आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोलार्डच्या बॉलिंगवर MI चा अधिकच विश्वास आहे. Oh wait, they do not have 6th baller. Pollard is effective for couple of hours. Last year, Smith complimented him perfectly to finish up 4 overs quota for fifth baller.

हैदराबादने १७०+ स्कोअर केलाय. मुंबईच्या सध्याच्या फॉर्मवरून त्यांच्यासाठीं हें कठीणच लक्ष्य म्हणायला हवं ! पण टी-२० आहे, कोण कधीं अफलातून खेळी करेल ,सांगता नाही येत !!!
किती ४ किपर आहेत MI च्या टीममधे

<< "४ किपर आहेत MI च्या टीममधे">><< - आणी हैद्राबाद कडे २ (ओझा आणी राहूल).>> ह्या सर्वानी फलंदाज म्हणून स्वतःच्या यष्टीचं रक्षण केलं म्हणजे मिळवली !! ओझाने शेवटी येवून १०धांवा काढून हैदराबादसाठी आज हें केलंय !!

काढलेलीच पोलार्डने मॅच.. पण मुंबई गंडलीच आहे.. हरभजनला त्या गौतमच्या आधी का पाठवला हे अनाकलनीय.. भज्जी आंधळ्यासारखा बॅट फिरवतो आणि त्याने बॉल फुकट घालवून सामना घालवण्याचे फुल्ल चान्सेस होते. भुवनेश्वरच्या ओवरला पोलार्डला एकच बॉल खेळायला मिळाला तिथेच सामना गेला !

इतर भेदक गोलंदाज संघात असूनही खास फॉर्मात नसलेल्या इर्फानला शेवटच्या ओव्हरसाठी राखून ठेवणं या धाडसी खेळीबद्दल धवनलाही श्रेय जातं !

इतर भेदक गोलंदाज संघात असूनही खास फॉर्मात नसलेल्या इर्फानला शेवटच्या ओव्हरसाठी राखून ठेवणं या धाडसी खेळीबद्दल धवनलाही श्रेय जातं ! >> calculations विसरला असेल कदाचित Lol पोलार्ड समोर दोन लेगस्पिनर्स एकाच वेळी, हि बात काही झेपली नव्हती.

आज जागतिक कामगार दिवसा निमित्ताने आयपीएल ची एकही मँच ठेवली नाही Biggrin

धन्य ते मालक आणि त्यांचे कामगार Wink

नाबाद २५०*.

आज बहूदा सगळ्या टीम्स यूएई हून भारतात येत असाव्यात. उद्यापासून भारतातले सामने सुरू.

<< calculations विसरला असेल कदाचित >> नसावं. सामन्यानंतर धवनला ह्याबद्दल विचारण्यात आलं होतं. 'फ्रंटलाईन' गोलंदाजांना आधींच षटकं देवून बळी मिळवायचे व त्या दबावाखाली आलेल्या इतर फलंदाजांसाठी इर्फानचा उपयोग करायचा ही ठरवलेली व्यूहरचना होती, असं तो म्हणाला. [अर्थात, याबद्दल प्रश्न विचारल्यावर धवनने आयत्या वेळीं हा 'इम्प्रुव्हाईज्ड स्ट्रोक' मारला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही !]
धवन हा किती धूर्त कप्तान आहे, हें अजून ठरायचं आहे. पण मैदानावर तरी तो कप्तानासारखा वागतो व नेतृत्व त्याला सहजसुलभ असल्याचं जाणवतं.

<< धन्य ते मालक आणि त्यांचे कामगार >> व धन्य तो अतिप्रचंड ग्राहकवर्ग [म्हणजे आपण !] जो त्यानी बनवलेला कसलाही माल ते सांगतील त्या किंमतीत उचलतो !!! Wink
<< चेन्नाई रांचीत! धोनी ने शतक केलेच पाहिजे.>> झक्कीजी, सामना केकेआर विरुद्ध आहे. सध्याचा केकेआरचा फॉर्म बघतां, धोनीला शतक करण्यासाठी टॉस जिंकून [ जी त्याची स्पेश्यॅलिटी आहे ] प्रथम फलंदाजी घ्यावी लागणार ! Wink

<< धोनीला शतक करण्यासाठी टॉस जिंकून [ जी त्याची स्पेश्यॅलिटी आहे ] प्रथम फलंदाजी घ्यावी लागणार ! >> चला , यांतला पुढचा अर्धा भाग तर पार पडला; आतां पाऊस थांबल्यावर बघूं झक्कींच्या वेधशाळेच्या अंदाजानुसार धोनी धांवांचा पाऊस पाडतो का !!! Wink

मायभूमीत येवून, कन्यारत्न झाल्याचा शुभसंकेत मिळूनही गंभीरच्या स्वतःच्या व त्याच्या संघाच्या कामगिरीला कांही उर्जितावस्था येत नाहीच आहे !! आणि, चेन्नईसाठी तर 'सर' जडेजा धोनी सांगेल त्यांचे व सांगेल तितके बळी मोठ्या खुन्नसने घेतोय !!!
[ पण बाप झाल्याबद्दल काल त्याचं अभिनंदन केल्यावर गंभीर खूप दिवसानी प्रथमच मनापासून गोड हंसताना दिसला !!]
आज मायदेशीं आल्याने मूंबईच्या तरी ग्रहदशेत कांही फरक पडतो का तें पहायचंय !

a-maher.JPG

पंजाब - १६८ -५ [ मॅक्स्वेल ४५, साहा -५६ ];
बेन डंगबद्दल जें बरंच ऐकलंय तें मुंबईसाठी आज खरं ठरवेल तो ? मुंबई आज नेहमीपेक्षां बर्‍या मूडमधे दिसतेय, हें मात्र खरं . आज दोन्ही संघाना ह्या आयपीएलमधला हरण्या/जिंकण्याचा विक्रम अबाधित ठेवण्याचा /मोडण्याचा मोका साधायचा आहे !

रोहित पोलार्ड अ‍ॅंडरसन तारे.......... खेळुन गेले ......... पहिला विजय मुंबईचा......... पहिला पराभव पंजाब चा

त्याचं नाव तरे आहे. इंग्लिश स्पेलिंग मुळे त्याला सगळे तारे म्हणतात. (असंच आपलं लिहितोय, त्याला वाईट वाटू नये म्हणून )

संदिप शर्माच्या सगळ्या विकेटस क्लास प्लेअर्सच्या आहेत. पुढच्या वर्षी तो चेन्नई कडे जाईल असे दिसते.

<< इंग्लिश स्पेलिंग मुळे त्याला सगळे तारे म्हणतात.>> म्हणून मीही तेच तारे तोडले ! Wink आतां ती चूक नाही करणार. धन्यवाद.
<<....पुढच्या वर्षीं तो चेन्नईकडे जाईल असं वाटतं >> धोनीच्या आवडी-निवडी गुणवत्ता व कामगिरीवरच अवलंबून असतातच असं नाहीं !! Wink

a-baMdyaa.JPG

चेन्नई, पंजाब, पाठोपाठ राजस्थानने आपली विजयी घोडदौड कायम राखल्यास आणि मुंबईने या विजयानंतर आपली विजयी दौड सुरू केल्यास १४ पैकी ७ सामने जिंकून अंतिम फेरीची स्वप्ने बघू शकते का? उर्वरीत ८ पैकी किमान ६ सामने जिंकायची करामत करावी लागेल पण पंजाबवरच्या विजयाने आत्मविश्वास आला असेल. पोलार्ड आणि मलिंगा हे मुंबईचे नेहमीचे ट्रंपकार्ड या विजयात चमकले हि जमेची बाजू. तारे रायडू गौतम हे छोट्यामोठ्या स्फोटक खेळी करू शकतात. बस्स आता शर्माला पुरेपूर सूर गवसून त्याने डावाला स्थैर्य देण्यात मोलाची भुमिका बजावावी.

- एक आशावादी मुंबईकर आणि मुंबई इंडियन्स सपोर्टर

अरेच्चा, डि व्हिलीयर्सला सलाम ठोकायलाही कुणी आलं नाही इथं ! ह्या आयपीएल मधील एक सर्वोत्कृष्ट खेळी केली काल एबीने बंगलोरला जिंकून देण्यासाठी.
[ काल शेवटी खरी निर्णायक लढाई होती स्टेन वि. एबी; पण एबीने स्टेनलाही झोडलाच. पण सामना संपतांच आपला संघ हरलाय याची पर्वा न करतां स्टेनने आपल्या या देशवासीयाला ज्या कौतुकाने व प्रेमाने मिठी मारली, तें पाहून कौतुक वाटलं. Blood is thicker than water, याचा प्रत्यय आला ! ]

डि व्हिलीयर्सच्या जागी धोनी नि स्टेनच्या जागी एखादा भारतीय बॉलर तर लोकांचे काय reactions असती ? Wink

१-२ वर्षांपूर्वी पण असेच स्टेनच्या एका ओव्हरमधे २३ धावा काढल्या होत्या. एकाच टीममधून खेळत असल्यामूळे स्टेनच्या बॉलिंगचा अधिक अंदाज येत असेल का ? शेवटची सिक्स जबरदस्त होती.

<< डि व्हिलीयर्सच्या जागी धोनी नि स्टेनच्या जागी एखादा भारतीय बॉलर तर लोकांचे काय reactions असती ? >> " मुद्दामच दिले रे धोनीला मारायला; नाय तर इंडियाच्या टिममधे येण्याचा चान्सच नाही ना त्याला ! ", ही रिअ‍ॅक्शन तर अपेक्षित नाही ना ? Wink
पण स्टेनच्या बाबतीत याच संदर्भात एक गोष्ट जाणवली; भुवीसारखे गोलंदाजही अशा वेळीं आतां ऑफ स्टंपबाहेर 'वाईड'च्या सीमेवरच मुख्यत्वें मारा करतात. स्टेन सहसा तसं करत नाही. तो विकेट घेण्याचाच प्रयत्न करतो. पण काल नाईलाजाने त्याला त्यावेळीं तसा चेंडू टाकावाच लागणार याचा नेमका अंदाज घेवून एबीने आधीच ऑफ स्टंपबाहेर जावून तो शेवटचा अफलातून षटकार मारला.
<< एकाच टीममधून खेळतात म्हणून..... >> दाट शक्यता आहे; अति परिचयात अवज्ञा !!! Wink

राजस्थान -१७०.
केकेअर -आज प्रथमच उथाप्पा व गंभीर इतक्या आत्मविश्वासाने व बहरात येवून खेळताना दिसताहेत. ५०-०

Pages