हता हेही खरेच. रेल्वे व बस गाड्या वेळेवर धावत होत्या, कचेऱ्या कार्यबाहुल्याने ओसंडून वाहात होत्या. लोकांची कामे वेळेवर होत होती. असं ऐकून आहे. विनोबा भाव्यांनी आणीबाणीस अनुशासन पर्व या शब्दांत गौरवलं आहे. हा कालखंड उण्यापुऱ्या दोनेक वर्षांचा होता (७५ ते ७७). तर मोदींच्या राज्याचा प्रभाव दोनेक वर्षांत स्पष्ट होईल, अशी अपेक्षा उचित ठरावी.

तुमच्या मुद्देसूद संदेशाबद्दल आभार! Happy

आ.न.,
-गा.पै.

गा.पै दंगलींचा विषय मी काढला आणि पुढे मयेकरांनी पोस्ट टाकली. माझा आणि मयेकरांचा मुद्दा येवढाच होता की १) २००२ नंतर गुजरातेत परत दंगल झाली नाही आणि २) काँग्रेसच्या काही लोकांचा सुद्धा काही जातीय दंगलींमध्ये सहभाग होता हे मुद्दे वापरुन मोदींचे समर्थन होऊ शकत नाही.
पुढे केदारनी सुद्धा त्याचं नेमकं काय म्हणणं होतं ते स्पष्ट केलं, मयेकरांना ते तितकं पटलं नाही आणि त्यांनी अजून काही मुद्दे प्रस्तुत केले पण त्याचा अर्थ असा नाही की ते (किंवा मी सुद्धा) मोदींना टोमणे मारत आहे. इथं भारताच्या समस्त जनतेनं त्यांना कौल दिलाय आणि आता ते पंतप्रधान होऊ घातलेत तेव्हा आता जुन्या गोष्टी बोलून काय आम्ही सरकार पाडायचा प्रयत्न करत आहोत असं वाटतं का?

विषय त्यांच्या अगदी सहजतेने समोरच्याचे मुद्दे खोडून काढण्यात त्यांची खासियत हा होता आणि त्याला अनुसरुन मी फक्त येवढं लिहिलं की बाकी सगळे मुद्दे पटतात, माहिती पटते पण गोधरा, नरोडा पाटिया बद्दल माहिती वाचली की कॉमन सेन्सला पटत नाही.

भाषणाच्या शेवटीच मोदिंनी म्हटले आहे कि पांच वर्षांनंतर रिपोर्ट कार्ड देणार आहे - तब हो जाएगा दुध का दुध, पानी का पानी!

तोवर सगळ्यांनी धीर धरुन आपापले घोडे आवरावेत. त्याचबरोबर, नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी मोदिंचा कुठलाहि विषय निघाला कि लगोलग २००२ च्या दंगलींचे (किंवा विकास होईल कि दंगल?) टाळ कुटत बसण्यापेक्षा थोडं क्रिएटिव होउन नविन मुद्दे शोधावेत... Happy

माझा आणि मयेकरांचा मुद्दा येवढाच होता की १) २००२ नंतर गुजरातेत परत दंगल झाली नाही आणि २) काँग्रेसच्या काही लोकांचा सुद्धा काही जातीय दंगलींमध्ये सहभाग होता हे मुद्दे वापरुन मोदींचे समर्थन होऊ शकत नाही.<<<

ह्याच्याशी सहमत आहे. दंगलींमध्ये सहभाग असणे, दंगली करण्यास जनतेला प्रवृत्त करणे किंवा कारणीभूत ठरणे ह्या सर्वांना एकच न्याय व कायदा हवा.

पण म्हणून हे समजले नाही:

>>>दंगलींचा विषय मी काढला आणि पुढे मयेकरांनी पोस्ट टाकली<<<

'हे कुठे लिहावे हे न समजल्यामुळे येथे लिहिले' अशी प्रस्तावना तुम्ही केली आहेत ते मी वाचले. पण विषय सेंट्रल हॉलमधील भाषणाचा असताना मुद्दलातच दंगलींचा विषय येथे निघू नये ना? Happy

अर्थात, व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य ह्या दोहोंचा आदर आहेच.

बरोबर आहे बेफि, म्हणूनच प्रस्तावना दिली होती, पुढे केदारचे आणि माझे नीट संभाषण सुरु होते आणि तोही पोस्टीतला मजकूर अवांतर आहे त्यामुळे काढुन टाका म्हंटला नाही म्हणून नाही काढली.

चांगली चर्चा.
आता मोदींना निवडून दिल्याने आपण विकास डिझर्व्ह करतो की दंगल ते कळायला थोडा वेळ तर जाऊद्या! >> आगाऊ, तुमचे हे वाक्य वाचल्यावर मोदी दंगली करत फिरतात असे अप्रत्यक्षपणे तुम्हाला म्हणायचे आहे असा समज होतोय. Sad ..
शाम भागवतांनी विकासाबद्दल चांगले लिहिले आहे.
भाऊंचे प्रतिसाद आवडले.

चमन +१ हे भाषन देशाला उद्देशून नव्हतेच मुळी. आणि तरी इतके मस्त. २६ मे ला शपथविधी नंतर ते बोलतील ते पहिले जनतेला उद्देशून केलेले भाषण असेल.

विचार करणार्‍या सर्वच जनांना माहित आहे की २ वर्ष लागतील सर्व बदलायला, त्यावर खरे आत्ता चर्वण होणे हेच मुळी गरजेचे नाही !

सुनिधी, येथील खूप जनांचे मोदीप्रेम जगजाहीर आहे.

आर्क धन्यवाद, पण हा लेख प्रचारी थाटाचा नाही. रादर तो लेखा जोखाही नव्हता. त्यात काँग्रेस सरकारनेच दिलेले आकडे आहेत. Happy

बुवा २००२ नंतर गुजराथ मध्ये दंगल झाली नाही असे मी लिहिले आहे. तो मुद्दा माझा होता. (जस्ट करेक्टिंग द फॅक्टस)

मला दंगल विषयाचा लई म्हणजे लईच कंटाळा आला आहे. राज म्हणाल्यासारखे नवीन काहीतरी काढू दे आता मोदीविरोधकांना. तो पर्यंत दे ऑल हॅव टू डिल विथ इट.

तेच लिहिलय केदार. दोन्ही मुद्दे तुझे होते.

बाकी दंगलीचा विषय काढला की मोदी समर्थकांनी पर्सनली घ्यायचं काहीच कारण नाही. मी वर पण लिहिलय की तो विषय काढल्यामुळे सद्य परिस्थितीत काहीही बदल होणार नाहीये आणि तो मुद्दा काढायचा तसा हेतू पण नाहीये. काही लोकं विसरायला तयार आहेत काही लोकं नाही. खरं तर जी लोकं होरपळली गेली ते सोडून इतर लोकं विसरले आणि नाही विसरले तरी काय फरक पडतो? मग प्रश्न असा आहे की विषय परत परत का निघतो? तो निघतो ह्या करता कारण काही लोकं परत जर कधी जातीयवादांवरुन काही घडलं तर मोदी नीट निर्णय घेतील का ह्याबाबत शंका व्यक्त करतात जो काही अततायी किंवा बळच ओढून ताणून लावलेला संबंध नाहीये.
ह्याचा त्यांनी घडवून आणलेल्या विकासाशी काहीही संबंध नाही. तुम्हाला दंगलीचा विषय सोडून द्यायचा असेल तर तो तुमचा प्रश्न पण इतर सोडत नसतील तर तोही त्यांचा प्रश्न म्हणून सोडून द्यायला काहीच हरकत नसावी. परत २००२ नंतर दंगली झाल्या नाहीत किंवा काँग्रेस पण काही कमी नाही असं काऊंटरार्ग्युमेंट केलं की वादाचा मुद्दा येणारच कारण हे दोन्ही मुद्दे वॅलिड काऊंटरार्ग्युमेंट नाहीयेत.

Pages