मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खेळखंडोबा... donkey che monkey झालेल असत. शिरगणती करण्यासाठी. आता लय नौस्टेल्जिक व्हायया लागलय. रात्री बसुन बखर काढतो. Happy

आणि ५ वीत होता ना....बहीण भाउ चित्र काधत असतात. बहिण विचारते पिवळा रंग कसा तयार करु..भाउ बोलतो " मला वाटते की हिरव्यात निळा मिसळला की पिवळा तयार होतो "
या धड्याचे नाव आठवत नाहीये

आगाऊ, कुरुंदकरांच्या शिवाजीच्या धड्याबद्दल एकदम अनुमोदनच. शिवाय जी.एंची अश्वत्थामा ही कथा पण होती धडा म्हणून कधीतरी ८-९वी ला

चौथीच्या (?) पुस्तकात एक 'दुधावरची साय' नावाचा धडा होता तो आवडायचा.

ना.सी.फडक्यांचा एक टीपिकल, व्यवच्छेदक इ.इ..ललित निबंधही आठवतो, त्यांना दाढी करताना सगळ्या कल्पना सुचतात असा काहीतरी.

आठवीच्या पुस्तकात एक कविता होती 'एक अश्रू' नावाची.. ती आठवते का कोणाला..
मला त्यातल्या अगदी एक दोन ओळी आठवतात फक्त. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, शहिद झालेल्या सैनिकाच्या घरी वातावरण कसं असतं त्यावर होतं..

----------, श्रुंगारली आळी झगमगे.
तोरणे पताका सांगती डोलून स्वातंत्र्याचा दिन उगवला.

असं काहितरी.. छान होती ती कविता..

रेडीओची गोष्ट मस्त होता, सहावीत एक 'मोहिम फत्ते' म्हणून धडा होता अंटार्क्टिका मोहिमेबद्दल.. तो ही भारी होता..
खेळखंडोबा म्हणजे माकडांची शिरगणतीवाला ना ?

भाउ साहेब की आण्णा की आप्पासाहेबांचा मुलगा युद्धामधे शहीद होतो तर ते सर्वांना ओरडतात की तो शहीद झालाय रडता कसले...आजारपणात युद्धाच्या बतम्या ऐकत ते बरे होउ लागतात....
एक दिवस रेडिओवर बातमी आली युद्धबंदीची.....आणि ते म्हणाले " युद्ध बंद?? म्हणजे?? " आणी छातीत कळ येउन ते पडले...

हा धडा आठवतोय??? युद्ध कदाचीत

अनिष्का मला तू लिहिलेले सगळे धडे होते Happy
माझी दहावी २००५ ला झाली Happy
आमच्या थोड्याश्या आधी पोर्शन बदललेला, बहुदा तुझ्या पासुनच बदलला असेल.
त्या आधी एका फीमेल रोबोट, सावकाराछ्या मुलीला हसवणारा बंडू का कोण त्यांचे धडे होते (आई शिकवायची मुलांना तेंव्हा तिचं पुस्तक घेऊन मी वाचत बसायचे ) ते धडे आम्हाला नव्हते.
अनू करेक्टेस!

हम्म्म, बाजारच बहुतेक.
गावातल्या शिंप्याचे व्यक्तिचित्र असलेला एक धडा ही आठवतो, त्याला एक उदास टोन होता.

@पराग
आठवीच्या पुस्तकात एक कविता होती 'एक अश्रू' नावाची.. ती आठवते का कोणाला.>>>हो ती वि. म. कुलकर्णींची कविता होती

स्वातंत्र्याचा सण दारात रांगोळी शृंगारली आळी झगमगे

@ वरदा
जी.एंची अश्वत्थामा ही कथा पण होती धडा म्हणून कधीतरी ८-९वी ला >> त्या कथेचं नाव भेट. खूपच आवडायची मला ती

हो शिंप्याचाही सहावीत होता.. त्याच्या तंबाखू खाण्याच्या स्टाईलच डिटेल वर्णन होतं.

कोणी मसाप ची परिक्षा दिली होती का नववीत ? त्या परिक्षेला व्यंकटेश माडगुळकरांचम माणदेशी माणसं पुस्तक होतं.
त्यातली काही काही व्यक्तिचित्र छान होती. धर्मा रामोशी, तांबोळ्यांची खाला आणि एक ते संस्थानिक असतात ते पण.

धुण या कथेमधील शेवटच्या काही ओळी अंधुक आठवतायत . त्यांचा आशय पुढीलप्रमाणे असावा अस वाटतंय .

>>>> आणि तिन माझ्या हातातलं धुण ओढून घेतलं. "एवढ्या उनाची नदीला चाललीस. आजारी पडलीस तर तुझी माय येणार आहे का निस्तरायला?"

Happy

"वळीव" नावाचा एक धडा होता....(लेखक ?..इयत्ता...८ वी ?)
त्यात उन्हळ्या अचानक पाउस सुरु होतो ... तो वळीवाचा तत्त्पुरता पण तुफानी पाऊस... म्हातारी इकडे गावातल्या घरात आहे.... म्हातारा रानात आहे...(हो धड्यातदेखिल लेखकाने म्हातारा आणि म्हातारी आशीच संबोधाने वापरली आहेत. ग्रामीण भागात ही कथा घडते आहे) . विजेच्या प्रत्येक गड्गडाटाबरोब्रर तिची म्हातार्‍याबद्दल वाढत जाणारी काळजी,....कारण म्हातारा पायाळू आहे अन त्याला विजेपासून भय/धोका आहे...लेखकाने, तिच्या जिवाच्या उलघालिचे वर्णन आणि वळीवातील वातवरण निर्मिती खुप छान केली आहे आणि कथाही छान रंगवली आहे...
वातावरण हळू ह्ळू निवळ्त आणि म्हातारा घरी येतो... त्याचा आवाज ऐकताक्षणी म्हतारीच्या मनातला वळीव देखील शांत होतो....

बाई खुप छान शिकवायच्या हा धडा...अगदी म्हातारीच्या पात्राशी समरस होऊन..अजुन आठवतोय..

आगाऊ, मी सातवीपर्यंत तुझ्यापेक्षा जुन्या अभ्यासक्रमाची पुस्तकं वापरली आहेत. आमच्यानंतरच्या बॅचला पुस्तकं बदलत गेली (तिसरी ते सातवी) त्यामुळे तू वरती लिहिलेले कुठलेच धडे माहित नाहीत.

फडक्यांचा ललितनिबंध वाचल्यासारखा वाटतो आहे, पण विषय आठवत नाही.

चिमणराव >> ४ थी

डॉल्फिन .>>> ५ वी
माझ्या शाळेत मराठे शिकवणार्या बाई होत्या जळगाव च्या..त्या अस बोलायच्या .. " डाल्फिन माणसाबरोबर वाटरपोलो खेळतो" मग मी विचारलं " बाई वॉटरपोलो म्हणजे काय? " तर त्यांनी उत्तर दिलं.. " ते नं.....ते एका व्यक्तीचं नाव आहे"

फीमेल रोबोट,>>> रोहिणी की असच काहीतरी नाव....तिच्या कपाळावरील टिकलीचं बटण दाबल की ती सांगु ते काम करीत असे..आणि पार्टी चा सत्त्यानाश पण करते..... ५ वीत होता हा धडा

१२ वीतली गुलकंद कविता कोणाला आठवतेय??
एका मुलाच प्रेम एका मुलीवर असतं. तो तीला रोज एक गुलाबाच फुल देत असे. महिनाभरानंतर ती मुलगी एक बरणी घेउन येते आणि त्याला देउन म्हणते की तुम्ही दिलेल्या फुलांचा मी गुलकंद केला. मग हृदयासाठी औषध म्हणुन तो तोच गुलकंद खातो.... Rofl

भावाला अंधत्व यायला लागल्यावर त्याला गुपचूप दुसर्‍या गावी डॉक्टरकडे नेणार्‍या बहिणीची कथा होती, ह.ना. आपटेंची.
चिमणराव >> ४ थी ... बरोबर अनिश्का.. आणि ७वी त पण होते.

Pages