सेंट्रल हॉल मधील मोदींचे पहिले भाषण !

Submitted by केदार on 20 May, 2014 - 07:49

modi_1.jpg

मोदींनी आज संसदेत पहिलेंदाच पाऊल ठेवले, . आज त्यांचे भाषण लाईव्ह ऐकले. जनरली मला भाषणात फार इंन्ट्रेस्ट नसतो पण पहिल्या दोन मिनिटांनंतर भाषण ऐकतच राहिलो. काही महत्वाचे मुद्दे.

१. मोदींना पहिलेंदाच इमोशनल पाहिले.
२. त्यांनी आधीच्या सरकारला अजिबात नावे ठेवली नाहीत, तर जे जे काही झाले आहे त्यापुढे भारतमातेला कसे न्यायचे ते पाहूयात असे ते म्हणाले.
३. जनतेने टाकलेल्या जबाबदारीची जाणिव त्यांचा भाषणातून येत होती.
४. सर्वांना विकास हवा आहे, तर विकासात सर्वच जणांचा सहभागही हवा. सर्वांसोबत सर्वांचा विकास !

यु ट्युब -

भाग १

भाग २

अजून बरेच मुद्दे आहेत जे नेटवर सहज मिळतील.

भाषण झाल्यावर मी चॅनल सर्फ करत होतो, ABP news वर भाषणाचे रेटिंग ( अगदी अमेरिकेत होते तसे) चालू होते आणि बहुतेक सर्वांनी १० पैकी १० (काहिंनी ८-९) मार्क दिले.

खूप दिवसांनी एका नेत्याचे भाषण ऐकले ही फिलिंग मात्र नक्कीच आली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसांनी एका नेत्याचे भाषण ऐकले ही फिलिंग मात्र नक्कीच आली. > +१

<< आजचं पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीतलं मोदींचं भाषण तरी एका आत्मविश्वास व निर्णयक्षमता असलेल्या, मुत्सद्दी व परिपक्व नेत्याच्या हातात देशाने सूत्र हवाली केलीत याचं आश्वासन देणारं होतं. [ बरीच वर्षं कागद समोर ठेवून वाचावं अशीं मरगळ निर्माण करणारीं भाषणं ऐकून वीट आला होता; कुणीं तरी उत्स्फुर्तपणे, जोषपूर्ण पण नम्रपणे, कांहींतरी भरीव करून दाखवण्याची उत्साही भाषा करतोय व त्यासाठी सर्वाना आवाहन करतोय, हें ऐकूनच जनताजनार्दनाचा कौल योग्य बाजूनेच पडला आहे असं वाटतंय. देव करो अन हें खरं ठरो !! ] >> भाऊ अगदी योग्य विश्लेषण Happy

भाऊ तुमच्या पोस्टी आवडल्या. अनुमोदन. अंजलीच्याही आवडल्या.
मोदींच्या भाषणातले सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे व इतर बरेच मुद्दे आवडले.

ज्या लोकशाहीने इतकी वर्षे घराणेशाही पोसली त्याच लोकशाहीने आज एका गरीब घरातल्या चहावाल्याला देशाच्या सर्वोच्च नेतेपदी बसवले. कालच्या भाषणाने माझ्या मनात खुप आशावाद निर्माण केला. >>>> +१

भारतात चांगले बदल घडायची ही नांदी ठरो. मोदींना खूप शुभेच्छा !

मला एक गंमत वाटते; समोर भाषणाचा कागद ठेवून निर्विकार चेहर्‍याने व निर्जीवपणे तें वाचलं, कीं तें भाषण खरं व प्रामाणिक आणि उत्स्फुर्तपणे, भावनिक ओलावा असलेलं भाषण केलं कीं तें सवंग, अप्रामाणिक, असं आपल्या देशात समजलं जातं कीं काय व कधींपासून ? ओबामानीं शपथ घेताना असं उत्स्फुर्त भाषण केलं तर त्याचं जगभर - आपल्या देशातही - काय कौतुक, पण मोदीनी तसं केलं तर तें मात्र ढोंग ? कां आपल्याला खुलेपणात, भावनिक ओलाव्यात, नेहमी दांभिकपणाच दिसतो ? अगदीं नेहरू, राजगोपालाचारी, जयप्रकाश ते वाजपेई यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांची भाषणं ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. बैठक बौद्धीक असली तरी त्यांच्या भाषणांत उत्स्फुर्तपणा, खुलेपणा, भावनिक ओलावा असायचाच व तोच आश्वासक वाटायचा. नेहरूंचं स्वातंत्र्याच्या पहाटेचं 'Tryst with destiny' हें गाजलेलं भाषण हें एकच उदाहरण यासाठीं पुरेसं आहे. आतां बहुतेक वेळां दुसर्‍या कुणीतरी लिहून काढलेलं भाषण रटाळपणे वाचलं जातं तेंव्हा तर मला हा फरक प्रकर्षने जाणवतो.
मोदींचं सेंट्रल हॉलमधील पहिलं भाषण म्हणून मला विशेष भावलं !

भाऊ सुरेख आणी नेमकी पोस्ट. तुमचे प्रतीसाद मला नेहेमीच आवडतात. अशोकमामान्प्रमाणे तुमची भाषा शैली पण दुसर्‍याचा आब राखणारी आहे.:स्मित:

भाऊ तुमच्या सगळ्या पोस्टीना अनुमोदन …. मला मोदीजींचे भाषण आवडले ते त्यांच्या positivness मुळे त्यांच्यामुळे देशाला एक खंबीर नेतृत्व मिळेल अशी आशा आहे

कां आपल्याला खुलेपणात, भावनिक ओलाव्यात, नेहमी दांभिकपणाच दिसतो ?<<<

भाऊसाहेब, हा प्रॉब्लेम सर्व भारतीयांचा नाही आहे. हा प्रॉब्लेम प्रामुख्याने मराठी माणसाचा आहे.

भाषण त्यांच्या शोमनशिपचा उत्तम नमुना होता, आणि त्यात वावगे काही नाही. राजकारण परसेप्श्नचा, इमेजचा खेळ आहे, मोदींना तो उत्तम जमतो. १० वर्षापूर्वी सोनियाचे 'आतल्या आवाजा' वाले भाषणही त्याच प्रकारात येते.
दंगलखोर मुस्लिमद्वेष्टे आणि धडाडीचे विकासपुरुष ह्या मोदींच्या दोन प्रतिमांपैकी बहुमताने आजतरी दुसरी प्रतिमा उचलून धरली आहे. 'वी गेट व्हॉट वी डिझर्व्ह' असे एक इंग्रजी सुभाषित आहे. आता मोदींना निवडून दिल्याने आपण विकास डिझर्व्ह करतो की दंगल ते कळायला थोडा वेळ तर जाऊद्या!

भाषण त्यांच्या शोमनशिपचा उत्तम नमुना होता, आणि त्यात वावगे काही नाही. राजकारण परसेप्श्नचा, इमेजचा खेळ आहे, मोदींना तो उत्तम जमतो.<<<

दंगलखोर मुस्लिमद्वेष्टे आणि धडाडीचे विकासपुरुष ह्या मोदींच्या दोन प्रतिमांपैकी बहुमताने आजतरी दुसरी प्रतिमा उचलून धरली आहे. 'वी गेट व्हॉट वी डिझर्व्ह' असे एक इंग्रजी सुभाषित आहे. आता मोदींना निवडून दिल्याने आपण विकास डिझर्व्ह करतो की दंगल ते कळायला थोडा वेळ तर जाऊद्या!<<<

पटले. सहमत आहे.

१. मोदिंचे भाषण आवडले. मुद्दे चांगले होते.

२. त्यांचे 'कृपा' शब्दावर भावनिक होणे आणि आत शिरतांना संसदेच्या पाया पडणे हे दिखाऊ होते कि खरे माहित नाही पण लोकांना आवडून गेले हे नक्की.

३. हे सरकार गरीबांसाठी आहे हे ठिक आहे.
पण काँग्रेसने 'गरीबी हटाव' मुद्दा असावा म्हणून जाणीवपुर्वक पोसलेली 'गरीबी' आतातरी कमी व्हावी (अर्थात ती ५ वर्षात होईल अशी काही भाबडी आशा मनात नाहीये) अशी इच्छा आहे. किमान दारिद्र्यरेषेखालची गरीबी कमी व्हावी (आणि अर्थव्यवस्थेत ज्याला 'रिलेटिव्ह पॉव्हर्टी' म्हणतात तिच उरावी) अशी इच्छा आहे.

४. मोदिंची खुप भाषणे ऐकली. अगदी मनापासुन ऐकली. आता त्यांचे काम बघण्यास उत्सुक आहे. होप सो कि त्यांचे काम २६ नंतर लगेच सुरु होईल.

५. मोदी सरकार आले कि ५ वर्षात आपण अगदी महासत्ता बनू अशी भाबडी आशा नाहीये. आधीची भ्रष्टाचार इ. कीड उपसायला ५ वर्ष सहज जातील. पण निदान मोदिंनी हा कचरा साफ केला तर माझं पुढचं मत मोदिंनाच.

६. कालच्या भाषणात ते हे सरकार स्त्रीयांसाठी आणि तरुणांसाठी असं म्हणाले. तरुणांना रोजगार वै. अपेक्षित असेल. पण स्त्रीयांसाठी ते काय करतात हे पाहायला मी खुप उत्सुक आहे. कारण स्त्रीयांसाठी कायदे ऑलरेडी आहेत. त्यांची अंमलबजावणी हाच मोठा प्रॉब्लेम आहे. शिवाय समाजातील स्त्रीयांचे स्थान उंचावण्यासाठी ते काय करतील हेही पाहायचे आहे.

७. अडवाणींचे आधीचे वागणे पाहाता मोदिंना त्यांना इथे शाब्दिक फटके देणे सहज शक्य होते. पण त्यांनी ते सारे विसरुन अडवाणींविषयी चांगलेच बोलणे हे त्यांच्या 'लुकिंग अ‍ॅट दी बिगर पिक्चर'ची जाणीव करुन गेले.

* माझी माबोकरांना विनंती आहे कि त्यांनी भाषणासाठी धागा काढला तसाच मोदींनी पंप्र झाले कि 'मोदी इफेक्ट' किंवा 'मोदी-प्रत्यक्ष कृती' नावाचा एक धागा काढावा. ज्यावर आपण ५ वर्ष मोदी ज्या ज्या सुधारणा आणतील, ज्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी करतील (प्रत्यक्ष कृती, भाषण नाही) त्या नोंदवुन ठेवु. चालेल का?

केवळ याच बाफबद्दल नाही, पण 'विकास' हा शब्द सर्वांनीच गेल्या काही दिवसांत इतका वापरला आहे, की ज्यांनी बहुमताने मोदींना निवडून दिलंय, तेच मतदार थोड्याच दिवसांत त्यांना नावं ठेवतील, अशी भीती वाटते आहे. कारण सगळ्यांना मतं बनवण्याची घाई फार आणि कृतीचे परिणाम लगेच दिसायला हवेत, अशी अपेक्षा. पेट्रोलचे भाव २५ रुपयांपर्यंत उतरतील, डॉलरमागे रुपयाचा भाव ३५ होईल, दोन महिन्यांत अहमदाबाद-दिल्ली बुलेट ट्रेन सुरू होईल इत्यादी इत्यादी अपेक्षा ऐकून-वाचून खरोखरच मोदींना जे काही करायचे आहे, ते करायला लोक आणि प्रसारमाध्यमं वेळ देतील का, ही भीती मला वाटते.

इथे ही पोस्ट अस्थानी वाटल्यास अनुल्लेख करा.

त्यांचे 'कृपा' शब्दावर भावनिक होणे आणि आत शिरतांना संसदेच्या पाया पडणे हे दिखाऊ होते कि खरे माहित नाही पण लोकांना आवडून गेले हे नक्की.

दिखाऊ पणा कुठेच दिसला नाही .. पियु ......:स्मित:

भाऊकाका, उत्तम पोस्ट्स!

मला राजीव गांधींचे भाषण आठवते. ते ऐकुनही थोड्याफार समजत्या वयात भारावून गेल्यासारखे आठवते आहे.
मला मोदीन्ची भाषणे/मुलाखती आवडताहेत.

बी, तुला वैयक्तिक काही म्हणायचे नाही पण तुही बरेचदा भावनिक वगैरे लिहीतोसच की इथे. ते आम्हाला आवडते मग कुणी म्हणालं की काय तो बी तद्दन भंपक लिहीतो आणि लोकांना ते आवडते... तर मला ते आवडणार नाही! Happy आता असं म्हनू नकोस की ते देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी अस भावनांचं प्रदर्शन करायला नको वगैरे त्यांनी भाषणात बरच काही सांगितलं आहे. बघ,जमल्यास परत एकदा ऐकून बघ!

<< 'वी गेट व्हॉट वी डिझर्व्ह' असे एक इंग्रजी सुभाषित आहे. >> ह्या सुभाषिताचा आवाका इतका मोठा आहे कीं बोकाळलेला भ्रष्टाचार, दंगली, 'नॉन्-गव्हर्नंन्स' इ.इ. सगळ्यासाठीच संबंधिताना आपापल्या सोईनुसार तें सुभाषित इतरांच्या तोंडावर फेंकता येईल; खरा प्रश्न असा आहे कीं, " डु वी रिअली डिझर्व्ह व्हाट वि हॅव बीन गेटींग ?" व त्याचं उत्तर आहे, चांगले पर्याय शोधून आपल्याला चांगले परिणाम मिळतात का हें पहाण्यात. मोदींचा पर्याय या दृष्टीने महत्वाचा आहे व त्याकडे औदासिन्यतेने पहाण्यापेक्षां आशादायक कुतूहलाने व जागरुकतेने पाहिल्यानेच वुई वील गेट व्हाट वुई रिअली डिझर्व !!

वत्सला +१

एकाच व्यक्तीचे खंबीर आणि भावूक असे दोन पैलू असू शकतात आणि ते माणूसपणाचेच लक्षण आहे. कुठलंही एक टोक असणं मात्र त्या व्यक्तीला आणि तिच्या संपर्कातील इतरांना त्रासाचं ठरु शकतं.

चिनुक्स.. पोस्ट अस्थानी नसावी. मलाही हिच भिती वाटते आहे.
मोदिंना आधीचा गाळ उपसायलाच बरेच दिवस/ महिने/ वर्ष जातील.

अरे..............किमान ६ महिने तरी होउ द्या........!!

आता पर्यंत भाषण ऐकले अनुभवले.. ...चांगले दिलेले.. आता काम देखील बघुया

रादर चिनूक्स तुझी पोस्ट अस्थानी नाही.

मी त्या लेखा जोखा बाफवर आणि इतरत्रही लिहिले आहे की मोदी जादूची कांडी नाहीत की ते एका दिवसात / महिन्यात / वर्षात सर्व बदलतील. आधीचे २-३ वर्ष हे अनेक पॉलिसीच चेंज करून अमंलात आणण्यात जातील. आणि नंतर शेवटच्या २ अडीच वर्षात त्याचे रिझल्ट दिसतील.

मोदींना प्रश्न विचारला होता की पहिल्या १०० दिवसात तुम्ही काय चेंज करणार? तर त्यांचे उत्तर योग्य होते की ५ वर्षानंतर पाहा, १०० दिवसात नाही.

गोल्डमन संस्था म्हणतेय की मोदी कदाचित डॉलर ४५ / ४८ मध्ये आणतील. गोल्डमन जेंव्हा म्हणते तेंव्हा तथ्य असेलच पण ते लगेच उद्या होणार नाही. ५ वर्ष वाट पाहावी लागेलच. निकालामुळे इकॉनॉमी रेटिंग बदलून ६.१ चे ६.६ ग्रोथ प्रोजेक्ट केली आहे वित्तीय संस्थांनी. इटस टू अर्ली दो.

नावडतीच मीठ आळणी अशी म्हण आहे. भारतात लोकशाही मार्गाने, विकासाच्या अजेंड्यावर, ठरवुन प्रतिमा काळी केलेली असताना, जातिय म्हनुन हिणवले असताना, भाजप आणि नरेंद्र मोदी बहुमत मिळवतात हे काहींना न पटण्यासारखे आहे ( हे पटण्यासारखे आहे ).

हा चमत्कार कसा घडु शकतो हे पहाण्यासाठीचे एक उदाहरण पाहु या. हा मुद्दा संदर्भ सोडुन आहे पण भाषणाच्या मुद्यावर अश्या प्रतिक्रिया कशा येतात हे समजण्यासाठी मला आवश्यक वाटते.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मोदींच्या अभूतपूर्व यशामागच्या कारणांचा प्रचंड उहापोह होतोय. परंतु या यशासाठी झटणार्या लाखो अदृष्य हातांचा मात्र अभावानेच उल्लेख होतोय.
अर्थात हे हात प्रसिद्धीपासून नेहमी दूरच असतात .
गेले सहा महिने हे चाळीस लाख अदृष्य हात कसलाही गाजावाजा न करता अहोरात्र राबत होते..... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीस लाख स्वयंसेवकांचे हात.....
हे अदृष्य हात काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे मैसूरमधील भाजपचे यश.
मैसूर हा कॉंग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ. प्रत्यक्ष मैसूरचा राजाही इथे कॉंग्रेसविरूद्ध एकदा हरला होता . सध्या तर इथे भाजपचा एकही आमदार नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या मैसूरचेच आणि त्यांचा उजवा हात मानले जाणारे ए. एच. विश्वनाथ कॉंग्रेसचे उमेदवार.
निवडणुका महीन्यवर आल्या तरी भाजपला उमेदवारही मिळत नव्हता. स्वतः हून कोण आगीत उडी मारेल?
अखेर संघ पुढे सरसावला.
अवघ्या ३५ वर्षांचा निष्ठावान स्वयंसेवक प्रतापसिंह गौडा भाजपचा उमेदवार बनला. त्याची उमेदवारी जाहीर होताच कॉंग्रेसने जल्लोष केला. आपण कमीतकमी दोन लाखांनी जिंकणार अशी खात्री त्यांना पटली.
भाजप शहराध्यक्षांचा शहर संघचालकांना फोन गेला. या पोराला निवडून आणणं केवळ अशक्य आहे. आता तुम्हीच काय ते पहा.
संघाने प्रथम मतदारसंघाचे गणित मांडले. पंधरा लाख मतदारांपैकी सुमारे ६५ ते ७०% म्हणजे १० लाख मतदान करतील. विजयासाठी ५ लाख मते हवीत. मैसूरमध्ये भाजपचे २.५ लाख पारंपारीक मतदार आहेत जे कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मत देतात. म्हणजे अजून २.५ लाख मते हवीत.
गणित मांडून पाच हजार स्वयंसेवक शिस्तबद्ध रीतीने कामाला लागले. कसलाही गाजावाजा नाही की बडेजाव नाही. १८ ते ३५ वयोगटातील मतदार हे प्रमुख लक्ष्य. या तरूण मतदारांना मोदींचे आकर्षण होतेच फक्त ते कोणत्याही प्रलोभनास न भुलता भाजपलाच मतदान करतील हे सुनिश्चित करणे हे त्यांचे काम. त्यांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी हे स्वयंसेवक अहोरात्र झटले.
अखेर १६ मे उजाडला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत प्रताप २८ मतांनी आघाडीवर आहे हे ऐकून कॉंग्रेस आणि भाजप दोघांनाही धक्का बसला. आणि मग प्रत्येक फेरीत प्रतापची आघाडी वाढत गेली.
अशक्य ते घडले.
मुख्यमंत्र्यांच्या उजव्या हाताला एका पोरसवदा स्वयंसेवकाने ३१००० मतांनी हरवले. प्रतापला बरोब्बर ५ लाख १ हजार मते मिळाली.
याला म्हणतात संघाची मॅनेजमेंट.
विजयानंतर प्रताप थेट संघ कार्यालयाकडे धावला. हेडगेवार, गुरुजी आणि देवरसांच्या फोटोला नमस्कार करून भारतमातेच्या चित्रासमोर उभा राहीला आणि मनसोक्त रडला.
काही वेळात विजयी मिरवणूकीला सुरूवात झाली........
आणि गेला महीनाभर राबणारे १० हजार हात "इदं न मम" असं म्हणत पुन्हा एकदा अदृष्य झाले....
जनसेवेसाठी आणि राष्ट्रजागरणासाठी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

तुम्ही संघाला माना अथवा मानु नका . भाजप हा पक्ष आहे आणि देश घडवण्यामधे त्यांचा राजकीय सहभाग आहे. पण देश तर आपला आहे. सकारात्मक द्रुष्टिने पाहिलत तर ही संधी आहे देशाला पुढे नेण्याची. नकारात्मक द्रुष्टिने पाहिलत तर फक्त चर्चा/ प्रतिक्रिया आणि फलीत काहीच नाही.

डु वी रिअली डिझर्व्ह व्हाट वि हॅव बीन गेटींग >>> याचे उत्तर प्रत्येकाने आपापल्या विवेकबुद्धीला स्मरुन द्यावे हेच उत्तम. भ्रष्टाचार, दंगली, 'नॉन्-गव्हर्नंन्स तर फार मोठ्या समस्या आहेत, स्वतःच्या घरात ओला-सुका कचरा वेगळ्या डब्यात जातो का इतके जरी पाहिले तरी ती चांगली सुरुवात असेल.

आगाऊ अनुमोदन.

नितीनचंद्र +१

खरोखर संघपरीवार भाजपच्या मागे खंबीरपणे उभा होता हे सत्य नाकारुन चालणार नाही.
भाजपच्या यशात त्यांचा मोठा वाटा तर आहेच.
पण संघाचे हे हजारो हात अजिबात गवगवा न करता ज्याप्रकारे आपले काम चोख करतात त्याला खरंच सलाम !!!

<भारतात लोकशाही मार्गाने, विकासाच्या अजेंड्यावर, ठरवुन प्रतिमा काळी केलेली असताना, जातिय म्हनुन हिणवले असताना, भाजप आणि नरेंद्र मोदी बहुमत मिळवतात हे काहींना न पटण्यासारखे आहे ( हे पटण्यासारखे आहे ).>

नरेंद्र मोदी बहुमत मिळवतात यात न पटण्यासारखे काय आहे? पटलेले नाही असे कोणी लिहिले? म्हटले? निवडणूक निकालाच्या धाग्यावर त्यांचे अभिनंदनही केलेले आहे. फार कशाला मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच काँग्रेसनेव आपली हार स्वीकारलेली आहे; हेही मीच अन्य एका धाग्यावर लिहिलेले आहे. तेव्हा माझ्या विधानांचा विपर्यास केल्याने सुख मिळत असेल ते मिळो बापड्यांना.

मोदींचा कारभार पाहायला मीही उत्सुक आहेच. या धाग्यावर लिहायला कोणत्या गोष्टीने उद्युक्त केले त्याबद्दल पुन्हा लिहीत नाही.

आताचा हा बदल लोकशाही मार्गाने वगैरे झाला असा साक्षात्कार काहींना झाला. केवळ या वरच्या पोस्टच्या संदर्भानेच नव्हे, पण आताच्याव निवडणुका तेवढ्या लोकशाही मार्गाने झाल्या,( आधी त्यात गडबड घोटाळेच व्हायचे!), आताच भारतीय मतदार अचानक प्रगल्भ इ.झाला या गेल्या काही दिवसांत दिसत असलेल्या वाक्यांचाही कंटाळा आलाय.

मोदी पंतप्रधान होणार हे पाहून खरंच एक आशा जागृत झाली आहे मनात.

अंजली आणि भाऊंच्या सगळ्या पोस्ट्स आवडल्या.

चिनूक्सच्या पोस्टलाही अनुमोदन.

आगाऊ, आपापला खारीचा वाटा उचलणारी लोकं आहेत आपल्या आजूबाजूला. फक्त ओला-सुका कचरा वेगळा ठेवणारीच नाही, कुठलाही कचरा फक्त कचराकुंडीतच टाकणारी, प्लॅस्टिकच्या पिशव्या कमी/न वापरणारी,पाणी जपून वापरणारी, ट्रॅफिक रुल्स पाळणारी, कुणी क्रॉस करत असेल तर अंगावर गाडी घालण्याऐवजी थांबून जाऊ देणारी, अपघात पाहिल्यावर थांबून मदत करणारी, नियम पाळणारी, रांग लावणारी. पण रेटा खूप कमी पडतोय.

भारावून, व्यक्तीपूजा करुन का होईना पण देशोन्नतीची आस असलेल्या एखाद्या नेतृत्वामुळे प्रेरणा मिळून एकंदरितच लोकांच्या मानसिकतेत चांगला बदल घडला आणि त्या बदलाची त्यांना सवय लागली तर चांगलेच आहे. सवय लागणे महत्त्वाचे !

आपापला खारीचा वाटा उचलणारी लोकं आहेत आपल्या आजूबाजूला. फक्त ओला-सुका कचरा वेगळा ठेवणारीच नाही, कुठलाही कचरा फक्त कचराकुंडीतच टाकणारी, प्लॅस्टिकच्या पिशव्या कमी/न वापरणारी,पाणी जपून वापरणारी, ट्रॅफिक रुल्स पाळणारी, कुणी क्रॉस करत असेल तर अंगावर गाडी घालण्याऐवजी थांबून जाऊ देणारी, अपघात पाहिल्यावर थांबून मदत करणारी, नियम पाळणारी, रांग लावणारी. पण रेटा खूप कमी पडतोय. >>> +१

Pages