निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज झरबेरा कडून.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
जिप्सी हा वाडा संहिता मध्ये
जिप्सी
हा वाडा संहिता मध्ये पण होता का रे
पाहिल्यासाराखा वाटतोय !
मेपल = चिनार मेपल सिरप ..
मेपल = चिनार
मेपल सिरप .. मेरा फेव , पॅन केक बरोबर..
चिनार सिरप...
गोपिका, कवी लोकांना
गोपिका, कवी लोकांना कायच्याकायच आणि काहीहि वाट्तं न् दिसतं.
जे न देखे रवी, ते देखे कवी म्हण्तात ते उगीच नाही
मेपलचे झाड खरे तर छान
मेपलचे झाड खरे तर छान प्लानिंग करते. एवीतेवी हिवाळ्यात पाने झडणारच असतात ( सूर्यप्रकाश नसल्याने त्यांना कामही नसते ) म्हणून ते झाडातील साखर परत खोडात घेते. खोडांना भोक पाडून हा सिरप गोळा केला जातो. हिरवा , पोपटी, पिवळा, लाल , सोनेरी अशा क्रमाने ही पाने रंग बदलतात.
ओह छान माहिती सांगितलीस
ओह छान माहिती सांगितलीस दिनेश,
आत्तापर्यन्त मेपल सिरप म्हंजे काय याचा विचार ही केला नव्हता कधी..
मेपल सिरप..
http://www.youtube.com/watch?v=WluCeKq_drc
सुप्रभात!!!! पूरबी सूर्य
सुप्रभात!!!!
पूरबी सूर्य उदेला जी
उडती पंछी आकाशी, घागरी पाणोठ्यापाशी
दूर नदीवरी वेणु रुणझुण घुंगरमाळा जी
प्राणांतून प्रार्थना कपाळी कुमकुम लावून जी
जात्यावर घरघर देवालय मृदुंग झाला जी
(कवी: ना. धों. महानोर)
सुप्रभात हे माझ्या कुंडीतल
सुप्रभात
हे माझ्या कुंडीतल जाईच फूल !
मस्तच जाई, जाई
मस्तच जाई, जाई
वॉव जाई की ब्यूटीफुल जाई
वॉव जाई की ब्यूटीफुल जाई
जाई , जाई सुंदर !!
जाई , जाई सुंदर !!
थँक्स दोस्त लोक्स !! वर्षू तै
थँक्स दोस्त लोक्स !! वर्षू तै
अहा.. आल्या आल्या 'जाई'चं
अहा.. आल्या आल्या 'जाई'चं फुल! सुगंध इथपर्यंत दरवळला जाई!!
आर्या तै
आर्या तै
सुप्रभात!!!! सगळीकडे
सुप्रभात!!!!
सगळीकडे कावळ्यांची घरटी बांधलेली आहेत. काही ठिकाणी बाळंतपणे सुद्धा झाली आहेत. पिले थोडी मोठी झाली आहेत. पण काही कारणाने एखादे पिलू खाली पडते. मग बाकीचे मोठे कावळे काव काव करून उच्छाद आणतात. अशा पिलाला पुन्हा त्यांच्यात स्थान नसते.
१६ मे च्या संध्याकाळी असेच एक पिलू गटाराजवळ पडलेले होते. सोसायटीतले सगळे बाळ-गोपाळ "कोकिळेचे पिलू" म्हणत कल्ला करत होते. झाडावर मोठे कावळे काव काव करत होते. ते पिलू घाबरले, सरकत सरकत गटाराच्या फटीत गेले. माझा नवरा तेथेच होता. घरी फोन करून मल्हारला विचारले "कोकिळेचे पिलू आहे. rescue साठी आणू का?" मग ते पिलू घरी आणले.
घरी पक्षांचा पिंजरा आणलेला आहे. त्यात हे कावळ्याचेच पिलू ठेवले. त्याला थोडे उडता येत होते. ओरडता येत होते. त्याला मध-पाणी पाजले. पाजताना हातात धरले तर पिलाला ग्रिप फार छान होती. (हे सगळे मल्हारने केले). ईतर कावळे / कबूतरे खिडकीत येऊन ओरडत असायचे. कदाचित त्यांना कळत होते की एक पिलू या घरात आहे. आजीचा रोष पत्करून दोन दिवस देखभाल केली. ( कावळा घरात ? एकदम अशुभ!!) मग त्याला संध्याकाळी थोडा अंधार झाल्यावर आवारातील एका झाडावर सोडून दिले. पुढे त्याचे काय झाले कळायला मार्ग नाही.
नमस्कार निगकर्स. एक आठवडा
नमस्कार निगकर्स. एक आठवडा कोकणात जाउन आले. भरलय कोकण मेवा नी आंब्यांनी. फोटो काढायला आजीबात जमले नाही. फेबु वर गणपती पुळेचे आहेत जरा तेवढेच.
हुश्श इथलेही वाचुन झाले सर्व.
बर मला एक सांगा, मोठ्या
बर मला एक सांगा, मोठ्या लेकाला कुत्रा चावलाय तिकडेच. इंजेक्शन सुरु आहेत. अजुन काही काळजी घ्यावी लागते का? काय?
कुत्रा रस्त्यावरचा होता व त्या दिवशी टोटल ७ मुलांवर हल्ला केला त्याने. मुलाला बर्याच डीप जखमा झाल्यात, डॉककडे पण नेलेय, त्यांनी स्ट्राँग अॅन्टीबायोटीक्स दिलेत. आता जखमा सावळल्या आहेत बर्याचशा. पण अजुन काय काळजी घ्यावी लागते? व किती दिवस?
जिप्सी, फोटोबरोबर एक सुंदर
जिप्सी, फोटोबरोबर एक सुंदर कविता पेश करता क्या बात है.
जाई, जाई मस्त.
मधु एकदम टचिंग.
आईग मोनालीप, वाईट वाटलं ग. काळजी घे. होईल लवकर बरा तुझा मुलगा. पण त्या कुत्र्याने एवढा उच्छाद मांडला, इतक्या जणांवर हल्ला केला, बापरे.
मोनालिप.. खूप वाईट वाटलं..
मोनालिप.. खूप वाईट वाटलं.. त्या इंजेक्शन्स चा इफेक्ट विचारून घे डॉक ला.. काही इंजेक्शनांमुळे शरिरातील प्रोटीन झपाट्याने कमी होतं ( थायलँड मधे असताना मुलीला पण इंजेक्शन्स घ्यावी लागली होती.. तेंव्हा डॉक ने बजावल्यामुले हे लक्षात आलं होतं )
बी एम सी, पोलिस इथे कंप्लेंट करून काही होईल का???
हो मोनालीप, सर्व मुलांच्या
हो मोनालीप, सर्व मुलांच्या पालकांनी आणि एरियातले अजून कोणी आले बरोबर तर पोलीस कम्प्लेंट करा.
अग हे सर्व रत्नागिरीला झाले.
अग हे सर्व रत्नागिरीला झाले. मी आता आलेय ठाण्याला. तेथे फोन करुन थोडया सुचना देत आहे दिल्यात पण इथुन जास्त काय सांगत राहु?
वर्षू धन्स. विचारते ग. इथेही शशांकशी बोलायचा प्रयत्न करतेय. त्याच्या जॉबचा संबंध रेबीजसाठीच्या लसी बनवण्याशी आहे असे इथेच एका नीगच्या धाग्यात वाचले.
मोनाली, अगं लेक रत्नागिरीला
मोनाली, अगं लेक रत्नागिरीला आहे का? काल वाचून खूप वाईट वाटलं.
नाही ग आलो आम्ही ठाण्याला.
नाही ग आलो आम्ही ठाण्याला. रविवारी आलोय परत आणि हे शुक्रवारी दुपारी झालेय.
बाकीची कुत्रा चावलेली मुलं
बाकीची कुत्रा चावलेली मुलं बरी आहेत का?
<<<< बर मला एक सांगा, मोठ्या
<<<< बर मला एक सांगा, मोठ्या लेकाला कुत्रा चावलाय तिकडेच. इंजेक्शन सुरु आहेत. अजुन काही काळजी घ्यावी लागते का? काय?
कुत्रा रस्त्यावरचा होता व त्या दिवशी टोटल ७ मुलांवर हल्ला केला त्याने. मुलाला बर्याच डीप जखमा झाल्यात, डॉककडे पण नेलेय, त्यांनी स्ट्राँग अॅन्टीबायोटीक्स दिलेत. आता जखमा सावळल्या आहेत बर्याचशा. पण अजुन काय काळजी घ्यावी लागते? व किती दिवस? >>>>>
अशा वेळेला रेबीज व्हॅक्सीनेशन जरुरी आहे आणि डॉ. ठरवतील तसे रेबीज अँटीसिरम किंवा इम्युनोग्लोब्युलिन देणे गरजेचे आहे.
समजा रेबीज व्हायरस (टच वूड - इथे तो नसावा) असेल तर स्ट्राँग अॅन्टीबायोटीक्स ते कसे काय रोखू शकेल - याठिकाणी फक्त रेबीज व्हॅक्सीनेशनच उपयोगी ठरेल.
मोनालि, ठाण्याच्या डॉक्टरला
मोनालि, ठाण्याच्या डॉक्टरला परत एकदा दाखवायला पाहिजे. सहसा इंजेक्शन्स घेतल्यानंतर घाबरायचे कारण नसते. त्याच्या मनातही उगाच भिती रहायला नको. स्वतःहून आता जाणार नाही कुत्र्याजवळ, पण तरी जपायला सांगायलाच पाहिजे. ( मला चावला होता लहानपणी. नंतर काही त्रास झाला नाही. )
समजा रेबीज व्हायरस (टच वूड -
समजा रेबीज व्हायरस (टच वूड - इथे तो नसावा) असेल तर स्ट्राँग अॅन्टीबायोटीक्स ते कसे काय रोखू शकेल - याठिकाणी फक्त रेबीज व्हॅक्सीनेशनच उपयोगी ठरेल.>>>> बापरे! मोनाली, तू ठाण्यातल्या डॉक्टरना गाठ पहिलं. इतर डॉक्टरांकडे नसेल तर ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला ये. तिथे आहेत ही इंजक्शन्स. मी शनिवारी तिथे ओपीडीसाठी हेल्पडेस्कला बसते तेव्हा कुत्रा चावलेले पेशंट्स आले होते १-२ वेळा. (मी ठाणे सिव्हिलला नोकरी करत नाही).
कोणाकडे मोनालिपचा फोन नं असेल
कोणाकडे मोनालिपचा फोन नं असेल तर मला द्या प्लीज - मी बोलतो तिच्याशी ....... इट्स अर्जंट ...
माझा सेल - ९४२०१७७३५९
शशांक, समस पाठवलाय तुझ्या
शशांक, समस पाठवलाय तुझ्या नंबरवर.
मोनाली घाबरू नको. सगळ ठिक
मोनाली घाबरू नको. सगळ ठिक होईल.
माझ्या पुतण्याला मागच्या महिन्यात असाच एक पिसाळलेला कुत्रा चावला होता. त्यानेही ५-६ जणांवर हल्ला केला होता. त्याला सरळ सरकारी दवाखान्यात नेले. कारण सरकारी दवाखान्यात अशी इन्जेक्शनची सोय तातडीने असते म्हणून. ४-५ इंजेक्शन्स घेतले त्याने. बरा झाला तो. डॉ. पथ्य सांगत नाहीत पण जुने लोक सांगतात व तसे आम्हीही थोडे पथ्य करायला लावले त्याला. जास्त तेलकट न खाणे, बटाटा न खाणे.
मिळाला तो नं. मला थँक्स.....
मिळाला तो नं. मला थँक्स.....
Pages