आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< आजच्या मॅच मधे विराट , गेल, युवी चालले तर दिल्लीवाल्यांना देवच वाचवु शकेल >> शिवाय,डी व्हीलीयर्सही चालला तर आज देवही नाही वाचवूं शकणार पीटर्सनशिवाय खेळणार्‍या दिल्लीला !! पण ... देव हल्ली तसा नाहीच पडत टी-२०च्या भानगडीत. त्यामुळे तसं कांहींही होऊं शकतं म्हणा तिथं !!! Wink

MI चे बेस्ट बॅट्स्मन शर्मा नि पोलार्ड खूप खाली खेळले. तारेऐवजी रायुडूला ओपन करायला लावून शर्मा नि पोलार्ड ह्यांनी ३ व ४ वर यायला हवे. मग अँडरसनला खाली binge hitter म्हणून वापरता येईल. तारे, रायुडू नि गौथम ह्यांच्याकडे reserve म्हणून बघायला हवे.

१) हसी म्हातारा झालाय का? >> त्याने यंदाच्या बीग बॅशमधे बरेच रन्स काढलेत तेंव्हा काही मॅचेस मधे ठरेल.

तसेही MI कडे अजिबात backup depth नाहिये तेंव्हा आहे त्यापेक्षा फारसे काही वेगळे करता येणार नाही.

<< MI चे बेस्ट बॅट्स्मन शर्मा नि पोलार्ड खूप खाली खेळले.>> पोलार्डची मॉर्केलने उडवलेली तारांबळ बघून तो वर येवूनही कांहीं फरक पडला असता असं नाही वाटत.

मॉर्केल अप्रतिम गोलंदाजी करत होता काल... शर्मा आउट नसता झाला तर शक्यता होती मुंबैला. त्यानी मॉर्कला पहिलाच चेंडू अप्रतिम फटकावला होता..

आजची भिस्त बंगलोर च्या बॅटींग वर...... बॉलिंग मधे मुरलीधरन शिवाय कोणी खास नाही आहे... रामपाल मॉर्कल च्या रस्त्यावर चालला तर परिणामकारक ठरेल

उदयन... काय पण तुलना करताय.. अगदीच इंद्राचा ऐरावत आणि शामाभट्टाची तट्टाणी की...

रामपाल मॉर्कल एव्हढा स्पीड गाठणे शक्य नाहीये..

अहो मी रस्त्यावर चालण्याचे बोललोय....... पळण्याचे नाही.... अचुक गोलंदाजी नावाचा प्रकार केला तरी चालेल... भुवनेश्वर कुमार जसा करतो

रामपाल खूप सही गोलंदाज आहे. नवीन चेंडूवर वा किंचीत जुन्या चेंडूवर सुद्धा तो करामत दाखवतो. चेहर्‍यावरून वाटत नाही पण विकेटटेकर बॉलर आहे.

१) हसी म्हातारा झालाय का? >> त्याने यंदाच्या बीग बॅशमधे बरेच रन्स काढलेत तेंव्हा काही मॅचेस मधे ठरेल.
>>>>>>>
इन्शाल्लाह असेच व्हावे. हसीचे पुर्ण भरात खेळणे मुंबईच्या बॅटींगलाईनला खूप गरजेचे नाहीतर कठीण जाईल हि स्पर्धा मुंबईला.
मात्र या वयात, या फॉर्मेटमध्ये फॉर्म गेला तर बरेचदा तो परत मिळवणे अवघड होऊन बसते म्हणून हि भिती. पाँटींगचा भार मुंबईने सहन केलाय त्याचा अनुभव ताजा आहे.

तसेही MI कडे अजिबात backup depth नाहिये तेंव्हा आहे त्यापेक्षा फारसे काही वेगळे करता येणार नाही.
>>>>>
याला +७८६ .. हेच खरे अवघड जागेचे दुखणे आहे. मुंबईला आहे त्या रिसोर्समध्येच कल्पकता दाखवावी लागणार. आणि वेळीच. अर्थात हा पहिलाच सामना असल्याने अंदाज वर्तवायची घाई नकोच. Happy

काल नरैन व मॉर्केलला अनूकूल खेळपट्टीही होती. दिल्लीची तशी मर्यादीत गोलंदाजी बंगलोरच्या मजबूत फलंदाजीसमोर आज किती चालते हे शारजाच्या खेळपट्टीवरही बरचसं अवलंबून असेल.

दिंडा ला किती बरं वाटत असेल ना? तो ह्या वेळी गेल च्या बाजूला आहे, विरुद्ध बाजूला नाही:);)

दिंडा कडून चांगल्या कामगिरी ची अपेक्षा असलेली लोकं बहुदा स्वतः दिंडा, गांगुली आणी आता कोहली ईतकीच माहीत आहेत मला.

दिल्ली च्या बॅटिंग मधले डोमेस्टिक प्लेयर्स कमकुवत वाटताहेत.

बंगलोरची बॉलिंग चांगलीच चालू आहे की... वाट लागलीये दिल्लीची पार... टेलर आणि ड्युमिनी खेळले तर थोडेफार रन्स होतील..

दिंडा माझा विश्वास सार्थ ठरवतोय. बाकीचे चारही बॉलर्स अनुक्रमे ६, ६, ३, ४ च्या सरासरीनं बॉलिंग करत असताना, हा एकटाच १० च्या सरासरीने बॉलिंग करतोय. दिंडा च्या २ ओव्हर्स मधे २० जर बाजुला काढले, तर दिल्ली, ११ ओव्हर्स मधे ५४ रन्स वर आहे.

ऑफ स्टंपबाहेर यॉर्कर टाकत रहाणं हा बचावात्मक डांवपेंच आतां खूपच सवंग व कंटाळवाणा होतोय असं नाहीं वाटत ?
हा चहाल आवडायला लागलाय आपल्याला ! छान , लयबद्ध व जोशपूर्ण शैली आहे व 'फ्लाईट ' व गुगलीही नेमकी वापरतो !
१४० + ही धांवसंख्या बंगलोरसाठी कठीण नसली तरीही फाजील आत्मविश्वास दाखवणं मात्र त्याना महागही पडूं शकतं.
डुमिनी व टेलर व्यावसायिक व मुरलेले फलंदाज वाटले. अर्थात आहेतच. शेवटचे दोन चेंडू डुमिनीला खेळूं देणं ही टेलरची शक्कल संघाला १० धांवा देवून गेली !!

डुमिनी व टेलर व्यावसायिक व मुरलेले फलंदाज वाटले. अर्थात आहेतच.
+७८६
सामना बघणेबल केलाय त्यांनी नाहीतर १२० च्या आसपास थांबले असते तर कोहलीने डाव्या हाताने खेळून जिंकवले असते.

"कोण बोलले की गेलच्या संघात असल्याने डींडा खुश आहे????" - मीच तो. सॉरी शक्तीमान! Wink

बहुदा ड्युमिनी ने येता येता दिंडाला सांगितलं असावं, माझं नाव जिन-पॉल ड्युमिनी, पण मला सगळे लाडाने ख्रिस म्हणतात.

हा चहाल आवडायला लागलाय आपल्याला ! छान , लयबद्ध व जोशपूर्ण शैली आहे व 'फ्लाईट ' व गुगलीही नेमकी वापरतो >> चहल त्यासाठी फेमस आहे. त्यासाठीच त्याच्यावर बिडींग झाले होते.

डुमिनी व टेलर ल एव्हढ्या खाली का खेळवले ?

>>डिंडा साठी सगळेच गेल आहे>>
खरय अगदी
पण मला प्रश्न असा पडलाय की अ‍ॅरॉन आणि अ‍ॅल्बीच्या एकेक ओव्हर शिल्लक असताना दिंडाला का दिली शेवटची ओव्हर?

<< ....पण मला सगळे लाडाने ख्रिस म्हणतात.>> त्यावर दिंडा म्हणाला, " माझंही नांव दिंडा असलं तरी सगळे मला लाडाने 'झोडा याला'च म्हणतात " !! Wink

भाऊ, आपल्या प्रंप्रिय (चुकून नाही, मुद्दाम लिहिलय तसं) दिंडा साठी काहीतरी चिताराल का? anyway, he is portrayed as one of the worst bowlers, but you may portray him as something else Wink

पण मला प्रश्न असा पडलाय की अ‍ॅरॉन आणि अ‍ॅल्बीच्या एकेक ओव्हर शिल्लक असताना दिंडाला का दिली शेवटची ओव्हर? >> कारण त्यांना सगळे नंतर दिंडा म्हणायला लागले असते Lol

आईच्या गा वा त .. कोहलीची हलवा कॅच सोडली.. दिल्लीने पहिल्याच सामन्यात आयपीएलची ट्रॉफी घालवली Proud

Pages