आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच
माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!
असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)
नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)
अहो ती युवराजची सापडलेली लय
अहो ती युवराजची सापडलेली लय आज कुठे गेली? नि कोहली ला काय झाले? अति आत्मविश्वासामुळे डवखुरा खेळला की काय? की चहाटळ नि स्टार्क सुद्धा शेवटच्या पाच षटकात ५० धावा करून जिंकून टाकतील असे वाटले त्याला?
की Cricket is a game of uncertainty याची लोकांना पुनः आठवण करून द्यायची आहे?
मला काय म्हणा त्याचे, कुठलाहि संघ हरला काय नि जिंकला काय, मी तर कुणावरच पैसे लावले नाहीत.
२०-२० बघण्यापेक्षा बेसबॉल बरा! आलेला चेंडू फटकवायचा नि धावायचे असाच खेळ आहे, शिवाय चीअर लीडर्स नाहीत नि सारखे सारखे, मोठ्ठा मोठ्ठा काळा चष्मा लावणारी ती मुलगी दाखवत नाहीत. काय काम असते त्या मुलीचे सगळे सामने बघायला येते ती? का वेगळ्या वेगळ्या मुली असतात, नि त्यांना पण निरनिराळ्या संघानी विकत घेतले असते खेळाडूंसारखे?
असो. आमच्या वेळी आम्ही कधी हे प्रकार बघितले नव्हते.

च्यायला..... एकपण प्लेयर
च्यायला..... एकपण प्लेयर चालेना झालाय यंदाच्या लीगमध्ये!
कोहली, गंभीर आज दोघेही शून्यावर आउट.... श्या!
धन्यवाद भाऊ! छान आहे
धन्यवाद भाऊ! छान आहे व्यंगचित्र.
, शिवाय चीअर लीडर्स नाहीत नि
, शिवाय चीअर लीडर्स नाहीत नि सारखे सारखे, मोठ्ठा मोठ्ठा काळा चष्मा लावणारी ती मुलगी दाखवत नाहीत. काय काम असते त्या मुलीचे सगळे सामने बघायला येते ती? का वेगळ्या वेगळ्या मुली असतात, नि त्यांना पण निरनिराळ्या संघानी विकत घेतले असते खेळाडूंसारखे? >> मग बेसबॉलमधे काय बघता ?
"असो. आमच्या वेळी आम्ही कधी हे प्रकार बघितले नव्हते." ह्याच्या नंतरच हसरा स्मायली सवयीने पडलाय असे वाटले
<< एकपण प्लेयर चालेना झालाय
<< एकपण प्लेयर चालेना झालाय यंदाच्या लीगमध्ये! >> 'फॉरीन'च्या पीचवर 'फॉरीन प्लेयर्स'नीच चालायचं व इंडियात आपल्या प्लेयर्सनी, हा नेहमीचा नियम तर ह्या स्पर्धेसाठीही लागू होणारच ना !!! डुमिनी, टेलर
पासून सुरवात झालीय ना याला !!
माझा कँप्टन डुमनी होता जाम
माझा कँप्टन डुमनी होता
जाम भारी
कोहली ० वर गेला याचा जल्ला नुक्सान झाला बघा
माझा पांडे बी लई चाल्ला बघा
मुंबईतुन तो खेळायचा तेंव्हां
मुंबईतुन तो खेळायचा तेंव्हां सचिनचा डुमीनीवर खूप भंरवसा असल्याचं जाणवायचं. पण तेंव्हा त्याने फारशी भरीव कामगिरी नाही केली. पण आतां डीडीतून खेळताना मात्र तो पूर्ण बहरात आलाय ! मुंबईच्या 'स्टार-स्टडेड' संघात आपली कर्तबगारी दाखवायचं खास 'मोटीव्हेशन' त्याला नव्हतं कीं काय ? ह्या 'आयपीएल'वर एकंदरीच द. आफ्रिकेच्या खेळाडूंचं वर्चस्व रहाणार असं दिसतंय !
केकेआरकडे इतकी भेदक गोलंदाजी असूनही १६६चं लक्ष्य पार करणं यासाठी दिल्लीला सलाम ! निवडणूकीनंतर दिल्लीला नवीन 'डेव्हील्स' आले तरीही ह्या 'दिल्ली डेव्हील्स'वर लक्ष ठेवावंच लागणार, असं दिसतंय !
दिल्लीच्या या हंगामातील
दिल्लीच्या या हंगामातील प्रभावी कामगिरीचं बरचसं श्रेय केव्हीन कर्स्टनलाही निश्चितपणे जात असावं. काल सामना संपल्यावर बक्षिससमारंभात कार्तिक व डुमिनी दोघानीही आवर्जून आदराने व आपुलकीने त्याचा उल्लेख केला. " He's (Kirsten) got the personality that makes you want to really be successful for him and the franchise ", पीटरसननेही ह्या शब्दांत 'क्रिकइन्फो'वर कर्स्टनबद्दल आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. [ हें मुद्दाम विस्ताराने सांगण्याचं कारण- प्रशिक्षक, 'मेंटॉर' इत्यादींचा टी-२०मधे प्रभाव फारच दुय्यम असतो, असं मींच वर म्हटलं होतं; कर्स्टन, द्रविडमुळे इ.मुळे मला आतां याचा पुनर्विचार करणं भाग पडतंय !]
वाह भाऊ !!!
वाह भाऊ !!!
कॉमेंट्री बॉक्समधे
कॉमेंट्री बॉक्समधे कार्तिकच्या 'लेफ्ट-आर्म स्पीनींग अॅक्शन'चं कौतुक अगदीं गेला पोचलं असतानाच सॅमसनने त्याला एक अप्रतिम षटकार ठोकला ! कॉमेंट्री बॉक्समधली चलबिचल स्पष्ट जाणवली !! सॅमसन हा जात्याच आक्रमक - व शैलीदारही - फलंदाज वाटतो.
जयपूर - ८५-२ [ सॅमसन - नाबाद ३१ - २ षटकार].
सांगण्यात आनंद होत आहे की
सांगण्यात आनंद होत आहे की मैक्सवेल कँप्टन आहे
डुमिनी, टेलर,.. आज..मॅक्सवेल,
डुमिनी, टेलर,.. आज..मॅक्सवेल, मिलर..... अजूनही अफलातून मॅच-विनींग खेळी बव्हंशी 'फॉरीन' खेळाडूंकडूनच होताहेत !!
अभिनंदन पंजाब.
संजू पण चांगला खेळला आज
संजू पण चांगला खेळला आज
<< संजू पण चांगला खेळला आज
<< संजू पण चांगला खेळला आज >> निर्विवाद व मीं म्हटलंयही << सॅमसन हा जात्याच आक्रमक - व शैलीदारही - फलंदाज वाटतो >> असं. तसा काल पुजाराही छान खेळला. पण ह्या खेळी धडाकेबाज, अफलातून नाही वाटल्या मॅक्सवेल व मिलर यांच्या खेळींसमोर, इतकंच.
काल दोन गोष्टी मला तरी खटकल्या - १] पुजाराचे काळे बूट - खूपच विचित्र व विसंगत दिसत होतं मैदानावर एकट्यानेच असे बूट वापरणं व २] दिल्लीच्या मालकीणबाईंचे खास कॅमेर्यासाठीच केलेले कृत्रिम, नाटकी हावभाव व नाचणं !!
Rank ................. Team
Rank ................. Team Name ................. Manager.................Points
1............................BLAST TEAM..............uday inadmar...........1717
2..............................Galli X.......................ISujit Pande...............1060
3...........................Gargi winners.............GARGI PANDE............888
4..........................Perfect Punch..............Swaroop Kulkarni........868
कालची मॅच डेंजर होती राव. काय
कालची मॅच डेंजर होती राव. काय धुतलाय त्या मॅक्सवेल नी.. आणि नंतर मिलर नी पण.. हे दोघे असेच चालले तर पंजाब सेमी मध्ये नक्की... तरी शॉन मार्शला बाहेरच बसवलय अजून..
ते तिघे ही चालायला लागले तर
ते तिघे ही चालायला लागले तर यंदा पंजाब बाजी मारेल
कालची मॅच डेंजर होती राव. काय
कालची मॅच डेंजर होती राव. काय धुतलाय त्या मॅक्सवेल नी.. आणि नंतर मिलर नी पण >> +१. फक्त हे असेच चालेल का शेवटपर्यंत हि शंका आहे. गेल्या वेळचे गेल नि कोहली आठवा.
संजू पण चांगला खेळला आज >> निर्विवाद व मीं म्हटलंयही << सॅमसन हा जात्याच आक्रमक - व शैलीदारही - फलंदाज वाटतो >> +१. मागच्या चँपियन्स ट्रॉफी मधली त्याची खेळी आठवा. फक्त अजून पॉलिश्ड व्हायची गरज आहे. त्याचे विकेट किपीम्ग कसे आहे ?
उदयन हा archive होणारा बाफ आहे तेंव्हा दर मॅचनंतर स्कोर टाकण्यापेक्षा हेडरमधे अपडेट करत जा अशी विनंती.
असामी... बाफ माझा नाही हो ...
असामी... बाफ माझा नाही हो ... स्वरुप यांचा आहे... पहिल्यांदाच स्कोर टाकला आहे फँटसीचा...
दर मॅच नंतर टाकल्यावर मज्जा निघुन जाईल.. ५ - १० मॅच नंतर देउ वाटल्यास...
५७.५% मॅच संपली तरिही आज एकही
५७.५% मॅच संपली तरिही आज एकही प्रतिक्रिया नाही!! दोन्ही संघांचा (lack of) charisma म्हणायचा की काय?
खुप स्क्रोल करावे लागत
खुप स्क्रोल करावे लागत असल्यामुळे धाग्याच्या हेडरमधले टाईमटेबल काढून टाकले आहे
दिल्लीची पार वाट लावून
दिल्लीची पार वाट लावून टाकलीय
डू-प्लेसिसचे दोन्ही कॅचेस अप्रतिम होते.... आणि रैनाचा सुद्धा!
समोरच्या टीमची दयनीय अवस्था झाली असताना जडेजा आणि अश्विनच्या गोलंदाजीला भलतीच धार चढते
काहो ते ऑरेंज कॅप, पर्पल कॅप
काहो ते ऑरेंज कॅप, पर्पल कॅप प्रकार केंव्हा सुरू होणार? की झाले पण?
भुवनेशः ४-०-१९-३ ....
भुवनेशः ४-०-१९-३ .... मस्तच!
मॅक्सवेल चा कॅच वॉर्नर च्या हातून सुटायला नको होता. त्या वेळी तो फक्त १० वर होता.
<< भुवनेशः ४-०-१९-३ ....
<< भुवनेशः ४-०-१९-३ .... मस्तच!>> +१. तो विचारपूर्वक गोलंदाजी करतो असं सतत जाणवतं !
सध्याचा फॉर्म बघतां, सेहवाग - पुजाराने बरीशी सुरवात करून दिली व मॅक्सवेल, मिलर व बेली यापैकी दोघे जरी ६-७ षटकं खेळले तरी कींग्ज इलेव्हन भलं मोठं लक्ष्य उभं/पार करूं शकतात, हें नक्की. सगळेच संघ मॅक्सवेल्-मिलरसाठी व्यूहरचना काय करावी या विवंचनेतच असावेत ! भारतातल्या खेळपट्ट्यांवरही ह्या जोडीचा फॉर्म असाच राहील का, हाही एक प्रश्न आहेच.
"भारतातल्या खेळपट्ट्यांवरही
"भारतातल्या खेळपट्ट्यांवरही ह्या जोडीचा फॉर्म असाच राहील का, हाही एक प्रश्न आहेच." - मलाही हीच शंका आहे. UAE मधल्या खेळपट्ट्या पाटा आहेत. पण जर बॉल वळायला लागले, खाली रहायला लागले, तर हे फलंदाज कसे खेळतील हे पहाणं खूप औत्सुक्याचं ठरेल.
आज राजस्थान - चेन्नई. हल्ला बोल!
राजस्थान जडेजा -
राजस्थान

जडेजा - सुपर्कींग्जच्या १४० मधे नाबाद ३६; ३३ धांवात राजस्थानचे ४ बळी !!
धोनीने त्याला 'जडेजा सर' म्हटल्यापासून तो जडेजा धोनीसाठी काय वाट्टेल ते करायला मागे पुढे पहात नाही !
भारतातल्या खेळपट्ट्यांवरही
भारतातल्या खेळपट्ट्यांवरही ह्या जोडीचा फॉर्म असाच राहील का, हाही एक प्रश्न आहेच.
>>>>>>>>
हो, भारतात आल्यावर बरीच समीकरणे बदलू शकतात. आठ ठिकाणच्या आठ खेळपट्ट्या. मात्र निम्मे सामने आपल्या होमपीच वर असतात हे हि विसरू नये. पंजाब आपली खेळपट्टी मॅक्सवेल, मिलर, बेली, सेहवाग या क्लीन हिटर्सच्या सोयीनेच बनवेल अशी अपेक्षा.
खास करून राजस्थान आपल्या होमपीच वर खेळण्यास फार उत्सुक असेल.
अब आयेगा असली
अब आयेगा असली मजा.................
पंजाब आपली खेळपट्टी मॅक्सवेल,
पंजाब आपली खेळपट्टी मॅक्सवेल, मिलर, बेली, सेहवाग या क्लीन हिटर्सच्या सोयीनेच बनवेल अशी अपेक्षा. >> मोहाली तशीच तार आहे, बॅटींगचे नंदनवन.
Pages