Submitted by shirodea on 20 June, 2008 - 06:50
मन्डळी नमस्कार!
मी आजच मायबोलीत सामिल झालो!
नाशिकला विजयनगर पन्चवटी मधे आमच्या घरी रुद्राक्शाची ५ झाडे फळान्नी बहरली आहेत. रोज सकाळी मोठी टोपली भरुन फळे काढत असतो.
आपण आमच्याकडे जरुर यावे हे आग्रहाचे आमन्त्रण. फोन करुन या. ९४२२२४५३००
अविनाश शिरोडे
गुलमोहर:
शेअर करा
अहो साहेब,
अहो साहेब, फोटो टाका की मग.
आणि टोपलीभर फळांचे काय करता रोज?
किती मुखी रुद्राक्ष आहेत तुमच्या झाडांवर?फोटो खरच टाका. वाट पाहात आहे.
साधना.
या
या विजयनगरला कसं यायचं बुवा
गोदेय
मायबोलीवर
मायबोलीवर स्वागत
आमच्याकडे
आमच्याकडे आत्तापर्यन्त ४, ५, ६, ७ आणि १० मुखी रुद्राक्ष आलेले आहेत.
आमच्याकडे येणार्या भाविकान्ना भगवान शन्कराचा प्रसाद म्हणुन रुद्राक्ष भेट देतो.
फोटो कसले बघता? प्रत्यक्षच पहाना.
जरुर या.
अविनाश
अविनाश शिरोडे, ३५, पंचवटी हौसिन्ग सोसायटी, विजयनगर, नवा आडगाव नाका, आग्रा रोड, नाशिक-३
औरन्गाबाद हायवे आणि आग्रा रोड्चे टी जन्क्शन.
घरावर पवनचक्की ही महत्वाची खुण.
अविनाश,
अविनाश, अहो, आम्हा नाशकात रहात नसलेल्या लोकांसाठी फोटो टाका इथे.
बापरे,
बापरे, नाशिककर आग्रह करण्यात एकदम जालिम. पण येणं जमणार नाही, तेव्हा कृपा करा आणि फोटो टाका.
एकाच झाडावर वेगवेगळे मुखी रुद्राक्ष येतात की प्रत्येकाची वेगळी झाडे असतात?
साधना.
फोटो कालच
फोटो कालच टाकलेत की. कुठे हरवलेत?


एकाच झाडावर वेगळ्यावेगळ्या मुखी फळे येतात.
आमच्याकडे
आमच्याकडे नाशिकला रुद्राक्षाची झाडे असायचे कारण म्हणजे आमचे कैलास मानससरोवर यात्रेचे पुण्य. त्याविषयी पुढे केव्हातरी. आता कैलासाचे दर्शन घ्या.




बोरासारखी
बोरासारखी फळे दिसताहेत,
कशी असतात ही फळे? वरती साल, आत गर आणि त्याखाली रुद्राक्ष असे? आणि मग फळ सुकायची वाट पहावी लागते?
कैलासाचे फोटो पण छान आहेत. यात्रेविषयी सवडीने लिहा.
साधना
होय!
होय! मोठ्या बोरासारखी (सामबोर) असतात. पुर्ण वाढ झाल्यावर पिकतात तेव्हा गर्द निळ्या रंगाची होतात. वार्याने, स्वता:च्या वजनाने खाली पडतात. पण आम्ही रोज गच्चीवर जाउन तोडुन आणतो व गोळाही करतो. वरती साल, आत गर आणि त्याखाली रुद्राक्ष असेच असते. पाण्यात ओले करुन कुस्करुन वरची साल निघते. गर काढल्यावर गोल रुद्राक्ष मिळतो. त्याच्या ओबढधोबड भागावर गर असतो तो ब्रशने खरडुन काढावा लागतो. भगवान शंकराची कमाल म्हणजे रुद्राक्ष खुप कडक असतो पण त्याच्या व्हर्टिकल ऍक्सिसला होल करायची सोय असते. देवाने त्याची स्वता:च काळजी घेतली आहे.
हि झाडे
हि झाडे बघायची खुप ईच्छा आहे. बघुया त्या बाजुचा ट्रेक केला तर नक्की भेट देउ.
तो पर्यंत माझ्या बहिणिस नंबर / पत्ता दिला आहे तुमचा. तीचा मुक्कम सध्या नाशकात आहे. ती चक्कर मारेलच
गेल्या
गेल्या जानेवारीत कार्य पुर्तीसाठी नाशिकला गेलो होतो.त्यावेळी कल्पना असतीतर ऩक्कीच आलो असतो. बा़की कैलास पर्वताचे सुन्दर फोटो आहेत्.त्याबद्दल जरुर लिहा.उत्तराखन्डातुन गेला असाल तर ओम पर्वताचाही फोटो असेल नाही?
हा घ्या ओम
हा घ्या ओम पर्वताचा फोटो!

झाड बघायची
झाड बघायची इच्छा आहे. पण नाशिकला यायला नाही हो जमणार.
ही झाड तुम्ही कशी लावलीत? काही इतिहास द्या ना.
म्हणजे कशी, कधी, हवामान, पाणी, किती दिवस लागतात फळ यायला, वगैरे वगैरे
मायबोली
मायबोली झिंदाबाद!
आज चक्क मायबोलीवरचा रुद्राक्षाचा मजकुर वाचुन एक पुर्ण कुटुंब झाडे पाहायला आलीत. पुणे-ठाणे-नाशिक असा या बातमीचा प्रवास होता.
१९९६ साली आम्ही कैलास्-मानससरोवर यात्रा भारत सरकारतर्फे पायी केली. (३८५ किलोमिटर हिमालयातला अत्यंत अवघढ ट्रेकच). माझा नेपाळला प्रोजेक्ट चालु होता. त्यासाठी सारखे जाणे असायचे. यात्रेनंतर नेपाळहुन १५ रोपे आणली होती. ५ माझ्या घरी लावलीत. १० वेगळ्यावेगळ्या गावांना नातेवाईक व मित्रांकडे दिलीत. आश्चर्य म्हणजे फक्त माझ्याकडेच रोपे लागली. ईतर कुठेहि लागली नाहित. भगवान शंकराचे आम्हि लाडके आहोतच.
२००२ म्हणजे ६ वर्षांनी पहिल्यांदा फळे यायला सुरुवात झाली. पहिल्या वर्षि फक्त २१ लहान फळे आलित. नंतर मात्र दर वर्षी फळांची संख्या व आकार वाढतच गेला.
आम्ही आजपर्यंत पाणी देण्यापलिकडे काहीही केले नाही. खत नाही, औषध नाही, काहीच नाही.
साधारणतः ९५% फळे ५ मुखी, २% ४ मुखी, २% ६ मुखी आणि चुकत माकत वेगळे.
मागच्या वर्षी २ फळे ७ मुखी (लक्ष्मी) व २ फळे १० मुखी (नारायण-विष्णु) अशी आलीत.
या वर्षी अजुन processing सुरु केले नाही. पाहुया भगवान शंकर काय प्रसाद देतो ते.
अविनाश
अविनाश वरील फोटोमधून तुमची पुण्याई दिसून येत आहे. माहिती बद्दल खूप धन्यवाद.
उपक्रमास अनेक शुभेच्छा.
मला देखिल
मला देखिल हि झाडे पहायचि आहेत.
ओम
ओम पर्वताचा फोटो तुम्ही काढलाय? ओम अगदी स्पष्ट दिसतो आहे.
अविनाश
अविनाश मन:पूर्वक धन्यवाद!
आजपर्यंत रुद्राक्षाच्या झाडांबद्दल कुतुहल होते. आपण दिलेल्या माहिती आणि फोटोबद्दल धन्यवाद.
मला सुद्धा रुद्राक्षाचे झाड पहावयाचे आहे.
रुद्राक्ष
रुद्राक्षा बरोबरच, तुमच्या इतर आवडी-निवडी, तुमचे सुरेख घर आणि तुम्ही जमवलेल्या विविध वस्तु आणि तुमचे आदरतिथ्य यांचे बरेच कोउतुक आत्ताच ऐकले.
.
आता रुद्राक्षा बरोबर शिरोडे कुटुंबियांना पण भेटण्याची उत्सुकता आहे.
होय! ओम
होय! ओम पर्वताचा फोटो मीच काढलाय! या सबंध यात्रेचे व्हिडियो शुटिंगही केले आहे. त्याच्या ३ सिडि आहेत. मायबोलीवर कश्या टाकायच्या?
यात्रेचे प्रवास वर्णन लिहायला सुरुवात केली आहे. उद्यापासुन क्रमशः येइल.
अरे वा,
अरे वा, लवकरच नाशिक दौरा ठरवायला हवा...
मला
मला रुद्राक्षाचे रोप लावायला आवडेल!

...;
आपला, लिम्बुटिम्बु
अहो
अहो लिंबुटिंबु,
तुम्ही जर आमच्यावर वाघ सोडला तर आम्ही काय बरं सांगणार?
त्या वाघाला रुद्राक्षाच्या झाडाखाली येवु द्या, कसा शांत होतो ते बघाच!
रोपे आमच्याकडे तरी तयार होत नाहित (खुप प्रयत्न करुन पाहिलेत).
व्वा!! आजच पाहिला हा धागा!
व्वा!! आजच पाहिला हा धागा!
रुद्राक्षाचं झाड नाशकात आहे या गोष्टीनेच हुरळुन गेले आहे.
नाशिकला नेहमी चक्कर होत असतो.
झाडं बघण्याच्या उत्सुकतेपोटी नक्की येउन जाईन.
रुद्राक्षांच्या फळांचा,
रुद्राक्षांच्या फळांचा, फुलांचा सिझन कोणता?
अतीशयच वेगळा धागा
अतीशयच वेगळा धागा
आमच्याकडे पण रुद्राक्षाचे झाड
आमच्याकडे पण रुद्राक्षाचे झाड आहे, माझ्या सासर्यांना त्यांच्या मित्राने भेट दिले होते.
अजुन फळं धरली नाहीयेत, पण रुद्राक्षाच्या झाडाची फांदी लागते, साबांनी लावली होती तेही झाड आलेय.
आजपर्यंत रुद्राक्षाच्या
आजपर्यंत रुद्राक्षाच्या झाडांबद्दल कुतुहल होते. आपण दिलेल्या माहिती आणि फोटोबद्दल धन्यवाद.
मला सुद्धा रुद्राक्षाचे झाड पहावयाचे आहे.>>>>+१
Pages