सेंट्रल हॉल मधील मोदींचे पहिले भाषण !

Submitted by केदार on 20 May, 2014 - 07:49

modi_1.jpg

मोदींनी आज संसदेत पहिलेंदाच पाऊल ठेवले, . आज त्यांचे भाषण लाईव्ह ऐकले. जनरली मला भाषणात फार इंन्ट्रेस्ट नसतो पण पहिल्या दोन मिनिटांनंतर भाषण ऐकतच राहिलो. काही महत्वाचे मुद्दे.

१. मोदींना पहिलेंदाच इमोशनल पाहिले.
२. त्यांनी आधीच्या सरकारला अजिबात नावे ठेवली नाहीत, तर जे जे काही झाले आहे त्यापुढे भारतमातेला कसे न्यायचे ते पाहूयात असे ते म्हणाले.
३. जनतेने टाकलेल्या जबाबदारीची जाणिव त्यांचा भाषणातून येत होती.
४. सर्वांना विकास हवा आहे, तर विकासात सर्वच जणांचा सहभागही हवा. सर्वांसोबत सर्वांचा विकास !

यु ट्युब -

भाग १

भाग २

अजून बरेच मुद्दे आहेत जे नेटवर सहज मिळतील.

भाषण झाल्यावर मी चॅनल सर्फ करत होतो, ABP news वर भाषणाचे रेटिंग ( अगदी अमेरिकेत होते तसे) चालू होते आणि बहुतेक सर्वांनी १० पैकी १० (काहिंनी ८-९) मार्क दिले.

खूप दिवसांनी एका नेत्याचे भाषण ऐकले ही फिलिंग मात्र नक्कीच आली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले वाटले भाषण. आजकाल शौकच लागलाय मला निवडणुकिच्या काळात मोदींच्या भाषणा(कुठल्याही राज्याच्या) झालेल्या क्लीप एकणे. होपफुल वाटतय.. बघुया.. काय होतय.

मी कधीच मोदींची समर्थक नव्हते. का कोण जाणे मला त्यांच्याकडून good vibes मिळत नव्हत्या. अर्थात मला कॉंग्रेस आजिबात नको होती. पण आज मोदी पंतप्रधान होऊ घातले आहेत. निवडणुकीच्या आधी मी त्यांची प्रचाराची कोणतीही भाषणे ऐकली नाहीत. प्रसिद्धी माध्यमातून जे छापून येत होतं तेवढंच. पण परवाचं वाराणसीतलं भाषण आणि आता हे भाषण अशी दोन्ही भाषणं ऐकून थोड्या चांगल्या vibes मिळत आहेत. अर्थात मोदिप्रेमात वाहून कधीच जाणार नाही. पण अपेक्षा वाढल्या आहेत. पाहू मोदी त्यांना कसे आणि किती पूर्ण करतात!

अंजली,

तुमचा इथला प्रतिसाद आवडला. अशा प्रकारच्या लोकांचं कुठूनतरी मोदींना अपशकून करणं एव्हढंच ध्येय आहे. मग भले स्वत:चं नाक कापायला लागलं तरी बेहत्तर. मोदींना गोधरोत्तर दंगलीच जर करायच्या होत्या तर २८ तास वाट कशाला पहात बसले? या साध्या प्रश्नाचं उत्तर नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

केदार,

चांगला धागा आहे. धन्यवाद!:-)

भाषण ऐकलं. बरचसं पटलं. अडवाणी वगैरेंच्या खांद्यावर बसलेलं असणं जरा नाटकी वाटलं. अडवाण्याने मोदींविरुद्ध काय तमाशे केले होते ते लोकांना माहितीये. मात्र राजकारणी नाटकी असावाच लागतो. हा नाटकीपणा उपद्रवी नाही.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै. - "अडवाणी वगैरेंच्या खांद्यावर बसलेलं असणं" हे मला अजिबात नाटकी वाटले नाही.
उलट मला तरी आवडले कारण - डा. मुखर्जी, पण्डित दीनदयाळ, टण्डन, वाजपेयी, अडवाणी (आणि कितीतरी ..) यांच्यामुळे ते सध्या इथे आहेत हे महत्वाच्या वेळी मान्य करणे यातून अजूनतरी श्री. मोदी पूर्वी आहे तसेच आहेत याची जाणिव झाली.

१९८४ मध्ये जे झालं ते चूकच होतं. त्यातल्या दोषींना शिक्षा न होणे हेही वाईटच होतं. पण त्या मुद्द्याच्या आधारे २००२ चे समर्थन होऊ शकते?
आता आम्हाला बहुमत मिळाले आहे, त्यामुळे २००२ने लोकांना काही फरक पडत नाही हे सिद्ध झाले असा मुद्दा येऊ घातला आहे. जो यापूर्वी गुजराथेतल्या आणखी दोन विधानसभा निवडणुका जिंकल्यानेही सिद्ध झाल्याचे सांगितले जायचे.
नैतिक बळाबाबत बोलायचे तर वाजपेयींनी 'राजधर्म पाळा' असे सांगितले होते पण त्यांचे बिचार्‍यांचे नैतिक बळ कमी पडले.

काँग्रेसने जातीपातीचे राजकारण केले असेल , पण विद्वेषाचे राजकारण केलेले नाही. १९४८ बाबत माझ्या वाचनात जे काही आले, त्यात स्थानिक पातळीवरील गुंडगिरीचेच उल्लेख होते. पीडितांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

जर दंगलींचा मुद्दा या धाग्यावर (आणि आता देशाच्या विकासाच्या (!!) उदात्त चर्चेत यायला नको होता; तर तो प्रथम आला तेव्हाच त्याला उत्तर द्यायचे नव्हते. ते उत्तर कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही हे सांगण्याचा हक्क देणारी लोकशाही अजूनतरी शाबूत आहे.

ह्या निवडणुकीच्या प्रचारा च्या वेळेला झी टिव्हीला दिलेल्या एक्स्लुसिव मुलाखतीच्या दरम्यान एक प्रश्न विचारला होता. २००२ सालच्या कांड साठी कधीही माफी का मागीतली नाही ?

त्यावर मोदींच उत्तर अस होत, जर गुन्हा करुन माफीच मागायची मग कायदे कश्याला ? प्रत्येक गुन्हयाला
शिक्षा ही व्हायलाच हवी, मग तो कोणीही असो.

२००२ सालापासुन मोदींवर काय कमी केसेस चालवल्या गेल्या ? पण ह्या सर्वांमधुन ते निर्दोषच सुटले.
जर कोर्टाने निर्दोष म्हणुन शिक्कामोर्त ब केल अस ताना परत परत २००२ चे रडगाण का ?

मोदींची भाषणं मला महाबोअर वाटतात. हे तरी पहावे का नाही अशा विचारात होते, पण पहायल हवे बहुतेक असे या धाग्यावरुन वाटले. आभारी आहे.

पण त्या मुद्द्याच्या आधारे २००२ चे समर्थन होऊ शकते?>>> कोणी समर्थन केलं आहे? कुठे? जे झालं ते क्षम्य नव्हतं असं आधीच लिहीलं आहे की. आता तुम्ही बळंच ही भाषा वापरली असं म्हणत असाल तर वादाला अर्थ नाही. आणि वाद घालायची इच्छाही नाही. शिवाय असं म्हणून ८४ साली जे झालं त्यावरून लक्ष दुसरीकडे वेधत नाही का? ८४ मधे गुंतलेल्या लोकांना शिक्षा झाली तर मोदींनाही व्हायला हवी. पण आधी ८४... कुठल्याही दंगलींचं कसलंही आणि कुठेही समर्थन होऊ शकत नाही. त्याबरोबरच एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसरा असंही होऊ शकत नाही.

आता आम्हाला बहुमत मिळाले आहे, त्यामुळे २००२ने लोकांना काही फरक पडत नाही हे सिद्ध झाले असा मुद्दा येऊ घातला आहे. >>> कुठे? या मुद्द्याचा बागुलबुवा जास्त होतोय असं वाटत नाही का? हाच आणि केवळ हाच मुद्दा का घेत आहात?

काँग्रेसने जातीपातीचे राजकारण केले असेल , पण विद्वेषाचे राजकारण केलेले नाही. >>>>> Really???? काय फरक आहे हो दोन्हीत? जातीपातीचं राजकारण करून आपल्या (इथे भारतीय असा अर्थ घ्या) लोकांतच फूट पाडली ना? हा द्वेष इतक्या पातळीला गेला की महाराष्ट्रात पार इतिहास बदलला की हो.

१९४८ बाबत माझ्या वाचनात जे काही आले, त्यात स्थानिक पातळीवरील गुंडगिरीचेच उल्लेख होते. पीडितांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचाही समावेश होता. >>>१९४८ बद्दल तुम्ही वाचलं असेल, पण अगदी जवळच्या लोकांकडून - जे होरपळले गेले - ऐकलं आहे. त्या कथा ऐकूनही अंगावर काटा येतो. जशा गोध्राच्या आणि ८४ कथा ऐकून येतो ना तसाच.

जर दंगलींचा मुद्दा या धाग्यावर (आणि आता देशाच्या विकासाच्या (!!) उदात्त चर्चेत यायला नको होता; तर तो प्रथम आला तेव्हाच त्याला उत्तर द्यायचे नव्हते. ते उत्तर कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही हे सांगण्याचा हक्क देणारी लोकशाही अजूनतरी शाबूत आहे.>>> हे तुम्ही कोणाला उद्देशून लिहीलं आहेत माहित नाही. दंगलींचा मुद्दा मी काढला नव्हता ना त्याला प्रथम उत्तर दिलं होतं. तुम्हाला स्पेसिफिकली लिहायचं कारण तुम्ही ज्या शब्दाला दोन उद्गारवाचक चिन्हं टाकली आहेत ना, त्याबद्दल आहे. It is a high time that we leave all this dirty politics behind and look forward. जगाच्या नकाशावर भारताचं स्थान पक्कं / ठळक करायचं असेल तर विकासाशिवाय दुसरा पर्याय नाही. नाहीच. जात/पात/धर्म सगळं दुय्यम आहे. याजागी मोदींऐवजी दुसरा कोणीही अगदी काँग्रेसचाही लायक उमेदवार असता तरी मला हेच वाटलं असतं. कारण देशहित हे कुठल्याही पक्षापेक्षा, व्यक्तिपेक्षा, जात -धर्म-पंथ यापेक्षा महत्वाचं/मोठं आहे. गुजरातमधे विकास झाला आहे हे गुजराथमध्ये वाढलेल्या इथल्या मराठी मैत्रिणींनी सांगितले आहे. तसाच विकास देशाचा होत असेल तर देशाच्या पंतप्रधानाला साथ द्यायची का केवळ परत जात-पात-धर्मावरून वाद घालत बसायचे? इथे मी कुठलीही व्यक्तीपूजा/पक्षपूजा करत नाहीये. माझ्या देशाला प्रगतीपथावर नेणार्‍या उमेदवाराला (तो कुठल्याही पक्षाचा असला तरी) साथ द्यायची आहे. हे सगळं भारताबाहेर राहून बाकिच्या जगाची प्रगती झालेली पाहिल्यामुळे प्रामाणिकपणे वाटते. आणि लोकशाहीचं म्हणाल तर भारतीय लोकशाही खरंच लेचीपेची नाही आणि ती कदापीही होऊ नये यासाठीच हा अट्टाहास आहे.

<कोणी समर्थन केलं आहे? कुठे?>
हाच धागा वाचा म्हणजे मिळेल. ज्या पोस्टच्या उत्तरार्थ माझा प्रतिसाद आला आहे ती वाचा.

मयेकर, किती वेळ तेच ते दळण दळत बसणार ! निवडणूकीच्या आधी प्रचाराचा हेतूने दळता असं म्हणू शकलो असतो. पण आता नवीन सरकार एव्हडं भरघोस मतांनी निवडून आलं आहे. त्यांना कारभार सुरु तरी करू द्या.. सारखा नकारात्मक सुर कशाला ?

२००२ च्या दंगलींचीच आठवण लोकांना अजून का येते? >>>> कारण तुमच्या सारखी लोकं ती काढतात ! खुद्द गुजराथमधली लोकं ते विसरून मोदींना तीन तीन वेळा विधानसेभेवर निवडून आणतात (आणि लोकसभेवरही) तरीसुद्धा !

मोदींच भाषण काल उशीरा पाहिलं.. लाईव्ह नाही बघता आलं. !
अतिशय मुत्सद्दी आणि परिपक्व नेत्यांचं भाषण होतं. आणि खूप स्फुर्तीदायकही.. !! वाजपेयींच्या काळात बर्‍याचदा विश्वासदर्शक ठरावांवर चर्चा झाल्या तेव्हाच्या भाषणांची आठवण झाली.. !

काल एनडीटिव्हीवर ऐकले पुर्ण भाषण. डोळे भरून येत होते आणि एका गीताची धून मनात वाजत होती.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो !

पराग, तुमच्या दुसर्‍या परिच्छेदात तुम्ही जे लिहिले आहे, ते मी आधीच लिहिले आहे.
दळणाबद्दल म्हणाल तर २००२ च्या समर्थनार्थ इथे जे काही लिहिलं गेलं ते लिहिलं गेलं नसतं, तर इथे अवाक्षरही लिहिण्याचं मला कारण नव्हतं.

सरकारला काम न करू देण्याचा आणि नकारात्मक लिहिण्याचा मुद्दा कळला नाही. २००२ पासून इतके लोक काही काही बोलत लिहीत आहेत तरीही गुजरातचा विकास झालाच ना? Wink आता (बाकीच्या) देशाचाही होईलच की. माझ्या बोलण्या लिहिण्याला उत्तर देण्यात वेळ कशाला घालवायचा?

१९८४ असो की २००२ हे सर्व मुद्दे जुने झाले आहेत. १९८४ च्यादंगलीनंतर काँग्रेस पंजाब मध्ये सुध्दा सत्तेवर आलेली आहे आणि २००२ नंतर जिथे प्रभाव जास्त आहे अश्या उत्तर प्रदेश आणि बिहार मधे जास्त जागा भाजपने मिळवला आहेत.

पुढे जाऊ यात.

कोणी समर्थन केलं आहे? कुठे?>
हाच धागा वाचा म्हणजे मिळेल. ज्या पोस्टच्या उत्तरार्थ माझा प्रतिसाद आला आहे ती वाचा. >>

बुवांनी दंगलीबाबत लिहिले, मी उत्तर दिले इतकेच. आणि ते कम्पेअर करून. आणि त्यावरून मी दंगलींच सर्मथान करतोय असा सूर मयेकर लावत आहेत. पण मी कधीही कुठल्याही दंगलींच समर्थन करत नाही हे जे मला इथे पोस्ट वरून ओळखतात त्यांना माहिती असेल. कुणीही मेले ते वाईटच, मग हिंदू असो की मुसलमान.

मला गुजराथ दंगल ह्या प्रकरणाचा कंटाळा आला आहे, ज्यांना तेच दळण दळायचे आहे, त्यांनी जरूर दळावे. लोकशाही आहे.

बेफिकीर तुम्हाल नाही, मयेकरांना उद्देशून होती. ज्यांना रात्रंदिवस मोदी म्हणले की दंगल आठवते.

अंजली छान मुद्दे मांडते आहेस. खूप आवडल्यात तुझ्या दोन्ही पोस्टी.

मी काल लगेच ह्या दोन्ही लिंक पाहिल्यात. आपल्या देशात बहुसंख्य (मास) लोकांना अशीच तद्दन भिक्कार भाषणे आवडतात. आपण पंतप्रधानांचे भाषण ऐकणार आहोत म्हणून जी अपेक्षा होती भाषणातून ती पुर्ण झाली नाही. एकच मुद्दा लक्षात आला की मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी स्वातंत्र्यपुर्व भारत पाहिला नाही.

काल परवा आपबद्दल मायबोलिवर एक सकारात्मक चर्चा वाचली होती. आज ह्या धाग्यावर त्यांच्याविषयी वेगळे विरोधी उद्गार वाचायला मिळत आहे. आणि तेही त्याच व्यकिंकडून ज्यांनी केजरीवालचे केवढे तरी कौतुक केले होते.

लोक खूप घाई करतात मत व्यक्त करायला. आधी नेता म्हणून त्यांना काही करु देत. गुजरात तसाही खूप मागासलेला भाग नव्हता. शिवाय गुजराती माणसे आधीच पुढे आहेत भारतात. गुज्जुंन्ना धंदा कळतो. अशा राज्याला थोडे चमकवणे फार अवघड नाही.

मोदीजींना माझ्या शुभेच्छा.

आ चंद्र सुर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे!!!!!

<< पुढे जाऊ यात.>> +१
एक अतिशय सुसंस्कृत, सज्जन, अर्थतज्ञ पंतप्रधान देशाला मिळाला म्हणून दहा वर्षांपूर्वीं आपण सुखावलो होतो व व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल अजूनही आदर असूनही पंतप्रधान म्हणून ते निराशाजनक ठरले हें आपण अनुभवले. आतां पंतप्रधान म्हणून सध्याच्या परिस्थितीत लायक व तडफदार म्हणून मोदींचं व्यक्तीमत्व सर्वमान्य होतंय, तर सध्यां तरी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहाणंच योग्य असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यानीही अपेक्षाभंग केलाच तर आपलं दुर्दैव व पुढची निवडणूक आहेच; पण तो विचार आत्तांच अनावश्यक व अनुचित.

त्यानीही अपेक्षाभंग केलाच तर आपलं दुर्दैव व पुढची निवडणूक आहेच; पण तो विचार आत्तांच अनावश्यक व अनुचित. >> + १ भाऊ, तुमच्या दोन्ही पोस्टी खूपच चांगल्या आहेत. संधी दिली आहे तर शिव्या देण्या आधी वाट पाहायला काय हरकत आहे.

लोकहो,

मोदी सरकार आलेले आहे. तुम्हाला आवडो न आवडो! तेही दडपशाही करून नव्हे तर अधिकाधिक जनतेच्या इच्छेनुसार कायदेशीर मार्गाने आलेले आहे. आता इतिहास खणून या धाग्यावर वाद घालून हाती काही लागणार नाही आहे. हा धागा आहे मोदींच्या भाषणाचा!

थोडे अवांतर करतो, मोदीजींचा पुढील पाच वर्षाचा प्लान आला आहे का? मी असे ऐकले की सुरवात गंगा नदी स्वच्छ करण्यापासून होत आहे.

थोडे अवांतर करतो, मोदीजींचा पुढील पाच वर्षाचा प्लान आला आहे का? मी असे ऐकले की सुरवात गंगा नदी स्वच्छ करण्यापासून होत आहे.<<<

बी, हे थोडेसे अवांतर नाही आहे. मोदींनी पुढील पाच वर्षात काय करावे ह्यावरून येथे महाभारत घडू शकते. मनस्मिंचा एक धागा आहे त्यावर तुमचा हा प्रश्न सुसंगत ठरू शकावा. (विशलिस्टचा धागा)

<बुवांनी दंगलीबाबत लिहिले, मी उत्तर दिले इतकेच. आणि ते कम्पेअर करून. आणि त्यावरून मी दंगलींच सर्मथान करतोय असा सूर मयेकर लावत आहेत. >

quoting again : "राहिली क्लिन चिट ची गोष्ट जेवढ्या दंगली काँग्रेसने केल्या तेवढ्यात गोध्रा पेक्षा जास्त माणसं मेली आहेत. इनफॅक्ट मोदी सत्तेत यायच्या आधी गुजराथ मध्ये काँग्रेस असताना खूप मोठी दंगल झाली होती, हजारो माणसे मेली. गुजराथला दंगलीचा इतिहास २००२ पर्यंत होता. त्यानंतर (गोध्रा) २०१४ पर्य्म्त एकही दंगल झाली नाही ह्यातच सर्व आले नाही का? स्टेट स्पॉन्सर्ड टेररीझम मध्ये काँग्रेस, भाजपापेक्षा पुढे आहे. (मृताचा आकडेवारीत) ही फॅक्ट आहे."

मलाही कंटाळाच आलेलाच आहे.

आनंदीआनंद गडे जिकडेतिकडे चोहीकडे Happy

ज्यांना 'घाईची' लागल्यामुळे सह्न होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था झालेली आहे त्यांनी कृपया पलिकडे उघडलेल्या सक्षम (?) विरोधी पक्ष इत्यादी सुलभ शौचालयांचा लाभ घ्यावा. इथे उभं राहायला जागा नसताना कागद घेऊन येऊ नये. भारतीय न्यायसंस्था सार्वभौम आहे असे म्हणतात, खरेखोटे काँग्रेस जाणे, त्यांनी एखाद्याला निर्दोष ठरवल्यानंतर कोणाला समांतर न्यायालये चालवायची असतील तर त्याची सोय सुद्धा सुलभ शौचालयांत नक्कीच असणार.

बाकी, इतरांनी आनंद साजरा करुया. Happy

मी काल लगेच ह्या दोन्ही लिंक पाहिल्यात. आपल्या देशात बहुसंख्य (मास) लोकांना अशीच तद्दन भिक्कार भाषणे आवडतात. आपण पंतप्रधानांचे भाषण ऐकणार आहोत म्हणून जी अपेक्षा होती भाषणातून ती पुर्ण झाली नाही.>>>>> धन्य आहे, म्हणजे ज्या माबोकर सदस्याना मोदीन्चे हे भाषण आवडले, ते पण भिक्कार आहेत नाही का बी?

बोलबच्चन असण्यापेक्षा काम आणी कृती झाली तर ती जास्तच चान्गली होईल नाही का?

राजसी,

तुमचा प्रतिसाद काहींना खूप गंंमतीशीर, लग्गेच अनुमोदन देण्याजोगा वाटेल पण व्यक्तिशः मला तरी त्यातील शैली भावली नाही. हे नोंदवण्याचेही कारण नव्हते, पण हेच काँग्रेसजनांनी लिहिले असते तर भाजपवाले कसे तुटून वगैरे पडले असते ते जाणवले व लिहिले. Happy

भाऊ काका तुमच्या सर्व पोस्टी छान आहेत

त्यानीही अपेक्षाभंग केलाच तर आपलं दुर्दैव व
पुढची निवडणूक आहेच; पण तो विचार आत्तांच
अनावश्यक व अनुचित. >> + १

काल मी पहिल्यांदाच मोदींचे भाषण पाहिले आणि इंदिराजींच्या काळची आठवण आली. इंदिराजीची लालकिल्ल्यावरुनची भाषणे अशीच प्रभावी असायची. दुर्दैवाने अटलजींना त्यांच्या ऐन बहरात ऐकता आले नाही, मला दिसले ते दीर्घ पॉजेस घेऊन बोलणारे अटलजी. त्यानंतर मात्र सगळा आनंदी आनंदच होता.

भारत हा लोकशाही देश आहे हे ऐकले की इथली घराणेशाही आठवुन मी फक्त हसायचे, काल पहिल्यांदा अभिमान वाटला भारताचा आणि इथल्या लोकशाहीचा. ज्या लोकशाहीने इतकी वर्षे घराणेशाही पोसली त्याच लोकशाहीने आज एका गरीब घरातल्या चहावाल्याला देशाच्या सर्वोच्च नेतेपदी बसवले. कालच्या भाषणाने माझ्या मनात खुप आशावाद निर्माण केला.

मोदींचे मिडीयाने इतके भयानक चित्र उभे केलेय की अजुनही ब-याच लोकांच्या मनात संशय असेल, माझ्याही होता. पण जसजसे नविन गुजरातचे चित्र समोर येत गेले तसतसा तो संशय फिटत गेला. काल तर उरलासुरला संशयही फिटला आणि देशाचे आणि सोबत आपलेही भविष्य आता उज्ज्वल आहे याची खात्री पटली. देव मोदींना उदंड आयुष्य देवो!!

रच्याकने, काल नेटवर मोदींवरच्या कमेंट्स वाचत असताना गार्डीयन मधला एक लेख वाचला. त्याखालच्या एक कमेंट खुपच आवडलेली. आता केदारचा लेख आणि त्यातली दंगलीची चर्चा वाचताना तीच कमेंट आठवली. खाली द्यायचा मोह आवरत नाहीय.

मायबोली धोरणात बसत नसेल तर अ‍ॅडमिनने ती उडवावी.

मुळ लेख इथे

http://www.theguardian.com/world/2014/may/20/narendra-modi-tearful-speec...

आणि इथे एक कमेंट -

FedUpIndian
20 May 2014 5:02pm

Tomorrow's Guardian articles today:

1) June 2014: "Modi takes Hindu nationalist leak in New Delhi"
Jason Burke reporting.

The controversial Hindu nationalist PM of India, Narendra Modi, today created an international incident when he did not pee in a Western-style toilet, preferring instead to go in an Indian-style toilet. "If Western-style toilets were good enough for Sonia Gandhi, I don't see why they are not good enough for a tea-seller," said a visibly miffed Mani Shanker Iyer, Congress party hanger-on.

Mr. Modi, whom some blame for the riots in Gujarat in 2002 AD in which 1000 people, most of them Muslims, were killed, said he merely used the first available toilet, but Human Right Watch has started an investigation of this incident to see if there is a pattern of discrimination by Modi against Western-style toilets.

2) 2018 AD: "Modi insults Indian Christians"

The controversial Hindu nationalist PM of India, Narendra Modi, created another communal incident in New Delhi yesterday at a ceremony to flag off India's first bullet train. Although bullet trains were introduced in record time in India, the driver of the bullet train was a Sikh. Traditionally, Anglo-Indian Christians serve as engine drivers in the Indian Railways. The Bishop of Ernakulam threatened to take Modi, under whose watch 1000 people, mostly Muslims, were killed in riots in 2002 AD, to the International Court of Justice for insulting Indian Christians.

3) 2024 AD: "Modi inaugurates India's 1000th steel plant"

Narendra Modi, the Hindu nationalist Prime Minister of India, today inaugurated the 1000th steel plant to open in India in the past 10 years. While India needs steel for its infrastructure, some Indian Muslims are worried because steel can also be used for swords, the kind of swords that were used to kill almost 1000 people, mostly Muslims, back in 2002 A.D. The riots started after a mysterious fire killed 59 Hindu pilgrims in a train in Gujarat. It is unclear what started the fire, but Human Rights Watch has credible evidence that flying monkeys from outer space were responsible.

4) 2025 A.D. "Boko Haram invades Great Britain, millions of Christians killed and enslaved"

The Boko Haram today completed its takeover of Great Britain, celebrating the occasion by beheading one million kaffirs in Piccadilly Circus. "Praise be to Allah," said their leader, "we can now bring sharia law to the infidels in these fair isles as the prophet told us we must do."

The controversial Hindu nationalist PM of India, Narendra Modi, who is blamed for the deaths of 1000 people, most of them Muslim, in the 2002 riots, could not resist making political capital out of this unfortunate misunderstanding, even though the Boko Haram has nothing to do with Islam, a peaceful religion that respects freedom of religion and religious minorities. Jason Burke, editor of the Guardian, condemned Modi's statement from his hiding place in Iceland as being "hideously Islamophobic."

Pages