आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच
माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!
असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)
नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)
<< कॉर्पोरेट कल्चर असतं आणी
<< कॉर्पोरेट कल्चर असतं आणी त्याचा परिणाम / प्रतिबिंब काम करणार्यांच्या कामात, >> स्वतःच्या देशासाठी लढणारा सैनिक व पैसे घेवून कोणासाठीही लढणारा सैनिक [ मर्सिनरी] यांत एक महत्वाचा फरक असा आहे कीं मर्सिनरीच्या बाबतीत ज्याचे पैसे घेतले त्याच्यासाठी आपलं कौशल्य पूर्णपणे पणाला लावण्याची पक्की मानसिकता व कमिटमेंट असणं. आयपीएलमधे बोली लावून आलेल्या खेळाडूना स्वतःच्या खराब कामगिरीसाठी ही कल्चरची सबब सांगण्याचा म्हणूनच अधिकार रहात नाही - मग ते भारतीय असोत कीं बाहेरचे - असं मला वाटतं. फॉर्म असणं, नसणं इथपर्यंतच ठीक आहे.
इथे काय समोर crystal ball आहे
इथे काय समोर crystal ball आहे असतो का जो बघून ठरवता येते कि काय करायचे ? मल्ल्याने युवराजवर, दिल्लीने कार्थिक वर नि पंजाबने रिशी धवनवर हाय बिडिंग केले पण अजून त्यांनी काय deliver केलय ? All are calculated guesses, some work and some does not. Some bone headed planning by MI management has not left with much backup which should be real grievanece and not that they did not bid for indivisual players be it Maxwell or Smith. MI has been clearly on loosing side so far. ऊद्या मॅक्सवेल बोंबलला नि अॅंडरसन चालला तर इथे हेच लोक उलट बोलतील
शांतपणे पहा नि मॅच ची मजा लूटा.
<< इथे काय समोर crystal ball
<< इथे काय समोर crystal ball आहे असतो का जो बघून ठरवता येते कि काय करायचे ?>> माझा मुद्दा तो नाहीच आहे. ज्यांच्यासाठीं पैसे घेवून खेळताय त्याना खराब कामगिरीसाठी भलत्या सबबी त्यानी सांगू नये किंवा आपणही नको शोधूंया; म्हणूनच " फॉर्म असणं -नसणं इथपर्यंतच ठीक आहे " व तो क्रिसल बॉल बघून नाही सांगता येत ,हेंही खरं.
आज बालाजी बहुतेक 'बालाजी दर्शन' करूनच खेळायला आलाय. आरसीबी ५५-५ !!
भाऊ crystal ball चा उल्लेख
भाऊ crystal ball चा उल्लेख तुमच्या पोस्ट्ला उद्देशून नव्हता. योगायोगाने आपल्या पोस्ट एकत्र आल्या एव्हढेच. मी जनरली इथे नि क्रिकईंफो वर MI ने कसे maxwell नि smith ला ठेवले नाही ह्याबद्दल वाचले त्याला उद्देशून म्हणत होतो. IPL bidding च्या वेळी anderson चा form बघता त्याला prefer केले हे एवह्ढे धक्कादायक का वाटते ? हसी गेल्या IPL मधे कसा खेळला होता नि big bash मधे पहिल्या तीन का पाचांमधे होता तेंव्हा तीही निवड धक्कादायक नाही. In fact CSK also bidded for him says it all. फक्त अजून काही मॅच विनर्स वर aggressive bidding का केले नाही हा धक्कादायक प्रकार आहे. They probabaly decided to stick with core combinations they had and payed the price.
ज्यांच्यासाठीं पैसे घेवून खेळताय त्याना खराब कामगिरीसाठी भलत्या सबबी त्यानी सांगू नये किंवा आपणही नको शोधूंया; म्हणूनच " फॉर्म असणं -नसणं इथपर्यंतच ठीक आहे " >> ह्यात शंका नसावी. काय भलत्या सबबी सांगितल्या नि कोणी ?
<< काय भलत्या सबबी सांगितल्या
<< काय भलत्या सबबी सांगितल्या नि कोणी ?>> नाही, कुणीही सबबी सांगितल्या नाहीत. पण इथं कुणी तरी 'टीम कल्चर' बदलल्याने कामगिरीवर परिणाम होण्याच्या शक्यतेचा उल्लेख केला व मीं आगाऊपणा करून आयपीएलमधल्या खेळाडूंवर तोंडसुख घेण्याची ही संधी दवडली नाहीं !
स्टार्कने दोन अफलातून झेल घेवून आरसीबीला जराशी आशा दाखवली आहे. मुख्य म्हणजे मॅक्सवेल गेलाय. पण मिलर व सेहवाग पंजाबकी नैया पार लगायेंगे ,असं दिसतंय ! सहल काय 'फ्लाईट' देतो चेंडूला; आवडते बुवा आपल्याला त्याची गोलंदाजी - Reminds me of good old days of leggies !
पण इथं कुणी तरी 'टीम कल्चर'
पण इथं कुणी तरी 'टीम कल्चर' बदलल्याने कामगिरीवर परिणाम होण्याच्या शक्यतेचा उल्लेख केला व मीं आगाऊपणा करून आयपीएलमधल्या खेळाडूंवर तोंडसुख घेण्याची ही संधी दवडली नाहीं >> हे थोडे 'बाजारात तुरी, भट भटणीला मारी' सारखे होतेय का भाउ ?
संदिप शर्मा नि मोहित शर्मा मस्त बॉलिंग करताहेत सध्या.
<< हे थोडे 'बाजारात तुरी,
<< हे थोडे 'बाजारात तुरी, ....' सारखे होतेय का भाउ ? >> संघांच्या मालकवर्गाच्या मनांत खेळाडू निवडताना नेमकीं काय गणितं, आडाखे असतील याचा आपण इथं विचार करत बसण्यालाही कदाचित हेंच लागू होत असावं !
चला, पंजाब जिंकली !
यात पंजाब ने योग्य खेळाडूंना
यात पंजाब ने योग्य खेळाडूंना घेतले आहे
आता पर्यंत च्या मँच वरून तरी हेच दिसते
स्वप्नावत कामगीरी
<< यात पंजाब ने योग्य
<< यात पंजाब ने योग्य खेळाडूंना घेतले आहे >> पंजाबच्या 'मालकीणबाई'नी हें वाचलं तर पुढच्या मॅचला टीव्हीवर खेळापेक्षां त्यानाच मिरवताना व नाचताना पहावं लागेल आपल्याला !
थांबो रे थांबो... ही दुबई
थांबो रे थांबो... ही दुबई मधली परिस्थिती आहे.. भारतात तर येऊ दे मग बघा कसे आणि काय घडेल ते..
<< भारतात तर येऊ दे मग बघा
<< भारतात तर येऊ दे मग बघा कसे आणि काय घडेल ते >> खरंय. दुबईतलं स्वस्त सोनं इथं येवूनच महागतं !!
भारतात तर येऊ दे मग बघा कसे
भारतात तर येऊ दे मग बघा कसे आणि काय घडेल ते.. >> हिम्या हे युधिष्ठिराच्या आणखी एक फासा पडू दे टाईप वाटतंय. चार मॅच गेल्याच की. आता पूर्ण १० जिंकणार का?
केदार.. ते स्पेसिफिक कुठल्या
केदार.. ते स्पेसिफिक कुठल्या टीम बद्दल नाहीये.. तर जनरल सगळ्याच खेळाडूंबद्दल आहे.. भारतात आल्यावर कोण चालेल आणि कोण झोपेल.. हे नाहीच सांगू शकणार..
आज राजस्थान वि. कोलकता.
आज राजस्थान वि. कोलकता.
रहाणे आतां फलंदाज म्हणून
रहाणे आतां फलंदाज म्हणून बहरतो आहे. आजच्या त्याच्या खेळात आत्मविश्वासामुळे येणारी सहजता होती. कांहीं फटके तर अप्रतिम शैलीदार होते. उचलाउचलीपेक्षां 'प्लेसींग' व 'टायमिंग'वर अधिक भर होता. कीप अप, रहाणे !
रहाणेची आजची इनिंग क्लासी
रहाणेची आजची इनिंग क्लासी होती.... मस्त खेळला तो!
करुण नायर अजिबात कन्व्हींसींग वाटत नव्हता..... त्याच्या ऐवजी उन्मुक्त चंदला चान्स मिळायला हवा होता
आज पहीली ओव्हर बिन्नीला द्यायला नको होती..... गंभीर शून्यावर खेळत असताना आपला बेस्ट बॉलर वापरून त्याला दडपणाखाली बाद करायला हवे होता.... त्या पहील्या ओव्हरमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला!
कॅलिस आणि गंभीरला लवकर काढले तर राजस्थानच्या हातातली मॅच आहे ही!
गंभीर अँकर करणार असं दिसतय.
गंभीर अँकर करणार असं दिसतय. त्याच्या अवतीभवती, पांडे, उथप्पा, हसन खेळतील. पण गंभीर गेला लवकर, तर मात्र ह्या योजनेला सुरूंग लागू शकतो. वॉटसन / फॉकनर पैकी कुणीतरी गंभीरची विकेट काढायला हवी.
कॅलीस [१३] झेल स्मिथ ,
कॅलीस [१३] झेल स्मिथ , गोलंदाज- तांबे.
]
टी-२० साठीच अवतरलेल्या या तांबे नांवाच्या वल्लीला कुणी शोधून काढलं व वयाची चाळीशी उलटेपर्यंत कुणी त्याला झांकून ठेवलं होतं ?
[ थोडं विषयांतर - शाहरुखबरोबर केकेआरचे गंभीर, उथप्पा इ.इ. सतत 'नोकिआ'च्या जाहिरातीत दिसतात व इतरही जाहिरातींत असावेत. 'बोली'चे पैसे ह्या खेळाडूना स्वतः न देता अशा जाहिरातींतून ते मिळवून देण्याचं काँट्रॅक्ट तर नाही ना त्याने केलंय खेळाडूंशी !
तांबे कांगा लीग मधे अनेक
तांबे कांगा लीग मधे अनेक वर्षं खेळतोय. अॅबी कुरूविला (क्लब-मेट) च्या सांगण्याप्रमाणे, गेल्या ८ वर्षात, तो मध्यमगती गोलंदाजीकडून फिरकीकडे 'वळला' आणी प्रभावी ठरला (ईती: श्री विकिपिडीया प्रसन्न)
गेला एकदाचा गंभीर..... तांबे
गेला एकदाचा गंभीर..... तांबे आणि भाटीया हे मधल्या ओव्हर्स करण्यासाठी आयडीयल बॉलर्स बनायला लागले आहेत
>>टी-२० साठीच अवतरलेल्या या तांबे नांवाच्या वल्लीला कुणी शोधून काढलं
बहुतेक राहुल द्रवीडने
गंमत म्हणजे हा माणूस आधी मध्यमगती गोलंदाज होता आणि नंतर तो लेगस्पिनर बनला
बट अ ग्रेट फाइंड फॉर राजस्थान
पण हा माणूस विकेट घेतल्यानंतर तोंडावर बोट नेउन "चूप" अशी अॅक्शन का करतो कुणाला माहित आहे का?
>>टी-२० साठीच अवतरलेल्या या
>>टी-२० साठीच अवतरलेल्या या तांबे नांवाच्या वल्लीला कुणी शोधून काढलं
बहुतेक राहुल द्रवीडने >> http://www.dnaindia.com/sport/report-pravin-tambe-life-begins-at-42-1901058
जबरदस्त झाली मॅच. जिंकले
जबरदस्त झाली मॅच. जिंकले राजस्थान!
चला, काल एकदां 'सुपर ओव्हर'
चला, काल एकदां 'सुपर ओव्हर' प्रकार पहायला मिळाला. पण गंमत अशी कीं कॉमेंट्री बॉक्समधून परत परत सांगितलं जात होतं , " If you lose two wickets during the over, you are gone ! " मला वाटलं, हॉकी, फुटबॉलसारखा हा ' सडन डेथ'चा नियम असावा. शेवटच्या चेंडूवर केकेआरची विकेट गेली, मला वाटलं मॅच संपली. तर राजस्थान १२ धांवांच लक्ष्य घेवून मैदानावर !!
<< पण हा माणूस विकेट घेतल्यानंतर तोंडावर बोट नेउन "चूप" अशी अॅक्शन का करतो कुणाला माहित आहे का?>> कारण माझ्यासारखे कुचाळक्या करणारे त्याच्या गोलंदाजीचं कौतुक करून न थांबतां ताबडतोब त्याचं वय काढतात ना ! !!
लय भारी मॅच झाली कालची...
लय भारी मॅच झाली कालची...
साकीब ने मस्त खेचली होती... चावला बाद झाला त्या वेळेस दोन धावा पळाले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते...
फॉकनरने १९वे ओव्हर अप्रतिम टाकली.. ४ धावा आणि ३ बळी.. त्यातले दोन तर बॅक टू बॅक..
सुपर ओव्हर मध्ये पण स्मिथने शेवटच्या बॉलला मारलेला फटका पण सही होता.. अत्यंत काळजीपूर्वक हळूवारपणे बॉल साकिबच्या उजव्या हाताला जाऊन त्याला सहज आडवता येणार नाही आणि दोन धावा निघतील इतक्याच जोरात होता...
<< लय भारी मॅच झाली कालची...
<< लय भारी मॅच झाली कालची... >> अगदीं खरंय.
फलंदाजीच नाही तर 'स्टंपींग', धांवचितसाठी 'डायरेक्ट थ्रो', सीमारेषेवरचे झेल, नेमक्या टप्प्यावर गोलंदाजी
इ.इ.चे अफलातून करिष्मे पहायला मिळताहेत आयपीएलमधे !
आणखी एक; काल धोनी हा कप्तान म्हणून कां ग्रेट आहे, हें गंभीरच्या कालच्या एकंदर देहबोलीवरून अधिकच स्पष्ट झालं. चेहर्यावर कायम तणाव, जरा कांहीं विपरित घडलं कीं कपाळावर हात मारून घेणं, 'सुपर ओव्हर' खेळायची पाळी आल्यावर गोंधळलेला वाटणं, हें सारं संघ सहकार्यांना प्रेरणा देण्याच्या बरोब्बर उलटं होतं. फलंदाजीत त्याच्याबद्दल अजूनही अपेक्षा आहेत पण कप्तान म्हणून तो निराशाजनक वाटतो असंच नाईलाजाने म्हणावं लागतं.
आज MI ने anderson च्या जागी
आज MI ने anderson च्या जागी merchant de lange किंवा hazzlewood ला घ्यायला हवे होते का ?
मुंबई (ज्यांचा सपोर्ट स्टाफ
मुंबई (ज्यांचा सपोर्ट स्टाफ हळू हळू खेळाडूंपेक्षाही जास्त असेल बहूदा) वि. हैद्राबाद (पहीला आणी तिसरा मजला पक्का, मधे भुसभुशीत वाळू).
काय अंदाज?
हसीला वगळून डन्ग [टास्मानिया]
हसीला वगळून डन्ग [टास्मानिया] या यष्टीरक्षक व फलंदाजाला घेतलंय मूंबईने.
डन्ग बिग बॅशमधला नं. १ होता.
डन्ग बिग बॅशमधला नं. १ होता. किती ४ किपर आहेत MI च्या टीममधे
"४ किपर आहेत MI च्या टीममधे"
"४ किपर आहेत MI च्या टीममधे" - आणी हैद्राबाद कडे २ (ओझा आणी राहूल).
Pages