आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण. द्रविड साठी IPL च काय, पण गल्ली क्रिकेट, बोळ क्रिकेट, पायवाट क्रिकेट ... कुठलंही क्रिकेट बघीन मी.

इथल्या आचारसंहीतेचं मुख्य कलम - " भाऊ, मागें तर तुम्ही असं म्हटल होतंत, आतां उलटं कसं बोलताय ? ", असले अडचणीत टाकणारे प्रश्न कुणीही कुणालाही विचारायचे नाहीत; येईल तो चेंडू वाटेल तसा टोलवायचा. बस्स !! Wink

उदयन, तो डग-आऊट मधे तर असेल ना? तो प्रेक्षकांत असेत, नव्हे पार्किंग लॉट मधे असेल तरिही मी मॅच बघीन. (तशीही बघीनच Wink )

या IPL मध्ये द्रविड नाही म्हणून बरेच आहे. तसा पण तो T-२० च्या लायकीचा प्लेयर नाही आहे. मागच्या दोन्ही IPL मध्ये त्याचा performance एकदमच खराब होता.

अमोल सूर्यवंशी: नोबॉल. फ्री हिट Wink

असो. तुमच्या मताचा आदर आहे. तज्ञांच्या मते राजस्थान संघाच्या आश्चर्यकारक प्रगतीमधे द्रविड चा वाटा खूप मोलाचा आहे आणी चाहत्यांच्या मते, he is the best.

तुमच्या ह्या पोस्टमुळे जरा शोधाशोध करायची संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद.

IPL च्या रेकॉर्ड्स मधे सर्वाधिक धावा केलेल्या फलंदाजात द्रविड १० व्या क्रमांकावर आहे (८९ सामन्यात, ८२ इनिंग्स मधे ५ वेळा नाबाद राहून, २१७४ धावा, २८.२३ ची सरासरी, ११५.५१ चा स्ट्राईक रेट, ११ अर्धशतकं.) सेहवाग तितक्याच धावा काढून ९ व्या क्रमांकावर आहे आणी ७ अधिक सामने आणि ६९ अधिक धावा काढून धोनी ८ व्या क्रमांकावर आहे. ही माहिती पाहून खूप मस्त वाटलं आणी आधीच आवडणारा द्रविड अधिक आवडून गेला (if it is even possible!)

जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी
आजाणत्यांच्या चुकीच्या विश्लेषणा साठी एक वेगळा धागा काढता का इथेच लिहू मी? Happy
भाउ, व्यंगचित्राला सुरुवात होऊ द्या.
दररोज एक तरी पाहिजे! म्हणजे मी गप्प बसीन. नाहीतर लिहीतच जाईन!

फेरफटका.... गुडवन!
पण माझ्या मते त्याचे आकडे फारसे महत्वाचे नाहीत...... तो संघात आहे हा भरवसाच खुप मोठा असतो.... त्याची जिगर, त्याची खेळावरची निष्ठा, अथक परीश्रम, सेल्फलेसनेस आणि किंचितही न डोकावणारा अंहकार त्याला एक असामान्य खेळाडू बनवून जातात Happy

स्वरुप, अगदी खरय. पण हे qualitative / subjective analysis, supporters, fans, experts ना पुरतं. critics साठी आकडेवारी द्यावी लागते. पण एक गंमत सांगतो. दर वेळी आकडेवारी पाहिली की द्रविड चं एक खेळाडू म्हणून मोठेपण अधिकाधिक सिद्ध होत जातं.

<< दररोज एक तरी पाहिजे! म्हणजे मी गप्प बसीन. नाहीतर लिहीतच जाईन! >> झक्कीजी, माबोकराना 'इकडे आड, तिकडे विहीर' अशा कैचीत पकडताय तुम्ही !! -

A-koti.JPG

MI team composition बघायला मजा येणार आहे. हसी, पोलॉर्ड, अँडरसन, मलिंगा, शर्मा, रायुडू, भज्जी, ओझा, झहीर हे नक्की आहेत. पण त्या नम्तरच्या जागा भरायला फारसे मह्त्वाचे भारतीय खेळाडूच नाहियेत. तेंव्हा एकतर काहि तरी जबरी झोल झाला आहे बिडींग करताना किंवा फारसे नावाजलेले नसलेले खेळाडू पण जे भरवशाचे ठरतील असे वाटले असे उचललेले आहेत. त्यांनी त्यांचा वाटा उचलला नाही तर MI चालले बाहेर. त्यांच्यातले rishi dhawan category मधले किती जण निघतील असे वाटते ?

तो संघात आहे हा भरवसाच खुप मोठा असतो.... त्याची जिगर, त्याची खेळावरची निष्ठा, अथक परीश्रम, सेल्फलेसनेस आणि किंचितही न डोकावणारा अंहकार त्याला एक असामान्य खेळाडू बनवून जातात स्मित >> +१

<< त्याची जिगर, त्याची खेळावरची निष्ठा, अथक परीश्रम, सेल्फलेसनेस आणि किंचितही न डोकावणारा अंहकार त्याला एक असामान्य खेळाडू बनवून जातात स्मित >> द्रविड हा असामान्य खेळाडू आहे हें नि:संशय. पण << तो संघात आहे हा भरवसाच खुप मोठा असतो.... >> याबद्दल साशंकता आहे; कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे आयपीएलसारख्या खेळाच्या 'मिनी फॉर्मॅट' मधे त्याच्या [ किंवा कोणत्याही असामान्य खेळाडूच्या ] या गुणविशेषांमुळे केवळ त्याच्या संघात असण्याने खरंच फार मोठा फरक पडेल का ? आयपीएलचा एकंदरीत अनुभव तरी याला पुष्टी नाही देत.

याबद्दल साशंकता आहे; कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे आयपीएलसारख्या खेळाच्या 'मिनी फॉर्मॅट' मधे त्याच्या [ किंवा कोणत्याही असामान्य खेळाडूच्या ] या गुणविशेषांमुळे केवळ त्याच्या संघात असण्याने खरंच फार मोठा फरक पडेल का ? >> ह्यावेळच्या द्रविड नसलेल्या राजस्थान रोयाल च्या खेळाने कळेलच काय ते.

याबद्दल साशंकता आहे; कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे आयपीएलसारख्या खेळाच्या 'मिनी फॉर्मॅट' मधे त्याच्या [ किंवा कोणत्याही असामान्य खेळाडूच्या ] या गुणविशेषांमुळे केवळ त्याच्या संघात असण्याने खरंच फार मोठा फरक पडेल का ? >> ह्यावेळच्या द्रविड नसलेल्या राजस्थान रोयाल च्या खेळाने कळेलच काय ते.

आयपील मधे लोकल (देशी) खेळाडू किती चांगले खेळतात ह्याने फार फरक पडतो असे मला वाटते.

>>केवळ त्याच्या संघात असण्याने खरंच फार मोठा फरक पडेल का ?
त्याच्या जुन्या आरसीबी मध्ये किंवा अन्य एखाद्या स्टारस्टडेड लाईनअपमध्ये पडलाही नसता कदाचित... पण रहाणे, सॅमसन, बिन्नी, दिशांत याग्निक, सचिन बेबी, श्रीवत्स गोस्वामी आणि अशोक मनेरिया या लाईनअपमध्ये त्याच्या असण्याने फारच फरक पडत होता.... यातले काही उद्याचे स्टार असतीलही पण गेला मोसम सुरु होताना यात भरवश्याचा फक्त एकच होता... द वॉल!
कित्येक वेळा त्याने दिलेल्या भक्कम सुरुवातीच्या जोरावर हॉज आणि बिन्नी शेवटच्या षटकात हल्ला करु शकले.... असो... या मोसमात देखील राजस्थानच माझा फेव्हरीट असेल.... शेन वॉटसन या सगळ्या यंग ब्रिगेडला कसा हाताळतोय यावर सगळे आहे.... द्रवीडच्या स्वभावानुसार संघनिवड आणि मैदानावर घ्यायच्या इतर निर्णयांबद्दल तो फारशी ढवळाढवळ करणार नाही.... तो एक सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करेल!

स्पर्धेच्या सुरुवातीला तरी वॉटसन, हॉज आणि फॉल्कनर हे निश्चितपणे संघात असतील आणि चौथ्या स्थानासाठी स्मिथ, साउदी, कूपर, कटींग आणि रिचर्डसनमध्ये चुरस असेल

राष्ट्रीय संघातुन खेळल्यामुळे रहाणे आणि बिन्नीचा आत्मविश्वास वाढला असेल तसेच गेल्या आयपीएलमधील आणि चॅम्पियन ट्रॉफीमधल्या कामगिरीने सॅमसनकडूनही खुप अपेक्षा आहेत.... उन्मुक्त चंदच्या (जरी तो गेल्या मोसमात फारसा चांगला खेळला नसला तरी त्याची अंडर-१९ कामगिरी खुप चांगली आहे) आणि अभिषेक नायरच्या समावेशामुळे फलंदाजीत चांगल्या लोकल टॅलेंटची भर पडली आहे
रजत भाटीयाच्या रुपाने संघाला अजुन एक ऑल राउंडर मिळाला आहे.... प्रवीण तांबेची फिरकी गेल्या मोसमाइतकी प्रभावी ठरेल का हे बघायला आवडेल

जयपूरच्या अभेद्य किल्ल्यात ते एकही सामना खेळणार नाहीयेत ही एक चिंतेची बाब असली तरी जिगरी रॉयल्स त्यावरही मात करतील अशी अपेक्षा आहे

एकूण काय तर पाच जुन्या स्टार्सना रिटेन करुन, हॉज आणि कूपरला ऑक्शनमध्ये स्वताकडे राखून आणि परंपरेप्रमाणे गुणी भारतीय तरुण खेळाडू निवडून राजस्थानने सुरुवात तरी चांगली केली आहे.... पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा Happy

द्रवीडच्या जागी वॉटसन कर्णधार झाल्यामुळे आरआरचे फेअरप्ले रँकींग मात्र खाली येण्याची शक्यता आहे (आठवा: पोलार्ड्-वॉटसन खडाजंगी)..... एज ए कॅप्टन वॉटसनने थोडा संयम राखायला शिकले पाहिजे!

>> हसी, पोलॉर्ड, अँडरसन, मलिंगा, शर्मा, रायुडू, भज्जी, ओझा, झहीर हे नक्की आहेत. पण त्या नम्तरच्या जागा भरायला फारसे मह्त्वाचे भारतीय खेळाडूच नाहियेत

आदित्य तरे आणि बुमराह आहेत की!

जयपूरच्या अभेद्य किल्ल्यात ते एकही सामना खेळणार नाहीयेत ही एक चिंतेची बाब असली >> गेल्या वर्षीची त्यांची हि अतिशय मह्त्वाची strategy होती. (bouncy wickets) यंदा तसे नसल्यामूळे काय होईल हे बघूया.

आदित्य तरे आणि बुमराह आहेत की! >> मह्त्वाचे हा कळीचा शब्द आहे रे. बेसिकली मलिंगा वगळता इतर कोणाही की प्लेयर साठी योग्य बॅकप नाहिये हा भाग नडू शकतो. उद्या हसी किंवा शर्मा खेळू शकले नाहित तर सगळे जमिनीवर येणार. पोलार्ड नि अँडरसन injury scare मधून बाहेर येताहेत.

................ दिनांक ..................वेळ ..........................सामना ....................ठिकाण

१) बुधवार- .........१६ एप्रिल ...... रात्री ८ ............. मुंबई वि. कोलकाता ...........अबूधाबी

२) गुरुवार- .........१७ एप्रिल ......रात्री ८ .............दिल्ली वि. बंगलोर ............. शारजा

३) शुक्रवार-........ १८ एप्रिल ......दु. ४ ................ चेन्नई वि. पंजाब ............... अबूधाबी

४) शुक्रवार-........ १८ एप्रिल...... रात्री ८.............. हैदराबाद वि. राजस्थान ...... अबूधाबी

५) शनिवार-.........१९ एप्रिल ....... दु. ४ ................ बंगलोर वि. मुंबई............... दुबई

६) शनिवार-........ १९ एप्रिल....... रात्री ८ ............. कोलकाता वि. दिल्ली .......... दुबई

७) रविवार-......... २० एप्रिल ....... रात्री ८ ............. राजस्थान वि. पंजाब ...........शारजा

८) सोमवार- ........२१ एप्रिल ....... रात्री ८ ............. चेन्नई वि. दिल्ली ..............अबूधाबी

९) मंगळवार-........२२ एप्रिल....... रात्री ८............. पंजाब वि. हैदराबाद............ शारजा

१०) बुधवार- ........२३ एप्रिल ........ रात्री ८ ............ राजस्थान वि. चेन्नई.......... दुबई

११) गुरुवार-....... .२४ एप्रिल ........रात्री ८ ............बंगलोर वि. कोलकाता......... शारजा

१२) शुक्रवार-...... ..२५ एप्रिल ........दु. ४ .............. हैदराबाद वि. दिल्ली ............. दुबई

१३) शुक्रवार-........ २५ एप्रिल ........ रात्री ८ ........... चेन्नई वि. मुंबई................... दुबई

१४) शनिवार- ........२६ एप्रिल ........ दु. ४ .............. राजस्थान वि. बंगलोर ......... अबूधाबी

१५) शनिवार-......... २६ एप्रिल .......रात्री ८ ...........कोलकाता वि. पंजाब............ अबूधाबी

१६) रविवार- ..........२७ एप्रिल....... दु. ४ ..............दिल्ली वि. मुंबई................. .शारजा

१७) रविवार- ...........२७ एप्रिल ....... रात्री ८ ........... चेन्नई वि. हैदराबाद............ शारजा

१८) सोमवार- ..........२८ एप्रिल .......रात्री ८ ...........पंजाब वि. बंगलोर ................ दुबई

१९) मंगळवार-..........२९ एप्रिल ....... रात्री ८ .......... कोलकाता वि. राजस्थान ....... अबू धाबी

२०) बुधवार- .............३० एप्रिल ...... रात्री ८ ...........मुंबई वि. हैदराबाद............... दुबई

भारतातील सामने

२१) शुक्रवार- .............२ मे .............रात्री ८ ........... चेन्नई वि. कोलकाता ...........रांची

२२) शनिवार-..............३ मे ............. दु. ४ ............. मुंबई वि. पंजाब.................. मुंबई

२३) शनिवार-..............३ मे ............ रात्री ८ ...........दिल्ली वि. राजस्थान ...........दिल्ली

२४) रविवार- ..............४ मे ............रात्री ८ ...........बंगलोर वि. हैदराबाद ............बंगलोर

२५) सोमवार- .............५ मे ............. दु. ४ .............राजस्थान वि. कोलकाता ......अहमदाबाद

२६) सोमवार- .............५ मे ............रात्री ८ ............ दिल्ली वि. चेन्नई ................ दिल्ली

२७) मंगळवार- ............६ मे ............रात्री ८ ...........मुंबई वि. बंगलोर .................मुंबई

२८) बुधवार- ...............७ मे .............. दु. ४ .............दिल्ली वि. कोलकाता ........... दिल्ली

२९) बुधवार- ...............७ मे .............रात्री ८ ........... पंजाब वि. चेन्नई .................कटक

३०) गुरुवार- ...............८ मे ..............रात्री ८ ...........राजस्थान वि. हैदराबाद ........ अहमदाबाद

३१) शुक्रवार- ...............९ मे ............रात्री ८ ............बंगलोर वि. पंजाब ............... बंगलोर

३२) शनिवार- ..............१० मे ............दु. ४ .............दिल्ली वि. हैदराबाद .............दिल्ली

३३) शनिवार- ...............१० मे ...........रात्री ८ ...........मुंबई वि. चेन्नई ..................मुंबई

३४) रविवार- ................११ मे ...........दु. ४ ..............पंजाब वि. कोलकाता ........... कटक

३५) रविवार- ................११ मे ...........रात्री ८ ...........बंगलोर वि. राजस्थान ......... बंगलोर

३६) सोमवार- ...............१२ मे ...........रात्री ८ ...........हैदराबाद वि. मुंबई ............... हैदराबाद

३७) मंगळवार- .............१३ मे ............दु. ४ .............चेन्नई वि. राजस्थान .............रांची

३८) मंगळवार- .............१३ मे ...........रात्री ८ ...........बंगलोर वि. दिल्ली ..............बंगलोर

३९) बुधवार- ................१४ मे ............दु.४ ..............हैदराबाद वि. पंजाब ..............हैदराबाद

४०) बुधवार- ................१४ मे ...........रात्री ८ ........... कोलकाता वि. मुंबई .............. कोलकाता

४१) गुरुवार- ................१५ मे ...........रात्री ८ ............राजस्थान वि. दिल्ली ...........अहमदाबाद

४२) रविवार- ................१८ मे ............दु. ४ .............चेन्नई वि. बंगलोर ................. चेन्नई

४३) रविवार- ................१८ मे ............रात्री ८ ...........हैदराबाद वि. कोलकाता ..........हैदराबाद

४४) सोमवार- ................१९ मे ...........दु. ४ ..............राजस्थान वि. मुंबई .............अहमदाबाद

४५) सोमवार- ................१९ मे ........... रात्री ८ ............दिल्ली वि. पंजाब .................दिल्ली

४६) मंगळवार-.............. २० मे ...........दु. ४ ............... हैदराबाद वि. बंगलोर ............ हैदराबाद

४७) मंगळवार- ..............२० मे ..........रात्री ८ .............कोलकाता वि. चेन्नई ............कोलकाता

४८) बुधवार- .................२१ मे .......... रात्री ८ ..............पंजाब वि. मुंबई ...................चंदिगड

४९) गुरुवार- .................२२ मे ...........दु. ४ ...............कोलकाता वि. बंगलोर ........... कोलकाता

५०) गुरुवार- .................२२ मे ...........रात्री ८ ............चेन्नई वि. हैदराबाद ..............चेन्नई

५१) शुक्रवार- ................२३ मे ............दु. ४ ...............मुंबई वि. दिल्ली ................... मुंबई

५२) शुक्रवार- ................२३ मे ...........रात्री ८ .............पंजाब वि. राजस्थान .............चंदिगड

५३) शनिवार- ...............२४ मे ...........दु. ४ ................बंगलोर वि. चेन्नई .................बंगलोर

५४) शनिवार- ...............२४ मे ............रात्री ८ ............. कोलकाता वि. हैदराबाद .........कोलकाता

५५) रविवार- ................२५ मे .............दु. ४ ...............पंजाब वि. दिल्ली ..................चंदिगड

५६) रविवार- .................२५ मे ............ रात्री ८ .............मुंबई वि. राजस्थान .................. मुंबई

५७) मंगळवार- ..............२७ मे ...........रात्री ८ ..............क्वालिफायर-१ ...................... चेन्नई

५८) बुधवार- ..................२८ मे ..........रात्री ८ ...............एलिमिनेटर ..........................चेन्नई

५९) शुक्रवार- .................३० मे ...........रात्री ८ ................क्वालिफायर-२ ..................... मुंबई

६०) रविवार- ...................१ जून ........रात्री ८ ............... अंतिम सामना ........................ मुंबई

तज्ञांच्या मते राजस्थान संघाच्या आश्चर्यकारक प्रगतीमधे द्रविड चा वाटा खूप मोलाचा आहे >>>>

ह्यात द्रविड चा वाटा आहे का मय्यप्पन चा हात आहे?

Pepsi_IPL_2014_Schedule - !!!.jpg

Pages