सेंट्रल हॉल मधील मोदींचे पहिले भाषण !

Submitted by केदार on 20 May, 2014 - 07:49

modi_1.jpg

मोदींनी आज संसदेत पहिलेंदाच पाऊल ठेवले, . आज त्यांचे भाषण लाईव्ह ऐकले. जनरली मला भाषणात फार इंन्ट्रेस्ट नसतो पण पहिल्या दोन मिनिटांनंतर भाषण ऐकतच राहिलो. काही महत्वाचे मुद्दे.

१. मोदींना पहिलेंदाच इमोशनल पाहिले.
२. त्यांनी आधीच्या सरकारला अजिबात नावे ठेवली नाहीत, तर जे जे काही झाले आहे त्यापुढे भारतमातेला कसे न्यायचे ते पाहूयात असे ते म्हणाले.
३. जनतेने टाकलेल्या जबाबदारीची जाणिव त्यांचा भाषणातून येत होती.
४. सर्वांना विकास हवा आहे, तर विकासात सर्वच जणांचा सहभागही हवा. सर्वांसोबत सर्वांचा विकास !

यु ट्युब -

भाग १

भाग २

अजून बरेच मुद्दे आहेत जे नेटवर सहज मिळतील.

भाषण झाल्यावर मी चॅनल सर्फ करत होतो, ABP news वर भाषणाचे रेटिंग ( अगदी अमेरिकेत होते तसे) चालू होते आणि बहुतेक सर्वांनी १० पैकी १० (काहिंनी ८-९) मार्क दिले.

खूप दिवसांनी एका नेत्याचे भाषण ऐकले ही फिलिंग मात्र नक्कीच आली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विधानसभा निवडणूकीबद्दल +१ चमन. कुठेही कडबोळं नकोच ह्या वेळी! भारताला फार गरज आहे हे आडकाठीचे राजकारण बाजूला सारुन डेवलपमेंटची गाडी बुंगाट पळवायची.

धन्यवाद, केदार.

मला लाईव्ह ऐकायला मिळाले नाही. आताच हे पाहिले.धन्यवाद!

बाकी मला त्यांचं हे भाषाण आवडलं तरी अडवाणींच्या 'कृपा' शब्दाला घेऊन रडणं बरंच नाटकी वाटलं.........नाटकी नाही वाटलं. भाषणाच्या ओघात कोण कसा बोलेल ते सांगता येत नाही.पण तो शब्द्/वाक्य मोदींनी टाळले असते तर जास्त शोभलं असतं.

अरे मी हा धागा पूर्ण वाचला नव्हता; इथे पण त्याची सीसी आहे Happy मला आता षुढची पाच वर्षे फक्त गंमत बघायची आह Happy तुम्ही लेखाजोखा वर बरच सगळ्या ना बरोबर घेऊन चालला होता सो इथे आले तुम्हाला सांगायला Happy

केदार, महाराष्ट्रात सध्यातरी गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पर्याय नाही. विनोद तावडे ,फडणवीस तितकेशे प्रभावी वाटत नाहीत. गडकरींना आता दिल्ली सोडता येणार नाही व त्यांना मास अपील नाही .
मुंडे, उद्धव ठाकरे, रामदास आठवले ,शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आत्तापासून प्रचार केल्यास १६०-१८० च्या आसपास जागा मिळण्यास अडचण येणार नाही. जोडीला योग्य रणनीती, प्रचार, नरेंद्र मोदींच्या सभा असा आराखडा असायला हवा.

<< हे अगदी खरं असलं तरी मला वाटतं इथे अमेरिकेत सुद्धा कोणी इलेक्शन लढवणारी व्यक्ती असंकाही म्हणायची हिंमत करणार नाही.>> अहो, मोदींचे विरोधक - विशेषतः काँग्रेसवाले - या पराभवातून जरा सांवरले कीं << चुनाव अलग है और देश चलाना अलग बात है >> हीच रेकॉर्ड लावणार आहेत , नेहमीच लावतात, कारण राज्यकारभार करणं ही त्यांची पिढीजात मक्तेदारी आहे असंच त्याना वाटतं; मोदीनी आधींच असं बोलून काँग्रेसची बोलतीच बंद केलीय, असंच म्हणावं लागेल !

<< मोदींनी आपल्या रफ टफ इमेजशी प्रामाणिक राहावे,>> प्रत्येक माणसाचा एक इमोशनल धागा असतो जसा अडवानींचा अटलजींशी आहे आणि मोदींचा अडवानींशी.

जसे ह्या भाषणात मोदीजी म्हणाले की पाच पिढ्या हा दिवस पहाण्यासाठी खपल्या आहेत. त्यांचे कष्ट आणि चिकाटी याचा सन्मान करताना कोणी भावनाविवश न झाला तर नवल.

इतके झाल्यावर आता मोदी हिटलर होऊ शकत नाहीत याची खात्री लगेच होणार नाहीत पण अनेकांची या दिशेने विचार करण्यासाठी वाटचाल सुरु व्हायला हरकत नाही.

ज्या पध्दतीने मोदींच्या निवडीवर अडवानींनी गोंधळ घातला आणि निकालानंतर सुध्दा जी प्रतिक्रिया दिली यावरुन मोदी त्यांना ह्या प्रसंगी त्यांची जागा दाखवु शकले असते. पण तस न करता त्यांनी प्रत्येक वेळी पायाला स्पर्श करुन आदर दर्शविला. हा आदर दर्शविण्यासाठी जे मुळच सह्रदय असण आवश्यक असत. एखादा निर्दयी माणुस कुणाच्या वारंवार पाया पडु शकत नाही. ( अडवानी असे का वागले हा वेगळा विषय आहे ).

हीच गोष्ट त्यांनी केशुभाई पटेलांच्या बाबतीत केली. दोन वेळा ते विधानसभा जिंकल्या बरोबर लगेच केशुभाईंना भेटायला गेले होते. त्यांच्या वयाचा मान राखुन पाया ही पडले होते. गुजराथच्या विकासासाठी त्यांनी सहकार्य मागीतले होते. त्यातल्या एका वेळेला तर केशुभाई पटेलांनी वेगळी पार्टी बनवुन त्यांच्या विरोधात प्रचार केला होता.

आपल्या विरोधकांना जर संपवायचे असते तर केशुभाई २०१२ नंतर आपला पक्ष विसर्जीत करुन पुन्हा भाजप मध्ये आले नसते.

एखादा माणुस आक्रमक भाषणे करतो आणि विरोधकांना न घाबरता आक्रमक कृती करतो म्हणजे तो रफ आणि टफ कायमच असतो असे मानणे योग्य नाही तसेच तो मनमोहनसिंगा सारखा सर्वच प्रसंगी मवाळ आणि कृतीहीन होईल असेही समजणे बरोबर असणार नाही.

भाऊ Lol अजून एक नमुना शब्द कसे फिरवायचे त्याचा.
मोदींनी ते आधीच वापरुन बेसिकली हे क्लॅरिफाय केलं की निवडणुकांमध्ये आम्ही रुलिंग पार्टीचे दोष दाखवणार आणि रुलिंग पार्टीचे काम आहे ते दावे खोडून काढून जनतेला खरं काय ते दाखवणे. पुढे एकदा सरकार आली की आम्ही तुम्हाला योग्य ते महत्व देऊन देश नीट चालवणार आणि असाच देश चालवायचा असतो असलं एकदम सडेतोड उत्तर दिलं ते ऐकायला मजा वाटली.

>> एखादा निर्दयी माणुस कुणाच्या वारंवार पाया पडु शकत नाही

मी मोदींना आणि एकूण भाजप चित्राशी फार परिचीत नाही पण एक चांगला राजकारणी तो चांगला अभिनेता असतोच तो हे करू शकणार नाही का दिखाव्यासाठी असा एक प्रश्न पडला वाचून ..

मोदींनी रडायचे नाटक केले आहे वा ते पाषाणह्रदयी आहेत असे इथे कुणीच म्हणत नाहीए ,भूज भुकंपग्रस्तांच्या इथे एका सभेत बोलताना मोदी वाजपेयींसमोर ढसाढसा रडले होते.साल होते 2001.

<राहिली क्लिन चिट ची गोष्ट जेवढ्या दंगली काँग्रेसने केल्या तेवढ्यात गोध्रा पेक्षा जास्त माणसं मेली आहेत. इनफॅक्ट मोदी सत्तेत यायच्या आधी गुजराथ मध्ये काँग्रेस असताना खूप मोठी दंगल झाली होती, हजारो माणसे मेली. गुजराथला दंगलीचा इतिहास २००२ पर्यंत होता. त्यानंतर (गोध्रा) २०१४ पर्य्म्त एकही दंगल झाली नाही ह्यातच सर्व आले नाही का? स्टेट स्पॉन्सर्ड टेररीझम मध्ये काँग्रेस, भाजपापेक्षा पुढे आहे. (मृताचा आकडेवारीत) ही फॅक्ट आहे.>

Apalled at reading this. अशा आशयाची विधाने यापूर्वीही अनेक वेळा वाचायला मिळाली आहेत. पण तोवर त्यात गांभीर्याने घ्यावे असे काही वाटले नव्हते. ती प्रचारकी थाटाची विधाने म्हणून सोडून दिली होती. पण आता अभ्यासू, रॅशनल, इ.इ.बिरुदे लावली जाणार्‍या व्यक्तीकडून ती लिहिली गेली. त्यामुळे लिहावे लागत आहे.

१) गुजरातमधल्या २००२ पूर्वीच्या आणि नंतर किंवा आधीच्या दंगलींमुळे गुजरातेत २००२ मध्ये जे झाले ते क्षम्य ठरते का? अगदी १९८४ ची तुलना केली तरी? हे दाखले देऊन अप्रत्यक्षरीत्या मोदींना दिले जाणारे २००२ दंगलींचे दायित्व त्यांचे समर्थक मान्यच करतात हेही त्यांच्या लक्षात येऊ नये?

२) कॉंग्रेस आणि स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम हे दोन शब्द १९८४ चा अपवाद केला तर एकत्र आल्याचे पाहिलेले नाही. वरच्या परिच्छेदात ते बिनदिक्कत एकत्र वापरलेले आहेत. शीख समुदायाचा द्वेष हा काँग्रेसच्या विचारसरणीचा भाग कधीच नव्हता. (कंसात मृतांच्या आकडेवारीत काँग्रेस पुढे आहे हे शब्द देऊन पळवाटेची सोय आधीच केलेली दिसते आहे.)

३) गुजरातेत २००२ पूर्वी कोणत्या मोठ्या दंगली झाल्या याचा शोध घेतला तर विकिपिडियावर दोन पाने मिळाली.१९६९ आंणि १९८५ च्या दंगलींसदर्भाने. तिथे काही संदर्भही दिसले. दोन्ही दंगलींसाठी
कोणाला जबाबदार धरले जाते याबद्दल विकी व अन्यत्र नोंदवलेली माहिती अत्यंत रोचक आहे. विकीवरची माहिती येत्या काही दिवसात बदलली जाईलही. पण तरीही अन्य खुणा राहतीलच.

४) २००२ च्या दंगलींचीच आठवण लोकांना अजून का येते? अन्यत्र झालेल्या कितीशा दंगली एका मोठ्या राज्याच्या बहुतांश भागात पसरल्या होत्या?

१) गुजरातमधल्या २००२ पूर्वीच्या आणि नंतर किंवा आधीच्या दंगलींमुळे गुजरातेत २००२ मध्ये जे झाले ते क्षम्य ठरते का? अगदी १९८४ ची तुलना केली तरी? हे दाखले देऊन अप्रत्यक्षरीत्या मोदींना दिले जाणारे २००२ दंगलींचे दायित्व त्यांचे समर्थक मान्यच करतात हेही त्यांच्या लक्षात येऊ नये?>>> २००२ मध्ये जे झालं ते क्षम्य नाही. ८४ मधे जे झालं ते होतं का? ८४ मधल्या संबंधीत लोकांना शिक्षा मिळाली का मंत्रीपदं मिळाली? तेव्हा काँग्रेसनं उत्तरदायित्व घेऊन कारवाई केली असती तर २००२ मधे मोदींविरूद्ध कारवाई करायला नैतिक बळ तरी मिळालं असतं. कदाचित 'मोदी' तिथंच संपले असते.

२) कॉंग्रेस आणि स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम हे दोन शब्द १९८४ चा अपवाद केला तर एकत्र आल्याचे पाहिलेले नाही. वरच्या परिच्छेदात ते बिनदिक्कत एकत्र वापरलेले आहेत. शीख समुदायाचा द्वेष हा काँग्रेसच्या विचारसरणीचा भाग कधीच नव्हता. >>>> मयेकर फक्त कुतुहल म्हणून विचारते, १९४८ साली जी दंगल झाली ते काय होतं? त्या दंगलीत जो समाज होरपळला, त्या समाजाचा द्वेष हा काँग्रेस विचारसरणीचा अप्रत्यक्षरित्या भाग नव्हता / नाही का? काँग्रेस मोदींच्या नावे खडे फोडते, पण जातीयवादाचं राजकारण काँग्रेसकडून कधीच झालं नाही का? सोलापूरात आणि गावी घरातली काही जेष्ठ मंडळी राजकारणाशी संबंधीत होती आणि त्यांनी सोलापूरातल्या काही बड्या लोकांबरोबर काम केलं आहे, त्यामुळे काँग्रेसनं जातीयवादाचं राजकारण कायमच खेळलं हे बिनदिक्कत म्हणू शकते. सुशिलकुमार शिंद्यांनी आत्ता निरोपाच्या भाषणात 'दलित गृहमंत्री' असा उल्लेख करायची काय गरज होती? गृहमंत्री हा देशाचा होता/असतो, कोणत्याही जातीचा वा समाजाचा नाही.

४) २००२ च्या दंगलींचीच आठवण लोकांना अजून का येते? अन्यत्र झालेल्या कितीशा दंगली एका मोठ्या राज्याच्या बहुतांश भागात पसरल्या होत्या?>>> ४८, ८४ आणि २००२ या दंगलींची आठवण कायम येत राहणार. लोक विसरायचे म्हटले तरी राजकारणी विसरू देणार नाहीत. खपल्या काढून जखम वाहतीच राहिल याची व्यवस्थित काळजी घेतली जाइल.

गुजरात दंगल हा डाग मोदींवर कायमच राहणार आहे. ४८ दंगलीत सहभागी झालेले लोक काय नी पुढे ८४ च्या दंगलीला कारणीभूत असलेले काय किंवा २००८ मधे मुंबई हल्ला झाल्यावर असंवेदनाशी वक्तव्य करणारे, कुठलंही ठोस काम न करणारे ... सगळे सहीसलामत सुटले, नंतर मंत्रीपदंही भूषविली, पुन्हा जातीचं धर्माचं राजकारण करायला मोकळे झाले.... आता जागतिकीकरणाची समिकरणं वेगात बदलत असताना स्पर्धेत नुसतं टिकायचंच नाही तर देशाचं वेगळं स्थान निर्माण करायचं असताना पुन्हा त्याच त्याच गोष्टी उगाळायच्या का आता देशाचा पंतप्रधान निवडून आला असताना काही ठोस कामं करायची? या वादाला अंत नाही हे माहित आहे. पण अगदीच रहावलं नाही म्हणून लिहीले.

दंगलीचे पुन्हा कशाला मधे आणावे आतापण.. कितीतरी वेळा न संपणारी चर्चा झालीये ह्यावर आणि दोन्ही बाजु तेचतेच बोलतात की दरवेळी.
भाषण टीव्हीवर ऐकले आज. मोदी कोणाला नावे न ठेवता पुढेच पहात आहेत हे उत्तमच.

अरे इथेही काय पक्षीय राजकारण करताय राव?

त्या माणसाला एक वर्ष तरी व्यतीत करूदेत त्या पदावर?

मनमोहन सिंगांसारखा राजकारणातला राजेंद्रकुमार किंवा मनोजकुमार पाहायची सवय लागल्यामुळे नसिरउद्दिन शहा पाहण्याचा वकूब राहिलेला नाही लोकांचा हेच खरे! दुर्दैवी!

मनमोहन सिंगांसारखा राजकारणातला राजेंद्रकुमार किंवा मनोजकुमार पाहायची सवय लागल्यामुळे
>>>> Lol

त्या माणसाला एक वर्ष तरी व्यतीत करूदेत त्या पदावर?

मनमोहन सिंगांसारखा राजकारणातला राजेंद्रकुमार किंवा मनोजकुमार पाहायची सवय लागल्यामुळे नसिरउद्दिन शहा पाहण्याचा वकूब राहिलेला नाही लोकांचा हेच खरे! दुर्दैवी! >>

+१ बेफी. ह्या धाग्यावरही तेच ते चालू आहे. कंटाळा आला.

बुवांनी तो मुद्दा आणला, मी नाही हे आपल्या लक्षात आले नसावे. आणि काँग्रेस कालावधीत स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम फक्त एकदाच झाला असे आपले म्हणणे असेल तर असो, ते खरे असायलाच हवे असे नाही.

बायदवे मयेकर माझ्या मुळ धाग्यावर तुमची काय प्रतिक्रिया ती पण दिली असती तर बरे वाटले असते. ती शिताफीने टाळलीच. पण असोच !

अंजली +1

भावी पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या भाषणातील शब्द न् शब्द आतुन आलेला वाटत होता आणि म्हणूनच तो खूप खराही वाटला.
देशाला मातेसमान मानणार्‍या व हिंदी भाषेवर प्रभूत्व असलेल्या कुठल्याही प्रखर देशभक्ताला त्या ठिकाणी कॄपा हा शब्द खटकेलच! मोदींच्या बाबतीत, वरील दोनांच्या बरोबर आणखीन एक कारण की त्यांच्या मातोश्री हयात आहेत.
ह्या सगळ्या भावना एकत्रितपणे उचंबळून आल्यामुळे किंचीतशा बाहेर पडल्या. यात गैर काय आहे.
केदार हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद.

केदार, अंजली, बेफी यांच्या पोस्टींना +१००

काँग्रेस कालावधीत स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम फक्त एकदाच झाला असे आपले म्हणणे असेल तर असो, ते खरे असायलाच हवे असे नाही.<<<

केदार, हे तुम्ही मला उद्देशून म्हणत आहात का? माझे तसे काहीच म्हणणे नाही आहे. इतर कोणाला उद्देशून म्हणत असलात तर माझ्या ह्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करा. Happy

एखादा धुतल्या तांदळाच्या प्रतिमेचा पण मवाळ पंतप्रधान जर स्वतः भ्रष्टाचार न करतांही भ्रष्टाचार, निष्क्रियता व तीव्र सामजिक प्रश्नांबाबतचं औदासिन्य बोकाळायला कळत नकळत कारणीभूत ठरत असेल व देश त्या पंतप्रधानाला व त्याच्या पक्षाला वर्षानुंवर्षं सहन करत असेल, तर एखाद्या घटनेमुळे कांहीशी डागाळलेली प्रतिमा असलेला पण 'मिशनरी झील'ने देशाच्या विकासासाठी आतां झटायला कटिबद्ध असलेल्या तडफदार पंतप्रधानाला तो डाग पुसून टाकण्याची संधी देशाने नाकारावी का ? भ्रष्टाचारामुळे, स्वार्थी राजकारणामुळे होणारं सर्व थरातील जनतेचं मानसिक खच्चीकरण दंगलींमुळे होणार्‍या खच्चीकरणापेक्षां कमी दर्जाचं व कमी हानीकारक आहे का ? घोटाळ्यासाठी तुरुंगाची हवा खाल्लेले व तरीही ताठ मानेने मिरवणारे लालू, ज्यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत असे नैतिकतेचीं भाषणं ठोकत फिरणारे घोटाळ्यात अडकलेले मंत्री/ मुख्यमंत्री यांचा समाजमानसावर होणारा विपरीत परिणाम काय कमी घातक आहे ? हें सर्व थांबवण्याची आकांक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याची धमक व कर्तृत्व लोकाना मोदींमधे दिसतंय, हेंच निवडणूकीचे निकाल सांगतात.

कोणताही सुसंस्कृत व संवेदनशील माणूस कोणत्याच दंगलीचं कधींच समर्थन करणार नाही व ज्यामुळें असं होण्याची शक्यता असेल त्या गोष्टीला पाठींबाही देणार नाही. मोदीना सर्व थरातून मिळणारा भरघोंस पाठींबा म्हणूनच दंगलीतील त्यांच्या संशयास्पद भूमिकेतून बाहेर व खूपच वर आलेल्या व नि:संशय राष्ट्रसेवेसाठी तळमळणार्‍या त्यांच्या आतांच्या व्यक्तिमत्वालाच आहे. परत परत दंगलींचाच मुद्दा उपस्थित करून त्यांचं खच्चीकरण करण्याच्या प्रयत्नांऐवजी, त्याना मनापासून संधी देवून देशाचं हीत कितपत साध्य होतंय हें पहाणं शहाणपणाचं नाही का ?

Pages