आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयन.. अखिल भारतीय ईशांत शर्मा हेटर मंडळातर्फे तुम्हाला 'कारणे दाखवा' नोटीस का बजावू नये? सिनिऑरिटी प्रमाणे नेहरा खालोखाल हा मान आधी ईशांत शर्मा ला मिळायला हवा आणी मग दिंडा ला.

दिंडा, इशांत आणि नेहरा करणार्‍यांनो मुनाफ पटेलला विसरू नका, त्याला चमकोगिरी करायची सवय नाही, आठवड्यातून एकदाच आंघोळ करतो, म्हणून कोणाच्या लक्षात येत नाही इतकेच.

>>कारण त्यांना सगळे नंतर दिंडा म्हणायला लागले असते
आजची त्या दोघांची बॉलिंग बघता अशी वेळ बहुदा आली नसती!

<< पण मला प्रश्न असा पडलाय की अ‍ॅरॉन आणि अ‍ॅल्बीच्या एकेक ओव्हर शिल्लक असताना दिंडाला का दिली शेवटची ओव्हर? >> स्वरुपजी, आतां तुम्ही असंही विचाराल, " दिल्लीने कोहलीचे दोन सोपे झेल कां सोडले ? ". टी-२०त असल्या अवघड प्रश्नांची उत्तरं न शोधणंच बरं !!
<< दिंडा, इशांत आणि नेहरा करणार्‍यांनो मुनाफ पटेलला विसरू नका, >>दिंडाला सहानुभूति मिळावी म्हटलं तर त्याच्या स्पर्धकांची दिंडीच निघाली कीं इथं !!!! Wink

युवी 29 बाँल्स मधे 52 रन्स

आयपीएल आहे बाबानों सगळ्यांचा गेलेला फाँर्म परत येतो Wink

युवी बॅक .. ज्याची आशा होतीच .. पाच षटकार .. २९ चेंडूत ५२ .. बँगलोर आता तर नक्कीच खतरनाक संघ .. शेवटच्या चारात यायला हरकत नाही ..

युवराजला त्याची लय सांपडणं ही खरंच आनंदाची गोष्ट; 'मॅच-विनर'ची त्याची प्रतिमाच सर्वांच्या मनात ठसून रहावी !!
चहलला 'मॅन ऑफ द मॅच ' !! अभिनंदन. [ मुरलीला बसवून त्याला संघात घेतलं होतं याचा केवढा दबाव असावा त्याच्यावर ! ]

99

100

चहल ला कोणत्या हिशोबाने दिले?
१ विकेट 18 रन्स

त्यापेक्षा वरूण ने चांगली टाकली
३ ओव्हर ८ रन्स १ विकेट १ मेडन ओव्हर

<< त्यापेक्षा वरूण ने चांगली टाकली ...३ ओव्हर ८ रन्स १ विकेट १ मेडन ओव्हर >> १] चहलच्या ४ षटकात १८-१ आहेत २] वरूणला चौथी ओव्हर टाकायला दिली असती तर ..३] वरूणला न देतां चहलला चौथं षटक द्यावसं वाटणं व ४] विजय पाय रोवून उभा होता व त्याची विकेट त्यावेळीं महत्वाची होती [ व ती ज्या सफाईने चहलने घेतली ].. ह्या सर्व घटकांमुळें तौलनिक दृष्ट्या चहल हा वरूणपेक्षां वरचढ वाटला असावा !

खेळपट्टी 'फास्ट' किंवा 'स्लो' असणं माझ्या आकलनशक्तीतलं आहे; पण काल सर्वच जण- कोहलीसकट -खेळपट्टी ' डबल पेस्ड ' [double paced] आहे म्हणत होते. खरंच काय असतो हा प्रकार [ किंवा, खरंच असतो का असा कांहीं प्रकार ? कसोटीच्या प्रत्येक दिवशीं खेळपट्टी कशी 'वागेल' याचं भाकीत करणार्‍यांवर डॉन ब्रॅडमननी आपल्या पुस्तकांत ओढलेले ताशेरे वाचल्यापासून मीं अशा विधानांबद्दल जरा साशंकच असतो !]

जॉन्सन असुन सुध्दा काहीच फरक दिसुन येत नाही १० च्या सरासरीने धुने चालु आहे मॅक्युलम ने तर तोफखानाच उघडलेला

भाऊ, आपल्या प्रंप्रिय (चुकून नाही, मुद्दाम लिहिलय तसं) दिंडा साठी काहीतरी चिताराल का? anyway, he is portrayed as one of the worst bowlers, but you may portray him as something else >>

Lol भाऊ, फेरफटकाने चांगलाच गुगली टाकला, त्याला तुम्ही बहुदा वेल लेफ्ट केलं. (अनुल्लेखाचा फटका मारून)

बाकी हे दिंडासारखे लोकं भारताकडून खेळू कसे शकतात?

बाकी हे दिंडासारखे लोकं भारताकडून खेळू कसे शकतात? >> एव्हढे काहि सरळ नाहिये रे. टेस्ट साठी सूटेबल असणारा, बाउन्स निर्माण करणारा बॉलर आपण लिमिटेड ओव्हर्स मधे सिटर्स पिचेस वर खेसिटर्स्वगैरे गोष्टी बघायला घ्यायला हव्यात. परत जेंव्हा ते फोर्ममधे असतात तेंव्हा आपण त्यांना टीम अ‍ॅटॉमॉस्फीरची ओळख व्हावी म्हणून ड्रिंक्स नेण्यासाठी वापरतो Wink

दिंडाची बाजू घेतोय असे नाही फक्त बॉलर हा एव्हढा एकमेव फॅक्टर नाही एव्हढे सांगतोय.

योग्य प्रश्न हा आहे कि आयपीलमधे दिंडा कसा काय येतो ? बहुधा That tells us a lot about dearth of domestic pacers.

मॅक्सवेल ने ९५ रन्स मारले....४३ बॉल्स मधे तब्बल १५ चौकार आणि २ षटकार.......

टिम चा कॅप्टन ...... Wink बरेच पॉईंट मिळणार

राजस्थान रॉयल्सला १३४ धांवांसाठी २०व्या षटकापर्यंत धांपा टाकतच जावं लागलं !!!
गेल्या सामन्यातल्या निराशाजनक खेळानंतर आज मुंबई काय करते बघायचं.

>>राजस्थान रॉयल्सला १३४ धांवांसाठी २०व्या षटकापर्यंत धांपा टाकतच जावं लागलं
पण फिंच, वॉर्नर, धवन, सॅमी अश्या सॉलिड लाइनअप असणार्‍या संघाला १३३ धावात रोखले ही समाधानाची बाब.... आणि या १३३ धावांच्या पाठलागात रहाणे-बिन्नी या भारतीय जोडीचा मोलाचा वाटा होता.... वॉटसन, हॉज अपयशी ठरुनही राजस्थान जिंकले..... शुभेच्छा!

<< दिंडा साठी काहीतरी चिताराल का? >><< भाऊ, फेरफटकाने चांगलाच गुगली टाकला, त्याला तुम्ही बहुदा वेल लेफ्ट केलं. (अनुल्लेखाचा फटका मारून) >> तसं नाहीय; गुगली म्हणून सोडलेल्या साध्या ,सरळ चेंडुंवर माझी बर्‍याच वेळां विकेट गेलीय ! म्हणूनच, मीं खेळतोंच असले चेंडू, अर्थात जमेल तसं -

aDindaa.JPG

राजस्थान हा टिमवर्क जिद्द चिकाटी वगैरे वगैरेचा उत्कृष्ट नमुना आहे. तिथे अकराच्या अकरा खेळाडूंना, आपण या सामन्यातले एक `की फॅक्टर' आहोत असे वाटते. त्यामुळे एवरेज खेळाडूंचा या आत्मविश्वासाने परफॉर्मन्स उंचावतो तर स्टार खेळाडूंना अतिआत्मविश्वास वा गर्व होत नाही. राहुल द्रविड संघात नसला तरी कालही तो द्रविडचाच संघ वाटला.

जागतिक आश्चर्य..

डिंडा ने ३ ओव्हर मधे अवघे १३ रन्स दिले आहेत आणि त्यात एक ही चौकार अथवा षटकाराचा समावेश नाही..

आजचा दिवस डिंडा सुवर्ण अक्षरांमधे लिहुन ठेवेल आणि समस्त मुंबई इंडियन्सच्या खेळाडुंना पार्टी देईल

मुंबई फलंदाजीचा अजून एक गचाळ परफॉर्मन्स. पहिल्या सामन्यानंतर पडलेले प्रश्न सुटायच्या जागी वाढले. यंदा मुंबई शेवटच्या ४ मध्ये पोहोचणे कठीण वाटतेय. काहीतरी वेगळे करण्याची गरज.

Pages