आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयपीएलसारख्या स्पर्धेत खेळ बव्हंशी अप्रचलीत फलंदाजी व गोलंदाजी यावरच विसंबून असतो व तीच त्या स्पर्धेची खासियतही आहे. त्यामुळे गोलंदाजाने/ फलंदाजाने प्रत्येक चेंडूवर प्रतिस्पर्धी काय करेल याचा अंदाज लावून तिथल्या तिथेंच निर्णय घेणं आवश्यक असतं. तो निर्णय त्याच्या कुवतीमुळे वा नशीबाने योग्य ठरला तर तो गोलंदाज / फलंदाज वरचढ ! त्यामुळे, अप्रचलीत खेळाचा पक्का सराव व मैदानात त्या क्षणीं निर्णय घेण्याची धडाडी यालाच आयपीएलमधे खरं महत्व आहे व प्रेरणादायी नेतृत्व इत्यादी गोष्टी फारच दुय्यम आहेत, असं मला वाटतं. द्रविड, सचिन किंवा इतर महान खेळाडूंना कमी लेखणं हा त्यामागे हेतू नव्हता [ आणि ,तसं करणं हें तर माझ्यासाठी पापच आहे ! ]

उदयन.... टाकले वेळापत्रक वरती धाग्याच्या सुरुवातीला!

आता तू लीग चालू कर बघू नेहमीसारखी...... यावेळी मजा आहे ५६ सामन्यामध्ये फक्त १२० चेन्जेस Sad

भाऊ, तुमच्या हेतुबद्दल शंका नाहीच!

पण तरीही "प्रेरणादायी नेतृत्व इत्यादी गोष्टी फारच दुय्यम आहे" हे नाहीच पटलं!

भाऊ, मागच्या वर्षी IPL तुलनेनं अधिक पाहिलं / follow केलं. द्रविड चं नेतृत्व, त्याची कल्पकता, horse for courses चं धोरण, खेळाडूंकडून अधिकाधिक चांगला खेळ करून घेण्याचं कौशल्य आणी त्याचे दृश्य परिणाम पाहिले म्हणून तुमच्या "प्रेरणादायी नेतृत्व इत्यादी गोष्टी फारच दुय्यम आहे" ह्या मताशी आदरपूर्वक असहमत.

बाकी स्वरूप ने लिहिल्याप्रमाणे, तुमच्या हेतूबद्दल शंका नाही.

यंदा बघू काय घडतं ते.

केली रे जॉइन लीग... पण एकंदरीत कठीण आहे.... खुप कमी बदल आहेत
कॅप्टन मात्र दर मॅचला बदलता येणार आहे!

<< पण तरीही "प्रेरणादायी नेतृत्व इत्यादी गोष्टी फारच दुय्यम आहे" हे नाहीच पटलं! >> म्हणजे माझा हा अप्रचलीत फटका नाहीच नीट बसला तर ! ठीक आहे ना. आत्तां तर स्पर्धा सुरूं होतेय आणि माझ्या भात्यात खूप भरलेत असे अप्रचलीत फटके !! Wink

"प्रेरणादायी नेतृत्व इत्यादी गोष्टी फारच दुय्यम आहे >> भाऊ तुम्ही दुय्यम आहे असे म्हणताय त्याला अनुमोदन. पण त्याच बरोबर, पहिल्या आयपील मधे वॉर्न ने स्मिथ, पठाण किंवा नंतरच्या दोन मधे ज्या तर्‍हेने धोनी ने मोक्याच्या क्षणी विजय नि रैनाला वापरले होते ते बघितल्यावर वाटते तेव्हढ्या ह्या गोष्टी दुय्यम नसाव्यात असेही वाटते. गेल्या वर्षी RR ने त्यांच्या होम पिचचा जो सराईतपणे वापर केला तो planning चा भाग होता. And I think thats why they came up short at the end. यंदा सॅमसन, राहाणे नि वॉतसन काय करतात ह्यावर द्रविडचा सहभाग कितपत मह्त्वाचा होता हे कळेल. अर्थात तो यंदाही off the field आहे तेंव्हा त्याचे मह्त्व असणारच overall strategy मधे. I just hope he has equal say there as it was last year.

बर.... आपापले फेव्हरिट संघ सांगा

१) राजस्थान रॉयल्स
२) सनरायझर्स हैद्राबाद

या दोन संघात फायनल झालेली बघायला आवडेल..... आजच्या घडीला कागदावर तरी हैद्राबादचा संघ चांगलाच समतोल दिसतोय!

फेवरीट संघ - 'मुंबई इंडीयन्स'कडे स्वाभाविक कल आहे व त्याला मुरड घालण्याची गरजही भासत नाही . बाकी, चांगलं खेळेल त्या संघाचं/खेळाडूचं मनापासून कौतुक तर होतच राहील !

झक्कास.. आजपासून सुरू..

एक मुंबईकर म्हणून आपला फेवरेट नेहमीच मुंबई ईंडियन्सच.. आणि लाडका रोहित शर्माच ..
पाठोपाठ शाहरुख फॅन म्हणून कोरबो लोरबो जितबो रे..
पुण्याचा संघ नसल्याने पुणेकरांना चिडवायचा चान्स यंदा मिस करणार..

पण माझ्यामते या वेळचा डार्क हॉर्स रॉयल चैलेंजर बॅंगलोर..
कोहलीचा फॉर्म एकहाती बॅंगलोरला पुढे घेऊन जाईल अशी अपेक्षा..
क्रिस गेल ज्या सामन्यात खेळेल ते जिंकवून देईलच..
एबी डी विलिअर्स फिनिशरचे काम चोख बजावेलच..
विशेष लक्ष युवराजसिंग वर .. त्याला आता बरेच लोकांना बरेच काही सिद्ध करून दाखवायचे आहे..
एकंदरीत बॅंगलोरची फलंदाजी बघणे हा एक धमाल अनुभव असेल..
गोलंदाजीत कोणत्या संघातले कोणते गोलंदाज फॉर्मात येतात हे स्पर्धा सुरू झाल्यावरच समजेल... आठवा, चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अचानक चमकलेला राजस्थान रॉयल्सचा ४१ वर्षीय प्रवीण तांबे .

आजच्या सामन्यात तेवढी मुंबईच्या विजयाने धमाकेदार सुरूवात होऊ दे. वा कलकत्त्याशी असल्याने कोरबो लोरबो जितबो रे ही चालेल.. Happy

मला यंदा डार्क हॉर्स हैद्राबाद वाटताहेत. अर्थात बँगलोर सुद्धा तितकेच रेस मधे आहेत. बघुया काय होतं ते.

उदयन, अजून प्लेयिंग ११ जाहीर व्हायचे आहेत ना? आधीच टिम बनवली का?

केकेआर - १६३-५ . कालीस ४६ चेंडूत ७२ ! मनीश पांडेची चांगलीच साथ .
पहिलाच सामना रंगणतदार व्हावा अशी आशा करायला हरकत नसावी.

गंभीर आणि हसी दोघेही completely out of touch वाटले..... त्यामानाने कॅलीस मात्र चांगलाच खेळला!
भज्जी आणि ओझा आज पूर्ण प्रभावहीन.... स्लिंगा मलिंगा लंकेसाठी खेळायला गेल्यावर मुंबईच्या बॉलींगचे काय होणारेय कुणास ठाउक?

नरैन दोन्ही बाजूला चेंडू चांगलेच वळवत होता; ही स्पर्धाही फिरकी गाजवणार कीं काय !
उथप्पा यष्टिरक्षक म्हणून केकेआरचा घात करूं शकतो; काल त्याचं 'कलेक्शन' व 'स्टम्पींग' खूप दोषास्पद वाटलं. नरैनचे चेंडू तर फलंदाजापेक्षां त्यालाच फसवत होते.
मॉर्केल 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'चा महत्वाचा दावेदार असावा. विकेटस नरैनला मिळाल्या पण खरा दबाव टाकायला मॉर्केलने सुरवात केली.
मुंबई पुचाट खेळली व हरली नसती तरच नवल.

बिस्ला आहे ना संघात बहुतेक त्यालाच द्यायला हवी विकेट किपिंग गेली ३-४ वर्ष तो नरेन चे चेंडु व्यवस्थित पकडत आहे ...

कालच्या मुंबई पराभवानंतर एक मुंबई सपोर्टर म्हणून मनात बरेच प्रश्न उपस्थित केले.

१) हसी म्हातारा झालाय का?
२) अँडरसन नामक हिटर घेतलाय तो येथील खेळपट्ट्यांवर फिरकीपुढे फ्लॉप जाणार का?
३) प्रग्यान ओझा आणि हरभजन चांगली जोडगोळी असली तरी मॅचविनर ठरण्यात कमी नाही पडणार का?
४) जॉन्सनच्या अनुपस्थितीत आता मलिंगा एकटा वा झहीरच्या साथीने वेगवान मारा सांभाळेल का?
५) पोलार्ड हा निम्यापेक्षा जास्त सामन्यात मागे आल्याने फुकटच जाणार का?
६) रोहित शर्माने ४ नंबरच्या जागी ओपनर नाही तर किमान ३ वर तरी येणार का? आणि तसे झाल्यास मग पुन्हा मिडल ऑर्डर कमजोर वाटणार का?

७) आणि सर्वात महत्वाचे, गेल्यावेळचे जॉन्सन , स्मिथ, मॅक्सवेल हे जाऊन हसी आणि अँडरसन आलेत ते फ्लॉप गेले तर यंदाची संघनिवड गंडलीय अशी नकारात्मक मानसिकता स्पर्धेच्या सुरुवातीलाच तयार होणार का? कारण या स्पर्धेत एकदा एखादा संघ पराभवाच्या गर्तेत गेला तर तो हरतच राहतो.

देवा, पुढचा सामना मुंबई लवकरात लवकर जिंकून या प्रश्नांना फुल्लस्टॉप लागू दे.. Happy

मला एक जाणवलं कीं निदान कालची खेळपट्टी तरी गोलंदाजीत वेग ,' बाऊन्स ' व फिरकी या सगळ्यालाच भरपूर साथ देत होती. मॉर्केल व नरैन दोघेही एकाच वेळीं भेदक ठरत होते. [ मॉर्केलचा पहिला 'स्पेल' तर वेग [१५० !], बाऊन्स व अचूक टप्प्यामुळे 'अनप्लेयेबल' वाटत होता]. अशा खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करतानाही जर मुंबईची गोलंदाजी प्रभाव पाडूं शकली नाही, तर मुंबईने फलंदाजीपेक्षां गोलंदाजीकडेच खूपच अधिक लक्ष देणं खूपच गरजेचं असावं. फलंदाजीतले क्रमांक बदलून , खेळपट्टीचा सराव होवून फलंदाजी
सहज सुधारेल पण गोलंदाजीला पोषक अशा खेळपट्टीवरच गोलंदाजी निष्प्रभ ठरणं हें खरंच गंभीरपणे काळजी करण्यासारखं !!

सर्वात चांगली फलंदाजी कॅलिस आणि पांडे ने केली... एकतर खेळपट्टी नविन होती काहीच अंदाज लावता येत नव्हता .. त्यातच आबुधाबी वगैरे या ठिकाणी मॅचेस कमीच भरतात त्यामुळे स्वरुप कळण्यास कठिण होत.

दोघांनी ही पहिले १० षटके आरामात खेळुन काढलीत नंतर खेळपट्टीचा अंदाज थोडाफार लागल्यानंतर मारामारी करण्यास सुरुवात केली .. तरी ही एकदम फ्री होउन खेळु शकलेच नाही...

या उलट मुंबई ने कोलकत्याचे अनुकरण न करता पहिल्या बॉल पासुनच धुण्यास प्रयत्न चालु केला.. कोणी ही जॅक सारखा थांबुन खेळला नाही. थोडाफार रायडु ने प्रयत्न केला पण तो अपुरा पडला...

मोर्कल ने पहिल्या ३ ओव्हर्स मधे अवघे ५ रन्स दिल्याने दडपण वाढले त्यातच नरेन ने विकेट्स घेणे आणि रन्स रोखणे दोन्ही कामगिरी बजावण्यास सुरुवात केली...

-----------------------

आजच्या मॅच मधे विराट , गेल, युवी चालले तर दिल्लीवाल्यांना देवच वाचवु शकेल

<< सर्वात चांगली फलंदाजी कॅलिस आणि पांडे ने केली...>> सहमत.
<< २) अँडरसन नामक हिटर घेतलाय तो येथील खेळपट्ट्यांवर फिरकीपुढे फ्लॉप जाणार का? >> कालच्या त्याच्या खेळावरून तरी माझ्याही मनात हीच शंका आली. त्याच्या गोलंदाजीतही कांहीं 'स्पार्क' दिसला नाही. [ 3-0-33-0 ]. अर्थात, आतांच त्याच्यावर काट मारणं पण योग्य नव्हे.

Pages