सेंट्रल हॉल मधील मोदींचे पहिले भाषण !

Submitted by केदार on 20 May, 2014 - 07:49

modi_1.jpg

मोदींनी आज संसदेत पहिलेंदाच पाऊल ठेवले, . आज त्यांचे भाषण लाईव्ह ऐकले. जनरली मला भाषणात फार इंन्ट्रेस्ट नसतो पण पहिल्या दोन मिनिटांनंतर भाषण ऐकतच राहिलो. काही महत्वाचे मुद्दे.

१. मोदींना पहिलेंदाच इमोशनल पाहिले.
२. त्यांनी आधीच्या सरकारला अजिबात नावे ठेवली नाहीत, तर जे जे काही झाले आहे त्यापुढे भारतमातेला कसे न्यायचे ते पाहूयात असे ते म्हणाले.
३. जनतेने टाकलेल्या जबाबदारीची जाणिव त्यांचा भाषणातून येत होती.
४. सर्वांना विकास हवा आहे, तर विकासात सर्वच जणांचा सहभागही हवा. सर्वांसोबत सर्वांचा विकास !

यु ट्युब -

भाग १

भाग २

अजून बरेच मुद्दे आहेत जे नेटवर सहज मिळतील.

भाषण झाल्यावर मी चॅनल सर्फ करत होतो, ABP news वर भाषणाचे रेटिंग ( अगदी अमेरिकेत होते तसे) चालू होते आणि बहुतेक सर्वांनी १० पैकी १० (काहिंनी ८-९) मार्क दिले.

खूप दिवसांनी एका नेत्याचे भाषण ऐकले ही फिलिंग मात्र नक्कीच आली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो थोडेसे ऐकले.:स्मित: मोदी भावुक झाले होते. त्यानी वाजपेयीन्ची आठवण काढली हेच खूप आहे. सत्ता मिळाली तरी पाय जमिनीवर दिसत आहेत, आणी असावेत. तरच आपला देश विकसनशील न रहाता विकसीत म्हणून ओळखला जाईल. कारण खम्बीर धोरण, सगळ्याना बरोबर घेऊन जाण्याची ईच्छा आणी समानता ही प्रमुख धोरणे असावीत.

"केंद्रातील सत्तापालट " या धाग्यावरचे कांहीं वेळापूर्वींचे माझे कॉमेंटस -
<< आजचं पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीतलं मोदींचं भाषण तरी एका आत्मविश्वास व निर्णयक्षमता असलेल्या, मुत्सद्दी व परिपक्व नेत्याच्या हातात देशाने सूत्र हवाली केलीत याचं आश्वासन देणारं होतं. [ बरीच वर्षं कागद समोर ठेवून वाचावं अशीं मरगळ निर्माण करणारीं भाषणं ऐकून वीट आला होता; कुणीं तरी उत्स्फुर्तपणे, जोषपूर्ण पण नम्रपणे, कांहींतरी भरीव करून दाखवण्याची उत्साही भाषा करतोय व त्यासाठी सर्वाना आवाहन करतोय, हें ऐकूनच जनताजनार्दनाचा कौल योग्य बाजूनेच पडला आहे असं वाटतंय. देव करो अन हें खरं ठरो !! ] >>

मोदींनी आपल्या रफ टफ इमेजशी प्रामाणिक राहावे, केजरीसारखे सतत साथियो !!दोस्तो !!!करत राहिले तर त्यांचा पण केजरी होईल.

<< आजचं पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीतलं मोदींचं भाषण तरी एका आत्मविश्वास व निर्णयक्षमता असलेल्या, मुत्सद्दी व परिपक्व नेत्याच्या हातात देशाने सूत्र हवाली केलीत याचं आश्वासन देणारं होतं. [ बरीच वर्षं कागद समोर ठेवून वाचावं अशीं मरगळ निर्माण करणारीं भाषणं ऐकून वीट आला होता; कुणीं तरी उत्स्फुर्तपणे, जोषपूर्ण पण नम्रपणे, कांहींतरी भरीव करून दाखवण्याची उत्साही भाषा करतोय व त्यासाठी सर्वाना आवाहन करतोय, हें ऐकूनच जनताजनार्दनाचा कौल योग्य बाजूनेच पडला आहे असं वाटतंय. देव करो अन हें खरं ठरो !! ] >> अगदी सहमत

भाषणाचा 'इमोशनल' भागच तेव्हढा बघायला मिळाला हाफिसात, घरी गेल्यावर टिव्ही वर पुर्ण बघायला मिळेल बहुतेक..बाकी मोदिंना ईमोशनल झालेलं पहिल्यांदाच पाहिलं, पण अजिबात नाटकी वाटलं नाही. (रागा खुपच नाटकी वाटला होता, 'एकदिन मुझे भी मार डालेंगे' म्हणताना.)

<< मोदींनी आपल्या रफ टफ इमेजशी प्रामाणिक राहावे,>> आपल्या अधिक व्यापक भूमिकेशी व लक्ष्याशीं प्रामाणिक रहाणं महत्वाचं कीं इमेज जपणं ? मला वाटतं मोदी स्वतःची 'रफ अँड टफ' इमेज दुय्यम समजताहेत [ त्याजत नाहीयेत ] व तेंच योग्य असावं. [ याबाबतींत केजरीवाल व मोदी यांची तुलना अनेक कारणांमुळे आत्तां तरी होऊं शकत नाहीं ].

त्यांना खंबीर व्हावेच लागेल. देशभराची सुस्त नोकरशाही कामाला लावणे अवघड आहे. पण त्यातही स्पष्ट बहुमत असल्याने त्यांना त्या "आघाड्यां"वर लढावे लागणार नाही.

पहिला भाग बघितला.
अतिशय प्रभावी आणि ओघवते वत्कृत्व!
अस्खल्लित हिंदी खुप दिवसांनी ऐकली. आत्तापर्यंत मोदींची जी भाषणे/मुलाखती ऐकल्या त्यातील त्यांचे भाषेवरील प्रभुत्व खुप भावले.
खुप आशा आहेत नव्या सरकारकडनं.

प्रत्येक शब्दाला/ वाक्याला वाटत गेले की अब अच्छे दिन आनेवाले है... देव करो.. नमो जसे बोलले तसे सरकार चालवू दे... आणि देशवासियांचे भले करो...

मोदींचे हितशत्रू खूपच आहेत. अशा भव्य व्यक्तिमत्वाचा अकारण-सकारण द्वेष करणारी माणसे असतातच.त्यातून त्यांच्यासारखे निरीच्छ समर्पित चारित्र्य असणारी माणसेही त्यांच्याभोवती फारशी नाहीत..तरीही काहीतरी आशास्पद असं त्यांच्या शब्दातून मिळत रहातं.. खूप दिवसांनी आशा जागृत झाली आहे.

भाषणातील मला अतिशय आवडलेले मुद्दे (मंजूडी ह्यांना धन्यवाद, संक्षिप्त स्वरुपाची लिंक दिल्याबद्दल)

१. पूर्वीच्या सरकारने काही केले नाही असे मी मानत नाही, प्रत्येकाने आपल्या परीनं प्रयत्न केला. त्या सगळ्याच सरकारना त्यांच्या यशासाठी आणि चांगल्या कामांसाठी मी शुभेच्छा देतो. जे काही चांगले आहे ते घेऊन पुढे जाऊ हा विचार घेऊन चाललो तर देशाची जनता सुखी होईल.

२. देशातील जनतेने प्रचंड मतदान केले. मग ते कोणत्याही पक्षाला केले असेल, पण त्याने जगभरात संदेश पोहोचला की भारताची प्रजसत्ता केवढी जबरदस्त आहे. भारताचे सामर्थ्य जगाला कळले. हा एक शुभशकून.

३.गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला फक्त मोदीच दिसताहेत पण ते माझ्या मोठेपणामुळे नाही तर पक्षातल्या मोठ्या नेत्यांनी मला खांद्यावर घेतले आहे म्हणून मी दिसतो आहे. पाच पिढ्यांचे हे तपाचे हे फळ आहे की आज एवढा मोठा विजय पक्षाला मिळाला आहे. ज्यांनी पक्षासाठी शरीर झिजवले त्यांना मी नमस्कार करतो.

केदार,

थँक्स,...... चां गला धा गा काढल्याबद्दल ,........

घरी बसुन टीव्हीवर, सेंट्रल हॉल मधले मोदींसाठीचे अनुमोदन पहायला सुरवात केली होती. बाहेर जा व लागल
आणि मोदींच भाषण मिसल !!

या आधी सर्वांनी ( बिजेपीतील नेत्यांनी) मोदीजींना अनुमोदन देताना भरभरुन बोलत होते.
विजय अभुतपुर्व आहे आणि याचा शिल्पकार एकच आहे, याची जाणिव सर्वांनाच होती.

दुसरा कुठला धागा सापडला नाही केदार म्हणून इथे टाकत आहे. टोटली अनरिलेटेड नाहीये पोस्ट पण तरी.
२-३ दिवसांपासून मोदींच्या मुलाखती बघून त्यांची वक्तव्ये फेस वॅल्यु वर, कॉमन सेन्सला पटातायत की नाही हे करुन पहायचा चाळाच लागला आहे जणू. मला वाटतं कित्येक वर्षात पहिल्यांदाच एखादा राजकीय माणूस इतक्या व्यवस्थितपणे नॉट लेटिंग हिज इमोशन्स गेट द बेस्ट ऑफ हिम आपण काय बोललो ह्याचा काँटेक्स्ट समजवून सांगताना दिसला असेल. हे झालं मुलाखतीचे पण भाषण करताना सुद्धा तेच की कुठेही पुढे आपल्याला आपली वाक्ये मागे घ्यावी लागतील असं काहीबाही ते बोलतच नाही सहसा. आता ते एकदम प्लॅनिंग करुन बोलतात त्यामुळे की बोलताना सहसा त्यांचे मुद्दे हे बळच फक्त शेरेबाजीच्या उत्तरांना उत्तर देणे हा मुद्दाच नसावा म्हणून असावे. बाकी ऑपोजिशन वाले एखाद्या वक्तव्यामधले एखादे वाक्य उचलून ते हवं तसं ट्विस्ट करतात हे बघायला मजा येते. (हे बिजेपी वालेही करत असतीलच पण तरी).

तर मूळ मुद्द्यावर येत म्हणजे फेस वॅल्यु वर त्यांचे आर्ग्युमेंट्स पटतात की नाही बद्दल. इतर त्यांच्या गुजरातमध्ये केलेल्या कामांवर हाईपचे बोट ठेवत केलेल्या आरोपांची उत्तरं टोटली पटतात पण गोधरा संबंधित, नरोडा पाटिया हत्यांच्या संदर्भात वाचलं की मग त्यांचे मौन आणि सुप्रिम कोर्टाचा दाखला देणे पटत नाही. माया कोदनानीला वर नरोडाची केस सुरु असताना सुद्धा तिकिट दिलं आणि त्याबद्दल विचारल्यावर तेव्हा त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नव्हते हे उत्तर आजिबत पटत नाही. मोदींना नक्कीच नेमकं काय झालं ह्याबद्दल जास्त माहित होतं आणि तरी तिकिट दिलं म्हणजे त्यांची हार्डलाईन हिंदू विचारसरणी असल्याची लोकांना शंका येणे अगदी स्वाभाविक आहे. आता तसं करण्यामागे पार्टी प्रेशर होतं की स्वतःच त्यांचे तसं मत होतं हा मुद्दा गौण आहे कारण एकदा निर्णय घेतला म्हणजे त्याची नैतिक जवाबदारी स्विकारावीच लागते.

शेवटी आपण बघे म्हणून, त्यांचा बाकी ट्रॅक रेकॉर्ड बघून ह्या गोष्टी सोडून देऊ शकतो (बर्‍याच मुसलमान लोकांनीही सोडून दिलेलं दिसत आहे असं वोटिंग रेकॉर्ड्स वरुन दिसतय) आणि ज्यांचे आप्त त्यात मारले गेले ती लोकं कधीच मोदींना क्लिन चिट देणार नाहीत. माझं म्हणणं येवढच आहे की जे काही मोदींनी तेव्हा केला (किंवा जे काही नाही केलं) तसं काही त्यांनी आता देशाची सरकार हाती असताना केलं तर त्याचा इफेक्ट क्ती पटीनी गुणला जाईल ह्याची त्यांना कल्पना असावी. माणूस हुशार वाटतो आणि दर वेळी अनुभवांवरुन शिकतो असंही वाटतं. फक्त हा धर्माचा मुद्दा पुढे उपस्थित झाला कधी तर तेव्हा सुडाच्या भावनेला बळी न पडता नीट निर्णय घेतील अशी आशा करुयात. (दुसरं आपल्या हातात काय आहे?)

मला वाटतं मोदी स्वतःची 'रफ अँड टफ' इमेज दुय्यम समजताहेत [ त्याजत नाहीयेत ] व तेंच योग्य असावं. >> +१

भाऊ सहमत आहे. म्हणून लिहिले की "खूप दिवसांनी एका नेत्याचे भाषण ऐकले ." ही इज बॉर्न लिडर !

मोदी विल डिलिव्हर हे माहिती आहे. केजरीवाल सोबत तुलना होऊ शकत नाही. केजरीवालला राजकारण आणि समाजकारण कश्याशी खातात हे अजिबात माहिती नाही.

मोदी हे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. समाजकारणात त्यांनी आयुष्य व्यतित केले आणि गेलं एक तप (फक्त) राजकारण करत आहेत. त्यांची तुलना केजरीवाल किंवा रा गा अश्या लोकांशी होऊच शकत नाही. त्या दोघांना राजकारण आणि समाजकारण ह्या दोघांचा बेस नाही.

बुवा,
तुझे म्हणणे योग्य असले तरी, मोदी जेवढे मला समजले त्यावरून लिहितो, तो माणूस हार्डलायनर्सला बळी पडणारा नाही.
राहिली क्लिन चिट ची गोष्ट जेवढ्या दंगली काँग्रेसने केल्या तेवढ्यात गोध्रा पेक्षा जास्त माणसं मेली आहेत. इनफॅक्ट मोदी सत्तेत यायच्या आधी गुजराथ मध्ये काँग्रेस असताना खूप मोठी दंगल झाली होती, हजारो माणसे मेली. गुजराथला दंगलीचा इतिहास २००२ पर्यंत होता. त्यानंतर (गोध्रा) २०१४ पर्य्म्त एकही दंगल झाली नाही ह्यातच सर्व आले नाही का? स्टेट स्पॉन्सर्ड टेररीझम मध्ये काँग्रेस, भाजपापेक्षा पुढे आहे. (मृताचा आकडेवारीत) ही फॅक्ट आहे.
विकास असेल तर दंगल वगैरे आपोआप बाजूला पडते. सो लेटस होप की दंगली होणार नाहीत.

केजरीवालला राजकारण आणि समाजकारण कश्याशी खातात हे अजिबात माहिती नाही.>>>>>>>>
हा एक महत्वाचा मुद्दा राहिला लिहायचा. मोदी अगदी बिनधास्त चुनाव अलग है और देश चलाना अलग बात है असं म्हणतात त्याचं मला खुप आश्चर्य वाटतं. हे अगदी खरं असलं तरी मला वाटतं इथे अमेरिकेत सुद्धा कोणी इलेक्शन लढवणारी व्यक्ती असंकाही म्हणायची हिंमत करणार नाही. केजरीवालांना काय समजतं आणि काय नाही ह्यावर भाष्य करता येइल इतकी मला त्यांच्या विषयी माहिती नाही पण त्यांची आणि त्यांच्या पार्टीची विचारसरणी बघता ते इलेक्शन एक वेगळा गेम आणि सरकार चालवणे ही गोष्ट सेपरेट ठेवू शकत नाही हे पटतं. ते बरोबर की चूक हा आपापल्या प्रिन्सिपलांचा प्रश्न आहे. मोदी अर्थातच सिजन्ड पॉलिटिशियन आहेत.

त्यानंतर (गोध्रा) २०१४ पर्य्म्त एकही दंगल झाली नाही ह्यातच सर्व आले नाही का?>>>>> ह्यात सर्व काही नाही आले तरी मला आणि इतर लोकांनाही असावी ती आशा आहे. ती म्हणजे ते अनुभवातून शिकतात आणि सरवात महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्माचे राजकारण हा त्यांचा मेन बेस नाही. ह्या असल्या गोष्टींमधून राज्यांची, देशाची अर्थातच प्रगती होत नाही आणि त्यामुळे त्यात त्यांना रस नाही ही खुप मोठी जमेची बाजू आहे.

राहिली क्लिन चिट ची गोष्ट जेवढ्या दंगली काँग्रेसने केल्या तेवढ्यात गोध्रा पेक्षा जास्त माणसं मेली आहेत. >>>>> काँग्रेसच्या राज्यात अर्थातच दंगली झालेल्या आहेत पण तो काऊंटर आर्ग्युमेंट नाही ना ठरू शकत मोदी असे वागले तर का वागले ह्याचा? काँग्रेस काही धुतल्या तांदळासारखे नाही हे सगळेच जाणतात.

फक्त काउंटर आर्ग्युमेंट नाही करत आहे तर गुजराथ मध्ये नंतर एकही दंगल झाली नाही हे सांगतोय. जर हार्डलायनरच असले असते तर गुजराथ मध्ये अजून दंगली घडल्या असत्या. त्यानंतर २००९ आणि २०१३ साली इलेक्शन मध्ये तेच निवडून आले. गुजराथचे लोक दंगल विसरले आहेत. ( अर्थात काही हिंदू आणि काही मुसलमान सोडून, मेजॉरिटी बद्दल लिहितोय मी) आणि त्यांना हे पटले आहे की विकास असेल तर धर्म मध्ये आणायची गरज नाही.

धर्माचे राजकारण हा त्यांचा मेन बेस नाही. ह्या असल्या गोष्टींमधून राज्यांची, देशाची अर्थातच प्रगती होत नाही आणि त्यामुळे त्यात त्यांना रस नाही ही खुप मोठी जमेची बाजू आहे. >> तेच मी पण म्हणतोय बुवा.

बुवा , +१.

बाकी मला त्यांचं हे भाषाण आवडलं तरी अडवाणींच्या 'कृपा' शब्दाला घेऊन रडणं बरंच नाटकी वाटलं.
असो. बाकी लोक पब्लिक इमोशनशी खेळतात. तर हे पब्लिकली इमोशनल होतायत.
प्रॅक्टीकली काय करतायत ते बघायला आवडेल.

आलं लक्षात केदार.
अडवाणींचे नाव नेहमीच घेतात ते. ते पुढे येत असताना राजकारणात मार्गदर्शन केलेच असेल ना अडवाणींनी?

माझं म्हणणं येवढच आहे की जे काही मोदींनी तेव्हा केला (किंवा जे काही नाही केलं) तसं काही त्यांनी आता देशाची सरकार हाती असताना केलं तर त्याचा इफेक्ट क्ती पटीनी गुणला जाईल ह्याची त्यांना कल्पना असावी. >>> काही असंतुष्ट, विघातक आणि विरोधक शक्ती असे घडून यावे ह्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतीलही पण मला नाही वाटत मोदी व त्याहीपेक्षा भाजप पार्टी असे डाव ओळखण्यात किंवा हाणून पाडण्यात कुठे कमी पडेल. ह्यासाठी काही सेन्सिटीव राज्यांमध्ये आगामी विधानसभांवर भाजप सरकार येणं जरूरी आहे.

मोदींचं कंपोजर आणि मागच्या सरकारांबद्द्ल आजिबात नसलेली सूडभावना बघता 'ईजिप्त मधल्या महमंद मोर्सी' सरकारची पुनरावृत्ती होण्याचीही शक्यता नाहीच.

विकास एके विकास (ह्यात भ्रष्टाचार निर्मूलन आलंच) आणि कणखर प्ररराष्ट्र धोरण ठेऊन बाकीच्या धर्म वगैरे गोष्टींना फाटा दिल्यास पुढचे पाच काय पंधरा वर्ष आजिबात अवघड जाऊ नयेत असे वाटते. सिमी,ईमु वगैरे सारख्या प्रचंड ऊपद्रवी संघटना आणि ओवेसी सारखे लोक आहेतच त्यांचे मात्र युक्तीने 'साप पण मरेल आणि फटक्याचा आवाजही होणार नाही' असे निर्दालन केले पाहिजे.

ते पुढे येत असताना राजकारणात मार्गदर्शन केलेच असेल ना अडवाणींनी? >> हो ते आणि वाजपेयी हे त्यांचे राजकिय गुरू. वाजपेयींनी २००२ मध्ये फोन करून बोलावले व त्यांना मुख्यमंत्री व्हायला सांगीतले, तो पर्यंत ते कधीही आमदार नव्हते.

आमदार नसताना मुख्यमंत्री आणि आधी खासदार नसताना पंतप्रधाण. (अर्थात आधी खासदार नसताना पंतप्रधाण गांधी घराण्यातून आले आहेत, पण सामान्य माणूस कधी नाही. Wink ह्यातच त्यांचे संघटण कौशल्य आणि नेतृत्व दिसून येते.

आगामी विधानसभा निवडणूकात महाराष्ट्रामध्ये तरी परत युतीचे सरकार येईल असे स्पष्ट दिसते आहे. दुदैवाने मोदीसारखा किंवा मध्यप्रदेशातील शिवराजसिंग चव्हाणांसारखा लिडर सध्या तरी दिसत नाहीये महायुती मध्ये.

Pages