मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एकही धडा / कविता आठवत नाहीये.

ओळखलतं का सर मला आणि फटका ह्या कविता आठवल्या.

ही कविता आम्ही 'एक हो गये हम और तुम..'(हम्मा हम्मा) च्या चालीवर म्हणायचो.. <<< पराग, Lol मीही कल्पना करून पाहिली अख्खा वर्ग कोरसमध्ये ती कविता गातोय... विशेषतः तिला माहेरी बोलवा वा वा वा रे.. धमाल येत असणार Proud

मस्त धागा आहे Happy
मला यातले खेळखंडोबा, वळीव आणि एवरेस्टवरचा सोडुन कुठलेच धडे आठवत नाहीत. Uhoh
गौतमाची कथा सांगणारा एक धडा आठवतोय. गंगाधर गाडगीळ यांचा होता का?
अजुन अंटार्टिकाचे अनुभव सांगणारा धडा आठवतोय.

लेकीसाठी मराठी बालभारतीचे पुस्तक आणायला हवे. ती गोष्टी म्हणुनतरी वाचेल Happy

गौतमाची कथा सांगणारा एक धडा आठवतोय <<< बुद्धाची का? तोडणे सोपे जोडणे अवघड?

बुद्धाच्या बालपणावरही एक होता (राजकुमार सिद्धार्थ)
तो आणि त्याचा सावत्र (?) भाऊ बागेत खेळत असताना त्याचा भाऊ बाणाने एका हंसाला वेधतो. हंस कळवळतो. सिद्धार्थ लगेच हंसाजवळ जाऊन त्याला उचलून घेतो, त्याला पाणी पाजतो, त्याची काळजी घेतो वगैरे. पण मग त्या दोन भावांमध्ये भांडण सुरू होते. हंसावर हक्क कोणाचा? भाऊ म्हणतो हंसाला मी मारलाय. तेंव्हा त्याच्यावर माझा हक्क आहे. तर सिद्धार्थ म्हणतो, नाही. त्याला मी वाचवलाय म्हणून तो माझा आहे. मग निवाड्यासाठी हा खटला राजदरबारापर्यंत जातो, वगैरे वगैरे.

चार दिसांवर उभा, ओला श्रावण हिरवा..
न्याया पाठवा भावाला, तिला माहेरी बोलवा..

ही कविता आम्ही 'एक हो गये हम और तुम..'(हम्मा हम्मा) च्या चालीवर म्हणायचो.. फिदीफिदी @पराग मस्तच! मी पण म्हणून बघीतली..खुप मजा येत असेल कोरस मधे म्हणताना!

हो. मला होता. बुद्धांना जेवण देता यावे म्हणुन आपले केस विकणारी सुकेशिनी. शेवटी बुद्ध डोक्यावर हात ठेवतात तेव्हा तिचे केस परत मिळतात तिला.

पेरुची फोड , कमल नमन कर, आठवा ना कोणी.
देवाचा देव लंगडा कविता , व कृ निकुंबांची माहेरा ची सय अशी काहीतरी कविता होती. कविच नाव चुकल म्हणून पानभर लिहून काढायची शिक्षा मिळाली होती Wink आता तेच लक्षात आहे फक्त.
इंदिरा संतांची बाभूळ (बहुतेक) त्यातल धुंद सुवासिक पिवळे उटणे आठवतय. (हे झाड शोधून वास खरच येतो का हे शोधायला गेल्यामुळे आठवतय Wink )
राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ही पण Happy ती आम्ही ऐ दिल मुझे मुझे बता दे च्या चालीवर म्हणायचो . गंमत म्हणजे ही सिनेमाचालीची कवीता पूर्ण लक्षात आहे बाकीच्या कवितांची एखादी ओळ.
मी मराठी अभ्यासाचा विषय म्हणून सातवीत शेवटचा शिकले . त्यातल यवढच आठवल .

इन्ना, हो, ती बाभूळ आठवतेय - लवलव हिरवी गार पालवी, काट्यांची वर मोहक जाळी..... (पण ती आम्हाला आठवीनंतर कधीतरी होती)... पण ती शांता शेळक्यांची होती ना? का दोन्ही वेगळ्या कविता आहेत?

शिवाय राजास जी महाली ला आम्हीही तीच चाल लावायचो Wink

त्याशिवाय अन्योक्ती होत्या वेगवेगळ्या

इंदिरा संतांची बाभूळ (बहुतेक) त्यातल धुंद सुवासिक पिवळे उटणे आठवतय. <<< हो आठवली! मस्त होती ती कविता.:)
वेलांटीची इवली इवली... अशाही काही ओळी होत्या, बाभळीच्या शेंगांचं वर्णन करणार्‍या. आणि मी आणि बहीण त्या वेलांट्या बघायला एकदा दूरवर असलेल्या बाभळीच्या झाडाकडे गेलो होतो खरेच.

इन्ना आणि वरदा....

आपण दोघी "बाभळी" या कवितेबद्दल बहुतेक बोलत आहात का ? इंदिरा संतांची ही एक प्रसिद्ध कविता. बी.ए. ला असलेला माझा रूममेट (त्याचा मराठी विषय होता स्पेशलला) मोठ्या आवाजात हीच कविता म्हणत असे.

छान किती दिसते फुलपाखरू ,
ह्या वेलींवर फुला फुलांवर
रम्य..
ही पण आठवली.
हैला बरच आठवतय की.
सिबीएस्सी वाले आहेत का कोणी. मला इंग्लीश आणि हिंदीतले पण बरेच धडे आठवतायत. Happy
खुब लडी मर्दानी वो तो झासी वाली रानी थी. प्रेमचंद यांच्या कथा. सरोजिनी नायडूं ची पॅलन्क्विन कविता. आणि ब्युटिफूल बिस्ट नावाची कविता.
टागोरांच्या 'लेट माय कंट्री अवेक' आणि कॅन यु नॉट हेअर हिज सायलेंट स्टेप्स. (ह्या बहुधा अवांतर अभ्यासलेल्या होत्या )

वरदा, असेल ग. आता मला पान्भर कवयत्रीच नाव लिहायची शिक्षा नको देउस Wink

वरदा, काल मीही ह्या साईट्स धुंडाळायला गेले होते पण एकतर लिंक्स उघडत नव्हत्या आणि आमच्या आठवी-नववी-दहावीची तर दिसलीच नाहीत ( कुमारभारती वेगळे असावे.) त्यामुळे नाद सोडला.

गंगाधर गाडगीळ ह्यांचा क्रिकेट बघायला जातात तो एक धडा होता. शेवटी घरी बसून मॅच बघितलेली बरी असा त्यांना साक्षात्कार होतो Happy
शांता शेळक्यांची 'पैठणी' कविता होती, कुसुमाग्रजांची 'कणा' आणि 'कोलंबसाचे गर्वगीत' होत्या. बालकवींची 'पारवा','जलदाली मज दिसली सायंकाळी' ही एक अत्यंत नादमय कविता होती. एक फटका होता तो कुणाचा होता ?

बर्‍याचदा पुस्तकातले पहिले एक- दोन धडे शिवकालीन, पेशवेकालीन भाषेत असायचे आणि ते तुलनेने छोटेही असायचे.

कवितांना कुणी 'ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है' ही चाल लावायचं नाही का ? Proud

कवितांना कुणी 'ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है' ही चाल लावायचं नाही का ? <<<

अगो, हो तर. या चालीत आम्ही 'गे माय भू तुझे मी, फेडीन पांग सारे, आणीन आरतीला, हे सूर्य चंद्र तारे' ही कविता म्हणायचो. Proud

तुम्ही कोणती म्हणत होतात?

Pages