सेंट्रल हॉल मधील मोदींचे पहिले भाषण !

Submitted by केदार on 20 May, 2014 - 07:49

modi_1.jpg

मोदींनी आज संसदेत पहिलेंदाच पाऊल ठेवले, . आज त्यांचे भाषण लाईव्ह ऐकले. जनरली मला भाषणात फार इंन्ट्रेस्ट नसतो पण पहिल्या दोन मिनिटांनंतर भाषण ऐकतच राहिलो. काही महत्वाचे मुद्दे.

१. मोदींना पहिलेंदाच इमोशनल पाहिले.
२. त्यांनी आधीच्या सरकारला अजिबात नावे ठेवली नाहीत, तर जे जे काही झाले आहे त्यापुढे भारतमातेला कसे न्यायचे ते पाहूयात असे ते म्हणाले.
३. जनतेने टाकलेल्या जबाबदारीची जाणिव त्यांचा भाषणातून येत होती.
४. सर्वांना विकास हवा आहे, तर विकासात सर्वच जणांचा सहभागही हवा. सर्वांसोबत सर्वांचा विकास !

यु ट्युब -

भाग १

भाग २

अजून बरेच मुद्दे आहेत जे नेटवर सहज मिळतील.

भाषण झाल्यावर मी चॅनल सर्फ करत होतो, ABP news वर भाषणाचे रेटिंग ( अगदी अमेरिकेत होते तसे) चालू होते आणि बहुतेक सर्वांनी १० पैकी १० (काहिंनी ८-९) मार्क दिले.

खूप दिवसांनी एका नेत्याचे भाषण ऐकले ही फिलिंग मात्र नक्कीच आली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< वरच्या चर्चेवरून बर्‍याच जणांचा असा गैरसमज झालेला दिसतोय की मोदींचे संसदेतले भाषण 'देशाला' किंवा 'भारतीय जनतेला' ऊद्देशून होते. >> निदान माझा तरी असा गैरसमज मुळीच नाही. पण त्याचबरोबर आपलं भाषण टीव्ही वरून सर्व देशात 'लाइव्ह' प्रसारित होतंय ही जाणीव मोदीना नक्कीच होती व त्या मर्यादित अर्थाने ते राष्ट्राला उद्देशूनही बोलत होते असं म्हणणं खूपच चूकीचं नसावं.
दुसरं, मोदी पंतप्रधान म्हणून किती योग्य , प्रभावी आहेत/नाहीत हें केवळ त्यांच्या सेंट्रल हॉलमधील एका भाषणावरून सिद्ध करण्याचा या धाग्याचा उद्देश नाही व नसावा; पण लग्न ठरवताना पारंपारिक 'पहाण्याचा कार्यक्रम' असायचा तसं कांहींसं महत्व त्यांच्या भावी पंतप्रधान म्हणून केलेल्या पहिल्या भाषणाला असायला हरकत नसावी. त्या भाषणामुळे व आनुषंगिक माहितीमुळे आपलं प्राथमिक मत काय झालं, हें मांडायला प्रत्यवाय नसावा. म्हणून, << त्या भाषणात ते काय विकास कामांचा अजेंडा, परराष्ट्र धोरण,भ्रष्टाचार निर्मूलन वगैरे मुद्द्यांना थोडीच हात घालणार होते.>> याच्याशीं पूर्ण सहमत असूनही, तशा अपेक्षेवर या धाग्यावरचे प्रतिसाद आधारलेले नाहीत/नसावेत, हेंही लक्षात घ्यायला हवं.

भाऊ +१. त्या बद्दल लिहायचे राहिले. अजून त्यांचा शपतविधी झालेला नाहीये त्यामुळे राष्ट्राला संबोधायचा संबंध येत नाही. चमन, केदार, मलाही कुठेही तसे प्रतिसाद दिसले नाहीत. लोकांना तेवढं तर नक्कीच माहित आहे त्यामुळे हा निष्कर्ष तुम्ही कुठून काढला ते समजलं नाही.

मी मायबोलीसोडून तश्या अनेक पोस्ट वाचल्या आहेत म्हणून +१ दिले.

"विचार करणार्‍या सर्वच जनांना माहित आहे की २ वर्ष लागतील सर्व बदलायला, त्यावर खरे आत्ता चर्वण होणे हेच मुळी गरजेचे नाही ! " हा माझा स्टॅन्ड ते निवडून यायच्या आधीपासून इथे लिहिलेला आहे.

भाऊ तुमच्या ह्या आत्ताच्या पोस्टलाही +१

बुवा दंगल कोणी पर्सनली घेत नाही, पण प्रत्येक बाफ वर तोच तो विषय असतो / आहे म्हणून त्याचा कंटाळा आला, मोदी = दंगल हेच समिकरण बरोबर आहे असे म्हणणे असेल तर असू द्या. कितीही चर्वण करून काही फायदा नाही, आपण कोणीही आपआपले स्टॅन्ड बदलणार नाही. मलाही पूर्वी दंगलीमुळे मोदी आवडायचे नाहीत पण २००९ नंतर आवडतात. सगळेच जण माझ्यासारखा विचार करत नाहीत हे मला माहिती आहे. Happy आणि तुमच्या त्या भितीमुळेच ( जी परत तुम्ही वर इथे परत मांडली) मी तिथे दंगल झाली नाही असे लिहिले.

मला रस नाही असे म्हणूनही मी परत परत तेच लिहितोय मात्र. असो. माझ्याकडे नविन काही नाही त्या बाबतीत, तुम्हाला मी कन्विन्स कशाला करू, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात, मी माझ्या.

मी मायबोलीसोडून तश्या अनेक पोस्ट वाचल्या आहेत म्हणून +१ दिले. >>>>>> Lol अरे पण चमननी तर ह्या चर्चेवरुन तसा निष्कर्ष काढला ना?

बुवा दंगल कोणी पर्सनली घेत नाही, पण प्रत्येक बाफ वर तोच तो विषय असतो / आहे म्हणून त्याचा कंटाळा आला, मोदी = दंगल हेच समिकरण बरोबर आहे असे म्हणणे असेल तर असू द्या. कितीही चर्वण करून काही फायदा नाही, आपण कोणीही आपआपले स्टॅन्ड बदलणार नाही.<<< सहमत आहे.

बुवा "त्या भाषणात ते काय विकास कामांचा अजेंडा, परराष्ट्र धोरण,भ्रष्टाचार निर्मूलन वगैरे मुद्द्यांना थोडीच हात घालणार होते." हे चमनने लिहिले आहे

आणि त्या आधीच्या पोस्ट मध्ये श्याम भागवतांनी परराष्ट्र धोरणासंबंधी लिहिले आहे. आणि त्यामूले कदाचित चमनने तसे लिहिले असावे.

त्यामुळे ते +१ आणि मी लिहिल्यासारखे मायबोली सोडून इतर ठिकाणीही वाचले म्हणून. मी निष्कर्ष काढतोय वगैरे तुमचा शब्द. मी फक्त सहमत आहे असे +१ द्वारे सुचित केले.

खरेतर मी कसलेच निष्कर्ष काढत नाही, तश्या फॅक्ट असल्याशिवाय. उदा काँग्रेसचा लेखाजोखा Proud

मी आपलं बळच मुद्दा ताणत आहे Happy पण एखाद्या वाक्याला +१ दिले म्हणजे त्या सबंध वाक्याला आपला दुजोरा आहे असा अर्थ नाही का? मग जर त्यानी "त्या भाषणात ते काय विकास कामांचा अजेंडा, परराष्ट्र धोरण,भ्रष्टाचार निर्मूलन वगैरे मुद्द्यांना थोडीच हात घालणार होते." असं लिहिलं म्हणजे त्यानी इथे चर्चा करणार्‍यांना मोदींचे भाषण राष्ट्राला उद्देशून होते असं वाटलं असा निष्कर्ष काढला आणि तू +१ देऊन त्याला दुजोरा दिला असा त्याचा अर्थ नाही का होत?
शाम भागवतांच्या पोस्ट मध्ये विकासाचे मुद्दे आले तरी त्यात कुठेही मोदींनी केलेले भाषण हे राष्ट्राला उद्देशून होते असं जाणवत नाही. जर त्यांची पोस्ट बघून असा चमन्नी निष्कर्ष काढला असेल तर तो बरोबर वाटत नाही आणि म्हणून मला आश्चर्य वाटत होतं.

मी +१ का दिले आणि तो माझा निष्कर्ष होऊ शकत नाही असे स्पष्टीकरण लिहिले आहे की. पण असे दिसतेय की माझा स्टॅन्ड क्लिअर झाला नाही.

तो ताणन्यासारखा मुद्दाच नाही असे माझे म्हणणे आहे. Happy वाटल्यास परत दंगलीवर जा. Lol मग मी परत काही तरी लिहिन. Happy

बाकी बराक भाऊ ओबामांशी मोदींचे बोलने ऑलरेडी झाले आहे. सगळ्यांना GC द्या नाहीतर पुढच्या वेळी तिथून निवडणूक लढवतो असे ते म्हणाल्याचे आतल्यागोटातून कळते.

पाकिस्तान ला शपथविधी समारंभात रेड कार्पेट?

का आता कुठे गेली देशभक्ति? आता कुठे गेला पाकिस्तानचा आतंकवाद? आता कुठे गेले सैनिकांच्या शिरावर केलेले राजकारण?
निवडणूक जिंकली आता विसरले का? सभेत काय काय बोललेले बिर्याणी खायला का बोलवतात मग?
आता बोलू नका की सार्क मेंबर्स ना बोलवले.. त्यात पाकिस्तान येतो हे विसरलेले? आता बोलून तर दाखवा इतरांना पाकिस्तान एजंट..

मी +१ का दिले आणि तो माझा निष्कर्ष होऊ शकत नाही असे स्पष्टीकरण लिहिले आहे की.>>>> हो बरोबर पण फक्त ते पुढच्या पोस्टीत आले. आणि मी तेच उलगडून सांगत होतो की वाक्यात असलेले सगळे संदर्भ मान्य असतील तरच +१ देणे योग्य ठरेल. आणि काही संदर्भ नसतील मान्य तर त्याबद्दल तिथेच लिहिणे गरजेचे आहे नाहीतर वाचकाचा गैरसमज होईल (जसा माझा झाला).

पाकिस्तान ला शपथविधी समारंभात रेड कार्पेट? >>. ह्याच डिटेल उत्तर आणि तुझ्या रोजच्या वाजपेयींनी बस का सुरू केली ह्याचे उत्तर मी अनेकदा देऊ शकलो असतो, पण काय आहे की हा धाग्याचा विषय नाही.

आता मोदी लाहोर ते दिल्ली बुलेट ट्रेन सुरू करेल
हेच काँग्रेस ने केलेअसते तर मोदी सकट भाजप थायथाय नाचला असता देशभक्ति च्या ओव्या गायल्या असत्या पण हे मोदी करताय तर डिप्लोमेसी का?

उदयन,

ह्या धाग्यावर तुमचे हे प्रतिसाद सुसंगत वाटत नाही आहेत. Happy

मोदी सरकारची कारकीर्द - असा एक धागा सुरू करा म्हणजे मूल्यमापन करणारे प्रतिसाद सुसंगत वाटतील.

सुसंगत तर यांची नियती नाही आहे
सरड्यापेक्षा जास्त लवकर रंग बदलले

फक्त कार्यक्रमानिमीत्ताने पाकिस्तानचा परराष्ट्रीय मंत्री आलेला तेव्हा भाजपाने काय काय मुक्ताफळ उधळलेली तेव्हा डिप्लोमेसी आठवली नाही? मोदी ने बोलवले की लगेच डिप्लोमेसी चे दाखले द्यायला लागले का?

<< सुसंगत तर यांची नियती नाही आहे..सरड्यापेक्षा जास्त लवकर रंग बदलले >> << भाजपा लबाड पक्ष असुनही देश भ्हाजपाला भुलला >> मोदींचं पहिलंच भाषण आहे हो हें; त्यांचं हें शेवटचंच ठरवायचा आत्तांपासूनच कां इतका आटापिटा !! Wink

पाकिस्तान ला शपथविधी समारंभात रेड कार्पेट? >>
माहित नाही मोदींनी हे का केले, चुक की बरोबर हे थोड्या दिवसात समजेलच..पण हे मागचा अनुभव पाहता हे गाढवाच्या मागे उभे राहुन त्याची शेपटी ओढण्यासारखे आहे, लाथा बसनारच.. Sad

मोदींना फक्त पाकिस्तानालाच नव्हे, तर सार्क देशांच्या नेत्यांना आमंत्रण दिलं आहे. माझ्या मते ही एक अतिशय जबाबदार आणि मुत्सद्दीपणाची जाणीव करून देणारी कृती आहे.

चिनूक्स , +१

उलट पाकिस्तानला टाळणे मूर्खपणाचे ठरले असते.
याऊलट समस्त सार्कप्रमुख इथे येऊन स्वतः मोदींना मिळालेले बहुमत आणि त्यामूळे देशात आलेला उत्साह पाहतील तर बहुमतातल्या या सरकारला किती खडतर निर्णय विनासायास घेता येतील हे प्रत्यक्ष कळेल. (इंदिराजींसारखा) वचक राहिल.

मोदीसरकारच्या कामाबद्दल चर्चा करायला हा नवा धागा-

http://www.maayboli.com/node/49069

कृती स्तुत्य आहेच यात वाद नाही आहे आक्षेप फक्त आधीच्या सरकार ने पाकिस्तान बरोबर संबंध प्रस्थापित या त्या दिशेने पाऊल यावर भाजप ने जो काही तांडव ज्याप्रकारे बोललेले ते आठवते.. तेव्हा त्या सरकारच्या मुत्सद्दीपणाची खिल्ली उडवत फिरणारे हेच मोदी होते.

बुवा दंगल कोणी पर्सनली घेत नाही, पण प्रत्येक बाफ वर तोच तो विषय असतो / आहे म्हणून त्याचा कंटाळा आला, मोदी = दंगल हेच समिकरण बरोबर आहे असे म्हणणे असेल तर असू द्या. कितीही चर्वण करून काही फायदा नाही, आपण कोणीही आपआपले स्टॅन्ड बदलणार नाही. मलाही पूर्वी दंगलीमुळे मोदी आवडायचे नाहीत पण २००९ नंतर आवडतात.

मलाही. मोदी शब्दानंतर फक्त दंगल हाच शब्द आठवणा-या मंडळींचे प्रतिसाद वाचायचेही आता मी सोडून दिलेय.

मोदींना फक्त पाकिस्तानालाच नव्हे, तर सार्क देशांच्या नेत्यांना आमंत्रण दिलं आहे. माझ्या मते ही एक अतिशय जबाबदार आणि मुत्सद्दीपणाची जाणीव करून देणारी कृती आहे.
+ १०००००

उदयन हाच किशोरडी या डुआयडीने नमोंप्रेमींना टारगेट करतोय. मी आरोप लावल्यानंतर किशोरडी हा आयडी गुलदस्त्यात ठेवलाय त्याने.

फुकट ची बदनामी करणार्या "इडलीवाला" या आयडी कडे अ‍ॅडमिन लक्ष देतील की मला माझ्या हिशोबाने लक्ष द्यावे लागेल हे स्पष्ट करावे....

Pages